ग्रेसाळ

 प्रिय 

अदृश्य वाटांची पाऊलखुण सोडवण्याच्या अलौकिक छंदात मी सापडत नाही . सृशनशीलतेचे भाषीक आरण्य पचवून त्याचा पाचोळा सोडून तुम्ही जीवनबंदी करून निघून गेलात अन आता मोहफुलांच्या निळ्या गगनमय राशी अंथरत हे प्रवासी म्हणतायत हा वेलू आम्ही गगनावरी चढवणार . मूर्तीच्या समूर्त हस्तिदंती त्वचेला हत्तीचे शहाणपण समजणाऱ्या ह्यांच्या प्राक्तनपापणीला मी कोणता उखाणा घालू ? मृत्यू सांज नसतो हे तुम्हीच सांगीतिक बंदिशीत ठिय्या देऊन समजावलं न्हवतं का त्या अंतिम हातांच्या भेटफेडणीत ? रक्ताच्या पाठलागावर हृदय भरून आलंय अन टपोरे गुलाबांचे लाल धबधबे शरीरतीरांना जगण्याच्या वासनेत थोपवतायत . 

एक युग सरलं तरी सौंदर्याची उकल काही होत नाही चमत्कारांवर माझा विश्वास नाही पण तुमचा भाषिक पुनर्जन्म झाला तर तो मराठी भाषा निवडेल ? कि उपेक्षाभंयाने भाषेवर फुंकर घालत तो आंग्लगात्रात अत्तरासारखा सळसळेल ? क्षितिज अंतिमतः काल्पनिक घन असते हे सांजभूलीला समजावत मी सजनीसह चांदण्यात बसलोय .तुमच्या कावळ्याची आकाशभाकीते आता पृथ्वीमय झालेत हा त्यांच्या शहाणपणाचा तल्लखपणा न्हवे काय ?चांदणशय्येवर जळणारी चंदनराने श्वासात उमलतायत परंपरेचा वध करायला निघालेला माझा बाण सौंदर्याचे चुंबन घेऊन परततोय करुणेला सुन्नता जडत नाही कारण तिला शून्याने खिळवून ठेवलेले असते खरा सौंदर्यप्रेमी स्त्रीच्या स्तनांवर निखारा ठेवत नाही स्तन तर साऱ्या निखाऱ्यांचे अंत असतात 

तुमचाच 

श्रीधर तिळवे नाईक 

(हे लिखाण २०२३ मध्ये आयुष्याची चोवीस वर्षे उलटूनही रोमँटिक राहिलेल्या लोकांसाठी आहे ज्यांना कळावे आम्हीही असले सौंदयवादी लिखाण करू शकतो ह्यासाठी ! बाकी तुमचे ग्रेसाळ चोचले चालू द्या )

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय