अनुशासन , कर्मफल आणि समाज श्रीधर तिळवे नाईक
शिव हे शून्य आहे तिथे अनुशासन उपस्थितच नाही पण शक्तीचे असे नाही तिथे अनुशासन उपस्थित आहे हे अनुशासन काय आहे तर ते यम आणि नियम यांच्याप्रमाणे चालते आणि म्हणूनच यम आणि नियम यांच्या आधारे विधी नियम आणि अधिनियम तयार केले जातात विधी नियम म्हणजे कायदे होय तर अधिनियम म्हणजे त्या त्या संस्थांचे त्या त्या संघटनांचे त्या त्या संघाचे नियम !
शक्ती ही नेहमी अनुशासनाने चालते जो कोणी या अनुशासनामध्ये आडवा पाय टाकतो त्याचा पाय आपोआप कापला जातो .त्याउलट शासन मात्र विधी नियम आणि अधिनियम यांच्या हिशेबाने चालते विधी नियम आणि अधिनियम यांच्या हिशेबाने चालणारे जे शासन असते त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला आपण प्रशासन यंत्रणा म्हणतो
शक्तीसाठी अनुशासन सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि मोक्ष जोपर्यंत तुम्ही अनुशासन स्वीकारत नाही तोपर्यंत मिळत नाही
वैदिक धर्मा नंतर जेव्हा ब्राह्मण धर्म आला तेव्हा सत्ताप्राप्तीसाठी ब्राह्मण धर्माने हे सर्व काही धुळीला मिळवले आणि त्यामुळेच पुन्हा एकदा हे सर्व सांगणे गरजेचे बनले आणि त्यातूनच मग नकुलीश, कपिल , महावीर आणि गौतम बुद्ध या चौघांना अनुक्रमे पाशुपत , सांख्य , जैन आणि बौद्ध या टायटल खाली पुन्हा एकदा धम्म सांगायला लागला अनुशासन सांगावे लागले .
धम्म धर्म या शब्दाचा चौघांनाही अभिप्रेत असलेला अर्थ हा अनुशासन हाच आहे गौतम बुद्ध कधी कधी याला धम्म म्हणतो तर कधी कधी शिस्त म्हणतो आणि स्वतःला शास्ता म्हणवतो जो शिस्त देतो तो शास्ता होय आपल्याकडे ब्रिटिश लोकांच्या प्रभावाने आपण संस्थापक धर्म संस्थापक अशा गोष्टी आणल्या परंतु भारतीय संस्कृतीत त्या बसत नाहीत . अनुशासक किंवा शास्ता हेच खरे शब्द ! भगवान शिव हा पहिला अनुशासन किंवा पहिला शास्ता होय त्याच्या आधारे एक संपूर्ण सिंधू सभ्यता नावाची सभ्यता उभी राहिली.
यानंतर भारतात इलेक्शन लोक आले युरेशियन लोक आले आणि त्यांनी हळूहळू आश्रयाच्या आधारे शिरकाव करत नंतर यज्ञ संस्थेच्या आधारे जमीन बळकवायला सुरुवात केली .
भगवान शंकर ,भगवान नकुलीश ,भगवान कपिल ,भगवान महावीर आणि भगवान बुद्ध हे भारताचे खऱ्या अर्थाने पहिले शास्ते होय पहिले अनुशासक होय
मात्र भगवान शिव यांच्या कालखंडामध्ये कर्माचे प्रश्न इतके गुंतागुंतीचे झालेले नव्हते ते पुढे झालेले दिसतात आणि या प्रश्नाचे उत्तर कर्मफल सिद्धांताच्या रूपाने देण्यात आले मुळातच हा सिद्धांत सुचण्यासाठी शेती ही मुख्य व्यवसाय बनणे खूप आवश्यक असते कारण मुळातच कर्माचे बीज असते आणि या बीजाप्रमाणे वृक्ष आणि फळ येतात अशी ही संकल्पना आहे. भगवान शंकर कर्मफल सिद्धांत मानत होते की नाही हा एक फार वादाचा प्रश्न आहे. गौतम बुद्ध धम्म आणि कम्म यांच्या आधारे संपूर्ण जगत चालते असे सांगतो म्हणजेच एका अर्थाने अनुशासन म्हणजेच शिस्त आणि कर्म यांच्या अनुसार फळ मिळते .
भक्तीने या सगळ्यांमध्ये नंतर जो प्रॉब्लेम निर्माण केला तो हाच होता की तिने ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्या प्रभावातून ईश्वर हा सर्व काही माफ करतो अशी संकल्पना आपल्याकडे आणली . प्रत्यक्षामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये ही संकल्पना नाही तुम्ही केलेल्या कर्मांची फळे तुम्हाला चुकत नाहीत असेच भारतीय संस्कृती सांगते पण आपल्याकडच्या राजे लोकांना आपल्या पापाची फळे मिळू नयेत म्हणून दिलासा हवा होता आणि भक्तीने हा दिलासा दिला ईश्वर दया वान आहे वगैरे वगैरे संकल्पना त्यातून आल्या प्रत्यक्षात ईश्वर काहीही दयाळू नये तो फक्त महाप्राण आहे आणि तुमच्या कर्माची फळे तुम्हाला देतोच देतो त्यामुळे ज्या राजकारणी लोकांना असे वाटते की आपण कर्मातून सुटू ते एका भ्रमात आहेत त्यांच्या कर्माची फळे सुद्धा त्यांना भोगावी लागणे अटळ आहे. मग तो राजकारणी राहुल गांधी असो नरेंद्र मोदी असो नाहीतर फडणवीस असो. हल्ली अनेक राजकारणी लोकांना असे वाटते की कर्मापासून त्यांची सुटका होईल ते एका भ्रमात जगत आहेत कर्मापासून कोणीही सुटलेला नाही. तुम्हीही सुटणार नाही आहात . तुम्ही किंवा तुमच्या पुढच्या पिढ्या तुमच्या कर्माच्या फेऱ्यात सापडणे अटळ आहे. प्रॉपर्टी म्हणून फक्त जमीन जुमला मिळत नाही आई-वडिलांची कर्म फळे ही मिळतात. तुमचा बाप दुष्ट सैतान असेल आणि तो बरीच प्रॉपर्टी सोडलेला असेल तर या भ्रमात राहू नका की तुमच्याकडे फक्त प्रॉपर्टी येईल त्याबरोबर कर्मफळे येणारच येणार .असो .
मोक्ष ही काही फक्त चर्चेची गोष्ट नव्हे सार्वजनिक जीवनात ती शिस्त निर्माण करते अनुशासन निर्माण करते धम्म निर्माण करते आणि मग त्याच्याच आधारे विधी नियम आणि अधिनियम बनतात अर्थात आपण जर का यादृष्टीने गौतम बुद्धाने संघासाठी दिलेले नियम पाहिले तर ते अधिनियम आहेत हे सहज लक्षात येईल ते फक्त संघापुरते आहेत विधी नियम काय असावेत हे मात्र गौतम बुद्ध ठामपणे सांगत नाही कारण कळत नकळत याबाबतीत तो शैव आहे. जो राजा आहे किंवा जो गणपती आहे त्याने विधी नियम ठरवावेत कारण विधी नियम किंवा अधिनियम हे नेहमीच काळाप्रमाणे ठरत असतात अशीच बहुदा त्याचीही धारण असावी. अर्थात अनुशासन म्हणजेच यमनियम मात्र बदलत नाहीत ते एका अर्थाने सनातन आहेत . बुद्धाच्या भाषेत सांगायचे तर हा धम्म सनातन आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी असते की अनेकदा लोक विधी नियम आणि अधिनियम सुद्धा प्राचीनच ठेवू इच्छितात त्यातूनच मग मनुस्मृतीचा आग्रह निर्माण होतो . वास्तविक मनुस्मृती म्हणजे अनुशासन नव्हे मोक्ष कसा मिळवावा हा मनुस्मृतीचा विषय नव्हे त्यापेक्षा राजाने कसे वागावे आणि राज्याचे विधी नियम काय असावेत या संदर्भात हे नियम आहेत. ती नेमकी कोणत्या राज्यासाठी लिहिली गेली होती हे आजही स्पष्ट नाही .
प्रत्यक्षामध्ये धर्म म्हणजे मूळ अर्थ विधी नियम असाच होता जैन आणि बौद्ध धर्माने हा अर्थ बदलून कारण नसताना त्याचा अर्थ अनुशासन असा केला आणि पुढचा सगळा गोंधळ त्यातून निर्माण झालेला आहे त्यामुळेच धर्म आणि मोक्ष या एकच गोष्टी होऊन बसल्या . तोपर्यंत ह्या दोन गोष्टी स्वतंत्र होत्या . याबाबतीत बहुदा या दोघांना असे वाटत होते की आपण जर का मोक्ष हाच धर्म केला तर धर्म अधिक सुसंस्कारित होईल . पण या मधला प्रॉब्लेम असा आहे की धम्म दिला गेला तर ठीक आहे पण धम्माच्या ऐवजी जर धर्मच आला आणि तो जर का ब्राह्मण धर्म असेल तर मग काय करणार ? महावीर आणि गौतम बुद्ध यांना कधीही ही शक्यता लक्षात आली नाही त्याउलट शैव धर्माने मात्र सुरुवातीपासूनच विधीनियम आणि मोक्ष या दोन भिन्न गोष्टी मानलेल्या आहेत ( शैव धर्मामध्ये या दोन गोष्टी भिन्न असल्यामुळेच शिवाजी महाराज स्वतःचे विधी नियम तयार करू शकले आणि ब्राह्मणांचीही मुलाहिजा ठेवणार नाही असे सांगू शकले)आणि काळाप्रमाणे विधी नियम, अधिनियम ठरवावेत अशी भूमिका घेतली आणि ती योग्यच आहे संस्थांचे आणि शासनाचे नियम हे नेहमीच बदलत असतात . काल नवीन नवीन ज्ञानविज्ञान घेऊन येत असतो आणि त्यानुसार हे नियम बदलावे लागतात . भगवान शंकर यांना याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी विधी नियम वेगळे केले आणि ते करण्याची जबाबदारी गणपतीवर सोपवली गणपतीने पहिले विधीनियम तयार केले म्हणूनच त्याची पूजा केली जाते.
महावीर आणि गौतम बुद्ध यांनी हे चित्र बदलले त्यामागे त्यांचा हेतू खूप छान होता पण दुर्दैवाने ब्राह्मणांनी तो चुकीच्या दिशेने नेला ब्राह्मण धर्मामध्ये एकही ब्राह्मण असा निर्माण होऊ नये जो स्पष्टपणे सांगेल की विधी नियम किंवा धर्म हा काळानुसार बदलतो हे केवळ आश्चर्य नाही तर हा कर्मठपणा आहे . समाजाला धारण करतो तो धर्म अशी जर व्याख्या असेल तर मग धर्म सनातन कसा असेल ? तो काळानुसार बदलणे अटळ आहे. ब्राह्मण धर्माने ही गोष्ट कधीही मान्य केली नाही त्यांनी कायमच धर्म सुद्धा सनातन असतो असे सांगायला सुरुवात केली म्हणजे इथे बुद्धाचा दुरुपयोग झाला . बुद्धाने जे सांगितले होते ते धम्म सनातन आहे असे सांगितले होते धर्म नव्हे . पण मुळातच धम्म हा शब्द दिल्याने सगळा गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्ष मूळउपदेशामध्ये अनेकदा बुद्ध शिस्त असा शब्द वापरतो तो अनुशासन या अर्थानेच वापरतो हे लक्षात घेण्याजोगे आहे नंतरच्या बौद्ध पंडितांच्या हे लक्षात आलेली दिसत नाही त्यातून मग ब्राह्मण लोकांना वाव मिळाला आणि त्यांनी धम्म सनातनच्या ऐवजी धर्म सनातन आणले . त्यामुळे खुद्द ब्राह्मण धर्मामध्ये जन्मलेल्या परंतु मोक्षाच्या दिशेने गेलेल्या ज्या ब्राह्मणाला काही नवे सांगायचे असते तो चक्क ब्राह्मण धर्माचा त्यागच करताना दिसतो . अष्टावक्र सारखे काही ब्राह्मण तर धर्माच्या नावाखाली मोक्षाबद्दल बोलतात स्वतःची गीता सांगतात आणि सामाजिक धर्माबद्दल मौन पाळतात .
भारतात जो सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे त्याचे कारण मोक्ष आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत हे न कळल्यामुळे झाला आहे . मी फार पूर्वीपासून सांगतो आहे की आपल्याकडचे सिद्ध, ऋषी आणि मुनी मूर्ख नव्हते त्यांनी या दोन गोष्टी भिन्न केल्या होत्या कारण त्यांना हे पूर्णपणे माहिती होते की या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत.
आता सुद्धा अनेकदा असे होते की ब्राह्मणी हिंदुत्व हे बरोबर या दोन्हीची सर मिसळ करत बसते आणि नवीन नवीन दंतकथा निर्माण करताना दिसते. ब्राह्मण धर्माचा किंबहुना जगातल्या सर्वच धर्मांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांचा आधार विज्ञान नाही तर दंतकथा आहे . त्यामुळेच पुन्हा एकदा नवीन नवीन दंतकथा जन्माला घालून इतर धर्मांना ना मोहरम करण्याचा प्रयत्न आता ब्राह्मणी हिंदुत्व करताना दिसते . आश्चर्याची गोष्ट अशी की लोक त्यामध्ये फसत आहेत . शिक्षण इज माय टीचर फिक्शन इज मायटियर than truth' हे हल्ली वारंवार प्रत्येकाला प्रत्ययाला येताना दिसते.
वास्तविक गौतम बुद्धाने संघासाठी अधिनियम सांगितले पण धम्म मात्र संपूर्ण जगासाठी सांगितलेला आहे कारण तो अनुशासन आहे ब्राह्मण लोक काय करतात तर ते शासन यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छितात आणि त्यासाठी मनुस्मृति सारख्या ग्रंथांचा धर्मग्रंथ म्हणून प्रचार करत गीतेचा धर्मग्रंथ म्हणून प्रचार करत ब्राह्मण धर्माचा सनातन धर्म नावाने प्रचार करत स्वतःला हवा तसा वापर करतात . ज्याप्रमाणे मौलवी लोकांना शेवटी शरीयत आणायचे असते तसेच सनातनी ब्राह्मण लोकांना मनुस्मृती आणायची असते. या लोकांचा कर्मफल सिद्धांतावर अजिबात विश्वास नसतो किंवा त्यांना आतून पुनर्जन्म मान्य नसतो हे लोक अत्यंत जडवादी आहेत त्यांना हे पूर्ण माहिती आहे की एकच जन्म असतो आणि या जन्मात आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचे पण कल्याण केले पाहिजे त्यामुळे साहजिकच आपणच एकदा वरचढ वर्ण म्हणून स्थापित झालो की आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदा मिळेल हे त्यांना माहिती आहे . सात पिढ्यांचे कोटकल्याण हे त्यातून होते . इसवी सन नव्या शतकानंतर ब्राह्मणांनी असे सात पिढ्यांचे कल्याण साधायला सुरुवात केली. पण त्यांच्या नशिबाने हे फार काळ चालू राहिले नाही कारण यासाठी त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली ती आक्रमण परतवण्यामध्ये सक्षम नव्हती. त्यामुळेच भारताची वर्णव्यवस्था मूठभर मुस्लिमांचा सुद्धा मुकाबला करू शकली नाही याला जबाबदार ब्राह्मण धर्म होता .
या आक्रमक मुस्लिम लोकांनी आणि राजवटींनी काय केले असेल तर ते म्हणजे त्यांनी ब्राह्मण लोकांच्या पिढी जात इस्टेटी काढून घेतल्या ब्राह्मण गरिबी बनला तो मुस्लिम राजवटीत ! त्यामुळेच ब्राह्मणांच्या विषयीचा मुस्लिम लोकांचा आणि मुस्लिमांच्या विषयी ब्राह्मण लोकांचा असलेला राग हे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे . कधी कधी द्वेषातून प्रेम पण निर्माण झालेले दिसते विशेषता जेव्हा मुस्लिम राजवटी ब्राह्मणांच्या फेवर मध्ये होत्या तेव्हा तेव्हा त्या मुस्लिम राजवटींना किंवा त्या मुस्लिम राज्यकर्त्याला ब्राह्मण धर्माने किंवा ब्राह्मणांनी किंवा त्या ब्राह्मणाने साथ दिलेली दिसते . अर्थात क्षत्रिय सुद्धा यापेक्षा फार काही वेगळे नव्हते . त्यांनीही तेच केलेले आहे .
या सगळ्यांमध्ये कर्मफल सिद्धांत हा पूर्णपणे फापलत गेलेला आहे . इस्लाम मध्ये मुळातच तुम्ही कितीही पापे करा ईश्वर तुम्हाला जर का तुम्ही माफी मागितली तर क्षमा करतो अशी संकल्पना असल्याने आणि ही संकल्पना नंतरच्या अनेक पापी लोकांना सोयीची वाटल्यामुळे अनेकांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला दिसतो त्याआधी काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता . ख्रिश्चन धर्म आधी तुमच्या पापांची जाणीव देतो आणि नंतर या पापापासून मुक्त होण्यासाठी जीजस ला शरण जा म्हणून सांगतो . मुस्लिम धर्मात हे अधिक व्यापक प्रमाणात होत जाते आणि मुख्य म्हणजे तिथे कुठल्या धार्मिक सत्तेची गरजच भासत नाही . हे सर्व इबादत या संकल्पनेखाली होते जी वैष्णव धर्मामध्ये भक्ती म्हणून येते.
भक्तीने एका अर्थाने नैतिकतेचा मुडदा पाडला असे म्हणायला हरकत नाही. लोक काहीही पाप करायला तयार झाले मोकळे झाले कारण ईश्वर माफी द्यायला बसलेलाच आहे अशी धारणा आली प्रत्यक्षामध्ये ही खोटी धारणा आहे .
आज भारतामध्ये पुन्हा एकदा नव्याने भक्ती युग निर्माण करण्यात आलेले आहे आणि प्रबोधन युगातल्या पुरोगामी युगातल्या ज्ञानयुगाचा आता मूडदा पडलेला आहे याचे परिणाम समाज अधिकाधिक अनैतिक बनण्यात होणे अटळ आहे . लोकांना पाप करायला आवडते . लोकांना कायदा मोडायला आवडतो . लोकांना कायदे तयार करणारे कायदे मोडताना बघायला आवडते . लोक कायद्याचा मुडदा बसवणाऱ्या माणसाला निवडून देतात . लोकांना कायदा करणारा बलशाली वाटतो आणि त्याहून अधिक कायदा मोडणारा बलशाली वाटतो . साहजिकच राजकारणामध्ये सत्ताबली नावाची कन्सेप्ट उदयाला आलेली आहे जो सत्ताबली आहे त्याचे हुकूम सर्वत्र चालायला लागतात . नैतिकतेने अत्यंत खुजे असणारे वामन राज्य करायला लागतात . हे वामन कुठल्याही वर्ण, जात आणि धर्मात असू शकतात .
उत्तर आधुनिकतेने बाहुबली (याला इंग्लिश मध्ये डॉन म्हणतात ) नावाची संकल्पना जन्माला घातली आणि आता चौथ्या नवतेमध्ये सत्ताबली उदयाला आलेले आहेत . आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जे पुरोगामी लोक आहेत ते आपण ज्ञान युगातले आहोत हे विसरून भक्तीयुगात शरण जाऊन भक्तीला इबादतला वारकरी संप्रदायाला सपोर्ट करत आहेत . मला असे वाटते की सर्व पुरोगामी आणि आधुनिक लोकांनी आता नास्तिक व्हावे आणि धर्मावर सरळ सरळ ईश्वर नाकारून तुटून पडावे लोकांशी ऍडजेस्ट करायचे नादामध्ये आधुनिकतेने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्माशी अड्जस्ट करायला सुरुवात केली आणि आज त्याची परिणीती सर्वत्र धर्म उदयाला येण्यात झालेली आहे. उत्तर आधुनिकतेने पुन्हा एकदा धर्म केंद्रस्थानी आणला . धर्माची परंपरा ही संकल्पना केंद्रस्थानी आणली . परंपरा ही चक्क सायंटिफिक कॉज सारखी इफेक्टिव्ह कॉज म्हणजेच मान्यतेचे कारण बनवली ( म्हणजे एखाद्याने जर का असे विचारले की हे का करायचे तर त्याचे उत्तर परंपरा असे देण्यात येऊ लागले आहे परंपरा पाळणे म्हणजे काहीतरी फार महान गोष्ट पाळणे आणि परंपरा पाळणारा कोणीतरी फार मोठा माणूस असतो असा काहीतरी गैरसमज पसरवण्यात आलेला आहे )
तेव्हा मला असे वाटते की पुन्हा एकदा वेळ आलेली आहे की आपण स्पष्टपणे सांगावे धर्म वेगळा मोक्ष वेगळा . मोक्षाचा ईश्वराशी काही संबंध नाही. भक्ती हे फक्त पाच तंत्रांपैकी एक आहे . भक्ती मुळे फार मोजके लोक मोक्षाला उपलब्ध झाले आहेत आणि जे झाले ते अनुशासन पाळल्यामुळे झालेले आहेत .त्यापेक्षा जोगतंत्र म्हणजेच योग आणि ज्ञानतंत्र हे जास्त प्रभावी आहे त्या खालोखाल शक्ती आणि क्रिया तंत्र प्रभावी आहे त्यांच्यामुळे जास्त लोक मोक्षाला पोहोचलेले आहेत . भक्तीमध्ये संपूर्ण वारकरी परंपरेमध्ये धड 10 लोक सुद्धा नाहीत त्यातील निवृत्तीनाथ आणि त्यांची भावंडे हे स्पष्ट पणाने योगी आहेत . तर एकनाथ प्रथम योगी आणि नंतर भक्त आहेत . भक्ती मार्गाने मोक्षाला पोचलेले खऱ्या अर्थानं दोनच मोठे लोक दिसतात पहिला नामदेव आणि दुसरा तुकाराम त्यानंतर मग जनाबाई वगैरे काही इतर लोक येतात . या काळामध्ये किमान 1000 लोक योग मार्गाने मोक्षाला पोहोचलेले आहेत.
तेव्हा ज्यांना कोणाला चळवळ उभी करायचे असेल त्याला भक्तीचे आणि भक्ती मधल्या भगवंताचे नाही तर अनुशासनाचे शिस्तीचे अधिष्ठान पाहिजे . अन्यथा पुन्हा एकदा डार्क एज मध्ये पोहोचायला तयार राहा. पाकिस्तान पोचलेलाच आहे अनेक मुस्लिम नेशन्स पोहचत आहेत आता जर का भारताचा क्रमांक याबाबतीत येणार असेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच !
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment