युर्गन हब्बरमास , मार्क्स, आंबेडकर आणि प्राज्ञ पाठशाळा श्रीधर तिळवे नाईक
प्राज्ञ पाठशाळा च्या वतीने पाच मे 2026 ला युर्गन हब्बरमासवर व्याख्यान होते आहे ही तशी चांगली गोष्ट आहे . मी मार्क्सवादाच्या विरोधात असलो तरी ते जे काही मांडणी करत असतात त्याच्यावर माझे बारकाईने लक्ष असते ज्याच्यावर लक्ष ठेवावे असे युरोपमध्ये जे काही मोजके लोक होऊन गेले त्यामध्ये युर्गन हब्बरमास हा एक विचारवंत होते.
आपण सर्वसाधारणपणे युरोप पेक्षा एक पिढी मागे असतो. फक्त आमचीच पिढी याला अपवाद आहे चौथी नवता ही एकमेव नवता अशी आहे की जी युरोपला समांतर आहे आणि जिच्यावर भारतातील , आशियातील, युरोपमधील, आफ्रिकेतील आणि अमेरिकेतील सर्व साठोत्तरी लोकांना खोडून काढण्याची जबाबदारी पडली होती . दुर्दैवाने आपल्याकडचे नव्वोदत्तरी लोक याला पुरेसे पडले नाहीत पुढचेही लोक नुसतेच आवाज करतात प्रत्यक्षात कोणाचे काही वाचन नाही . आणि जे वाचले आहे ते आपल्याच नावाने कसे कॅश करता येईल ते बघितले जाते. प्रत्यक्ष काम मात्र कोणालाच करायचे नाही साहजिकच ९० नंतरचा discource कसा उभा करायचा हा एक फार मोठा तात्विक प्रश्न माझ्यापुढे कायमच उभा होता.
संपूर्ण साठोत्तरी पिढी ही संरचना structure आणि विरचना deconstruction या दोन बिंदूमध्ये हलताना दिसते संरचना काय आहे ते समजून घ्यायचे आणि नंतर तिची विरचना करायची तिच्या मधली भगदाडे शोधायची असा हा खेळ आहे आणि यातूनच पुढे मग उत्तर आधुनिकता जन्मली . याची सुरुवात अर्थातच फ्रेडरिक nietsche ने प्रत्येक गोष्ट कन्स्ट्रक्शन असते असे सांगून केली . त्याने या सगळ्या व्यवस्थांच्या मागे प्रत्यक्षात कुठलीही ऑब्जेक्टिव्ह व्यवस्था नसते तर ते एक पद्धतशीरपणे केलेले कन्स्ट्रक्शन असते हे उलगडून दाखवले त्याने तत्वज्ञानाची आणि तिच्या मांडण्याची एक नवीन शैली विकसित केली एक नवीन परिभाषा घडवली आणि त्याचा प्रभाव १९३० नंतर सर्वाधिक पडत गेला
पुढे संरचना ह्या सर्वसाधारणपणे अनेकदा स्थानिक असतात असा साक्षात्कार उत्तर आधुनिकतेला झाला त्यातूनच मग स्थानिक वादाची आणि काही ठिकाणी देशीवादाची वाट अनेक देशांच्या मध्ये मोकळी झाली . मात्र या लोकांना त्यांच्या ओरिजिनल सोर्सचा जो वैज्ञानिक पाया होता तो काही कळलेला दिसत नाही . याबाबतीत नेहमीप्रमाणे जे मोक्षवादी लोक होते त्यांनी बाजी मारलेली आहे म्हणजे संरचनांचा विचार आणि परंपरांचा विचार आपल्याकडे अनुक्रमे जे कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश यांनी अधिक नीट केलेला दिसतो. अस्सल साठोत्तरी विचारवंत खरे तर हेच होते यांच्यासाठी मी उत्तर आध्यात्मिक असा शब्द वापरला होता
पण आपल्याकडे आपल्या लोकांच्याकडे लक्ष देणे माहित नाही त्याऐवजी आपल्या लोकांचे लक्ष विशेषतः मराठी लोकांचे लक्ष कायमच अमराठी लोकांच्याकडे असते . आपल्या मराठी माणसांची त्यांना घंटा काय कदर नसते . त्यापेक्षा परंपरेचा दणदणाट करणारे नेमाडे जास्त चालतात पण त्यापेक्षा अधिक खोलात जाऊन काही करू इच्छिणारे लोक त्यांना नको होते दुर्दैवाने आपल्याकडे त्या अंगाने फारशी डेव्हलपमेंट पण होत नाही . वास्तविक या काळातल्या साठोत्तरी लोकांची ही फार महत्त्वाची जबाबदारी होते की त्यांनी सर्व युरोप मधले साठोत्तरी लोक या काळामध्ये तत्त्वज्ञानाच्या पातळीवर आयात करायला हवे होते पण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातल्या काही लोकांनी काही अंकांमध्ये लिहिलेल्या लेखांचा ( उदाहरणार्थ परामर्श)अपवाद वगळता या अंगाने फार काही मोठी मांडणी झाली नाही . त्यामुळे विद्यापीठाच्या चौकटीत काही प्रमाणामध्ये ही आयात नीट झाली अजूनही ही आयात मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.
भारतामध्ये डाव्या मार्क्सवादी लोकांनी ज्या विचारवंतांकडे लक्ष देणे आवश्यक होते त्यामध्ये युर्गन हब्बर मास हा क्रमांक एक आहे कारण त्याच्यावर कळत नकळत मार्क्सवादाचा पगडा शेवटपर्यंत राहिला आणि कळत नकळत तो सामाजिकतेच्या अंगाने कायमच विचार करत राहिला जरी त्याने आपले नाते फ्रँकफूर्ट घराण्याशी तोडले आयुष्यात सोशल ऍक्शन चा विचार तो कधीही वजा करू शकला नाही .
आमच्यासारख्या लोकांसाठी त्याचा pragmatism शी असलेला संबंध या अंगाने फार महत्त्वाचा होता अर्थातच तो काही तिथे थांबणारा मनुष्यच नव्हता . पण साठोत्तरी काळामध्ये ज्ञानाचा विचार व्यवहारवादाला वगळून करता येणे फार अवघड झाले त्यामुळे मार्क्सवादी असणाऱ्या अनेक विचारवंतांना व्यवहारवादाचा विचार करण्याची वेळ आली. त्यातूनच पुढे मग व्यवहार वाद विरचित करत एक नवा उत्तर व्यवहार वाद आकाराला यायला लागला. हब्बर मास याचा यामध्ये नक्कीच खारीचा का असेना पण वाटा होता .
पुरोगामी वाद भांडवलशाहीशी निगडित असेल तर आधुनिक वाद हा कार्पोरेटशाहीशी निगडित होता त्याला हब्बरमास न्यू कॅपिटलीजम म्हणतो मुळात हा शब्दच तो मार्क्सवादामध्ये अडकल्याचे लक्षण होते . कारण कॅपिटलीजम आणि मर्कंटालिझम यांच्यामध्ये जो फरक आहे तोच फरक कार्पोरेटिझम आणि कॅपिटलीझम यांच्यामध्ये आहे ज्याप्रमाणे धर्म युगामध्ये शेती केंद्रस्थानी होती आणि नंतर उत्तर धर्मयुगांमध्ये व्यापार महत्त्वाचा झाला त्याचप्रमाणे विज्ञान युगामध्ये भांडवलशाही महत्त्वाची होत गेली आणि या भांडवलवादाचे सर्वात प्रथम सर्वांगीण चित्र हे ॲडम स्मिथने केले म्हणून त्याला आपण अर्थशास्त्राचा जनक मानतो त्या उलट तंत्रज्ञान युगामध्ये कार्पोरेट वाद महत्त्वाचा होत गेला याला समांतर असे काही साम्यवादामध्ये उभा करता येणे शक्य होते का? हा खरा प्रश्न होता पण मार्क्सवादी लोकांना हा प्रश्न नीट हाताळता आला नाही अपवाद फक्त चायना होता भारतीय मार्क्सवाद या बाबतीत पूर्णच कोसळला याचे कारण भारतातला मार्क्सवाद ब्राह्मणी होत नको तितका पुस्तकी आणि शब्द प्रमाण प्रमाण मानणारा राहिला आणि यामध्ये ब्राह्मणे तर असलेले मार्क्सवादी सुद्धा एखाद्या ब्राह्मणाप्रमाणेच आपल्या मुख्य संहितांना चिपकून राहिले . अपवाद काही प्रमाणात गोविंद पानसरे होते किंबहुना त्यामुळेच माझे त्यांच्याशी जरा जास्त चांगले पटले. मात्र त्यांचा आवाका खूप कमी होता आणि इतरांच्या बाबतीत मला माहित नाही परंतु माझ्यापुढे त्यांनी हे दोनदा कबूल केले होते . याउलट चीनमध्ये मात्र ब्राह्मण्यवाद नसल्याने तिथे मार्क्सवाद हा ब्राह्मणी झाला नाही त्याने आपल्या वाटा आपल्या पद्धतीने शोधल्या . प्रमाण पुस्तकांच्या किंवा संहितांच्या बाहेर न येणे त्यांचे प्राचीनत्व सतत जतन करणे आणि सनातनी होणे हे ब्राह्मण्य असलेल्या मानसिकतेचे सर्वाधिक मोठे लक्षण असते . हे लक्षण आपल्याला भारतीय मार्क्सवादामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आढळते आणि अलीकडे ब्राह्मणी हिंदुत्व वादामध्ये मोठ्या प्रमाणात विलसत आहे . ज्यांना जुन्या गोष्टीचा त्याग करता येत नाही त्यांना जुन्या गोष्टी गिळंकृत करतात . ब्राह्मण्यवादामध्ये वारंवार हे घडलेले आहे आणि ब्राह्मण वारंवार आपल्याच परंपरेकडून गिळले गेलेले आहेत . हब्बर मास जर का या ब्राह्मण लोकांनी वाचला असता तर कदाचित त्यांचा मार्क्सवाद हा थोडा अधिक प्रगल्भ झाला असता आणि मुख्य म्हणजे ओपन झाला असता . आता कार्पोरेट वाद मेला आहे आणि उत्तर कार्पोरेटवाद जन्मलेला आहे युर्गेन हब्बर मास हा कार्पोरेट वादाच्या चौकटीत काम करणारा मनुष्य होता आणि हे लोक हाबरमास आऊटडेटेड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या मढ्यावर बसणार आणि शवविच्छेदन करणार. आपल्याकडे तेराव्याला ब्राह्मण बोलवतात बहुदा जगामध्ये कुठल्याही विचारवंताचे तेरावे घालायचे असेल तर आपल्याकडचे ब्राह्मण त्याच्यावर चर्चा करतात किंबहुना ब्राह्मण चर्चा करतात तेव्हा ते लक्षणच असते की हा आता मेलेला आहे आणि आता साग्रसंगीत तेरावे घातले जात आहे .
पण तरीही मी स्वागत करतो कारण निदान त्यामुळे का होईना अमुक एक माणसाचे प्रेत आहे आणि त्या माणसावर मरणोत्तर का होईना पण चर्चा होत आहे .
भारतातला खरा तात्विक प्रश्न भारतीय लोक म्हणजे आपण वर्तमानात का उपस्थित नसतो हा असतो .भारतामध्ये प्रत्येक वेळेला मोक्षवादीच फक्त त्या त्या काळातल्या वर्तमानामध्ये व्यवस्थित उपस्थित असलेले दिसतात . पण मुळातच मोक्षाचा कल हा सामाजिक नसल्याने सामाजिकतेवर ज्या समकालीन चर्चा त्यांच्याकडून व्हायला हव्या त्या होत नाहीत . अपवाद कदाचित स्वामी विवेकानंद पण कदाचित त्यांना मोक्ष मिळाला नव्हता म्हणून त्यांना हे साधले असावे त्या उलट रामकृष्ण परमहंस यांना मोक्ष मिळालेला होता ते काही सामाजिक ते बद्दल चर्चा करताना दिसत नाहीत .मोक्ष मिळवलेल्या माणसाला सर्वसाधारणपणे सर्वाधिक चर्चा मोक्षावर करावीशी वाटते ते सहज स्वाभाविक आहे ते एका अर्थाने सहज स्वाभाविक आहे परंतु त्याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की बहुतेक मोक्षवादी हे समाजाच्या दृष्टीने फारसे उपयुक्त विचारवंत ठरताना दिसत नाहीत फक्त व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व काय आहे आपण काय आहोत हे कळून घ्यायला त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मदत होते . परंतु मला असे वाटते की आता आपणाला सामाजिक आणि राजकीय बाबतीत पाठ फिरवून चालणार नाही . मी स्वतः समोर जेव्हा एखादा मुमुक्ष असतो तेव्हा त्याच्याशी समग्र आणि संपूर्ण मोक्षावर आणि त्याच्याच साधनेवर चर्चा करतो परंतु फेसबुक वर मात्र मी सहसा फार चर्चा करत नाही कारण कोणीही मुमुक्ष असत नाही . मला वाटते की प्रत्येकाने हे थोडे तपासावे. लोकांचे सामाजिक राजकीय मुख्य म्हणजे आर्थिक प्रश्न जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत त्यांचे मोक्षिक प्रश्न सुद्धा पूर्णपणे उलगडणार नाहीत हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे . भारतातल्या सर्व सामाजिक राजकीय आर्थिक व्यवस्था या मोक्षाच्या विरोधात काम करतात आणि हे आता स्पष्टपणे बोलण्याची वेळ आलेली आहे याबाबतीत रामकृष्ण परमहंस यांनी एक मधली पद्धत शोधली ती म्हणजे त्यांनी सामाजिकतेसाठी राजकीयतेसाठी आर्थिक गोष्टींच्यासाठी आणि त्यांचा मोक्षाशी असलेला संबंध उलगडण्यासाठी स्वामी विवेकानंद यांची निवड केली आणि स्वतः मात्र सतत मोक्षाच्या अंगाने चर्चा केली. हा एक त्यांनी त्यांच्या पद्धतीने काढलेला सुवर्ण मध्य आहे पण हा सुवर्ण मध्य प्रत्येकाला जमलेला नाही. आपल्याकडे असे जे कृष्णमूर्ती यांच्या बाबतीत घडलेले आहे म्हणजे ते मोक्षावर बोलतात परंतु त्यांच्यापासून प्रभावित झालेले ओशो रजनीश हे मात्र सामाजिक आर्थिक राजकीय गोष्टींच्या वर बोलताना दिसतात. त्यामुळे फक्त दोनच सरचना नीट झाल्या आणि ह्या दोन्ही आगम सरचना आहेत.
तुम्ही विचाराल की याचा हाब्बर मास याच्याशी काही संबंध आहे का? तर आहे कारण त्यालाही धर्माचा झक मारत विचार करावा लागला . त्यातून त्याने पोस्ट मेट्या फिजिकल थॉट्स चा विचार केला तो करावाच लागतो तो मला पटला नाही म्हणून मग उत्तर आध्यात्मिकता ही संकल्पना डेव्हलप करावी लागली . मुळातच मोक्ष या गोष्टीशी कधीही संबंध न आल्याने हा बर मास हा ज्यू ख्रिश्चन चौकटीतच वावरताना दिसतो त्याला त्याचाही नाईलाज आहे कारण शेवटी परंपरेच्या बाहेर जाऊन विचार करणे अनेकांना जमत नाही
प्रश्न असा आहे की त्याचा जो सोशल ॲक्शन चा विचार आहे तो आपल्या रिलिजियस ॲक्शनला सुद्धा अप्लाय करता येतो का कारण तो रॅशनॅलिटीच्या संकल्पनेच्या अधिक पुढे जातो व्यक्तींच्या अंतर्गत झालेले भाषिक संवादन या अंगाने त्याने जी तपासणी केलेली आहे ती बघण्याजोगी आहे. त्याच्या एका विचाराशी मी सहमत आहे तो म्हणजे पुरोगामी वादाचा जो प्रबोधनाचा प्रोजेक्ट होता तो अजूनही अपुरा आहे आणि तो दुरुस्त correct करणे आवश्यक आहे तो संपलेला नाही आधुनिकतेने हा प्रोजेक्ट संपला अशी घोषणा केली होती परंतु भारतासारख्या देशात आजही हा प्रोजेक्ट संपलेला नाही किंबहुना आता तर त्याची अधिक आवश्यकता भासते आहे म्हणूनच आपल्याकडे पुरोगामी एवढे तळमळताना दिसतात आज त्यांना मिळणारा प्रतिसाद कमी असला तरी तो सतत मिळणे खूप आवश्यक आहे मी स्वतः पुरोगामी वादावर खूपदा टीका करतो परंतु त्यांच्या कामाशी किती आवश्यकता आहे याची मला नीट कल्पना आहे माझे म्हणणे एवढेच असते की फक्त पुरोगामी वादामध्ये अडकू नका आधुनिक वाद, उत्तर आधुनिक वाद आणि चौथी नवता यांच्यामध्ये पण या . मुख्य म्हणजे चौथ्या नवतेचे जे चिन्ह तंत्रज्ञान आहे त्याचा अत्यंत कुशलतेने वापर परंपरा करत आहे अशा वेळेला परंपरेला शह द्यायचा असेल तर तुम्हाला कळत नकळत नवतावादी भूमिका स्वीकारावी लागते आणि त्यासाठी चौथी नवता स्वीकारण्या खेरीज पर्याय नाही त्यासाठी मुळात परंपरेची उपस्थिती मान्य करावी लागते आणि ती नेमकी काय आहे ते सर्वांगाने तपासावे लागते . तिच्या मधले राजकारण तपासावे लागते . आणि हे राजकारण तपासायचे असेल तर सर्वात प्रथम धर्म ही एक राजकीय विचारप्रणाली आहे हे स्वीकारावे लागते . ही मूलभूत गोष्ट नाकारून पुरोगामी वाद चकला किंबहुना धर्माने पुरोगामी वादाला गंडवले . हाबरमासच्या हे लक्षात आलेले नाही . धर्माचा प्रभाव अंडरएस्टिमेट करण्यातून आणि ती राजकीय विचार प्रणाली आहे हे लक्षात न आल्याने हे घडले आहे . वास्तविक खोमीणीचे उदाहरण समोर असताना सुद्धा हे घडावे हे आश्चर्यच मानले पाहिजे . प्रबोधनाच्या प्रोजेक्टचा त्याग त्यामुळेच करता येत नाही पण त्यावर उपाय म्हणून सेक्युलरिझम शोधणे ही आधुनिक आत्महत्या होती. कारण त्यामुळे झाले असे की घराघरांमध्ये धर्म शाबूत राहिला आणि धर्म शाबूत राहिल्यामुळे राजकीय विचार प्रणाली म्हणून धर्म घराघरांमध्ये जिवंत राहिला . पुरोगामी लोकांना यामधली मेखच कळली नाही धर्म घरात ठेवा याचा अर्थ राजकीय विचार प्रणाली घरात ठेवा असा असतो हे त्यांना कळले नाही. याचे कारण त्यांनी धर्म म्हणजे फक्त श्रद्धा असे समीकरण मांडले वास्तविक श्रद्धेपासून धर्माची सुरुवात असते परंतु श्रद्धा म्हणजे धर्म नव्हे श्रद्धा आरामात रिप्लेस करता येते परंतु धर्म रिप्लेस करता येत नाही याचे कारण तो राजकीय प्रणाली म्हणून घराघरांमध्ये काम करतो . इस्लाम मध्ये तो सर्वाधिक काम करतो म्हणूनच तर इस्लामला टारगेट करावे लागते . कारण अंतिमत: तो इस्लामिक राजवट मानतो ,मागतो आणि मांडतो. आणि हे मिशन पुरे व्हावे म्हणून कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवतो . भारतामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीत हेच घडलेले आहे आणि ब्राह्मणी हिंदुत्व आता कोणत्याही टोकाला जाण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेले आहे .आणि हे इस्लाम मुळे घडले आहे याबाबतीत इस्लामला टार्गेट करण्याऐवजी पुरोगामी लोकांनी त्याला सपोर्ट दिला आणि वैचारिक आणि अंतिमतः राजकीय आत्महत्या केली पुरोगामी वादाचा प्रोजेक्ट हा अनफिनिश्ड प्रोजेक्ट आहे असे हबरमास मानतो परंतु त्याला हे कळाले नाही की हा फिनिशिंग टच का लाभत नाही? तो लाभत नाही कारण तुम्ही कितीही श्रद्धेच्या गोष्टी केल्या तरी धर्म म्हणजे श्रद्धा नव्हे धर्म हा श्रद्धेचा आरंभ आहे श्रद्धा ही फाउंडेशन आहे परंतु जी बिल्डिंग आहे ती सरळ सरळ राजकीय सत्तेची आहे आणि रोमन कॅथोलिक धर्मने युरोपमधल्या सर्व सत्ता आपल्या ताब्यात आणल्या होत्या हीच गोष्ट इस्लामने केली भारतामध्ये ब्राह्मण धर्म हाच उद्योग कायमस्वरूपी करत असतो . किंवा त्यासाठी धडपडत असतो . त्याचे अंतिम ध्येय हे संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवर आपल्या वर्णाचे नियंत्रण आणणे हे असते. त्याला शह देण्यासाठी म्हणून मग सुरुवातीपासूनच पशुपत शैवधर्म आणि प्राचीन काळी काही प्रमाणामध्ये बौद्ध धर्म जैन धर्म काम करत होते . बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही आध्यात्मिक गप्पा मारल्या तरी प्रत्यक्षामध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याला सर्वात मोठे कारण राजकीय होते आणि त्यांनी बौद्ध धर्म जो आणला तो राजकीय धर्मच आहे . किंबहुना शिका ,संघटित व्हा आणि शेवटी काय करा तर सत्ता मिळवा असेच बाबासाहेब सांगतात . हा सरळ सरळ युरोपियन वसाहतवादाचा आणि ब्राह्मण धर्माचा परिणाम आहे . भारतामध्ये काँग्रेस ही कळत नकळत हिंदू नावाच्या ब्राह्मण धर्माला धरून आहे असे बाबासाहेबांना पक्के माहित होते . त्यामुळेच त्याला समांतर डिस्कोर्स म्हणून त्यांनी नवयान आणले . आणि खुद्द बौद्ध धर्माची सुरुवात सुद्धा कशी एका राजकीय पाण्यावरून झालेल्या राजकीय वादापासून झाली त्याची मांडणी केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधला राजकारणी माणूसच बौद्ध धम्म मांडत आहे हे इथे लक्षात घ्या . महात्मा फुले हे समाजसुधारक होते बाबासाहेब आंबेडकर मात्र राजकीय सुधारक होते हे आपणाला अनेकदा कळत नाही . आज जास्तीत जास्त दलित लोक विशेषता पूर्वाश्रमीचे महार लोक हे राजकारणात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंटरेस्ट घेत असतात किंवा प्रशासनाच्या सत्तेमध्ये इंटरेस्ट घेत असतात याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा हा राजकीय स्वभाव आहे . फक्त ते कधीच म्हणत नाहीत की धम्म ही गोष्ट राजकीय आहे . ते म्हणतात ती नैतिक गोष्ट आहे . त्यांच्या राजकारणासाठी हे आवश्यक आहे कारण बाबासाहेबांचा मूळचा पिंड हा नैतिक आहे .
जर हाबरमास याची चर्चा आपण करणारच आहोत तर ही सगळी पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यायला हवी
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment