संस्कृतचा लोच्या श्रीधर तिळवे नाईक 

मोहन भागवत यांनी सांस्कृतिक भारताचा प्राण आहे असे म्हटल्यापासून पुन्हा एकदा भाषेला वादस्थान मिळालेले आहे 

संस्कृतइतका घोळ कुठल्याच इतर भाषेबाबत झालेला नाही या भाषेच्या संदर्भात अत्यंत परस्परविरोधी दावे सतत पुढे येतात आणि त्यातच धार्मिक राजकारण सुद्धा संस्कृतच्या आधारे खेळले जाते. एका अर्थाने संस्कृत भारतातील सर्वात मोठी पॉलिटिकल भाषिक गोष्ट आहे 

सर्वसाधारणपणे संस्कृत पासून इतर  भाषा कशा तयार झाल्या असे सांगणारे ब्राह्मण इतिहासकार भरपूर होऊन गेले या लोकांनी तत्सम आणि तद्भव नावाची भानगड शोधून सर्वकाही तत्सम किंवा तद्भव आहे असे सांगायला सुरुवात केली त्याला शह देण्यासाठी म्हणून संस्कृत हीच कशी सर्व प्राकृत भाषांच्या पासून तयार झाली ते अनेक ब्राह्मणे तर इतिहासकार सांगायला लागले . 

या सगळ्या भाषिक इतिहासाबाबत एक गोष्ट सर्व इतिहासकार विसरतात की भारतामध्ये भले संस्कृत तयार झाली असेल परंतु इराणमध्ये awestaअवेस्ता ही भाषा तयार झाली आहे आणि तिचे संस्कृतशी  प्रचंड साम्य आहे

 प्रश्न असा आहे की समजा संस्कृत प्राकृत पासून तयार झाली असे झाले असेल तर मग अवेस्ता ही भाषा कुठल्या प्राकृत भाषांच्या पासून तयार झाली आणि ती तयार करायला इराण मध्ये कोण होते ?

दिसते ते असे की या दोन्ही भाषांचे मूळ कुठल्यातरी एका भाषेत असावे. काहीसा अशा स्वरूपाचा  सिद्धांत सर्वसाधारणपणे इंडो युरोपियन भाषेचा सिद्धांत मांडणारे लोक सांगत असतात . किंबहुना अलीकडे आर्य सिद्धांत जिवंत आहे त्याचे सर्वात मोठे कारण ही कॉमन भाषेची शक्यता आहे. ही आदी भाषा आहे .


अवेस्ता आणि संस्कृत यांची जर तुलना केली तर आपणाला अनेक वेगळ्या गोष्टी सापडतात शुद्ध अशुद्ध लेखनाचे नियम असोत वर्ण व्यंजन साम्य असो किंवा शब्द संपत्ती असो  अनेक ठिकाणी या दोन भाषा एकमेकांशी खूप जुळ्या बहिणींच्या सारख्या वावरतात मात्र अवेस्ताची लिपी वेगळी आहे ती देवनागरी नाही म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे देव नागरी ही लिपी भारतातल्या भाषांच्या पासून तयार झालेली असावी . म्हणजे संस्कृत लिखित संस्कृत झाली तेव्हापासून तिच्या या अवेस्ता या बहिणीी पासून पूर्णपणे वेगळी होत गेली.

संस्कृत आणि अवेस्ता या दोन भाषांच्या संरचनेतील साम्य अनेक भाषिक तज्ञ लोकांनी दाखवून दिलेले आहे त्यामध्ये धातू चालवणे असो किंवा लिंग पद्धत असो अशा अनेक गोष्टी येतात प्रश्न असा आहे की इतके असून सुद्धा मग सांस्कृतिक पातळीवर या दोन भाषा बोलणारे लोक एकमेकांचे शत्रू कसे ? कारण या इराणी संस्कृती मधल्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत त्या पूर्णपणे ब्राह्मण धर्माच्या विरोधातले आहेत म्हणजे देव हे त्यांचे कट्टर दुश्मनच दिसतात त्यातून एक प्रश्न असा निर्माण होतो की त्यामुळेच या दोन संस्कृतीमध्ये संघर्ष होत ब्राह्मण लोकांना इराणमधून हाकलले गेले होते का ? माझ्या मते हे घडलेले आहे. मी नेहमीच सांगत आलेलो आहे की ब्राह्मण हे मांत्रिक होते साहजिकच झरातृष्ट धर्म निर्माण झाला तेव्हा या मांत्रिकीला त्यांनी नकार दिला आणि एक नवा धर्म निर्माण केला हा धर्म श्रद्धा नव्हती तर तो वेग व्यवस्थित धर्म होता जगामध्ये अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा धर्म निर्माण झालेला आहे तेव्हा तेव्हा त्याचा संघर्ष हा आधीच्या श्रद्धांशी आहे इराण मध्ये सुद्धा नेमके हेच घडले आणि त्यामुळेच मग ब्राह्मण मांत्रिक भगत आणि नवीन आलेला धर्म यांच्यामध्ये संघर्ष होऊन त्यामध्ये ब्राह्मण मांत्रिक भगत पराभूत झाले आणि तेच शेवटी भारतात आले . माझ्या मते ब्राह्मणांचे स्थलांतर ही एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि आपण ती स्वीकारायला हवी . प्रश्न असा आहे की ब्राह्मणांना स्थलांतर का करावे लागले तर त्याचे उत्तर असे की मुळातच ब्राह्मणांना आपली श्रद्धा सोडायची नव्हती आपले वर्चस्व सोडायचे नव्हते परंतु या नवीन धर्मामुळे त्यांचे वर्चस्व गेले साहजिकच नवीन धर्म स्वीकारायचा किंवा आपली मानसिकी आपली मांत्रिकी आपली श्रद्धा कायम ठेवण्यासाठी म्हणून स्थलांतर करायचे असे दोन पर्याय ब्राह्मण लोकांच्या पुढे उभे राहिले आणि त्यातूनच ब्राह्मण लोकांनी भारताच्या दिशेने स्थलांतर करायला सुरुवात केली. ब्राह्मण येण्याआधीच भारतामध्ये युरेशियन संस्कृतीतले वैदिक लोक आलेले होते आणि साहजिकच या वैदिकांच्या धर्मामध्ये त्यांना आश्रय मिळाला . काही लोक चक्क शैव धर्माला येऊन मिळाले . उदाहरणार्थ शुक्राचार्य किंवा नंतरचे विश्वामित्र मात्र ह्या ब्राह्मण लोकांनी कधीही स्वतःची स्वतंत्र मांत्रिकी सोडली नाही किंबहुना वेद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मांत्रिकी आहे आणि मंत्र आहेत . आज सुद्धा ब्राह्मण लोकांना त्यातील अनेकांना वेद येत नाहीत हे सोडून द्या आणि अनेकदा वेद न येणारे ब्राह्मण हे वेद येणाऱ्या ब्राह्मणांच्या पेक्षा अधिक कट्टर असतात कारण त्यांचे अज्ञान असते. त्यांनी वेद नीट वाचलेला नसतो . गायत्री  मंत्रासारखे काही मंत्र त्यांना येत असतात . ब्राह्मण ब्राह्मण वर्णाची जर का संरक्षण कोणीतरी सर्वेक्षण केले तर लक्षात येईल की प्रत्यक्ष ब्राह्मण मात्र स्वतःची मुले इंग्लिश मीडियम मध्ये टाकत असतात त्याची वेगवेगळी कारणे देत असतात माझ्यामते भागवत यांनी सर्व ब्राह्मण वर्णासाठी संस्कृत मिडीयम सक्तीचे करावे आणि मग पहावे की ब्राह्मण लोकांना खरोखर संस्कृत बद्दल किती प्रेम आहे ? मला खात्री आहे ब्राह्मण लोकांच्या पैकी धड 10% लोक सुद्धा स्वतःच्या मुलांना संस्कृत मिडीयम मध्ये टाकणार नाहीत. आणि तरीसुद्धा संस्कृत आत्मा आहे हे सांगायला मात्र कोणीच विसरणार नाही . प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये मात्र सर्वच ब्राह्मणांचा आत्मा इंग्लिश आहे . असो.

प्रश्न असा निर्माण होतो की ही संस्कृत कशी काय निर्माण झाली ? ब्राह्मण हे इराणमधून आलेत याचे जे काही पुरावे आहेत त्यामध्ये हा awestan भाषिक पुरावा नेहमीच पुढे आणला जातो म्हणजेच आपण जर का युरेशियन आक्रमणाचा सिद्धांत स्वीकारला तर आपणाला युरेशियन आक्रमण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने विभागावे लागते म्हणजे कदाचित शक्य आहे की इराण आणि अफगाणिस्तान इथून ब्राह्मण आले आणि येताना ते स्वतःची अवेस्ता भाषा घेऊन आले परंतु मग तिचे क्रॉस पॉलिनेशन आपल्या प्राकृत भाषांशी होऊन त्यातून संस्कृत तयार झाली 

आपल्याकडे काही लोक असे मानतात की पाणीनिने सर्व प्राकृत भाषांच्या पासून एक कृत्रिम भाषा तयार केली आणि त्यापासून संस्कृत तयार झाली किंवा संस्कृत ही थेट भाषाच तयार केली.

माझे स्वतःचे मत असे की ब्राह्मण जी स्वतःची भाषा घेऊन आले ती इंडो युरोपियन भाषा होती तिचे क्रॉस् पॉलिनेशन इथल्या प्राकृत भाषांशी झाले मात्र लिखित स्वरूपात मात्र ती पूर्णपणे भारतीय होत गेली . अनेक शैव संकल्पना या संस्कृतने आत्मसात केल्या आणि मुळातच शैव पंडितांना सुद्धा अशा प्रकारच्या भाषेची गरज भासत असल्याने त्यांनी संस्कृत निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला. किंबहुना संस्कृत ही फक्त वैदिक श्रुतीने तयार केलेली भाषा नाही ती सर्व श्रुतीने सुद्धा तयार केलेली भाषा आहे त्यामुळे ती भाषा ब्राह्मणांची म्हणून ब्राह्मणे तर लोकांनी पाठ फिरवू नये. ती जितकी ब्राह्मणांची भाषा आहे तितकीच ती शैव पंडितांची सुद्धा भाषा आहे आणि या पंडितांच्या मध्ये सर्व समाजातून आलेले पंडित होते . म्हणजे कालिदास हा गुरव समाजातून आलेला होता हे लक्षात घ्या किंवा अभिनव गुप्त हा चक्क वैश्य समाजातून आलेला होता . नंतर ब्राह्मण या सर्वांना ब्राह्मण करण्याचा खटाटोप चालू केला आणि मग आपोआपच कालिदासाला त्याचे नाव कालिदास असून सुद्धा सरस्वती देवता प्रसन्न घ्यायला लागले खरा प्रॉब्लेम हा ब्राह्मणांचा आणि ब्राह्मणांच्या या तथाकथित दंतकथा निर्मिती करण्याच्या भानगडी मध्ये आहे . आपण या दंतकथा तयार करताना बहुजन शैव  लोकांना दुखवतो हे सुद्धा ब्राह्मणांच्या लक्षात येत नाही ते  काली ही शैव देवता सरस्वतीच्या साह्याने रिप्लेस करतात ही रिप्लेसमेंट ब्राह्मणे तर लोकांना संतापायला विवश करते.

त्यातून मग काय होते ? तर संस्कृत ही धार्मिक शोषकांची भाषा बनत जाते संस्कृत बरोबर असलेला सर्वात मोठा घोळ हा मुळातच त्या भाषेशी जोडले जाणारे युरेशियन धर्म आहेत या भाषेच्या साह्याने भारतावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने युरेशियन लोकांनी केलेला आहे आणि खरा प्रॉब्लेम तिथेच सुरू होतो जेव्हा हे लोक संस्कृतची तरफदारी सुरू करतात तेव्हा अनेकदा त्यामागे सांस्कृतिक वर्चस्व आणि नंतर धार्मिक वर्चस्व आणि या दोन्ही वर्चस्वांच्या सहाय्याने राजकीय वर्चस्व गाजवण्याची इच्छा आकांक्षा असते. भागवतांची अशी इच्छा नाही हे कशावरून ठरवायचे ? मुळातच प्राकृत भाषांना जितके दडपता येईल तितके दडपायचे असे धोरण सध्याच्या भाजप सरकारांनी चालवलेले आहे का असा प्रश्न भाजपाच्या अंगाने वारंवार निर्माण होतो आहे त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आंदोलन जाणून बुजून चालवणे जेणेकरून मराठीला दडपता येईल असा राजकीय अजेंडा कशावरून नसेल ? 

मुळात प्रॉब्लेम हा नेहमीच ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मण धर्माच्या हेतूचा आहे कारण ब्राह्मणांचा हेतू कधीही शुद्ध असत नाही अशी पक्की धारणा ब्राह्मणेतर लोकांच्या मध्ये झालेली आहे .

दुसरीकडे प्रॉब्लेम असा आहे की राष्ट्रभाषा भारताला हवी आहे मी नेहमीच भारताची राष्ट्रभाषा ही संस्कृत असायला हवी होती असे प्रतिपादन केले आहे पण भाजपच्या राजकारणामुळे आता हे होणे अशक्य होते की काय अशी शंका येते आहे. वास्तविक ही गोष्ट काँग्रेसने करायला हवी होती पण ब्राह्मणांच्या दडपणाखाली येऊन संस्कृत ही राष्ट्रभाषा करणे नाकारले आणि आपण ब्राह्मणांचेच वैष्णव भावंड आहे हे काँग्रेसने सिद्ध केले . इंग्लिशचा गवगवा काँग्रेसने वाढवला . हिंदीला राष्ट्रभाषा करण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेसने केला . भारताचे उत्तरिकरण जे झाले ते काँग्रेसने केले हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आज भाजप काँग्रेसचे भाषिक आणि उत्तरेच्या दक्षिणेवरच्या वर्चस्वाचे धोरण पुढे नेते आहे . महाराष्ट्र राज्य स्वतंत्र असले पाहिजे यासाठी आंदोलन मुळात काँग्रेसच्या राजवटीतच करावे लागले ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे . 

प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा खरा प्रॉब्लेम काय आहे ? मुळातच आपली सर्वात मोठी चूक ही आहे की आपण गायपट्ट्यातले पक्ष स्वीकारले . आणि या एका चुकी मुळे   आज महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या मुळावरच उत्तर भारत आलेला आहे स्वतःला दक्षिणेशी जोडायचे नाही या एका धोरणामुळे महाराष्ट्राने अतोनात नुकसान करून घेतले एकीकडे शिवाजी महाराज की जय म्हणायचे आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांचे नाते राजपुतांशी कसे आहे हे सांगायचे ते सिसोदिया कसे आहेत हे सांगायचे ते मूळचे दक्षिणात्य होयसाळ ज्याचा अपभ्रंश भोयसाळ होत पुढे भोसले झाला हे सुद्धा साधे सत्य खुद्द भोसले घराण्याला सुद्धा स्वीकारता येत नाही इतकी वाईट परिस्थिती ब्राह्मण लोकांनी निर्माण केली उत्तरेकडच्या लोकांनी प्रचार करून तयार केली  हे उत्तरे शी नाते जोडणे नेमके कोण करते तर हे ब्राह्मण करतात कारण आपल्या महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांचे आधीच उत्तरीकरण झालेले आहे हे लोक स्वतःला उत्तरेतून आलेले आहोत असे समजतात वास्तविक जे यांचे नेते चित्पावन ब्राह्मण आहेत ते बहुदा  ग्रीक किंवा तसम देशातून पलायन करून आलेले आहेत किंवा मग किनाऱ्याला लागलेले आहेत (मग स्वतःची मुळे सांगण्यासाठी म्हणून या लोकांनी परशुरामाशी स्वतःला जोडले  परशुरामाच्या दंतकथेमध्ये ते कळत नकळत आलेले आहे परशुरामाने जिवंत केले वगैरे) त्याचा खरा अर्थ इतकाच असतो की हे किनाऱ्याला लागले आता भारताच्या किनाराला लागलेल्या माणसाने स्वतःला उत्तर भारतीय का म्हणून घ्यावे ? पण यांच्या या मूर्खपणामुळेच उत्तर भारत महाराष्ट्राच्या उरावर बसायला लागले आता तर परशुराम आणि श्रीराम चालू आहे वास्तविक तुम्ही आलात कुठून आणि तुमचा या आर्य लोकांशी काय घंटा संबंध होता ? तुम्ही सरळ सरळ ग्रीक किंवा तत्सम होता आणि तुम्हाला मराठी लोकांनी आश्रय दिला तर तुम्ही मराठी लोकांच्या संस्कृतीच्या उरावर बसून ती संस्कृती नष्ट करायची स्वप्न बघता ? काय टाईपचे लोक आहात तुम्ही ? की तुमची युरोपियन गोरी कातडी आहे म्हणून तुम्हाला हे लोक आपले वाटायला लागले ? तुम्हाला वाचवले कोळी शैव लोकांनी ! आपल्यालाा बहुजन कोळी समाजाने वाचवले हे सुद्धा तुम्हाला स्वीकारायचे नाही म्हणून तुम्ही दंतकथा निर्माण करता ? आणि आता तुम्ही परशुरामाच्या नादाला लागता? जेव्हाा तुम्ही कोणीीीच  नव्हता तेव्हा तुम्हालाा शैैैव लोकांनी आश्रय दिला आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात जाता ?  तुम्ही होता शैव आणि आता वैष्णव बनत कुठल्यातरी अवताराशी स्वतःला जोडत नेमके काय साधत आहात? जगातील सर्वात नतदृष्ट अतिथी लोक भारताला आणि विशेषत: महाराष्ट्राला लाभले . किंबहुना ही एक अशी गोष्ट आहे जी युुुरेशियन लोकांच्या बाबतीत वारंवार होते ते जिथे आश्रय घेतात तिथली संस्कृती नष्ट करतात . पाहुणे म्हणून यायचे आणि घर बळकवायचे . अमेरिकेपासून भारतापर्यंत आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलिया पर्यंत हा एक सततचा नतद्रष्ट उद्योग चाललेला दिसतो या लोकांना कोणीतरी आता सांगितले पाहिजे की लोक पूर्वीसारखे झोपलेले नाहीत हळूहळू सगळ्यांना जागृती यायला लागली आहे. आफ्रिकेत हळूहळू लोक नेमके काय झाले ते तपासायला लागलेत . भारतात सुद्धा आता ही गोष्ट सुरू होईल . त्यानंतर काय होईल याविषयी काही विचार केला आहे का ? 

मुळातच चिन्ह संस्कृतीमध्ये कुठली ना कुठली तरी चिन्ह व्यवस्था म्हणजेच भाषेत भाषिक व्यवस्था केंद्रस्थानी येणे अपरिहार्य आहे परंतु ही भाषिक व्यवस्था कुणाच्या टर्म्स आणि कंडिशन वर डान्स करणार हा मूलभूत प्रश्न आहे आज जो काही संशय भागवतांच्या हेतूविषयी घेतला जात आहे त्याचे कारण मुळात  ब्राह्मणी हिंदुत्व हे जर का संस्कृतच्या साह्याने कमबॅक करू इच्छित आहे का हा प्रश्न आहे हा संशय आहे तो खरा असेल तर मग हा कमबॅक आम्ही साजरा होऊ देणार नाही हे नक्की आहे 

मुळातच कुठलीच भाषा आत्मा असत नाही हे भागवतांना कळायला हवे . भाषा ही कपड्यासारखी असते . मूळ गोष्ट अर्थ ही आहे तेव्हा प्राण वेगळाच असतो तयार होणारे अंतकरण वेगळे असते आणि तयार झालेले बाह्यकरण म्हणजेच त्वचेच्या आतले आणि त्वचा यांनी बनलेले शरीर असते आणि या शरीरावर मग आपण संस्कार घेत आणि संस्कार देत भाषा तयार करत असतो . एकीकडे वेदांत सांगायचा सर्वांचा आत्मा एक म्हणायचे आणि मग अमेरिकेचा आत्मा अमेरिकन  इंग्लिश असल्याने तो वेगळा फ्रान्स देशाचा आत्मा फ्रेंच असल्याने तो आत्मा वेगळा आणि भारताचा आत्मा वेगळा असेही मानायचे यातला विरोधाभास भागवतांना कळतो का ? तेव्हा हे आत्मा वगैरे बंद करावे कारण या देशांमध्ये आत्मा सर्वजण मानत नाहीत . संस्कृती मुळात आपली संवादाची भाषा आहे आणि तिला जर का आपण त्या पद्धतीने वागवले तर ती स्वीकारली गेली असते परंतु ब्राह्मणांनीच संस्कृत शिकायला मनाई करून त्या भाषेची मक्तेदारी स्वतःकडे घेऊन तिला ब्राह्मणी भाषा करून टाकली. हे ब्राह्मणांचे स्वतःचे पातक आहे जर राष्ट्रभाषा केली असती तर सर्व लोकसंस्कृत शिकू शकले असते पण संस्कृत शिकू नये म्हणून ब्राह्मण लोकांनी नेहरूंच्या काळात प्रयत्न केले आणि आता हेच लोक संस्कृत आत्मा म्हणतात जर आत्मा आहे तो तर तो प्रत्येकाला का दिला गेला नाही ? ज्यांना संस्कृत नव्हती येत नव्हती असे अनेक लोक होऊन गेले गौतम बुद्ध ते गुरुनानक ते तुकाराम महाराज या सर्व लोकांना संस्कृत भाषा येत नसल्याने आत्मा नव्हता असे म्हणायचे आहे का ? उलट संस्कृत भाषेला मनाई करून रामायण महाभारत मात्र संपूर्ण भारतभर पसरवून वर्ण जात व्यवस्था आणण्यामध्ये फार मोठा वाटा वैष्णव लोकांनी उचलला आहे . म्हणजेच एका अर्थाने आपला पराभव संस्कृत साहित्यामुळे झालेला आहे . आता हे सगळे संस्कृत साहित्य पुन्हा आणून वर्ण व्यवस्था जात व्यवस्था बहुजन लोकांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न चालला आहे का असा हा प्रश्न आहे 

तुम्ही संस्कृत शिकवायला जावे परंतु तुम्ही फक्त ब्राह्मणांची संस्कृत शिकवता कामा नये तर भारतात असलेल्या अनेक धर्मांची ती भाषा आहे अगदी शैव-धर्मातल्या सुद्धा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची ती भाषा आहे पण क्षैव-धर्मातल्या धर्मग्रंथांची किती चर्चा तुम्ही करता बौद्ध संस्कृत धर्मग्रंथांची तुम्ही किती चर्चा करता जैन धर्मग्रंथांची संस्कृत मधल्या किती चर्चा करता ? तुम्ही फक्त तुमच्या युरेशियन धर्मांची चर्चा संस्कृतच्या अंगाने करता आणि त्यामुळेच हा सगळा घोळ झालेला आहे. 

तेव्हा मुळात ही आत्मा ही भानगड बाजूला काढा आणि संस्कृत संपर्क भाषा म्हणून आवश्यक आहे असे सांगा आणि या संस्कृत मधून आत्ताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवता आले तर पहा वर्ण जात व्यवस्था धार्मिक व्यवस्था यांचे समर्थन करणारे कुठलेही वाङ्मय अभ्यासक्रमात येणार नाही याची गॅरंटी द्या अन्यथा या देशांमध्ये संस्कृत स्वीकारली जाणार नाही .

भारताला जोडणारी भाषा संस्कृत भाषा असू शकते परंतु तिचे शिक्षण सर्वांना मिळायला हवे आणि मुख्य म्हणजे ते धर्मनिरपेक्ष शिक्षण असायला हवे . नैतिक तत्वांचे आचरण करणारे तुकडे तुम्ही टाका पण त्यामागे कसलाही धर्म उभा करू नका. असे झाले तर संस्कृत स्वीकारली जाईल . तेव्हा स्वतःलाच प्रश्न विचारा की तुमचा हेतू काय आहे ? मनुस्मृति स्वीकार शिकवणे हे जर का संस्कृत शिकवण्या मागचे उद्दिष्ट असे तर सॉरी मग संस्कृत शिकायला आणि शिकवायला आम्ही तयार नाही आहोत मी नेहमीच बहुजन समाजाला सांगत असतो की संस्कृत शिका ब्राह्मण लोक अनेकदा संस्कृत ग्रंथांचे अत्यंत चुकीचे अनुवाद अत्यंत जाणीवपूर्वक करतात हा माझा अभ्यास आहे . तेव्हा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी संस्कृतचा अभ्यास आवश्यक आहे आणि तो फक्त ब्राह्मणांच्यासाठी नाही तर  ब्राह्मणे तरांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे . भाषांतरांमध्ये इतका खोटारडेपणा ब्राह्मण लोकांनी आणि ब्राह्मण लेखकांनी केलेला आहे की बोलता सोय नाही . हा खोटारडेपणा  कळायचा असेल तर सुद्धा संस्कृत शिकली पाहिजे त्यामुळे संस्कृत शिकायला विरोध नाही किंबहुना आपण ती शिकलीच पाहिजे ती राष्ट्रभाषा झालीच पाहिजे पण ती राष्ट्रभाषा राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी असली पाहिजे . प्राचीन काळामध्ये नेण्यासाठी नाही .

श्रीधर तिळवे नाईक 



Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय