प्रभाव आणि सत्य

 महंमद पैगंबर यांचा पडलेला जगावरचा प्रभाव ही सत्याची कसोटी असू शकत नाही. सत्याची कसोटी ही नेहमीच प्रत्यक्ष प्रमाण आणि त्या प्रत्यक्ष प्रमाणामुळे लोक प्रमाण या दोन गोष्टी असतात . मोहम्मद पैगंबर यांना मोक्ष या गोष्टीविषयी काहीही माहिती नव्हती आणि संपूर्ण कुराणांमध्ये या संदर्भात आपणाला काहीही आढळत नाही . त्यामुळे त्यांच्या उपदेशाला धर्म म्हणता येत नाही कारण धर्म आणि महाश्रद्धा (रिलीजन )यांच्यामध्ये फरक असतो महा श्रद्धा मोक्ष नाकारते तर धर्म मोक्ष स्वीकारतो मोहम्मद पैगंबर यांनी रिलिजन सांगितला आणि जगातील अनेकांनी तो स्वीकारला हे मात्र खरे. या रिलिजननुसार ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या खऱ्या आहेत की नाही या नेहमीच वैज्ञानिक कसोटीवर तपासल्या गेल्या पाहिजेत . मी मोक्षा विषयी सार्वजनिक जीवनात आग्रह धरत नाही वैयक्तिक आग्रह धरतो याचे सर्वात मोठे कारण मला मोक्ष मिळाला तरी मी तो सर्व लोकांना देऊ शकत नाही त्याला लोकांच्या प्रमाणित करू शकत नाही आणि जी गोष्ट सर्व लोकांना तुम्ही वाटू शकत नाही देऊ शकत नाही ती लोक प्रमाण म्हणून स्वीकारू नये . मात्र अशी एक गोष्ट आहे अशी शक्यता मात्र सतत सांगावी लागते. मुस्लिम मजहब मध्ये जे काही सांगितले आहे ते आता वैज्ञानिक प्रमाणावर टिकणे अवघड होऊन बसलेले आहे मात्र ही फक्त इस्लामची अवस्था नाही तर जगातल्या सर्वच मजहब महा श्रद्धा आणि धर्मांची अवस्था आहे . 1960 नंतर अत्यंत जाणीवपूर्वक विज्ञानाबद्दल संशय निर्माण करण्यात आला आणि हा संशय उत्तर आधुनिकता म्हणून खपवण्यात आला . पण हा उत्तराधुनिक फिनॉमिना घडल्यामुळे जगाचे हित होणे दूर प्रत्यक्षामध्ये धर्माचा आणि रीलिजनचा प्रभाव वाढण्याला कारणीभूत झाला. शेषराव मोरे यांनी धर्म हा शब्द वापरून गोंधळ निर्माण केलेला आहे . जुडाईक लोक धर्म हा शब्द वापरत नाहीत ते मजहब किंवा महा श्रद्धा किंवा रीलिजन हा शब्द वापरतात तिथे या गोष्टीचा प्रभाव ओलांडून जाणे अशक्य असले तरी आता ते शक्य होईल असे वाटते कारण नास्तिक लोकांची संख्या हळूहळू का होईना परंतु ख्रिश्चन लोकांच्या मध्ये वाढत चाललेली आहे. मुस्लिम धर्मामध्ये असे काही होण्याची शक्यता किती तर जवळजवळ ही शक्यता शून्य आहे . त्यामुळे आपल्याजवळ उरतो तो फक्त प्रभाव आणि शेषराव मोरे येथे फक्त प्रभाव आधोरेखित करत आहे या सर्व उपदेशांमधला सर्व विरोधाभास त्यांनी अधोरेखित केलेला आहे . तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारावा की तुम्हाला फक्त हाच भाग का टाकावासावा वाटला की तुम्हाला स्वतःलाही प्रभाव पडणे या गोष्टीचा भयंकर आदर आहे या गोष्टीचे प्रचंड आकर्षण आहे ? 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय