महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी काय करायला हवे २ अर्थात ब्राह्मणांशी वागावे कसे श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांच्या लिखाणातील भटांवरचा हल्ला हा ब्राह्मणांचा काळीजवेध घेणारा आहे हे आत्ताच्या अलीकडच्या पोस्टवरून सुद्धा अनेकदा स्पष्ट होत असते . अगदी अलीकडेच ते कसे ब्राह्मणांचा द्वेष करत हे सांगणारे त्यांच्या लिखाणातील असे काही उतारे काही ब्राह्मण पंडित सादर करत असतात हे उतारे ऑथेंटिक असल्याने त्यांना नकार देणे कठीण आहे प्रश्न असा आहे की त्यांच्या या त्यावेळी घेतलेल्या भूमिकेचे आता काय करायचे ?
सर्वात प्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे महात्मा फुले यांच्या काळामध्ये कलियुगामध्ये फक्त ब्राह्मण आणि शूद्र असे दोन वर्ण अस्तित्वात आहेत असा स्टांस अशी भूमिका ब्राह्मण लोक घेत होते किंबहुना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तयार करायला कोणी तयार नव्हते याचे सर्वात मोठे कारण हा सिद्धांत होता . परशुरामाने सर्व क्षत्रिय कापून टाकले आणि कलियुगामध्ये वैश्य उरले नाहीत असे हेमाद्रि या पंडिताने सिद्धांतन केले आणि तेच या लोकांचे ठाम मत होते . साहजिकच जेव्हा महात्मा फुले शूद्र हा शब्द वापरतात तेव्हा त्यामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण सुद्धा येतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच फुले यांच्या लिखाणातून ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असे दोन वैचारिक ध्रुव तयार होऊन ब्राह्मणे तर चळवळ उभी राहिली
पण याचा एक परिणाम असा झाला की ब्राह्मण हाच आपला शत्रू आहे ब्राह्मण्य हेच आपले शत्रू आहे अशा प्रकारचा अत्यंत दुराग्रह महात्मा फुले यांच्या लिखाणांमध्ये आपणाला दिसतो हा टोकाचा आग्रहच अलीकडे सुद्धा काही ब्राह्मणेतर चळवळीतले लोक पुढे चालवत आहेत त्यामुळेच ओबीसी लोक प्रचंड गोंधळलेले दिसतात .
एका बाजूला आपणाला असे दिसते की महात्मा फुले स्वतःच पूर्वाश्रमीच्या क्षत्रियांना रिस्टोर करायचा प्रयत्न करत आहेत . त्यामुळेच वेदांच्या मधले विश्वामित्र यांच्यासारखे क्षत्रिय प्रचंड टीके खाली येत नाहीत.
ते त्यामुळेच बुद्ध हा क्षत्रिय असल्याने त्याला सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतात . याबाबतीत इंग्रजांचा स्टान्स फार महत्त्वाचा होता मुळात इंग्रजांना क्षत्रिय रिस्टोर होणे फार आवश्यक वाटत होते याचे कारण त्यांना सर्व क्षत्रियांचा पाठिंबा त्यांच्या राजवटीसाठी आवश्यक वाटत होता मात्र हे सर्व क्षत्रिय भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे असावेत असे त्यांना वाटत होते साहजिकच प्रतिकार न करणारे अहिंसेचे समर्थन करणारे असे हे क्षत्रिय आणि त्यांचे धम्म त्यांनी जास्तीत जास्त भारतीय इतिहासाच्या केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली आणि आणि शेवटी ते त्यात यशस्वी ही झाले. आपल्याकडे महात्मा गांधी ,बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरू यांना जे इंग्रजांचे समर्थन लाभले होते त्याला कारण ते नेमके तेच करत होते जे इंग्रजांना महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यामार्फत साधायचे होते . त्या उलट हिंदुत्ववादी किंवा तत्सम लोकांना इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळ उभी करायची असल्याने ते मात्र सातत्याने शिवाजी महाराज , महाराणा प्रताप यांना पुढे आणायला बघत होते. भारतीय इतिहासाचे हे राजकारण हे काही नवीन नाही. फार सुरुवातीच्या काळापासूनच भारतातल्या राजकीय व्यवस्था इतिहासाचा वापर आपल्या पद्धतीने करायला बघत असतात. याची सुरुवात सुरुवातीला ब्राह्मण धर्माने केली होती . महात्मा फुले यांना इंग्रजांचे हे राजकारण कळाले का? तर नाही! किंबहुना त्यांना इंग्रज फारसे कळाले किंवा इंग्रजांची साम्राज्यशाही किती पॉलिटिकल आहे हे त्यांना कळाले असे मला वाटत नाही . या मुळात त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्या. या काळामध्ये सर्व समाज सुधारक आपणाला इंग्रजांचे राज्य ही जणू काय दैवी देणगी आहे अशा थाटात लिखाण करताना दिसतात यामध्ये लोकहितवादी जसे आहेत तसे न्यायमूर्ती रानडे सुद्धा आहेत मग एकट्या फुलांना फक्त दोष का दिला जातो ?
फुले यांनाच दोष दिला जातो याचे कारण फुले फक्त इंग्रजांच्या बाजूने नाहीत ते ब्राह्मणांच्या विरोधात उभे ठाकतात आणि राजाराम मोहन राय किंवा न्यायमूर्ती रानडे अशा प्रकारची चूक करत नाहीत कारण मुळातच हे दोघेही ब्राह्मण आहेत .त्यामुळे नेहमीच इंग्रजांच्या बाबतीतला मुद्दा महात्मा फुले यांच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि करता येतो . हा प्रयत्न आपण स्वीकारू नये मात्र त्याचबरोबर हेही खरे की त्यांच्या काळाची ही मर्यादा होती त्यांची स्वतःची ही मर्यादा होती हे लक्षात घेऊन आपण हे नक्की केले पाहिजे की आपला ओबीसी लोकांचा इतिहास हा आपण इंग्रजांच्या विरोधातच लिहिला पाहिजे. त्याबाबतीत इंग्रज लोकांचे आणि इंग्रज साम्राज्याचे जे निर्लज्ज समर्थन काही लोक एकविसाव्या शतकातही करू बघतात ते चुकीचे आहेत . किंबहुना फुले यांनी इंग्रज राजवटीचे समर्थन केले आणि पुढे त्यांचा उत्कृष्ट शिष्य ज्यांनी एकदा फुले यांचा मीच आता काय तो अनुयायी उरला आहे असे म्हटले होते ते पंडित बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ब्रिटिशांच्या राजवटीचे समर्थकच होते .
प्रश्न असा आहे की यामुळे संपूर्ण ओबीसीबीसी आणि आदिवासी समाज इंग्रजांच्या बाजूने उभा होता का ? तर नाही! प्रत्यक्षामध्ये समाज एका बाजूला आणि हे नेते एका बाजूला असे इंग्रजांच्या धोरणाबाबत झालेले दिसते आणि याचा एक दुष्परिणाम असा झाला की स्वातंत्र्य चळवळ जशी वाढत गेली तसतसे ही स्वातंत्र्य चळवळ चालवणारे लोक ब्राह्मण असल्याने फक्त ब्राह्मण सुधारक हे ब्राह्मणांच्या विरोधी नसल्याने आणि महात्मा फुले हे मात्र ब्राह्मणांच्याही विरोधी असल्यामुळे आणि त्याचबरोबर इंग्रजांना पूरक असल्यामुळे भारतीय इतिहासामधून साईडलाईन केले गेले . त्यांचे लिखाण हे कितीही क्रांतिकारक सामाजिक पातळीवर असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला ते पूरक नाही हे लक्षात आल्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जवळजवळ सर्वच ब्राह्मण इतिहासकारांनी फुले यांच्यावर या काळामध्ये अघोषित बहिष्कार टाकलेला आहे .
प्रश्न असा आहे की महात्मा फुले हे इंग्रजांच्या राजवटीच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित होते का ? याचे प्रामाणिक उत्तर हो असे आहे उदाहरणार्थ १८५७ चे बंड भले अयशस्वी झाले असेल पण ते केवळ ब्राह्मणांचे बंड नव्हते . त्याला ज्या प्रकाराने फुले यांनी मोडीत काढलेले आहे ती तऱ्हा मला नाही वाटत की फार स्पृहणीय आहे . मुळातच या मागचे जे गृहीतक आहे की इंग्रज आल्यामुळे ओबीसी, बीसी आणि आदिवासी या लोकांचे भले झाले ते गृहीतक चुकीचे आहे. कळत नकळत शैव लोकांच्या लढाऊ वृत्ती बद्दल खात्री नसल्याचे इथे दिसते . प्रत्यक्षामध्ये माझे स्पष्ट मत असे आहे की इंग्रज जर आले नसते तर पुन्हा एकदा यशवंतराव होळकरांची राजवट प्रस्थापित झाली असती आणि त्या राजवटीने संपूर्ण भारतभर वर्णजात व्यवस्थेला आव्हान देत एक पूर्णपणे नवीन आधुनिक व्यवस्था निर्माण केली असती . शैव चुपचाप बसले असते हा जो काही अर्थ या लोकांनी काढलेला आहे तो शैव लोक आणि शैव धर्म न कळल्यातून आलेला आहे . फुले यांनी कळत नकळत इथे ब्रिटिश साम्राज्यवादाचे धडे गिरवलेले दिसतात आणि आपल्याच लोकांना अंडर एस्टिमेट केलेले दिसते . एक गोष्ट मात्र खरी आहे की आता जो भारत नावाचा देश दिसतो तो कदाचित दिसला नसता. त्या ऐवजी भारतात किमान चार देश दिसले असते आणि त्या चार देशांची वेगळी संस्कृती विकसित झाली असती. यातील द्रविडस्थानांचा देश म्हणून उदय तर निश्चितच झाला असता. त्यानंतर होळकर यांनी निर्माण केलेला एक मध्य भारतीय देश दिसला असता . आणि पुढे पूर्वेकडे एक नवीन देश दिसला असता आणि आत्ताचा पाकिस्तान पंजाब कश्मीर वगैरे मिळून एक नवीन देश दिसला असता. इंग्रजांच्या आगमनामुळे आपण सगळे एक झालो पण हे एक होणे खरोखर कितपत फायदेशीर ठरले हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. आपण अनेकदा गोष्टी गृहीत धरतो पण प्रत्यक्षामध्ये त्या तशाच घडल्या असत्या असे सांगता येत नाही .
मात्र लोक थांबले का ? तर नाही थांबले . भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा बारकाईने अभ्यास केला तर आपणाला असे दिसते की नेतृत्व जरी ब्राह्मणांच्या ताब्यात असली तरी मुख्य नेतृत्व ब्राह्मणेतर गांधी यांच्या ताब्यात होते आणि इतरत्र अनेक ठिकाणी अनेक शैव लोकांनी या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे.
उलट या सगळ्या गोष्टींच्यामुळे झाले काय ? तर स्वातंत्र्य चळवळ ही वैष्णव लोकांनी चालवल्यामुळे कळत नकळत हिंदू म्हणजे वैष्णव असे समीकरण रूढ झाले आणि आजही ते प्रस्थापित झालेले दिसते . एका अर्थाने फुले यांनी शैव धर्माच्या विस्ताराला पायबंद घातला आणि यामुळेच पुढे मागे ओबीसी नावाचा वर्ग मागासलेला आहे अशा तऱ्हेने मांडणी करावी लागली. फुले यांनी स्वीकारलेल्या या धोरणामुळेच कळत नकळत जैन आणि बौद्ध धर्माची थोरवी वाढत गेली आणि कळत नकळत मूळ शैव असलेले बाबासाहेब आंबेडकर हे कळत नकळत बौद्ध होत गेले म्हणजेच बाबासाहेबांच्या धर्मांतराचा पाया एका अर्थाने महात्मा फुले यांनी टाकलेला आहे .
त्यामुळेच महात्मा फुले यांना जे स्वतःला हिंदू समजतात अशा लोकांच्याकडून फारशी मान्यता मिळत नाही पण याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की त्यामुळेच शैव अभिमान जितका जागृत व्हायला हवा तितका तो होत नाही आणि जणू काय शैव धर्म हा एक हिंदू धर्माचा पंथ आहे अशा तऱ्हेचा जो वैष्णव लोकांनी प्रचार केला तो प्रचार वाढत जात कळत नकळत शैव धर्म हा ओबीसी बीसी आणि आदिवासी या प्रवर्गांच्या मध्ये विसाव्या आणि एकविसाव्या शतकामध्ये आकसत गेला.
मग सनातन कर्मठ ब्राह्मणांच्या प्रमाणेच आपण सुद्धा महात्मा फुले यांना खलनायक ठरवायचे का ? तर याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. मुळातच अशा प्रकारचा गोंधळ लोकहितवादी यांनी घातला रानडे यांनी घातला परंतु हा गोंधळ नंतर टिळक आणि महात्मा गांधी यांनी दुरुस्त केला आणि वैष्णव वाद अधिक वाढीस नेला अशा प्रकारचा एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता शैव लोकांना का लाभला नाही हा खरा प्रश्न आहे. जर का बाबासाहेब आंबेडकरांनी शैव धर्म स्वतंत्र आहे हे ओळखून तो नव्याने स्थापन केला असता तर कदाचित संपूर्ण भारताचा इतिहास बदलला असता परंतु हे शक्य नव्हते. हीच गोष्ट प्रबोधनकार ठाकरे यांच्या बाबत होती पण त्यांनी सुद्धा जय श्री कृष्ण म्हणायला सुरुवात केली आणि गीता धर्म पुढे नेला याला कारण त्यांच्यावर पडलेला टिळकांच्या हिंदुत्ववादाचा प्रभाव होता. एक शक्यता नेताजी सुभाष चंद्र बोस होती परंतु त्यांनी सुद्धा कम्युनिझम स्वीकारून शैव धर्म ही शक्यता पूर्णपणे टाळली .
म्हणजेच शैव नेतृत्वाच्या राष्ट्रीय शक्यता पूर्णपणे या काळामध्ये फापलत गेलेल्या दिसतात आणि ही नक्कीच महात्मा फुले यांची चूक नाही . मुळात फुले यांच्या नंतर आलेल्या पुढच्या पिढ्यांना नेमके काय प्रकारचे उद्योग नववैष्णव वाद आणि वैष्णव वाद यांच्या नावाने चाललेले आहेत हेच कळले नाही. आणि पुढे मग यातून हिंदू धर्म नावाचा एक धर्मच पूर्ण पणे स्वातंत्र्य चळवळीतील लोकांनी स्वीकारला आणि इंग्रजांना आणि युरेशियन लोकांना एका अर्थाने यशस्वी केले . याचे भारतीय संस्कृतीवर नेमके काय दुष्परिणाम झाले हे सांगणे आज सुद्धा कठीण आहे. याबाबतीत नवबौद्ध चळवळ बघण्याजोगी आहे सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत मुळचे शैव स्पिरिट घेऊन आलेली ही चळवळ हळूहळू बौद्ध बनत हळूहळू अहिंसक बनत सरळ सरळ सरकारी हिशेबानं चालत गेली .
त्यामुळेच महात्मा फुले यांना दोष देऊ नये . दोष पुढच्या पिढ्यांचा असतो. आपल्या आधी होऊन गेलेल्या नेत्यांना समजून घेऊन मग पुढची वाटचाल करणे हे काम पुढच्या पिढीचे असते निदान यापुढे तरी आपण ज्या काही आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारत पुढे जायला हवे.
एकेकाळी इंग्रजांच्या दबावाखाली येत महात्मा फुले पूर्ण शैव झाले नाहीत आत्तासुद्धा आपल्यावर नववैष्णववादी काँग्रेस आणि अशैववादी हिंदुत्ववाद यांचा दबाव आहे आणि हा दबाव इंग्रजांच्या काळात जसा अदृश्य होता तसाच आहे तो सहजासहजी दाखवला जात नाही मात्र तो पद्धतशीरपणे आपले काम करत असतो. याला उत्तर एकच असते ते म्हणजे एक तर तुम्ही शिवाजी महाराजांचा शैव सेक्युलरवाद निर्माण करा किंवा तुम्ही शैव हिंदुत्ववाद निर्माण करा तिसरा पर्याय शैव कम्युनिझमचा होता परंतु त्याला फार प्रतिसाद मिळाला नव्हता . त्यामानाने सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा शैवकेंद्रितवाद हा सध्यातरी शैव हिंदुत्ववाद आहे तो स्वीकारायला हरकत नाही परंतु तो स्वीकारताना अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकायला हवीत. मी माझ्या मांडण्या अनेक पद्धतीने सादर केलेल्या आहेत. एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे आपल्याला वर्ण जात विरोधी आणि सर्व लोकांना समान संधी देणारी समाज व्यवस्था स्थापित करायची आहे. म्हणूनच मनुस्मृतीला आपण ठाम विरोध करायचा आहे. संविधानाच्या ज्या ज्या गोष्टी समानतेच्या दिशेने जातात समतेच्या दिशेने जातात स्वातंत्र्य आणि बंधुता दिशेने जातात त्यांना पाठिंबा द्यायचा आहे . समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यायचा आहे . सनातनी अपरिवर्तनीय इस्लामचा असलेला धोका सेक्युलरवादी लोकांना कळत नाही आणि परंपरा स्मृती प्रधान असलेल्या ब्राह्मणवादाचा धोका हिंदुत्ववादी लोकांना कळत नाही अशा एका विचित्र पेचामधून आपण जात आहोत पण आपणाला यातूनच वाट काढत जायला हवे .
आता या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांचे मग करायचे काय ? हा प्रश्न आपण सोडवू शकतो . तर आपण ब्राह्मणांच्या विरोधात उभे राहायचे परंतु पंडितांना मात्र पाठिंबा द्यायचा .म्हणजेच आता आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की जे जे ब्राह्मण म्हणवतात पण जे समतेचे पुरस्कार करणारे आहेत जे जे वर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात आहेत त्या सर्वांना आपण त्यांचे मूळ सांगायचे आणि ठामपणे सांगायचे की तुम्ही आता स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणे बंद करा आणि पंडित म्हणवून घ्या अन्यथा तुम्ही जोपर्यंत ब्राह्मण आहात तोपर्यंत स्मृती जाणे अशक्य जातीव्यवस्था वर्णव्यवस्था जाणे नाहीशी होणे अशक्य आहे. खरे तर ब्राह्मणांनीच आता ब्राह्मण ही आपली आयडेंटिटी सोडावी तिचा त्याग करावा तेच त्यांच्या हिताचे आहे आणि तेच या देशाचेही हिताचे आहे त्यांच्या विद्वत्तेला मान मिळावा असे मला सुद्धा वाटते आणि त्यासाठीच त्यांनी स्वतःला पंडित म्हणवून घ्यावे म्हणजे विद्वत्तेचा मानपण होईल राखलाही जाईल आणि वर्ण जात व्यवस्थेचे जे लेबल त्या ब्राह्मण या शब्दाला आहे ते हटवता येईल . त्यासाठी आता सर्व शैव लोकांनी जे जे विद्वान आहेत त्या त्या सर्वांना ते मग कुठल्याही वर्ण जात आणि धर्मामधून येत असोत किंवा कुठल्याही देशांमधून येत असोत त्यांना सरळ सरळ पंडित हा शब्द लावावा . म्हणजे अगदी अल्बर्ट आईन्स्टाईनला सुद्धा पंडित आईन्स्टाईन म्हणावे हमीद दलवाईला सुद्धा पंडित हमीद दलवाई असे म्हणावे .महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख सुद्धा पंडित महात्मा फुले आणि पंडित बाबासाहेब आंबेडकर असा करावा .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment