महात्मा फुले यांच्यानंतर काय करायचे
महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी काय करायला हवे ?
श्रीधर तिळवे नाईक
सर्वात प्रथम ओबीसी लोकांनी स्वतःची मुख्य आयडेंटिटी ही शैवधर्मीय अशी सांगायला हवी कारण ओबीसींना स्वतः तर संघटित होणे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर स्वतःबरोबर बीसी, भटके आणि आदिवासी यांना सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे त्याचबरोबर ब्राह्मणांच्या मधील जे पूर्वा श्रमीचे पंडित आहेत जे राजे लोकांच्यातील वीर आहेत आणि जे व्यापारी वर्गातील उद्योजकांच्यातील वाणी पणी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे
जोपर्यंत हे सर्व एकत्र येत नाही तोपर्यंत ज्याला जगव्यापी म्हणता येईल अशी चळवळ उभी करता येणे शक्य नाही मागील काही लोकांनी कळत नकळत शूद्र शूद्र अशी ओळख निर्माण करून ठेवली आणि मग ज्यांचा त्यामध्ये हितसंबंधांचा गोतावळा गुंतला होता त्यांनी ती जाणीवपूर्वक अधिकाधिक बिंबवली पण त्या ओळखीचा फायदा किती झाला आणि त्या ओळखीमुळे किती नुकसान झाले हा एक फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे याचे कारण स्वतःसाठी शूद्र असा शब्द वापरणे असा एक अत्यंत घातकी प्रकार सुरू झाला. आम्ही शूद्र हे कोण ठरवणार आणि हे कोण टिकोजीराव जे स्वतःला शूद्र म्हणवून घेत नाहीत ? हे म्हणजे गुलाम या शब्दांमध्ये अभिमान बाळगण्यासारखे झाले . मुळात गुलामगिरी दर्शवणारा हा शब्दच आता फेकून देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे यापुढे शूद्र हा शब्दच वापरू नये त्याऐवजी आपण ज्या विरासतीचे वारसदार आहोत ती एक विशाल अशी ओळख आहे जी संपूर्ण जगभर पसरली होती आपण मागासलेले होतो ही संकल्पनाच मुळात आत्मघातकी आहे या देशातील बहुजन लोकांचा स्वतःचा एक दैदिप्यमान असा इतिहास आहे हा इतिहास शतकानूशतके चालू होता तो अचानक शूद्र म्हणून ब्राह्मणांच्या चरणी अर्पण करण्यात काय अर्थ आहे ? शूद्र ही ब्राह्मण धर्माने दिलेली ओळख आहे ती आपण का स्वीकारावी ? या देशातल्या ाही विद्वान लोकांना काही उद्योग नाहीये त्यामुळे ते सतत शूद्र अति शूद्र असा भडिमार करत असतात पण या भडीमार्याला बळी पडण्याची आता गरज नाही किंबहुना सामान्य माणसाला आता हे कळून चुकलेले आहे की आपण असे सतत झुकलेले राहण्यात काही अर्थ नाही याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला ओबीसी या कॅटेगरी खाली मिळणाऱ्या सवलती सोडा असे सांगतोय फक्त सवलत मिळवण्यापुरताच या ओळखीचा वापर करा मात्र धर्म लिहिताना शैवधर्म असं स्पष्ट लिहा म्हणजे एक मोठी ओळख सर्वजण मिळवतील आणि अभिमानाने ती मिरवतील . शेवटी सवलती तरी किती काळ आणि किती पिढ्या घेणार ? तेव्हा सवलतींचा वापर सुरुवातीला करावा मात्र त्या कुबड्या आहेत हे विसरू नये आपण स्वतःच्या कर्तुत्वाच्या जीवावर कसे समाजात उभारत राहू ते पाहू एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सवलती कितीही दिल्या गेल्या तरी मुळात सरकारी उद्योगधंदे अतिशय कमी होत जाणे अपरिहार्य आहे त्यामुळे मुळातच या सगळ्या सवलतींच्या भानगडी मध्ये जास्तीत जास्त पाच टक्के समाज सेटल होईल त्यापेक्षा अधिक समाज सेटल होणे शक्य नाही त्यामुळे उरलेल्या 95% लोकांनी काय करावे त्यांच्या नशिबी फक्त शूद्र ही ओळख येते आणि त्याचा फायदा मात्र काहीच होत नाही कारण उरलेला जो समाज आहे तो काही सवलती देणार नाही त्यामुळे त्या समाजात वावरताना या 95% लोकांनी केवळ या 5% लोकांच्यासाठी का इतके बलिदान द्यावे ? तेव्हा सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात घ्या की 95% ही जास्त लोकसंख्या आहे आणि तिच्यासाठी शैव हीच अभिमानाने मिरवण्याची ओळख आहे अगदी ज्यांना आज सवलत मिळेल त्यांच्या मुलांनाही पुढच्या पिढीत सवलत मिळेल याची काय खात्री ? त्यामुळे ओबीसी ही ओळख तात्पुरती ओळख आहे हे लक्षात ठेवावे . याउलट शैव ही ओळख फक्त धार्मिक नाही हे गोष्ट लक्षात ठेवा ही ओळख प्रामुख्याने सांस्कृतिक आहे . तिच्या मागे एक प्रचंड संपन्न असा इतिहास आहे . मुख्य म्हणजे ती अतिशय सर्व व्यापक आहे अगदी तुम्ही गोंड असला तरी शैव असता आणि पंडित असला तरी तुम्ही शैव असता. आपल्यातल्या विद्वान लोकांची पोटे भरण्यासाठी आपण इथे जन्माला आलेलो नाही त्यामुळे महात्मा फुले यांचा यथार्थ सन्मान झालाच पाहिजे कारण इंग्रजांच्या काळातील ते पहिले असे शैव समाज सुधारक आहेत ज्यांनी पुन्हा एकदा खंडोबाची ओळख ही मूळ ओळख आहे हे सांगितले त्यांनीच प्रथम शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा अभिमानाचा विषय आहे हे सांगितले त्यांनीच प्रथम शिवाजी महाराज हे कुळवाडीभूषण आहेत हे स्पष्टपणे सांगितले . शिवाजी महाराज बहुजन लोकांचे नेते आहेत हे अधोरेखित करणारे सुद्धा सर्वात प्रथम महात्मा फुलेच होते . त्याबद्दल त्यांचा आपण यथोचित आदरच केला पाहिजे पण त्याचबरोबर तिथेच थांबून आता चालणार नाही आपणाला आता पुढची वाटचाल करायची आहे आणि ही वाटचाल 21व्या शतकातली वाटचाल असणार आहे . तेव्हा ओबीसी ही मर्यादित ओळख सवलत घेण्यापुरती ठेवा आणि सवलती मिळाल्यानंतर आपल्या पुढच्या पिढ्या जागतिक पातळीवर कशा काम करतील ते पहा . आपला वारसा थेट भगवान शंकर भगवती पार्वतीपासून सुरू होतो. ही भारतीय संस्कृती आपण घडवलेली आहे आपण निर्माण केलेली आहे सिंधू संस्कृती ही तिचा सर्वात मोठा सुरुवातीचा आद्य आविष्कार आहे . आपला वारसा आपण तिथून सुरू केला पाहिजे हे आपण लक्षात घेतले पाहिजे हा साधारणपणे 12,000 वर्षाचा इतिहास आहे हे लक्षात घ्या त्यापेक्षाही तो जुना असू शकतो सिंधू संस्कृतीनंतर सुद्धा आपल्या वीर समाजातून अनेक शैव राजे होऊन गेले पंडित समाजातून शैव पंडित होऊन गेले अनेक उत्तम दर्जाचे लोक हे ज्याला आज आपण कारागीर समाज म्हणतो त्यातून निर्माण झालेले आहेत. आपल्यातूनच अनेक व्यापारी आणि उद्योजक निर्माण झालेले आहेत आपण हे सर्व विसरावे म्हणून खटाटोप चाललेला आहे आणि म्हणूनच काही लोक आपोआपच आत्ताचा शूद्र लोकांचा इतिहास हा 19 व्या शतकापासून सुरू होतो तोपर्यंत हे लोक गुलाम होते अशी इतिहासाच्या अत्यंत विपरीत प्रकारची मांडणी करायला बघतात . महात्मा फुले यांनी या मांडणीला नकार दिला होता आणि फार प्राचीन काळापासून आपण भांडत आहोत याची यथार्थ जाणीव करून दिली होती. तेव्हा महात्मा फुले यांना आपण पुढे गेलेलो पाहायचे होते हे लक्षात घेतले पाहिजे .
थोडक्यात सर्वात प्रथम स्वतःची ओळख शैव अशी सांगा .
श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी काय करायला हवे २ अर्थात ब्राह्मणांशी वागावे कसे श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांच्या लिखाणातील भटांवरचा हल्ला हा ब्राह्मणांचा काळीजवेध घेणारा आहे हे आत्ताच्या अलीकडच्या पोस्टवरून सुद्धा अनेकदा स्पष्ट होत असते . अगदी अलीकडेच ते कसे ब्राह्मणांचा द्वेष करत हे सांगणारे त्यांच्या लिखाणातील असे काही उतारे काही ब्राह्मण पंडित सादर करत असतात हे उतारे ऑथेंटिक असल्याने त्यांना नकार देणे कठीण आहे प्रश्न असा आहे की त्यांच्या या त्यावेळी घेतलेल्या भूमिकेचे आता काय करायचे ?
सर्वात प्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे महात्मा फुले यांच्या काळामध्ये कलियुगामध्ये फक्त ब्राह्मण आणि शूद्र असे दोन वर्ण अस्तित्वात आहेत असा स्टांस अशी भूमिका ब्राह्मण लोक घेत होते किंबहुना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तयार करायला कोणी तयार नव्हते याचे सर्वात मोठे कारण हा सिद्धांत होता . परशुरामाने सर्व क्षत्रिय कापून टाकले आणि कलियुगामध्ये वैश्य उरले नाहीत असे हेमाद्रि या पंडिताने सिद्धांतन केले आणि तेच या लोकांचे ठाम मत होते . साहजिकच जेव्हा महात्मा फुले शूद्र हा शब्द वापरतात तेव्हा त्यामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण सुद्धा येतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच फुले यांच्या लिखाणातून ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असे दोन वैचारिक ध्रुव तयार होऊन ब्राह्मणे तर चळवळ उभी राहिली
पण याचा एक परिणाम असा झाला की ब्राह्मण हाच आपला शत्रू आहे ब्राह्मण्य हेच आपले शत्रू आहे अशा प्रकारचा अत्यंत दुराग्रह महात्मा फुले यांच्या लिखाणांमध्ये आपणाला दिसतो हा टोकाचा आग्रहच अलीकडे सुद्धा काही ब्राह्मणेतर चळवळीतले लोक पुढे चालवत आहेत त्यामुळेच ओबीसी लोक प्रचंड गोंधळलेले दिसतात .
एका बाजूला आपणाला असे दिसते की महात्मा फुले स्वतःच पूर्वाश्रमीच्या क्षत्रियांना रिस्टोर करायचा प्रयत्न करत आहेत . त्यामुळेच वेदांच्या मधले विश्वामित्र यांच्यासारखे क्षत्रिय प्रचंड टीके खाली येत नाहीत.
ते त्यामुळेच बुद्ध हा क्षत्रिय असल्याने त्याला सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतात . याबाबतीत इंग्रजांचा स्टान्स फार महत्त्वाचा होता मुळात इंग्रजांना क्षत्रिय रिस्टोर होणे फार आवश्यक वाटत होते याचे कारण त्यांना सर्व क्षत्रियांचा पाठिंबा त्यांच्या राजवटीसाठी आवश्यक वाटत होता मात्र हे सर्व क्षत्रिय भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे असावेत असे त्यांना वाटत होते साहजिकच प्रतिकार न करणारे अहिंसेचे समर्थन करणारे असे हे क्षत्रिय आणि त्यांचे धम्म त्यांनी जास्तीत जास्त भारतीय इतिहासाच्या केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली आणि आणि शेवटी ते त्यात यशस्वी ही झाले. आपल्याकडे महात्मा गांधी ,बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरू यांना जे इंग्रजांचे समर्थन लाभले होते त्याला कारण ते नेमके तेच करत होते जे इंग्रजांना महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यामार्फत साधायचे होते . त्या उलट हिंदुत्ववादी किंवा तत्सम लोकांना इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळ उभी करायची असल्याने ते मात्र सातत्याने शिवाजी महाराज , महाराणा प्रताप यांना पुढे आणायला बघत होते. भारतीय इतिहासाचे हे राजकारण हे काही नवीन नाही. फार सुरुवातीच्या काळापासूनच भारतातल्या राजकीय व्यवस्था इतिहासाचा वापर आपल्या पद्धतीने करायला बघत असतात. याची सुरुवात सुरुवातीला ब्राह्मण धर्माने केली होती . महात्मा फुले यांना इंग्रजांचे हे राजकारण कळाले का? तर नाही! किंबहुना त्यांना इंग्रज फारसे कळाले किंवा इंग्रजांची साम्राज्यशाही किती पॉलिटिकल आहे हे त्यांना कळाले असे मला वाटत नाही . या मुळात त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्या. या काळामध्ये सर्व समाज सुधारक आपणाला इंग्रजांचे राज्य ही जणू काय दैवी देणगी आहे अशा थाटात लिखाण करताना दिसतात यामध्ये लोकहितवादी जसे आहेत तसे न्यायमूर्ती रानडे सुद्धा आहेत मग एकट्या फुलांना फक्त दोष का दिला जातो ?
फुले यांनाच दोष दिला जातो याचे कारण फुले फक्त इंग्रजांच्या बाजूने नाहीत ते ब्राह्मणांच्या विरोधात उभे ठाकतात आणि राजाराम मोहन राय किंवा न्यायमूर्ती रानडे अशा प्रकारची चूक करत नाहीत कारण मुळातच हे दोघेही ब्राह्मण आहेत .त्यामुळे नेहमीच इंग्रजांच्या बाबतीतला मुद्दा महात्मा फुले यांच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि करता येतो . हा प्रयत्न आपण स्वीकारू नये मात्र त्याचबरोबर हेही खरे की त्यांच्या काळाची ही मर्यादा होती त्यांची स्वतःची ही मर्यादा होती हे लक्षात घेऊन आपण हे नक्की केले पाहिजे की आपला ओबीसी लोकांचा इतिहास हा आपण इंग्रजांच्या विरोधातच लिहिला पाहिजे. त्याबाबतीत इंग्रज लोकांचे आणि इंग्रज साम्राज्याचे जे निर्लज्ज समर्थन काही लोक एकविसाव्या शतकातही करू बघतात ते चुकीचे आहेत . किंबहुना फुले यांनी इंग्रज राजवटीचे समर्थन केले आणि पुढे त्यांचा उत्कृष्ट शिष्य ज्यांनी एकदा फुले यांचा मीच आता काय तो अनुयायी उरला आहे असे म्हटले होते ते पंडित बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ब्रिटिशांच्या राजवटीचे समर्थकच होते .
प्रश्न असा आहे की यामुळे संपूर्ण ओबीसीबीसी आणि आदिवासी समाज इंग्रजांच्या बाजूने उभा होता का ? तर नाही! प्रत्यक्षामध्ये समाज एका बाजूला आणि हे नेते एका बाजूला असे इंग्रजांच्या धोरणाबाबत झालेले दिसते आणि याचा एक दुष्परिणाम असा झाला की स्वातंत्र्य चळवळ जशी वाढत गेली तसतसे ही स्वातंत्र्य चळवळ चालवणारे लोक ब्राह्मण असल्याने फक्त ब्राह्मण सुधारक हे ब्राह्मणांच्या विरोधी नसल्याने आणि महात्मा फुले हे मात्र ब्राह्मणांच्याही विरोधी असल्यामुळे आणि त्याचबरोबर इंग्रजांना पूरक असल्यामुळे भारतीय इतिहासामधून साईडलाईन केले गेले . त्यांचे लिखाण हे कितीही क्रांतिकारक सामाजिक पातळीवर असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला ते पूरक नाही हे लक्षात आल्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जवळजवळ सर्वच ब्राह्मण इतिहासकारांनी फुले यांच्यावर या काळामध्ये अघोषित बहिष्कार टाकलेला आहे .
प्रश्न असा आहे की महात्मा फुले हे इंग्रजांच्या राजवटीच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित होते का ? याचे प्रामाणिक उत्तर हो असे आहे उदाहरणार्थ १८५७ चे बंड भले अयशस्वी झाले असेल पण ते केवळ ब्राह्मणांचे बंड नव्हते . त्याला ज्या प्रकाराने फुले यांनी मोडीत काढलेले आहे ती तऱ्हा मला नाही वाटत की फार स्पृहणीय आहे . मुळातच या मागचे जे गृहीतक आहे की इंग्रज आल्यामुळे ओबीसी, बीसी आणि आदिवासी या लोकांचे भले झाले ते गृहीतक चुकीचे आहे. कळत नकळत शैव लोकांच्या लढाऊ वृत्ती बद्दल खात्री नसल्याचे इथे दिसते . प्रत्यक्षामध्ये माझे स्पष्ट मत असे आहे की इंग्रज जर आले नसते तर पुन्हा एकदा यशवंतराव होळकरांची राजवट प्रस्थापित झाली असती आणि त्या राजवटीने संपूर्ण भारतभर वर्णजात व्यवस्थेला आव्हान देत एक पूर्णपणे नवीन आधुनिक व्यवस्था निर्माण केली असती . शैव चुपचाप बसले असते हा जो काही अर्थ या लोकांनी काढलेला आहे तो शैव लोक आणि शैव धर्म न कळल्यातून आलेला आहे . फुले यांनी कळत नकळत इथे ब्रिटिश साम्राज्यवादाचे धडे गिरवलेले दिसतात आणि आपल्याच लोकांना अंडर एस्टिमेट केलेले दिसते . एक गोष्ट मात्र खरी आहे की आता जो भारत नावाचा देश दिसतो तो कदाचित दिसला नसता. त्या ऐवजी भारतात किमान चार देश दिसले असते आणि त्या चार देशांची वेगळी संस्कृती विकसित झाली असती. यातील द्रविडस्थानांचा देश म्हणून उदय तर निश्चितच झाला असता. त्यानंतर होळकर यांनी निर्माण केलेला एक मध्य भारतीय देश दिसला असता . आणि पुढे पूर्वेकडे एक नवीन देश दिसला असता आणि आत्ताचा पाकिस्तान पंजाब कश्मीर वगैरे मिळून एक नवीन देश दिसला असता. इंग्रजांच्या आगमनामुळे आपण सगळे एक झालो पण हे एक होणे खरोखर कितपत फायदेशीर ठरले हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. आपण अनेकदा गोष्टी गृहीत धरतो पण प्रत्यक्षामध्ये त्या तशाच घडल्या असत्या असे सांगता येत नाही .
मात्र लोक थांबले का ? तर नाही थांबले . भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा बारकाईने अभ्यास केला तर आपणाला असे दिसते की नेतृत्व जरी ब्राह्मणांच्या ताब्यात असली तरी मुख्य नेतृत्व ब्राह्मणेतर गांधी यांच्या ताब्यात होते आणि इतरत्र अनेक ठिकाणी अनेक शैव लोकांनी या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे.
उलट या सगळ्या गोष्टींच्यामुळे झाले काय ? तर स्वातंत्र्य चळवळ ही वैष्णव लोकांनी चालवल्यामुळे कळत नकळत हिंदू म्हणजे वैष्णव असे समीकरण रूढ झाले आणि आजही ते प्रस्थापित झालेले दिसते . एका अर्थाने फुले यांनी शैव धर्माच्या विस्ताराला पायबंद घातला आणि यामुळेच पुढे मागे ओबीसी नावाचा वर्ग मागासलेला आहे अशा तऱ्हेने मांडणी करावी लागली. फुले यांनी स्वीकारलेल्या या धोरणामुळेच कळत नकळत जैन आणि बौद्ध धर्माची थोरवी वाढत गेली आणि कळत नकळत मूळ शैव असलेले बाबासाहेब आंबेडकर हे कळत नकळत बौद्ध होत गेले म्हणजेच बाबासाहेबांच्या धर्मांतराचा पाया एका अर्थाने महात्मा फुले यांनी टाकलेला आहे .
त्यामुळेच महात्मा फुले यांना जे स्वतःला हिंदू समजतात अशा लोकांच्याकडून फारशी मान्यता मिळत नाही पण याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की त्यामुळेच शैव अभिमान जितका जागृत व्हायला हवा तितका तो होत नाही आणि जणू काय शैव धर्म हा एक हिंदू धर्माचा पंथ आहे अशा तऱ्हेचा जो वैष्णव लोकांनी प्रचार केला तो प्रचार वाढत जात कळत नकळत शैव धर्म हा ओबीसी बीसी आणि आदिवासी या प्रवर्गांच्या मध्ये विसाव्या आणि एकविसाव्या शतकामध्ये आकसत गेला.
मग सनातन कर्मठ ब्राह्मणांच्या प्रमाणेच आपण सुद्धा महात्मा फुले यांना खलनायक ठरवायचे का ? तर याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. मुळातच अशा प्रकारचा गोंधळ लोकहितवादी यांनी घातला रानडे यांनी घातला परंतु हा गोंधळ नंतर टिळक आणि महात्मा गांधी यांनी दुरुस्त केला आणि वैष्णव वाद अधिक वाढीस नेला अशा प्रकारचा एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता शैव लोकांना का लाभला नाही हा खरा प्रश्न आहे. जर का बाबासाहेब आंबेडकरांनी शैव धर्म स्वतंत्र आहे हे ओळखून तो नव्याने स्थापन केला असता तर कदाचित संपूर्ण भारताचा इतिहास बदलला असता परंतु हे शक्य नव्हते. हीच गोष्ट प्रबोधनकार ठाकरे यांच्या बाबत होती पण त्यांनी सुद्धा जय श्री कृष्ण म्हणायला सुरुवात केली आणि गीता धर्म पुढे नेला याला कारण त्यांच्यावर पडलेला टिळकांच्या हिंदुत्ववादाचा प्रभाव होता. एक शक्यता नेताजी सुभाष चंद्र बोस होती परंतु त्यांनी सुद्धा कम्युनिझम स्वीकारून शैव धर्म ही शक्यता पूर्णपणे टाळली .
म्हणजेच शैव नेतृत्वाच्या राष्ट्रीय शक्यता पूर्णपणे या काळामध्ये फापलत गेलेल्या दिसतात आणि ही नक्कीच महात्मा फुले यांची चूक नाही . मुळात फुले यांच्या नंतर आलेल्या पुढच्या पिढ्यांना नेमके काय प्रकारचे उद्योग नववैष्णव वाद आणि वैष्णव वाद यांच्या नावाने चाललेले आहेत हेच कळले नाही. आणि पुढे मग यातून हिंदू धर्म नावाचा एक धर्मच पूर्ण पणे स्वातंत्र्य चळवळीतील लोकांनी स्वीकारला आणि इंग्रजांना आणि युरेशियन लोकांना एका अर्थाने यशस्वी केले . याचे भारतीय संस्कृतीवर नेमके काय दुष्परिणाम झाले हे सांगणे आज सुद्धा कठीण आहे. याबाबतीत नवबौद्ध चळवळ बघण्याजोगी आहे सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत मुळचे शैव स्पिरिट घेऊन आलेली ही चळवळ हळूहळू बौद्ध बनत हळूहळू अहिंसक बनत सरळ सरळ सरकारी हिशेबानं चालत गेली .
त्यामुळेच महात्मा फुले यांना दोष देऊ नये . दोष पुढच्या पिढ्यांचा असतो. आपल्या आधी होऊन गेलेल्या नेत्यांना समजून घेऊन मग पुढची वाटचाल करणे हे काम पुढच्या पिढीचे असते निदान यापुढे तरी आपण ज्या काही आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारत पुढे जायला हवे.
एकेकाळी इंग्रजांच्या दबावाखाली येत महात्मा फुले पूर्ण शैव झाले नाहीत आत्तासुद्धा आपल्यावर नववैष्णववादी काँग्रेस आणि अशैववादी हिंदुत्ववाद यांचा दबाव आहे आणि हा दबाव इंग्रजांच्या काळात जसा अदृश्य होता तसाच आहे तो सहजासहजी दाखवला जात नाही मात्र तो पद्धतशीरपणे आपले काम करत असतो. याला उत्तर एकच असते ते म्हणजे एक तर तुम्ही शिवाजी महाराजांचा शैव सेक्युलरवाद निर्माण करा किंवा तुम्ही शैव हिंदुत्ववाद निर्माण करा तिसरा पर्याय शैव कम्युनिझमचा होता परंतु त्याला फार प्रतिसाद मिळाला नव्हता . त्यामानाने सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा शैवकेंद्रितवाद हा सध्यातरी शैव हिंदुत्ववाद आहे तो स्वीकारायला हरकत नाही परंतु तो स्वीकारताना अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकायला हवीत. मी माझ्या मांडण्या अनेक पद्धतीने सादर केलेल्या आहेत. एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे आपल्याला वर्ण जात विरोधी आणि सर्व लोकांना समान संधी देणारी समाज व्यवस्था स्थापित करायची आहे. म्हणूनच मनुस्मृतीला आपण ठाम विरोध करायचा आहे. संविधानाच्या ज्या ज्या गोष्टी समानतेच्या दिशेने जातात समतेच्या दिशेने जातात स्वातंत्र्य आणि बंधुता दिशेने जातात त्यांना पाठिंबा द्यायचा आहे . समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यायचा आहे . सनातनी अपरिवर्तनीय इस्लामचा असलेला धोका सेक्युलरवादी लोकांना कळत नाही आणि परंपरा स्मृती प्रधान असलेल्या ब्राह्मणवादाचा धोका हिंदुत्ववादी लोकांना कळत नाही अशा एका विचित्र पेचामधून आपण जात आहोत पण आपणाला यातूनच वाट काढत जायला हवे .
आता या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांचे मग करायचे काय ? हा प्रश्न आपण सोडवू शकतो . तर आपण ब्राह्मणांच्या विरोधात उभे राहायचे परंतु पंडितांना मात्र पाठिंबा द्यायचा .म्हणजेच आता आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की जे जे ब्राह्मण म्हणवतात पण जे समतेचे पुरस्कार करणारे आहेत जे जे वर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात आहेत त्या सर्वांना आपण त्यांचे मूळ सांगायचे आणि ठामपणे सांगायचे की तुम्ही आता स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणे बंद करा आणि पंडित म्हणवून घ्या अन्यथा तुम्ही जोपर्यंत ब्राह्मण आहात तोपर्यंत स्मृती जाणे अशक्य जातीव्यवस्था वर्णव्यवस्था जाणे नाहीशी होणे अशक्य आहे. खरे तर ब्राह्मणांनीच आता ब्राह्मण ही आपली आयडेंटिटी सोडावी तिचा त्याग करावा तेच त्यांच्या हिताचे आहे आणि तेच या देशाचेही हिताचे आहे त्यांच्या विद्वत्तेला मान मिळावा असे मला सुद्धा वाटते आणि त्यासाठीच त्यांनी स्वतःला पंडित म्हणवून घ्यावे म्हणजे विद्वत्तेचा मानपण होईल राखलाही जाईल आणि वर्ण जात व्यवस्थेचे जे लेबल त्या ब्राह्मण या शब्दाला आहे ते हटवता येईल . त्यासाठी आता सर्व शैव लोकांनी जे जे विद्वान आहेत त्या त्या सर्वांना ते मग कुठल्याही वर्ण जात आणि धर्मामधून येत असोत किंवा कुठल्याही देशांमधून येत असोत त्यांना सरळ सरळ पंडित हा शब्द लावावा . म्हणजे अगदी अल्बर्ट आईन्स्टाईनला सुद्धा पंडित आईन्स्टाईन म्हणावे हमीद दलवाईला सुद्धा पंडित हमीद दलवाई असे म्हणावे .महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख सुद्धा पंडित महात्मा फुले आणि पंडित बाबासाहेब आंबेडकर असा करावा .
श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी (शैव) काय करायला हवे? ३ अर्थात ब्राह्मणांशी कसे वागावे २ श्रीधर तिळवे नाईक
ओबीसी,बीसी आणि आदिवासी यांच्यापुढे येणारा जो सर्वात मोठा प्रश्न असतो तो नेहमीच वर्णव्यवस्थेचा कट्टर पुरस्कार करणारा ब्राह्मण व्यक्तीचा असतो . अशा लोकांशी कसे वागावे हा एक फार मोठा प्रश्न आहे.
अशा कट्टर ब्राह्मण माणसाला किंवा क्षत्रिय माणसाला सर्वात प्रथम एक गोष्ट आपण सांगावी ती म्हणजे आपण सर्व होमो सेपियन आहोत . तू सुद्धा होमोसेपियन आहेस आणि मी सुद्धा होमो सेपियन आहे तुला काही स्पेशली निर्माण करण्यात आलेले नाही तू आमच्यासारखाच आईच्या पोटातून आलेला आहेस तू मला होमोसिपियन म्हणून स्वीकार आणि मी तुला होमो सेपियन म्हणून स्वीकारतो .
जर त्याने यानंतर जनेटिकचे उदाहरण दिले तर त्याला स्पष्टपणे सांग की ब्राह्मण हे मुळात युरेशियामधून आलेले आहेत म्हणजेच ते भारतीय नाहीत तरीसुद्धा आम्ही अत्यंत मनमोकळेपणाने तुमचा स्वीकार केलेला आहे तुम्ही पाहुणे होता आता यजमान झालेले आहात पण याचा अर्थ तुम्ही आमच्या डोक्यावर बसावे असा होत नाही जर का तुम्ही स्वतःच्या जन्मदत्त गुणसूत्रांच्या आधारे वर्चस्व गाजवायला जाल तर त्याच गुणसूत्रांच्या आधारे आम्ही सुद्धा तुम्ही कसे युरेशियामधून आलेले आहात हे सिद्ध करत राहू शिवाय तुझ्या जेनेटिक्स मुळे तुला असे कोणते विशेष प्राप्त झाले ते शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक पातळीवर वैज्ञानिक पुरावे देऊन सिद्ध कर असे आव्हान द्यावे .
त्याला जर स्वतःच्या गोऱ्या रंगाचा अभिमान असेल तर त्याला सांगावे की हा रंग ही देणगी नसून रंगद्रव्याच्या अभावामुळे निर्माण झालेले हे प्रकरण आहे आणि हे प्रकरण वयाने जास्तीत जास्त १० ते ५० हजार वर्षे जुने आहे तेव्हा उगाच हुशारकी मारू नकोस कारण दहा ते ५०हजार वर्षांपूर्वी तुझे सर्व पूर्वज काळेच होते . रंगद्रव्य जास्त असणे हे गरजेचे आहे कारण ते जास्त हेल्दी आहे त्यामुळे आरोग्यवान कोण असा प्रश्न आला तर कदाचित तूच आमच्यापेक्षा कमी आरोग्यवान आहेस . तर तुला आम्ही तू जास्त रोगट आहेस असे म्हणावे का असा प्रश्न विचारावा
यानंतर तो जर म्हणेल की शास्त्र असे म्हणते तर त्याला स्पष्ट सांगावे की तुझे शास्त्र हे फक्त तुझ्यावर ब्राह्मण धर्मापुरते मर्यादित आहे आम्हा शैव धर्मामध्ये त्यांची काहीही जागा नाही .
यावरही तो जास्त युक्तिवाद करत असेल तर त्याला सांगावे की मुळातच हा शब्द शूद्र नव्हता तर शुद्ध होता आणि शैव लोक तो वापरत होते आणि तुम्हाला अशुद्ध म्हणत होते कारण तुम्ही जेव्हा आलात तेव्हा आंघोळ करत नव्हता शुद्ध होत नव्हता तर जर का तू आमच्यासाठी शूद्र हा शब्द वारंवार वापरणार असशील तर आम्ही सुद्धा वारंवार तू अशुद्ध आहेस तू अशुद्ध आहेस अशा प्रकारचा शब्द प्रयोग करत राहू ते तुला चालणार आहे का ? तुम्ही जेव्हा भारतात आला तेव्हा आंघोळ करणे तुम्हाला फारसे मानवत नव्हते रोज आंघोळ करणे तुम्ही भारतात आल्यानंतर शैव लोकांच्याकडून शिकलेला आहात तेव्हा उगाच हुशारकी मारू नका . आमच्याकडे आमच्या शिवलिंगाला सुद्धा रोज आंघोळ घालावी लागते . तुझ्या वेदांच्या मध्ये तुझे देव किती वेळा आंघोळ करतात हे तू एकदा नेट नीट अभ्यासून आम्हाला सांग . यदा कदाचित हे सर्व ऐकून तो सुधारला तर त्याला सांगावे की तू आमच्या दृष्टीने पंडित आहेस परंतु पंडित असल्यासारखा विद्वान हो मानवतावादी हो . आम्ही तुला ब्राह्मण म्हणणार नाही आम्ही तुला फक्त पंडित म्हणू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव कुठल्याही वर्ण आणि जातीमधून पंडित निर्माण होऊ शकतात.
तरीही त्याचा ब्राह्मण असण्याचा गर्व कमी होत नसेल तर मात्र अशा माणसाशी संपर्क कमी करावा हेच उत्तम . मात्र आपल्या बाजूने आपण सतत वर्ण जात सिस्टीम विरोधात बोलले पाहिजे. आणि या अंगाने जेव्हा जेव्हा कोणी प्रश्न विचारेल तेव्हा त्याला फक्त एकच गोष्ट सांगावी ती म्हणजे आपण सर्व होमो सेपियन आहोत आणि आता वेळ आलेली आहे की आपण सर्वच होमोसेपियन लोकांनी या पृथ्वीची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतली पाहिजे.
श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी कसे वागावे ४ निर्मिकाचे काय करावे श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांनी धार्मिक म्हणून जे काही योगदान दिले त्यामध्ये त्यांची निर्मिक संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे त्या काळामध्ये मुळातच आपली पृथ्वी कोणी निर्माण केली याचे वैज्ञानिक उत्तर कोणाकडेच नव्हते साहजिकच मग त्या काळातले सर्व वैज्ञानिक निर्माण कर्ता म्हणून कोणीतरी असणार असे गृहीत धरूनच आपले वैज्ञानिक संशोधन करत असत . त्यामुळेच पुरोगामी कालखंडामध्ये नास्तिक विचारवंत खूप कमी होते फुले याला अपवाद नव्हते. त्यामुळे साहजिकच त्यांची सुद्धा ईश्वरावर श्रद्धा होती मात्र ईश्वर हा शब्द वापरावा की न वापरावा याविषयी त्यांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या कारण हा शब्द ब्राह्मण लोकांनी आणि ब्राह्मण धर्माने हायजॅक केला होता वास्तविक ईश्वर ही मूळची शैव संकल्पना आहे आणि भाव तंत्रासाठी ती वापरली जाते किंबहुना ईश्वर तंत्र असे स्वतंत्र मोक्ष मिळवून देणारे भावतंत्र आहे .महात्मा फुले यांनी एका अर्थाने शैव लोकांच्या मध्ये नाहीशा झालेल्या या भाव तंत्राचे पुनरजीवन केले
महात्मा फुले यांच्या काळामध्ये जो ब्राह्मण धर्म होता तो ब्राह्मण धर्म ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन देवतांची पूजा करत असे आणि या धर्माने शिव या संकल्पनेचे रूपांतर महेश मध्ये केले होते आणि त्याला संहारक करून टाकला होता. त्याला राहण्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक स्मशान दिले होते आणि तो कसा दरिद्री आहे हे वारंवार सांगायचा प्रयत्न केला होता . हे करताना अत्यंत धूर्तपणाने शिव हे तत्व निर्मिक नाही हे बिंबवण्यात येत होते एका अर्थाने शैव लोकांचे आपल्या धर्माशी असलेले नाते तुटावे म्हणून हे करण्यात येत होते .
मूळ लोकशैव-धर्मामध्ये शिव हा केवळ संहारक कधीच नव्हता तर तो निर्मिक होता पालक होता आणि संहारक होता म्हणजेच या जगाचे निर्माण त्यानेच केले होते तोच या जगाला पाळत होता आणि शेवटी तोच हे जग नष्ट करणार होता पण ब्राह्मण धर्माने अत्यंत जाणीवपूर्वक ब्रह्मा विष्णू महेश ही संकल्पना सातत्याने लादत त्याच्याकडून निर्माण आणि पालन काढून घेतले आणि ते आपल्या वैदिक परंपरेतून आलेल्या देवतांच्याकडे दिले . महात्मा फुले यांनी हे सर्व नाकारून पुन्हा एकदा निर्मिक हे तत्त्व प्रस्थापित केले आणि त्यासाठी निर्मिक हा खास शब्द निर्माण केला सतत संहारक म्हणून बिंबवला गेलेला रोल नाकारणे हे त्यामुळे शक्य झाले .
मुळात आपण लक्षात घेतले पाहिजे की शैव-धर्मामध्ये शिव आणि शक्ती ही दोन तत्वे आहेत आणि त्यांनी हा संसार निर्माण केलेला आहे या संसाराचा प्राण म्हणजे ईश्वर ! संसार निर्माण करण्याच्या प्रक्रिये मधला सर्वात महत्त्वाचा रोल हा शक्तीचा आहे म्हणजे एका अर्थाने शक्ती निर्मिक आहे मात्र हा संसार निर्माण केल्यानंतर संपूर्ण संसारामध्ये शिव हे तत्व ईश्वर म्हणून अस्तित्वात येते कारण संसारामध्ये ते सगुण होते म्हणूनच मग सर्वत्रच त्र्यंबकेश्वर, महेश्वर, काशी विश्वेश्वर अशा प्रकारच्या अनेक नावांनी त्याला पुजले जाते . फुले यांनी हा ईश्वर स्वीकारला मात्र नवीन पुरोगामी संकल्पनेमध्ये त्याला बसवत त्यांनी त्याला निर्मिक असे नाव दिले आणि केवळ संहारक म्हणून जी ब्राह्मण धर्माने शिवतत्त्वाची ईश्वर तत्वाची जी प्रतिमा तयार केली होती ती नाकारत तो पेंडुलम निर्माणाकडे निर्मितीकडे नेला त्यामुळेच ज्यांना ज्यांना निर्मिक तत्व निर्माण तत्व भावते त्या त्या लोकांनी शंकराची पूजा किंवा ईश्वराची पूजा निर्मिक म्हणून करायला काहीही हरकत नाही मात्र निर्मिक म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे .
लोकशैव धर्मामध्ये ईश्वर हे तत्व सगुण मानत त्याची अनेक पद्धतीने अनेक नावांनी पूजा केली जाऊ शकते . फुले यांनी त्यांच्या सत्यशोधक समाजामध्ये ही पूजा निर्मिक म्हणून करण्याची प्रथा सुरू केली. ही पद्धत ज्यांना स्वीकारायची आहे त्यांनी ती जरूर स्वीकारावी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी की निर्मिक हा फक्त निर्माण करत नाही तर तो पालनही करतो आणि संहारही करतो
प्रश्न असा आहे की महात्मा फुले यांनी नास्तिक वाद का स्वीकारला नाही ? याचे स्पष्ट उत्तर असे आहे की त्यांची खरोखरच ईश्वरावर निर्मिकावर श्रद्धा होती त्यामुळे ते एका अर्थाने आस्तिक होते दुसरी गोष्ट ते या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन धर्मांच्या कडून प्रभावित झाले होते मुख्य म्हणजे ख्रिश्चन धर्मातील शिक्षण धर्म आणि सेवाधर्म त्यांना प्रचंड भावलेला होता . वास्तविक ख्रिश्चन धर्मा मधले हे दोन्ही धर्म हे मूळशैव धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये अस्तित्वात होते आणि त्यांचाच प्रभाव पडून ख्रिश्चनिटी बदललेली होती . विशेषता बौद्ध धर्माने आपल्या धर्मप्रचाराविषयी ज्या काही गोष्टी अत्यंत पद्धतशीरपणे राबवल्या त्या ह्या दोन गोष्टी होत्या आणि त्याचा प्रभाव पडून अनेक लोक बौद्ध झाले . फुले यांना याविषयी माहिती असावी की नसावी हा एक फार मोठा प्रश्न आहे . सध्याच्या पुराव्यावरून असे दिसते की त्यांना बौद्ध धर्माचा संपूर्ण इतिहास माहीत नसावा . कारण मुळातच त्यांच्या काळामध्ये तो पूर्णपणे उपलब्ध नव्हता .
माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की सर्व ओबीसींनी शिक्षणधर्म आणि सेवाधर्म आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना बसवेश्वर यांनी याची अतिशय व्यवस्थित मांडणी केलेली होती(त्यामुळेच कर्नाटकामध्ये लिंगायत लोकांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थांची संख्या प्रचंड दिसते ) पण दुर्दैवाने ती अधिक प्रभावी होण्याऐवजी तिचीच हत्या करण्यात आली आणि पुन्हा एकदा आपण कर्मकांडामध्ये गुंतून गेलो पण मला असे वाटते की पुन्हा एकदा याचे अतिशय चांगले पुनर्जीवन महात्मा फुले यांनी केले. आपण शिक्षण धर्म आणि सेवाधर्म हे दोन्ही धर्म स्वीकारले पाहिजेत मुळातच हे परके नव्हते ते आपलेच आहेत हे लक्षात घ्या . ज्ञानदान हे कायमच आपल्याकडे पवित्र दान मानले गेलेले आहे . त्याचबरोबर गरिबांची सेवा आजारी पडलेल्या माणसाची सेवा ही सुद्धा प्रथम शैव-धर्मामध्ये सुरू झाली होती किंबहुना भगवान शंकर यांची पूजा वैधेश्वर म्हणून करणे त्यामुळे सुरू झाले होते . याच परंपरेतून पुढे वैद्यनाथ नावाचा एक अतिशय चांगला नाथ संप्रदायातला मोक्षला पोहोचलेला मनुष्य निर्माण झाला आणि त्यानेच वैद्यक विद्या स्वतंत्र विद्या म्हणून साकारली आणि पुढे नेली. पुढे कर्नाटकामध्ये त्यालाच शंकराचा भगवान शिव यांचा अवतार मानले गेले . सर्व रुग्णांची सेवा आणि त्यांना रोगमुक्त करण्याची संपूर्ण धडपड ही या वैद्यनाथ संप्रदायात फार महत्त्वाची आहे . वैद्यकीय व्यवसाय हा पैसे मिळवण्यासाठी करायचा व्यवसाय नसून तो सेवा करण्यासाठी जन्माला घातला गेला आहे . महात्मा फुले हे या सेवाधर्मापासून प्रचंड प्रभावित झालेले होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . त्यामुळेच बहुजन समाजाच्या सेवेसाठी आपला जन्म झालेला आहे असे ते मानत त्यांनी अनेक समाज सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामागे त्यांचा निर्मिका वरील विश्वास हा सोबतच होता . महात्मा फुले नास्तिक नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे पण त्याचबरोबर ते बसवेश्वर यांच्याप्रमाणेच देह देवाचे मंदिर मानत होते. आणि या निर्मिकाच्या पूजेसाठी बसवेश्वर यांच्याप्रमाणेच ते कुठल्याच मधल्या दलालाची म्हणजेच ब्राह्मणाची गरज नाही पुरोहिताची गरज नाही असे म्हणत होते हेही लक्षात ठेवले पाहिजे तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निर्मिक स्वीकारणे म्हणजे पुरोहित नाकारणे होय . याबाबतीतले अधिक विवेचन करण्यासाठी जो आवश्यक वेळ त्यांना मिळायला हवा होता तो मिळालेला नाही परंतु याबाबतीतला निर्णय हा त्यांनी स्वतःच भाविकावर सोपवलेला आहे . भाविकाने आपल्या निर्मिकाची पूजा कशी करावी हे ठरवावे मात्र पुरोहिताची गरज नाही हे निश्चित आहे.
याचा एक निश्चित परिणाम झालेला दिसतो मुख्य म्हणजे सत्यशोधक समाजाचे चर्च निर्माण झाले नाही आणि त्यामुळे या धर्माचा प्रचार फारसा होऊच शकला नाही . ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाने अनेक ठिकाणी विठ्ठल मंदिरे बांधली तशा प्रकारची मंदिरे उभी करण्याची कसलीही शक्यता महात्मा फुले यांनी वर्तवली नाही मात्र ओबीसी लोक यापुढे निर्मिकाचे मंदिर उभा करू शकतात जेणेकरून निर्मिकाची पूजा करणारे सर्व भाविक लोक एकत्र येऊन स्वतःच्या धर्माला आकार देतील . मात्र या मंदिरांच्या आत पुरोहित शाही वाढू नये म्हणून प्राचीन काळामध्ये जी पद्धत अवलंबली गेली होती ती आपण स्वीकारली पाहिजे ती म्हणजे मंदिराची सर्व कामे सर्वांनी वाटून घेणे . यासाठी मंदिराला मंदिर म्हणून जी सेवा द्यावी लागते ती सेवा प्रत्येकाने देणे आवश्यक आहे. याबाबतीतला उत्कृष्ट आदर्श गुरुद्वाराने आपल्या पुढे ठेवलेला आहे हा आदर्श आपण स्वीकारावा . निर्मिका चे प्रतीक म्हणून शिवलिंग किंवा शक्ती लिंग किंवा ईश्वरलिंग वापरावे . मात्र त्याचबरोबर या मंदिरामध्ये सत्यशोधक समाजाची सर्व तत्वे लिहिलेला एक बोर्ड व्यवस्थित उभा करावा आणि त्यामध्ये दिलेल्या सर्व सूचना जनमानसांच्या पर्यंत पोहोचवाव्यात आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा . या मंदिरामध्ये सर्वच गरिबांना मोफत अन्न मिळालीच पाहिजे त्यामुळे अन्नछत्र चाललेच पाहिजे .या सर्व मंदिरांना निर्मिक मंदिर किंवा सत्यशोधक मंदिर असे नाव द्यावे. या मंदिरामध्ये पुरोहित असता कामा नये पुजारी असता कामा नये . ज्या भाविकाची त्या त्या दिवसासाठी सेवा असेल त्या भाविकाने पूजा करावी म्हणजेच पूजा करणे ही सुद्धा एक सेवा मानली जावी आणि ती अलटून पालटून करावी . मुख्य म्हणजे सेवा करण्याचा अधिकार हा फक्त पुरुषांना देऊ नये तर तो स्त्रियांना सुद्धा समान पद्धतीने द्यावा याबाबतीत कसल्याही प्रकारची उच्चनीच्चता स्वीकारू नये .
श्रीधर तिळवे नाईक
फुले यांच्यानंतर ओबीसी आणि शैव समाजाने काय करावे ५ अर्थात क्षत्रियांशी कसे वागावे
महात्मा फुले यांनी जी काही मांडणी केली आहे त्यामध्ये ब्राह्मण समाज हा मुख्य शत्रू मानलेला होता . मात्र राज्यकर्ता असलेला वर्ग ते कळत नकळत वगळत होते याचे कारण खुद्द त्यांच्या काळामध्येच इंग्रज सत्ताधारी म्हणून आले होते. या सत्ताधारी इंग्रजांशी त्यांना पंगा घ्यायचा नव्हता . ओबीसी लोकांच्या समस्या या इंग्रजांशी जुळवून घेऊन सुटू शकतील अशी त्यांना खात्री होती. पेशवाई पेक्षा इंग्रजांचे राज्य हे अधिक चांगले आहे याविषयी त्यांना संशय नव्हता आणि त्यामुळेच अनेकदा त्यांनी ब्रिटिश राज्याचे समर्थन केलेले दिसते. प्रत्यक्षामध्ये या सगळ्या साम्राज्यवादामध्ये काय प्रकारचे शोषण चालू होते याचा पुरेसा अंदाज महात्मा फुले यांना आला नाही आणि साहजिकच मग ते कळत नकळत ब्रिटिशांच्या बाजूने मांडणी करत राहिले आज ही मांडणी आपणाला खटकत राहते पण आपण जर का त्यांच्या काळात जन्मलो असतो तर कदाचित आपणही हेच केले असते . वस्तुस्थिती अशी आहे की
१ शिवशाही ही शैव होती
२ पेशवाई ही सुद्धा शैव होती आणि पहिल्या बाजीराव पर्यंत तीच टिकली होती पण पहिल्या बाजीरावाच्या काळातच ती वैष्णव होत गेली
३ नानासाहेब पेशवे यांच्यापासून उत्तर पेशवाई मध्ये जी राजवट आली तीच स्मृती प्रधान वर्ण जात व्यवस्था पाळणारी राजवट होती . या राजवटीचे वर्णन खुद्द लोकहितवादी यांनी केले आहे त्यासाठी शतपत्रे पहा तुम्हाला आपोआपच उत्तर पेशवाई काय करत होती हे कळू शकेल आणि मग महात्मा फुले का ब्रिटिश राज्याचे समर्थन करत होते हेही कळेल. अलीकडे महात्मा फुले यांच्यावर ब्रिटिशांच्या निमित्ताने भरपूर बाण मारले जात आहेत या लोकांना ब्राह्मणांची राजवट आली होती म्हणजे नेमके पुण्यामध्ये काय चालले होते हे सुद्धा माहित नाही विशेषत: हिंदी बेल्ट मध्ये याबाबतीत एक प्रकारचा मूर्खपणा आढळत आहे. महात्मा फुलेच काय पण या काळामध्ये जे इतर विचारवंत होते त्यामध्ये ब्राह्मण विचारवंत सुद्धा होते या सर्वांनाच ब्रिटिश राजवट ही चांगली वाटत होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे खरे तर या निमित्ताने परखड परीक्षण आपण उत्तर पेशवाईचे करायला हवे . असे काय झाले की उत्तर पेशवाई नको, ब्रिटिश राजवट परवडली असे लोकांना वाटले ? पण हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि केवळ ब्रिटिश विरोध या एका गोष्टीच्या आधारे फुले यांच्यावर टीका केली जात आहे ही टीका त्या काळाला धरून नाही आणि योग्य तर अजिबातच नाही . फुले यांना काळाच्या मर्यादा पडल्या होत्या ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे . अर्थातच जर का फुले यांनी विरोध केला असता तर जास्त बरे झाले असते याबद्दल माझ्या मनातही शंका नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या काळामध्ये आदिवासी लोकांची बंडे होत होती आणि त्यांचे काय होत होते हे फुले पाहत होते . प्रश्न असा आहे की फुले यांनी मग त्या काळात असलेल्या क्षत्रिय लोकांच्यावर का टीका केली नाही ? या लोकांनी ब्रिटिशांच्या पुढे जे लोटांगण घातले होते त्या लोकांचे कठोर विश्लेषण फुले यांनी का केले नाही ? ही एकंदरीत राज्यकर्त्या वर्गावर टीका करायची नाही असे त्यांचे धोरण होते ? माझ्या मते हो त्यांचे धोरण असे होते शासन करणाऱ्या लोकांच्यावर टीका करायची नाही हा जवळ जवळ अनेक सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या लोकांचा पिंड असतो . विशेषता जर का सामाजिक सुधारणा करण्यासाठी राज्यकर्ता वर्गाचा पाठिंबा असेल तर त्या राज्यकर्त्या वर्गाशी पंगा घ्यायचा नाही हे अनेक सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या लोकांचे धोरण असते. फुले यांचे नेमके असेच धोरण होते आणि याचे पुढे अनेक दुष्परिणाम झाले
त्यामुळेच ब्रिटिशांशी किंवा एकंदरीत शासन करणाऱ्या लोकांशी फुले यांनी का पंगा घेतला नाही असा प्रश्न खरं तर आपण विचारायला हवा पण हा प्रश्न न विचारता आपण फक्त टीका करायला पाहतो आहे आणि हे चुकीचे आहे . भारतामध्ये सध्या वैचारिक समतोलपणा हा आढळत नाही आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात प्रत्येक विचारवंत हा त्याच्या त्याच्या काळाशी निगडित असतो आणि त्या काळाने बद्ध असतो . फुले याला अपवाद नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
मग फुले यांनी क्षत्रियांच्या साठी काही वेगळी मांडणी केलीच नाही का? तर या प्रश्नाचे उत्तर
क्षत्रियांसाठी फुले यांनी सर्वात मोठी मांडणी जर कुठली केली असेल तर ती आहे बळीवंशाची ! हा वंश शैव होता आणि तो कसा ब्राह्मण वर्गाने कारस्थान करून धुळीला मिळवला याचे अत्यंत व्यवस्थित विश्लेषण त्यांनी केलेले आहे. त्यांनी हा संपूर्ण बळीवंश आरे लोकांशी लढणाऱ्या सेनापतींचा वंश म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे .किंबहुना त्यांची ही मांडणी हा भारतीय इतिहास लेखनातला एक अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे . त्यामुळे साधारणपणे अनार्य हा ध्रुव पराभूत कसा होत गेला याचे विश्लेषण फुले करत राहतात आणि शेवटी एका निष्कर्षाला पोचतात तो निष्कर्ष म्हणजे आर्य आणि ब्राह्मण लोकांचे कपटनीती ज्याला ते बामणी कावा म्हणतात आणि अनार्य लोकांच्या मधला विद्येचा अभाव होय . पण एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की मुळातच ब्राह्मण धर्माने ही विद्या हिसकावून घेतली होती का? तर स्पष्ट सांगायचे तर नाही . वस्तुस्थिती अशी आहे की मनुस्मृति ही एवढी कट्टर ब्राह्मणवादी वर्ण जात वादी असून त्यामध्ये सुद्धा वार्ता ही प्रमुख विद्या ब्राह्मणांच्या पासून नव्हे तर राजाने ती वाणीपणी , उत्पादक आणि आदिवासी लोकांच्याकडून शिकावी असा उपदेश करण्यात आलेला आहे . प्रश्न असा आहे की मग ब्राह्मण राजाला नेमके काय शिकवत होते ? त्यांना खरोखर शस्त्रविद्या येत होती का ? ते फक्त धर्म ज्ञान आणि राजकीय बाबतीत काही मर्यादित प्रमाणात सल्ला देत होते की धर्माच्या नावाखाली ते फक्त कायदे देत होते किंवा काय कायदे आहेत हे सांगत होते आणि त्या कायद्यांच्या द्वारे आपला ब्राह्मण धर्म स्थापन करत होते ? माझ्या मते या काळामध्ये ब्राह्मण धर्माने एक अत्यंत व्यवस्थित पद्धतशीर असा राबवलेला एक कावा दिसतो फुले यांच्या भाषेत बामणी कावा आखलेला दिसतो तो म्हणजे कायदा काय आहे ते आम्ही राजाला शिकवणार राजाने आम्ही शिकवलेलेच कायदे जे स्मृतीद्वारे आले होते ते राज्याचे कायदे करावेत आणि हे राज्याचे कायदे या कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी याबाबतीत न्याय करण्याची जबाबदारी ब्राह्मण वर्गावर सोपवावी इतकेच नव्हे तर सर्व मंत्री पदे ही ब्राह्मण वर्गाला द्यावी . म्हणजेच एका अर्थाने सर्वोच्च शासन संस्था क्षत्रिय लोकांनी आपल्या ताब्यात ठेवावी आणि जे वीर ब्राह्मणधर्म स्वीकारतील त्यांना आम्ही क्षत्रिय म्हणून मान्यता देऊ मात्र त्यांची ताकद ही फक्त शासन संस्थेपुरतेच मर्यादित पाहिजे आणि सर्वोच्च प्रशासकीय संस्था मात्र पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात ठेवण्याचा हा कावा आहे प्रश्न असा आहे की हे खरोखर नंतरच्या काळातील राजकीय वीर समाजातील शैव लोकांनी स्वीकारले का तर याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे . भारतातला जो इतिहास आता आपणाला माहिती झालाय त्यावरून स्पष्ट दिसते की भारतातले राजे स्मृती प्रमाण मानत नव्हते. स्मृति प्रामाण्य मानत नव्हते उलट ते स्वतःच्या राज्यातले कायदे स्वतःच करत होते याला सर्वात मोठा छेद हा दहाव्या शतकानंतर निर्माण झालेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हा प्रतिक्रांतीचा जो प्रयोग प्रथम महाराष्ट्रामध्ये ज्यांना नंतरच्या काळामध्ये यादव म्हटले गेले त्यांच्या राजवटीत भारतामध्ये झाला एका अर्थाने ज्याला स्मृती प्रमाणे कायदा म्हणता येईल तो प्रथम महाराष्ट्रात आला आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्येच ब्राह्मणी हिंदुत्ववादाची सुरुवात झाली आश्चर्याची गोष्ट त्याची सुरुवात करणारा मनुष्य देशस्थ ब्राह्मण म्हणजेच पंडित होता पंडितांच्या पेक्षा सुद्धा आणि ब्राह्मणांच्या पेक्षाही अधिक कट्टर ब्राह्मण झाला होता. म्हणजेच एखादा हिंदू मनुष्य बाटल्यामुळे अधिक कट्टर मुस्लिम होतो तसाच काहीसा प्रकार झालेला दिसतो त्याच्यामुळेच प्रथम यादवांच्या राजवटीत स्मृतिप्रधान राजवट येण्याला प्रारंभ झाला आणि याच राजवटीत प्रथमच ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना मृत्यू दंड देण्यात आला. अर्थातच अशा राजवटीचा अंत होणे आढळतो असते अटळ असते म्हणजे स्मृती प्रधान राजवट स्वीकारल्यावर ताबडतोब यादवांचा सत्यानाश झालेला दिसतो . जोपर्यंत हे यादव शैव सैनन होते तोपर्यंत जिंकत होते वैष्णव झाल्यानंतर मात्र हे ताबडतोब मुस्लिमांच्याकडून पराभूत झाले कारण मुस्लिमांचे कायदे हे भारतातल्या युरेशियन वैष्णव स्मृतीच्या कायद्यापेक्षा अधिक उजवे होते आणि अधिक तपशीलवार होते मुख्य म्हणजे हे कायदे जन्मदत्त पद्धतीने राबवले जात नव्हते तर ते कर्मदत्त पद्धतीने राबवले जात होते आणि याचाच परिणाम कळत नकळत धर्मांतरामध्ये झालेला आहे . भारतातल्या अनेक राजे लोकांनी इस्लाम स्वीकारण्याचे सर्वात मोठे कारण त्यांना नवीन आलेली कायद्याची व्यवस्था ही जास्त उजवी वाटत होती एका अर्थाने अनेक वैष्णव राजांनी जे स्मृती प्रमाण मानत होते त्यांनी या काळामध्ये इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे आणि एकदा का राजाने इस्लाम स्वीकारला की प्रजा सुद्धा इस्लाम स्वीकारते असे वारंवार घडलेले आहे . याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आपणाला जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसते. तिथे वैष्णव ब्राह्मणांनी जे मूळचे पंडित होते बौद्ध राजाचे धर्मांतर करून घ्यायला नकार दिला आणि राजा स्वतःच सुफी फकीरांच्या प्रभावाखाली येऊन मुस्लिम झाला आणि नंतर त्याच्या प्रभावाखाली येऊन संपूर्ण काश्मिरी प्रजा ही सुद्धा मुस्लिम झाली. अगदी बहामन शाही सुद्धा एका ब्राह्मणाची शाही असून सुद्धा मुस्लिम झाली याचे कारण तेच होते . कालबाह्य झालेले स्मृति कायदे आणण्याच्या आणि थोपवण्याच्या नादामध्ये आपण इस्लाम कडून पराभूत झालो. जी चूक एकेकाळी भारतीय धर्मांनी केली ती चूक आता जगातील मुसलमान करतो आहे आणि शरीयतपाशी अडकून पडलेला आहे. अर्थात जे अवस्था हिंदूंची झाली तीच अवस्था नंतर त्याची होणे अटळ आहे ती म्हणजे गुलामगिरी ! या गुलामगिरी पासून सुटका करण्यासाठी म्हणूनच काही मुस्लिम धर्मांतर करायला लागलेले दिसतात . मुस्लिम समाजातल्या अनेक उच्च हळूहळू धर्मांतर करताना दिसतात त्याचे कारण सुद्धा हेच आहे एक नवे धर्मांतर होताना दिसते याचे कारण नेहमीच उच्च वर्गाला आपले भले कशात आहे ते कळत असते . एके काळी भारतातल्या काही उच्चवर्गीय लोकांनी असे धर्मांतर केले होते आणि इस्लाम स्वीकारला होता आता इस्लाम त्यागण्याची वेळ आलेली आहे म्हणून अनेक उच्च वर्गीय लोक हळूच इस्लामचा त्याग करून हळूच नवीन दुसरा धर्म स्वीकारत आहेत.
फुले यांचे जे इस्लामचे प्रेम आहे ते सुद्धा या पार्श्वभूमीतून आलेले आहे कारण तिथे जन्मदत्त समता आहे अशी त्यांची ठाम समजूत होती . फुले यांना मुस्लिम लोकांच्यामधली समाज व्यवस्था जी जातीअधिष्ठितच होती का दिसली नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे . कळत नकळत ब्राह्मणांचा द्वेष पराकोटीला गेल्यामुळे ब्राह्मणांच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक करायचे असे काही इथे घडले आहे का ते तपासले पाहिजे. शिवाय मुळात इस्लामचा धोका या काळात कळणे शक्यच नव्हते कारण त्यावेळी इस्लामची तत्कालीन हिंदुस्थानातील तत्कालीन लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या धड १५% ही नव्हती . त्यामुळे पाकिस्तान निर्मिती वगैरे महात्मा फुले यांना दिसणे अशक्यच होते . त्यामुळेच महात्मा फुले इस्लाम बाबत आंधळे झाली ही वस्तुस्थिती गुरुदेवाची गोष्ट अशी की दुर्दैवाची गोष्ट अशी की शब्दप्रामान्य मानणारे काही लोक काय काळामध्ये बदल झाला हे लक्षात न घेताच याबाबत ज्योतिबा फुले यांना फॉलो करत आहेत आपण असे त्यांना या संदर्भात फॉलो करण्याची गरज नाही आपल्याला वेगळे धोरण स्वीकारावे लागेल आपल्या पुढचा इस्लामचा प्रश्न फार वेगळा आहे आणि त्यावर मी बोललो आहे आणि पुढे बोलेनच .
अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्माचे आगमन झालेले असताना आता काय करायचे हा खरोखर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न ओबीसींच्या पुढे प्रामुख्याने ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संदर्भात पुन्हा पुन्हा निर्माण होतो आहे . ज्याप्रमाणे छगन भुजबळ यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे अगदी तशीच कोंडी समस्त ओबीसी लोकांची झालेली आहे . ही कोंडी सर्वात प्रथम वैचारिक कोंडी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक ओबीसी लोक मला सतत सांगत असतात की काय करायचे ते समजत नाहीये म्हणूनच हा विषय मी चर्चेला घेतला . आणि आताही घेतो आहे .
ज्याप्रमाणे ब्राह्मणांशी वागताना ब्राह्मण वेगळे आणि पंडित वेगळे असा भेद करावा लागतो आणि हे लक्षात घ्यावे लागते की पंडित हा जन्मदत्त नसतो तर करमदत्त असतो आणि कोणीही पंडित होऊ शकतो त्याचप्रमाणे क्षत्रियांशी वागताना सुद्धा आपणाला वीर समाज वेगळा आणि क्षत्रिय वर्ण वेगळा असा भेद करावा लागतो आणि या जगामध्ये कोणीही वीर होऊ शकतो कुठल्याही समाजातून आलेला मनुष्य पराक्रमी असू शकतो हे स्वीकारावे लागते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वीर विरुद्ध क्षत्रिय हा भेद आपण निर्माण केलेला नाही तर हा भेद ब्राह्मण धर्माने निर्माण केलेला आहे.
सर्वसाधारणपणे ऋग्वेद हा स्पष्ट आणि स्वच्छपणाने वैदिक आहे परंतु ब्राह्मण ग्रंथ आणि स्मृति ग्रंथ हे पूर्णपणे ब्राह्मण धर्माचे ग्रंथ आहेत .
याबाबतीत मुळातच बहुदा ख्रिश्चन लोकांचा प्रभाव पडलेला असावा ज्याप्रमाणे ख्रिश्चन लोकांनी ज्यू लोकांचे ओल्ड टेस्टमेंट स्वीकारले पण प्रत्यक्षात मात्र नवे बायबलच ऑन ठेवले त्याचप्रमाणे ब्राह्मण लोकांनी ऋग्वेद ऑन ठेवला परंतु प्रत्यक्षात सर्व काम ब्राह्मण ग्रंथ आणि स्मृती ग्रंथ यांच्याप्रमाणे चालवले आणि नंतर ज्याप्रमाणे इस्लामने ज्यू जीव लोकांचे ओल्ड टेस्टमेन्ट ख्रिश्चन लोकांचे बायबल स्वीकारून नंतर आपले कुराण मांडले त्याचप्रमाणे ब्राह्मण लोकांनी वैष्णव धर्माची स्थापना झाल्यानंतर तो धर्म ताब्यात घेऊन वैष्णव धर्मग्रंथ म्हणजेच रामायण आणि महाभारत आणि पुराने स्वीकारून पुराणांचा खेळ मांडलेला आहे त्याचा प्रसार केलेला आहे
प्रत्यक्ष ऋग्वेदामध्ये क्षत्रिय नावाचे काहीही नाही कारण या काळामध्ये क्षत्रिय वर्ण अस्तित्वातच आलेला नव्हता त्याऐवजी विश समाजातून आलेला विशपती हाच राजा होत असे आणि हा विश म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून युरेशियन लोकांच्या मधला बहुजन समाज होता . हा प्रामुख्याने पशुपालक गोपालक होता आणि नंतर व्यापार स्वीकारणारा व्यापारी होता .
त्या उलट जेव्हा ब्राह्मण धर्म अस्तित्वात आला तेव्हा या ब्राह्मण धर्माने क्षत्रिय नावाचा स्पष्ट आणि स्वच्छ असा जन्मदत्त वर्ण निर्माण केला एका अर्थाने ब्राह्मण लोकांनी त्यांचे ऐकणारा आणि त्यांच्या स्मृतीनुसार शासन चालवणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणायला सुरुवात केली. हे लोक स्पष्ट आणि स्वच्छ पणाने शैव धर्माचे शत्रू होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे ते लोक होते ज्यांनी यज्ञसंस्थेचा स्वीकार केला होता आणि यामध्ये काही अनार्य लोक सुद्धा होते जे धर्मांतर करून ब्राह्मण धर्मात गेले होते . थोडे या धर्मांतर केलेल्या शैव लोकांनी स्वतःचा एक वेद निर्माण केला तो म्हणजे अथर्ववेद अगदी आज सुद्धा त्यामुळेच गणपतीला अथर्वशीर्ष म्हटले जाते हा शैव लोकांनी ब्राह्मण धर्मात जाऊन निर्माण केलेला चौथा वेद आहे या लोकांनी का धर्मांतर केले हा एक वेगळाच मुद्दा आहे मात्र हे लोक नंतर स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात त्यांनी ब्राह्मणधर्म स्वीकारला आणि नंतर आपल्या स्वतःच्या धर्मात सुद्धा त्याचा प्रचार आणि प्रसार केला
प्रश्न असा आहे की मग आपण काय करावे ? आपण एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला क्षत्रिय म्हणते तेव्हा त्याचा अर्थ तिने वर्ण जात व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि स्मृती प्रामाण्य स्वीकारलेले आहे ब्राम्हण्य स्वीकारलेले आहे असा होतो तिने धर्मांतर सुद्धा केले आहे का हा प्रश्न आपण त्या त्या व्यक्तीलाच विचारावा आणि जर का तिने ब्राह्मण धर्म स्वीकारला असेल आणि ती व्यक्ती जर का हे कबूल करत असेल तर मात्र आपण तिला ती क्षत्रिय आहे अशी मान्यता द्यायला हरकत नाही .
याउलट वीर समाज हा मात्र वर्ण जात व्यवस्थेला स्पष्ट आणि स्वच्छ नकार देणारा होता आणि आहे . हा वीर समाज शैवधर्मी होता आणि आहे .त्याचे कुलदैवत हे नेहमीच शंकर, पार्वती ,स्कंद, विनायक किंवा सूर्य यांच्यापैकी एक किंवा त्यांच्या रूपा पैकी एक होते . उदाहरणार्थ खंडोबा हे स्कंदचे रूप आहे. तर मल्हारी मार्तंड हे सूर्याचे रूप आहे. शैवधर्मामध्ये सूर्य हे या सूर्यमालेतील मुख्य शिवलिंग मानले जाते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भारतामध्ये साधारणपणे नाईक समाज (यामध्ये केरळचा आणि दक्षिणेतील नायर सुद्धा येतात ) , मराठा समाज, जाट समाज , सोळंकी समाज , राजपूत समाज , शीख समाज , हर समाज( यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातला आणि इतर काही राज्यातला रक्षक समाज येतो उदाहरणार्थ महा हर, चर्महर ) , गोंड समाज यासारखे अनेक समाज येतात . एकेकाळी यादव (मूळ नाव योद्धा समाज )समाज सुद्धा यामध्ये येत होता पण दुर्दैवाने तो पुढे वैष्णव झाला . भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळे हे परिवर्तन घडले की त्यांच्या नावाला पुढे करून हे परिवर्तन घडवण्यात आले हा एक फार मोठा प्रश्न आहे . कारण महाभारतात तरी श्रीकृष्ण शिवभक्त होते पुढे मग त्यांच्या नावाने अनेक गोष्टी आल्या. आणि त्यांनाच देव करण्यात आले जेणेकरून त्यांच्या नावाने वर्ण जात व्यवस्था प्रस्थापित करता यावी . असो. जोपर्यंत या समाजांच्यातील कोणीही व्यक्ती तुमच्या समोर येत असेल आणि ती जर का वर्ण जात व्यवस्था पाळत नसेल तर समजून चला की ती शैव आहे . तिला पाठिंबा द्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा तुळजाभवानी हे ज्यांचे कुल दैवत आहे असे अनेक मराठा आहेत जे वर्ण जात व्यवस्था पाळत नाहीत अशा लोकांना मतदान करावे पण जे जात आणि वर्णव्यवस्था पाळतात आणि स्वतःला क्षत्रिय समजतात त्या लोकांना आपणही क्षत्रिय समजावे आणि त्यांना मतदान करू नये.
त्यामुळे जर कोणी क्षत्रिय म्हणून तुम्हाला समोर येत असेल आणि तुम्हाला शूद्र म्हणत असेल अतिशूद्र म्हणत असेल किंवा आदिवासी म्हणत असेल आणि त्यावरून खालच्या जातीची/चे समजत असेल तर समजून चला की हा मनुष्य शैव नाही . जो उच्चनीचता पाळतो तो शैव असू शकत नाही अशा व्यक्तीला कसे हाताळायचे?
सर्वात प्रथम तिच्याशी सतत गोड बोलत रहा आणि तिला समजावून सांगत राहा की तिचे भले कसे वीर समाजात राहण्यात आहे .
तरीही जर का ऐकत नसतील तर मग आपणच संबंध कमी करत न्यावे हे बरे कारण शेवटी समजावण्याची सुद्धा एक मर्यादा असते .
भारतातले जवळजवळ सर्व क्षत्रिय हे मूळचे शैव आहेत पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या सर्वांना आता विसर पडत चाललेला आहे . त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव करून देणे आणि त्यांना वीर म्हणूनच सन्मान देणे त्यांचा उल्लेख करताना कायम वीर म्हणून उल्लेख करणे हे आता गरजेचे बनत चाललेले आहे . शिवाजी महाराज हे शैव होते आणि आपल्या प्रत्येक पत्रामध्ये ते श्री शंकर प्रसन्न किंवा तुळजाभवानी प्रसन्न असेच लिहीत होते अशी साधी गोष्ट सुद्धा हे लोक आता विसरत चाललेले आहेत .
वीर समाजाची युद्ध घोषणा हरहर महादेव ही आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे मात्र प्रत्येक काळ हा युद्ध काळ नसतो सतत युद्ध करणारे लोक विनाशाला आमंत्रण देत असतात. शांतीच्या काळात मात्र ओम नमः शिवाय ओम शांती शांती ओम हाच मंत्र आहे . तेव्हा तुम्ही जर स्वतःच वीर समाजातील असाल तर समजवा . एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीही वीर समाजामध्ये असू शकतो उदाहरणार्थ तानाजी मालुसरे हे कोळी समाजातून आलेले होते पण त्यांना आपण वीर समजतो आणि मराठाच म्हणतो बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे स्वतःला मराठा समजत होते . गौतम बुद्ध हे शाक्त ( ब्राह्मण लोकांनी अत्यंत जाणीवपूर्वक हे नाव बदलून शाक्य करून टाकले )समाजातून आले होते आपण त्यांना वीर समजतो कारण ते स्वतःला खत्तीय (नंतरच्या काळात खत्री) समजतात . शिवाजी महाराज हे वीर समाजातून आलेले होते . आपण हे नीट लक्षात घेतले पाहिजे . वीरांचा उचित सन्मान ठेवला पाहिजे मात्र जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात क्षत्रिय समजतात त्यांचे अज्ञान दूर केले पाहिजे . वर्ण जात लिंगभेद पाळणारा कोणीही व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष शैव असू शकत नाही.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment