इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाची कारणे श्रीधर तिळवे नाईक
इस्रायल अमेरिका युती विरुद्ध इराण यांचे युद्ध सुरू झाल्यापासून फेसबुकवर ज्या काही चर्चा रंगलेल्या आहेत त्यातील एक मूलभूत चर्चा युद्ध नेमके का सुरू झाले आणि अब्राहम मोजेस ज्यू होते की नाही या दोन चर्चा आहेत त्यातील पहिल्या गोष्टीची चर्चा आपण थोडक्यात करू अर्थात मी काही मूलभूत गोष्टी मांडत आहे असा माझा दावा नाही.
या चर्चा स्वाभाविक आहेत कारण या युद्धामध्ये इस्रायल ज्यू आहे अमेरिका ख्रिश्चन आहे आणि इराण इस्लामीक आहे. एका अर्थाने जुड्याइक धर्मातले तीन धर्म इथे युद्धात सामील झालेले दिसतात. आणि कदाचित या तीन धर्मांच्या मध्ये जे काही आहे त्यामुळेच हे युद्ध निर्माण झालेले आहे.
दुसऱ्या महायुद्धात या युद्धाची बीजे आहेत . १८६० नंतर सेक्युलर वादाचा उदय झाल्यानंतर त्याला काटशह म्हणून धार्मिक पुनर्जीवनाच्या गप्पा मारणाऱ्या काही लोकांनी चार नवे इजम सुरू केले त्यातून
१ इस्लाम वाद जो नंतर प्यान इस्लाम वाद म्हणून फेमस झाला
२ नाझिवाद हा प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मातून उदयाला आला
३ Zionist ज्यू वाद किंवा इस्त्राईल वाद हा 1860 नंतर उदयाला आला तरी तो प्रामुख्याने हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणाला विरोध म्हणून प्रभावी विचार म्हणून उदयाला आला.
४ हिंदुत्ववाद हा इस्लामवादाला प्रतिक्रिया म्हणून जन्मला.
मी नेहमीच सांगत आलेलो आहे की धर्म ही राजकीय विचार प्रणाली आहे आणि सेक्युलर वाद ही धार्मिक राजकीय विचार प्रणाली पूर्णपणे नाकारत तिला घरात बसवत होता . याचवेळी कम्युनिस्ट राष्ट्रांचेही उदय झाले आणि सर्वच कम्युनिस्ट राष्ट्रांनी धर्म नाहीसा करण्याची शपथ घेतली साहजिकच अति धार्मिक लोकांच्याकडून याचा प्रतिकार होणे अटळ होते त्यामुळेच सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्टैलीनने हिटलरला पाठिंबा दिला होता आणि नंतर अमेरिकेने लादेनला पाठिंबा देऊन अशी चूक केली (आता नेमकी अशीच चूक पुतीन इराणला पाठिंबा देऊन करत आहेत त्यांना आपण धार्मिक राष्ट्राला पाठिंबा देतोय हे कळत नाहीये अर्थात कम्युनिस्टांचा आणि अमेरिकेचा हा घोळ आत्ताचा नाही तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे.) म्हणजे एका अर्थाने रशिया इराण नावाच्या धर्मग्रस्त राष्ट्राला पाठिंबा देणार आणि अमेरिकेने इस्रायल नावाच्या धर्मग्रस्त राष्ट्राला पाठिंबा दिला आहे आणि युद्धात ही त्यासाठी उतरलेली आहे. आता जर का चीन इराणच्या बाजूने उतरला तर मग महायुद्धाची शक्यता निर्माण होते अशावेळी भारताने काय करायचे हा खरा प्रश्न आहे.
संपूर्ण जग मुस्लिम करणे हे इस्लामवादाचे मुख्य ध्येय आहे . आणि त्याच हिशेबाने इस्लाम स्वतःचे बुद्धिबळ चालवत असतो इस्लाम वाढवण्याचे या काळामध्ये उपाय बदलत गेले त्यामध्ये दोन उपाय ठळक होते जे तत्कालीन लोकांना दिसलेच नाहीत
१ जिथे आहोत तिथे प्रचंड लोकसंख्या वाढवत नेऊन हळूहळू बहुसंख्यांक होणे आणि तो भौगोलिक प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन पूर्णपणे इस्लामिक करणे .
२ जिथे आपली लोकसंख्या नाही तिथे स्थलांतर करत हळूहळू आपली लोकसंख्या वाढवत नेणे आणि हळूहळू तो देश ताब्यात घेणे
लोकसंख्यावाढ हे इस्लामचे सर्वात मोठे प्रभावी असे अस्त्र आहे आणि कसलाही आवाज न करता ते व्यवस्थित राबवता येते . उपाशी मेलो तरी चालेल परंतु लोकसंख्या वाढ झालीच पाहिजे हे प्रमेय इस्लामने ठामपणे प्रत्येक मुस्लिम माणसाच्या मनात घातलेले आहे . कुठलाही व्यवसाय करण्यामध्ये काहीही लाज बाळगू नका पण टीका जगा जागा व्यापा आणि लोक व जागा वाढवा असे हे धोरण आहे साहजिकच इतर सर्व धर्मीय लोकांनी बाजूला काढलेली कामे सुद्धा १८६० नंतर इस्लाम मधील लोक करू लागले . इतर कुठल्याही धर्मामध्ये इतका प्रखर धर्म अभिमान नाही त्यामुळे साहजिकच इस्लाम धर्माच्या अंगाने जास्त प्रभाव टाकत राहतो.
भारतामध्ये या धोरणाची अत्यंत यशस्वीपणे वाटचाल सुरूच होती सुरुवातीच्या कालखंडात धड एक टक्का सुद्धा नसणारे हे लोक हळूहळू वाढत वाढत दोन टक्के मग चार टक्के मग आठ टक्के मग 16% मग 32 टक्के होत गेलेले दिसतात. सुरुवातीला तर फक्त 5000 होते मग 10000 मग 20000 मग 40,000 अशी वाढ झालेली आहे त्या काळामध्ये हिंदूंची लोकसंख्या सुद्धा अशाच वेगाने वाढत असल्याने ही लोकसंख्या वाढ हिंदूंची आणि मुसलमानांची दोघांची होत होती परंतु फरक तेव्हा निर्माण झाला जेव्हा हिंदूंनी लोकसंख्या वाढ थांबवायला सुरुवात केली सर्वसाधारणपणे हे सर्व विसाव्या शतकामध्ये घडले आणि मग इथूनच जगभरात सर्वत्र ज्यामध्ये हिंदुस्तान सुद्धा येतो अचानकपणे मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग हळूहळू वाढत गेला आणि आता अवस्था अशी आहे की जगभरामध्ये साधारणपणे २०६० च्या आसपास निम्मी लोकसंख्या मुस्लिम होईल अशी चिन्हे आहेत.
हे एक आवाज न करता होणारे आक्रमण आहे त्यासाठी सुरुवातीला अतिशय गोड बोलणे सुरू असते या गोड बोलण्याला सर्वच इतर गैरमुस्लिम लोक फसताना दिसतात. मुळातच मरण्याची तयारी करूनच जगत असल्याने कुठल्याही प्रकारचे धाडस दाखवण्याची तयारी मुस्लिम लोकांची असते शिवाय मुस्लिम धर्मासाठी आपण जे काही करू ते आपल्याला स्वर्ग देणार याची त्यांना पक्की खात्री असते त्यामुळे मेलो तरी स्वर्ग भेटणार हा विश्वास असल्याने मरण्याची पूर्ण तयारी असते .त्यामुळे अल्पसंख्यांक असून सुद्धा हे त्या त्या भूगोलामध्ये आपली लढाई आपला लव जिहाद जिद्दीने चालवू शकतात . शेरोशायरी हा फार मोठा असेट असतो जो त्यांना प्रेमाची सभ्यता फार सुंदर रीतीने व्यक्त करायला शिकवतो. हे प्रेम फक्त स्त्री आणि पुरुष असे नसते तर पुरुष आणि पुरुष असे सुद्धा असू शकते . अतिशय सुमधुर संबंध ठेवणे ते सुमधुर भाषेद्वारे जतन करणे नेहमीच चाललेले असते. ही एक अशी पद्धत आहे जी हिंदूंच्यात पूर्णपणे मिसिंग आहे . अपवाद कदाचित ब्राह्मणच आहेत .(अर्थात ब्राह्मण लोकांच्या सुद्धा ही पद्धत फक्त ब्राह्मण पुरुषांच्यातच आहे स्त्रियांना वागवण्याची ब्राह्मण लोकांची पूर्वीची पद्धत फारशी सभ्य नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामानाने मुस्लिम लोक अधिक सभ्य होते हे स्पष्टपणे स्वीकारणे गरजेचे आहे जो काही ब्राह्मणलोकांच्या मध्ये बदल घडलेला आहे तो अलीकडे ब्रिटिश लोकांशी संपर्क झाल्यानंतर झालेला आहे) त्यामुळे १८६० पासून जन्म घेऊन सुद्धा अनेकदा हा प्रकार आणि हा वाद लक्षातच आला नाही आणि विचारवंत झोपलेले राहिले याला एक कारण बाकीचे लोक मुळात लोकसंख्या वाढीमध्ये तितकेच प्रवीण होते. जेव्हा कंडोम चा शोध लागला तेव्हा सर्व गोष्टी बदलल्या आणि हळूहळू डोळ्यात भरण्याजोगी मुस्लिमांची लोकसंख्या वाढ दिसायला लागली.
धर्माच्या आधारे निर्माण झालेला दुसरा वाद म्हणजे नाझीवाद होय . मुळातच युरोपमध्ये व्यापारवाद mercantalism एक हजार नंतर उदयाला आला आणि तो इतका भरभराटीला येण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा ज्यू लोकांचा होता साहजिकच हे ज्यू लोक त्या काळामध्ये असभ्य वाटणारा व्यापार मोठ्या प्रमाणात करत होते कारण ख्रिश्चन बहुल देशांच्या मध्ये ख्रिश्चन लोकांचे व्यापाराकडे तितकेसे लक्ष नव्हते . शेती आणि व्यापार यांच्याकडे दुर्लक्ष करणे त्या काळातली एक धार्मिक खोड होती जिला इस्लामने छेद दिला . महंमद पैगंबर स्वतः व्यापारी होते त्यामुळे साहजिकच त्यांनी व्यापाराला प्रचंड उत्तेजन दिले आणि कसल्याही गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचा व्यापार करणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे अशी शिकवण दिली साहजिकच मुस्लिम लोकांनी व्यापारवादामध्ये उडी मारल्यानंतर हळूहळू सर्वत्र आपले प्रभुत्व निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजेच एका बाजूला मुस्लिम आणि दुसऱ्या बाजूला ज्यू आणि तिसऱ्या बाजूला भारतामध्ये जैन आणि पारसी असे चार अल्पसंख्यांक समुदाय संपूर्ण व्यापार वाद चालवत होते. एका बाजूला स्वतःची ओळख प्रखरपणाने शाबूत ठेवणे आणि दुसऱ्या बाजूला सर्व लोकांशी गोडी गुलाबीने संबंध प्रस्थापित करणे असा एक उद्योगच या चार अल्पसंख्यांक धार्मिक समुदायांचा होता आणि तो बिन बोभाट चालला होता . याला पहिला छेद मिळाला तो हिटलर कडून. मुळातच युरोपमध्ये या काळामध्ये ज्यू मक्तेदारीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अलीकडे आपल्याकडे जैन लोकांच्या बाबतीत हेच सुरू झालेले आहे. या काळामध्ये मुस्लिम पराभूत झाल्याने साहजिकच मुस्लिम लोकांच्याविषयी चिंतन करण्याची गरज फारशी उरलेली नव्हती विशेषता व्यापारी पातळीवर बिलकुलच अशी चर्चा करण्याची गरज उरलेली नव्हती . मात्र ज्यू लोकांच्या बाबतीत उलट घडले. मुस्लिम लोक औद्योगिक युद्ध अवगत करण्यात कमी पडल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज उरलेली नव्हती याउलट युरोपमध्ये मात्र मुळात औद्योगीकरणाचा पायाच ज्यू लोकांच्या व्यापारी धोरणांच्यामुळे निर्माण झाला होता . अनेक संशोधक हे ज्यू तरी होते किंवा पूर्वाश्रमीचे ज्यू होते अगदी कार्ल मार्क्स सारखा विचारवंत सुद्धा पूर्वाश्रमीचा ज्यू होता . नंतरच्या काळातले दोन दादा विचारवंत सिग्मंड फ्राईड आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हे ज्यूच होते . त्यातील अल्बर्ट आईन्स्टाईन याला इस्राईलचे मुख्य राजकीय पद सुद्धा ऑफर झाले होते.
साहजिकच ज्यू लोकांच्या मक्तेदारी विषयी वारंवार चर्चा 19 व्या शतकामध्ये होऊ लागली यातच भर म्हणून प्रोटेस्टंट धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ब्रिटिश साम्राज्यात उदयाला आला. मार्टिन ल्युथर हा सरळ सरळ ज्यू लोकांचा पराकोटीचा द्वेष करत होता आणि जर्मनीमध्ये हा द्वेष हळूहळू संपूर्ण ख्रिश्चन कम्युनिटीमध्येच भिनायला लागला कारण मार्टिन ल्युथर हा मुळात जर्मन होता .
इस्लाम वाद हा गैर इस्लामिक मूर्तिपूजकांच्या द्वेषावर आधारित असा पहिला धर्म होता . तर नाझीवाद हा ज्यू लोकांच्या द्वेषावर आधारित निर्माण झालेला दुसरा विचार प्रवाह होता . ज्यू आणि इस्लामिक दोन्हीही ख्रिश्चन लोकांना मूर्ती पूजक मानत होते आणि त्या अंगाने प्रचंड टीका या काळामध्ये व्हायला लागली होती. या सगळ्याचा प्रतिकार करणे काही लोकांना गरजेचे वाटायला लागले आणि त्यातूनच मग नाझीवाद हा ज्यू द्वेष्टा विचार म्हणून लोकप्रिय होत गेला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा विचार फक्त जर्मनी पुरता मर्यादित राहिलेला नाही तो संपूर्ण युरोपभर पसरला जिथे जिथे ख्रिश्चन लोकसंख्या बहुसंख्यांक आहे त्या त्या ठिकाणी सर्वत्र तो झिरपला याला अगदी कम्युनिस्ट रशिया सुद्धा अपवाद राहिला नाही आणि तिथे सुद्धा जू लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हत्या झालेली आहे.
३ या सगळ्या पार्श्वभूमीच्या आधारे आणि हिटलरने ज्यू लोकांचे प्रचंड हत्याकांड घडवल्यानंतर साहजिकच त्यांच्यासाठी एक स्वतंत्र देशनिर्मिती त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आवश्यक बनत गेली आणि त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यू लोकांचा स्वतंत्र देश निर्माण करण्यात आला तो म्हणजे इस्त्राईल होय मुळातच त्याला जिओनीस्ट विचाराची पार्श्वभूमी होती जी स्वतःला देवाचे लाडके म्हणवून घेत होती आपण काहीतरी स्पेशल आहोत आणि आपणाला राष्ट्र लोकांनी नाहीतर देवाने दिलेले आहे असा हा विचार आहे.
४ या तिन्ही विचारांच्या पासून प्रेरणा घेत स्वतःला कायम स्पेशल समजणारे लोक भारतात ब्राह्मण म्हणून अस्तित्वात होते आणि आहेत या ब्राह्मण लोकांनी हिंदुत्ववाद पूर्णपणे ताब्यात घ्यायला या काळामध्ये सुरुवात केली आणि गोळवलकर हे या ब्राह्मणी हिंदुत्वाचे प्रतिपादक आणि प्रचारक होते ज्यू वादामध्ये आणि ब्राह्मणवादामध्ये त्यामुळे काहीच फरक पडत नाही साहजिकच अनेक ब्राह्मणांना ज्यू लोकांचे आकर्षण वाटते कारण त्यांना सुद्धा आपण ज्यू लोकांच्या प्रमाणे स्पेशल टोळी आहोत असे वाटत असते. मात्र त्याच वेळेला हिटलरने जी पद्धत अवलंबली तशी पद्धत आपण मुस्लिमांच्या बाबत वापरू शकतो असे वाटत असल्याने हिटलरच्या विजयी होण्याच्या काळात हिटलरला सुद्धा या लोकांनी पाठिंबा दिलेला होता ही वस्तुस्थिती आहे. एकाच वेळी दोन्ही पार्ट्यांना पाठिंबा देण्याची किमया ब्राह्मणवादाला नेहमीच साधत असते ती इथे साधलेली आहे यामध्ये परस्परविरोध आहे हे सुद्धा या लोकांच्या लक्षात येत नाही .अर्थात असा पाठिंबा देणारे फक्त ब्राह्मण नव्हते तर कम्युनिस्ट सुद्धा होते कारण बहुतेक कम्युनिस्ट शेवटी ब्राह्मण होते. मुळातच युरेशियन लोक हे नेहमी जो विजयी होईल त्याच्या बाजूने असतात . इतिहासाच्या बाबतीत सुद्धा जी बाजू विजयी होईल त्या बाजूने आपण असले पाहिजे ही त्यांची मुख्य धारणा आहे एकेकाळी कम्युनिस्ट असे विजयी होतील असे त्यांना वाटत होते म्हणून ते कम्युनिझमच्या बाजूने होते . साहजिकच आता सुद्धा नेमके कोण विजयी होईल हे सांगता येत नाही अशी स्थिती असल्याने दोघांनाही पाठिंबा दिल्याचे आभास निर्माण करण्यात येतात प्रत्यक्षात जेव्हा निर्णय कळेल तेव्हा मग नक्की कुणाला पाठिंबा द्यायचा ते ठरेल . यदा कदाचित जर का इराण विजयी झाले तर मग इराणची संस्कृती आणि आर्यांची संस्कृती ही कशी एकच आहे हे सांगितले जाईल. याच इराणी लोकांनी एकेकाळी ब्राह्मण लोकांना हाकलून काढले होते ते विसरले जाईल. असो.
प्रश्न असा आहे की प्रॉब्लेम नेमका कुठे झाला ? प्रॉब्लेम असा झाला की एकेकाळी अमेरिकेचे आणि युरोपचे केवळ आश्रित असणारे इस्त्राईल हळूहळू बदलत गेले आणि अलीकडे आम्हाला अमेरिकेची गरज नाही आम्हाला अमेरिकन मदतीची गरज नाही अशी ही गर्जना करायला लागले होते नेत्यांनाहू हेच करत होते कारण आता इस्त्रालवादाकडून पुन्हा एकदा हे लोक Zionist वादाकडे वळले. एकदा का तुम्हाला Zionist स्वप्न पडायला लागली की मग साहजिकच राज्य विस्ताराची स्वप्ने पडायला लागतात आणि इस्त्राईलच्या नेमक्या सीमा काय ते ठरवणे सुरू होते . आधी उल्लेख केलेला जो दुसरा प्रश्न आहे तो यातून निर्माण होतो.
आजच्या युद्धाची बीजे ही या घटनेत आहेत.
मुळात हा प्रश्न इस्त्राईलचा आकार केवढा हा आहे आणि इस्त्राईल म्हणते की गाजापट्टी आमची इस्त्राईल भूमी आहे तर मुस्लिम म्हणतात की ती आमची भूमी आहे . या युद्धाचे केंद्र मुळात हा वाद आहे . मुस्लिम लोकांना असे वाटते की इस्रायल निर्माण झाले नसते तर हा वाद निर्माणच झाला नसता . साहजिकच सुरुवातीच्या कालखंडामध्ये इस्रायल संपूर्ण नामशेष करावे असे मुस्लिम राष्ट्रांचे धोरण होते आणि त्याप्रमाणे युद्ध खेळले गेले परंतु या युद्धामध्ये मुस्लिम लोक पराभूत झाले .
या पराभूत झालेल्या मुस्लिम देशांच्या मध्ये सुद्धा इस्लामचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न होता व आहे . यामध्ये जो मुख्य दावेदार होता तो प्रामुख्याने अरबस्थान( त्यातील देश )होता पण हे सर्व सुन्नी असल्याने शियापंथाच्या लोकांना त्यामध्ये जागा नव्हती साहजिकच इराणला एकमेव शियाराष्ट्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे गरजेचे वाटत होते आणि वाटत आहे.
मुळातच इराण मध्ये जेव्हा लोकशाही उदयाला येत होती तेव्हा ही लोकशाही अमेरिकेला नकोच होती साहजिकच ती उलटवली गेली आणि आत्ताच्या युद्धाचा पाया ज्या घटनांनी घातला त्यामध्ये ही एक घटना आहे. अमेरिकेने स्वतःचे भावले असलेला राजा आणला. ही काही इराणी लोकांची निवड नव्हती त्यामुळे साहजिकच ही राजवट उलथवण्याची वाट पहात काही लोक होते आणि आयातुला खोमिनी यांनी हे काम पूर्ण केले . इराण मध्ये जे काही झाले होते ते सर्व काही अमेरिकेने घडवलेले असल्यामुळे साहजिकच अमेरिकेबद्दल एक प्रचंड खुन्नस आयातुला खोमिनी यांच्या मनामध्ये होती. इराण मधून आणि संपूर्ण मुस्लिम राष्ट्रांच्या मधूनच अमेरिकेला उखाडणे त्यांना गरजेचे वाटत होते आणि त्या दिशेने त्यांनी फार सुरुवातीपासूनच योजना आखायला सुरुवात केली होती. आमचे तेल आहे आणि ते कसे विकायचे कोणाला विकायचे कोणत्या दराने विकायचे हे आम्ही ठरवू असा हा राष्ट्रवादी दृष्टिकोन आहे आणि त्यामध्ये काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही कारण एकदा आपण राष्ट्रवाद स्वीकारला की मग त्या राष्ट्रातल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचे काय करायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या राष्ट्राला असतो हे आपण मान्य केले पाहिजे आणि आपण ते विकत घ्यायचे नाही की विकत घ्यायचे विकत घ्यायचे की कोणत्या दराने घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार ग्राहक म्हणून आपला असतो त्याबाबत वाटाघाटी होऊ शकतात पण दुर्दैवाची गोष्ट अशी की अमेरिकेला हे कधीही मान्य नसते अमेरिका कायम हस्तक्षेप करत बसते आणि म्हणूनच मग युद्धे होतात. बरे याबाबतीत इराण शहाणे म्हणावे का ? तर नाही मुळातच पॅलेस्टाईनचा प्रश्न हा पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल यांनी सोडवायला हवा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न म्हणूनच आपण पाहिले पाहिजे . पण या प्रकरणांमध्ये कारण नसताना केवळ मुस्लिमांचे नेतृत्व आपल्याकडे यावे किंवा मुस्लिमांना आपल्याबद्दल प्रेम निर्माण व्हाव म्हणून आपणच मुस्लिमांचे नेते आहोत हे दाखवण्यासाठी इराणमधील अति शहाण्या लोकांनी हम्हास सारखी दहशतवादी संघटना गाजा पट्टीत पाठवली आणि तिथून युद्धाची सुरुवात झालेली आहे. याबाबतीतले पहिले आक्रमण इराणने केलेले आहे इस्त्राईलने नाही. आता तुम्ही असे म्हणू शकता की ही दहशतवादी संघटना कशावरून इराणची आहे. पण सगळे पुरावे हीच गोष्ट सांगतात की इराणने निश्चितपणे मदत केलेली आहे . यात भरीत भर म्हणून इराणने आमच्याकडे अणुबॉम्ब तयार झाला तर आम्ही तो इस्रायल विरोधात वापरू शकतो अशी अप्रत्यक्ष धमकी द्यायला सुरुवात केली . इस्लामबाबत याबाबतीत प्रतिमा अशी आहे की जे लोक अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर विमान घालू शकतात ते इस्रायलवर अणुबॉम्ब टाकू शकतात . साहजिकच इस्राईलला मुस्लिम लोकांच्याकडे असलेले आण्विक शस्त्र आपल्यावरच पडण्याची भीती आहे आणि म्हणून ते त्यांना नको आहे आणि त्यातून आलेल्या असुरक्षिततेमुळे इस्त्राईलने इराणवर हल्ले सुरू केले . प्रश्न असा आहे की मग इस्त्राईलच्या बाजूने अमेरिकेला उडी घेण्याची का गरज आहे ? खरे तर अशा प्रकारची गरज नव्हती पण ट्रम्प अति शहाणा माणूस आहे . केवळ काही व्यापारी फायद्यासाठी इराणचे तेल आपल्या ताब्यात हवे म्हणून या मूर्ख माणसाने यामध्ये उडी घेतली. शिवाय हा कळत नकळत ख्रिश्चनवादी आहे . साहजिकच ज्याप्रमाणे मुस्लिम द्वेष हा ब्राह्मणी हिंदुत्ववादाचा पाया आहे त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारसरणीचाही पाया आहे . फक्त उघडपणे तो सांगत नाही कारण तो मुळात व्यापारी आहे .प्रॉब्लेम असा आहे की जो प्रश्न केवळ इस्त्राईल संबंधित आहे तो असा जागतिक का झाला ? आणि आता अचानक तो फक्त अमेरिके पुरता कसा काय मर्यादित झाला ? याचे कारण सरळ सरळ स्वार्थ आहे . तेल सर्वांनाच हवे आहे आणि युरोपकडे स्वतःचे तेल फारसे नाही साहजिकच त्यांना युद्धात पडणे परवडणारे नाही मुळातच एक शक्यता अशी आहे की ग्रीनलँडच्या आसपास तेल एलपीजी आणि इतर नैसर्गिक साधन संपत्ती असण्याची शक्यता आहे साहजिकच तिकडे सुद्धा नैसर्गिक साधन संपत्तीमुळेच अमेरिकेचे लक्ष गेलेले आहे आणि अमेरिकेने युरोपला धमकी दिली आहे पण आता डोनाल्ड ट्रम्प हा काय प्रकार आहे हे युरोपच्या लक्षात आल्याने युरोप आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादाला लागणे शक्य नाही. या सगळ्या प्रकारामध्ये त्यामुळे अमेरिकेची कोंडी झालेली स्पष्ट दिसते . जे व्यापारी संबंध पैशाच्या जीवावर नीट करता येत होते ते कारण नसताना युद्धाच्या जीवावर नीट करायला डोनाल्ड ट्रम्प पुढे सरसावले आणि तोंडघशी पडले . अर्थात इराणला सुद्धा फार काळ तग धरता येणे शक्य नाही त्यांनाही आपले तेल विकल्याशिवाय देश चालवता येणे अशक्य आहे त्यामुळे दोघेही आपापसात सोयीस्कर अशी तडजोड केल्याशिवाय गप्प बसतील असे वाटत नाही. या सगळ्यांमध्ये आता अचानक इस्त्राईलची गोची होणार आहे कारण अणुबॉम्ब तयार करण्याची प्रोसेस जोपर्यंत बंद पडत नाही तोपर्यंत इस्त्रायलला हे युद्ध हवे असणार . त्यामुळे अमेरिकेने जरी माघार घेतली तरी इस्त्राईल जोपर्यंत ही प्रोसेस बंद पडत नाही तोपर्यंत युद्ध चालू ठेवेल आणि जोपर्यंत इस्त्राईल युद्ध चालू ठेवते आहे तोपर्यंत इराणला लढावे लागेल. मुळातच आता इराणने स्वतःचे बघावे पण ते न करता जर का गाजा प्रश्न हा आपला प्रश्न आहे असे इराण समजत राहील तर मग कठीण आहे. प्रॅक्टिकल लेवल ला पॅन इस्लामिक मुवमेंट परवडत नाही असा अनुभव आहे परंतु तरीही इस्लामची भुरळ अशी आहे की अचानक सर्व जगात मुस्लिम असे स्वप्न पडायला लागते. प्रत्यक्षामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सुद्धा एकमेकाशी लढत बसतात. त्यामुळे जगभरात इस्लाम आला तरी शांतता नांदणे शक्य नाही कारण हे लोक एकमेकांत युद्ध करत बसतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कदाचित अल्लाह आमच्याच बाजूने आहे आणि खरा इस्लाम आम्हीच जाणतो असे म्हणत लढतील आणि संपूर्ण जग सुद्धा नष्ट करतील इतके हे धर्मांध आहेत . जोपर्यंत मुस्लिम धर्म डोळस बनत नाही तोपर्यंत मुस्लिमांचे काहीही भले होणे शक्य नाही आणि जोपर्यंत मुस्लिम धर्माला डोळसपणा येत नाही तोपर्यंत युद्ध थांबणे शक्य नाही . वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे कारणे घेऊन वेगवेगळी कारणे घेऊन लोक लढतच राहणार आणि धर्म हा असा गोंधळ आहे की तो अनेक नवीन कारणे पुरवू शकतो .
श्रीधर तिळवे नाईक
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाची कारणे २ श्रीधर तिळवे नाईक
गेले कित्येक आठवडे लोक इस्त्रायल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाची कारणे शोधत आहेत आणि त्यावरून वाद पण घालत आहेत सर्वसाधारणपणे अमेरिकेला संपूर्ण दोष देणे असा एक उपक्रम चालू आहे आणि तो अमान्य असल्यानेच मी माझी मांडणी केली होती. या युद्धाच्या मुळाशी मुळात धार्मिक संघर्ष आहे असे माझे म्हणणे आहे आणि या धार्मिक संघर्षाचा फायदा घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी यात उडी मारली आहे. ती त्यांनी इस्त्राईलच्या पंतप्रधानांच्या सांगण्यावरून केलेली किंवा मारलेली उडी नाही हे इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे हा अमेरिकेचा स्वतःचा निर्णय आहे हे आता स्वीकारायला हरकत नाही किंबहुना त्रंबके दूध खुळे नाहीतच डोनाल्ड ट्रम्प हे दूध खुळे नाहीतच हे आपण स्वीकाराला हरकत नाही.
मी एक सिद्धांत नेहमीच मांडलेला आहे तो म्हणजे युरोप आणि अमेरिका अत्यंत जाणीवपूर्वक इस्लाम मधल्या प्रतिगामी शक्तींना उत्तेजन देतात कारण त्यांना मुस्लिम समाज हा मागासलेला ठेवायचा आहे. याचे कारण उघड आहे . त्यांना तेल पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात हवे आणि जितका मुस्लिम समाज मागासलेला राहील तितका तो नियंत्रणात राहील असे हे समीकरण आहे त्यामुळे साहजिकच कुठलीही पुरोगामी चळवळ मुस्लिम समाजात निर्माण झाली की अमेरिका आणि युरोप ती पद्धतशीरपणे कुठल्या ना कुठल्या मार्गाने थांबवायला बघतात अगदी ब्रिटिश काळात सुद्धा ब्रिटिशांनी इथले मुस्लिम पुरोगामी होणार नाही त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके केले आणि त्यासाठी मुस्लिम लीगला सुद्धा त्यांनी उत्तेजन दिले ही वस्तुस्थिती. अमेरिकेने हेच ब्रिटिश साम्राज्यवादी धोरण कंटिन्यू केलेले आहे जेणेकरून फक्त प्रतिगामी लोक मुस्लिम लोकांचे प्रतिनिधी म्हणून उदयाला येत राहतील इराणसुद्धा याला अपवाद नव्हता आणि इराण मधली लोकशाही राजवट जी पुरोगामी असण्याची आणि बनण्याची बरीच शक्यता निर्माण झाली होती ती पद्धतशीरपणे अमेरिकेने कोसळवली आणि तिथूनच इराणचे अध:पतन सुरू झाले त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की अमेरिकेने तिथे अत्यंत प्रतीगामी राजेशाही पद्धतीची राजवट येईल याची काळजी घेतली पण जेव्हा ही राजवट सुद्धा हळूहळू पुरोगामी दिशेने सरकारला लागली तसे खोमिनीचे आगमन होईल याची अत्यंत पद्धतशीरपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर काळजी घेण्यात आली आणि इराणमध्ये प्रतिक्रांती झाली मात्र खोमिनी आपल्या हातचे भावले बनण्याची शक्यता जी वाटली होती ती फळली नाही. आया तुला खोमिनी हे फार धूर्त होते त्यांनी अमेरिकेचाच वापर केला त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट प्रतिगामी राजवट आणण्यातच होता कारण ते कट्टर धार्मिक होते .
दुर्दैवाने ही प्रतिक्रांती आहे हे सुद्धा आपल्याकडच्या पुरोगामी लोकांच्या लक्षात आले नाही. त्यांनी हा संघर्ष अमेरिकेच्या विरोधात कोणी ठाकते आहे ना तर मग हा साम्राज्यविरोधी लढा आहे अशा प्रकारचा देखावा उभा केला साहजिकच हा एक पुरोगामी मूर्खपणा होता आणि तो आज ना उद्या उघडकीला येणे अटळ होते त्याप्रमाणे झाले आणि हळूहळू या राजवटीचे खरे स्वरूप उघड झाले आणि अत्यंत प्रतिगामी स्वरूपाची एक व्यवस्था इराणमध्ये प्रस्थापित झाली. साहजिकच या विरोधात एक आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आणि हे आंदोलन तेलाच्या स्वायत्ततेकडे जाऊ शकते हे अमेरिकेच्या लक्षात येतात अमेरिकेने या युद्धात उडी मारली जेणेकरून इराणमध्ये होऊ घातलेली क्रांती या युद्धामध्ये वाहून जाईल . इराण मध्ये कधी नव्हे ते प्रथमच स्वतःच्या झोराष्ट्रीयन परंपरेचा गौरव सुरू झालेला आहे साहजिकच ही एका अर्थाने उत्तराधुनिक चळवळ बनण्याची शक्यता होती आणि कदाचित तिने इराणमध्ये मूळचा झोराष्ट्रीयन धर्म आणि आत्ताचा इस्लाम यांची सांगड घालत काहीतरी नवीन निर्माण केले असते पण असे व्हावे असे कोणालाच वाटत नाही कारण इराण एकदा का राष्ट्र म्हणून उभा राहिला तर तो संपूर्ण तेलावर नियंत्रण आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी अमेरिकेची ठाम समजूत आहे .. सद्दाम हुसेन बाबतीत सुद्धा जेव्हा तो पुरोगामी दिशेने सरकायला लागला तेव्हा अमेरिकेने अण्वस्त्र ठेवल्याचे कारण देत त्याला संपवले . थोडक्यात काय प्रतिगामी इस्लाम आणि इस्लाम प्रतिगामी रहावा म्हणून कार्यरत असणारा उत्तर कार्पोरेट वाद यांची ही अभद्र युती आहे आणि या युद्धामध्ये ते फार मोठे कारण आहे .
डोनाल्ड ट्रम्प हे मूर्ख असले तरी ते स्वार्थी मूर्ख आहेत त्यांना अमेरिकेचा स्वार्थ त्यांच्या पद्धतीने दिसतो काही झाले तरी जगातले सगळे नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे अमेरिकेच्या नियंत्रणात असले पाहिजे ही अमेरिकेची दुसऱ्या महायुद्धानंतरची पॉलिसी आहे आणि तीच पॉलिसी नेमकी डोनाल्ड ट्रम्प पुढे चालवायला बघत आहेत . जोपर्यंत रशिया कार्पोरेट गिरीच्या दिशेने जात होता तोपर्यंत अमेरिका गप्प होती परंतु अचानक पुन्हा एकदा साम्यवादाचे धोरण रशियन अध्यक्षांनी चाचपायला सुरुवात केली आणि गोंधळ सुरू झाला याची सुरुवातच मुळात एकेकाळचे सोवियत युनियन निर्माण करणे या विचाराने झाली आणि युक्रेंनवर आक्रमण झाले साहजिकच या सोव्हिअट रशियाच्या राजवटीत ज्या काही प्रदेशांचा समावेश होता ते प्रदेश आता धास्तावलेले आहेत त्यांना जुनी कम्युनिस्ट राजवट नको आहे याचाही फायदा ट्रम्प यांना मिळत होता आणि युरोप सुद्धा याबाबतीत त्यांच्या बाजूने होते परंतु तिथे सुद्धा ट्रम्प यांनी शेण खाल्ले त्यांनी ग्रीनलँड चा प्रश्न उपस्थित करून संपूर्ण युरोपची सहानभूती गमावली .
डोनाल्ड ट्रम्प यांचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे? मी या प्रॉब्लेमला सिस्टिमॅटिक आक्रस्ताळेपणा म्हणतो काही कार्पोरेट हाऊसेस मधले काही बॉस हा फार पद्धतशीरपणे वापरत असतात. आपण काय करणार आहे याचा थांगपत्ता लागूच द्यायचा नाही आणि आपला स्वार्थ मात्र सतत ध्यानात ठेवून कृती ॲक्शन्स करत राहायच्या असा हा प्रकार असतो . डोनाल्ड ट्रम्प हे याबाबतीत माहीर आहेत पण तरीही मी याला मूर्खपणा म्हणतो कारण आंतरराष्ट्रीय राजकारण हा कार्पोरेट प्रकार नाही. तिथे तुमची बॉसगिरी पोस्ट कार्पोरेट पद्धतीने चालत नाही . ती तशी चालते असा डोनाल्ड ट्रम्प यांचा गैरसमज आहे.
मुळात प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकेचे जगावरचे वर्चस्व हे अनेकदा अमेरिकेच्या पैशावर चाललेले होते त्यासाठी अमेरिका जो पैसा ओतत होती त्या पैशाचे आकलन पहिल्या प्रथम जर कुठल्या अध्यक्षाला झाले असेल तर तो अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे .ते कार्पोरेट उद्योगपती व व्यापारी असल्यामुळे हे साहजिक होते कारण कुठलाही व्यापारी सर्वात प्रथम टॅली बघतो साहजिकच त्यांनी जेव्हा ही टॅली बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण आंतरराष्ट्रीय वादाच्या नावाखाली प्रत्यक्षामध्ये प्रचंड पैसा खर्च करतो आहे आणि या पैशाचे जे रिटर्न्स आपणाला यायला हवेत ते येणे आता बंद झालेले आहेत साहजिकच या संपूर्ण खर्चाचे गणित पूर्णपणे एकदा तपासले पाहिजे असे त्यांना वाटायला लागले आणि त्यातूनच मग आमच्याच पैशावर पोसले गेलेले जे काही लोक आहेत ज्या काही संघटना आहेत आणि ज्या राष्ट्राचे प्रमुख आणि नेशन्स आहेत त्या सर्वांनाच आपण पैसे पुरवत आहोत तर त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट कबूल केली पाहिजे असे त्यांना वाटायला लागले. आता हा पूर्णपणे उद्योगपती सारखा विचार आहे कारण जर का पैसा मी लावत असेन तर मग फायदा सुद्धा मलाच मिळाला पाहिजे अशी ही विचारसरणी आहे प्रश्न असा आहे की ही विचारसरणी इतरांना मान्य आहे का? तर मुळातच याबाबतीत अमेरिका जो पैसा ओतत आहे तो पैसा ओतणे थांबले तर हे जे तथाकथित अमेरिकेचे सहकारी आहेत ते नेमके काय करतील त्यांच्या राष्ट्रांच्यावर काय नेमका परिणाम होईल त्यावरून पुढे येणार आहे खरे तर भविष्यात हे ताट वाढून ठेवलेले आहे आणि त्या ताटाची नेमकी कल्पना अजून कोणाला आलेली नाही मी पुन्हा एकदा म्हणतोय डोनाल्ड ट्रम्प थोडे मूर्ख आहेत पण स्वार्थ त्यांना बरोबर कळतो . युरोपमधील अनेक देशांना असे वाटते की अमेरिकेने जसा पूर्वी सहजरीत्या कसलीही अट न घालता पैसा ओतला तसा आताही पैसा ओतावा अशी अनेक राष्ट्र प्रमुखांची धारणा आहे परंतु हा जो अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष आलेला आहे तो पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांच्यासारखा नाही. पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष कार्पोरेट हाऊसेस मधून आलेले नव्हते मात्र हा मात्र स्वतःच कार्पोरेट हाऊस चालवतो साहजिकच त्याच्यापुढे आलेले प्रश्न हे कार्पोरेट हाऊसचे प्रश्न असल्यासारखा तो हँडल करत असतो साहजिकच मग मी पैसा टाकतो तर मग मला रिटर्न हवे अशी ही कार्पोरेट वृत्ती आहे आणि ती सहन करणे सर्वांच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे . फुकटात मिळालेले सर्वांनाच हवे असते आणि जर कोणी फुकटात मिळत असेल तर का सोडा असा हा विचार असतो पण जेव्हा एखादा फुकटा देणारा अचानक सावधान होतो तेव्हा मग भिकारी लोकांची सुद्धा पंचाईत होते . आज काही प्रमाणात अशीच पंचाईत युरोपियन लोकांची आणि इतर अमेरिकन समर्थकांची झालेली आहे कारण आता अमेरिका फुकटात काही द्यायला तयार नाही ती तुम्ही काय मला परत देणार हे दाखवा असे म्हणत आहे . प्रश्न असा आहे की हे सर्व असे अतिरेकी चाळे करत करणे आवश्यक होते का? तर नाही अत्यंत धूर्तपणाने सर्व काही हातात आले असते दुर्दैवाची गोष्ट अशी की ट्रम्प यांची जी बिझनेस शैली आहे तीच मुळात अशा प्रकारचा धूर्तपणा सांभाळत नाही ती एक प्रकारे लहान मुलाची बिझनेस स्टाईल असल्यासारखी असते आणि आदळ आपट करत आपणाला हवे ते मिळवण्याचा प्रयत्न ती करत असते आता प्रत्यक्ष व्यापार उद्योगात ही अनेकदा सफल झालेलीही असते पण इथे फक्त व्यापार नाही तर इथे राष्ट्रहितांचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच हे लोक जे घेत आहेत ते आता द्यायला तयार नाहीत कारण त्यांना संपूर्ण राष्ट्राचे हित सांभाळायचे आहे प्रश्न असा आहे की जर का अमेरिकेने यांना कर्जे दिले असतील तर त्या कर्जाचा दबाव आज ना उद्या डोनाल्ड ट्रम्प या लोकांना झेलायला लावतील याबद्दल मला शंका नाही आणि जर का हा दबाव झेलणे अशक्य बनले तर हे लोक आपोआपच अमेरिकेचे ऐकायला लागतील . किंवा मग त्यांना अमेरिकेविरुद्ध बंद करावे लागेल .
एकंदरच या युद्धामधली जी कारण मीमांसा चाललेली आहे ती जितकी सोपी दिसते तितकी ती नाही आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सांगतो मुर्खा सारखा वागताना दिसत असला तरी त्याला स्वार्थ बरोबर कळतो ते अमेरिकेचा स्वार्थ आता सोडायला तयार नाही कारण मुळातच ते आधीच्या लोकांच्या सारखे उदारमतवादी परंपरेत वाढलेले नाहीत ते सरळ सरळ एखाद्या लहान मुलासारखे आदळ आपट करणारे आणि आदर आपटून स्वार्थ साधणारे स्वार्थी आहेत आणि खरी पंचाईत त्यांच्या या अटीट्यूडनेच केलेली आहे .
याबाबतीत भारताने काय करायचे हे स्पष्ट आहे आणि सुदैवाने मोदी तेच करत आहेत . शांतपणे हा तमाशा आपल्या धर्माचा तमाशा नाही हे ओळखावे. एकही भारतीय धर्म म्हणजे शैव जैन बौद्ध वैष्णव सांख्य लिंगायत शीख यामध्ये इन्व्हॉलव नाही त्यामुळे आपण जुडाइक धर्मातली बॅटल म्हणून ही लढाई त्यांची त्यांनाच हॅण्डल करू द्यावी मात्र आपल्या लोकांचा संरक्षणाचा जो जीम्मा आपल्याकडे आहे तो पार पाडणे आवश्यक आहे कारण आज ना उद्या सर्वच सुन्नी मुस्लिम देश हे इराणच्या विरोधात उभे राहणे अटळ आहे इराणला हे लोक आपल्या बाजूने येतील असे जे वाटते आहे तो भ्रम आहे किंबहुना अमेरिकेला मदत करणे किंवा इराणच्या मदतीला न जाणे असे जे धोरण या देशांनी स्वीकारले आहे त्याचे कारण इराण हा शिया राष्ट्र आहे हेच आहे . सुंठी वाचून खोकला गेला तसा जर का अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यामुळे हा शियापंथ जात असेल तर तो या सर्व सुन्नी मुस्लिम देशांना हवा आहे.
थोडक्यात काय इसराइल चा प्रश्न उभा करून इराणने आक्रमणाला सुरुवात केली ही मूलभूत गोष्टच अनेक लोक आता लक्षात घेत नाहीत म्हणूनच लेख लिहिण्याची वेळ आली. जर का इराणकडून अतिरेकी संघटना गाजामध्ये पाठवण्यात आली नसती तर हे सर्व निर्माण झालेच नसते . त्यातच आण्विक क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये फेकू अशी धमकी दिली गेली आणि त्यातून सुद्धा एक भयग्रस्त तणाव निर्माण झाला आणि इस्रायलने आक्रमण केले . त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पोस्ट कार्पोरेट स्वार्थ सांभाळण्यासाठी उडी घेतली खरे तर हे आक्रमण करण्याऐवजी इस्रायलने मोसादद्वारा ही क्षेपणास्त्रे नष्ट करायला हवी होती पण कळत नकळत युद्धाचा स्टान्स घेतला गेला इतकेच नव्हे तर गाजावर नंतर सुद्धा अपरिमित अत्याचार करण्यात आले जे करायला नको पाहिजे होते. पण नेत्यान्याहू हा एक अजब प्रकार आहे एका अर्थाने दोन नमुनेदार नेते उदयाला आल्यानेच आणि दोघेही post truth वादी उत्तर आधुनिक असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
यानंतर तरी शहाणे व्हावे पण कोणीही शहाणे व्हायला तयार नाही हा लेख लिहितानाच एक बातमी आली आहे की कतार मधील तेलाच्या संदर्भातच इराणने नुकसान केलेले आहे आता जर काय असेच नुकसान इराण करत राहिला तर मग हे सर्व देश इराणच्या विरोधात जाणे अटळ आहे याचा परिणाम हे युद्ध संपणे दूर पण ते प्रचंड प्रमाणात भडकण्यात होणार आहे. अशावेळी आपले तेल अडकून पडले तर आश्चर्य नाही. मुळातच काही झाले तरी इराणला त्यांचे तेल विकण्यावाचून पर्याय नाही कारण त्यांचा देश त्याशिवाय चालू शकत नाही त्यामुळे भारताची जहाजे सोडणे ही इराणचीसुद्धा मजबूरी आहे. हीच गोष्ट रशियासंदर्भात आहे रशियाला भारताला तेल विकणे कधीही परवडते . शिवाय मैत्री आहेच . इराणच्या नादामध्ये पाकिस्तानला फेवर करणे असा एक विचार नक्की झाला होता परंतु हे दूरगामी विचार करता महागात पडू शकते हे लक्षात आल्यानंतर गोष्टी बदललेल्या असाव्यात . यातच भरीस भर म्हणून अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू झालेले आहे यामध्ये कोण पराभूत होईल हे आपण दुरूनच पहावे हे उत्तम.
ज्या अलिप्त राष्ट्रवादी चळवळीची नरेंद्र मोदी यांनी चेष्टा केली त्याच अलिप्ततावादी राष्ट्रवादी धोरणाला त्यांना पाठिंबा द्यावा लागावा आणि युद्धाच्या काळात नेहरूवादी बनावे लागावे हा मात्र काळाने उगवलेला सूड म्हणावा की काय म्हणावे ?
श्रीधर तिळवे नाईक
अमेरिका ईस्त्रायल विरुद्ध इराण या युद्धाचे खरे कारण काय आहे श्रीधर तिळवे नाईक
अमेरिका इस्त्राईल विरुद्ध इराण यांच्या युद्धामुळे काही ऐतिहासिक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलेले आहेत त्यातील एक प्रश्न म्हणजे ज्यू धर्म नेमका कधी सुरू झाला ? आणि या युद्धाचे कारण असलेला देवाशी करार हा जो आहे त्याचा इतिहास काय आहे?
एक सिद्धांत असा आहे की देवाशी झालेला ज्याचा करार तो आब्राहम हा ऊर ur मध्ये राहात होता त्याचे देव वेगळे होते पण त्याला यहुदी देवाने स्वतःची पितृभूमी आणि स्वतःचे देव सोडायला सांगितले आणि या देवाच्या सांगण्यावरून त्याने आपला देश सोडला. इतकेच नव्हे तर त्याने एकच देव स्वीकारला मुख्य गोष्ट अशी आहे की त्याने God बरोबर एक करार केला आणि हा करार त्याने आयुष्यभर पाळला एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की जुडाइक धर्म हा करारी धर्म आहे म्हणजेच देवाबरोबर झालेला करार पाळणाऱ्या प्रेषितांचा आणि त्या प्रेषितांच्या अनुयायांचा धर्म आहे . हा करार नेमका काय होता तर त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यापुढे आब्राहम फक्त एक आणि एकच देव पूजणार होता. एका अर्थाने हा एक देव वाद होता साहजिकच तोपर्यंत तो बहुदेववादी होता हे उघड आहे म्हणजेच त्याच्या आधी जो बहुदेववादी धर्म होतात त्या धर्माचा त्याग करून त्याने एक देव वाद स्वीकारला. काही आरब विचारवंतांच्या मते आरब लोक आणि इराक मधून निघालेले हे उरलोक मिळून सेमेटिक वंश बनतो. अर्थातच या काळामध्ये इराक हे नाव नव्हते तर खाल्डियन हे नाव होते . हे लोक मूळचे आफ्रिकनच होते आणि ते उत्तर आफ्रिकेत मायग्रेट झाल्याने थोडेसे गोरे झाले होते.
माझे स्वतःचे मत ही असेच आहे की मुळात हा जो वंश आहे तो दक्षिणात्य आफ्रिकेकडून उत्तर आफ्रिकेकडे स्थलांतरित झाला होता काही विचारवंतांच्या मध्ये मुळातच यूफ्रेटीस आणि नाईल या नद्या पार करणाऱ्या लोकांना हिब्रू म्हटले जात होते आणि त्याचा अर्थ परके असा होतो शक्यता अशी आहे की या दोन नद्या पार करून हे लोक पुढे उत्तरेकडे गेले म्हणून त्यांना कदाचित हिब्रू म्हटले गेले असावे . म्हणजेच एका अर्थाने जर अब्राहम आफ्रिकन आहे तर मोजेस हा त्याचा वंशज असेल तर तो सुद्धा आफ्रिकन आहे . म्हणूनच मी अनेकदा हे सांगितलेले आहे की यहुदी आणि इस्लाम हे दोन्हीही एका अर्थाने आफ्रिकी धर्म आहेत . त्याउलट ख्रिश्चन हा धर्म मात्र आफ्रोयुरोपी आहे कारण ख्रिश्चन धर्मामध्ये आफ्रिकी धर्मा बरोबरच ग्रीक आणि रोमन धर्म मिसळलेले आहेत. माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की मुळात जीजसचा आणि ज्यूधर्माचा कदाचित काडीचाही संबंध नसावा आणि म्हणूनच त्याची कृसीफिकेशन झालेले असावे तुझे काही मांडत होता ते जीजस जे काही मांडत होता ते जीव धर्माला संपूर्णपणे अमान्य होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे यासंदर्भात त्या काळामध्ये चर्चा झालेल्या असाव्यात निदान बायबल तरी सांगते की खूप वाद झाले. आजही येहुदी धर्म जीजस ला प्रेषित म्हणून स्वीकारत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि जर तो प्रेषित म्हणून जीव धर्माच्या परंपरेमध्येच बसत नसेल तर मग जीजस ला जो परंपरेत बसवण्याचा आग्रह का चालला आहे हा मला कायमच प्रश्न पडतो त्यापेक्षा युरोपमध्ये निर्माण झालेले हे वादळ आहे आणि हे वादळ कदाचित शक्य आहे की भारतामधून तिकडे गेले होते. त्यामुळे ते पारंपारिक ज्यू धर्माला झेपले नाही. आणि त्याला क्रूसावर मृत्यू देण्यात आला. शक्यता अशीच आहे की त्याचे जे ज्यू धर्माशी नाते जुळवले गेलेले आहे ते नंतरच्या काळात जुळवले गेलेले आहे. त्यामुळेच भारतीय आणि ग्रीक रोमन लोकांची मूर्ती पूजा सुद्धा ख्रिश्चन लोकांनी स्वीकारलेली आहे. आणि म्हणूनच इस्लाम ख्रिश्चन धर्माला मूर्तीपूजक मानतो. याबाबत एक युक्तिवाद असाही आहे की जर का जीजस हा ज्यू असता तर तो हिबरू भाषेत बोलला असता पण त्याऐवजी तो aramic भाषेत बोलतो म्हणजे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे जीजस हिब्रू भाषेत बोलणारा नव्हता त्याच्या बोलण्यात येणारा उल्लेख हा आधीचे प्रेषित एवढाच आहे मात्र कुठलाही विशेष प्रेषित तो उल्लेखित नाही.
यातून मग एक वेगळाच वाद उदयाला येतो तो म्हणजे जीजस जर ज्यू नव्हता तर मग ज्यू असणे म्हणजे नेमके काय होते काहींच्या मते जुडा पासून जे निघाले ते ज्यू होत आणि ही केवळ बारा टोळ्यांच्या पैकी एक टोळी होती. प्रश्न असा आहे की मग हिब्रू ही फक्त या टोळीची भाषा होती का? की वेगवेगळ्या टोळ्या मोजेसच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आणि त्यांनी हिबरू ही भाषा स्वीकारली ? कारण मोजेस हिब्रू भाषेत बोलतो किंबहुना पहिले बायबल त्यानेच हिब्रू भाषेत लिहिले असे माझे मत आहे मात्र त्यामध्ये भर पडत गेली हेही सत्य आहे. काही लोक ही भर पडत गेली हे नाकारतात पण अलीकडे जे काही संशोधन पुढे आले आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे अनेक जणांनी बायबल मध्ये भर घातलेली आहे.
जीजस हा डेव्हिड सालोमान यांच्या ब्लड लाईन मधला होता की नव्हता हा एक फार मोठा वादाचा विषय झालेला आहे काहींच्या मते जीजस हा ज्यू होता आणि अब्राहम व मोजेस हे Levite होते. यातील अब्राहम हा खाल्डियन उर होता आणि त्याने कॅननमध्ये गेल्यानंतर तिथे हिब्रू लोकांची नोकरी केली आणि तिथेच तो हिब्रू भाषिक ज्यू झाला म्हणजे एका अर्थाने अब्राहम आणि जीजस हे दोघेही कदाचित ज्यू नव्हते आणि ज्याचा आधीचा प्रेषित म्हणून येशू ख्रिस्त उल्लेख करतो तो प्रेषित कदाचित अब्राहम असावा आणि हा आबराहम कदाचित ज्यू परंपरेमध्ये नसावा. तो कदाचित आशियाई परंपरेमध्ये असावा .
सर्वसाधारणपणे एक कल असा दिसतो की लेव्ही होता त्याचा मुलगा कोहात आणि त्याचा नातू मोजेस होता . म्हणजेच एका अर्थाने मोजेस हा लेवीट होता. हा लेवी जेकब आणि लेह यांचा तिसरा मुलगा होता हा जेकेब इस्रायल या नावाने ओळखला जातो आणि त्यालाच अनेक देशांचा निर्माता मानले जाते. Exodus 2:1- 2 मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की लेविने एका लेवि स्त्रीशी लग्न केले आणि तिने मोजेसला जन्म दिलाExodus 6:16-20 सुद्धा मोजेस लेविट आहे हे मान्य करते .
माझे स्वतःचे म्हणणे असे की जे काही घडले ते घडले पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे जे लोक मोजेसला प्रेषित मानतात ते ज्यू होत.
प्रश्न असा आहे की प्रॉफेट हा शब्द आला कुठून ? अनेकांच्या मते तो profess या शब्दापासून आलेला आहे म्हणजेच एका अर्थाने त्याचा अर्थ पंडित असा आहे. अलीकडे ज्याला आपण प्रोफेसर म्हणतो हा शब्द त्यातूनच आलेला आहे आणि त्याचा अर्थ पंडित असाच होतो. शैव परंपरेमध्ये पंडित जे काम करत होते तेच काम प्रॉफेट करत होते. म्हणजेच जी संहिता चालत आलेली आहे ती जतन करणे आणि तिचा अर्थ समजावून सांगणे कारण मुळातच या काळामध्ये मौखिक परंपरा अस्तित्वात होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बहुदा मोजेसने ती लिखित केली असावी. मी नेहमीच एक सिद्धांत मांडत असतो तो म्हणजे श्रद्धा ही मौखिक असते तर धर्म हा लिखित असतो. म्हणजेच एका अर्थाने मोजेसने आबराहम याने दिलेल्या मौखिक श्रद्धेतून तिला लिखित करत ज्यू धर्म जन्माला घातला. प्रश्न असा आहे की या लिखितामध्ये काय आहे आणि तिथे आपणाला एक करार दिसतो एकंदरच करार ही संकल्पना यामुळेच जुडाईक धर्मामध्ये केंद्रस्थानी आहे. याचाच पुढे अधिक विस्तार आपणाला इस्लाम मध्ये दिसतो आणि तिथे अगदी लग्न सुद्धा करार आहे आणि हा करार अनेकदा लिखित स्वरूपामध्ये केला जातो. आपल्याकडे यामुळेच बहुजन समाजामध्ये याद्या काढणे असा प्रकार लिखित रूपात येतो ज्यामध्ये कोणी काय करायचे हे व्यवस्थित लिहून ठेवलेले असते.
तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा युद्धाशी काय संबंध तर युद्धाशी संबंध यासाठीच आहे कारण इस्त्राईल आणि इस्माईल यांच्यातला हा संघर्ष आहे. जेकब हा इस्त्रायल आहे आणि गाजा पट्टी ही इस्माईल आहे म्हणजे इस्माईल हा नेमका काय आहे तर ज्यू लोकांच्या मते तो देवाचा आज्ञा मोडणारा पुत्र आहे त्यामुळे त्याला जागाच नाही त्या उलट इस्लाम असे म्हणतो की इस्माईल हा देवाच्या आज्ञेवरूनच नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी म्हणून पुन्हा अरेबियन आफ्रिकेकडे आला आणि त्याने आपला वंश इकडे आणला हा वंश अरब स्थानात गेला आणि त्यातूनच मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झालेला आहे.साहजिकच गाजा पट्टीवर मुस्लिमांचा तितकाच हक्क आहे जितका तो इस्रायलच्या लोकांचा आहे याउलट इस्त्राईलचे म्हणणे असे की मुळातच इस्माईल हा त्याने देवाचे आज्ञा मोडली म्हणून हाकलला गेला होता त्यामुळे त्याचा काहीही हक्क नाही. इस्त्राईलच्या मते गाजा पट्टीमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे नंतर मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यात आली आणि हे सर्व स्थलांतरित लोक आहेत मूळचे गाजा पट्टीतले नाहीत.
आता याचा निर्णय कसा होणार? स्थिती अशी आहे की जेव्हा इतिहास स्पष्ट नसतो आणि दंतकथांच्या जंगलामध्ये हरवलेला असतो तेव्हा एकच उपाय असतो तो म्हणजे वर्तमान काळात येऊन निर्णय घेणे इथला वर्तमान जो आहे त्याच्या आधारेच हा निर्णय घ्यावा लागेल पण हा निर्णय इस्त्राईलच्या विरुद्ध जाणार हे इस्त्राईलला माहिती आहे कारण बहुमत आत्ता तरी पॅलेस्टाईन स्वतंत्र देश या संकल्पनेच्या मागे उभे आहे.
यावर एक उपाय होता का म्हणजे पॅलेस्टाईन आपल्या ताब्यात ठेवून जर का त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देत त्याचा योग्य पद्धतीने विकास करता येण्याची काही शक्यता होती का? हा खरा यातला कळीचा प्रश्न आहे आणि तो कोणीच विचारत नाही. गाजाला युद्ध क्षेत्र बनवण्यातच सर्वांना रस दिसतो. आता तर अवस्था अशी आहे की अमेरिकेने मारलेल्या उडी मुळे मूळ प्रश्न जो धार्मिक होता तो राहिला बाजूला या सगळ्या लढाईला भलताच रंग चढत चालला आहे म्हणजे पुरोगामी लोकांच्या दृष्टीने ही लढाई अमेरिकेच्या साम्राज्यशाही विरोधात आहे तर हिंदुत्ववादी लोकांच्या दृष्टिकोनातून ही लढाई मुस्लिम फंडामेंटल अतिरेकी वादाच्या विरोधात आहे. त्यातच इराणने मदत केल्याच्या बातम्या येत असतात पण त्यात तथ्य किती हे अजूनही स्पष्ट नाही मुख्य म्हणजे इराणने पाकिस्तानला पाठिंबा अचानक दिला त्यामुळे समीकरण बदलले बहुदा इराणला आता आपली चूक कळलेली दिसते त्यामुळे हळूहळू पुन्हा भारताच्या बाजूने इराण उभा राहिला तर आश्चर्य मानू नये. कारण पाकिस्तान इतका कंगाल आहे की पाकिस्तान कडून नेमके काय मिळणार हाच प्रश्न आहे .
या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यू लोकांच्या बरोबर झालेला करार नेमका काय आणि खरोखरच नेमकी कोणती भूमिका या करारानुसार त्यांना द्यायला हवी असा हा श्रद्धायुक्त प्रश्न आहे जोपर्यंत तो आपण सोडवत नाही तोपर्यंत गाजाचा प्रश्न पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटणार नाही. अनेकांच्या मते तर इस्राईलचा बायबल मधून निर्माण केलेला इतिहास हा पूर्णपणे काल्पनिक इतिहास आहे. तो कथांच्या स्वरूपात येतो आपल्याकडे पुराणाच्या स्वरूपात इतिहास मांडून आपल्याला हवा तसा इतिहास मांडून अनेकदा गोष्टी फिरवल्या जातात इथेच इस्त्राईल आणि ब्राह्मणी हिंदुत्ववाद यांच्या कुंडल्या मिळतात . दोघांचेही इतिहास कथांच्या माध्यमातून उभे आहेत आणि आपण जर का आर्किऑलॉजीचा वापर करत काही पुरावे शोधायला गेलो तर सर्व पुरावे अलीकडच्या काळात येतात आणि हे सर्व जुने आहे हे मत बदलून जाते त्या मानाने या दोघांचा विचार केला तर इस्राईलच्या बाजूने निदान काही पुराने पुरावे आहेत भारतातल्या ब्राह्मणी हिंदुत्वाच्या बाजूने मुळात दुसऱ्या शतकानंतरच पुराव्यांची संभाव्य गोष्ट सुरू होते. मुळात पुराणांची रचनाच उशिरा झालेली आहे हे स्पष्ट आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे हा जो करार आहे तो वास्तव नाही म्हणजे तो देवाशी झालेला आहे आता देवाशी झालेला करार वैज्ञानिक पातळीवर कसा काय स्वीकारता येईल असा हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच सगळा गोंधळ होऊन जातो या संदर्भामध्ये माझ्या मते एकच गोष्ट करता येणे शक्य होते ती म्हणजे ज्यू-धर्माला सर्व लोकांच्याकडून त्या काळामध्ये जी वागणूक मिळाली त्या वागणुकीमुळे ज्यू लोकांचे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण होणे गरजेचे होते आणि तसे ते निर्माण झाले आहे प्रश्न असा आहे की या राष्ट्राचा विस्तार करण्याची आता इस्त्रा एलला का गरज भासत आहे? आता त्यांच्या ताब्यात जी भूमी आहे त्या भूमीवर ज्यू राष्ट्र उभा करता येणे शक्य नव्हते का तर शक्य होते मग पॅलेस्टाईनचा आग्रह कशासाठी चालला आहे? या प्रश्नाचे उत्तर राजकारण हेच आहे. मुस्लिम लोकांना हा प्रदेश सोडायचा नाहीये आणि जुडाइक धर्मांना सुद्धा हा प्रदेश आपल्या ताब्यातून जावा असे वाटत नाही या दोन्ही धार्मिक बाजूंच्या मध्ये पॅलेस्टाईन सध्या जळते आहे.
अनेक लोकांना असे वाटते की पुरोगामी विचारसरणीतून हा प्रश्न सुटू शकतो परंतु ते शक्य नाही कारण देवाचा करार अशी गोष्ट पुरोगामी वाद मान्यच करू शकत नाही. आणि जेव्हा विज्ञानाच्या आधारे प्रश्न सुटत नाहीत तेव्हा मग श्रद्धांचे सगळे गोंधळ सुरू होतात तसे ते झालेले आहेत खरे तर अशावेळी युद्ध सुरू करू नये पण दुर्दैवाने इराणने ते सुरू केले आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून इस्त्राईलने नको तितका आक्रमकपणा घेतला तो आक्रमकपणा इतका होता की इस्रायलने आक्रमण केले असे दृश्य निर्माण झाले. प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती नाही. आक्रमण इराणनेच केले आहे आणि ते अतिरेकी संघटनेच्या द्वारे केले आहे .प्रश्न इतकाच आहे की इराणला आक्रमण करण्याची का गरज भासते? मुस्लिम राष्ट्रांचे नेतृत्व या गोष्टीमुळे मिळणार आहे का? माझ्या मते हे शक्य नाही . याचे कारण मुळातच सर्व मुस्लिम राष्ट्रे सुन्नी आहेत. त्यामुळे ती इराणला नेतृत्व देणार नाहीत. मुळातच खोमणी या माणसाला इस्लामिक राजवट जगभर पसरवायची होती आणि हा सगळा त्याच्या अट्टाहासाचा परिणाम आहे आपल्याकडे असाच अट्टाहास सय्यद आणि जिना नावाच्या अतिशहाण्या माणसाने धरला आणि पाकिस्तान निर्माण झाले. मुस्लिम लोकांचा धर्मवाद हाच या सर्व गोष्टींना जबाबदार आहे लोक आता केवळ अमेरिका हरत आहे म्हणून मुस्लिमांच्या बाजूने उभे राहायला तयार आहेत कारण शेवटी जो जीता वही सिकंदर परंतु त्यामुळे प्रश्न सुटतील अशी जर का कोणाची समजूत असेल तर मी इतकेच म्हणेन की हे युद्ध पुन्हा पुन्हा उद्भवणार आहे कारण या युद्धाची जोपर्यंत धार्मिक सोडवणूक होत नाही तोपर्यंत युद्धाचे कारण नष्ट झालेले नसणार आणि जोवर युद्धाचे कारण अस्तित्वात आहे तोवर हे युद्ध पुन्हा पुन्हा होणे अटळ आहे. ज्यांना कोणाला असे वाटते की इराणचे डोके शहाणे आहे किंवा शाबूत आहे ते लोक मूर्ख आहेत . इराण मध्ये सुद्धा इस्लामज्वर चढलेला आहे आणि आता तर कतार मधल्या तेलावर हल्ले करण्यातच ते शहाणे डोके खर्च पडले आहे. मुळात ज्यासाठी लढाई आहे ती संपत्ती नष्ट होता कामा नये याचे भान युद्धात असावे लागते आता इराण ते भान विसरत चालला आहे आणि एकदा का हे भान लोपत गेले तर मग इतर शांत बसलेले मुस्लिम देश शांत बसणार नाहीत त्यांना एक तर इराणला थांबवावे लागेल किंवा मग अमेरिकेला थांबवावे लागेल किंवा इस्त्राईलला थांबवावे लागेल किंवा इस्त्राईल अमेरिकेला थांबवावे लागेल दुसरा कुठलाही पर्याय सध्या तरी दिसत नाही.
या सगळ्यांमध्ये अमेरिका किंवा इराण यांनी माघार घेतली इस्त्राईलने माघार घेतली तर कदाचित तोडगा निघू शकतो ही एक दुसरी शक्यता आहे जिथे शहाणपण ऍक्टिव्हेट झाले तर फरक पडू शकतो. सध्या तरी हे शहाणपण तिन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये गायब झालेले दिसते.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment