तंत्र आधी की तर्कशास्त्र आधी श्रीधर तिळवे नाईक
मोक्ष मिळवावा पण कसा हा प्रश्न फार महत्त्वाचा कारण कसा हा प्रश्न प्रयोग करायला लावतो असे प्रयोग भगवान शंकर यांना करावे लागले कारण त्यांच्या आधी त्यांच्यासारखा कोणी होऊनच गेला नव्हता ज्याला असे काही शोधावेसे वाटले साहजिकच प्रयोग होत गेले आणि जेव्हा मोक्ष मिळाला तेव्हा मग तो नेमका कसा मिळाला हे शोधले गेले त्यातून एक पद्धत तयार झाली आणि या पद्धतीतून तर्कशास्त्र उगवले कारण ही पद्धत म्हणजेच तंत्र होते तंत्र शोधले गेले आणि मग त्यातून एक सार्वजनिक काही कॉन्फिगरेशन तयार झाले ज्याला आज आपण तर्कशास्त्र म्हणतो म्हणूनच आधी तंत्र येते आणि मग तर्क येतो जर का तरकाच्या सहाय्याने जात बसला तर तुम्हाला प्रयोग करताच येत नाही कारण कसे हा एक असा प्रश्न आहे की जिथे अनेकदा-अतार्थीक प्रयोग करावे लागतात तुम्ही जर का तार्किक प्रयोग करत बसला तर यश मिळण्याची कसलीही खात्री नसते
त्यामुळे प्रथम तंत्रशास्त्र आणि मग तर्कशास्त्र मग दर्शन आणि मग तत्वज्ञान असा हा क्रम आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment