ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद कोणी सुरू केला कुठून सुरू झाला श्रीधर तिळवे नाईक 

ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद हा एक महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांच्यामुळे सातत्याने चालू राहिलेला वाद आहे या वादाला नंतर शाहू महाराजांच्या काळामध्ये वेदोक्त प्रकरणामुळे अधिकच चालना मिळालेली दिसते आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी तो हिंदुत्वाच्या अंगाने अधिक पुढे नेला हा वाद अनेकदा मराठा राजकारणी लोकांनी निर्माण केलेल्या काही मॉडेल्समध्ये नीट समजून घेतलेला नाही विशेषत: यशवंतराव चव्हाण यांच्या मॉडेलमध्ये हे घडलेले दिसते याचे कारण स्पष्ट आहे कारण त्या काळातले हे सर्व पुरोगामी लोक कळत नकळत ब्रिटिश लोकांनी किंवा ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी लिहिलेल्या इतिहासाच्या प्रभावाखाली आले यांनी खरा इतिहास तपासलाच नाही एका अर्थाने हे काँग्रेसचे मॉडेल आहे आणि हे मॉडेल ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद अस्तित्वातच नाही अशा तऱ्हेने मांडणी करत होते याचे कारण पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस मधील इतर नेते होते अनेकांना असे वाटते की याची सुरुवात महात्मा फुले यांनी केली परंतु पुरावे वेगळी गोष्ट सांगतात ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद किंवा हा भेद प्रथम ब्राह्मणांनी सुरू केलेला आहे आणि ब्राह्मण धर्माचा तो पाया आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याचा ढळढळीत पुरावा आपणाला वेदांच्या मध्ये सापडू शकतो. उदाहरणार्थ पुढील ऋचा किंवा मंत्र पहा 


उ॒त यत्पत॑यो॒ दश॑ स्त्रि॒याः पूर्वे॒ अब्रा॑ह्मणाः। ब्र॒ह्मा चे॒द्धस्त॒मग्र॑ही॒त्स ए॒व पति॑रेक॒धा ॥


मन्त्र उच्चारण

पद पाठ

उत । यत् । पतय: । दश । स्त्रिया: । पूर्वे । अब्राह्मणा: । ब्रह्मा । च । इत् । हस्तम् । अग्रहीत् । स: । एव । पति: । एकऽधा॥१७.८॥


अथर्ववेद » काण्ड:5» सूक्त:17» पर्यायः:0» मन्त्र:8

अर्थ 

एखाद्या स्त्रीचे दहा पती जरी होऊन गेले असले तरी जर ब्राह्मण त्या स्त्रीचा हात पकडत असेल तर तो त्या स्त्रीचा पती होतो 


इथे प्रथमच ब्राह्मण आणि अब्राह्मण असा भेद केलेला आहे म्हणजेच हा भेद ब्राह्मण लोकांनी सुरू केलेला आहे व ब्राह्मण किंवा ब्राह्मणे तर लोकांनी केलेला नाही अशा प्रकारचे अनेक श्लोक वेदांच्या मध्ये आहेत लोक वेद नीट वाचत नाहीत त्यामुळे गोंधळ होतो अथर्व वेद हा बहुदा ब्राह्मण धर्म निर्माण झाल्यानंतर निर्माण झाला असावा असे वाटते त्याला अनेकदा त्यामुळे नंतरचा वेद म्हटले जाते ते यामुळेच !

अथर्व वेदा मधील वरचा श्लोक हा फार गुंतागुंतीचा आहे कारण इथे स्पष्टपणे म्हटले आहे की ब्राह्मणाने अब्राह्मण स्त्रीचा हात पकडला तरी ती त्याची होऊन जाते 

पुढच्या मंत्रात असे म्हटले आहे की वैश्य आणि राजन्य लोकांना हा अधिकार नाही 

इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या क्षत्रिय ही संकल्पना अथर्ववेदात सुद्धा दिसत नाही अनेकदा राजन्य हा शब्दच वापरला जातो आणि त्यांच्या सुद्धा ताब्यात हा अधिकार नाही नंतरच्या मंत्रामध्ये हे स्पष्ट केलेले आहे हा मंत्र असा 

ब्रा॑ह्म॒ण ए॒व पति॒र्न रा॑ज॒न्यो॒ न वैश्यः॑। तत्सूर्यः॑ प्रब्रु॒वन्ने॑ति प॒ञ्चभ्यो॑ मान॒वेभ्यः॑ ॥

मन्त्र उच्चारण

पद पाठ

ब्राह्मण: । एव । पति: । न । राजन्य: । न । वैश्य: । तत् । सूर्य: । प्रऽब्रुवन् । एति । पञ्चऽभ्य:। मानवेभ्य: ॥१७.९॥

अथर्ववेद » काण्ड:5» सूक्त:17» पर्यायः:0» मन्त्र:9

म्हणजेच हा पती होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना दिलेला आहे ब्राह्मण काय पद्धतीने विचार करत होते ते इथे स्पष्ट व्हावे 

आपण जर का याच्याही मागे गेलो तर मात्र काही वेगळ्या गोष्टी दिसतात उदाहरणार्थ वैदिक धर्मामध्ये ही संकल्पना इतकी गाढ झालेली दिसत नाही 

आणि वेदांच्या ही आधी जर का आपण पाहायला गेलो तर आपणाला आर्य विरुद्ध दास असा संघर्ष अस्तित्वात असावा याचे स्पष्ट पुरावे मिळतात उदाहरणार्थ ऋग्वेदामध्ये अगस्ती यांनी हा संघर्ष इंद्र विरुद्ध मऋत गण यांच्या संदर्भात मांडलेला होता ( १ :१६९ :५ /१ :१६५ १५ /१ :१६६ :१५ /१ १६७ :११)


अगस्ती हे सर्वात प्राचीन ऋषी असून सुद्धा त्यांच्या नावाने फार ऋचा दिसत नाहीत कारण त्यांनी मंत्र लिहिल्यानंतर बहुदा वैदिक धर्माचा त्याग केला आणि सर्व धर्म स्वीकारला साहजिकच पुढे जाऊन त्यांना संगम लिटरेचर मध्ये अध्यक्ष पदाचा मान मिळालेला दिसतो आणि त्यांनी पुढे जाऊन तमिळ भाषेचे व्याकरण सुद्धा लिहिलेले दिसते एका अर्थाने ते उत्तर दक्षिण वैदिक- शैव यांचा पूल होते. साहजिकच प्रथम त्यांनी मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यातूनच त्यांच्या या ऋचा आल्या असाव्यात त्यांचा आश्रम सुद्धा गोदावरी काठी किंवा विंध्य पर्वताच्या आसपास दिसतो हिमालयाच्या दिशेने दिसत नाही त्याचे कारण सुद्धा हेच आहे दक्षिणेमध्ये ते दक्षिणात्य मानले जातात आणि तसे मांडले जातात त्याचे कारण त्यांनी पूर्णपणे शैव संस्कृती स्वीकारली होती . शुक्राचार्य यांची सुद्धा अशी स्थिती दिसते . त्या उलट विश्वामित्र हे ब्रह्म धर्माने प्रभावित होतात परंतु मोक्षा पर्यंत पोहोचत नाहीत कदाचित मोक्ष स्वीकारत नाहीत पण शैव धर्मातील समता मात्र ते स्वीकारताना दिसतात आणि अहिंसक यज्ञ सुद्धा बहुदा त्यांनी सुरू केलेला असावा त्यामुळेच त्यांचा जो गायत्री मंत्र आहे तो एकेकाळी सर्वच राजे लोकांचा अत्यंत आवडता मंत्र होता याचे कारण तो विश्वामित्र यांनी म्हणजेच एका राजन्य माणसाने रचलेला असल्याने त्याच्याशी एक नाते आहे पण या सगळ्याची सुरुवात मात्र अगस्ती यांच्यापासून झाली त्यामुळेच त्यांनी मऋत म्हणजेच माने (अम्मा हिने) निर्माण केलेला ऋत पाळणारे लोक आणि इंद्र यांच्यातला संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो . प्रत्यक्षात इंद्र दक्षिणेकडून मरुत गणाकडून पराभूत झाला आणि तिबेट कडे निघून गेला असे इतिहास सांगतो.  


 हा मरूतं गण मूळचा कर्नाटचा (कर्नाटक आणि महाराष्ट्र ) आहे आणि त्याच्यावरूनच प्रत्यक्षामध्ये मराठा हा शब्द आलेला आहे . "म" ऋत पाळणारे ते मराठा हा मूळचा अर्थ आहे आणि त्यांनी वैदिक काळामध्ये इंद्राला पराभूत केले होते त्यामुळेच खंडोबाच्या अनेक कथांच्या मध्ये इंद्र हा महादेवापुढे हात जोडून असतो . उत्तर भारतीय लोकांना विशेषतः वैदिक लोकांना ब्राह्मण लोकांना मराठी कायम शत्रू वाटतात त्याची सुरुवात इथे झालेली आहे . कारण मराठा हा कायमच हर हर महादेव वाला राहिलेला आहे अलीकडे त्यांना वैष्णव बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे की कुठे जायचे मूळ सोडायचे आणि अस्तित्वात नसलेले फळ पकडायचे की एक नवीन शैव संस्कृती पुन्हा जन्माला घालायची हे त्यांनी ठरवायचं आहे. 


जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात पराभूत होता तेव्हा अनेकदा स्वतःचा अहंकार शाबूत ठेवण्यासाठी अनेक दंतकथा जन्माला घालतात त्यातील एक म्हणजे रामायण होय पुढे मग रामायण मध्ये मऋत गणाचा मार्गदर्शक असलेल्या हनुमानाला राम भक्त दाखवून दास करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण प्रत्यक्षात तो फक्त सुग्रीव नावाच्या राजाचा संरक्षक होता रामाचा भक्त वगैरे काही नव्हता केवळ आपल्या राजाने आज्ञा दिली म्हणून त्याने रामाला मदत केली वेळोवेळी योग्य ते सल्ले दिले त्यामुळेच दक्षिणात्य चित्रपटांमध्ये कधीही हनुमान हा रामाचा भक्त वगैरे असा दाखवत नाही तर मित्र म्हणून दाखवतात . अलीकडे राजमौली यांचा चित्रपट हे अधिक स्पष्ट करतो . याच विषयाच्या अंगाने महाबळेश्वर सैल यांची एक कादंबरी पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.


वैदिक परंपरा असे सांगते की अगस्ती यांनी या दोन गणांच्या मध्ये मैत्री घडवून आणली त्यासाठी त्यांनी विंद्य पर्वत नमवला म्हणजेच पार केला जी एस घुरये हे या संघर्षाकडे आर्य विरुद्ध दास असे पाहतात जिथे दास म्हणजे गुलाम असा अर्थ नाही तर अनार्य असा अर्थ आहे हा मूळचा शैव आहे. म्हणजेच इथेही कळत नकळत एक भेद आलेला दिसतो आणि हाच भेद पुढे फक्त आपल्या दिशेने केंद्रित करत ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण धर्माची स्थापना करत नंतर ब्राह्मण आणि अ ब्राह्मण असा भेद केलेला दिसतो जर का तुम्ही सर्व ब्राह्मणग्रंथ वाचले तर तिथे हा भेद अतिशय सातत्याने केलेला दिसेल.


थोडक्यात काय ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा भेद प्रथम युरेशियन श्रुतीने आणलेला आहे तो शैव श्रुतीने आणलेला नाही नंतर सुद्धा गौतम बुद्ध सारखा माणूस हा भेद अरिय आर्य विरुद्ध अनारीय अशाच पद्धतीने घेऊन येतो मात्र तिथे अर्थ नेमका काय होता सर्वसाधारणपणे अलीकडे असे गृहीत धरले जाते की आर्य उच्च स्थानी होते परंतु प्रत्यक्षात असे दिसत नाही कारण नंतर गौतम बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण लोकांनी आर्य लोकांना स्वतःपेक्षा वेगळे केलेले दिसते मी मागेच म्हटल्याप्रमाणे हे ते युरेशियन लोक आहेत जे तिबेट मार्गे बिहार उत्तर प्रदेश मध्ये आले होते एका अर्थाने हा संघर्ष त्या काळामध्ये इराणमार्फत आलेले युरेशियन लोक आणि तिबेट मार्गे आलेले युरेशियन लोक असा झालेला आहे यातील आर्य लोकांचा प्रॉब्लेम फक्त एकच होता तो म्हणजे या लोकांनी शैव श्रुती स्वीकारून मोक्ष स्वीकारला आणि नंतर त्या मोक्षाला एक नवा आकार देऊन स्वतःची श्रमण संस्कृती निर्माण केली जी शैव श्रुतीचाच भाग होती याचे श्रेय पार्श्वनाथ यांना द्यायचे की महावीराला द्यायचे एवढाच फक्त प्रश्न आहे कारण महावीराने ही धारा नंतर पूर्णपणे स्वतंत्र केली त्यापूर्वीचे सर्व तीर्थंकर हे सरळ सरळ स्वतःला नाथ म्हणून घेत होते आणि ते नाथ संप्रदायी होते इतकेच नव्हे तर सर्वात पहिला म्हणून ते नेहमीच आदिनाथ म्हणजेच भगवान शिव यांचेच नाव घेत होते आणि वृषभनाथ हा त्या धारेत कैवल्यप्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती करणारा पहिला युरेशियन शामन मनुष्य होता ज्याला पुढे श्रमण शमण म्हटले गेले कारण शामन परंपरेमध्ये मोक्ष नावाची भानगड नाही .एका अर्थाने असे म्हणता येईल की ऋषभनाथ यांनी भारतीय शैव लोकांची मोक्ष ही संकल्पना स्वीकारली नंतर स्वतः साधना केली आणि मोक्ष मिळवला कैवल्यप्राप्ती केली इथेच दोन संस्कृतींचे मिलन सुरू झाले पण 23 नाथांच्या पर्यंत हा प्रकार व्यवस्थित चालला आणि महावीर यांनी प्रथमच नाथपरंपरेपासून स्वतःला पूर्णपणे तोडून स्वतःचा नवीन धर्म निर्माण केला . कठोर ब्रह्मचर्य आणि टोकाची अहिंसा यांची ओळख स्थापन केली . स्त्रियांना मोक्ष मिळत नाही अशी मांडणी केली या तिन्ही गोष्टी शैव श्रुतीला मान्य नाहीत त्यांना सुकाम मान्य आहे स्त्रियांना मोक्ष मिळतो असा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि टोकाचे ब्रह्मचर्य अमान्य आहे म्हणूनच अगदी शंकर सुद्धा मुलांना जन्म देतात त्यांना ब्रह्मचर्य मान्य नाही आणि टोकाची अहिंसापण मान्य नाही आणि फक्त स्त्रियांना मोक्ष मिळतो ही मांडणी ही मान्य नाही . त्याएवजी सुहिंसा मान्य आहे. त्यामुळेच शैव लोकांच्या मध्ये मांसाहार प्रचंड चालतो आणि स्त्रिया मोक्षाची साधना करू शकतात .


महावीरांनी निर्माण केलेल्या ब्रह्मचर्य केंद्रित अतीअहिंसा केंद्रित पुरुष केंद्रित याच श्रमण परंपरेला फॉलो करत गौतम बुद्धाने आपला धर्म निर्माण केला आणि त्यानेही आपल्या धम्माला पूर्णपणे शैव लोकांच्या पासून किंवा अनारीय लोकांच्या पासून वेगळे काढले पण याची सुरुवात गौतम बुद्धाने केली नव्हती ही सुरुवात भगवान महावीर यांनी केलेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ते फक्त इतके करून थांबले नाहीत त्यांनी स्वतःला भगवान शिवांच्यापासूनही तोडले जैन श्रमण लोकांशी वादही घातला आणि या दोघांच्या मुळेच स्वतःची फक्त स्वतःला युरेशियन मानणारी श्रमण परंपरा सुरू झाली. आधीचे २३ नाथ हे एका अर्थाने साईडलाईन केले गेले आदिनाथ म्हणून वृषभ नाथांना प्रस्थापित केले गेले . यामुळे अनारीय म्हणजेच शैव परंपरा अधिकच वेगळी होत गेली आणि पुढे जाऊन मग ब्राह्मण आणि अ ब्राह्मण असा भेद करण्यापर्यंत ती पोहोचली तेव्हा ब्राह्मण ब्राह्मणे तर वादाचे ते तो सुरू करण्याचे ओझे शैव लोकांच्यावर टाकू नका महात्मा फुले यांच्यावर टाकू नका हे सगळे भेदाभेदाचे उद्योग तुम्हाला सुचतात आम्हाला नाही . याचे कारण स्पष्ट आहे जेव्हा एखादा समुदाय हा स्थलांतर करतो तेव्हा त्याला एका बाजूला स्वतःची ओळख शाबूत ठेवायची असते आणि त्याच वेळेला ते जिथे आलेले असतात तिथली संस्कृती ही आत्मसात करायची असते . अगदी परशियन लोकांनी सुद्धा आपल्याला गणपती आत्मसात केलेला आहे असे दिसेल . खरा प्रॉब्लेम सुरू झाला तो इस्लाम मुळे. इस्लामचा कट्टर पणा इतका होता की त्यांनी कधीही शैव धर्म आणि श्रुती आत्मसात करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला नाही काही अपवाद आहेत पण ते अपवादच आहेत. त्यामानाने ख्रिश्चन जरा जास्त फ्लेक्सिबल आहेत आणि ते लवकरच अधिक भारतीय होतील अधिक शैव होतील असा माझा अंदाज आहे . त्यांना मंदिरे उपलब्ध न करण्याचा जो खटाटोप काही कर्मठ पुरोहित लोकांनी चालवलेला आहे तो त्यांचे भारतीय करण होण्यापासून त्यांना थांबवत आहे इतके सुद्धा ब्राह्मण धर्माला कळत नाही माझे म्हणणे इतकेच आहे की तुम्हाला जे काय करायचे ते तुम्ही तुमच्या ब्राम्हण धर्मात करा आमची सर्व शैव मंदिरे सर्वांसाठी खुली करा . उगाच आमच्या धर्मावर तुमच्या ब्राह्मण धर्माची तत्त्वे लागू करू नका लादू नका . आणि शक्य असेल तर लवकरात लवकर समतावादी व्हा. कारण समता हे मूल्य फक्त आमचेच नाही ते संपूर्ण मानव जातीचे आहे.

खरे तर अनेक ब्राह्मणांनी आता समता स्वीकारलेली आहे पण अचानक हिंदुत्ववादाच्या नावाखाली काही ब्राह्मण अजूनही ब्राह्मणी हिंदुत्व आणू पाहतात आणि त्यांच्यासाठीच म्हणून हे सगळे लिहिले गेलेले आहे 

श्रीधर तिळवे नाईक 



Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय