२०२६ म्युनिसिपल निवडणुकीनंतर २ ओवेसी,सहर शेख आणि नव्या मुस्लिम लीगचा उदय श्रीधर तिळवे नाईक


या निवडणुकीनंतर सर्वाधिक चर्चा ज्या काही मुद्द्यांच्यावर होणार होती त्यामध्ये अचानक उदयाला आलेला मुद्दा हा ओवेसी आणि त्यांची पक्षनीती या अंगाने होता व आहे . 


मुळातच ओवेसी हे ओविसी हे निजामांच्या हैदराबाद संस्थानांमधून आलेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे . सर्व धर्मातल्या निजामवादी लोकांनी अतिशय पद्धतशीरपणे आंध्रप्रदेशात फूट पाडली आणि काँग्रेसने या फुटीला मदत केली. किंबहुना हिंदूंच्या मध्ये जितकी फूट पडेल तितकी ती काँग्रेसला हवी असते. पुन्हा गांधीवादी नववैष्णव धोरणामध्ये मुस्लिमांचे लाड हे मूळ धार्मिक धोरणच असल्याने हे सर्व घडणे अटळ होते मी हे खूपदा सांगितले आहे की गांधी नेहरूंच्या अनेक गोष्टी बरोबर आहेत परंतु इस्लामबाबत दोघेही साफ चुकलेले आहेत आणि आज त्यांची ही चूक दुरुस्त करण्याऐवजी काँग्रेस त्या चुकीने निर्माण केलेल्या चिखलामध्ये अधिकाधिक रुतत चाललेली बुडत चाललेली दिसते परिणाम साफ आहे या चिखलामधूनच कमळ उगवते आहे .


मुस्लिम लीगला फार सुरुवातीपासून हे माहित आहे की ब्राह्मणी हिंदुत्व आणि इस्लामी मुस्लिमत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळेच एक वेळ ब्राह्मणी हिंदुत्ववादाशी युती होऊ शकते परंतु काँग्रेसशी युती होऊ शकत नाही शैव हिंदुत्वाशी युती होऊ शकत नाही . त्यामुळे साहजिकच आपणाला असे दिसते की हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांच्या स्वातंत्र्यपूर्व युती झालेल्या आहेत . मी हे मागे सांगितले होते की आज ना उद्या ब्राह्मणी हिंदुत्व आणि ओवेसी एकत्र येऊ शकतात कारण हे मुस्लिम राजवटीत मध्ययुगीन काळात अनेकदा झालेले आहे. या निवडणुकीमध्ये याचा थोडासा प्रत्यय आलेला आहे कारण अनेक ठिकाणी ओवेसीचा पक्ष निवडून येईल याची काळजी भाजपने घेतलेली आहे थेट युती झाली नाही कारण शैव हिंदुत्ववादी लोकांनी प्रचंड मोठा दबाव टाकला जर बहुजन हिंदुत्व फिरले असते तर ही युती झाली असती पण भाजप मधल्या बहुजन शैव लोकांनी दबाव टाकून हा डाव हाणून पाडला .


इस्लाम हा एक अतिशय व्यवस्थित धूर्तपणाने आखला गेलेला धर्म आहे . मी हे खूपदा मांडलेले आहे की रीलिजन ही मुळात राजकीय प्रणाली असते इस्लाम हा या सर्व राजकीय प्रणालींचा कळस आहे जिच्या केंद्रस्थानी श्रद्धा होती आहे अनुभव होता आणि आहे. साहजिकच अत्यंत टोकाचे व्यवहारिक ज्ञान आणि सत्ता कशी स्थापन करायची याचे कौटिल्य सुद्धा झक मारेल असे कौशल्य हे इस्लामचे फार मोठे भाववैचारिक बळ आहे . १८५० पासून इस्लामला कळाले की आता आपले दिवस सत्ता स्थापन करण्याचे संपलेत आणि मग इस्लामने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढवत नेण्याचा निर्णय घेतला आणि तो पद्धतशीरपणे सर्व जगात अमलात आणला . हे करण्याचे दोन मार्ग होते. एक स्थलांतर आणि दुसरे जन्मदर वाढवणे आज इस्लामची जी काही वाढलेली लोकसंख्या दिसते तिच्या मागे तिचे लोकसंख्या वाढीचे अत्यंत पद्धतशीरपणे आखलेले धोरण आहे . लोकसंख्या हे कायमच श्रद्धेच्या युगातले सत्ताबळ होते शस्त्र होते पण इस्लाम ते १९ व्या शतकापासून वापरायला लागेल अशी कल्पना कधीही पुरोगामी लोकांनी केलेली नव्हती. पुरोगामी लोकांचे हे अज्ञान जगाला आज प्रचंड महागात पडलेले आहे. आणि येत्या पन्नास वर्षात यात काही फरक होईल असे वाटत नाही. कारण माणसाचा मूर्खपणा हा शहाणपणापेक्षा अधिक आयुष्यमान असतो. 


ओवेसीचे हे धोरण स्पष्ट आहे त्यामुळेच ते लोकसंख्या थांबवणार नाहीत उलट ती वाढत कशी राहील याचीच काळजी घेतील आज ना उद्या भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या ५०% च्या वर जाईल याची त्यांना खात्री आहे . त्यामुळे भारतीय संविधानाचा फायदा घेते एक ना एक दिवस एखादी मुस्लिम महिला बुरखा घालून पंतप्रधान होईल अशी स्वप्न ते संपूर्ण मुस्लिम समाजाला देऊ शकतात आणि हे स्वप्न ज्यांना स्वप्न वाटते ते मूर्ख आहेत कारण प्रत्यक्षात हे इस्लामचे स्वप्न आहे आणि ते साकार होऊ शकते .फक्त ओवेसी हे सांगत नाहीत की त्या बुरखेवाल्या बाईमागे असणारे सारे धर्मगुरू हे मुस्लिम धर्मगुरू आणि त्यातही पुरुष धर्मगुरू जास्त असतील. म्हणजेच यदाकदाचीत स्त्रीने डायरेक्ट इस्लामिक राजवट आणली तर आणि ते येऊ शकते कारण लोकशाहीमध्ये स्त्रियांचे वोटिंग प्रचंड महत्त्वाचे आहे हे ओवेसी यांना व्यवस्थित कळलेले साहजिकच ते मुस्लिम पुरुषाची गोष्ट करत नाहीत मुस्लिम स्त्रीची गोष्ट करतात जेणेकरून मुस्लिम स्त्री मतदार हा इस्लामला मतदान करेल आणि इतकेच नव्हे तर इस्लामेतर धर्मातल्या स्त्रियांना हे एका अर्थाने आमंत्रण आहे की आम्ही किती स्त्रियांना समान मानतो . ही मोहम्मद पैगंबर यांची स्ट्रॅटेजी आहे आणि आता ओवेसी हे ती अतिशय उत्कृष्ट पणाने अमलात आणत आहेत. 


याचाच एक पुढचा भाग म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपलीच एक विजयी स्त्री उमेदवार पुढे टाकत मुंब्रा हा हिरवा केला जाईल असा संदेश दिलेला आहे हा संदेश मुस्लिम लोकांना बरोबर कळलेला असणार आणि आता माझा अंदाज चुकला नाही तर उत्तर भारतीय मुसलमान हा पूर्णपणे मुंब्रा आणि मुंब्रा च्या आसपासचा सगळा प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात करेल यासाठी पद्धतशीरपणे काही ना काही प्लॅनिंग तयार असेलच कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ओवेसी हे अतिशय पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून राजकारण खेळत असतात . भाजपला नेहमीच हे दाखवायचे असते की मुस्लिम कसे पाकिस्तान धार्जिणे आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून ओवेसी यांनी मोदींच्या पेक्षा अधिक टीका पाकिस्तानवर केलेली दिसते त्यामुळे तुम्ही त्यांना पाकिस्तान प्रोन म्हणू शकत नाही उलट ते मोदींनाच म्हणतात की यापेक्षा अधिक पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई करा . भविष्यामध्ये प्रत्यक्षामध्ये जर इस्लामिक सत्ता आली तर कदाचित ही इस्लामिक सत्ता पाकिस्तान मधल्या इस्लामिक सत्तेशी हात मिळवणी करेल . अर्थातच त्यावेळेला मात्र धर्म बाजूला काढला जाईल आणि खरोखरच राजकारणामध्ये पाकिस्तानची गरज आहे का असा प्रश्न विचारला जाईल सध्या ओवेसी यांना असे वाटते की पाकिस्तान आपणाला नको कारण ती जबाबदारी जास्त होते खरे सांगायचे तर पाकिस्तान आता कुणालाच नको आहे त्यामुळे पाकिस्तान विरोधात जेवढे बोंबलता येईल तेवढे ते आरोप करत असतात . हे त्यांच्या स्वतःचे फायद्याचे राष्ट्रीय धोरण आहे त्यांना पूर्णपणे हे कळलेले आहे की आता भारत हा गजवा हिंद करायचा आहे आणि ते व्यवस्थित त्या दिशेने पावले टाकत आहेत या संदर्भात यदा कदाचित जर ते यशस्वी झाले तर भविष्यात त्यांचा जिनाप्रमाणेच राष्ट्रसंस्थापक म्हणून गौरव केला जाईल आणि यदाकदाचीत ते अपयशी झाले तर त्यांना कोणी ना कोणीतरी वारस निर्माण होईलच याची त्यांना खात्री आहे . हे सर्व राजकारण कळण्याची भाजपाला अक्कल आहे का हा खरा प्रश्न आहे याचे कारण ब्राह्मणी हिंदुत्वाने अनेकदा मुसलमानांच्या गोड गोड बोलण्याला फसून या देशाला टांगणीला टांगले आहे . अर्थात पुरोगामी लोक मुस्लिम लोकांच्याबद्दल अविश्वास इस्लाम फोबिया वगैरे वगैरे बम्पकगिरी बडबड करत राहतील . हे लोक अप्रत्यक्षरीत्या कायमच मुसलमानांना मदत करत राहिले आणि यांच्यामुळेच या देशाला बांगलादेश आणि पाकिस्तान निर्माण झालेले पहावे लागले आहे .पुरोगामी लोकांचे पाप पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून आपल्यासमोरच उभे राहिले आहे पण या लोकांना ते स्वीकारायचे नाही . आपण काय करून ठेवले आहे हे सुद्धा नतदृष्ट लोकांना कळत नाही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते आता पुन्हा तेच करत आहेत. त्यांच्यापेक्षा गाढवे बरी असे म्हणायची पाळी आता आलेली आहे. ओवेसी हे सर्व ओळखून आहेत आणि ते बरोबर पुरोगामी लोकांचे विचार स्वतःच्या इस्लामच्या प्रचारासाठी वापरत आहेत . हे काही आजचे नाही इस्लाम हे नेहमीच करत असतो. मुळातच इस्लाम धर्मात असे करा असेच सांगितलेले आहे .त्यामुळे इस्लामिक राजवट जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत उदारमत वाद , पुरोगामीवाद आणि संविधान वाद आपल्याला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने वापरत राहायचा असे हे मुत्सद्दी धोरण आहे. 


या पुढची स्टेप अतिशय स्पष्ट आहे ती म्हणजे भारतामध्येच हळूहळू काही इलाके मुस्लिम लोकसंख्येने व्यापत त्यांना मुस्लिम करणे आणि तिथून मग सगळा इस्लामचा कारभार पसरवत नेणे . व्याप्ती वाढवत नेणे. भारतामध्ये जेव्हा इस्लाम आला तेव्हा त्यांची संख्या धड दोन हजार सुद्धा नव्हती . पण आज या घडीला मुस्लिम लोकांची संख्या जवळ जवळ ६०- ७०करोड झालेली आहे . हे पुन्हा एकदा करणे सहज शक्य आहे असे त्यांना वाटते. एकेकाळी बांगलादेश आणि पाकिस्तान लोकसंख्येच्या जीवावर आपल्या नावावर करून झालेले आहेत अफगाणिस्तान पूर्वीच गेला होता आता फक्त आत्ताचा हिंदू भारत राहिलेला आहे तो तसा केला की संपूर्ण हिंदुस्तान मोहीम सफल होईल. खरे तर सर्व धोरण स्पष्ट आहे प्रश्न असा आहे की मुकाबला कसा करणार ? ब्राह्मणी हिंदुत्व हे स्वतःपुरतेच इतके धूर्त असते की ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघते त्यामुळे आज ना उद्या ते इस्लामशी युती केल्याशिवाय राहणार नाही . ज्या लोकांना स्वतःच्या पोरी सुद्धा इस्लाम पासून वाचवता येत नाहीत ते लोक काय हिंदूंना वाचवणार ? असा प्रश्न त्यामुळेच अनेक अँटीजिहादी लोक विचारत असतात . भाजपच्या अनेक राजकारणी लोकांना या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही कारण त्यांच्या पक्षात हे सातत्याने घडते आहे अगदी शत्रुघन सिन्हा ते अलीकडेच सुब्रमण्यम स्वामी असे सर्व यामध्ये तोंडघशी पडलेले दिसतात . शत्रुघन सिन्हा यांनी आपल्या बंगल्याचे नाव रामायण असे ठेवलेले बदलावे आणि कुठले तरी मुस्लिम नाव ठेवावे अशी सूचना त्यामुळेच वारंवार मीडियावर केली गेली होती इतका असंतोष या संदर्भात आहे . आता अर्थातच पुरोगामी लोक म्हणतात की हा त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे . माझ्या मते हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न असता जर का हे लोक सेक्युलर असते . हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत होते आणि मग हे घडले आहे आणि हे घडल्यानंतर यांचा हिंदुत्ववाद उडत गेलेला आहे हे शत्रुघन सेना यांनी सिद्ध केलेले आहे. जावयाला हिंदू करून घेण्यापेक्षा आपलीच पोरगी मुस्लिम होणार असेल तर कसला हिंदुत्ववाद आणि कसल्या अँटीजीहादी घोषणा ? खरे तर आपल्या मुली आपल्याला तोंडघशी का पाडत आहेत हेच एकदा या सर्व नेत्यांनी स्वतःला विचारले पाहिजे . या लग्नाचा परिणाम म्हणून भविष्यात शत्रुघन सेना पराभूत झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही . हे मी सांगतो आहे कारण विस्ताराचे जे धोरण मोगल लोकांनी आखून दिले होते तेच पुढे कंटिन्यू झालेले आहे . अगदी जीना सुद्धा हे करून बसलेले आहेत . पुरोगामी लोकांना अशा गोष्टी दिसत नाहीत त्यामुळे त्यांना सोडून द्या पण हिंदुत्ववादी लोकांना जर का त्यांच्या घरातच हे धोरण दिसत नसेल तर मग कठीण आहे . 


म्हणजेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त धर्मांतर त्या धर्मांतराचा एक शस्त्रासारखा भाग म्हणून लवजिहाद आणि राजकीय पातळीवर भारतीय लोकशाहीचा जास्तीत जास्त फायदा घेणे भारतातल्या समाजकारणाचा जास्तीत जास्त फायदा घेणे असे हे धोरण आहे अगदी मेरा नायर यांचा मुलगा अतिशय तथाकथित सेक्युलर वातावरणात वाढला तरी अंतिमता मुस्लिमच असतो हे लक्षात घेतले पाहिजे. लोकसंख्या वाढ करून प्रदेश ताब्यात घेणे हे धोरण मुस्लिम लीगने अतिशय यशस्वीपणे राबवून दाखवले होते . आणि त्यातूनच बांगलादेश पाकिस्तान पदरात पाडून घेतला होता . भारताचा तिसरा भाग हा कसा पदरात पाडून घ्यायचा हा खरा इस्लाम पुढचा प्रश्न आहे . पूर्वीचा निजाम आणि आत्ताचा महाराष्ट्र अशी काही आखणी करता येईल का असा हा डावपेच विचार आहे . ओवीसी धूर्तपणाने राजकारण खेळत आहेत.  


यापुढचा अर्थातच प्रश्न आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या पुरोगामी लोकांचे यामध्ये होणारे नुकसान काय असेल ? त्यांची स्वतःची मुलगी ख्रिश्चन धर्मात लग्न करून गेलेली आहे आणि माझा अंदाज चुकला नाहीतर त्यामुळे ते पुढची निवडणूक हारतील . कारण मुळातच आता त्यांची हक्काची मुस्लिम मते ही ओवेसी यांच्याकडे गेलेली आहेत . हे कसे घडले हे जितेंद्र आव्हाड यांना कळले नाही अर्थातच पुरोगामी लोकांचा हा नेहमीचा झालेला पोपट आहे. महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या नाका खालून मुस्लिम लीगने पाकिस्तान बांगलादेश काढून घेतला गेला आणि तरी सुद्धा त्यांनी हे कळले नाही . बरे हे झाल्यानंतर तरी यांना अक्कल यायला हवी होती परंतु गांधी नेहरू यांना याबाबतीत काडीची अक्कल आली नाही. याचे कारण इस्लाम बद्दलचे या लोकांचे आंधळे प्रेम जे आता विरासत म्हणून जितेंद्र आव्हाड यांना लाभले होते . 


याचा फायदा भाजपला होतो आहे परंतु भाजप तरी याबाबतीत गांधी नेहरूंच्या पेक्षा काही वेगळे वागणार आहे का हा खरा प्रश्न आहे . याबाबतीत कसलीही ठाम खातरी मला वाटत नाही . आणि यामागे हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांची युती , हिंदू कोड बिलाबाबत झालेला ब्राह्मणी हस्तक्षेप , अजूनही बंच ऑफ थॉट या ग्रंथाचा होत असलेला हिंदुत्व मध्ये गौरव , अलीकडे मनुस्मृतीचा पुन्हा एकदा सुरू झालेला गवगवा, वर्ण व्यवस्थेचे कठोर पालन करणाऱ्या श्रीरामांचा सतत चाललेला जय जयकार , अटल बिहारी वाजपेयी यांनी मुस्लिमांना दिलेल्या सवलती विशेषता हज यात्रा, पाकिस्तान विरोधात राबवताना भारतातील स्वतःच्या पक्षातील मुस्लिम लोकांना डावलून ओवेसी यांचा केलेला समावेश , मोदी यांनी आणलेल्या युजीसी act बाबत अलीकडे सर्व वैष्णववाद्यांनी व्यवस्थितपणे मोदींच्या विरोधात चालवलेली मोहीम हे सर्व जे काही सांगते आहे ते फारसे चांगले नाही. माझा स्वतःचा अंदाज चुकला नाही तर यापुढे मुस्लिम लोकांच्या पुढे एक सशक्त पर्याय आलेला आहे आणि तो म्हणजे एम आय एम ! नवीन मुस्लिम नेते हे आता ओवेसी यांच्या बाजूनेच जातील अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. 


नेहमीप्रमाणे पुरोगामी बेशुद्ध आहेत आणि ज्यांच्यावर या संदर्भात जबाबदारी आहे ते हिंदुत्ववादी पुरेसे जागे नाहीत . त्यातच भरीत भर म्हणून नव बौद्ध लोकांनी मुस्लिम लीगच्या बाजूने मुस्लिम लोकांच्या बाजूने उभे राहणे स्वीकारायला सुरुवात केले आहे . 


मुस्लिमांच्या प्रश्नावरून आज ना उद्या नव बौद्ध समाजामध्ये पूर्णपणे दोन गट पडणे अटळ आहे एका गटाला मुस्लिम धर्म आणि ओवेसी आकर्षित करत राहील तर दुसऱ्या गटाला तो शत्रू वाटत राहून ते लोक हिंदुत्ववादाला मिळत राहतील. 


या सगळ्यावर उपाय एकच आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढी नियंत्रणाचा कायदा जर हा कायदा केला गेला नाही तर मुस्लिम लोकसंख्या वाढत जाणार आणि आज ना उद्या भारताची आणखी एक फाळणी होऊन आणखी एक मुस्लिम देश तयार होईल किंवा अख्खा भारतच मुस्लिम होईल अनेकांना हे आता अशक्य वाटते कारण हे लोक मूर्ख आहेत . काय झाले ते सुद्धा पाहण्याची या लोकांची तयारी नाही पण जे वास्तववादी आहेत त्यांना इस्लाम कसा काम करतो हे व्यवस्थित माहिती असते आणि इस्लाम खरोखरच व्यवस्थित काम करत आहे. सहर शेख ही फक्त त्याची झलक आहे .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय