टेस्ट क्रिकेट आणि पुरोगामी वाद श्रीधर तिळवे नाईक
जगातली अधिकृत पहिली टेस्ट मॅच ही १८७७ मधल्या मार्च महिन्यात मेलबोन स्टेडियम वर कम्बाईन ऑस्ट्रेलियन इलेव्हन आणि जेम्स लिली वाईट इलेव्हन या दोन संघात खेळली गेली म्हणजेच आता टेस्ट क्रिकेट १४९ वर्षे पूर्ण करून १५० व्या वर्षात पदार्पण करणार आहे साहजिकच त्याचे सेलिब्रेशन आता हळूहळू सुरू होईल .
पुरोगामी क्रिकेटचा हा एका अर्थाने उदय होता यामध्ये वेळाची मर्यादा नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना डॉन ब्रॅडमनचे सगळे विक्रम हे प्रामुख्याने टाईमलेस क्रिकेटचे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पण त्याचबरोबर हेही खरे की हेल्मेट नव्हते आणि मुबलक बॉडी लाईन गोलंदाजी करण्याची पूर्णपणे मुभा होती त्यामुळे साहजिकच फलंदाज मेला तरी चालेल परंतु त्याला जबाबदार गोलंदाज नव्हता. त्यामुळे हे टेस्ट क्रिकेट शौर्याचे सुद्धा होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे टेस्ट क्रिकेट कधीकधी 10 किंवा 12 दिवस पण चाले. मुळातच क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये त्या काळात औद्योगिकता उदयाला आली असली तरी क्रिकेट खेळायला आणि बघायला भरपूर वेळ होता. मात्र हळूहळू तो आता कमी व्हायला लागला आणि टाईम लेस टेस्ट क्रिकेट परवडणारे राहिले नाही.
अर्थात 1939 नंतर क्रिकेटला वळण घ्यावे लागले आणि त्यातूनच आधुनिक टेस्ट क्रिकेटचा जन्म होऊ लागला.
पुढे आधुनिकतेने टाईम बाउंड टेस्ट क्रिकेट सुरू केले. मुख्य म्हणजे हळूहळू मैदान आठ इंची किंवा नऊ इंची वगैरे वगैरे सगळे वाद विवाद हळूहळू संपुष्टात यायला सुरुवात झाली आणि आधुनिकतेची एक संरचना क्रिकेटमध्ये उदयाला आली. आणि आधुनिक क्रिकेटने सर्वात प्रथम पाच दिवसाची टेस्ट हे मॉडेल फिक्स केले. आज सुद्धा सचिन तेंडुलकर सारख्या लोकांच्या मते टेस्ट क्रिकेट हेच खरे क्रिकेट होय याचे कारण खऱ्या अर्थाने क्रिकेट हा खेळ शेतीशी निगडित आहे आणि तोच प्रामुख्याने एकाच वेळेला संयम शिकवतो आणि त्याच वेळेला अत्यंत सातत्याने लागवड कशी करत राहायची त्याची प्रेरणा देतो. सतत बॉलिंग करणे किंवा सतत बॅटिंग करणे किंवा सतत फील्डिंग करणे हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असे ट्रेनिंग आहे त्यामुळे साहजिकच भारतासारख्या देशांमध्ये अगदी गावात सुद्धा क्रिकेट पसरले याचे कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे दुर्दैवाने आपल्याकडच्या अनेक तथाकथित पुरोगामी लोकांना हे कळले नाही.
शेतीची कामे संपल्यानंतर काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये इंग्लंड सारख्या कंट्री मध्ये होता आणि तो प्रश्न प्रामुख्याने क्रिकेटने सोडवला हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
हळूहळू १९४० नंतर औद्योगिक युग प्रस्थापित झाले आणि त्याने नंतर दुसऱ्या महायुद्धाला सुद्धा जन्म दिला पण ते युद्ध संपल्यानंतर मात्र गोष्टी बदलायला लागल्या आणि आधुनिकतेला अधिक सभ्य होणे आवश्यक आहे हे स्पष्ट झाले आणि त्यातूनच १९४८ यावर्षी इंग्लंडमध्ये ज्याला आज आपण पाच दिवसाचे टेस्ट क्रिकेट म्हणतो ते उदयाला आले.
आठ मार्च १९५५ या दिवशी पाच दिवसाचे क्रिकेट हे अधिकृत क्रिकेट म्हणून आयसीसी ने जाहीर केले . खरे तर हा सगळा विकास आधीच व्हायला हवा पण मुळातच हे सर्व इंग्लंड सारख्या परंपरेला घट्ट चिट चिटकून राहणाऱ्या देशातून जन्माला आलेले असल्याने क्रिकेटमधला सर्व विकास हा मंद गतीने झाला याला खरा छेद हा नंतर ऑस्ट्रेलियाकडून केरी पॅकर्स यांच्याकडून आला आणि ज्याला आज आपण उत्तराधुनिक क्रिकेट म्हणतो ते 50 50 षटकाचे क्रिकेट सुरुवातीला 60 60 म्हणून उदयाला आले . 1990 नंतर ज्याला आज आपण 20-20 म्हणतो ते चौथ्या नवतेचे क्रिकेट प्रस्थापित झाले.
आज पुरोगामी वाद हा कितपत काल सुसंगत आहे असा प्रश्न निर्माण झाला असल्याने साहजिकच पुरोगामी आणि आधुनिक टेस्ट क्रिकेट किती कालसंगत आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सचिन तेंडुलकर हा या आधुनिक क्रिकेट मधला शेवटचा जबरदस्त भारतीय खेळाडू होता याचे सर्वात मोठे कारण तो बॉलर पण उत्कृष्ट आहे. किंबहुना लारा हा त्याचा खरा प्रतिस्पर्धी आणि तो बॉलिंग मध्ये फारसा प्रभावी नाही या कालखंडातला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा नेहमीच ज्या कॅलीस होता.
आता टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्वीसारखा प्राण राहिला नाही ही वस्तुस्थिती ! काळानुरूप सर्वच खेळामध्ये बदल होत जातात मुळातच शेतीसाठी लागणारा संयम हा औद्योगिक क्षेत्रामध्ये कालबाह्य होत चालला आहे. लागवडीपेक्षा सध्या आधुनिक उत्पादनावर जास्त भर आहे आणि अलीकडे तर उत्पादनापेक्षा वितरण आणि जाहिरात बाजी व चिन्हसृष्टीय सादरीकरण हे महत्त्वाचे ठरत आहे . पण तरीही मला असे वाटते की टेस्ट क्रिकेट पूर्णपणे नाहीसे नजीकच्या काळात होणार नाही मात्र पूर्वीच्या काळामध्ये जी टेस्ट क्रिकेटची क्रेझ होती ती आता राहिली नाही ही वस्तुस्थिती !
एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे खेळाकडे खेळ म्हणून पाहणे आवश्यक आहे हा पुरोगामी विचार भारतामध्ये तरी क्रिकेटमुळे जास्त प्रचलित झाला अन्यथा इतर खेळ याबाबतीत फारसे प्रभावी ठरले नव्हते त्यामुळे भारतात तरी टेस्ट क्रिकेटचे महत्व प्रचंड आहे. त्या खालोखाल कुस्ती आणि कबड्डी ! पंचवार्षिक योजना आणि पाच दिवसाचे क्रिकेट हे एका अर्थाने समांतर धावतात. त्यांनी पुरोगामीवादाचे आणि पुरोगामी खेळाचे फाउंडेशन टाकले ही वस्तुस्थिती त्यांचे श्रेय अमान्य करून कोणालाही पुढे जाता येणार नाही. अर्थातच नेहरू यांच्या कालखंडामध्ये पुरोगामी वादाचा प्रतिनिधी म्हणून मन्सूर अली खान पतोडी कॅप्टन झाला खरा पण नंतर याच आंधळेपणात मोहम्मद अझरुद्दीन सारखा मनुष्य काँग्रेसने पुढे आणला ही वस्तुस्थिती ! क्रिकेटमधली ही वस्तुस्थिती पुढे भारतीय राजकारणातली वस्तुस्थिती बनली . मन्सूर अली खान पत्तोडी हा खरोखर लायक माणूस होता त्यामुळे त्या काळामध्ये पुरोगामी वाद सजग होता असे म्हणता येते पण हा सजगपणा नंतर राहिला असे दिसत नाही भारतात पाच दिवसाचे क्रिकेट पराभूत झाले नाही तर पुरोगामी वाद सुद्धा पराभूत झाला आणि त्यामध्ये त्यांचा स्वतःचाच आंधळेपणा महत्त्वाचा वाटा उचलतो हे लक्षात घेतले पाहिजे. मोहम्मद अझरुद्दीन हा या आंधळेपणाचे चालते बोलते वॉकिंग टॉकिंग उदाहरण आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment