सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग २
श्रीधर तिळवे नाईक
सौष्ठव सुरु करण्याआधीच अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना निम्म्याहून अधिक लिहून झाली होती आणि लिखाण चालू होते निर्वस्तुवादी कविता किंवा बांधकाम चालू आहे उत्तरार्ध सारख्या कविता लिहून झाल्या होत्या आणि लिखाण सुरु होते आणि हे सर्व लिहीत असतांनाच मार्गी म्हणजे काय आणि देशी म्हणजे काय हे प्रश्न होते पॉप्युलर प्रकाशनाने कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चेची धुळवड कोल्हापुरात उडाली होती आणि आमचे मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी ह्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरे नेमाडेंनी दिली कि नाही ह्याची चर्चा मार्क्सवाद्यांच्यात चालू होती ह्या चर्चेचे पुढे पुस्तक झाले खरे पण त्याने मार्गी काय आणि देशी काय हे पुरेसे स्पष्ट न होताच नेमाडेंना निर्विवाद विजय बहाल करण्यात आला होता आणि तो गो मा पवार आणि म द हातकणंगलेकर ह्यांनी बहाल केला होता माझ्या मते ह्या चर्चेत नेमाडेंना कुणी नीट क्रॉस एक्झाम केलेच नाही सर्वात वाईट म्हणजे ह्या चर्चासत्रानंतर काही वर्षातच मार्क्सवाद्यांनीच नेमाडेंच्यापुढे गुडघे टेकले आणि पुढे दलितांनीही ! आणि त्याची सुरवात ह्या चर्चासत्रात झाली होती . साहजिकच लोकवाङ्मयगृहातून देशीवादाला प्रोत्साहनच मिळाले आणि लढाई पूर्ण संपली. ह्याला जबाबदार रशियातील मार्क्सवादाचा अस्त होता वास्तविक ह्या अस्ताची चाहूल आधीच दिसत होती (माझा डेकॅथलॉन रिअल हा कवितासंग्रह ह्या काळातल्या मार्क्सवादाच्या आणि परिवर्तवाद्यांच्या पडझडीचा संग्रह आहे ) पण भारतीय कम्युनिस्ट झोपलेलेच राहिले आणि प्रत्यक्षात जेव्हा हे घडले तेव्हा तो शॉक होता
ह्या सर्व चर्चासत्रात नेमाडे ह्यांची एक स्ट्रॅटेजी होती जे मराठीने विकसित केले आहे ते देशी आणि जे परदेशी वा उर्दू संस्कृत आहे ते उधार घेतले कि त्याचे देशीकरणाच्या नावाखाली समर्थन ! ह्या स्ट्रॅटेजीच्या आधारे जगातल्या प्रत्येक गोष्टीला देशी म्हणता येते पण जेव्हा देशीकरण होते तेव्हा ज्याचे देशीकरण होते त्याचे काय? ते तर मार्गीच असते ना कि तुम्ही देशीकरण केले कि ते देशी होते ? म्हणजे मुक्तछंद तम्ही आपनवला कि तो देशी होतो का ?किंवा गझल किंवा सॉनेट ? किंवा अस्तित्ववाद ?किंवा देशीवाद ?किंवा टूथब्रशपासून प्लास्टिकपर्यंत ? सिमेंटपासून टीव्हीपर्यंत ?किंवा कमोडपासून ऍलोपथीपर्यंत ? किंवा कॉम्प्युटरपासून फेसबुकपर्यंत ? सगळं देशी होतं ? केवळ तुम्ही म्हणता म्हणून ? तुमच्या रोजच्या जगण्यातल्या नव्वद टक्के वस्तू देशीकरण करून येत असतील तर तुमची संस्कृती कितपत देशी ? फेसबुकवर मराठीत लिहिले म्हणून फेसबुक देशी ? आणि असेल तर कितपत देशी ?आणि इंग्रजीचे काय ? इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या घटनेचे काय ? कि घटनेचे इंग्लिश देशी ? तुम्ही म्हणता म्हणून ?
बरं तुमची महान टिकलेली देशी वस्तू कोणती तर वर्णव्यवस्था , जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता ! तिला आम्ही स्वीकारायचे काय ? आणि स्वीकारून काय करायचे ? जगभर निर्यात करायची ?
वस्तुस्थिती अशी आहे कि धम्म आणि धर्म सोडले तर विज्ञान , तंत्रज्ञान आणि आता चिन्हविज्ञान ह्यातील किमान ९०% भाग देशी संस्कृतीतला नाही आहे आणि तो स्वीकारावा लागतो म्हणजेच मार्गीपणा आणि मार्गीयता स्वीकारावी लागते . मार्गीकरण स्वीकारावे लागते आणि म्हणुनच मार्गी आणि देशी ह्यांच्यातले जे जे उत्तम आहे जागतिक आणि वैज्ञानिक कसोटीला उतरणारे आहे त्यांचा सन्मान करून त्यांच्याविषयी सम्यक विवेक बाळगुन त्याला आपल्या जगण्यात स्वीकारावे लागते आणि कलेत त्याचा अविष्कार घडवावा लागतो हा सम्यक विवेक हे सम्यक भान म्हणजे चौथी नवता !
श्रीधर तिळवे नाईक
*********************************************************
सौष्ठवला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख तिसरा श्रीधर तिळवे नाईक
सतीश तांबे ह्यांनी मी चौथी नवता इथे मांडावी अशी सूचना केली होती त्यांच्या सूचनेचा मान ठेऊन इथे जास्तीत जास्त सुलभ भाषेत चौथी नवता म्हणजे काय ते मांडत आहे .
सौष्ठवची भूमिका काय होती ?
१ सौष्ठवच्या मते मानवी जीवनात चौथी नवता ही अटळ गोष्ट आहे आणि तिचे मूळ पाश्चात्य देशात आधीच घातले गेले होते पाश्च्यात्य देशातील सर्व उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींनी ह्याचे बीज घातले होते जसे ह्या उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींचे मूळ आधीच्या मॉडर्न मुव्हमेंटमध्ये होते भारतातील देशीवादी चळवळी आणि सबाल्टर्न चळवळी ह्या मात्र परंपरा आणि आधुनिकतेतच घुटमळत राहिल्याने ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जाणाऱ्या ठरल्या आज ना उद्या ह्या चळवळी भारतातल्या हिंदुत्ववादी आणि मुसलमानवादी चळवळींना मदत करणार आहेत आणि ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्ववाद आणि शरीयतवाद ह्यांचे रूप घेणार आहे . म्हणूनच देशीवादाचा पाडाव करणे हे अत्यंत आवश्यक कार्य आहे
२ देशीवाद स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांचे समर्थन करतो त्यामुळे सर्वांनी विशेषतः ओबीसी , स्त्रिया, दलित आणि आदिवासी ह्या सर्वांनी त्याचा पाडावंच केला पाहिजे
३ शिव , बुद्ध ,महावीर ,चार्वाक , मौर्य , सातवाहन , गुप्त , वर्धन , बसवेश्वर , शिवाजी महाराज , प्रथम बाजीराव , यशवंतराव होळकर , रामकृष्ण परमहंस , विवेकानंद , शाहू महाराज , फुले , नारायण गुरु , पेरियार , आंबेडकर , महात्मा गांधी आणि बिरसा मुंडा ह्यांची पूजा करण्याऐवजी त्यांची तार्किक चिकित्सा करून परिवर्तनवादी विचार नव्या काळाला अनुरूप पद्धतीने घडवला पाहिजे . वेळप्रसंगी त्यांचे जिथे चुकले आहे ते खुल्या दिलाने मान्य करून ते कसे दुरुस्त करता येईल ते पाहिले पाहिजे .
४ . लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो
५मानवी समुदायता ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे स्मार्टफोन , टॅब्लेट्स , फेसबुक वैग्रे आत्ताच्या सेमिऑडिटीज ! चिन्हसृष्टी सर्वच कमोडिटीजचे रूपांतर सेमिऑडिटीजमध्ये करत चालली आहे आणि तिचे अंतिम सेमिऑडिटींक रूप मानवी क्लोन आणि क्लोनड ब्रह्माण्ड आहे जे साध्य करण्याच्या दिशेने तिचे अपडेटीकरण होत चालले आहे
मराठी व भारतीय कला व साहित्यविश्वाला ह्याचे भान देणे हे गरजेचे आहे आणि सौष्ठव ह्या भानप्रक्रियेला वेगवान करण्यासाठी जन्माला घातले आहे
६ भारतीय इतिहास हा आतापर्यंत फक्त वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव , हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , पुरुषी , युरोपियन , अमेरिकन पद्धतीने लिहिला गेला असून तो आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल .
७ जागतिकीकरण समजून घ्यायचे असेल तर चिन्हसृष्टीकरण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे समजून घ्यायचे असेल तर मूलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे जागतिकीकरणामुळे चिन्हसृष्टी अस्तित्वात आलेली नसून चिन्हसृष्टीकरणामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले आहे . नव्वदोत्तरी पिढी जागतिकरणाचा ढोल पिटून मूळ सत्याचा अपलाप करत आहे . कॉलनीजमुळे व्यापारवाद (मर्चंटालिझम ) अस्तित्वात आला न्हवता तर व्यापारवादामुळे कॉलनीज अस्तित्वात आल्या त्याचप्रमाणे पुढे ह्या व्यापारवादाचे रूपांतर औद्योगिकवादात (इंडस्ट्रियालिझम ) झाल्यावर कॉलनीवादाचे (कलोनियालिझम ) रूपांतर साम्राज्यवादात झाले . ह्याचप्रमाणे चिन्हसृष्टिवादामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले असून त्याचा स्वीकार आपण विवेकाने आणि आपल्या टर्म्स आणि कण्डिशनवर केला पाहिजे . जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे .
८ चिन्हसृष्टीकरणाला विरोध करणे आणि चिन्हसृष्टीकरणात माणसाची झालेली घुसमट व्यक्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आधुनिक आणि उत्तराधुनिक कलेने औद्योगिक आणि उत्तरौद्योगिक जगातील माणसाची झालेली घुसमट आणि आनंदता व्यक्त केली चौथी नवता हीही चिन्हसृष्टीकरणातला नवा चिन्हमानव त्याची संवेदनशीलता , शरीरशिलता , बुद्धीशीलता वैग्रे आपल्या साहित्यात व कलेत सादर करते
श्रीधर तिळवे नाईक
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
ड्रॅगन आता खेळणे म्हणून मराठी घरात दाखल झालेला आहेच
श्रीधर
अशोक बाबर म्हणतात
Sridhar seems to me a staunch desivadi.
अशोक बाबर म्हणतात
आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल . This is desivad.मानवी समुदायता ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे. This is desivadi ideology.
श्रीधर तिळवे म्हणतात
Ashok Baabar हे तरं वैदिक करतात तसे झाले त्यांना जसे सगळे वेदात सापडते तसे तुम्हाला देशीवादात सगळं सापडायला लागलं काय ? आमचे मुद्दे ढापून त्यांना देशीवादाचा मुलामा चढवणे अप्रतिमच !
अशोक बाबर म्हणतात
Back to Buddha and Back to Basavanna are two most influential revolutions in the 20th and 21nd century, respectively. The first is 20th century Desivad and the second is 21nd century Desivad. Going back to Buddha is the first NAWATA and Going back to Basavanna is the second NAWATA.
सतीश तांबे म्हणतात
Shridhar Tilve माझ्या कोऱ्या पाटीला ह्यातील बरेचसे मुद्दे कळणेच शक्य नाही आणि fiction लिहिताना आजवर त्यामुळे काही अडले आहे असेही वाटत नाही .
तरीही >> लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो << ह्यातील पहिले वाक्य मला महत्वाचे वाटते . हे मेट्रो / ग्लोबल जाणिवेला जवळचे आहे , जिची मराठीमध्ये रीतसर गळचेपी सुरु आहे . तसेच >> जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे . << हे भान देखील महत्वाचे आहे . हे २ मुद्दे लक्षात घेता चवथी नवता , हि रुजणे आवश्यक आहे. बाकी देशीवाद / वास्तववाद हे ढवळेपवळे नांगरु देत त्यांच्या आसपासचं रान ! तो रवंथ दात घशात जाईपर्यंत सुरूच राहील . राहू दे .
आता पुन्हा सवड मिळेल तेव्हा , वाचकांच्या आकलनासाठी ,>> चिन्हसृष्टीकरण<< ही संज्ञा जरा खुलासेवार सांगा . हा त्रास सुरूच राहील. कंटाळा येईल तेव्हा खुश्शाल सोडून द्या !
श्रीधर तिळवे म्हणतात
तुमच्यामुळे ही संधी मिळाली धन्यवाद चिन्हसृष्टीकरणाबद्दल प्रयत्न करतो
प्रणव सखदेव म्हणतात
<लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो> हे मला मनोमन पटते, आणि ही माझी पहिल्यापासूनची 'भूमिका' आहे.
श्रीधर तिळवे म्हणतात
tumchya pidhila janmapasun jagtikikaran bhetle tyacha to aprihary fayda ahe . Amhala deshiwadashi fight karun hi bhumika milhwawi lagli तुमच्या पिढीला जन्मापासून जागतिकीकरण भेटले त्याचा तो अपरिहार्य फायदा आहे आम्हाला देशी वादाशी फाईट करून ही भूमिका मिळवावी लागली
अशोक बाबर म्हणतात
Sridhar and Nitin, this is for you only. The anti-Nemadian critics must learn Marathi first and then English. Nativism is not desivad and desivad is not nativism. For them Montessorian method would be helpful. Nativism may be translated as SWADESIVAD but never as DESIVAD. A good translator might help such critics.
श्रीधर तिळवे म्हणतात
Ashok Baabar It's perfectly suitable for you because Vaidik always use this linguistic strategy when they don't have any point to debate.
अशोक बाबर म्हणतात
I think Ambedkar is true desivadi, more than Gandhi. If Ambedkar, according to you, is vaidik, I have no hesitation in calling me vaidik.
श्रीधर तिळवे म्हणतात
Ashok Baabar Ambedkar was neither Vaidik nor Deshivadi. Calling him Deshivadi is strategic Hindu play and I'm not getting trapped in it. He was the only ideological thinker who perfectly balanced Margi Deshi Poti and Jamati aspects of Indian society. I am trying same in new biosignoversal context.
अशोक बाबर म्हणतात
Sridhar, Its not any kind of trap or politics. As I think you and Nitin are honest and unbiased critics, I am writing it plainly. Initially, I was Marxist, then became Gandhian and now Ambedkarite. I may be wrong in this process but its a fact. Please refer my books: Desivad, Ambedkarvad, Ambedkarite Nativism, Indian Nativism and Two versions of nativism available on Flipkart; otherwise, I will send you if you require. No need to pay. Sridhar, I know that Ambedkar was never Vaidik. According to Ambedkar, ‘ historically there have been three India: Brahman India, Buddhist India and Hindu India.Buddha is the first Desivadi. Those who live in Brahman India are Swadesivadi, in Buddhist India are desivadi and in Hindu India are Videsivadi. In above mentioned all my books I have explained everything. I believe that only Nitin and you can develop desivad in Ambedkarite way or any other way. But we will never be the victim of Brahman India and Hindu India. Friends, sorry, I am writing this in agony and typing this post with my single finger painstakingly because I can not type like you in Marathi as well as in English. I beg your pardon, if it is not possible to write again. It is also killing time for me. I am busy with writing a book Ambedkarite Literary Theory.
श्रीधर तिळवे म्हणतात
This way you can call everybody Deshivadi. It's becoming laughable.
अशोक बाबर म्हणतात
According to Ambedkarite theory, as propounded in Pakistan or the Partition of India, the global village, or rightly be called the global country, may be possible after the federation of the countries across the world when the peoples of the world live together as citizens of one country and under one constitution. Moreover, all these distinct nations have been content to live together in one country under one constitution without fear of losing their nationality and their distinctive cultures.
श्रीधर तिळवे म्हणतात
Ashok Bababr This is exactly my point of view and it's supported by almost every indian thinker because Indian Ethos truly believes that humanity is one and earth is one family. Unfortunately brahmanism , vaishnavism and hinduism used it to fulfill their exploitation and so called deshi caste system and untouchablity ruined everything which is related with HUMANITY.. Nemade is consistenty supporting horizontal axis of caste system and Deshivad ultimately leads society into PRESERVATION OF CASTE SYSTEM .Nemade's romantic vision about ALUTEDAR AND BALUTEDAR is nothing but a revival of ancient deshi exploitation of ALUTEDAR AND BALUTEDAR by high class kshatriy and CHAUTHI NAVTA is against it . CHAUTHI NAVTA fully supports O B C LITERATURE MOVEMENT which is fighting against this exploitation and emerging as a new movement from 1990 because like dalit and feminist literature this movement along with ADIVASI MOVEMENT which is JAMATI need support from all kind of intellectuals .Ambedkar was MARGI also because he also believes GLOBAL VISION and he knew perfectly how to balance it with DESHI, POTI AND JAMATI. I am really glad about your growth because I have seen your initial stage but it seems that your attachment and obsessiveness about DESHIWAD is still there but my dear friend one day or other you will realize the trap of DESHIVAD AND IT'S ULTIMATE INTENTIONS. Thanks for response.
श्रीधर तिळवे नाईक
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग ३
श्रीधर तिळवे नाईक
माझे , चौथ्या नवतेचे आणि सौष्ठवचे सर्वात मोठे सुदैव (किंवा दुर्देवं ) कोणतं ?
कुठल्याही नवतेला जशी पूर्वी युरोप अमेरिकेची मॉडेल्स उपलब्ध होती म्हणजे मराठी प्रबोधनात्मक नवतेपुढे थॉमस मान , फ्रान्सिस बेकन (ह्याचा खरेतर आधिक प्रभाव पडायला हवा होता )वैग्रेंची रॅशनल विचारसरणी किंवा रोमँटिक नवतेपुढे व्हॉल्टेर , स्पिनींझो ह्यांची रोमँटिक विचारसरणी आणि शेक्सपिअर बायनेर शेली गौथे ह्यांच्या कविता व साहित्य वा आधुनिक नवतेपुढे बॉदलेर , रिल्के , इलियट ह्यांचे साहित्य किंवा देशीवाद्यांपुढे अमेरिकन नेटिविस्ट व फ्रेंचमधील व लॅटिन अमेरिकेमधील साहित्य तसा कोणताही आयता साचा माझ्यापुढे न्हवता त्यामुळे शैवाचार्य म्हणून लाभलेल्या शैव परंपरेचं उत्खनन करत बौद्ध जैन ते थेट जे कृष्णमूर्ती ओशो , गांधी आंबेडकर ह्यांच्यापर्यंत उपसाउपशी करत आणि स्वानुभवांना प्रमाण मानत वाटचाल करावी लागणे अटळ होते अमेरिकन व युरोपिअन उत्तराधुनिक साचे चौथ्या नवतेसाठी कामाचे न्हवते पण त्यातून काही नव्या पाऊलखुणा सापडण्याचा शक्यता होत्या पण इंटरनेट आलेले न्हवते त्यामुळे तो मार्ग तितकासा खुला न्हवता अश्यावेळी तुम्ही तुमचे मार्गी आणि देशी साचे पुन्हा नव्याने घासून ते वितळवून वापरता येतील का हे पाहत राहता. मी हे केले .
मराठीतला प्रत्येक अव्हेलेबल फॉर्म मी अनेक पद्धतीने वितळवत नव्या प्रकारे वापरला मग तो अभंग असो कि गाथा सप्तशतीतले तुकडे असो कि गझल असो कि सॉनेटस असो कि पादाकुलक असो जिथे जिथे फॉर्म लवचिक करण्याची शक्यता होती तिथे तिथे मी फॉर्म लवचिक केला ह्याशिवाय स्वैर छंद आणि मुक्त छंदाचा युरोअमेरिकन फॉर्म होताच जो मराठीने वापरला होता त्यालाही मी भारतातल्या संस्कृत भाषेतल्या श्लोकातून दिसणाऱ्या वर्णनात्मक ढाच्यात वितळवले आणि नवे रूप दिले ह्याशिवाय माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी मुक्तछंदात निर्माण केलेले फॉर्म चौथ्या नवतेत वितळवून ते समकालीन केले निर्वस्तुवादीसारखे काही नवे फॉर्मही निर्माण केले नागेशी बांदिवडे आणि कोल्हापुरातून उगवलेल्या माझ्यासारखेला हे सहज शक्य होते मला उत्सुकता होती मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला कवी काय करेल हा सस्पेन्स संपवला नव्वदोत्तरी पिढीतील मन्या जोशीने अभिजित देशपांडेने त्याची ओळख करून दिली मन्या माझा अपोझिट ध्रुव होता मी गावरान तो पूर्ण कास्मो मी गावरान आणि व्यापारी संस्कृतीत वाढलेलो तर मन्या मुंबईच्या नवश्रीमंत उच्चंमध्यमवर्गात ! त्याच्या कवितेत त्याच्या वर्गाची पॉश ओळख होती मला वाटले होते हेमंत माझ्या मार्गाने जाईल कारण तो माझ्यासारखाच शहापूरातून उगवला होता पण तो गेला मनोजच्या वाटेने कारण त्याचा बदललेला वर्ग ! पुढे अनेकजण मनोज आणि हेमंतच्या वाटेने गेले ह्याचवेळी पुण्यातून सलील वाघ उगवला आणि त्याने पुण्याचे जालर म्हणून सादरीकरण सुरु केले जे अभूतपूर्व होते ही चौथ्या नवतेची तिसरी वाट होती ह्या वाटेवर सचिन केतकर आणि निवि कुलकर्णी अत्यंत यशस्वीपणे वाटचाल करू लागले वास्तविक सचिन माझ्यासारखाच कोल्हापूरसारख्या असलेल्या बडोदा शहरातून उगवला होता पण तरीही त्याने जी वाट सुरवातीला पकडली ती सलील सारखी होती पण चमत्कारिकरित्या तीही वेगळी होऊन शेवटी मनोजला जाऊन भिडली आणि सलील वाघापेक्षा वेगळी झाली (कदाचित प्राध्यापकांचे नव्या अर्थव्यवस्थेत जे वर्गांतर झाले (म्हणजे मध्यम वर्गाकडून उच्चं नवमध्यमवर्ग ) त्यामुळेही असेल ) कॉस्मोत न जगता कास्मो होण्याची ही शिकस्त माझ्यासाठी कायमच कोडे होती आणि आहे . महाजालरातून उगवलेली संजीव खांडेकरांची कविता मात्र आश्चर्यकारक आहे ती ह्यासाठी कि जे काम मनोज जोशीने तरुणपणी करायला हवे होते ते उत्तरभांडवलशाहीचे बाजारीकरण पेलण्याचे काम संजीव खांडेकरांनी पोस्टमार्क्सिस्ट पद्धतीने केले .
आम्ही पकडलेली जालऱे आणि महाजालरे काय दर्जाची होती ह्याचा फैसला नवीन महाजालरी पिढीने करावा नितीन वाघ , अजित अभंग , संतोष पवार, स्वप्नील शेळके प्रणव सुखदेव , ओंकार कुलकर्णी , शर्मिला रानडे, संदीप देशपांडे ह्या सारख्या सर्व अव्वल दर्जाच्या कवींनी वा कादंबरीकारांनी कोणती कविता स्वीकारली आणि कोणती कविता साईडलाईन केली आणि का केली ह्याची चर्चा त्यांच्या पिढीनेच करायची आहे आणि ही निवड आपण आनंदाने मान्य करावी कारण मला नेहमीच वाटते कि योग्यता आपल्या हातात असते आणि पात्रता इतरांनी ठरवायची असते .
माझ्यापुढचे प्रश्न असे होते कि जालरांचा आणि महाजालरांचा महाजालपणा आम्हाला किती पेलला ?एक संक्रमण आमच्या डोळ्यादेखत झाले ते सर्व अंगांनी आम्ही पेलले का कि चौथ्या नवतेची कलई करून आम्ही दुसऱ्या नवतेची आधुनिकतेची भांडीच घासली ? मनोज जोशीसारखा कवी पुढे भेलकांडत न वाढता अरुंद का होत गेला ? कि मनोजची वाट स्वभावानेच अरुंद आहे ? मनोज जोशी अरुंद होत असताना गझल अंक काढणारा हेमंत दिवटे पुढे कसा सरकत गेला ? त्याच्या ह्या सरकण्याचे स्वरूप सपाट आहे कि
असपाट आहे ? अडचणींत आणणारे प्रश्न अनेकांना नकोसे वाटतात पण असले प्रश्न मला कायमच पडायचे आणि इतरांनाही ते पडत असतील
साठोत्तरी कवितेत नामदेव ढसाळ हा एकमेव कवी असा होता ज्याने मुंबई (हे महाशहर) रांड आहे म्हणत आपल्या कवितेत तिला सवाष्ण करत नांदवली . आम्ही पुणे , मुंबई ही महाजालरे अशी नांदवली ? कि आम्ही चौथ्या नवतेची फक्त ऍक्टिंग केली ?
श्रीधर तिळवे नाईक
***************************************************************************________________________________
Comments
Post a Comment