व्यवहार आणि अजित पवार श्रीधर तिळवे नाईक
अनेकांचा प्रश्न असा की अजित पवार यांच्या अंगाने इतके लिखाण कशाला ? आणि एवढे लेख कशाला? त्यांना कदाचित हे कळणे अशक्य ! अजित पवार हे आमच्या पिढीचे राजकारणातले प्रतिनिधी आहेत . एका बाजूला बलाढ्य साठोत्तरी असे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला आपली समकालीन पिढी जिचे काय करायचे ते कळत नाही आणि तिसऱ्या बाजूला केवळ टॉंट मारणारी पिढी अशा कात्रीत सापडत आम्ही आमच्या वाटा शोधल्या. शोधत राहिलो पुढे मग तिसरी वाट गडद होत आली आणि त्यातून प्रश्न उभा राहिला पुढच्या पिढीचे काय करायचे ? सुरेल तिळवे हा माझा पुतण्या जेव्हा दहा वर्षाचा झाला तेव्हाच मला त्याचा फ्लॅश आला होता की हा राजकारणात पडणार आणि माझ्यापुढे तेव्हा एकच प्रश्न आला होता तो म्हणजे रोहिदास मामाशी याचे पटणार की नाही ? माझ्या सर्वच फ्लॅश प्रमाणे हाही फ्लॅश खरा झाला आणि सुरेल सार्वजनिक जीवनात आला
एका बाजूला रोहिदास मामा बहुजनवादी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात होता आणि दुसरीकडे सुरेलला मात्र आप पक्षाचे आकर्षण होते यातून काही संघर्ष उदभवतो की काय असे भय होते पण तसे काही सुदेवाने झाले नाही आणि सुरेल आणि रोहिदास मामा यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले . मुख्य म्हणजे दोन्ही बाजूंनी प्रेम होते आणि पक्ष भले एकमेकांच्या विरोधात असो पण त्याचा ताण संबंधांच्या वर आला नाही .
अजित पवार यांच्यामध्ये आमच्या पिढीचे प्रतिबिंब आहे. आमच्या पिढीने माणुसकी मरू दिली नाही मात्र आमच्या पुढच्या नव्वदोत्तरी पिढीमध्ये एक जो कृत्रिम पणा आला तो आम्ही समजून घेतला . प्रवीण बर्दापूरकर यांनी अजित पवार यांच्यावर लिहिलेल्या मरणोत्तर लेखांमध्ये दोन उदाहरणे दिली आहेत त्यातील आजारपणात उत्स्फूर्तपणे भेटायला आलेल्या अजित पवार यांचे व्यक्तिमत्व निश्चितपणे आकर्षक आहे. शरद पवार यांचे अनेक गुण अजित पवार यांनी अवगत केले असे म्हणायला हरकत नाही . भाजपाच्या उपस्थितीमध्ये या लोकांच्या मध्ये वाद झाले आणि असे वाद खुद्द आमच्या घरात पण काही कमी झालेले नाहीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जेव्हा भाजपबरोबर गेला तेव्हा काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न होता आणि आहे. गेली ५० वर्षे घरामध्ये असलेली बहुजनवादी परंपरा अचानक मोडीत निघाली की काय असे वाटावे असे हे वातावरण आहे तिचा परिणाम थेट देवळावर झालेला दिसतो म्हणजे कधी नव्हे ते देवळामध्ये वैदिक पद्धतीचे यज्ञ होऊ लागलेले आहेत मला स्वतःला हे कधीच पटले नाही कारण माझ्या मते यज्ञ संस्कृती ही काही बहुजनांची संस्कृती नव्हे परंतु हे सर्व काही होत आहे आणि मी त्यापासून अंतर राखून आहे. या सर्व गोष्टींचे आकलन इतके सोपे नाही काँग्रेस जर धड असती तर हे घडले नसते अनेकांना यामध्ये असलेला काँग्रेसचा वाटाच कळत नाही गांधी फॅमिलीच्या हट्टाहासामुळे अनेक चमत्कारिक गोष्टी या देशाच्या राजकारणात घडलेल्या आहेत त्यामधला सर्वात मोठा अट्टाहास गोव्याच्या राजकारणात आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे इथे ख्रिश्चन लोकांची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे भारतात जर अशी लोकसंख्या असती तर सोनिया गांधींनी काय काय प्रताप गाजवले असते हे सांगणे कठीण आहे त्या स्वतःला काहीही सेक्युलर वगैरे म्हणवत पण त्या आतून रोमन कॅथॉलिक आहेत आणि त्यांचे हे असे असणे गोव्याच्या राजकारणामध्ये फार प्रॉब्लेमटिक झाले आपण कुठल्या माणसांना पुढे आणतोय याचा विवेक सुद्धा राहिलेला नाही. धर्म विवेका पेक्षा मोठा झाला की काय होते त्याचे उदाहरण खुद्द काँग्रेस मधूनच सुरू झालेले आहे. नेहरू यांचे बौद्ध धर्माविषयीचे obsession इथून त्याची सुरुवात आहे . भारतातली जनता प्रामुख्याने हिंदू आहे बौद्ध नाही याचा विसर खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच पडला होता . त्यांचे हे obsession मुळातच या काळातल्या बौद्ध धर्माच्या आंतरराष्ट्रीय गौरव्यामुळे आणि दबदब्यामुळे निर्माण झाले होते त्याचबरोबर हिंदू धर्माचा एक तिरस्कार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये नक्की होता . पण त्याला कारण त्यांच्या काळातला हिंदू धर्म होता या हिंदू धर्मातल्या चालीरीती होत्या. सोनिया गांधी यांचे तसे नाही त्यांचा मुळात जन्मदत्त धर्मच वेगळा आहे त्यामुळे यांचा अल्पसंख्यांकवाद हा मुस्लिम लोकांशी कमी आणि ख्रिश्चन रोमन कॅथॉलिक यांच्याशी जास्त जुळलेला आहे . अर्थात हे राजकारण समजून घेण्याची आता गरज वाटत नाही कारण मुळात ख्रिश्चन लोकांची संख्या तेवढी नाही त्या उलट मुस्लिम लोकांची संख्या मात्र प्रचंड वाढल्याने अचानकपणे आपणाला सगळा अल्पसंख्यांकवाद हा मुस्लिम संदर्भामध्ये दिसायला लागतो . दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की 1980 नंतर रोमन कॅथोलिक या धर्माने सुद्धा कुठे कुठे आणि कसे कसे किती किती अत्याचार केले आणि हे लोक गुलाम बनवण्यात किती एक्सपर्ट होते आणि यांची गुलामगिरी कशी कुठे कुठे ऑपरेट होत होती हे आता पुढे आलेले आहे त्यामुळे या धर्माला कॉन्व्हेंट स्कूल कल्चर मुळे आणि सेवाधर्म म्हणून त्याची जी या स्कूल्सने इमेज तयार केली होती त्यामुळे जी एक सहानभूतीची लकीरं होती ती आता राहिलेली नाही . 1920 नंतरच्या ख्रिश्चन धर्मामध्ये अडकून पडलेल्या लोकांना आणि त्यावेळच्या डायरेक्टिव्ह मध्ये अडकून पडलेल्या लोकांना हे कळणे अवघड आहे. त्यांना मुळात नवीन पिढीचा आवाज ऐकू येत नाही . हा आवाज शरद पवार यांना ऐकू आला आणि हा आवाज ऐकू येणे हे त्यांना महागात पडले. किंबहुना त्यांना हा आवाज ऐकू आलेला आहे याची कल्पना टाइम्स ऑफ इंडिया पासून सगळ्या ख्रिश्चन लोकांनी स्पॉन्सर केलेल्या वर्तमानपत्रांना आली आणि त्यांनी आपल्या मीडिया मधून शरद पवारांच्या विरोधात जितका प्रचार करता येणे शक्य होते तितका केला . एतदेशीय मराठी संस्कृतीला विरोध हे तर टाइम्स ऑफ इंडियाचे एक वैशिष्ट्यच होते अलीकडे ते थोडे अड्जस्ट झालेले आहेत परंतु ही ऍडजस्टमेंट आहे
अजित पवार त्यामुळेच काकांमुळे का असेना पण काही प्रमाणात समजून घेत होते पण सेक्युलर ठसा इतका जोमदार होता की त्यातून नंतर आलेल्या नवोदत्तरी पिढीला सुद्धा बाहेर येता आलेले नाही . आता साहित्यिक आणि कलावंत लोक हे तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मागासलेले असतात की काय असा प्रश्न आता पडतो कारण समाज एका दिशेला आणि कलावंत एका दिशेला अशी सरळ सरळ फुट आपणाला नवदोत्तरी पिढीमध्ये दिसते . ज्या वेळेला समाज हिंदुत्ववादी बनत चालला होता तेव्हा हे लोक अधिकाधिक सेक्युलर बनत चालले होते कारण यातल्या प्रत्येकाला आंतरराष्ट्रीय मान्यतेची आणि हिंदी बेल्टच्या मान्यतेची प्रचंड गरज वाटते शिवाय समाजवादी आणि डावे असणे हे साहित्याच्या क्षेत्रात फायद्याचे असल्यामुळे त्यांच्याही मान्यतेची गरज भासते. याला कारण अर्थातच हिंदुत्ववादी लोकांचा कलेबद्दलचा दृष्टिकोन अतिशय पारंपारिक आणि आठव्या शतकात अडकलेला आहे त्यामुळे कधीही कुठलाही कलावंत असलेला शहाणा माणूस हिंदुत्ववादी होणे शक्य नाही . नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे लोक कलावंत असतील आणि ते जर का हिंदुत्ववादाला प्रतिनिधित्व देत असतील तर कोण हिंदुत्ववादाकडे कलावंत म्हणून आकर्षित होईल ? शरद राव माझे चांगले मित्र आहेत पण मैत्री एका बाजूला आणि वैचारिक दृष्टिकोन एका बाजूला ! त्यांचे नथुराम गोडसे यांचे समर्थन मला कधीच पटलेले नाही . आपण चुकलो तर चुकलो म्हणावे ती चूक कशी बरोबर होती हे सांगू नये पण अहंकार इतका मोठा की काय बोलावे ?
अशा या सगळ्या माहोल मध्ये अजित पवार राजकारण करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . त्यांच्या आसपास असणाऱ्या कुठल्याही नेत्यापेक्षा ते मुख्यमंत्रीपदाला अधिक लायक होते . शरद पवार यांनी निर्माण केलेली व्यवस्थापन शैली त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेली होती आणि ते त्याबाबतीत शरद पवार यांच्या इतकेच एक्सपर्ट होते . असे असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये हा महाराष्ट्राचा करंटेपणा म्हटला पाहिजे . वास्तविक शरद पवार यांनीच त्यांना जेव्हा एकदा संधी आली होती तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती कारण संधी वारंवार मिळत नाही हे शरद पवार यांना सुद्धा माहिती आहेच की ! माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की इथे शरद पवार चुकले आहेत आणि दुर्दैवाने नंतर पुन्हा अशी कधी संधी निर्माणच झाली नाही . दिल्ली मधल्या लोकांनी खरंतर अजित पवार यांचा गेम केला आणि हा गेम शरद पवार यांनी चालवून घेतला तो त्यांनी चालवून घ्यायला नको पाहिजे होता.
अशावेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे मग दुसरा कुठला काही पर्याय आहे का ते चाचपणे . दुर्दैवाने असा पर्याय निर्माण झालाच नाही आणि अजित पवार यांच्या सगळ्या राजकारणाची गोची ही इथे आहे . त्यांच्या डोळ्या देखत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना असे वाटत होते की आपण निश्चितपणे एकनाथराव शिंदे यांच्या पेक्षा उजवे आहोत . आणि खरे सांगायचे तर ते खरे होते . जर का काकाने भाजपशी युती केली असती तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळाले असते . पण येथे सगळा आयडिया लॉजिकल लोच्या झाला . त्याची चर्चा मी आधीच्या लेखात केलेली आहे.
हिंदुत्ववादाबाबत आमच्या पिढीचा सर्वात मोठा लोच्या हाच होता की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून काही आकाराला येईना . याचे सर्वात मोठे कारण ओबीसी आहेत हे लोक हिंदुत्ववादाकडे गेले नसते तर कदाचित धर्मनिरपेक्ष राजकारणाला बरे दिवस पुन्हा आले असते पण हे घडले नाही आणि याचवेळी नेमकी भाजपाने एक अशी खेळी केली की तिथे सगळेच पराभूत झाले ही खेळी म्हणजे नरेंद्र मोदी यांना ओबीसी म्हणून पुढे आणणे . आज अवस्था अशी आहे की समस्त वैश्य आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे मोदी यांच्या मागे ठामपणे उभा आहे . आणि याचे एकमेव कारण ते दोघांनाही आपल्या वर्ण जातीचे वाटतात. त्यातच त्यांनी निवडणुका लढवताना हर हर महादेव ही घोषणा केली अशी घोषणा करणारे ते पहिले पंतप्रधान होते आहेत बसवेश्वर यांच्यावर बोलणारे ते पहिले पंतप्रधान आहेत साहजिकच अशा अनेक गोष्टींचा अडवांटेज त्यांना मिळत गेला आणि याचा पूर्ण फायदा भाजपला होत गेला आत्ता सुद्धा आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी व्यवस्थित प्लेस केलेले आहे साहजिकच सर्वशैवलोक हे या दोघांच्या मागे गेले . आणि शक्यता अशीच आहे की बहुदा पुढेही जातील .
ही जी एक त्यामुळे हिंदुत्ववादी अपरिहार्यता निर्माण झाली तिच्याशी कसे अड्जस्ट करायचे हेच अजित पवार आणि शरद पवार यांना कळत नव्हते आणि त्यामुळेच एक कोलाहल निर्माण झाला आणि त्या कोलाहाला मुळेच अजितदादांची सर्वात मोठी गोची झाली . नाही म्हटले तरी अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपद कळत नकळत शरद पवार यांच्यामुळे दोनदा हुकले असा काहीतरी समज (ज्यामध्ये सत्य असण्याची बरी शक्यता आहे) अजित पवार यांचा झाला होता . त्यामुळे ते भाजपाला जॉईन झाले खरे परंतु त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता राहिली नाही. कारण तोपर्यंत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपणच दावेदार असल्याच्या थाटामध्ये पुन्हा एकदा राजकारण करू लागले म्हणजे एकनाथ शिंदे एकदा मुख्यमंत्रीपद भोगून झाल्यामुळे पुन्हा कधीतरी आपल्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देतील ही शक्यता संपली . भविष्यामध्ये त्यामुळेच भाजपचाच मुख्यमंत्री येणार हे स्पष्ट झाले आणि यामुळेच अजित पवार यांना हळूहळू का होईना परंतु आपल्याला पुन्हा काकाकडे परत गेल्याशिवाय पर्याय नाही जर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आले तर ते आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच येऊ शकते असे वाटायला लागले आणि यामध्ये बरेचसे तथ्य होते . ते अधिक जगते तर कदाचित पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एक झाली असती. आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोक आहेत त्यांना काही शरद पवार यांच्याशी देणे-घेणे नाही किंबहुना जिकडे सत्ता तिकडे यांचा मत्ता असेच यांचे धोरण आणि वातावरण असते.
थोडक्यात काय महाराष्ट्राचा मुख्य नायक होण्याचे जे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले ते त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे होते परंतु नियतीने त्यांना हुलकावणी दिली हेच खरे . कवितेत एक वेळ हे सगळे पुन्हा प्राप्त होऊ शकते कारण कविता जिवंत असतात त्या पुढच्या पिढीत कर्तुत्वाच्या चुका दुरुस्त करू शकतात परंतु राजकारणामध्ये हे शक्य नसते एकदा सत्ता गेली की जातेच . त्या अर्थाने अजित पवार ही एक शोकांतिका आहे . Macbeth बनायला खूनी माणसाचे काळीज लागते ते अजितदादा यांच्याकडे कधीच नव्हते ते आतून अतिशय सॉफ्ट होते . माझ्या मते हेच खरे नायकाचे आणि म्हणून त्यांचे यश आहे . राजकारणातल्या त्यांच्या तडजोडी भविष्यात अधिकाधिक पुढे येत जाणार . अशा प्रकारच्या तडजोडी आमच्या पिढीने का केल्या हाही एक मुद्दा गडद होत जाणे अटळ आहे . खरे तर या सगळ्यावर कंगाल होणे हा उत्तम उपाय एकदा का कंगालच तुम्ही झाला की लोक तुमच्याकडे बोट करत नाही पण राजकारणात कंगाली काही कामाची नाही आणि म्हणूनच पैसे मिळवले पाहिजेत याची जाणीव त्यांना झाली होती.
त्यांच्या मृत्युपत्रामध्ये जे काय आलेले आहे त्याविषयीच्या काही बातम्या येत आहेत मुख्य म्हणजे डिजिटल पैसा त्यांनी प्रचंड कमावला असा प्रवाद आलेला आहे या अंगाने त्यांनी मिळवलेला पैसा जवळ जवळ 11 अब्ज आहे आणि तो चक्क त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या इन्व्हेस्टमेंट सॉफ्टवेअरच्या साह्याने मिळवला असे समोर आलेले आहे . हा सगळा पैसा खेळता असल्याने त्याच्या बाबतीतल्या कायदेशीर गोष्टी कशा हे सांगणे आता अवघड आहे . मुळात हे खरे की खोटे हे सांगणेच अवघड आहे पण जर हे खरे असेल तर मात्र आमच्या पिढीत मिळालेला आणि झालेला हा एक उत्तम नायक होता असे म्हणायला हरकत नाही कारण केवळ राजकारण हे एकमेव क्षेत्र नाही त्याबरोबर अर्थकारण हे क्षेत्र येते आणि अर्थकारणामध्ये जर काही त्यांनी ही चमकदार कामगिरी केली असेल तर त्याला दाद दिलीच पाहिजे
अजितदादा यांना आदरांजली !
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment