शरद बाविस्कर : पुरोगामी आणि प्रतिगामी या दोघांनी घातलेला गोंधळ श्रीधर तिळवे नाईक 

आत्मचिकित्सा कोणी करायची असते ? तर ती सर्वांनीच करायची असते .डाव्या लोकांनी आणि उजव्या लोकांनीही! आपल्याकडच्या बहुतेक पुरोगामी लोकांचा असा एक गैरसमज असतो की चिकित्सा ही फक्त उजव्या लोकांनी करायची असते . आत्मचिकित्स होणे सर्वांनाच गरजेचे आहे आहे पण प्रत्यक्षात असे होत नाही ना? कशावरून डावा विचार योग्य आहे ? याबाबतीत युक्तिवाद कोण करत? पुरोगामी लोकांची सुद्धा एक चौकट आहेच. त्या चौकटीवर हल्ला केला की सोयीस्कर मौन पाळायचं आणि जो कोणी त्या चौकटीचा मान ठेवेल त्याला मान देत राहायचं . तुमच्या विचारांची चिकित्सा करायला हवी होती ती खोलात जाऊन केली गेली नाही. कळत नकळत शेवटी गोष्टी वैयक्तिक झाल्या ते चुकीचेच होते किंबहुना हिंदुत्ववादाचा जो सर्वात मोठा दुबळेपणा आहे तो इथेच आहे . त्याला दुसऱ्यांची चिकित्सा सुद्धा करता येत नाही. आता ज्याला दुसर्‍याची चिकित्सा जमत नाही तो स्वतःची चिकित्सा काय करणार ? वस्तुस्थिती अशी आहे की पुरोगामी वाद ,आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता सुद्धा कालबाह्य झालेल्या आहेत . पण हे सुद्धा स्वीकारण्याची किती लोकांची तयारी आहे आंबेडकरांची चिकित्सा सुरू केली की काय प्रकारची प्रतिक्रिया येते हे मी अनुभवलेले आहे. तुम्ही कुठल्यातरी अत्यंत सामान्य विश्लेषणाला विश्लेषणाच्या कक्षेत आणणार आणि मग त्याने त्याच्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या की त्या नको तितक्या मोठ्या करणार तर हे कसे चालेल ? जे काही झाले ते अनुचित झाले याबद्दल कुठल्याही माणसाला शंका असू नये . परंतु कुस्ती झाली असे जर तुम्ही म्हणत असाल तर मी त्याला तयार नाही माझ्या मते कुस्ती झालीच नाही . पण कुस्ती गाजवली गेली . आता अशा कुस्त्या गाजवून हिंदुत्ववाद पराभूत होईल का ? जास्तीत जास्त सर्व विचारवंत स्वतःवर खुश होऊन जातील . अर्थात खुश होण्याचा सुद्धा प्रत्येकाला अधिकार आहेच . 

श्रीधर तिळवे नाईक

शरद बाविस्कर , दाते आणि तत्त्वज्ञान श्रीधर तिळवे नाईक 


शेवटी दाते यांनी माफी मागितलेली आहे आणि एकंदर हा वाद संपला ते बरे झाले . याबाबत बाविस्करांनी पुढील प्रमाणे पोस्ट टाकलेली आहे.

"आज सकाळी माननीय दाते यांचा मेसेज आला. त्यानंतर आमचं जवळपास अर्धा तास सविस्तर बोलणं झालं. व्याख्यानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी ज्या आक्षेपार्ह काॅमेन्टस् केल्या त्याबद्दल

ते 'sorry म्हणाले. म्हटलं तुमच्या सारख्या जेष्ठ व्यक्तिने 'sorry' म्हणणं मला सुद्धा रुचत नाही. तुमच्या कडून खरंच चूक झाली असेल तरच दिलगिरी व्यक्त करा. तुम्ही जे आरोप केलेत त्याविषयी पुरावा दिला तर मी स्वतः माफी मागेल. आणि तुमच्या विरोधात कुणी बोलत असेल तर मी उघडपणे तुमची बाजू घेईल. पण फक्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 'sorry' म्हणत असाल तर अनैतिक असेल. त्यांना मनापासून या सगळ्या प्रकरणाविषयी खेद आहे.


मी म्हटलं पुढच्या वेळी मुंबई आल्यावर हक्काने तुम्हाला चहासाठी निमंत्रित करेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण सोशल मीडियाचा निराधार वापर कुणीही करू नये असं वाटतं.

ते थोडे अस्वस्थ वाटले. मी त्यांना माझ्या परीने धीर दिला. कुणीही त्यांच्या बाबतीत अपशब्द वापरू नये ही माझी सगळ्यांना नम्र विनंती. 


सोशल मीडियावर चिखलफेक चालू असताना एशियाटिक सोसायटीचे डॉ कुन्दा मॅम, विलास ढवळे सर, अनिल सावंत सर मध्यस्थी करून वाद मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 


पण ज्यांनी वस्तूस्थिती न समजून घेता फक्त आगीत तेल ओतलं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक वेळी माझ्याविषयी काहीही झालं तर ताबडतोब तीच जुनी कॅसेट लावून स्वतःची पोळी भाजणार्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून प्रसिद्धी मिळवण्याचा विचार करावा. 


आणि महाराष्ट्रात स्वकर्तृत्वाने एका मागून एक तत्वज्ञानाची विभागं बंद पाडून तत्वज्ञानाचं वाटोळं करणार्या आणि इतर डबल ढोलकींकडून फार अपेक्षा नाही आहेत!


समविचारी लोकांचा वाद bad faith मध्ये होतो तेव्हा कुणीही जिकंत नाही. सगळे हारतात! 


(मी फेसबुकचा वापर फार मर्यादित स्वरूपात करतो. चर्चा वगैरे प्रत्यक्षात कराव्यात. सोशल मीडियावर चर्चा करण्याचं कौशल्य माझ्या अंगी नाही हे मी मान्य करतो.)"


शरद बाविस्कर 


त्यातील चर्चा फक्त खाजगी असाव्यात हे काय मला मान्य नाही आणि फेसबुक तर नव्या युगाचे प्रतिनिधी आहे असे मी मानतो. त्यामुळे मी फेसबुकवरच चर्चा करणार आहे.  


एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाविस्कर जे करत होते ते अतिशय महत्त्वाचे काम होते याचे कारण कुठल्याही माणसाचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा बहुतांशी तत्त्वज्ञानाच्या इतिहासापासून सुरू होतो. माझा स्वतःचा अभ्यास हा अकरावीला असताना सुरू झाला होता आणि त्याचे श्रेय बर्ट्रांड रसेल यांच्या हिस्टरी ऑफ वेस्टन फिलॉसॉफी या ग्रंथाला होते. माझ्या आयुष्यात हा ग्रंथ विलास काळे नावाचे मला इंग्रजी शिकवायला येणारे गृहस्थ होते त्यांच्यामुळे आला . दहावीनंतर मी मराठी माध्यमात शिकल्यामुळे विज्ञान शाखेत शिकत असल्याने अचानक इंग्लिश माध्यम आल्याने थोडा गडबडून गेलो होतो आणि माझी गडबड माझ्या वडिलांच्या म्हणजे भाऊंच्या लक्षात आल्याने त्यांनी पोराने उत्तम इंग्रजी शिकावे म्हणून विलास काळे नावाच्या शिक्षकाची खाजगी शिकवणी मला लावली. ते मला माझ्या घरी येऊन शिकवत. त्यांच्यामुळे माझे इंग्रजी किती चांगले झाले हा एक प्रश्न आहे पण त्यांनी हा जो ग्रंथ पहिल्याच भेटीत सहज म्हणून आणला होता त्याकडे माझे आकर्षण केंद्र ओढले गेले आणि इंग्रजी शिकता शिकता मी तत्त्वज्ञान पण शिकायला लागलो . याचा नंतर माझ्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडलेला आहे .(माझ्या बाळबोध कवितांमध्ये रसेलचा प्रभाव तुम्हाला सहज सापडेल) मला मुळात प्रायव्हेट हायस्कूल मधील रक्तवान सरांच्या इतिहासाच्या तासांच्यामुळे शाळेपासूनच इतिहास आकर्षित करत होता आणि रसेलच्या या पुस्तकांमध्ये इतिहासाची एक अत्यंत वेगळी मांडणी मी अनुभवली . भारतीय पद्धत माझ्या घरातच होती परंतु पाश्चात्त्य माझ्या घरात नव्हती. वडिलांच्यामुळे थोडाफार मार्क्सवाद असला तरी त्याचे तात्विक स्वरूप काही समजून घेण्याइतके माझे वडील मार्क्सवादाचे फॅन नव्हते त्यांनी माझ्यावर गांधीवादाचे सगळे संस्कार केले . परंतु रसेलच्या या पुस्तकाने अचानक तत्वज्ञान माझ्या डोक्यात आणले आणि भारतीय विचार पद्धतीपेक्षा सुद्धा एक वेगळी विचार पद्धती असू शकते याचे मला भान आले . आमचे रक्तवान सर हे कट्टर हिंदुत्ववादी असावेत त्यामुळे मी हिंदुत्ववादी पठडीतलाच इतिहास शिकलो होतो . आता मात्र पूर्ण वेगळ्या धाटणीचा इतिहास समोर आलेला होता . या पुस्तकानंतर या पुस्तकात उल्लेख केलेल्या सर्व तत्त्वज्ञांचे मी झपाटल्यासारखे माझ्या नेहमीच्या शैलीत समग्र वाचन सुरू केले आणि सर्वात प्रथम याची सुरुवात समग्र बर्ट्रांड रसेल पासून सुरू झाली . पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा खोलात जाऊन अभ्यास करण्याचा एक प्रोग्राम सुरू झाला. सुदैवाने रसेलची पुस्तके ही उपलब्ध होत गेली आणि मुळात तिळवे भांडार या आमच्या दुकानात रद्दीत आलेली पुस्तके जी होती त्यामध्ये रसेल सुद्धा होताच .नंतर मग बरेच विचारवंत मी समग्र पद्धतीने वाचले आणि त्याचा मला फायदा झाला पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तत्त्वज्ञान हे फार वेगळे प्रकरण आहे आणि त्याला दर्शनशास्त्र म्हणणे हा मूर्खपणा आहे . विशेषत: माझा शक्तिपात झाल्यानंतर ही गोष्ट अधिक ठळक झाली.


भारतीय परंपरेमध्ये दर्शन म्हणजेच तंत्र होय पण कुठल्याही तंत्राचे दर्शन बनते जेव्हा तंत्राचे परंपरा बनवणे सुरू होते. शिस्त सुरू होते . प्रत्येक दर्शन शास्त्राच्या मुळाशी मुळात मोक्ष असतो अपवाद म्हणून माझ्यापुढे नेहमीच लोकायत दर्शन सादर केले गेले त्याबद्दल मी इतरत्र लिहिलेले आहे.


नंतर अचानक मग प्रायोगिक नाटकांच्यावर पीएचडी करताना त्या पी एचडी डीच्या अभ्यासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण पाश्चात्त्य परंपरा समजून घेण्याची आणखी एक नवीन संधी मिळाली . मात्र आता फोकस 1960 पर्यंत नव्हता तर फोकस बदलला होता तो आता 1960 ते 1990 असा झाला होता कारण मुळात मीच बदललो होतो . नाटक हा विषय असल्याने कलेच्या अंगाने पूर्णपणे दर्शन आणि तत्त्वज्ञान तपासणे गरजेचे बनले. 


यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा समग्र इतिहास बघण्याची गरज निर्माण झाली जेव्हा मी २०१५ - १६ यावर्षी थेटर अकॅडमी मुंबई विद्यापीठामध्ये व्याख्याने द्यायला सुरुवात केली . प्रत्येक वर्षी सर्व इझम शिकवावे लागत असल्याने साहजिकच आपोआपच सगळ्या विचार प्रणाली अभ्यासाव्या लागल्या आणि पुन्हा विद्यार्थ्यांच्या पुढे त्यांना कळेल अशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यातली उदाहरणे घेत सादर कराव्या लागल्या.


त्यामुळे जेव्हा बाविस्कर यांची ही मालिका सुरू झाली तेव्हा मी तिचे स्वागत केले होते कारण आपले विद्यार्थी नसलेल्या लोकांच्या पुढे हे सर्व काही जात असेल तर ते बरेच आहे असे मला वाटत होते या मागचे कारण उघड आहे आणि होते. सध्या अत्यंत जाणीवपूर्वक तत्त्वज्ञानाची हत्या केली जात आहे. थेरी संपली की लोक विचार करायचे बंद होतात आणि अलीकडे कळत नकळत थेरीचे महत्व कमी करणे हे चालू झालेले आहे . साहजिकच 2020 नंतर थेरीचे क्लासेस अटेंड केले जात नाहीत अनेक लोकांना तर तो फक्त पेपर वाटतो आणि इंटरनेट मध्ये पसरलेल्या माहितीच्या आंतरजालामध्ये आरामात शिरून आपण तत्त्वज्ञान शिकू शकतो असा एक कॉन्फिडन्स नवीन पिढीत आहे प्रत्यक्षामध्ये विचारायला गेले तर मात्र वाय वाय म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये बहुतेक जण फापललेले दिसतात. मुळातच काही केले तरी पास केले पाहिजे अशी वरूनच ऑर्डर असल्यामुळे सगळेजण थेरी मध्ये अभ्यास न करताच पास होतात कारण पास नाही झाले तर त्यांना कुठे ठेवणार असा एक मोठा प्रश्न असतो . (कारण राहण्याचा प्रश्न हॉस्टेलमध्ये जागा कमी आहेत आणि विद्यार्थी जास्त त्यातून आलेला हा प्रश्न आहे)


आता अशा पार्श्वभूमीवर जेव्हा बाविस्कर यांनी ही मालिका सुरू केली तेव्हा साहजिकच मी तिची शिफारस सर्वत्र केली विशेषत: विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही लोकांना ज्यांना तत्त्वज्ञानामध्ये इंटरेस्ट होता त्यांना मी ती आवर्जून वाचा असे सांगायला सुरुवात केली. 


वास्तविक अशा गोष्टींमध्ये फार अपेक्षा करायच्या नसतात. कारण शेवटी वर्तमानपत्राची मर्यादा असते. त्यामुळे बाविस्कर यांनी स्वतःचे तत्त्वज्ञान मांडावे अशी अपेक्षाच नव्हती. फक्त ते काय मांडणी करतात हे लक्षात घेण्याजोगे होते हळूहळू माझ्या लक्षात आले की ही मांडणी काही प्रमाणात का होईना पण डाव्या बाजूकडे झुकते . काही वेळा डावे बायस पण दिसतात . पण हे बायस अटळ असतात. शेवटी कोण इतिहास लिहितो हे फार महत्त्वाचे असते त्यामुळे बाविस्करांच्या वर टीकाच करायची होती तर ती पूर्णपणे त्यांची इतिहासच्या तत्त्वज्ञानाची काय बैठक आहे ती बैठक तपासून टीका करायला पाहिजे होती आणि त्यासाठी मुळात तुम्ही तत्त्वज्ञानाचा आणि तत्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करायला लागतो असा अभ्यास नसला की मग गोची होते . 


अर्थातच तत्त्वज्ञानाचा इतिहास काही रसेल यांच्यापाशी थांबलेला नाही त्यानंतर अनेक आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पाश्चात तत्त्वज्ञानाचे इतिहास लिहिलेले आहेत. या आत्तापर्यंत होऊन गेलेल्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाची तुलना बाविस्कर यांनी केलेल्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाच्या मांडणीच्या आणि एकंदरच इतिहासाच्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीच्या तत्त्वज्ञानाशी करून मग निष्कर्ष काढायला हवेत. अशावेळी त्यांनी काय नवीन पद्धतीने या संकल्पना पाहिल्या ते पाहायला लागते कारण अनेकदा संकल्पना इतिहासात उपलब्ध असतात आणि प्रत्येक तत्त्वज्ञ पुन्हा पुन्हा त्या संकल्पनांना स्वतःचा म्हणून काही आयाम देत असतो आशय देत असतो किंबहुना त्याचे हेच तत्त्वज्ञानाला योगदान असते. उदाहरणार्थ परात्मता ही संकल्पना हेगेलच्या तत्त्वज्ञानात आहे पण काल मार्क्स ने त्याला पूर्णपणे भौतिक डायलेक्टिकल अर्थ दिला आणि नंतर अस्तित्ववादी तत्त्वज्ञानामध्ये तिला पूर्णपणे वेगळा अर्थ मिळालेला आहे . अशा वेळेला परात्मता या संकल्पनेला कसा कसा कोणी कोणी वेगवेगळा अर्थ दिला कुठे कुठे कसा अर्थ भरला हे सर्व तपासावे लागते आणि इथेच इतिहासकाराची कसोटी लागते कारण इतिहासकार हा नेहमीच संकल्पनांची आणि भूतकाळात घडलेल्या घटनांची एक तर्कशुद्ध साखळी तयार करत असतो . जर अशी तर्कशुद्ध साखळी त्याला तयार करता आली नाही तर तो इतिहास इतिहास राहत नाही फक्त माहिती गोळा करण्याचा उद्योग होऊन बसतो . मी अशा लोकांसाठी माझ्या एका कवितेत गोळकरी गोळेकरी या दोन संज्ञा वापरलेल्या आहेत माझ्या मते विकिपीडिया हे गोळा बेरीज काम करतच असतो त्यासाठी आता कुठल्या तत्त्वज्ञाची गरज राहिलेली नाही . त्यामुळे आता तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिणाऱ्या माणसाला फक्त गोळा बेरीज चालत नाही त्याला कंपल्सरी साखळी तयार करावी लागते आणि हाच प्रश्न आपण बाविस्कर यांनी लिहिलेल्या इतिहासासंदर्भात विचारायला पाहिजे होता त्यांनी अशी साखळी तयार केली आहे का ? ती तर्क शुद्ध आहे का तिला व्यवस्थित पुरावे आहेत काय ? या साखळीमध्ये कुठे घट्ट चिटकण आहे आणि कुठे मोकळी अचिटकण आहे ? या अंगाने सर्व लेखन तपासायला पाहिजे होते.


पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे हे लोक ऐतिहासिक भान पूर्णपणे राखून असतात त्यामुळे ते जेव्हा एखादी इतिहासातून चालत आलेली संकल्पना स्वीकारतात तेव्हा त्या संकल्पनेबद्दल जेव्हा त्यांना काही नवीन अर्थ किंवा आयाम भरायचा असतो किंवा द्यायचा असतो तेव्हाच ते तो शब्द पुन्हा एकदा वापरत असले तरी या शब्दाला त्या संकल्पनेला आपला नवीन अर्थ तिला प्रदान करतात . अशावेळी पाश्चात्य देशातील एक संकल्पना म्हणजे "संकल्पनांचा इतिहास" ही संकल्पना फार महत्त्वाची ठरत जाते. पाश्चात्त्य देशात जेव्हा पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिला जातो तेव्हा हा संकल्पनाचा इतिहास नेहमीच स्वतःच्या पावलांनी चालत येत राहतो . किंबहुना तत्त्वज्ञानाचा इतिहास म्हणजे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या संकल्पनांचा इतिहास आणि त्या संकल्पनांचा केलेला पाठलाग असतो . पाठपुरावा असतो असो.


भारतीयांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कुठला असेल तर इथे संकल्पनांचा इतिहास नावाची गोष्टच नाही आणि याचा प्रचंड तोटा भारतातल्या तत्त्वइतिहासाला झालेला आहे. विशेषत: ब्राह्मण धर्मातले अनेक लोक दुसऱ्यांच्या संकल्पना सहजरित्या स्वीकारतात आणि आपल्या पद्धतीने आपल्याच नावाने आपल्या धर्माच्या नावाने कॅश करून घेत असतात . त्यामुळेच आपला इतिहास इतिहास न राहता अनेकदा केवळ पुराण बनून डोक्यावर बसतो आणि नको त्या काल्पनिक मीऱ्या आपल्या डोक्यावर वाटायला लागतो .आपल्या आधी कोणी काही मांडले असेल तर अनेकदा त्या संदर्भात नावे सुद्धा घेतली जात नाहीत सरळ सरळ चोरी करण्यामध्ये लोक एक्सपर्ट झालेले आहेत याचे कारण असे की आता कॉपी आणि पेस्टिंग हे फास्ट झालेले आहे त्यामुळे चीपकाचीपकी फार सुलभरीत्या करता येते पूर्वीच्या काळी स्वतःच्या हस्ताक्षरात सर्व लिहून काढावे लागत असल्याने हे सहजासहजी जमत नसे. त्यामुळे कुठल्याही संकल्पनेचा इतिहास लिहिणे किंवा शोधून काढणे हे कालिक आणि अवकाशीक अंतर जास्त असल्याने सोपे होते आता तसे राहिले नाही अक्षरशः 10 सेकंदात तुमची पोस्ट कॉपी केली जाऊ शकते .त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये संकल्पनांचा इतिहास लिहिणे अधिक कठीण होऊन बसले आहे . अनेकदा एखाद्या चोर माणसाला तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिताना आपण श्रेय देऊ शकतो आणि मग त्याने ज्यादा सेकंद आधी पोहचलेले होती तो ओरिजनल माणूस विचारा मारला जातो अगदी कवितेबाबत तर हे खूपदा होते तुमच्या कवितेत एखादी नवीन थीम आली की दहा सेकंदात त्याच थीमवर नवीन कविता लिहायला सुरू करणारे लोक भरपूर आहेत .त्यामुळे नेमका खरोखर एखाद्या माणसाने काही अर्थ नवा दिलेला आहे की नाही हे ठरवणे फार अवघड जाते.


आपल्याकडे समजा ब्रह्म ही संकल्पना आहे तर ती शैव-धर्मामध्ये शिव या संकल्पनेसारखीच आहे पण आपण जर का उपनिषदांच्या मध्ये आलो तर तिथे तिचा अर्थ बदलत गेलेला दिसतो पुढे मग शंकराचार्यांच्या मांडणीमध्ये ब्रह्म पूर्णच वेगळे आहे त्यानंतर रामानुजाचार्य यांच्या भक्तीशैलीत ते आणखीनच वेगळे होते आणि तुकाराम जेव्हा ब्रह्म म्हणत असतो तेव्हा त्याला वैदिक परंपरा अभिप्रेतच नसते भले मग तो कितीही वैदिक परंपरेची गॅरंटी घेवो. अशावेळी जो इतिहासकार असतो त्याला त्या संकल्पनेचा इतिहास व्यवस्थित माहिती असायला हवा किंवा मग त्याने शांतपणाने आपल्या परंपरेमध्ये जे अर्थनिर्णयन झालेले आहे ती मर्यादा आहे असे सांगणे आवश्यक असते किंवा कधी कधी प्रादेशिक मर्यादा आखून घ्याव्या लागतात कधी कधी भाषिक मर्यादा आखून घ्याव्या लागतात तरच तो इतिहास ऑथेंटिक बनण्याचे काही चान्सेस असतात. अगदी आजच्याकाळात सुद्धा असे घडू शकते मी फ्रान्सिस बेकन या तत्त्वज्ञाला जबरदस्त मानत होतो परंतु नंतर मॉन्टिंग्यू नावाचा एक फ्रेंच तत्त्वज्ञ मी वाचला आणि माझ्या लक्षात आले की बेकनच्या अनेक संकल्पना ह्या त्याच्यातून आलेल्या आहेत आणि मग मला कळले की इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये नेहमी इतके भांडण का चाललेले असते किंवा कवितेच्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आधुनिक कवितेचे तत्त्वज्ञान प्रथम पूर्णपणे फ्रान्स भाषेत आलेले आहे आणि हे मला माहीत असल्यामुळे मला कधीही ब्रिटिश आधुनिक कवितेचे कसलेही आकर्षण वाटले नाही मला ते अत्यंत सामान्यच आणि उधारीचे वाटत राहिले कारण मी आधीच फ्रान्स कवींचं वाङ्मय वाचून बसलो होतो .


एकेकाळी मला काही लोक नेहमीच विचारत की तू एखाद्या विषयावर लिखाण सुरू करताना नेमके काय करतो. तर मी या संदर्भात एकच उत्तर देत असे ते म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल काही शंका असेल तर सरळ सरळ wikipedia वर जा तिथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील आणि त्यापेक्षा काही वेगळे सांगायला तुमच्याकडे आहे का ते पहा आणि जर का तसे काही विकिपीडियावर नसलेले तुमच्याकडे सांगायला असेल तर आणि तरच मग इतिहासाचा मागोवा घ्या आणि सांगा. याचे कारण असे आहे की एकेकाळी विकिपीडिया संपूर्ण ऐतिहासिक मांडणी देत असे . आता मात्र त्याचीही विश्वासार्हता संपायला सुरुवात झालेली आहे. त्याने पूर्णपणे सत्ताधारी लोकांची ऐतिहासिक पद्धत गुलामगिरीशरण पद्धतीने स्वीकारून ऐतिहासिक इतिहास मांडायला सुरुवात केलेली आहे . अनेकदा तर स्पष्ट दिसते की वैष्णव शरण किंवा वेदांतशरद मांडणी केली जाते. अशा वेळेला मग तुम्हाला लिखित स्वरूपात स्वतःचे नवइतिहास निर्माण करावे लागतात अन्यथा विकिपीडियावरून स्पॉन्सर केला जाणारा सत्ता शरण इतिहास हाच इतिहास म्हणून पुढे येण्याची शक्यता असते विशेषतः संकल्पनांच्या इतिहासाबाबत असे खूप घडते आहे .


त्यामुळे बाविस्कर यांनी लिहिले म्हणजे काम संपले असे होत नाही आपल्याकडे अशा प्रकारच्या मालिका सर्वच वर्तमानपत्रांनी सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे . आपल्याकडे अनेकदा वर्तमानपत्रांच्या आता हे लक्षातच येत नाही की एकेकाळी ते व्यवसायिक रंगमंचासारखे होते आता हा व्यवसायिक रंगमंच टेलिव्हिजन कडे गेलेला आहे चॅनेल्स कडे गेलेला आहे आणि आता तर तो चॅनेल्सकडेही राहिलेला नाही तर तो आता सोशल मीडियाकडे गेलेले त्यामुळे आता अवस्था अशी आहे की सोशल मीडिया हा व्यवसायिक नाटकासारखा रंगमंच टेलिव्हिजन हा समांतर रंगभूमी सारखा रंगमंच आणि वर्तमानपत्र ही अक्षरशः प्रायोगिक रंगांच्या सारखी झालेली आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वर्तमानपत्राच्या संपादकांनाही लक्षात येत नाही . याचा थेट परिणाम आपल्याला मासिकांच्या वर झालेला दिसतो. आणि तो वाढत जाणार आहे कारण जर का प्रायोगिक अवस्था वर्तमानपत्रांना प्राप्त झाली तर आत्तापर्यंत जी प्रायोगिक आशय देणारी मासिक संस्कृती होती तिचे काय ? त्यामुळे आता वर्तमानपत्रांना शाबूत राहायचं असेल आणि टेलिव्हिजनच्या उथळ वर्तमानकेंद्री विश्लेषणांना शह द्यायचा असेल तर हा शह देण्याचा देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे .

आणि आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिणाऱ्या माणसाला क्वालिफिकेशन काय लावायचे ? म्हणजे जर का तो रसेल सारखा स्वतःच योगदान देणारा तत्त्वज्ञान असेल तर तो अधिक चांगल्या रीतीने इतिहास लिहू शकतो का की तो अधिक चांगला इतिहासकार असणे अधिक गरजेचे आहे? कुठेतरी या संदर्भात जेव्हा योगदान विचारले जाते तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतिहासकाराचे योगदान हे इतिहासात असले पाहिजे. मी म्हटल्याप्रमाणे त्याला ती साखळी नीट जुळवत आली पाहिजे अन्यथा त्याला स्वतःला खुद्द काही तत्त्वज्ञानामध्ये योगदान देता आले आहे का हा मुद्दा तसा फार मोठा होत नाही जर का तो त्या पद्धतीचा असेल म्हणजे उदाहरणार्थ इथे असेल सारखे त्याचे योगदान असेल तर तो इतिहास अधिक वेगळ्या पद्धतीने मांडतो याविषयी काही शंका नाही कारण या पुस्तकाला जेव्हा नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा त्या पुस्तकातले साहित्यिक गुण सुद्धा महत्त्वाचे मानले गेले आणि असे काही साहित्यिक गुण खरोखरच त्या पुस्तकात आहेत पण हे सगळे साहित्यिक गुण निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण असेल त्या त्या काळामध्ये स्वतः जात होता आणि म्हणूनच त्या काळाचा येतो आणि खरोखर त्या कल्पना किती व्हॅलिड आहेत हे तो व्यवस्थित तपासात होता आणि म्हणूनच हा इतिहास फार इंटरेस्टिंग झाला. अशा प्रकारची काही गोष्ट बाविस्कर यांच्या बाबतीत झाली का? हे या अंगाने तपासले जायला पाहिजे होते परंतु ते ह्या अंगाने तपासणी झालीच नाही. 

दुसरी गोष्ट अशी की समजा एखाद्याने हा प्रश्न विचारला की बाबा तुझे योगदान काय तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमचे योगदान काय ते सांगून द्यायला हवे किंवा तुमच्या वतीने कोणी ते उत्तर द्यायला पाहिजे प्रत्यक्ष मध्ये हे घडलेलेच नाही त्यामुळे हे सगळे हवेत बांध झाले आणि लोकांना काय चालले ते कळेना . ऑब्जेक्शन कशावर आहे आणि उत्तर काय दिले जाते यामध्ये काहीही समायोजनच नाही . आज सुद्धा हे काही समायोजन साधलेला असे दिसत नाही एकंदरस पुरावा आम्ही लोकांनी समायोजनाचा बुटाबोल करायचा बट्ट्याबोळ करायचा असं काय पण केलेला आहे की काय माहित नाही पण तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये हे कसे चालेल 

मुळात दाते यांना पण आपला पॉईंट नीट ठामपणे स्पष्टपणे स्पष्टीकरण देत मानता आला नाही आणि त्यातून झालेला गोंधळ आहे पण कधी कधी समजा समोरचा माणूस त्या क्षेत्रातला नाही पण तो एखाद्या ऑब्जेक्शन घेत असेल तर मग त्या ऑब्जेक्शन ला ज्यांच्याकडे असेच स्पष्टीकरण आहे स्पष्टता आहे त्यांनी मग त्या पद्धतीने मांडणी केली पाहिजे यामध्ये आलेला एक आणखी विचित्र मुद्दा म्हणजे बाविस्कर जी एन यु मध्ये काम करतात आता हा काय कसोटीचा मामला आहे काय ? कोण कुठे काम करतोय महत्त्वाचे नाही त्यापेक्षा तो योगदान काय देतो ते महत्त्वाचे . आपल्याकडे काही पुरोगामी विचारवंतांना जे एन यु म्हणजे मक्का वाटते . 

एकंदर काय दृष्टिकोनांच्या स्पष्टतेचा कुठे ना कुठेतरी या वादविवाद मध्ये अभाव दिसला आणि म्हणून मग अशा पोस्ट पडत गेल्या 

ही सगळी पार्श्वभूमी समजून घेऊन जर का हा वैचारिक संघर्ष केला गेला असता तर बरे झाले असते त्यासाठी खोलात जाणे गरजेचे आहे आणि होते. खोलात जाऊन प्रति मांडणी आली असती तर हा वाद खूप चांगला रंगू शकला असता पण तसे झालेले नाही असो आता भेटी घडल्यानंतर माहोल बदलत जाईल . शेवटी लोक भेटतात एकमेकावर प्रभाव टाकायला बघतात आणि कधी कधी बदलतात आता कोण किती बदलते हे हळूहळू पुढच्या लिखाणावरून दिसेलच. 

श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय