बहुआम्हीवाद , बहुउपपक्षवाद , मोहन भागवत आणि अनेक चेहऱ्यांचा व्यवहार श्रीधर तिळवे नाईक
मोहन भागवत यांनी भाजप ही एक वेगळी पार्टी आहे आणि त्यात काही संघाचे सभासद असतील पण ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे हे अधोरेखित केलेले आहे . साहजिकच त्यावरून वाद होणे अटळ आहे. चौथ्या नवतेची मांडणी करताना मी ज्या काही गोष्टी मी सातत्याने मांडत आहे त्यातील एक गोष्ट म्हणजे उत्तर आधुनिक सब्जेक्ट इज डेड या प्रमेयाला आव्हान देणे गरजेचे आहे कारण ती गोष्ट आता आऊटडेटेड झालेली आहे हे सातत्याने सांगणे आणि चौथ्या नवतेमध्ये मेनी सब्जेक्टस आर बॉर्नड borned हे अधोरेखित करणे . मी वैचारिक लेखनाइतकेच कवितेत आणि कादंबरीत सुद्धा हे अधोरेखित करत असतो . माझ्या अडा हॉ का बा ना सु ना या netamblage ची सुरुवातच मुळात "मी" च्या बाराखडी पासून होते त्याचे कारण तेच होते अनेक मी आलेले आहे आणि आपण सर्व अनेक "मी "ची बाराखडी आहोत हे सांगणे हाच त्यामागचा उद्देश होता . बहुमीवाद असं मी त्याला नाव दिले होते .
साहजिकच सार्वजनिक जीवनात सुद्धा याचे रूपांतर "बहुआम्हीवाद '' मध्ये होणे अटळ आहे याची मला कल्पना होती आहे. याचे सर्वात उत्तम उदाहरण नेहमीच काँग्रेस पक्ष होता तिथे गांधीवाद वेगळा नास्तिक कसा समाजवाद वेगळा अपवादात्मक साम्यवाद वेगळा असे अनेक चेहरे होते अनेकदा आंबेडकरवादी चेहराही होता आणि हाच कित्ता पुढे भाजपने गिरवला काँग्रेस नंतर हा बहु आम्ही वाद आलेला पक्ष भाजप होता अपवाद फक्त कम्युनिस्ट आणि समाजवादी होते याचे कारण हे लोक एका पक्षात बहु बहु आम्ही वाद करत थांबत नाहीत हे लोक अनेक पक्ष स्थापन करून बसलेले आहेत म्हणजे या लोकांनी कधीही बहुआम्हीवाद स्वीकारला नाही विशेषतः 2000 पर्यंत काँग्रेसमध्ये अनेक चेहरे फंक्शनल असतात पुढे मग राहुल गांधी यांचे नेतृत्व आले आणि एकच एक चेहरा प्रस्थापित होऊ लागला आणि यातूनच पक्षाचा दुबळेपणा व्यक्त व्हायला लागला कारण शरद पवार किंवा त्यासारखा नवीन वाटणारा वेगळा वाटणारा चेहरा सामील करून घेणे काँग्रेसला जमलेले नाही. याउलट भाजप याबाबतीत बहु आम्ही वाद ऍक्टिव्ह करण्यामध्ये अतिशय वाकबगार आहे . याचीच फलश्रुती म्हणून पुढे प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपद दिले गेले. शरद पवार जर का भाजपकडे गेले असते तर त्यांना सुद्धा बहुदा राष्ट्रपतीपद मिळाले असते . कारण त्यांच्या अनुभवाची गरज भाजपाला नेहमीच वाटत असते . काँग्रेसला आश्चर्यकारकरीत्या वाटत नाही .
त्यामुळे मोहन भागवत यांचे जे विधान आलेले आहे त्याबद्दल आश्चर्य करावे असे काहीच नाही चौथ्या नवतेमध्ये तुम्ही आता जुन्या पद्धतीने पार्टी चालवू शकत नाही किंवा संस्थाही चालवू शकत नाही किंवा आयडिया लॉजीही चालवू शकत नाही . मी याला नेटॉलॉजी म्हणतो आणि ही नेटॉलॉजी चालवण्यामध्ये सर्वाधिक एक्सपर्ट जर कोणी असेल तर तो हिंदुत्ववाद आहे .तो एकाच पक्षात असून सुद्धा ब्राह्मणी हिंदुत्व ,वैदिक हिंदुत्व ,वैष्णव हिंदुत्व आणि शैव हिंदुत्व अशी चारही हिंदुत्वे पोटात घेऊन आरामात वाटचाल करताना दिसतो. ही जी बहुविधता आहे हे जे अनेक चेहरे आहेत हे पद्धतशीरपणे एकमेकाला कनेक्ट होत राहतात ते जिथे संघर्ष करायचा आहे तिथे संघर्ष करतात आणि जिथे समायोजन करायचे आहे तिथे समायोजन करतात या गोष्टीचा अर्थातच विरोधी पक्षांना विशेषतः समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्ष ज्यांना हे जमत नाही त्यांना त्रास होतो . या लोकांना हे अजूनही कळत नाही की हा चेहरा करा की तो चेहरा खरा या भांडणांना फारसा अर्थ नसतो खरा प्रश्न किती चेहरे खरे आणि किती चेहरे खोटे हा असतो एक चेहरा असण्याचे दिवस कधीच इतिहास जमा झाले हे जर का अजूनही तुम्हाला कळत नसेल तर मग तुम्हाला काय काय घंटा पॉलिटिक्स कळाले ?
मोदी सत्तेवर आल्यानंतर खरे तर मोदींना विरोध करण्यासाठी तरी हे लोक एकत्र येतील असे वाटले होते निदान एकच एक डावा पक्ष ज्यात सर्व समाजवादी आणि कम्युनिस्ट एकमेकात विलीन होतील आणि अनेक चेहऱ्यांचा "बहुआम्ही वाद '' स्वीकारून वावरतील अशी माझी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा काही या लोकांनी पूर्ण केली नाही किंबहुना यांना ना "बहुमीवाद '' पटला ना "बहुआम्ही वाद '' पटला . हे आपल्याच मस्तीत मग्न राहिले आणि वैचारिक मस्ती ही भांगे सारखी असते
ती अशी गोष्ट आहे की ती भल्या भल्या लोकांची वाट लावते आपल्याकडे डाव्या लोकांची वाट त्यामुळेच लागलेली आहे एकीकडे सहिष्णुतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा प्रकारची नेटवर्किंग सहिष्णुता स्वीकारायची नाही असा काहीतरी प्रकार चालतो. म्हणजे मी बारावीला असताना साम्यवादी होतो आणि बाळबोध कविता लिहीत होतो तेव्हा शक्तिपात झाल्यानंतर मी मोक्ष केंद्रित शैव साम्यवादाची संकल्पना प्रस्तुत केली होती पण आश्चर्यकारित्या ए टू झेड कम्युनिस्ट लोकांनी ती नाकारली होती याचे कारण या लोकांना काही नवा चेहरा नकोच असतो नकोच होता यांच्यासाठी फक्त परदेशी चेहरे तेवढेच खरे यामुळे झाले असे की हे कोणीतरी परदेशातून आलेले लोक आहेत अशीच आयडिया लॉजिकल पातळीवर समजूत आहे ही समजूत दूर करण्याचा प्रयत्न नारायण सुर्वे यांनी हा आमचा मार्क्स बाबा वगैरे वगैरे पद्धतीने केला पण तो अपयशी झाला या लोकांना आज सुद्धा कार्ल मार्क्स आणि माओ यांच्या नावाने उचक्या लागतात . वास्तविक मानवेंद्रनाथ राय सारखा माणूस मिळालेला होता पण त्याचा कसलाही वापर या लोकांना करता आला नाही सुभाष चंद्र बोस सुद्धा यांच्या बाजूने आले असते जर का यांनी त्यांना घेऊन आपला चेहरा उभा केला असते मी या लोकांना कितीदा सांगितले की तुम्ही स्वतःला प्रथम कम्युनिस्ट म्हणवून घेणे थांबवा. सर्वात प्रथम तुम्ही भारतीय परंपरेचे नाव जोडा आणि स्वतःला लोकायतवादी आणि नवलोकायतवादी आणि आता किमान उत्तरलोकायतवादी म्हणा . जोपर्यंत तुम्ही स्वतःला नवलोकायतवादी किंवा उत्तरलोकायतवादी म्हणत नाही आणि तुमची परंपरा महर्षी बृहस्पती महर्षी चार्वाक अशा पद्धतीने सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणे शक्य नाही .
आता हे लोक या सगळ्या प्रकाराला साहजिकच डबल स्टॅंडर्ड वगैरे म्हणतील परंतु हे तसे नाही मुळातच आत्ताचा समाज हा नेटवर्किंग सोसायटीमध्ये वावरतो साहजिकच अशा प्रकारची बहु चेहरे असलेली पार्टी त्यांना प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही . "बहुमीवाद" स्वीकारल्यामुळे सामान्य लोक अनेक मी सहज स्वीकारतात आणि त्यांचा मुख्य प्रश्न हा "नेटवर्किंग कसे करायचे'' हा असतो .
तेव्हा अशा प्रकारची विधाने येतात तेव्हा त्यांच्याकडे पॉझिटिव्हली पाहणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादाचे सर्व चेहरे आपणाला ज्याला आज संघपरिवार म्हटले जाते तिथे दिसतात. यांच्यातला अंतर्विरोध अनेकदा दिसतो पण जग हे असेच असतं ते दिवस गेले जेव्हा एक चेहऱ्याने एक सपाट डायरेक्टिव्ह दिले जायचे. आता तसे होत नाही एकदा का हे लक्षात आले तर कदाचित राहुल गांधी बहुचेहऱ्याने कसे वापरायचे ते शिकतील . सहिष्णुता ही आता एककल्ली गोष्ट राहिलेली नाही ती आता बहुकल्ली गोष्ट झालेली आहे. जेवढ्या लवकर हे सत्य विरोधक स्वीकारतील तितके त्यांच्यासाठी बरे आहे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment