नेट : बॉलीवूड
Heroine श्रीधर तिळवे नाईक
हर तरफ पुछता बाजार है
क्या आया कोई नया आकार हैं?
वो इस तरह से पकडी है उसे
वह मोबाईल नही अलंकार हैं
पता नही मेरे सेट पे क्या क्या होगा
उसकी एंट्रीही ऐसी धमाकेदार है
इस तरह से बैठी है योगा मे
सासों को कर रही साकार है
ए शिव उसे इतना सुंदर क्यूँ बनाया
स्मरण होने नही देती तू निराकार है
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: बॉलीवूड या काव्यफायलीतून)
तेरे फोटो अच्छे है मगर तेरे पास सिनेमॅटो नही
शायद गती के साथ अड्जस्ट होने का फॉर्मॅटो नहीं
तू कह रही हैं मेरे बारेमें फीडबॅक नही अच्छा
अपराध हैं मैं मानता हू मेरे पास कोई मोटो नही
वो बॅट लेके हाथमें खेलता नही डान्स करता है
कहा से हैं लेन देन नही मुझे दिखता घेटो नही
तेरा प्रेम होगा भी शायद प्रोटीन की तरह
मगर मेरा भी दिल विटामिन हैं कोई फॅटो नाही
राष्ट्रसंघ की तरह हैं अपनी कलेक्टिव्ह लाईफ
और मौत के बारे मे अपने पास कोई व्हेटो नहीं
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरीज मधील नेट बॉलीवूड या काव्यफायलीतून)
तुझा अविश्वास मी का कॅरी आऊट करू
शक्य आहे
मला मिळालेली संधी फेक असेल
कदाचित त्यांच्या कंपनीत बनत असलेले कपडे
कपडेच नसतील
काय आहे
तुम्ही नट्या कायम अलंकार शास्त्रात पोहत असता
आणि माझे लोक
एकदम सुतासारखे सरळ
संशय कापसासारखा पिंजत
तुझं आयुष्य गेलं
आणि तू म्हणतेस
मला शेती येत नाही
असेलही
पण काय आहे
गायीच्या अनुमानाने बैल मरत नाही
तेव्हा जा
तुझी नकारात्मक आत्मविश्वासाची मर्सिडीज घेऊन
न्यू लिंक रोडवर
मी ती बुलेट ट्रेन आहे
जिचा काळ अजून आलेला नाही
श्रीधर तिळवे नाईक
( नेट सिरीज मधील नेट बॉलिवूड या काव्यफायलीतून)
मी म्हणालो
तीन लाख
तू म्हणालीस
फक्त साडी
निर्माता म्हणाला
तीस लाख
तू म्हणालीस
चालेल बिकनी
यादरम्यान काय घडले
दिल तडफडले
की डील फडफडले ?
कोणता तुझा अवयव होता
जो तुझ्या शरीरात नव्हता
तरी झाला जागा
आणि काहीतरी गडबडले
एक आशाळभूत
चकवून पंचमहाभूत
चेकमध्ये चकचकला
की चुकचुकला
नेमके कशात
कोण वाकला
कणा झोपला
की मेंदू झुकला ?
सभ्य असभ्य
नसते काही
ऑथेंटिसिटी
उरली नाही
काय बाहेर
आणि काय आहे आत
कशाने तुटला आरसा
काय आतून आले गात
होते सारे बाहेर
ज्यांना समजत होतो आत
काय वजूद
की सर्व जादू?
मी फक्त सत्व टांगलेले पाहिले
मी तुला पुरवली खुंटी ?
की मी तयार केली बबली
आणि तू ओळखलीस माझ्यातील बंटी
वाजली घंटी ?
बॉलीवूड नाही चर्च बेल
नाही शिवलिंगावरचे पान बेल
मग कोणी दिली बेल
एक बैल
झाला सैल
लागला सेल
मी कबीर घेऊन नाही बाजारात उभा
दिल डूबा
उभ्या उभ्याने काय कापले गेले
जे आजवर आडवे होते ते उभे झाले
चल
ही हालचाल मला आवडली नाही
एकसंध कपाळ
कायमचे गहाळ
रिस्पेक्ट अस्पेक्ट उरला नाही
इम्पॅक्ट इम्पॅक्ट उरला नाही
उरलेला झाडाचा भुगा
काळजाच्या पायऱ्या उतरत चाललाय
श्रीधर तिळवे नाईक
( नेट सिरीज मधील नेट बॉलीवूड या काव्यफायलीतून)
काय म्हणतील लोक
या विचाराने पडेल भोक
फोटो प्रकट होणारच
तू लुक दे एकदम चोक
कॅमेरा सांभाळावा लागतो
आणि फ्रेमपुढे झोक
प्रत्येक पेन्सिल आखूड
तरी काढत बसते टोक
सक्सेस हीच चावी
तेच बोलते रोख ठोक
श्रीधर तिळवे नाईक
( नेट सिरीज मधील नेट बॉलीवूड या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment