पवार आणि अजित पवार
स्वसंतानमोह , पक्षांतर आणि पक्षमालकी श्रीधर तिळवे नाईक
कुठलाही पक्ष चालवताना त्याचा वारस कोण ह्याविषयी भविष्यकालीन स्वच्छ दृष्टी नसणे हे भारतीय शासकांचे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळेच मग वारस कोण हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो ह्यात त्या संततीचा करिअर बनवण्याविषयीचा गोंधळ हाही एक फॅक्टर असतो बाळासाहेब ठाकरे व शरद पवार ह्यांच्या संततीने प्रथम आम्हाला तुमच्या क्षेत्रात रस नाही असं सांगितल्याने हा गोंधळ सुरु होतो कारण मग स्वतःची संतती वारस बनायला तयार नसेल तर साहजिकच ती व्यक्ती भाचा भाची पुतणा पुतणी ह्यांच्याकडे वळते प्रत्यक्षात स्वतः निवडलेल्या क्षेत्रात मिळणार यश व वडिलांच्या क्षेत्रात दिसू लागलेलं यश ह्यांच्यात प्रचंड तफावत दिसायला लागली कि साहजिकच संतती आपला करियरसंदर्भातला निर्णय बदलते आणि ह्यात गोची बापाची होती कारण तोवर बापाने आपला वारस म्हणून भाचा भाची पुतण्या पुतणी ह्यांना तुम्हीच माझे वारस म्हणून सांगितलेले असते अशावेळी त्या संततीला आपली चुलत व मामे भावंडे सांभाळून पुढे जाता आलं तर ठीक असतं नाहीतर फूट अटळ असते
कुठल्याही आई बापाला स्वसंतानमोह नैसर्गिक असतो त्यामुळे स्व संतानाची निवड अपरिहार्य ठरते ठाकरे व पवार दोन्ही कुटुंबात हेच घडले आहे उद्धव ठाकरे व सुप्रिया पवार ह्यांनी सुरवातीला वडिलांच्या क्षेत्रात स्वतः रस न दाखवल्याने राज ठाकरे व अजित पवार ह्यांची नेतृत्वे पुढे आणली गेली मग अचानक ह्यांचा रस वाढला आणि दुही अटळ झाली पवारांनी तर ह्यावर तोडगाही काढला होता लोकसभा व राष्ट्रीय राजकारण सुप्रियाला व विधानसभा व महाराष्ट्रीय राजकारण अजित पवारांना असा हा तोडगा होता हा तोडगा यशस्वी करण्याचा उपाय एकच होता काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विसर्जन ! दुर्देवाने पवारांनी हे केलं नाही कारण काँग्रेसमध्ये विसर्जित होऊन पंतप्रधानपद मिळणार नाही ह्याची त्यांना वाटणारी खात्री ! भाजपमध्येही ही खात्री नाहीच अशावेळी स्वतंत्र अस्तित्व ठेवून विरोधी आघाडीतून स्वतःसाठी संधी तयार करणे हाच उपाय उरतो तो उपाय ते आता ह्या इलेक्शनमध्ये अजमावतील पवारांच्या पंतप्रधानमोहाचा तोटा झाला तो सुप्रियांना ! कारण राष्ट्रीयसाठी प्रथम शरद पवार मग सुप्रिया पवार हे गणित तेव्हाच फळलं असतं जेव्हा ते यशस्वी झालं असतं
अजित पवारांना शरद पवारांचं हे राजकारण हवेतील किल्ला वाटत होता काका जमिनीवर नाहीत असं त्यांना वाटत होतं साहजिकच राष्ट्रीय राजकारण मायनस केलं तर महाराष्ट्रीय आपल्यासाठी आहे ह्याची त्यांना खात्री होती ही खात्रीच सुप्रियांना अध्यक्ष करून शरद पवारांनी मोडीत काढली राष्ट्रीयचा मोह अजित पवारांना कधीच न्हवता त्यामुळं साहजिकच त्यांनी आपल्या पद्धतीने बंड करून महाराष्ट्रीय बळकावले वास्तविक हे करताना त्यांनी स्वतंत्र पक्ष काढायला हवा होता पण राज ठाकरेंच्या ठायी असलेली धमक त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी आमदारसंख्येचे राजकारण करून पक्षच बळकावला
ह्यातून निर्माण झालेला सर्वात मोठा प्रश्न पक्ष कुणाचा असा होता आणि निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर आमदारांचा असं दिल घराची मालकी घर बांधणाऱ्याकडे असते हे पारंपरिक उत्तर इथे नाकारले आहे व ज्याच्या बाजूने घरातल्या सत्ताधारी नातेवाईकांची संख्या जास्त आहे त्याला घराची मालकी दिली गेली आहे ह्याचे दूरगामी परिणाम काय असतील हे सांगणे कठीण आहे मुळात निवडणूक आयोग हा निवडणुकीच्या आधारेच निर्णय करणे अटळ पण पक्ष व निवडणूक ह्या दोन गोष्टी एकच मानता येतील का हा खरा न्यायिक प्रश्न आहे त्यामुळे कोर्टात हा प्रश्न जाईल तेव्हा ह्या अंगाने वाद होणे अटळ आहे
बाकी लोकशाहीत अंतिम न्यायालय हे लोकच असतात अजित पवारांचा एक फार मोठा गैरसमज म्हणजे लोक त्यांच्याबरोरबर आलेत सोर्री टू से पण लोक त्यांच्याबरोबर नाही तर सत्तेबरोबर गेलेत उद्या निवडणुकीत शरद पवारांच्यामुळे आपण विजयी होऊ शकतो अन्यथा अजित पवारांच्याबरोबर आपण पराभूत होऊ असं वाटलं तर हेच आमदार पुन्हा शरद पवारांच्याकडे परततील हीच गोष्ट शिंदेंची आहे त्यामुळे येति विधानसभा निवडणूक अजित पवार व एकनाथ शिंदे ह्यांची खरी ताकद काय हे ठरवणारी असेल ह्यात काही शंका नाही
सुप्रियाताई अजूनही शरद पवारांच्या आधारे पक्ष उभा करू इच्छितात हे फक्त इमोशनल असेल तर ठीक आहे पण हे जर प्रॅक्टिकलही असेल तर कठीण आहे त्यांनी आता स्वतःच स्वतःचा पक्ष उभा करायचा आहे असं ठरवून कामाला लागावे हे उत्तम महिलांचा उत्तम प्रतिसाद हा त्यांचा फार मोठा असेट ठरू शकतो सद्याची परिस्थिती पाहता माझा स्वतःचा अंदाज आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे व अजित पवार अल्पमतात जातील व भविष्यात भाजप व सुप्रिया सुळे व्हाया शरद पवार एकत्र येतील असा आहे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्याप्रमाणे किंगमेकरच्या भूमिकेत जातील कि विरोधात बसतील हा प्रश्न मात्र अधांतरी आहे एक गोष्ट मात्र नक्की ह्यापुढे अजित पवार , एकनाथ शिंदे व सुप्रिया सुळे ह्यां तिघांनाही इतरांच्या खांद्यावरून उतरून स्वतःचे राजकारण खेळावे लागेल
श्रीधर तिळवे नाईक
अजित पवार : शरद पवार यांच्या आधुनिक मराठा पण परंपराशरण मॉडेलचे उत्तम नेते श्रीधर तिळवे नाईक
अभी अभी तो बैठा था साथ
अभी अभी कहां चला गया
अभी अभी तो हँसा रहा था
अभी अभी कैसे रुला गया
ये जिंदगी है या फिसलन है
कही भी कोई फिसलता है
पल मे होता है कोई सामने
पल मे कोई दर्शन हटा गया
सब कुछ इतना बडा हो गया
कहा जाता है पता भी नही
अभी अभी तो जिंदा था वो
डॉक्टर कह रहा है चला गया
मरना कैसे हो गया सस्ता
जीना हो गया कैसे महंगा
कैसे जिंदगी कोई खरीद सके
खरीद नाही पाया चला गया
जानता हूँ उसका दम घुटता था
हालातके सामने फिरभी टिकता था
फिर ऐसा क्या हुआ टिक नही पाया
बायभी नही बोला और चला गया
श्रीधर तिळवे नाईक
( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
शैव श्रुतीने भारतामध्ये सर्वत्र स्वतःची शासक समाजाची मॉडेल्स तयार केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मध्ये राजपूत पंजाब हरियाणा मध्ये जाट व शीख कर्नाटकात लिंगायत वगैरे वगैरे ही मॉडेल्स आहेत . या मॉडेल्सचे जास्तीत जास्त ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न आपल्याकडे नेहमीच ब्राह्मण धर्म करत असतो . त्याला कधी ही मॉडेल्स बळी पडतात तर कधी पडत नाहीत .
महाराष्ट्रामध्ये प्राचीन कालखंडामध्ये सातवाहन आणि वाकाटक यांनी प्रथम कृषी शासक समाजाचे मॉडेल तयार केले . हे मॉडेल अर्थातच भगवान शंकरांच्या शिवगण मॉडेल पासून सुरू झाले होते .
पुरोगामी कालखंडामध्ये शिवाजी महाराज आणि नंतर महात्मा फुले यांनी दोन मॉडेल्स आपल्यापुढे सादर केली त्यातील फुले यांचे मॉडेल शाहू महाराजांनी पुढे नेले आणि फुले शाहू मॉडेल तयार केले पण हे मॉडेल यशवंतराव चव्हाण यांनी पूर्णपणे कधी स्वीकारले नाही याचे कारण त्यांना ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद मान्य नव्हता . शिवाजी मॉडेल हे कायमच मराठा समाजासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून काम करत राहिले याच मॉडेल मधून एक तिसरे मॉडेल डेव्हलप झाले ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेले यशवंत मॉडेल ! शरद पवार काय किंवा अजित पवार काय हे दोघेही या यशवंत शासक मॉडेलमध्ये वाढलेले राजकारणी होते जोपर्यंत यशवंतराव चव्हाण होते तोपर्यंतच हे मॉडेल ऍक्टिव्ह राहीले त्यामध्ये वसंत दादा पाटील सुद्धा येतात .
या यशवंत मॉडेलचे प्रॉब्लेम सुरू झाले ते 1960 नंतर सुरू झालेल्या राजकारणाच्या आधुनिकीकरणानंतर ! पुरोगामी वादामध्ये वाढायचे की आधुनिक मॉडेल निर्माण करायचे हा एक फार मोठा प्रश्न तत्कालीन मराठा समाजापुढे उभा होता आणि शेवटी वसंत दादा पाटील यांच्या पुरोगामी मॉडेल विरुद्ध बंड करून शरद पवार बाहेर पडले आणि शरद पवार यांनी आधुनिक मॉडेल तयार केले हे मॉडेल तयार करताना जे व्हायचे तेच झाले ते म्हणजे यशवंत मॉडेलमध्ये जी विठ्ठला बरोबर वैष्णव मॉडेल बरोबर युती केली गेली होती ती कायम राखण्यात आली आणि काही वेगळ्या गोष्टी आपोआपच या मॉडेलमध्ये आल्या .
राजकारणाचे आधुनिक मॉडेल हे फार गुंतागुंतीचे प्रकरण आहे मुख्य म्हणजे या मॉडेलला लोकशाहीमध्ये राजकारणी माणसाला प्रचंड पैसा लागतो हे नीट कळलेले आहे पण हा पैसा आणायचा कुठून हा फार मोठा प्रश्न या मॉडेल पुढे होता आणि शरद पवारांनी तो आपल्या पद्धतीने सोडवला . एकीकडे राजकारणाचा फायदा घ्यायचा सत्ता कारणाचा फायदा घ्यायचा आणि स्वतःचे वैश्य धंदे किंवा को-ऑपरेटिव्ह चळवळ आणि व्यवसाय उभे करायचे वाढवायचे आणि त्याचवेळी दिलेल्या व्यवसायाच्या कंत्राटांच्या बदल्यात व्यावसायिक आणि उद्योगपती लोकांच्याकडून फेवर घ्यायचे असे हे मॉडेल आहे . खुद्द इंदिरा गांधी यांनी सुद्धा हे मॉडेल संजय गांधी यांच्या द्वारा गिरवलेले दिसते आधुनिकतेमुळे निर्माण झालेली ही आधुनिक तडजोड होती आणि ती शरद पवार यांनी अतिशय उत्कृष्ट निभवली. को-ऑपरेटिव्ह चळवळ बेस्ड किंवा कमिशन बेस्ड असलेली ही आधुनिकता राजकीय क्षेत्रामध्ये हळूहळू सर्वांनीच आत्मसात करायला सुरुवात केली पण शरद पवार यांच्याकडे जे यशवंत मॉडेलचे पुरोगामी भान होते ते अनेक लोकांच्याकडे नसल्याने फार मोठा भ्रष्टाचार हळूहळू वाढत गेला . शरद पवारांनी जो एक समतोल ठेवला होता तो समतोल अनेकांनी राखला नाही आणि फक्त स्वतःची स्वतःच्या पोटाची आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षाची भूक भागवणे इतकाच उद्योग सुरू केला आधुनिक मॉडेलमध्ये जे को-ऑपरेटिव्ह चळवळीचे मॉडेल आले होते ते खरे तर इंडियाला अतिशय उत्कृष्ट पणाने डेव्हलप करता आले असते परंतु ते न करता भारतातल्या काही राजकारणी लोकांनी अक्षरशः शेण खाल्ले . आधुनिक काळामध्ये साखर कारखान्याचा व्यवसाय हा पुरोगामी फॅक्टरी व्यवसाय नसून आधुनिक इंडस्ट्रियल व्यवसाय आहे याचे भान या लोकांचे लोपले आणि मग आपोआपच साखर कारखाने तोट्यात जायला लागले.
अजित पवार जेव्हा राजकारणात आले तेव्हा या सर्व गोष्टींची सुरुवात झाली होती आणि या सर्व गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी शरद पवार यांनी त्यांच्यावर टाकायला सुरुवात केली आपल्या या पुतण्याची जडणघडण त्यांनी अतिशय व्यवस्थित केली याबद्दल शंका असू नये . या मॉडेल मधले सगळे विधायक आणि विघातक गुण अजित पवार यांनी आत्मसात केले .
विधायक गुण कोणते होते
१ प्रत्येक दिवसाचे व्यवस्थित व्यवस्थापन करून ते व्यवस्थित अंमलात आणणे.
२ कार्य तत्परता आणि कार्यक्षमता आणि लोकांच्या केलेल्या कामामुळेच आपल्याला लोक मतदान करतात यावर दृढ श्रद्धा ठेवून काम करणे .
३ व्यसनांच्या पासून जास्तीत जास्त लांब राहणे टाळता येत नसेल तर निदान कमीत कमी करणे
४ काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित लक्षात ठेवणे त्याच्या कार्याला व्यवस्थित लक्षात ठेवणे आणि त्याला आपल्याशी इमोशनली किंवा इंटेलेक्च्युली जोडून घेणे
५ व्यवस्थापन हा आधुनिकतेचा कणा आहे हे ओळखून सर्व भर व्यवस्थापनावर देणे आणि पुरोगामी लोकांचा जो आयडियालॉजीवर भर होता तो कमी करत अधिकाधिक कार्यक्षम व्यवस्थापन उभारणे .
शरद पवारांनी अतिशय उत्कृष्ट आदर्श याबाबतीत ठेवला होता आणि हे पवार यांचे मॉडेल अजित पवार यांनी व्यवस्थित आत्मसात केले होते त्यामुळे हे सर्व गुण त्यांच्या नेतृत्वाच्या ठाई आपणाला दिसतात शरद पवार याबाबतीत सर्वात वाकबगार नेत्यांच्या पैकी एक होते त्यांच्यानंतर कदाचित किंवा त्यांच्या बरोबरीने कदाचित फक्त नरसिंहराव होते . साहजिकच या दोघांच्यातच नंतर स्पर्धा निर्माण झाली. इंदिरा गांधींना कधीही आधुनिक मॉडेल जमले नाही त्या फक्त स्टैलीनच्या पुरोगामी मॉडेलमध्ये अडकून पडल्या आणि या देशाचा पुरेसा सत्यानाश त्यांनी केला सुदैवाने स्टॅलिन बनण्याची त्यांची महत्त्वकांक्षा भारतीय जनतेने उधळून लावली . त्यांच्या मुलाकडे मात्र म्हणजेच राजीव गांधी यांच्याकडे मात्र आधुनिक आणि उत्तर व्यवस्थापकीय मॉडेलची सर्व क्षमता होती . दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले आणि काँग्रेसला त्याचा फटका पडण्याची बरीच शक्यता होती पण सुदैवाने प्रथम नरसिंहराव आले आणि नंतर मनमोहन सिंग आले दुर्दैवाची गोष्ट अशी की हे मॉडेल कधीही सोनिया गांधी या व्यक्तीला कळले नाही त्यामुळे तिने नरसिंहरावांचा जितका अपमान करता येईल तितका केला आणि नंतर मनमोहन सिंग यांच्या कामामध्ये अडथळे आणले. या सोनिया गांधींनी खरे तर थोडी जरी अक्कल असती तर शरद पवार यांना पुन्हा जोडून घेतले असते आणि महाराष्ट्र पूर्णपणे शरद पवारांच्या हातात दिला असता राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो इतकी बेसिक गोष्ट सोनिया गांधी यांना कळली नाही . स्वतः काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांच्या कामात अडथळे आणणे याखेरीज त्यांनी काय केले असा एक प्रश्नच पडतो . माझे स्वतःचे मत असे की स्वतः शरद पवार यांनी मग काँग्रेसमध्ये एकतर्फी जायला हवे होते आणि मग महाराष्ट्राची काँग्रेस आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे होती . पण शरद पवार यांनीही हे केले नाही कारण त्यांना सतत ही भीती होती आणि आजही आहे की सोनिया गांधी आपला अपमान करतील या भीतीमध्ये तथ्य आहे जिथे ही बाई भारताचे पंतप्रधान असलेल्या नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांना सोडत नाही तिथे बाकीच्यांना काय वागणूक देणार आज काँग्रेसचा जो काय सत्यानाश झालेला आहे त्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रचंड वाटा आहे.
साहजिकच शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस वाढवत नेणे याखेरीज दुसरा कोणताही उपाय नव्हता अजित पवार यांना शरद पवार यांची व्यवस्था आणि विवशता कळली का हा एक फार मोठा प्रश्न माझ्या मनात कायमच निर्माण झालेला आहे .
पवार यांनी मुख्य काँग्रेस सोडून स्वतःची जी कोंडी करून घेतली त्याचा सर्वाधिक मोठा बळी अजित पवार ठरले . 2014 पर्यंत अजित पवार यांना असा विश्वास होता की शरद पवार यांचे मॉडेल आपल्याला मुख्यमंत्री बनवेल परंतु मोदी लाट आली आणि सर्व समीकरणे बदलली.
नरेंद्र मोदी हे भारताच्या राजकारणामध्ये अत्यंत गुंतागुंतीची अशी उत्तर आधुनिकता घेऊन आले आहेत. तिच्या केंद्रस्थानी धर्म आणि धर्माची परंपरा आहे . शरद पवार यांची गोची अशी आहे की या धर्माचे आणि उत्तर परंपरा वादाचे काय करायचे हे त्यांना कळत नाही आणि पुरोगामी आणि आधुनिक असलेला धर्मनिरपेक्षता वाद हा जनतेनेच कालबाह्य ठरवून टाकला आहे. अजित पवार यांचे मोठेपण असे की त्यांनी मात्र धर्माचे झालेले पुनरागमन ओळखले आणि म्हणूनच मग ते सातत्याने आता आपण भाजपशी युती केली पाहिजे कारण आपल्याला काँग्रेस सामावून घेणार नाही या मोडस ऑपेरेंडी मध्ये आले होते. काँग्रेसला फारसे भवितव्य नाही हे अजितदादांना शरद पवार यांच्या पेक्षा जास्त व्यवस्थित कळाले होते . याला कारण अर्थातच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयीचे त्यांचे आकलन होते. हे आकलन शरद पवारांच्या आकलनापेक्षा अधिक उजवे होते . साहजिकच मग शरद पवार यांचे व्यवस्थापन आणि अजित पवार यांचे उत्तर व्यवस्थापन यांच्यामध्ये एक संघर्ष उडाला कारण उत्तर व्यवस्थापन हे धर्माशी तडजोड करायला तयार असते तर आधुनिक व्यवस्थापन आणि पुरोगामी व्यवस्थापन हे पूर्णपणे ही तडजोड नाकारतात . अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जी व्यवस्थापनाची लढाई झाली तिची पार्श्वभूमी ही होती . ज्यांना खरोखर प्रत्यक्ष राजकारण कळते त्यांनाच हे कळणे शक्य होते आपल्याकडच्या बहुतेक पत्रकारांचा याबाबतीतला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते फार जनतेच्या बाजूने सर्व बघत असतात जनतेच्या बाजूने पत्रकाराने बघितलेच पाहिजे परंतु राजकीय विचारवंतांना मात्र फक्त जनतेच्या बाजूने बघून चालत नाही त्यांना राजकारण खेळणाऱ्या लोकांच्या बाजूने सुद्धा राजकारण बघावे लागते. निदान माझा तसा प्रयत्न असतो.
प्रश्न असा होता की धर्माशी समजा तुम्ही तडजोड करणार असाल तर तुमचा धर्म नेमका कोणता आणि अजित पवार यांचा खरा गोंधळ या प्रश्नांमध्ये उडाला . अंगात भिनलेली धर्मनिरपेक्षता जात नाही आणि युती मात्र उत्तर आधुनिक राजकारणाशी आणि हे राजकारण करणाऱ्या पक्षाशी करायची आहे जो धर्म हीच राजकीय विचार प्रणाली मानतो. याला मी उत्तर परंपरा वाद म्हणतो जो परंपरेला नूतन करून नव्यारूपात घेऊन येतो विशेषता धार्मिक परंपरेला अधिक घेऊन येतो .
या व्यवस्थापना मधली एक गुंतागुंत अशी होती की भारतामध्ये सामाजिक व्यवस्था म्हणून वर्ण जात प्रस्थापित झाले होते आणि प्रश्न असा होता की हे हाताळायचे कसे ? यशवंतराव चव्हाण यांनी महात्मा फुले यांचे ब्राह्मण ब्राह्मणे तर हे मॉडेल स्पष्टपणे नाकारले आणि सर्वच जातींना सोबत घेऊन जाण्याचा आणि याबाबतीत शिवाजी महाराजांना फॉलो करायचा निर्णय घेतला आणि त्याच पद्धतीचे राजकारण केले. साहजिकच त्यांच्या गोतावळ्यामध्ये ब्राह्मण लोकांची संख्या सुद्धा भरपूर होती .शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही हाताळणी अधिक परिपक्व केली पण त्यांच्या दुर्दैवाने 1980 नंतर उत्तर परंपरा वादामुळे सर्व जातीय परंपरा इतक्या वेगाने आणि इतक्या उंचीने वाढत गेल्या की त्या हळूहळू त्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या . शरद पवारांचे एक जातीय गणित पक्के होते ते म्हणजे या सर्व राजकारणामध्ये मराठा हा जातीय समुदाय मुख्य केंद्र ठेवायचा . पण दुर्दैवाने 1980 नंतर हा मराठा समुदाय आधुनिक होण्याऐवजी अधिकाधिक पारंपारिक होत गेला आणि त्याचा प्रचंड फटका शरद पवार यांना पडला . मुख्य म्हणजे मंडल आयोगानंतर ओबीसी मराठा वेगळा आणि 96 कुळी मराठा वेगळा असे दोन मराठा समुदाय स्पष्टपणे निर्माण झाले आणि त्यातील ओबीसी मराठा समुदाय हा थेट भाजपकडे गेला . छगन भुजबळ यांनी केलेले पक्षांतर हे सर्वात अधिक जातीय समीकरणांना हादरवणारे होते आणि शरद पवार यांचा तो सर्वात मोठा पराभव होता . अजित पवार याबाबतीत अधिक यशस्वी झाले .
पण यावेळी शरद पवार यांच्या मॉडेलमध्ये एक मोठा घोळ झाला तो म्हणजे सुप्रिया पवार यांनी स्पष्ट आणि स्वच्छ पणाने मी विठ्ठल मुख्य देव मानते अशी घोषणा केली साहजिकच आता यांना हरवलेच पाहिजे अशी शैव भूमिका बहुजन समाजाची तयार होत गेली आणि त्याचे प्रतिबिंब पालिकांच्या निवडणुकीत पडलेच आहे. निखळ वैष्णव असणाऱ्या कोणालाही यापुढे राजकारणात विजयी होऊ द्यायचे नाही हे ठरलेले आहे मग ते कोणीही असोत आणि कुठल्याही पक्षात असोत त्यामुळे सुप्रिया सुळे यांना हरवणे गरजेचे बनले . त्यांनी शैव श्रुतीला फार लाईटली घेतलेले आहे ओबीसी समाजामध्ये घडलेला बदल त्यांना कळत नाही कळलेला नाही .
शरद पवारांना उत्तर परंपरा वादाला मिळालेले हे सर्व यश तात्कालिक आहे असे वाटत होते आणि ते तसे आहे की नाही हे या नगरपालिका निवडणुकीमध्ये दिसून आले मात्र या उत्तरपरंपरा वादाबरोबर तळजळ करून आपल्या पदरात नेमके काय पडेल हा जो शरद पवारांचा प्रश्न आहे तो सध्या तरी शरद पवार बरोबर होते असे सांगणारा आहे असे दिसते आहे परंतु कदाचित लॉन्ग रनमध्ये गोष्टी बदलू शकतात या सगळ्यांमध्ये मग आपोआपच शरद पवारांचे शरद मॉडेल हे पूर्णपणे उध्वस्त होत गेले आणि अजित पवारांना स्वतःचे मॉडेल उभा करायला एक आवकाश मिळाला पण दुर्दैवाने या अवकाशाची जडणघडण होण्याआधीच त्यांचा आता अकाली मृत्यू झाला आहे .
अजित पवार हे शरद पवारांच्या व्यवस्थापन शैलीचे अनुयायी होते त्यामुळे साहजिकच सकाळपासून कामाला सुरुवात करणे व्यवस्थापनामध्ये कामाचा वेग वाढवणे आणि कामे पूर्ण करणे कामांना आवश्यक असणारा पैसा उभा करणे ही शरद पवार मॉडेलची सर्व वैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली होती त्यांची शरद पवार यांच्यासारखीच जनतेशी बांधिलकी होती जनतेची कामे झाली पाहिजेत आणि ही कामे व्हायची असतील तर सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे हा शरद पवार वाद आहे तो त्यांनी अधिक पुढे नेला.
त्यांच्याकडे संयमाचा अभाव होता का हा एक फार मोठा प्रश्न आहे मुळात हा त्यांच्या काकांच्या बद्दलच प्रश्न आहे पण तरीही काकांच्या तुलनेत त्यांच्याजवळ संयम कमी होता असे दिसते. लोकांची कामे करण्यासाठी सत्ता गरजेची वाटणे आणि लोकांची कामे करताना हळूहळू सत्तेचे व्यसन लागणे या दोन गोष्टीत फरक आहे शरद पवार यांना हा फरक कळाला होता का किंवा कळाला आहे का हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यामानाने सुप्रिया सुळे याबाबतीत अधिक संयमी आहेत याचे कारण मुळातच त्या राजकारणात सत्ता गेल्यानंतरच्या मुख्य कालखंडात राजकारणात आलेल्या आहेत सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की राजकारण खेळायला लागणारा फायनान्स शरद पवार यांच्याकडे पूर्वीसारखा येत नाहीये. गौतम अडाणी यांच्याबरोबरची युती स्टेजवर दिसली त्यामागचे खरे कारण हेच आहे. व्यापारी लोक नेहमीच जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावतात . सर्वच घोड्यांच्यावर थोडा थोडा पैसा लावायचा ही त्यांची पॉलिसी असल्यामुळे अर्थातच काही पैसा विरोधकांच्याकडे पण जात जातो कारण जनता काय करेल याचा कसलाही अंदाज आपणाला येऊ शकत नाही असे व्यापारी वर्गाचे स्पष्ट मत आहे किंबहुना त्यांच्यासाठी हा कायमच एक्स फॅक्टर असतो त्यामुळे साहजिकच ते विरोधकांना पैसे देतात परंतु मर्यादित देतात त्या उलट त्यांच्या दृष्टीने जो निवडून येणार आहे त्याच्याकडेच जवळजवळ 70 टक्के पैसा ते वळवतात . भारतामध्ये विरोधक अनेक असल्याने उरलेले 30 टक्के पैसे हे असे अनेक लोकांच्या अनेक पक्षांच्या मध्ये विभागले जातात आणि कुठल्याच पक्षाला त्याचा फायदा होत नाही मात्र मिळणारा तुकडा सुद्धा इतका महत्त्वपूर्ण होत जातो की त्यासाठी सुद्धा व्यापारी लोकांचे उद्योगपती लोकांचे आभार मानावे लागतात . अजित पवार यांना याचे भान होते मात्र कमिशन बेस्ड आर्थिक धोरण हेच त्यांच्या कुवती मधले होते याबाबतीत सुप्रिया अधिक तयार होऊ शकतात पण त्या तशा झाल्या आहेत की नाही हे सांगणे आत्ता कठीण आहे . त्यामुळेच राष्ट्रीय राजकारण त्यांना देणे याशिवाय शरद पवार यांच्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नव्हता . एका अर्थाने अजित पवार यांच्या या अक्षमतेमुळे पवारांची कोंडी झाली . त्यानंतर प्रश्न मग हाच होता की महाराष्ट्रातल्या राज्य राजकारणावर संघटनेवर कोणाचे जास्त प्रभुत्व आहे आणि या प्रश्नाचे उत्तर अजित पवार यांनी दिले आणि ते पॉझिटिव्ह होते त्यांनी स्पष्टपणे सिद्ध केले की संघटनेवर तुमच्यापेक्षा म्हणजेच काकांच्या पेक्षा माझी पकड जास्त आहे अर्थात यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आहे पण त्याचबरोबर हेही खरे की हे सर्व कॉन्टॅक्टस हे सर्व नेटवर्क शरद पवार यांनी त्यांना दिले होते हे नसले की काय होते हे अजित पवारांना कदाचित कधीच कळले नाही म्हणूनच बंड करायला ते पुढे गेले अर्थातच ज्यांना सत्तेशिवाय जगता येत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस मधले अनेक नेते त्यांच्या मागे उभे राहिले हेही तितकेच खरे! त्यामुळे प्रत्यक्षामध्ये हे संघटन कौशल्य होते की त्यांच्या मागे उभे असलेल्या राजकीय नेत्यांची (त्यातले काही म्हातारे झाले होते) सत्ता लालसा कारणीभूत होती हा एक फार मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे एकंदरीत अजित पवार यांच्याकडे बघताना असे दिसते की उत्तर परंपरा वाद हा विजयी झालेला आहे हे त्यांना आपल्या काकांच्या पेक्षा अधिक कळाले परंतु काकांची संपूर्ण राष्ट्रीय राजकारण खेळण्याची प्रतिभा त्यांच्याकडे नव्हती ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच ते राज्याच्या राजकारणात नेहमीच खुश होते एका अर्थाने त्यामुळे त्यांच्यामध्ये क्षेत्रपालाची मेंटॅलिटी डेव्हलप होत गेली शरद पवार क्षेत्रपालापेक्षा फार मोठे आहेत ते संपूर्ण राष्ट्रपाल होऊ शकतात किंबहुना तेच एक असे मराठी नेते होते जे भारताचे पंतप्रधान बनू शकले असते पण दुर्दैवाने मराठी माणसांनी त्यांचा घात केला . मुख्य काँग्रेस सोडण्याची त्यांची खेळी ही त्यांनी आयुष्यात केलेली सर्वात मोठी घोडचूक होती एका अर्थाने कळत नकळत राष्ट्रीय राजकारणात त्यांनी स्वतःला ओव्हरएस्टीमेट केले . आणि हीच त्यांची चूक होती या चुकीने त्यांना राष्ट्रीय राजकारणातून नंतर हळूहळू नाहीसे केले . अजित पवार यांनी हे समजून घेतले परंतु नंतर आपल्या काकाची साथ सोडली कारण काकांच्या बरोबर राहून आपले मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही याची त्यांना खात्री पटली. प्रॉब्लेम फक्त एकच होता तो म्हणजे भाजप बरोबर युती करून कसे काय त्यांचे स्वप्न साकार होणार होते ? इथे कळत नकळत जी चूक काकांनी केली तीच पुतण्याने केली आणि ही चूक होती राज्य राजकारणामध्ये स्वतःला ओवर एस्टिमेट करणे .
आता अजित पवार गेलेले आहेत आणि त्यांच्या गुणांची आठवण येणे अटळ आहे . उत्कृष्ट व्यवस्थापक हीच त्यांची सर्वात पहिली राजकीय ओळख आहे जी त्यांच्याकडे काकाकडूनच वारसा म्हणून आली होती . पण शरद पवार आणि त्यांच्यात एक फरक होता तो फरक म्हणजे शरद पवार कधीच फार बोलत नसत आणि स्पष्ट बोलताना सुद्धा ते खूप गोड असतात अजित पवार मात्र याबाबतीत फटकळ आणि स्पष्ट वक्ते होते. मात्र इमोशनल होण्याची काकाची क्षमता खूप कमी होती आणि कधीकधी त्यामुळेच ते कोरडे वाटायचे या उलट अजित पवार कळत नकळत अधिक भावनाप्रधान होते प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांचा इमोशनल बॉण्ड पक्का असायचा . शरद पवार यांच्यावर मात करताना कळत नकळत त्यांना त्यांच्या ह्या गुणाचा फायदा झाला. मात्र पवारांच्या पेक्षा त्यांचे नेटवर्क वाढवणे ही त्यांची जबाबदारी होती परंतु ती काही त्यांना पेलली असे वाटत नाही
जे नेटवर्क चालत आले होते तेच त्यांनी अधिक चांगल्या रीतीने सत्तेच्या दिशेने नेले पण हे नेटवर्क वाढले का तर नाही त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याला शरद पवार यांच्यापेक्षा अधिक मर्यादा होत्या याबद्दल शंका असू नये . राज्याबाहेर स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणे त्यामुळेच त्यांना शक्य झाले नाही किंबहुना तो त्यांच्या क्षमते बाहेरचा विषय होता . मात्र राज्यपातळीवरची त्यांची क्षमता ही निश्चितपणे मुख्यमंत्री होण्याची होती. दादा एकदा तरी मुख्यमंत्री व्हायला हवे होते असे मला प्रामाणिकपणाने वाटते. एकदा तशी संधीही होती परंतु शरद पवारांनी ऐन वेळेला माघार घेऊन त्यांच्यासाठी ही संधी गुप्त करून टाकली. कळत नकळत या गोष्टीचा त्यांना राग असावा आणि शरद पवार यांना त्यांनी सोडले त्याचे हेही एक कारण असावे .
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा सर्व लोक आता सुप्रिया सुळे यांच्याकडे वळले तर आश्चर्य वाटणार नाही प्रश्न इतकाच आहे की हे सगळं घडवायचे कसे ? कारण भाजप बरोबर असलेली सत्ता कोणीही सोडणार नाही किंबहुना अजित पवार यांच्याबरोबर आलेले सर्व लोक हे सरळ सरळ सत्तेसाठी त्यांच्याबरोबर आले होते त्यामुळे हे लोक भाजपमध्ये गेले तरी आश्चर्य वाटून घेऊ नये कारण या लोकांच्याकडे कुठलीही आयडिया लॉजी नाही हे फक्त सत्तेचेच भुकेले आहेत . यामुळे अर्थातच सर्वाधिक फायदा हा भाजपचा होणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये शिरले तर आश्चर्य वाटून घेऊ नये विशेषता ज्यांना शरद पवार यांना तोंड दाखवण्याची लाज वाटते त्यांच्या बाबतीत तर हे घडणे अटळ आहे. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री बनण्याची वाट यामुळे अधिक सुलभ होणे अटळ आहे . त्या स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रातली सत्ता खेचू शकतात का हा पुढच्या इलेक्शन मधला एक फार मोठा इशू असणार आहे. शक्यता अशी आहे की त्या स्वतःच भाजपला जाऊन मिळतील.
अजित पवार यांच्या मुळे व्यवस्थापन उत्तम करणारा आणि सरकार व प्रशासन कसे चालवायचे याची उत्तम जाणीव असणारा अत्यंत धुरंदर उमदा असा खंदा नेता गेला याबद्दल शंका असू नये.
माझी त्यांना मनापासून आदरांजली ! दादा तुम्ही फार अवेळी गेला .
श्रीधर तिळवे नाईक
ते गेले तेव्हा श्रीधर तिळवे नाईक
१
पर्याय दोनच आहेत
शक्तिपात
किंवा शक्ती क्रॅश
२
आजतागायत कळालेले नाही शक्ती नेमकी कुठल्या मार्गाने येते
आणि कुठल्या मार्गाने नेते
३
ती कधी जमिनीवरून येते
तर कधी आकाशातून
पण कुठूनही येते
४
असं नाही की जग उलटापालट करत बसले आहे
पण एक बोल्ट निखळला
की बरेच काही निसटते निखळते
मला माहित नाही
काय नाही निखळते आहे
बस एक आवाज आहे
मात्र तो निखळण्याचाच आहे असे नाही
तो कदाचित तुझ्या निखळ हसण्याचा पण असू शकतो
५
मला शोक नाही
मुक्त माणूस अशोक असतो
मात्र याच अशोक वनात
एक सीता कधी कधी रडत असते
६
तुझी शेवटची ओळख घड्याळ होती
याचा अर्थ इतकाच
काळ अजून क्रॅश झालेला नाही
श्रीधर तिळवे नाईक
( मोक्ष या सिरीजमधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्य फायलीतून)
सुनेत्रा पवार यांची एन्ट्री आणि भारतीय राजकारणाचा इतिहास श्रीधर तिळवे नाईक
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्ष दोन पद्धतीने जाणार हे फार स्पष्ट होते पहिली दिशा ही विलीनीकरणाची होती आणि दुसरी दिशा वेगळीकरणाची होती अजूनही हे स्पष्ट नाही की नेमके काय होणार आहे परंतु सध्या तात्कालिक विजय हा वेगळीकरणाला मिळालेला आहे
ज्यांनी १९८० चे राजकारण पाहिलेले आहे त्यांना हा गोंधळ स्पष्टपणे कळू शकतो कारण नेमका हाच गोंधळ जेव्हा संजय गांधी यांचा अचानक अपघाताने मृत्यू झाला त्यावेळी त्यावेळी झाला होता यानंतर जी राजीव गांधी यांची एन्ट्री झाली तो एक फार आमच्या पिढीसाठी ऐतिहासिक क्षण होता त्यावेळी नेमके काय झाले? हे पुढील भाषेत सहज दिसेल
राजीव गांधी यांच्या entry ची गझल श्रीधर तिळवे नाईक
तुझ्या माझ्या हातातून निसटलेले आहे
हे राजकारण आता इतके भटकलेले आहे
ज्याचा त्याचा अभिनय चालू आहे नीट
ज्यांने लिहून दिलेले वाचले स्क्रिप्ट ते वाचलेले आहे
शोधूनही सापडणार नाही कोण आहे खरा सूत्रधार
आपण फक्त पहायचे ते डोके जे हललेले आहे
प्रत्येक नेत्यांमध्ये आहे एक संस्थानिक लपलेला
आणि लोकांनीही ते संस्थानिकपण जपलेले आहे
माहित नाही त्यांना अशी कोणती सत्तेची घाई होती
आत्तापर्यंत जे गॅलरीत होते ते रेस मध्ये उतरलेले आहे
अगदी अनपेक्षित पणे कोणी रंगमंचावर आहे आला
तो रेसमध्ये आला आहे आणि भांडण थांबलेले आहे
नवीन पिढीचा नायक आहे कदाचित नवे युग येईल
त्याच्या हातात संगणक दिसतोय
पण बोट थांबलेले आहे
तुम्ही त्याची आई पाहताय पण मी तिचा हा मुलगा पाहतोय
ती आऊटडेटेड झालेली पण तारुण्य सळसळलेले आहे
असेल ही ती कधीकाळी रणरागिनी दुर्गा तुमच्यासाठी
माझ्यासाठी मात्र नवे ऑर्केस्ट्रेशन वाजलेले आहे
माहित आहे माझ्यामुळे नवा विचार तुम्हाला खूपतो
पण लक्षात ठेवा जागे होईल
आत्ता जे झोपलेले आहे
काय बोलायचे ते बोला तुम्ही शक्य आहे मूर्ख ठरेन
नाही तरी तुम्ही शहाण्यांनाच आधी मूर्ख ठरवलेले आहे
होऊ शकते की या कोल्हापुरात मी मारला जाऊ शकतो
इतके या शहराचे आता हवामान खालावलेले आहे
माझ्याजवळ माझे म्हणावी अशी फक्त आहे फॅमिली
तुमच्याजवळ आहे टीम जिला मी आव्हान दिलेले आहे
भल्या भल्या लोकांना या व्यवस्थेने व्यवस्थित केले
माझ्या अव्यवस्थितपणानेच मला इथे वाचवलेले आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
यावेळी जे काही घडले ते सर्व या कवितेत आलेले आहे आता मात्र नेमके उलटे घडलेले आहे म्हणजे अजित पवार यांचा मुलगा सत्तेवर येण्याऐवजी त्यांची पत्नी सत्तेवर आलेली आहे पण प्रश्न मात्र तेच आणि तसेच आहेत मुलगा सत्तेवर येण्याऐवजी आई सत्तेवर आलेली आहे आणि तरीही निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत फारसा फरक पडलेला नाही. एका अर्थाने महाराष्ट्राची इंदिरा गांधी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे .
प्रश्न हाच आहे की सुनेत्रा पवार या इंदिरा गांधी होऊ शकतील का ? कारण जेव्हा नेहरू गेले तेव्हा नेहरूंच्या नंतर काय असा प्रश्न उभा राहिला होता त्यावेळी ही दोन प्रकाराचे लोक होते ज्यांना नेतृत्व पूर्णपणे वेगळ्या हातात जावे असे वाटत होते आणि ज्यांना संस्थानिक पणाची सवय झाली होती त्यांना नेहरूंचीच मुलगी सत्तेवर यावी असे वाटत होते यामध्ये एक खेळी अशी होती की इंदिरा गांधी सत्तेवर आल्या की त्या आपल्या हातातील भावले म्हणून आपणाला हव्या तशा काम करतील भारतीय राजकारणात हा विचार नवीन नाही किंबहुना हा थेट महाभारत काळापासून सुरू होतो जिथे शकुनी दुर्योधनाला आपल्या तालावर नाचवत होता पुढे राजाराम महाराजांना सुद्धा सत्तेवर आणण्याचा जो घाट घातला गेला होता तो याच स्वरूपाचा होता . संभाजी महाराज हे पूर्णपणे स्वतंत्र वृत्तीचे असल्याने ते आपल्या तालावर नाचणार नाही हे लक्षात आलेल्या लोकांनी हा उद्योग केला होता पण तो काही फार यशस्वी झाला नाही आणि त्यामध्ये अण्णाजी फसले आणि नंतर हत्तीच्या पायाखाली गेले . आज सुद्धा फडणवीस यांना जेव्हा अण्णाजी म्हटले जाते तेव्हा ते अशा प्रकारचे राजकारण खेळतात असे अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात ते तसे नाही त्याची कल्पना मला आहे त्यांचा यासंदर्भातला रोल हा अतिशय मर्यादित आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हा पूर्णपणे राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचा प्रश्न आहे आणि प्रॉब्लेम तिथेच झाला . कारण पुन्हा पर्याय दोन होते एक शरद पवार यांच्या दिशेने जाणार होता तर दुसरा स्वतःची सत्ता तात्पुरती का होईना परंतु भाजप जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत शाबूत ठेवणारा होता मुळात ज्यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडली त्यांना सत्ता इतकी प्रिय आहे की ते शरद पवारांच्या कडे जाणे शक्यच नव्हते पवारांच्या बरोबर जायचं म्हणजे पवार स्वतः मोदींच्या बरोबर यायला हवेत भाजप बरोबर यायला हवेत आणि या दिशेने नक्की प्रयत्न झालेले असतील असे मला वाटते पण ठामपण न आढळल्याने किंवा ठाम उत्तर नाही मिळाल्याने शेवटी मग सध्याची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी म्हणून आपण आता सुनेत्रा पवार यांना आणले पाहिजे असा विचार केला गेलेला आहे अजित पवारांचा जो सकाळच्या सरकारचा नाट्यप्रयोग पार पाडला त्यावेळी ठाम पण नसले म्हणजे काय होते याचा अनुभव या लोकांना असल्याने बहुदा पुन्हा एकदा अशीच दुविधा आढळल्यानंतर त्यांनी आपली सुविधा शोधलेली आहे शिवाय दुसरा प्रॉब्लेम हाही होता की जर का सुप्रिया मुळे या आल्या तर त्या अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे राजकारण करणारे असल्याने कदाचित आपल्याला हवे ते स्वातंत्र्य मिळणार नाही . थोडक्यात काय तात्कालीन सत्तेचा विचार हा जो यशवंत आणि शरद पवार मॉडेलचा प्रॉब्लेम आहे तोच इथे कार्यान्वित झाला यशवंतराव चव्हाण यांच्या मॉडेल मध्येच हा प्रॉब्लेम होता आणीबाणीच्या काळामध्ये बाहेर पडायचे असून सुद्धा आणीबाणीत यशवंतराव चव्हाण पूर्णपणे बाहेर पडले नाहीत चालढकल करत राहिले कारण सत्ता प्रत्येकाला हवी असते . किंबहुना मराठा लोकांच्या बद्दल दिल्लीमध्ये हेच बोलले जाते की मराठा प्रत्यक्ष सत्ता कधीच ताब्यात घेत नाहीत ते कायमच कोणी ना कोणीतरी बादशहा नेमत असतात किंबहुना हा मराठा मॉडेलचाच प्रॉब्लेम आहे ते दिल्ली ताब्यात घेतच नाहीत पण दिल्लीचे सगळे फायदे त्यांना हवे असतात . उत्तर भारतीय लोक आता याबाबतीत शहाणे झाल्याने ते असा फायदा मराठ्यांना घेऊ देत नाहीत पण मुंबई हे क्षेत्र मराठ्यांच्या ताब्यात असल्याने त्यांना झक मारत मराठ्यांशी तडजोड करावी लागते आणि ही तडजोड कायम करावी लागत असल्याने ती टाळता यावी म्हणूनच मुंबई वेगळी करण्याचा घाट अनेकदा घाटला जातो .
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरच्या काळात सुरुवातीला पहिला गट विजयी झाला आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले परंतु हा विजय फार काळ टिकला नाही आज सुद्धा लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत संशयाचे धुके आहे आणि त्याचा एक पदर हा इंदिरा गांधींना सत्तेवर आणण्याचा प्लॅन कम्युनिस्ट रशियन सरकारने केला होता काय या अंगाने येतो त्यांचा ताश्कंद मधला मृत्यू आजही संशयास्पद आहे याबद्दल शंका नाही .
त्यामुळेच आज सुद्धा अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल वारंवार संशय व्यक्त केला जातो आणि हा होतच राहील . माझा अंदाज चुकला नाही तर या संदर्भातले अंतिम उत्तर कधीही मिळणे शक्य नाही आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूसारख्याच हा विषय कायम चघळला जाईल .
थोडक्यात काय राज्यप्रमुखाचा अंत आणि त्याच्यानंतर होणारी परिस्थिती हा एक सनातन राजकारणातला सनातन चक्रव्यूह असतो तोच आता आपल्यापुढे उभा राहिला आहे आणि प्रत्येक जण त्याचे विश्लेषण करत बसलेला आहे .
प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार हा या चक्रव्यूहातला अभिमन्यू आहे का ? आणि तो शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही बाजूंनी ठरवला गेलेला आहे का ? की फक्त ही ज्यांना सत्तेची घाई झालेली आहे अशा लोकांनी खेळलेली तात्पुरती खेळी आहे ? कदाचित नीट निर्णय न घेता आल्याने आता केलेली चालढकल आहे ? कारण जे घडले ते इतके अनपेक्षित आहे की कदाचित काहीच ठरवता येत नसावे . ही नेमकी तीच परिस्थिती आहे जी लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर निर्माण झाली होती आणि नंतर संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर निर्माण झाली होती अशा परिस्थितीच्या वेळी अनेकदा सगळे वातावरण थंड करण्यासाठी म्हणून परंपरेचा आधार घेतला जातो म्हणजेच परंपरा ज्याला मान्यता देईल असा उमेदवार निवडायचा म्हणजेच राजेशाही निवडायची म्हणजे संस्थानिकशाही निवडायची आणि त्या राजाचा त्या संस्थानिकाचा वारस सत्तेवर नेमायचा . अगदी इंदिरा गांधी यांची निवड सुद्धा याचमुळे झाली होती त्यापूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये सर्व संस्थानांच्या मध्ये इंग्रज हेच करत होते तेव्हा आपणाला या परंपरेची इतकी सवय झालेली आहे की भारतीय लोक चटकन या गोष्टीला मान्यता देतात याचा सर्वांनाच अंदाज आलेला आहे . भारतातली वर्णव्यवस्था मोडत नाही याचे एक मोठे कारण भारतातला राजा हा परंपरेने चालवला जातो आणि तेच अनेकांना सोयीचे असते म्हणजे फाटाफूट होत नाही . झाली तरी फारशी होत नाही आणि बऱ्यापैकी संघटन एकसंध राहते
हे एका अर्थाने जुन्या भाषेत एनसीन किंवा आत्ताच्या भाषेत पॅरासिटामोल घेण्यासारखे आहे डोकेदुखी थांबवायची . आणि मग आता डोके शांत ठेवून होणाऱ्या घटना निरीक्षणाखाली आणत शेवटी मग एक निर्णय घ्यायचा .
पण समजा उद्या जशा इंदिरा गांधी अत्यंत कार्यक्षम निघाल्या किंवा राजीव गांधी नंतर अतिशय योग्य असे नेते म्हणून उदयाला आले तसेच सुनेत्रा पवार यांचे झाले तर काय ?
राजकारणी लोकांच्या बायका ह्या आपल्या नवऱ्याबरोबर राहून व्यवस्थित राजकारण शिकत असतात हा माझा अनुभव आहे . त्यामुळे त्यांना कोणी अनोळखी समजू नये . फक्त फायली हाताळता येतील का फायलींच्या गाठी सोडवता येतील का हाच फक्त त्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे कारण राजकारणी लोक सहसा आपल्या बायकोकडे आपल्या फायली घेऊन जात नाहीत . कारण मुळात फायली राजकीय कमी आणि प्रशासकीय जास्त असतात आणि प्रशासनाबाबत जितकी गुप्तता पाळता येईल तितकी ती पाळणे आवश्यक असते . आता जर का पवार मॅडम व्यवस्थित फायली हाताळायला शिकल्या तर त्यांच्यातून एक इंदिरा गांधी नव्याने उदयाला येणे अटळ आहे . प्रश्न असा आहे की फायली हाताळण्यात अजित पवार यांच्या नंतर सर्वाधिक एक्सपर्ट असलेले देवेंद्र फडणवीस त्यांना हे शिकवणार का ?
श्रीधर तिळवे नाईक
सुनेत्रा पवार यांची एन्ट्री आणि भारतीय राजकारणाचा इतिहास भाग दोन श्रीधर तिळवे नाईक
सुनेत्रा पवार यांच्या एन्ट्री नंतर गिरीश कुबेर यांनी लेख लिहिला आणि नंतर बहुदा काही प्रमाणात माघार घेतली स्त्रीवादी सर्व लोकांनी मुळातच हा प्रश्न स्त्रीवादाचा केला आणि त्यामुळे गुंतागुंत अधिकच वाढली . एखाद्या व्यक्तीकडे ती स्त्री आहे म्हणून स्त्रीवादी नजरेने पाहणे हे योग्य आहे की तिच्याकडे सर्वात प्रथम मनुष्य म्हणून पाहिले पाहिजे असा एक मूलभूत प्रश्नच यामुळे निर्माण होतो . माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की तिच्याकडे सर्वात प्रथम आपण मनुष्य म्हणून होमोसोपियन म्हणून पाहिले पाहिजे . आणि मग होमोसोपियन म्हणून पुरुष सत्ताक राजवटी कडून तिच्या स्वभावात तिच्या वागण्यात तिच्या वर्तन शैलीत काही फरक पडला आहे का तिच्यावर काही पुरुषसत्ताक विशिष्ट दबाव निर्माण झालेले आहेत का असे प्रश्न निर्माण केले पाहिजेत आणि त्या अंगाने तपासणी केली पाहिजे परंतु अनेकदा होते उलटे म्हणजे एखादी स्त्री असेल तर सर्वात प्रथम तिचा विचार स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून करणाऱ्या अनेक स्त्रीवादी लेखिका आहेत . नेत्या आहेत. याची सुरुवात सुषमा अंधारे यांनी केली . पण ही करताना त्यांनी शेवटचा इशारा हाच दिला होता की जेव्हा बाई म्हणून प्रश्न येईल तेव्हा आम्ही तुमच्या मागे येऊ परंतु आम्ही तुमचे विरोधक राहू . त्यांना याबाबतीत म्हणायचे हेच होते की पुरुष सत्ता जेव्हा स्त्री म्हणून तुमचे अधिकार डावलेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत पण जेव्हा विचार प्रणाली चा येईल तेव्हा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला विरोध करताना आम्ही मागे हटणार नाही .
मूळ मुद्दा असा आहे की विचार प्रणालीच्या पातळीवर खरोखर विराट विरोध करता येणे शक्य आहे का? तर हे शक्य नाही याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मुळात उद्धव ठाकरे यांनीच युती केली होती आणि आता याच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप बरोबर युती केलेली आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची हिंदुत्ववादी या विचारसरणीची युती असे विचार प्रणालीच्या पातळीवर याचे स्वरूप आहे तर तुम्ही कसे काय विरोधात जाणार ? आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे हे होऊ शकत नाही . उद्या समजा अजित पवार पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करायला उतरले असते तर ही युती झाली नसती काय तर ती झालीच असती तेव्हा उगाच काहीतरी विचार प्रणालीच्या नावाखाली विरोध विरोध तर मूळ मुद्दा काय खरा नाहीये मूळ मुद्दा निर्माण झालाच तर तो भ्रष्टाचाराचा होणार आहे आणि त्या संदर्भाबाबत कोणी चर्चा करत नाही हा खरा परस्पर विरोध आहे .
साहजिकच आता प्रश्न असा येतो की एक होमो सेपियन म्हणून एखादा मनुष्य मग तो स्त्री असो किंवा पुरुष राजकारणात वावरतो तेव्हा त्या माणसाकडे त्या व्यक्तीकडे काय असते ? याचे पहिले उत्तर धर्म असते आणि दुसरे उत्तर विचारप्रणाली असते त्यातील विचार प्रणालीचा भाग आपण बघितलेलाच आहे
या प्रश्नाचे दुसरे दुसरे उत्तर अलीकडच्या काळामध्ये धर्म असतो असे आहे याचे कारण उत्तर परंपरा वादामध्ये आणि उत्तराधुनिक मध्ये धर्माचे पुन्हा एकदा आगमन झालेले आहे आणि याची सुरुवात आया तुला खोमेनी यांनी केली याबद्दल मी अनेकदा लिहिलेलेच आहे .
साहजिकच सुनेत्रा पवार धर्माच्या बाबतीत काय भूमिका घेतात ते फार महत्त्वाचे असते . अजित पवार यांच्या निधनानंतर स्पष्ट आणि स्वच्छपणाने सर्व जे संस्कार झाले ते युरेशियन परंपरेचे झाले ही वस्तुस्थिती आणि ही जवळजवळ सर्वच लोकांच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे. भारतातला कोणताही मोठा राजकीय नेता अलीकडच्या काळामध्ये अंत्यविधीसाठी ब्राह्मणेतर शैव पुरोहितांना बोलवत नाही याबाबतीत सर्वच हिंदू झालेले आहेत. प्रत्यक्षामध्ये अनेकदा सर्वजण फक्त संस्कृत वर भाळतात आणि अनेकांना हे माहीतच नसते की मंत्र पौराणिक की वैदिक हा एक फार मोठा प्रश्न असतो कारण जर का मंत्र पौराणिक म्हटले गेले तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही शूद्र आहात आणि मंत्र जर का वैदिक म्हटले गेले तर तुम्ही ब्राह्मण आहात किंवा ब्राह्मणांनी मान्य केलेले क्षत्रिय किंवा वैश्य आहात . तिथे नेमके काय झाले ते माहित नाही पण एवढी गोष्ट नक्की आहे की जे विधी झाले ते ब्राह्मण लोकांनी केले . आता हा प्रश्न नेमका कुठे घेऊन जातो तर हा प्रश्न हिंदू किंवा वैष्णव-धर्माकडे घेऊन जातो याचा अर्थ स्पष्ट आहे की सुनेत्रा पवार या हिंदू किंवा वैष्णव धर्मी आहेत त्यामुळेच त्या भाजपकडे गेल्या तर त्याबद्दल आश्चर्य मानायचे कारणच नाही महाराष्ट्रातले बहुतांशी मराठा नेते शिवाजी महाराजांचे नाव घेत असले तरी प्रत्यक्षामध्ये ते शिवाजी महाराजांचा शैव धर्म पाळत नाहीत त्यांना पंडित आणि ब्राह्मण यांच्यात असलेला फरक कळत नाही . अनेक जण केवळ या अज्ञानामुळे हिंदू असतात त्यामुळे पवार कुटुंबीयांनी पंडितांना बोलावले की ब्राह्मणांना बोलावले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही . जर पंडित असेल तर किमान वैदिक मंत्र म्हणायलाच हवेत पण तो जर कर्मठ ब्राह्मण असेल तर मात्र तो कदाचित पौराणिक मंत्र म्हणूनच निघून जाईल . आता अशा तपशिलामध्ये कोणी सहसा जात नाही कारण हा एक धर्माचा प्रश्न आहे आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होतो. आपणाला हे मान्यच आहे परंतु प्रॉब्लेम असा झाला की कळत नकळत तेरावे पाळायला हवे सत्तेची घाई करायला नको होती अशा प्रकारची मांडणी समोर आली . यात गिरीश कुबेर यांचीही मांडणी होती . प्रत्यक्षामध्ये ही सत्तेची घाई होती असे म्हणता येईल का? तर राजकीय पातळीवर आपण पाहायला गेलो तर ही एक आवश्यकता होती हे स्पष्टपणे दिसते राहता राहिली गोष्ट धार्मिक गोष्टींची तर त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात . उदाहरणार्थ आता मी हे अनेकदा सांगितले आहे की तेरावे ही सिस्टीम मुळची शैव सिस्टीम आहे वैदिक ब्राह्मणांनी त्यामध्ये काही आपले स्वतःचे मंत्र बसवलेले आहेत . त्यामुळे आपोआपच ही व्यवस्था हिंदू बनत जाते जिच्यामध्ये युरेशियन आणि शैव अशा दोन्ही श्रुती मधले मंत्र येतात . आणि विधी तर सरळ सरळ पूर्णपणे शैव पद्धतीचेच आहेत तो तसा का गेला गेला होता याची स्पष्ट कारणे एक शैव पंडित म्हणून मी इतरत्र दिलेली आहेत आणि मी स्वतः त्यावर एक तेरावे नावाचे पुस्तकच लिहिलेले आहे जे आता कदाचित बाजारात येईल.
हा विषय मग अचानक सार्वजनिक किंवा राजकीय का झाला? हा एक फार मोठा प्रश्न आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे की तुम्ही नीट पणाने हा विधी काय आहे ते आधी समजून घ्या आणि नंतर यामध्ये बदल करणे आवश्यक आहे का हेही पहा . माझ्या नवशैव-धर्मामध्ये हा विधी मी तेरा दिवसाचा ठेवलेला नाही माझ्या मते आता तसा तो ठेवण्याची गरज नाही याचे कारण असे आहे की पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावरून किंवा बैलगाडी मधून यावे लागे आणि त्यामुळे प्रवासाला अनेकदा तेरा दिवस लागायचे त्यामुळे सर्व नातेवाईक साधारणपणे तेराव्या दिवशी एकत्रपणे भेटायचे आणि म्हणून तेराव्या दिवशी हे तेरावे ठेवले होते दुसरे कारण अर्थातच तेरा दिवसात असणारे विधि आहेत प्राचीन काळामध्ये त्यासाठी लागणारी सामग्री गोळा करायला कधीकधी वेळ लागेल म्हणूनच प्रत्येक दिवशी एक विधी असा एक सोहळा होता त्या काळाला हे धरूनच होते परंतु अलीकडच्या काळात हे गरजेचे राहिलेले नाही तुम्ही सर्व विधी एका दिवसात सुद्धा सहज रित्या पार पाडू शकता मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की आपले प्राचीन काळातले लोक काही अगदी मूर्ख नव्हते त्यांचा म्हणून स्वतःचा काही शहाणपणा होता पण त्या शहाणपणा मागची कारणे आपण तपासायचे ऐवजी आपण काहीतरी आपला मूर्खपणा सादर करत बसतो . जेव्हा हा संस्कार शोधला गेला तेव्हा तो योग्यच होता त्याची असलेली मांडणी मग ती युरेशियन श्रुतीतील असो किंवा शैव श्रुतीतील असो योग्यच होती पण आता मात्र प्रवास करायला तास सुद्धा पुरत नाही सामान मॉल मधून मागवायला वेळ लागत नाही किंवा अनेकदा मरणाचे सामान सहजरीत्या मिळते पूर्वी जो खटाटोप करावा लागेल तो आता करावा लागत नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी एक विधी करत वेळ घालवणे याला आता काही अर्थ उरलेला नाही अर्थातच ज्यांना सनातन पद्धतीने सर्व करायचे आहे त्यांना ते करायचा पूर्ण अधिकार आपण शाबूतच ठेवला पाहिजे कारण प्रत्येक श्रद्धेचा आपण आदर ठेवला पाहिजे परंतु मी नेहमीच सांगतो की जे नवशैव लोक आहेत त्यांनी आता या संदर्भात काळाच्या अंगाने काळाला अनुरूप असे स्वतःच्या जीवनशैलीत फरक करावेत . ज्यांना हे बदल घडवायचे नाहीत त्यांना त्यांचा कर्मठ सनातन धर्म पाळण्याचा अधिकार व्यवस्थित शाबूत ठेवावा. कारण शेवटी श्रद्धेचे प्रश्न हे नेहमीच वैयक्तिक असतात . जेव्हा त्याचा परिणाम सार्वजनिक जीवनावर होत असतो तेव्हा मात्र अवश्य त्यामध्ये सरकारने दखल घ्यावी लागते . पूर्वी वाहनाची साधने जास्त नव्हती त्यामुळे त्या काळात ते सर्व योग्य असले तरी अलीकडच्या काळात जर का तुम्ही विमानाने आलात आणि जर का तुम्ही टॅक्सी किंवा रेल्वे वगैरे नाही आला तर जास्तीत जास्त तीन दिवसात तुम्ही पोहोचतात म्हणूनच आता तेरावे हे तीन दिवसाचे किंवा पाच दिवसाचे करावे असे मी म्हणतो . आणि जे काही विधी आहेत ते सर्व या पाच दिवसात किंवा तीन दिवसात पुरे करावे म्हणजे वेळ वाया जाणार नाही . एखादी गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा ती त्या काळाला धरून असते पण काळ नेहमी बदलत असतो आणि काळाप्रमाणे आपणाला वेळ सुद्धा बदलावी लागते .
एकदा हे लक्षात आल्यानंतर धार्मिक पातळीवर जर का हे सर्व मूळच्या शोकाच्या कळा संपल्या असतील तर सुनेत्रा पवार यांना सत्ता ग्रहण करण्याचा पूर्णपणे अधिकार पोहोचतो अगदी धार्मिक पातळीवर सुद्धा पोहोचतो दुर्देवाची गोष्ट अशी की कुबेरांच्या सारखा मॉडर्न असणारा माणूस आता अचानक पारंपारिक होत जातो . तो तसा का झाला आहे त्यांनीच आता एकदा सांगितलेले बरे ! मला नेहमी प्रश्न पडतो समजा पतीचा मृत्यू झाला तर हे सर्व होते आता उलट करून पहा पत्नीचा मृत्यू झाला तर पतीवर असे ऑब्जेक्शन येते का ? येईल का ? एकदा तुम्ही स्त्री पुरुष समानता स्वीकारली तर ती सर्व बाबतीतच स्वीकारली पाहिजे फक्त बाई माणसाच्या बाबतीतच हा प्रश्न कसा काय उभा करायचा हेही आपण आता विचारले पाहिजे . स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान न्याय असेच झाले पाहिजे .
दुसरा प्रश्न आमचे एक मित्र जय प्रभू यांनी विचारला होता तो म्हणजे अर्थमंत्रीपद काढून घेतले त्याचे काय
या प्रश्नाला मी उत्तर दिले होते तेच इथे देतो
" कारण त्या पदासाठी आता ताबडतोब अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे आणि माझा अंदाज चुकला नाही तर आता हे काम खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाच करावे लागेल अर्थसंकल्प सादर करणाऱ्या माणसाला अनेक आर्थिक प्रश्नांना विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये उत्तरे द्यावी लागतात मला नाही वाटत की ताबडतोब या गोष्टीची प्रॅक्टिस सुनेत्रा वहिनींना होईल . राजकारणातल्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या असतात बाकी जाऊ दे साध ग्रामपंचायत बजेट करायला गेलो तरी किती अडथळे येतात हे मला माहिती आहे गेली कित्येक वर्षे माझ्या गावाची ग्रामपंचायत आमच्याच घराण्याकडे होती हे तुला माहित असेलच . बाहेरून राजकारण बघणे आणि आतून राजकारण बघणे यात खूप फरक असतो .
श्रीधर तिळवे नाईक"
तेव्हा ताबडतोब त्यांच्या हातात अर्थमंत्रीपद द्यावे असे ज्यांना वाटते त्या लोकांची मला गंमत वाटते एकीकडे गुणवत्ता गुणवत्ता म्हणायचे आणि दुसरीकडे थेट घराणेशाही आहे म्हणून घराण्याप्रमाणे अर्थमंत्रीपद द्या अशी मागणी करायची यामधला विरोधाभास यांना कळत नाही का ? सुनेत्रा पवार या सार्वजनिक जीवनात व्यवस्थित वावरलेले व्यक्तिमत्व आहे याबद्दल कोणीही शंका घेऊ नये किंबहुना त्यांना राबडी देवी म्हणणे मूर्खपणाचे होते कारण सार्वजनिक जीवनात त्या व्यवस्थित वावरलेले आहेत आणि त्यांच्या घराण्यामध्ये राजकारणाचा वारसा आहे पर्यावरणाच्या प्रश्नावर इको आस्था असलेल्या त्या कदाचित एकमेव राजकीय नेत्या आहेत त्यामुळेच त्यांना राबडीदेवी समजणे हा तर मूर्खपणाच होता. मी पहिल्याच भागात लिहिले होते की त्या इंदिरा गांधी बनू शकतात . त्या मंत्रीपद सांभाळू शकतात याबद्दलही शंका नाही परंतु अर्थमंत्री पद हे फार अवघड आहे आणि गुंतागुंतीचे आहे कारण ताबडतोब आता बजेट सादर करणे गरजेचे आहे म्हणूनच त्यांना अर्थमंत्रीपद दिले गेलेले नाही .
दरवेळी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी कसलेही राजकारण करा हे बरोबरच नाही . सत्ता जिथे चुकते तिथे तिला आवश्यक दाखवून दिले पाहिजे मी स्वतः हे काँग्रेसच्या राजवटीत करत होतो आणि हिंदुत्ववादी राजवटीतही हे करत असतो . प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही समोरच्या सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडायला बघता तेव्हा तुम्ही विश्लेषण करत नसता तुम्ही विरोधी पक्षाचे काम करत असता माझी त्यालाही हरकत नाही माझं म्हणणं इतकंच असतं की विरोधी पक्षात प्रवेश करा उगाच तटस्थ असल्याचा आव आणू नका .
बाकीचे सर्व मुद्दे बाकीचे इतरत्र लोकांनी मांडलेलेच आहेत म्हणजे मुख्य मुद्दा असा की पक्षात फूट पडण्याची शक्यता होती
माझा याबाबतीतला स्वतःचा एक वेगळाच मुद्दा आहे माझे स्वतःचे म्हणणे असे आहे की समजा विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा असेल तर सुद्धा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक संपूर्ण त्यांच्या पक्षाच्या वतीने बोलणारी नेतृत्व यंत्रणा नको का? ती असायलाच हवी म्हणजे विलीनीकरणासाठी सुद्धा या लोकांच्याकडून बोलणारा एक नेता असायला हवा जो या सर्वांना लीड करेल आता हे नेतृत्व करायला सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा अधिक योग्य कोण आहे त्या एकच नेत्या अशा आहेत की ज्यांच्या नावाबद्दल पक्षांमध्ये फूट पडणार नाही त्यामुळे जे झाले ते योग्य झालेले आहे . विलीनीकरणाच्या साठी सुद्धा सुनेत्रा पवार बोलणार असतील तर आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे किंवा त्यांनी या संदर्भातली सूत्रे समजा एखाद्या चार नेत्यांच्या पैकी कोणाला दिली तर तोही निर्णय आपण स्वीकारला पाहिजे शेवटी दोन पार्ट्या झाल्या आता त्या दोन पार्ट्यांनी आपापसात बसून काय करायचे हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे थोडक्यात काय इथे सुद्धा एक नेतृत्व हवे आहे आणि सध्या तरी सुनेत्रा पवार त्याला योग्य आहेत म्हणून त्यांचे नेतृत्व नेतृत्व म्हणून हवे आहे .
तेव्हा जे झाले ते योग्य झाले असे म्हणा आणि पुढे कामाला लागा मुख्य म्हणजे अजितदादांचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये हेच होते की ते फार उत्कृष्ट व्यवस्थापक होते . थांबणारे नेते तर ते बिलकुलच नव्हते . त्यांना खरी श्रद्धांजली हीच आहे की गती पकडा .
श्रीधर तिळवे नाईक
काँग्रेस , चांगले काम आणि पवारांचे मॉडेल श्रीधर तिळवे नाईक
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर अनेक गोष्टींच्यावर चर्चा होणे अटळच होते आणि ते होताना दिसते आहे
आता आपण सर्वांनी एक गोष्ट मुळातली समजून घेतली पाहिजे ती म्हणजे काँग्रेसचे मॉडेल! हे मॉडेल काही आज जन्मलेले नाही ते काँग्रेसच्या जन्माबरोबरच जन्मलेले आहे . या मॉडेल चे मुख्य सूत्र एक तर सत्तेत असावे किंवा सत्ते जवळ असावे . संपूर्ण ब्रिटिश काळाचा आपण अभ्यास केला तर आपणाला काँग्रेसने(आणि हिंदुत्ववादी आणि मुस्लिम लीगने सुद्धा ) ही गोष्ट सतत केलेली दिसते . म्हणजे ब्रिटिशांच्या जवळ राहायचे आणि सत्तेत वाटा मागत राहायचा . निवडणुका झाल्या की कोणाशीही युती करायची आणि सत्तेवर यायचे . अगदी इंदिरा गांधी पराभूत झाल्या झाल्या काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्याला कारण ही सत्तेजवळ राहण्याची उर्मी होती आणि सवय होती काँग्रेस कुठलीही असो राष्ट्रवादी असो नाहीतर सोनिया गांधींची काँग्रेस असो नाहीतर अजित दादांची काँग्रेस असो या सर्वांचा अजेंडा काहीही असला तरी त्या अजेंड्याचे मुख्य सूत्र हेच राहणार की एक तर सत्तेत राहायचे किंवा सत्तेभोवती राहायचे अगदी अशोक चव्हाण यांच्यापासून छगन भुजबळांच्या पर्यंत सगळ्यांना हा काँग्रेसचा रोग लागलेला आहे . सत्ता ही गोष्टच अशी आहे की ती तुम्हाला मोह पाडते seduce करते आणि मग तुमचे पतन घडवते . तुम्ही सर्व तुमची तत्त्वे तुमचा धर्म तुमची विचार प्रणाली खुंटीला टांगून ठेवता. जगाच्या संपूर्ण राजकीय तत्त्वज्ञानामध्ये कौटिल्य किंवा मेक्यावली अजिबात मरत नाहीत त्याचे सर्वात मोठे कारण हे दोघे फक्त सत्ता प्रणाली सांगतात . यांच्या राजकीय विचाराच्या केंद्रस्थानी फक्त सत्ता असते आणि सत्ता कशी मिळवायची सत्ता कशी टिकवायची आणि सत्ता कशी वाढवायची या तीन तत्त्वाखेरीज हे लोक काहीही बोलत नाहीत आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वास्तववादी राजकारण वास्तववादाच्या व्यवहारवादाच्या आणि उत्तर व्यवहार वादाच्या दृष्टिकोनातून बघायला लागता तेव्हा तुम्हाला या लोकांचा त्यांच्या विचारांचा प्रत्यय कायम येत राहतो आणि जगातले सर्वात थोर राजकीय विचारवंत हेच आहेत असे वाटायला लागते हे लोक राजकारणाची आणि राजकारणी लोकांची मानसिक जडणघडण काय आहे हे पक्के जाणतात आणि हे उपदेश सुद्धा त्याच पद्धतीचा करतात त्यामुळे जेव्हा मेक्यावलीचे प्रिन्स हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ते ताबडतोब संपले परंतु सार्वजनिक जीवनात मात्र त्या काळातला एकही राजा किंवा राजकारणी किंवा सरंजामदार ते पुस्तक उघडपणे दाखवत नव्हता . त्याचे कारण त्यातला उपदेश प्रत्येक जण अमलात आणत होता आणि प्रत्यक्ष मात्र आपण अमलात आणतो हे मात्र लपवत होता . आजही ही दोन पुस्तके अनेकांना राजकीय आणि राजकारणी बायबल आहेत . कसलेही नैतिक चाड नसलेले असे हे राजकारण हे लोक अत्यंत उघडे आणि नागडे करून दाखवतात आणि वाईट गोष्ट अशी आहे की जगाच्या इतिहासामध्ये हे दोन लोकच जे सांगत आहेत त्याप्रमाणे राजकारणी वागत आहेत मात्र हे कधीही स्वतःच्या डोक्यावर blame दोष घेत नाहीत ते कायमच धर्मयुगामध्ये पुरोहित लोकांच्या डोक्यावर सर्व दोष मारत होते पुरोगामी ज्ञानयुगामध्ये विज्ञान युगामध्ये यांनी सर्व दोष सामाजिक राजकीय आर्थिक व्यवस्थेच्या या व्यवस्थेतील संविधानाच्या माथ्यावर मारायला सुरुवात केली आणि यामध्ये गंमत अशी होती की व्यवस्था निर्माण करणारे हेच होते पुढे मग लोकशाहीचा काळ प्रस्थापित झाल्यानंतर या लोकांनी इतर पक्षांना ब्लेम द्यायला सुरुवात केली म्हणजे जो जो विरोधी पक्ष आहे किंवा आसपासचा पक्ष आहे त्याला टार्गेट करायचे. प्रत्येक गोष्टीला विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला जबाबदार धरायचे असा एक तमाशा सुरू झाला कलगीतुरा सुरू झाला उत्तर आधुनिक कालखंडामध्ये मात्र या लोकांनी प्रशासन सांभाळणाऱ्या लोकांना आणि मतदान करणाऱ्या लोकांना दोष द्यायला सुरुवात केली साहजिकच आता प्रशासक आणि लोक हेच कसे मूलतः स्वभावानेच भ्रष्ट असतात हे सांगितले जाते शिवाय व्यवस्था आणि व्यवस्थेने निर्माण केलेले संविधान यांच्या विरोधात बोलून तेच कसे जबाबदार आहे किंवा पुरोहित वगैरे जुने लोक हेच कसे जबाबदार आहेत हे नेहमीच सांगितले जाते . यामध्ये त्यांचा वाटा नाही असे म्हणत नाही परंतु राजकारणी ज्या तऱ्हेने या सर्व गोष्टींचा वापर अतिशय चपखल पद्धतीने करत असतात तो वाटा आणि भूमिका अनेकांना लक्षात येत नाही
या सगळ्याचा आणि कारणांचा आता चौथ्या नवतेमध्ये अधिकाधिक चोथा होत जाणे अटळ आहे त्यामुळे एक वेळ अशी येऊ शकते की जेव्हा वेगवेगळी सोशल नेटवर्किंगची सिस्टीम वापरत अनेक जालांच्यावर चिन्हविरोध करत विरोधी महाजाल विंचरत वावरत लोकच सत्ताधारी लोकांच्या विरोधात उभे ठाकतील त्यामुळे भविष्यात अधिकाधिक सेन्सॉरशिपस वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणी लोकांच्याकडून लादली गेल्या तर आश्चर्य वाटणार नाही नेट लॉकिंग हे भविष्य काळामध्ये राजकारणी लोकांचे फार मोठे हत्यार असेल . याशिवाय तुमच्या नेटवर्कचे रिप्लेसमेंट डिस्प्लेसमेंट प्लेसमेंट हे सर्व काही अधिकाधिक ताब्यात घेऊन त्या अंगाने वाटचाल केली जाईल . त्यासाठी अधिकाधिक डिजिटल कॅमेरे व्यापारले जातील वापरले जातील . एकंदरच हा सगळा लढा चिन्ह पातळीवर लढला जाईल आणि नंतर मग तो प्रत्यक्षात उतरवला जाईल असे सध्याचे वातावरण आहे यासाठी अर्थातच सोशल नेटवर्सवर असलेली खाजगी मालकी ही हळूहळू सार्वजनिक करता आली तरच ती कार्यान्वित राहील अन्यथा लोक स्वतःची अशा प्रकारची नेटवर्क सिस्टीम तयार करत समांतर आणि प्रायोगिक नेटवर्सेस(Netverses )तयार करतील यासाठी नेमका किती काळ जाईल हे सांगणे कठीण आहे माझे स्वतःचे म्हणणे असे की त्यापेक्षा राजकीय पक्षांनी स्वतःला सुधारावे आणि ही वेळ येऊ नये . राजकारणी मरतात पण खुर्ची जिवंत राहते हे सत्तेच्या राजकारणातले सर्वात मोठे सत्य आहे . खुर्ची अमर आहे आणि तीच राजकारणाला राजकारणी माणसाला आयुष्य देते त्याचे आयुष्य सत्ताबाज बनवते . त्यामुळेच प्रत्येक राजकारणी अंतिमतः सत्ताबाजच बनतो. याला कदाचित थोडाफार छेद मिळाला तर मोक्षाकडूनच मिळू शकतो परंतु आजच्या काळामध्ये हे अधिकाधिक अवघड होऊन बसलेले आहे मात्र ते अशक्य आहे अशातली गोष्ट नाही विशेषत: जेव्हा एखाद्या राजकारणी माणसाला भिडत समोरच कुणाचा तरी किंवा स्वतःचा मृत्यू किंवा अपघात दिसतो तेव्हा माणसे बदलतात माझा एक बालपणातला मित्र सुविद लटोरे हा अशा तऱ्हेने बदललेला मी बघितलेला आहे. एक मृत्यूच आहे जो राजकारणी लोकांना घाबरवतो म्हणून तर हे लोक पिरॅमिड वगैरे बांधून अमर व्हायला धडपडत असतात. अलीकडे पिरॅमिड बांधून काही आपण अमर होत नाही म्हणून हे लोक स्वतःला देव बनवण्याच्या किंवा किमान आपले पुतळे बनवण्याच्या मागे असतात . प्राचीन काळी धर्म उघड उघडपणे हे सर्व करायचा आता ती ही संधी नाही . तरीपण राजाला देव बनण्याचे चान्सेस अजूनही असल्याने विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये तो अजूनही असल्याने अनेक राजकारणी या मागे लागलेले असतात किंबहुना शिवाजी महाराजांचे मंदिर झाले त्याला एकाही पुरोगामी राजकारणी माणसाने विरोध केलेला नाही याचे सर्वात मोठे कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आपलेही मंदिर भविष्यात होण्याची यामध्ये शक्यता आहे असे दिसत असते . अमर होण्याची ही लालसा आहे पण अनेकदा ती चांगले काम करायला प्रवृत्त करू शकते. आपण यामध्ये जर का त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही चांगली कामे करा आणि मग स्वतःचे नाव द्या असे सांगितले तरच काहीतरी होऊ शकते . शेवटी प्रत्येकाला इतिहासामध्ये आपले नाव ठेवून जायचे असते . असो. ज्याला आपले स्वतःचे नाव सुद्धा ठेवून घ्यायचे नसते किंवा इतिहासात अमर व्हायचे नसते असा राजकारणी माणूस हळूहळू अत्यंत क्रूर ,निष्ठुर , नीच आणि नालायक बनत जातो . खरे तर आपल्याला या लोकांना घाबरायलाच लागते कारण या लोकांना मग काहीच असे आपण देऊ शकत नाही की जे त्यांना चांगली कामे करायला प्रवृत्त करेल. प्राचीन काळी पुरोहित निदान स्वर्ग आहे असा दिलासा दाखवून त्यांच्यावर काही प्रमाणात तरी कंट्रोल ठेवायचे आता हा कंट्रोल गेला कोणाचाही स्वर्गावर नरकावर विश्वास उरलेला नाही आणि राजकारणी लोकांचा तर अजिबात नाही त्यामुळे अमर होणे ही आसक्तीच आता फक्त रिमोट कंट्रोल सारखी यांना नियंत्रित करू शकते अन्यथा नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चांगल्या गोष्टींना मीडिया प्रसिद्धी देतच नाही म्हणजे बारामती मध्ये अतिशय अप्रतिम असे हॉस्पिटल अजितदादा पवार यांनी निर्माण केले होते हे लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर कळते आणि सर्वात वाईट गोष्ट हीच असते म्हणजे मीडिया जेवढ्या वाईट बातम्या देता येईल तेवढ्या देतो पण चांगल्या कामाबद्दल जे कव्हरेज मिळायला हवे ते मिळत नाही वास्तविक हे कव्हरेज चांगल्या कामांना मिळत गेले तर सुद्धा हे लोक सुधारण्याची शक्यता आहे पण पत्रकार लोकांना टेररिस्ट लोकांच्या ऍक्टिव्हिटी जास्त महत्त्वाच्या वाटतात त्याला काय करणार ? मी साधे याचे उदाहरण देतो जे कृष्णमूर्ती हा एक आधुनिक बुद्ध होऊन गेला मराठी माध्यमातील एकाने सुद्धा त्या माणसाची मुलाखत घेतलेली मला दिसलेली नाही . मराठी पत्रकारितेचा सगळा नटदृष्टपणा यामध्ये दिसतो . हीच गोष्ट निसर्ग दत्त महाराज यांची आहे . मेल्यानंतर मीडिया आदर देतो परंतु हा आदर काहीही कामाचा नाही विशेषता तो राजकारणाबाबत काहीच कामाचा नाही कारण राजकारणी लोकांना जिवंतपणे आपण अमर होणार आहोत असे वाटणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचा उपाय एकच आहे या लोकांनी केलेल्या प्रत्येक कामाला अत्यंत धुमधडाक्यात प्रसिद्धी देणे . हा लोकांच्या बाजूने होणारा लोक व्यवहार असेल आणि तो लोक व्यवहार पार पाडण्याची जबाबदारी पत्रकारांच्या वर आहे. बारामती हे गाव याबाबतीत फार उत्तम गाव होते पवार घराण्यांनी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची हे लोक ज्या तऱ्हेने एकमेकांशी चर्चा करत ती चर्चा फार बघण्याजोगी गोष्ट असायची हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय त्यामुळे साहजिकच चांगले काम करायला पवार घराण्याला कायमच प्रोत्साहन लाभलेले दिसते हे खरे तर प्रत्येक मतदारसंघात व्हायला हवे पण त्याचबरोबर आता त्याला मीडियामध्ये पण प्रचंड प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे .निदान अजित पवार गेल्यानंतर एवढी बेसिक गोष्ट जरी आपल्या मीडियाला कळली तरी खूप झाले तुम्ही जेवढा जिवंत माणसावर फोकस ठेवाल तितका तो अधिकाधिक जास्त चांगली कामे करेल शेवटी त्या माणसाला सुद्धा मान्यता हवी असते प्रोत्साहन हवे असते आणि तेच जर का तुम्ही देणार नसाल तर कठीण आहे .
श्रीधर तिळवे नाईक
शरद पवार , बोलणे आणि राजकीय व्यवहार
सर्वसाधारणपणे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात ज्या व्यक्तीची सर्वाधिक चर्चा होत आहे ती व्यक्ती म्हणजे शरद पवार ! काही लोकांनी तर शरद पवारांनी संपूर्ण लक्ष महाराष्ट्राचे आपल्याकडे यानिमित्ताने कसे वळवले आणि हे कसे त्यांचे प्लॅनिंग होते तेही सांगायला सुरुवात केली आहे.जणू काय शरद पवारांनीच हा सगळा डाव रचला आणि अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्व लक्ष आपल्याकडे खेचले . वास्तविक असे काहीही घडलेले नाही हे सर्व घडण्याचे सर्वात मोठे कारण उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीचे अपघाती झालेले निधन हेच आहे.जेव्हा अशा प्रकारचे निधन होते तेव्हा साहजिकच अनेक कथा दंतकथा फुटतात आणि कॉन्स्पिरसी थेरीज रचल्या जातात . ही एक उत्तर आधुनिक माणसाची अलीकडच्या काळात डेव्हलप झालेली चिन्ह स्थिती आहे . अशावेळी शांत डोक्याने काय होत आहे ते पाहणे हे फार अवघड होऊन जाते.
सर्वसाधारणपणे माध्यमात राजकीय नेते किंवा प्रवक्ते सात पद्धतीने बोलतात
१ स्पष्ट आणि ठाम बोलणे या पद्धतीत सत्य माहीत नसले तरी ठाम विधाने केली जातात आणि ती स्पष्ट पणाने बोलली जातात . आणि जे माहित आहे त्याबद्दल तर नक्कीच ठामपणे बोलले जाते.
२ स्पष्ट पण संदिग्ध बोलणे या पद्धतीत ठामपणे बोलले जात नाही पण जे माहित आहे ते स्पष्टपणे सांगितले जाते आणि जे संदिग्ध आहे ते संदिग्ध पद्धतीनेच सांगितले जाते.
३ खोटे बोलणे या पद्धतीत सरळ सरळ खऱ्याचे खोटे करून सांगितले जाते. मात्र हे सांगताना त्या बोलण्याचा खऱ्याशी काही संबंध असतो
४ कपोकल्पित बोलणे या पद्धतीत खऱ्याशी असलेला खोट्याचा संबंधही तुटतो आणि मनुष्य स्वतःच्याच कल्पनेने अनेक गोष्टी मीडियामध्ये सांगत असतो. सध्याच्या काळात हा अधिक डेव्हलप झालेला असा रोग आहे जो अनेक प्रसिद्धीमुखी लोकांना भरपूर प्रसिद्धी देतो
५ खरे बोलणे यामध्ये खरे सर्व माहिती झालेले असते आणि त्यामुळे ते ठाम पणाने सांगितले जाते पण त्या सांगण्याला मुळातच पुराव्यांचा आधार असतो आणि इथे खरे काय आहे ते आधी शोधले गेलेले असते त्यामुळे मनुष्य खरे बोलतो
६ गूढ बोलणे इथे इशारे वजा गूढ भाषेत बोलले जाते आणि अर्थ समोरच्या व्यक्तीवर सोपवला जातो
७ मिश्र बोलणे वरील सहा पद्धतीपैकी अनेक पद्धती एकमेकात मिक्स करत अनेकदा राजकीय नेते प्रवक्ते बोलत असतात . त्यांना काही गोष्टी खऱ्या सांगायच्या असतात आणि काही गोष्टी अत्यंत जाणीवपूर्वक खोट्या बोलायच्या असतात अनेकदा तर काय खरे आहे काय खोटे आहे हेही कळत नाही कधी कधी काल्पनिक फटाक्याची माळ पण लावली जाते. मीडियाला अशा व्यक्ती आवडतात कारण त्यांचे खरे खोटे वेगळे करणे फार कठीण होऊन बसते आणि डिबेटला चान्स मिळतो .
शरद पवार हे संदिग्ध पण स्पष्ट बोलणे या कॅटेगरीमध्ये येतात या पद्धतीमध्ये येतात अपवादात्मक वेळेला त्यांनी गूढ पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो साहजिकच अशा व्यक्ती माध्यमांना आवडत नाहीत आणि पत्रकारांना तर आवडतच नाहीत अपवाद ज्यांना खरे आवडते असे पत्रकार ते मात्र यात सुद्धा बरोबर बातमी शोधतात शरद पवारांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होतो की ते जी गोष्ट संदिग्ध आहे ती गोष्ट कधीही माहीत असल्याचा आव आणत नाहीत. ते सहसा संतापत नाहीत अनेकदा माहिती जास्त दिली जाते . स्वतःच्या भविष्याविषयी तर ते कधीच बोलत नाही . अपवादात्मक वेळेला इशारा देतात . त्यामुळेच अजित पवारांच्या मृत्यूबद्दल कॉन्स्पिरसी थेरिज येऊ शकतात हे लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब माध्यमात येऊन निवेदन दिले याचे कारण हेच होते की खूप काही गोष्टी मग घडू नयेत आत्ताच आवर घातला जावा आणि प्रत्यक्षातही ते बऱ्यापैकी घडले बहुदा असे घडेल याचा त्यांना अंदाज आलेला असावा सर्वसाधारणपणे शरद पवार यांची प्रतिमा अलीकडे प्रचंड भ्रष्टाचारी नेता अशी करण्याची स्पर्धा सुरू आहे साहजिकच त्यांच्या विरोधात नेहमीच विरोधकांच्याकडे गाडाभर पुरावे असतात पण हा पुराव्यांचा गाडा नेमका कधी मिळणार आहे हे काही कोणी सांगत नाही फक्त चर्चा होत राहतात प्रतिमा खराब होत राहते किंबहुना अनेकदा तर असा संशय येतोय की हे अत्यंत जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठीच केले जात आहे . अनेक पत्रकार मला नेहमी बोलतात की पुरावे आहेत असं करप्शन आहे पण प्रत्यक्षात काही असं प्रकरण त्याने आणलेले आहे किंवा मीडियामध्ये प्रकाशित केलेले आहे असे काही दिसत नाही .
शरद पवार हे मीडियामध्ये खोटे बोलले असे सुद्धा किती वेळा सिद्ध झाले आहे ? शरद पवार संदिग्ध बोलतात डाऊटफुल बोलतात याचे कारण त्यांना अनेकदा वस्तुस्थिती माहीत नसली की ते ठामपणे बोलत नाहीत पण जेव्हा गोष्ट ठामपणे माहित असते तेव्हा ती स्पष्टपणे सांगतात पण त्यांची सांगण्याची पद्धत अशावेळी कॅज्युअल असते . विलीनीकरणाच्या गोष्टी ते म्हणतात म्हणजे झाल्या असण्याची बरीच शक्यता आहे खुद्द अजित पवार यांच्या अलीकडच्या भाषणांच्या मध्ये सुद्धा तशी काही विधाने आढळतात. आता त्यांचे हे खरे बोलणे दुसऱ्या गटाला झेपणारे नाही म्हणून साहजिकच मग प्रत्येकाने त्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो . मुळात फडणवीस यांची गोची अशी होती की त्यांना एक अतिशय दमदार असा मंत्री आणि दोस्त हवा होता त्यांच्या बुद्धिमत्तेला साजेसा असा दोस्त त्यांना अजित पवार यांच्या रूपाने मिळाला याबद्दल काही शंका नाही . अनेकदा राजकीय लोकांच्या गरजा आपणाला कळत नाहीत पण अशी गरज होती एक प्रकारे पैशाची सर्व व्यवस्था अजित पवार सांभाळतील याची खात्री असल्याने पुढच्या अनेक गोष्टी करणे फडणवीस यांना शक्य झाले होते आता मात्र याही गोष्टीत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणजे एका अर्थाने फडणवीस यांना डबल इंजिन सारखे काम करावे लागणार . यातला गोंधळ असा आहे की अजित पवार फडणवीस यांच्याशी विलीनीकरणाबाबत बोललेले नाहीत पण मुळातच एकदा दोघांच्या मध्ये जो प्रियास्को झाला होता ते लक्षात घेता जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत बोलायचे नाही असा कदाचित अजित पवार यांची भूमिका असावी त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात विलीनीकरण नव्हते हा काही युक्तिवाद होऊ शकत नाही .
पण याचमुळे सत्ताधारी लोकांच्याकडून एक वातावरण असे तयार करण्याचा प्रयत्न झालाय की शरद पवार याबाबत खोटे बोलत आहेत . अर्थातच फडणवीस नेहमीच पवारांच्याच पठडीत बोलत असल्याने त्यांनी पवारांच्याच पद्धतीने विधाने केली आहेत जेणेकरून भविष्यात कोणी असे म्हणू नये की फडणवीस खोटे बोलले . अफवा दोन्ही बाजूने उठलेल्या होत्या मुख्य म्हणजे अजित पवार या सगळ्या हिंदुत्ववादी माहोल मध्ये स्वतःला फिट आहोत असे मानायला तयार नव्हते किंबहुना आपला पक्ष मोडीत काढला जाणार आहे असेही त्यांना वाटत होते मुख्य म्हणजे ज्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न घेऊन ते पुढे सरकले होते ते स्वप्न आता भाजपबरोबर कधीही साकार होणे शक्य नाही भाजपकडून कायमच फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येतील याची त्यांना जाणीव झालेली होती . चान्स फक्त एकच होता तो म्हणजे जर का खुद्द देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेले तर ! पण ही एक रिमोट शक्यता होती . त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फुटल्याने त्यांना प्रत्यक्षात काय मिळाले हाच प्रश्न होता . पण मतभेदाचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की भाजप बरोबर जायचे की नाही आणि याबाबतीत शरद पवार ठाम नसल्याने सगळा गोंधळ उडालेला आहे जर का एक नि:संदिग्ध भूमिका पवार यांनी घेतली असती तर हा सगळा गोंधळ झालाच नसता . वस्तुस्थिती अशी आहे की शरद पवार यांच्यासाठी भाजप "असून अडचण नसून खोळंबा" असा झालेला आहे . भविष्यात भाजपा शिवाय कोणी सत्तेवर येईल का? हा खरा प्रश्न पवार यांच्या मनामध्ये चाललेला असावा आणि याचे उत्तर नाही असे आल्याने मग करायचे काय असा प्रश्न पडतो . कारण भाजपच जर का सत्तेवर राहणार असेल तर मग कायम विरोधी पक्षात बसावे लागणार आणि पवार यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांना सत्तेत किंवा सत्तेजवळ राहणे आवडते . खरे तर हा प्रॉब्लेम सगळ्या काँग्रेस बाबत आहे हे मी मागच्या लेखात सांगितलेलेच आहे . आणि अजित पवार हेच समजावून सांगत होते की भाजप शिवाय पर्याय नाही युतीत जावेच लागेल . एका अर्थाने अजित पवार एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगत होते आणि पवार यांची गोची अशी होती की त्यांच्या आयडिया लॉजिकल वातावरणामध्ये त्यांनी केलेल्या सर्व ॲडजस्टमेंट या सेक्युलर ऍडजेस्टमेंट होत्या आणि प्रथमच एक असा पक्ष समोर होता जो सेक्युलर अजिबातच नव्हता म्हणजे त्यांच्या दृष्टीने नव्हता . त्यामुळे ते काही वर्षे वाट बघत होते आणि आता त्यांना असं वाटायला लागले होते की भाजप संविधान मोडणार नाही आणि संविधानाच्या चौकटीतच काम करेल . मात्र जी खात्री वाटायला पाहिजे होते ती वाटत नव्हती आणि म्हणूनच दोलायमान स्थिती झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी होती की महाराष्ट्रात आपण स्वतःच्या जीवावर सत्तेवर येऊ हे जे त्यांचे स्वप्न होते ते कधीच साकार झाले नाही. आणि हळूहळू आता स्थिति अशी झाली की बहुधा ते होणारच नाही अशावेळी करायचे काय? तर विरोधी पक्षात बसून मिळालेल्या मोजक्या जागा गोंजारत बाक वाजवत बसणे . यातही प्रॉब्लेम असा की नवीन पिढीतली जे राजकारणी आलेले आहेत त्यांना आयडालॉजीशी काही सोयरे सुतक नाही त्यामुळे जर का सत्ता आली नाही तर आपल्या पक्षातील उरले सुरले नेते केवळ बाक वाजवत बसतील यावर विश्वास ठेवणे कठीण होते त्यामुळे ते निवडून आणले तरी सुद्धा भाजपाला जाऊन मिळतील याची त्यांना खात्री पटली होती विशेषता जर का आपला पुतण्या जाऊन मिळत असेल तर मग बाकीच्यांची गॅरंटी काय घ्यावी ? म्हणजे पक्ष शाबूत ठेवण्यासाठी सुद्धा भाजपची गरज निर्माण झालेली दिसते किंवा मग पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवून नव्याने संपूर्ण पक्ष उभा करणे पण प्रॉब्लेम पुन्हा तोच आहे पुन्हा पक्ष उभा केला तरी पुन्हा फूट पडणार नाही याची गॅरंटी काय ? जेथे सत्ता जिकडे सत्ता तिकडे नीतिमत्ता अशी उत्तर आधुनिक विचार करणारी एक राजकारणी लोकांची पिढीच आता निर्माण झालेली आहे आणि या पिढीनेच खरे तर शरद पवार यांची खरी गोची केलेली आहे याचे कारण त्यांचा इतिहास आहे . एका अर्थाने सगळेच शरद पवार झालेले आहेत आणि प्रश्न असा आहे की म्हाताऱ्या लोकांना हे नवीन शरद पवार झालेले लोक आदर देणार का तर त्याचेही उत्तर नाही असे आहे . म्हातारपणाविषयी कसलाही आदर या नवीन उत्तर आधुनिक पिढीला नाही . आणि हे काय केवळ फक्त राजकारणात नाही तर जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये आलेले आहे. हा या पिढीचा उत्तराधुनिक नैतिक स्वभाव आहे त्याचे तुम्ही काय करणार ? त्यामुळे जरी आपण तत्त्वाशी बांधिलकी मानली तरी आपल्याजवळ जर का निवडून येणारे लोक थांबणार नसतील तर मेहनत तरी कशाला करायची ? म्हणजे आपण अजित पवार निर्माण करायचे आणि या सर्व अजित पवारांनी भाजपाला जाऊन मिळायचे याने साधणार काय ?
यावर उपाय एकच आहे तो म्हणजे शरद पवारांनी शांतपणाने आपल्या काँग्रेसचे विसर्जन मुख्य काँग्रेसच्या प्रवाहात करावे पण प्रॉब्लेम तिथेही असाच आहे की राहुल गांधी त्यांचा आदर रिस्पेक्ट ठेवतील का आणि या प्रश्नाचे सुद्धा उत्तर दुर्दैवाने हो असे येत नाही आणि खरी गोची इथेच आहे . त्यामुळेच अजित पवार यांनी आता तुम्ही रिटायर व्हा असे सांगितलेले होते ते एका अर्थाने बरोबर होते पण प्रॉब्लेम असा आहे की आपण रिटायर झालो तर आपला पक्ष नीट चालेल याची जी खात्री लागते ती खात्री इथे नाही म्हणजेच रिटायरमेंट नंतर ऑफिस नीट चालायला पाहिजे अशी खात्री रिटायर होणाऱ्या माणसाला लागते ती खात्री शरद पवार यांच्या जवळ नाही आणि हीही गोची आहे . किंबहुना आजच्या सगळ्या जगण्याचा केऑस आणि येथॉस शरद पवार ही व्यक्ती अनुभवत आहे . दाही दिशा उदास आणि भकास होण्याचा अनुभव ज्यांना आहे त्यांनाच फक्त शरद पवार यांचे काय झाले आहे ते कळू शकते. खरंतर मराठी लोकांनी त्यांना पराभूत केले पंतप्रधानकीसाठी ठाम पणाने त्यांच्या मागे उभे राहणे हे कधीही मराठी लोकांनी केलेले नाही . जितक्या काड्या टाकता येतील तितक्या टाकल्या . हा एक पहिला असा मराठी मनुष्य होता ज्याला दिल्लीच्या तक्तावर बसायचे होते . त्यासाठी ते लायकही होते पण दुर्दैवाने ते ज्या संस्कृतीत जन्मलेले आहेत ती संस्कृती प्रॉब्लेम म्हणून अडथळ्यासारखी येत आहे ती ना स्वतः दिल्लीत बसते ना आपल्या माणसाला बसू देते . आता तर अशी एक स्थिती आलेली आहे की शरद पवार यांची दिल्लीत बसण्याची लायकीच नव्हती अशा प्रकारचा निष्कर्ष काढणारे ही महाभाग निर्माण झालेत त्यामध्ये मराठी लोकांचा टिपिकल इन्फिरीयर कॉम्प्लेक्स आहे आणि नॉन मराठी लोकांना मुळात असा मराठी लोकांना कॉम्प्लेक्स देणे आवडते . अशावेळी एक उपाय असतो तो म्हणजे मराठी लोकांच्यातून बाहेर पडून पूर्णपणे नॉन मराठी लोकांची गॅंग तयार करणे आणि त्यांच्या साह्याने सर्व व्यवस्था मॅनेज करणे . प्रमोद महाजन यांनी हे केले होते पण अनफॉर्च्युनिटली त्यांचे निधन झाले अन्यथा तेच एक असे होते जे शरद पवार यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी लायक होते. त्यांची ही हत्या एका मराठी माणसाने आणि सख्ख्या भावाने भाऊबंदकीमध्ये केली हे मराठी संस्कृतीला साजेसेच आहे . विज्ञानाच्या क्षेत्रात जयंत नारळीकर यांची सर्वाधिक चेष्टा ही नेहमीच मराठी लोकांनी केलेली आहे . कुठलाही जागतिक दर्जाचा माणूस निर्माण झाला की त्याच्या पायात पाय घ**** ही आपली संस्कृती आहे मराठी माणसे मत्सरग्रस्त आहेत हीच वस्तुस्थिती आहे कुठल्याही जागतिक दर्जाचा माणूस आला रे आला की त्याच्याबद्दल अत्यंत हीन किंवा मध्यम दर्जाचे लोक आपोआप काड्या टाकायला लागतात त्यामुळेच निसर्ग दत्त महाराज यांच्याबद्दल मराठी माणूस बोलत नाही तो ओशोंच्याबद्दल बोलतो . या मत्सरग्रस्ततेचे काय करावे हा एक फार मोठा प्रश्न असतो मी नेहमीच सांगतो की तुमचा दर्जा जर जागतिक असेल तर तुम्ही ताबडतोब मराठी संस्कृतीतून बाहेर पडा आणि जगात प्रसिद्ध व्हा हे मराठी लोक तुमच्या मागोमाग आपोआप येतील (अर्थातच याला अपवाद कदाचित मोक्ष हवा असेल तर आहे कारण तिथे मळ्यात काही संस्कृतीकडून अपेक्षाच नसतात किंबहुना तुम्ही जर संस्कृतीकडून अपेक्षा ठेवत असाल तर तुम्हाला मोक्ष मिळणे शक्यच नसतं अन्यथा मोक्षाच्या क्षेत्रात सुद्धा काही मराठी लोकांनी फार सपोर्ट दिलाय असे दिसत नाही ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांची आता मराठी लोक नावे घेत असले तरी त्यांना ते हयात असताना मराठी लोकांनी फक्त तापच दिलेला आहे )
त्यामुळे आता भविष्यात शरद पवार यांना चुकून चान्स जरी आला तरी मला खात्री आहे मराठी लोक काड्या टाकतील . त्यामुळे करायचे काय हा एक फार मोठा प्रश्नच आहे . अनेक लोक रिटायर व्हा म्हणून सांगताहेत पण शरद पवार रिटायर झाले तर असे काय नेमके पॉझिटिव्ह इफेक्ट येणार आहेत ?
माझे स्वतःचे मत असेच आहे की जोपर्यंत शरद पवारांना खेळावेसे वाटते तोपर्यंत आता त्यांनी खेळावे मात्र सूत्रे आता सुप्रियाच्या हातात द्यावीत . तिला राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बनवावा . सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये तिला व्यवस्थित सेटल करावे केंद्रामध्ये पाठवण्याची जी काही व्यवस्था अजित पवार यांच्यामुळे होती ती आता लागू होत नाही . स्वतःच स्वतंत्र अस्तित्व खासदार निवडून आणण्यापुरते असेल तरच केंद्रात तुमचा निभाव लागतो पवार यांची ती ताकद होती ती ताकद आता सुप्रिया सुळे यांच्यामध्ये राज्याचे राजकारण टाळून स्वतंत्रपणे निर्माण होईल अशी शक्यता खूप कमी आहे. थोडक्यात म्हणजे सुप्रिया सुळे यांना आता दुसरे शरद पवार बनणे भाग आहे . त्यांच्यात ते गुण पण आहेत. मात्र त्यांनी धार्मिक बाबतीत आता अधिक सर्वसमावेशक होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अधिकाधिक इंग्लिश बोलणे आवश्यक आहे . पण सर्वात मुख्य गोष्ट आता कळत न कळत महाराष्ट्र काबीज करणे अशीच झाली पाहिजे. दुसरी गोष्ट इंदिरा सोनिया काँग्रेसमध्ये शरद पवार यांना फार स्थान नसले तरी मला वाटते की सुप्रिया सुळे यांच्यासाठी तिथे जास्त मोकळ्या वाटा आहेत . त्यांनी एकदा झाले गेले विसरून जाऊया असे सांगत सोनिया गांधी यांची भेट घेणे आवश्यक आहे आणि राहुल गांधी यांना त्यांच्याशी दीर्घ चर्चा करून काय हवे आहे आणि आपल्याकडून काय त्यांना दिले जाऊ शकते आणि त्यांच्याकडून काय मिळू शकते याचा अंदाज घेत एक पॉलिटिकल डिझाईन करता येते का हे पाहायला हवे . माझे स्पष्ट मत असे होते की शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्य काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये आधीच जाऊ द्यायला पाहिजे होते . पण बहुदा राहुल गांधी यांच्या बद्दल त्यांना खात्री वाटत नसावी खरे तर ती अनेकांना वाटत नाही आणि तोच खरा प्रॉब्लेम आहे. पण यामध्येच संधी आहे हे त्यांच्या बहुदा लक्षात आलेले नाही.
एकंदर काय शरद पवार समजून घेणे कठीण वगैरे नाही . ते नेहमी संदिग्ध गोष्टींना नेहमी संदिग्ध ठेवतात इतकी साधी गोष्ट आहे आणि हाडाचे राजकारणी असल्यामुळे लपवाछपवीत ते अत्यंत उस्ताद आहेत . त्यांची नीतिमत्ता जितकी दाखवली जाते तितकी पोकळ नाही . मात्र ते संत पण नाहीत . त्यांना राजकीय चाली खेळण्यात एक प्रकारचा बौद्धिक आनंद मिळतो आणि अनेकदा असे बौद्धिक आनंद हे डेंजरस बनत जातात .
खरे तर उतारवयामध्ये सर्व जबाबदारी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टाकून त्यांनी निवृत्त व्हायला हवे होते पण परिस्थिती अशी झाली की अचानक भाजप आला आणि काँग्रेसचे सगळेच नेते पराभूत व्हायला लागले अशा वेळी काँग्रेस शाबूत ठेवण्यासाठी म्हणून रिटायरमेंट घेणे अवघड बनले. अजित पवार यांना स्वतःचे म्हणावे असे किती नेते तयार करता आले असा प्रश्न आता विचारायला पाहिजे. शरद पवार यांनीच तयार केलेले नेते ही काही त्यांची राजकीय अचिव्हमेंट होऊ शकत नाही . शरद पवारांनी ज्याला हात सुद्धा लावला नाही आणि निखळ अजित पवार यांच्यामुळे जे डेव्हलप झाले असे नेमके किती राजकारणी आहेत हे एकदा नीट तपासले पाहिजे . आणि अशा लोकांची खरोखर राजकीय उंची काय आहे हेही एकदा नीट तपासले पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक राजकीय नेते आपल्या तालमीत तयार करणे ही गोष्ट फक्त अलीकडच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनाच जमलेली आहे . दुर्दैवाने त्यांनी तयार केलेल्या लोकांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले . या खंजिरांचा अंदाज का आला नाही हा खरा प्रश्न आहे. अनेक लोक नातेवाईकगिरीवर टीका करतात पण बाहेरून आलेल्या लोकांना तयार केल्यानंतर ते बाहेरचे लोक जर का वफादारी विसरत असतील आणि खंजीर खुपसणार असतील तर बाहेरच्या लोकांना का तयार करावे . स्वतःच्या आस्तिनमध्ये साप कोणीही ठेवू इच्छित नाही . भारतामध्ये नातेवाईकगिरी असण्याचे सर्वात मोठे कारण बाहेरच्या लोकांचा वफादारी करण्यावर नसलेला विश्वास हे आहे . त्यामुळेच आपल्याकडे वफादारीचे तत्व वारंवार शिकवले जाते पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ते कधीही अमलात आणले गेलेले दिसत नाही . खुद्द शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याबाबत जे काही केले त्यामुळेच त्यांची विश्वासार्हता संशयाच्या धुक्यात उभी राहीली . या कर्माची फळे त्यांना मिळणारच होती ती अजित पवार यांच्या रूपाने मिळाली. एका अर्थाने बरे झाले या जन्मात हिशेब फिटला.
सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या मागे जाणार नाहीत असेच सध्या बोलले जात आहे परंतु शरद पवार मागे नसतील तर वेगवेगळ्या कायदेशीर संस्था कुठल्या कुठल्या पातळीवर कशा कशा ऍक्टिव्हेट होतील हे सांगता येणे फार कठीण आहे. त्याचा विचार बहुदा सुनेत्रा पवार यांनी केला नसावा पण हे घडणे अटळ आहे. जर का त्यांचा सर्व रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ असेल तर त्या तगतील अन्यथा त्यांच्यामागे अनेक गोष्टींचा ससेमीरा हळूहळू लावून त्यांना संपवले जाईल किंवा मग आपल्या तालावर त्यांच्यामार्फत विशिष्ट पद्धतीने राजकारण खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. माझा अंदाज चुकला नाही तर विधानसभा निवडणूक जिंकणे त्यांना सोपे जाणार नाही . त्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाडणे हा भाजपाला फायदा असेल कारण मग आपोआपच हे जे लोक थांबलेले आहेत ते भाजपमध्ये सरळ येतील आणि या दिशेने भाजप नक्की विचार करत असणार . अजित पवार आता नाहीत त्यामुळे ही विधानसभा निवडणूक जितकी सोपी दिसते तितकी ती सोपी नाही . जर का भाजपने खरोखर मनापासून त्यांना मदत केली तरच त्या जिंकणे शक्य आहेत अन्यथा नाही . शिवाय ज्यांच्या जीवावर त्या आता उप मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्या लोकांनाही काय वाटते हे फार महत्त्वाचे आहे हे लोक खरोखर विश्वासार्ह आहेत का हा एक फार मोठा प्रश्न आहे . अन्यथा असे होऊ शकते की ज्यांच्यामुळे त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत तेच त्यांना नंतर मात्र बाजूला करायचा प्रयत्न करतील. कारण हे लोक कोणाचेच आता राहिलेले नाहीत ते आता शरद पवार यांचे नाहीत अजित पवार यांचे ते खरोखर होते की नाही हे संदिग्ध आहे आणि आता सुनेत्रा पवार यांच्या मागे उभे राहण्याची खरोखर आवश्यकता आहे का असा प्रश्न ते निश्चितपणे स्वतःला विचारत असतील आणि किती काळ मागे राहायचे याची काल निश्चिती करत असतील.
राजकारणात नेहमीच काळ वैऱ्याचा असतो आणि वेळ आपली असते ती येण्याची वाट पाहावी लागते ज्याला ती वेळ कळते तो ती साधतो आणि पुढे जातो ज्याला ती साधता येत नाही तो मागे पडत जातो इतके हे सगळे थेट आहे राहता राहिलो आपण सामान्य माणसे ! काय घडेल हे निमुटपणे पाहणे एवढेच आपल्या डोळ्यांच्या हाती आहे .
श्रीधर तिळवे नाईक
उत्तर व्यवहार , पुरोगामी वाद , शरद पवार यांची भाजप बाबत चाललेली चालढकल आणि त्या मागील त्यांची झालेली असलेली गोची श्रीधर तिळवे नाईक
शरद पवार सध्या अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत पण एकदाही भाजपमध्ये जाणार की नाही याविषयी ते ठामपणाने काही सांगत नाही . साहजिकच त्यांच्या भवताली असलेल्या अनेक लोकांचा आणि पत्रकारांचा सुद्धा प्रचंड गोंधळ उडालेला दिसतो त्यामुळे यावर हे लिखाण करत आहे.
ही एवढी चाल ढकल का आहे याविषयीची मीमांसा मी काही प्रमाणात मागील लेखात केलेली होती
आता काही आणखी काही कारणे आहेत काय हे पाहिले पाहिजे . सर्वात पहिला प्रश्न मी अनेकदा विचारलेला आहे तो म्हणजे खरोखरच हिंदू लोकांचा धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा होता का ? माझ्या मते मुळातच हा भ्रम आहे की धर्मनिरपेक्षतेला हिंदू लोकांचा संपूर्ण पाठिंबा होता वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये मुळात कधीही धर्म धर्म म्हणून येत नाही त्याच्याबरोबर मोक्ष अर्थ आणि काम हे जीवनार्थ सुद्धा फंक्शन करत असतात जे इतर प्रकारच्या विशेषता जुडाईक धर्माच्या बाबतीत किंवा रिलीजन्स बाबतीत घडत नाही. त्यामुळे जेव्हा लोक काँग्रेसला मतदान करत होते त्यामागे आणखीन काही गोष्टी होत्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य चळवळ ही काँग्रेसने चालवलेली चळवळ होती आणि त्यामुळेच आपण स्वतंत्र झालो याविषयीची भारतीय जनतेमध्ये विशेषता हिंदू जनतेमध्ये काँग्रेस विषयी विलक्षण कृतज्ञता होती. ही कृतज्ञता इतकी होती की कट्टर शैव असणारे लोकसुद्धा गांधीजींच्या मागे गेले . याशिवाय गांधी आणि नेहरू यांच्या विषयी भारतीय जनतेमध्ये विशेषतः हिंदू लोकांच्या मध्ये प्रेम होते. साहजिकच या कृतज्ञते पोटी आणि या प्रेमापोटी विशेषत: गांधी हे मोक्षवादी असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनतेचे अधिकच प्रेम होते आणि त्यांनी नेहरूंना निवडल्यामुळे नेहरूंच्यावरही प्रेम होते. तर या दोघांच्या प्रेमापोटी आणि स्वातंत्र्य बाबतीत स्वातंत्र्य मिळवून दिल्याने कृतज्ञते पोटी हिंदू लोक काँग्रेस पार्टीच्या मागे उभे राहिले त्यामध्ये धर्मनिरपेक्ष नावाचा विचार केंद्रस्थानी नव्हता शिवाय दुसरी गोष्ट अशी होती की भारतामध्ये राहणारे मुस्लिम सेक्युलर आहेत असा एक फार मोठा गैरसमज हिंदू लोकांचा झालेला होता प्रत्यक्षामध्ये १९८० च्या आसपास हा किती खोटा आहे हे कळाले मुस्लिम सत्यशोधक समाजाची चळवळ हळूहळू कशी फापलत गेली तेही हिंदू लोकांनी पाहिले त्यांनी इस्लाम मध्ये वाढत चाललेल्या कट्टरतेला पाहिले इस्लाम मधल्या तथाकथित बुद्धिमान लोकांनी कट्टर इस्लामपुढे घातलेले लोटांगण पाहिले आणि नाही म्हटले तरी हिंदू लोकांच्या मनावर हळूहळू या गोष्टींचे आघात होत गेले.
आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सामान्य जनता कधीही तुमच्या केवळ विचार प्रणालींना बघत नाही त्यापेक्षा ती प्रत्यक्ष लोक व्यवहार कसा चालत असतो आणि हा लोक व्यवहार खरोखरच आपल्याला शिकवल्या गेलेल्या विचार प्रणाली प्रमाणे चालू आहे का त्याकडे लक्ष ठेवून असते आणि मुस्लिम लोकांच्या बाबतीत हेच झाले. जेव्हा मुस्लिम लोकांचा लोक व्यवहार हा प्रचंड धर्मकेंद्री आहे आणि तो तसाच राहिलेला आहे तो अजिबात सेक्युलर झालेला नाही आणि धर्माबाबत मुस्लिम लोक कट्टर आहेत इतकेच नव्हे तर ते लोकसंख्या वाढवत आहेत हे स्पष्ट आणि स्वच्छ पणाने लोकांना कळायला लागले तेव्हा इस्लाम बाबत भूमिका बदलायला सुरुवात झाली मुख्य म्हणजे बुरख्या विषयीचा आग्रह २०१३ नंतर याबाबतीत कमालीचा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे हे अनेक पुरोगामी लोकांनाही लक्षात येत नाही याबाबतीत आधी हिंदू गाफील होते त्यामुळे काँग्रेसचे फावले परंतु जेव्हा अक्कल आली तेव्हा हळूहळू गोष्टी स्पष्ट झाल्या पण याबाबतीतली व्हॅलिडीटी कन्फर्म होत नव्हती आणि ही व्हॅलिडीटी शहाबानो प्रकरणांमध्ये कन्फर्म होत झाली. यावेळी सुद्धा स्वतःच्या सहनशीलतेसाठी का होईना परंतु काँग्रेसला बदलण्यासाठी म्हणून लोकांनी संधी दिली. मात्र तरीसुद्धा एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या काळामध्ये एक मोठा बदल १९९० नंतर भारतामध्ये झाला तो म्हणजे भारतामध्ये सुद्धा उत्तर आधुनिकता आली. प्रस्थापित व्हायला सुरू झाली . उत्तर कार्पोरेट वाद आला प्रस्थापित व्हायला लागला. हा उत्तर कॉर्पोरेट वाद प्रामुख्याने नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये फक्त आर्थिक होता परंतु तो हळूहळू प्राथमिक पातळीवर सुद्धा आला आणि उत्तराधुनिकतेने जो परंपरेचा पुरस्कार केला होता आणि 1960 स*** उदयाला आलेल्या कला क्षेत्रामध्ये जो धर्माचा आणि परंपराचा पुरस्कार केला गेला होता त्यामुळे धर्म हा पुन्हा एकदा परतला धर्माचे हे परत येणे नेमके काय आहे हेच आपल्याकडे विचारवंत लोकांना कळाले नाही धर्मनिरपेक्ष वादामुळे एक फार मोठा गैरसमज असा पसरला होता की धर्म ही एक घरात करायची गोष्ट आहे ती वैयक्तिक आहे हा एक खोटा इतिहास पुरोगामी वादी लोकांनी रचला होता आणि स्वतःची च फसवणूक करून घेतली होती धर्म घरात ठेवा असे सांगणे म्हणजे प्रत्यक्षामध्ये राजकीय विचार प्रणाली घरात ठेवा असे सांगणे होते आणि हेच अनेक पुरोगामी लोकांच्या आणि धर्मनिरपेक्ष लोकांच्या लक्षात आले नाही . प्रत्यक्षामध्ये मोक्ष हा वैयक्तिक असतो धर्म नव्हे . प्रत्यक्षामध्ये धर्म ही एक राजकीय प्रणाली असते आणि ती नेहमीच पूर्वीसुद्धा राजकीय प्रणाली होती आणि तिच्या आधारेच अनेकदा राज्य व्यवस्था चालत होती धर्माप्रमाणे अनेकदा राज्य व्यवस्था बदलत सुद्धा होती म्हणजे यथा राजा तथा प्रजा या न्यायाप्रमाणे राजाचा धर्म तोच आपला धर्म असे मानणारे अनेक लोकसमूह अस्तित्वात होते साहजिकच जेव्हा वैष्णव धर्म यादव लोकांनी स्वीकारला विशेषता केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा राजे लोकांनीच वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हा लोकांनी तो राजाचा धर्म आहे म्हणून स्वीकारला पण याचा परिणाम असा झाला की सर्वत्र वैष्णववाद वाढत गेला आणि साहजिकच तो हळूहळू हिंदू धर्म बनत गेला म्हणजेच धर्म हा राजकीयच असतो पण ही मूलभूत गोष्ट न कळाल्याने आणि धर्मही काहीतरी कुटुंबात करायचे कर्मकांड असते असा गैरसमज करून घेतल्याने पुरोगामी लोक धर्माबाबत प्रचंड बेसावध राहिले त्यांच्या दुर्दैवाने सर्वात प्रथम इस्लामने धर्म ही राजकीय विचार प्रणाली म्हणून पुन्हा प्रस्थापित केली इराण मध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती हळूहळू सर्वत्र पसरत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुद्धा ती राजकीय विचारप्रणाली म्हणून प्रस्थापित झाली. साहजिकच भारतातला मुसलमान सुद्धा या बदलांच्यामुळे अतिशय मूलभूतपणे पुन्हा बदलला आणि अत्यंत कर्मठ झाला . त्यांचा लोक व्यवहार कर्मठ झाला आणि ही गोष्ट सरळ सरळ आणि स्पष्टपणे हिंदू लोकांना दिसायला लागली . मुस्लिम देशात जाऊन परतलेला मुस्लिम ही एक वेगळीच कॅटेगरी तयार व्हायला लागली आणि तिच्या प्रभावाखाली अनेक मुस्लिम येऊ लागले. इस्लामचे जागतिकीकरण पुन्हा एकदा मुस्लिम मनामध्ये वावरायला लागले आणि आपण सर्व एक आहोत ही भावना पसरायला लागली साहजिकच भारतामध्ये सुद्धा धर्मराज्य स्थापन करण्याचे स्वप्न अनेक मुस्लिम लोकांना पडायला लागले याची प्रतिक्रिया हिंदू लोकांच्याकडून येणे अपरिहार्य होते आणि त्यामुळेच भाजपला वाव मिळाला. उत्तराधुनिकतेने घडवून आणलेला हा राजकीय बदल आज सुद्धा अनेक पुरोगामी लोकांना कळत नाही मी सुरुवातीपासूनच उत्तर आधुनिकतेच्या विरोधात आणि परंपरेच्या विरोधात ठामपणे थांबलो परंतु ही गोष्ट अनेकांच्या नीट लक्षात आली नाही. माझ्या दृष्टीने मोक्ष हा सर्वाधिक महत्त्वाचा होता पण दुर्दैवाने मोक्षावर विश्वास नसल्यामुळे पुरोगामी चळवळ सर्वच पातळीवर फापलत गेली . गांधींनी धर्माचे नाव घेतले असेल पण प्रत्यक्षात त्यांचे सगळे राजकारण हे जितके धार्मिक होते त्यापेक्षा अधिक मोक्षिक होते पुरोगामी लोकांच्या हेही लक्षात आले नाही याचा परिणाम असा झाला की उत्तर आधुनिक तत्त्वज्ञान म्हणून धर्म प्रस्थापित झाला आणि आज तो उत्तर आधुनिक राजकीय तत्त्वज्ञान म्हणून संपूर्ण इस्लाम जगतात आणि हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही भारताच्या जनमानसामध्ये वावरत आहे तुम्हाला आवडो अगर नावडो पण हा बदल घडलेला आहे उत्तर आधुनिकतेकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ही एक पुरोगामी लोकांनी केलेली फार मोठी चूक होती. ते मूर्खासारखे ओरिएंटालिझम सारखे पुस्तक देशी वादाचे पुस्तक समजत होते प्रत्यक्षामध्ये त्याचा हिडन अजेंडा इस्लाम वादच होता . यासारख्या पुस्तकांनीच मुळात इस्लामला नवा तात्विक पाया दिला आणि त्यातून पुढचे सगळे कट्टर धार्मिक गोंधळ तयार झाले.
यामुळेच आता ज्यांना शहाणपण आलेले आहे अशा सर्व राजकीय नेत्यांच्या पुढे धर्म हा राजकीय प्रणाली म्हणून उभा राहिला आहे आणि तो विजयी होताना सतत दिसतो प्रश्न असा आहे की मग त्याला शह कसा देणार ? आणि इथेच सर्व पुरोगामी लोकांचा गोंधळ उडालेला दिसतो आणि त्याला शरद पवार सुद्धा अपवाद नाहीत . याचे कारण असे की शरद पवारांना धर्म केंद्रस्थानी आलेला आहे हे पटते परंतु त्याचबरोबर त्यांच्यावर झालेले सेक्युलर्स संस्कार हे अत्यंत घनदाट असल्याने त्यांना तोही सोडवत नाही आणि म्हणूनच ही सगळी चाल ढकल धरपकड चाललेली आहे .ते अजूनही एका निष्कर्षाला पोचलेले नाहीत म्हणजे काय करावे याविषयी गोंधळलेले आहेत याचे कारण त्यांच्या समोरची परिस्थिती अतिशय गोंधळाचीच आहे . जे कट्टर डावे आहेत ते आरामात या संदर्भात भूमिका घेऊ शकतात जे आंबेडकरवादी आहेत तेही अशी भूमिका घेऊ शकतात कारण त्यांच्याजवळ बौद्ध धर्म आहे पण काँग्रेस अशी कधीच कट्टर डावी किंवा बौद्ध धर्म स्वीकारणारी नव्हती . अपवाद इंदिरा गांधींच्या पासून सुरू झालेली काँग्रेस पण ती सुद्धा फक्त सात वर्षे टिकली राजीव गांधींच्या काळात उलट काँग्रेस उजवी झाली आणि नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी ती पूर्णच उजव्या बाजूने झुकवली मात्र कार्पोरेट वादाला पूरक होईल असा माहोल तयार करताना गरीब लोकांशी असलेले नाते काँग्रेसने कधीही तोडले नाही. खरा प्रॉब्लेम उत्तराधुनिकतेने धर्म केंद्रस्थानी आणल्यामुळे झालेला आहे आणि पवारांची खरी गोची धर्म या संदर्भात झालेली आहे भाजपकडे जावे तर सेक्युलर वादाची वाट लागते आणि सेक्युलर बरोबर रहावे तर हा वाद आता अल्पसंख्यांक झालेला आहे या वादा बरोबर लोक नाहीत कदाचित ते पूर्वीही नव्हते पण त्यावेळी उत्तर आधुनिकता आलेली नव्हती आता ती आल्याने आणि लोक जीवनामध्ये स्थिर झाल्याने धर्म ही गोष्ट सुद्धा एक राजकीय विचारप्रणाली म्हणून पुन्हा परतली आहे . आणि हे सर्व उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानाने घडवलेले आहे किंबहुना उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानाला कदाचित आपण काय करतो आहोत ते लक्षातच आले नाही . इस्रायल निर्मितीचे समर्थन करता करता आणि इस्लामला संरक्षण देता देता हे लोक आपण धर्माला केंद्रस्थानी आणत आहोत हे पाहायला विसरले . याचा परिणाम असा झाला की आज जगात सर्वत्रच धर्मनिरपेक्षता वाद हा हळूहळू अल्पसंख्यांक बनत चाललेला आहे अपवाद फक्त ५२ % नास्तिक झालेल्या इंग्लंड सारख्या नास्तिक देशांचा आहे पण या नास्तिक लोकांना धर्मनिरपेक्षता स्वीकारावी लागते आणि तिथे मुस्लिम मात्र धर्मसापेक्षता घेऊन घुसतात आणि या धर्मसापेक्षतेचे काय करावे हे या नास्तिक राजवटींना कळत नाही तिथे सुद्धा एक विचित्रच प्रॉब्लेम झालेला आहे आणि आज ना उद्या त्यांना तो हाताळावा लागेलच .
धर्मनिरपेक्षता वाद इतका अल्पसंख्यांक होईल याची पवारांना कदाचित सर्वांनाच अंदाज आला नाही आणि आता धर्म सापेक्षतावाद एक नवे तत्त्वज्ञान म्हणून आल्याने सगळा गोंधळ उडालेला आहे. मुख्य म्हणजे लोकच आता धर्मसापेक्षता वादाच्या प्रेमात पडलेले दिसतात अशावेळी तुम्ही काय करणार ?
इंग्रज विजयी झाले तेव्हा आपले सर्व पराभव हे आपल्या धर्मामुळे झालेले आहेत याची स्पष्ट आणि स्वच्छ कल्पना १९ व्या शतकामध्ये आली आणि या लोकांनी आपले स्वतःचे स्वतंत्र आणि समांतर धर्म निर्माण केले त्यातूनच ब्राह्मो समाज ,आर्य समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन ,थिऑसॉफी सोसायटी ,नवयान यांच्यासारख्या नव्या धार्मिक चळवळी निर्माण झाल्या या लोकांनी एका बाजूला आपले कनेक्शन परंपरेशी जोडले आणि दुसऱ्या बाजूला ते नवे पण केले
मला स्वतःला या गोष्टी स्पष्टपणे दिसल्या म्हणूनच मग मी संपूर्ण शैव परंपरेचे नूतनीकरण घडवून तिला एकविसाव्या शतकात दाखल करण्याचे एक मिशनच उभे केले हळूहळू का होईना पण त्या मिशनला सक्सेस मिळत जाताना दिसते विचार पसरताना दिसतो पुरोगामी पण जमिनीवर असलेल्या लोकांच्या पुढे असे काही करण्याशिवाय पर्याय नाही आणि नव्हता .
वस्तुस्थिती अशी आहे की इस्लामवादाला शह देण्यासाठी म्हणून जो युरेशियन हिंदुत्ववाद आलेला आहे तो काय करणार आहे ? त्यांची सत्ता आलेली आहे हे तर उघडच आहे पण मुळात भविष्यात काय ? माझ्या मते भविष्यामध्ये आत्तापर्यंतचा सगळा युरेशियन लोकांचा इतिहास लक्षात घेता या लोकांनी मुस्लिम लोकांची युती केली तर मला आश्चर्य वाटणार नाही किंबहुना मोदींच्या विरोधात मोहीम चालवताना मोदी नकोत पण मुस्लिम चालतील अशा प्रकारची भूमिका काही अतिशहाण्या सवर्ण लोकांनी घेतलेली दिसते साहजिकच याचे पडसाद ओवेसी बरोबर झालेल्या युतीत दिसते हे होणारच होते कारण या लोकांनी हे केलेलेच आहे प्रश्न असा आहे की याला शह कसा देणार ? तर याला शह देण्याचा उपाय एकच असतो एक तर या लोकांच्या ब्राह्मणी , वैष्णव हिंदुत्वाला साईडलाईन करून शैव हिंदुत्व निर्माण करणे यामुळे दोन गोष्टी होतील एक तर भाजप स्वतःच शैव हिंदुत्ववादी होईल किंवा शैव हिंदुत्ववाद स्वतःची नवी हिंदुत्ववादी पार्टी तयार करेल किंवा मग बहुजनांचा सांस्कृतिक धर्म म्हणून शैव धर्माचा स्वीकार करून नवसत्यशोधक पद्धतीचे शैव आधुनिक तत्त्वज्ञान तयार करणे जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म या राजकीय विचार प्रणालीला शह देऊ शकत नाही. 19 व्या शतकामध्ये जी गोष्ट राजाराम मोहन राय महात्मा फुले स्वामी विवेकानंद आणि विसाव्या शतकात गांधी आणि आंबेडकर यांना कळली ती आत्ताच्या पुरोगामी लोकांना कळत नाही कारण संपूर्ण पुरोगामी वाद हा जडवादी झालेला आहे . त्याचा मोक्षाशी काहीही संबंध उरलेला नाही आणि जोपर्यंत पुरोगामी वाद मोक्षाशी पुन्हा जोडला जाणार नाही तोपर्यंत कोणतीही नवी धर्मकेंद्री राजकीय विचार प्रणाली पुढे येऊ शकत नाही याबाबतीत मला जे करायचे आहे ते मी केलेलेच आहे आणि करतोच आहे .
प्रश्न असा आहे की शरद पवार असा दोन्ही बाजूंपैकी एक पर्याय निवडणार आहे का ? शरद पवार यांची तशी वैचारिक ताकद आहे का ? त्यांची ही वैचारिक ताकद नाही ही त्यांची सर्वात मोठी मर्यादा आहे शरद पवारांचा मोक्षाशी काडीचाही संबंध नाही इतकेच कशाला त्यांचा धर्माशी फार संबंध नाही त्यामुळे या अंगाने काही निर्णय घेता येणे त्यांना शक्य होत नाही आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने विचार करून गेली तीस वर्षे ते चाललेलेच आहेत आता तिथे ते थांबलेत आणि पुढे जाता येत नाही कारण पुढे समोर उत्तर आधुनिकता आणि धर्म स्वतःचे दोन चेहरे घेऊन उभे आहेत .
त्यामुळे शरद पवारच काय कुठल्याही पुरोगामी माणसाकडून ज्याला धर्म ही राजकीय विचार प्रणाली म्हणून प्रस्थापित झालेले आहे हे कळलेले आहे त्याला ताबडतोब निर्णय घेता येणे शक्य नाही . याला अपवाद फक्त सत्तेविषयीचे आकर्षण होऊ शकते अशा प्रकारचे आकर्षण शरद पवार यांच्यामध्ये या वयामध्ये सुद्धा आहे का हा खरा प्रश्न आहे जर का ते तसे असेल तर खूप ताबडतोब निर्णय घेऊन शरद पवार भाजपकडे जातील आणि एका अर्थाने अजित पवार यांना फॉलो करते करतील कारण अजित पवारांना सत्तेनेच आंधळे बनवले आणि ते गेले . आता प्रश्न तोच आहे की जो अनुभवी म्हातारा मानला गेला आहे तो तरुण आणि पुतण्या असलेल्या माणसाला फॉलो करणार आहे का ?
श्रीधर तिळवे नाईक
व्यवहार आणि अजित पवार श्रीधर तिळवे नाईक
अनेकांचा प्रश्न असा की अजित पवार यांच्या अंगाने इतके लिखाण कशाला ? आणि एवढे लेख कशाला? त्यांना कदाचित हे कळणे अशक्य ! अजित पवार हे आमच्या पिढीचे राजकारणातले प्रतिनिधी आहेत . एका बाजूला बलाढ्य साठोत्तरी असे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला आपली समकालीन पिढी जिचे काय करायचे ते कळत नाही आणि तिसऱ्या बाजूला केवळ टॉंट मारणारी पिढी अशा कात्रीत सापडत आम्ही आमच्या वाटा शोधल्या. शोधत राहिलो पुढे मग तिसरी वाट गडद होत आली आणि त्यातून प्रश्न उभा राहिला पुढच्या पिढीचे काय करायचे ? सुरेल तिळवे हा माझा पुतण्या जेव्हा दहा वर्षाचा झाला तेव्हाच मला त्याचा फ्लॅश आला होता की हा राजकारणात पडणार आणि माझ्यापुढे तेव्हा एकच प्रश्न आला होता तो म्हणजे रोहिदास मामाशी याचे पटणार की नाही ? माझ्या सर्वच फ्लॅश प्रमाणे हाही फ्लॅश खरा झाला आणि सुरेल सार्वजनिक जीवनात आला
एका बाजूला रोहिदास मामा बहुजनवादी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात होता आणि दुसरीकडे सुरेलला मात्र आप पक्षाचे आकर्षण होते यातून काही संघर्ष उदभवतो की काय असे भय होते पण तसे काही सुदेवाने झाले नाही आणि सुरेल आणि रोहिदास मामा यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले . मुख्य म्हणजे दोन्ही बाजूंनी प्रेम होते आणि पक्ष भले एकमेकांच्या विरोधात असो पण त्याचा ताण संबंधांच्या वर आला नाही .
अजित पवार यांच्यामध्ये आमच्या पिढीचे प्रतिबिंब आहे. आमच्या पिढीने माणुसकी मरू दिली नाही मात्र आमच्या पुढच्या नव्वदोत्तरी पिढीमध्ये एक जो कृत्रिम पणा आला तो आम्ही समजून घेतला . प्रवीण बर्दापूरकर यांनी अजित पवार यांच्यावर लिहिलेल्या मरणोत्तर लेखांमध्ये दोन उदाहरणे दिली आहेत त्यातील आजारपणात उत्स्फूर्तपणे भेटायला आलेल्या अजित पवार यांचे व्यक्तिमत्व निश्चितपणे आकर्षक आहे. शरद पवार यांचे अनेक गुण अजित पवार यांनी अवगत केले असे म्हणायला हरकत नाही . भाजपाच्या उपस्थितीमध्ये या लोकांच्या मध्ये वाद झाले आणि असे वाद खुद्द आमच्या घरात पण काही कमी झालेले नाहीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जेव्हा भाजपबरोबर गेला तेव्हा काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न होता आणि आहे. गेली ५० वर्षे घरामध्ये असलेली बहुजनवादी परंपरा अचानक मोडीत निघाली की काय असे वाटावे असे हे वातावरण आहे तिचा परिणाम थेट देवळावर झालेला दिसतो म्हणजे कधी नव्हे ते देवळामध्ये वैदिक पद्धतीचे यज्ञ होऊ लागलेले आहेत मला स्वतःला हे कधीच पटले नाही कारण माझ्या मते यज्ञ संस्कृती ही काही बहुजनांची संस्कृती नव्हे परंतु हे सर्व काही होत आहे आणि मी त्यापासून अंतर राखून आहे. या सर्व गोष्टींचे आकलन इतके सोपे नाही काँग्रेस जर धड असती तर हे घडले नसते अनेकांना यामध्ये असलेला काँग्रेसचा वाटाच कळत नाही गांधी फॅमिलीच्या हट्टाहासामुळे अनेक चमत्कारिक गोष्टी या देशाच्या राजकारणात घडलेल्या आहेत त्यामधला सर्वात मोठा अट्टाहास गोव्याच्या राजकारणात आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे इथे ख्रिश्चन लोकांची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे भारतात जर अशी लोकसंख्या असती तर सोनिया गांधींनी काय काय प्रताप गाजवले असते हे सांगणे कठीण आहे त्या स्वतःला काहीही सेक्युलर वगैरे म्हणवत पण त्या आतून रोमन कॅथॉलिक आहेत आणि त्यांचे हे असे असणे गोव्याच्या राजकारणामध्ये फार प्रॉब्लेमटिक झाले आपण कुठल्या माणसांना पुढे आणतोय याचा विवेक सुद्धा राहिलेला नाही. धर्म विवेका पेक्षा मोठा झाला की काय होते त्याचे उदाहरण खुद्द काँग्रेस मधूनच सुरू झालेले आहे. नेहरू यांचे बौद्ध धर्माविषयीचे obsession इथून त्याची सुरुवात आहे . भारतातली जनता प्रामुख्याने हिंदू आहे बौद्ध नाही याचा विसर खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच पडला होता . त्यांचे हे obsession मुळातच या काळातल्या बौद्ध धर्माच्या आंतरराष्ट्रीय गौरव्यामुळे आणि दबदब्यामुळे निर्माण झाले होते त्याचबरोबर हिंदू धर्माचा एक तिरस्कार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये नक्की होता . पण त्याला कारण त्यांच्या काळातला हिंदू धर्म होता या हिंदू धर्मातल्या चालीरीती होत्या. सोनिया गांधी यांचे तसे नाही त्यांचा मुळात जन्मदत्त धर्मच वेगळा आहे त्यामुळे यांचा अल्पसंख्यांकवाद हा मुस्लिम लोकांशी कमी आणि ख्रिश्चन रोमन कॅथॉलिक यांच्याशी जास्त जुळलेला आहे . अर्थात हे राजकारण समजून घेण्याची आता गरज वाटत नाही कारण मुळात ख्रिश्चन लोकांची संख्या तेवढी नाही त्या उलट मुस्लिम लोकांची संख्या मात्र प्रचंड वाढल्याने अचानकपणे आपणाला सगळा अल्पसंख्यांकवाद हा मुस्लिम संदर्भामध्ये दिसायला लागतो . दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की 1980 नंतर रोमन कॅथोलिक या धर्माने सुद्धा कुठे कुठे आणि कसे कसे किती किती अत्याचार केले आणि हे लोक गुलाम बनवण्यात किती एक्सपर्ट होते आणि यांची गुलामगिरी कशी कुठे कुठे ऑपरेट होत होती हे आता पुढे आलेले आहे त्यामुळे या धर्माला कॉन्व्हेंट स्कूल कल्चर मुळे आणि सेवाधर्म म्हणून त्याची जी या स्कूल्सने इमेज तयार केली होती त्यामुळे जी एक सहानभूतीची लकीरं होती ती आता राहिलेली नाही . 1920 नंतरच्या ख्रिश्चन धर्मामध्ये अडकून पडलेल्या लोकांना आणि त्यावेळच्या डायरेक्टिव्ह मध्ये अडकून पडलेल्या लोकांना हे कळणे अवघड आहे. त्यांना मुळात नवीन पिढीचा आवाज ऐकू येत नाही . हा आवाज शरद पवार यांना ऐकू आला आणि हा आवाज ऐकू येणे हे त्यांना महागात पडले. किंबहुना त्यांना हा आवाज ऐकू आलेला आहे याची कल्पना टाइम्स ऑफ इंडिया पासून सगळ्या ख्रिश्चन लोकांनी स्पॉन्सर केलेल्या वर्तमानपत्रांना आली आणि त्यांनी आपल्या मीडिया मधून शरद पवारांच्या विरोधात जितका प्रचार करता येणे शक्य होते तितका केला . एतदेशीय मराठी संस्कृतीला विरोध हे तर टाइम्स ऑफ इंडियाचे एक वैशिष्ट्यच होते अलीकडे ते थोडे अड्जस्ट झालेले आहेत परंतु ही ऍडजस्टमेंट आहे
अजित पवार त्यामुळेच काकांमुळे का असेना पण काही प्रमाणात समजून घेत होते पण सेक्युलर ठसा इतका जोमदार होता की त्यातून नंतर आलेल्या नवोदत्तरी पिढीला सुद्धा बाहेर येता आलेले नाही . आता साहित्यिक आणि कलावंत लोक हे तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मागासलेले असतात की काय असा प्रश्न आता पडतो कारण समाज एका दिशेला आणि कलावंत एका दिशेला अशी सरळ सरळ फुट आपणाला नवदोत्तरी पिढीमध्ये दिसते . ज्या वेळेला समाज हिंदुत्ववादी बनत चालला होता तेव्हा हे लोक अधिकाधिक सेक्युलर बनत चालले होते कारण यातल्या प्रत्येकाला आंतरराष्ट्रीय मान्यतेची आणि हिंदी बेल्टच्या मान्यतेची प्रचंड गरज वाटते शिवाय समाजवादी आणि डावे असणे हे साहित्याच्या क्षेत्रात फायद्याचे असल्यामुळे त्यांच्याही मान्यतेची गरज भासते. याला कारण अर्थातच हिंदुत्ववादी लोकांचा कलेबद्दलचा दृष्टिकोन अतिशय पारंपारिक आणि आठव्या शतकात अडकलेला आहे त्यामुळे कधीही कुठलाही कलावंत असलेला शहाणा माणूस हिंदुत्ववादी होणे शक्य नाही . नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे लोक कलावंत असतील आणि ते जर का हिंदुत्ववादाला प्रतिनिधित्व देत असतील तर कोण हिंदुत्ववादाकडे कलावंत म्हणून आकर्षित होईल ? शरद राव माझे चांगले मित्र आहेत पण मैत्री एका बाजूला आणि वैचारिक दृष्टिकोन एका बाजूला ! त्यांचे नथुराम गोडसे यांचे समर्थन मला कधीच पटलेले नाही . आपण चुकलो तर चुकलो म्हणावे ती चूक कशी बरोबर होती हे सांगू नये पण अहंकार इतका मोठा की काय बोलावे ?
अशा या सगळ्या माहोल मध्ये अजित पवार राजकारण करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . त्यांच्या आसपास असणाऱ्या कुठल्याही नेत्यापेक्षा ते मुख्यमंत्रीपदाला अधिक लायक होते . शरद पवार यांनी निर्माण केलेली व्यवस्थापन शैली त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेली होती आणि ते त्याबाबतीत शरद पवार यांच्या इतकेच एक्सपर्ट होते . असे असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये हा महाराष्ट्राचा करंटेपणा म्हटला पाहिजे . वास्तविक शरद पवार यांनीच त्यांना जेव्हा एकदा संधी आली होती तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती कारण संधी वारंवार मिळत नाही हे शरद पवार यांना सुद्धा माहिती आहेच की ! माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की इथे शरद पवार चुकले आहेत आणि दुर्दैवाने नंतर पुन्हा अशी कधी संधी निर्माणच झाली नाही . दिल्ली मधल्या लोकांनी खरंतर अजित पवार यांचा गेम केला आणि हा गेम शरद पवार यांनी चालवून घेतला तो त्यांनी चालवून घ्यायला नको पाहिजे होता.
अशावेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे मग दुसरा कुठला काही पर्याय आहे का ते चाचपणे . दुर्दैवाने असा पर्याय निर्माण झालाच नाही आणि अजित पवार यांच्या सगळ्या राजकारणाची गोची ही इथे आहे . त्यांच्या डोळ्या देखत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना असे वाटत होते की आपण निश्चितपणे एकनाथराव शिंदे यांच्या पेक्षा उजवे आहोत . आणि खरे सांगायचे तर ते खरे होते . जर का काकाने भाजपशी युती केली असती तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळाले असते . पण येथे सगळा आयडिया लॉजिकल लोच्या झाला . त्याची चर्चा मी आधीच्या लेखात केलेली आहे.
हिंदुत्ववादाबाबत आमच्या पिढीचा सर्वात मोठा लोच्या हाच होता की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून काही आकाराला येईना . याचे सर्वात मोठे कारण ओबीसी आहेत हे लोक हिंदुत्ववादाकडे गेले नसते तर कदाचित धर्मनिरपेक्ष राजकारणाला बरे दिवस पुन्हा आले असते पण हे घडले नाही आणि याचवेळी नेमकी भाजपाने एक अशी खेळी केली की तिथे सगळेच पराभूत झाले ही खेळी म्हणजे नरेंद्र मोदी यांना ओबीसी म्हणून पुढे आणणे . आज अवस्था अशी आहे की समस्त वैश्य आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे मोदी यांच्या मागे ठामपणे उभा आहे . आणि याचे एकमेव कारण ते दोघांनाही आपल्या वर्ण जातीचे वाटतात. त्यातच त्यांनी निवडणुका लढवताना हर हर महादेव ही घोषणा केली अशी घोषणा करणारे ते पहिले पंतप्रधान होते आहेत बसवेश्वर यांच्यावर बोलणारे ते पहिले पंतप्रधान आहेत साहजिकच अशा अनेक गोष्टींचा अडवांटेज त्यांना मिळत गेला आणि याचा पूर्ण फायदा भाजपला होत गेला आत्ता सुद्धा आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी व्यवस्थित प्लेस केलेले आहे साहजिकच सर्वशैवलोक हे या दोघांच्या मागे गेले . आणि शक्यता अशीच आहे की बहुदा पुढेही जातील .
ही जी एक त्यामुळे हिंदुत्ववादी अपरिहार्यता निर्माण झाली तिच्याशी कसे अड्जस्ट करायचे हेच अजित पवार आणि शरद पवार यांना कळत नव्हते आणि त्यामुळेच एक कोलाहल निर्माण झाला आणि त्या कोलाहाला मुळेच अजितदादांची सर्वात मोठी गोची झाली . नाही म्हटले तरी अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपद कळत नकळत शरद पवार यांच्यामुळे दोनदा हुकले असा काहीतरी समज (ज्यामध्ये सत्य असण्याची बरी शक्यता आहे) अजित पवार यांचा झाला होता . त्यामुळे ते भाजपाला जॉईन झाले खरे परंतु त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता राहिली नाही. कारण तोपर्यंत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपणच दावेदार असल्याच्या थाटामध्ये पुन्हा एकदा राजकारण करू लागले म्हणजे एकनाथ शिंदे एकदा मुख्यमंत्रीपद भोगून झाल्यामुळे पुन्हा कधीतरी आपल्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देतील ही शक्यता संपली . भविष्यामध्ये त्यामुळेच भाजपचाच मुख्यमंत्री येणार हे स्पष्ट झाले आणि यामुळेच अजित पवार यांना हळूहळू का होईना परंतु आपल्याला पुन्हा काकाकडे परत गेल्याशिवाय पर्याय नाही जर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आले तर ते आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच येऊ शकते असे वाटायला लागले आणि यामध्ये बरेचसे तथ्य होते . ते अधिक जगते तर कदाचित पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एक झाली असती. आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोक आहेत त्यांना काही शरद पवार यांच्याशी देणे-घेणे नाही किंबहुना जिकडे सत्ता तिकडे यांचा मत्ता असेच यांचे धोरण आणि वातावरण असते.
थोडक्यात काय महाराष्ट्राचा मुख्य नायक होण्याचे जे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले ते त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे होते परंतु नियतीने त्यांना हुलकावणी दिली हेच खरे . कवितेत एक वेळ हे सगळे पुन्हा प्राप्त होऊ शकते कारण कविता जिवंत असतात त्या पुढच्या पिढीत कर्तुत्वाच्या चुका दुरुस्त करू शकतात परंतु राजकारणामध्ये हे शक्य नसते एकदा सत्ता गेली की जातेच . त्या अर्थाने अजित पवार ही एक शोकांतिका आहे . Macbeth बनायला खूनी माणसाचे काळीज लागते ते अजितदादा यांच्याकडे कधीच नव्हते ते आतून अतिशय सॉफ्ट होते . माझ्या मते हेच खरे नायकाचे आणि म्हणून त्यांचे यश आहे . राजकारणातल्या त्यांच्या तडजोडी भविष्यात अधिकाधिक पुढे येत जाणार . अशा प्रकारच्या तडजोडी आमच्या पिढीने का केल्या हाही एक मुद्दा गडद होत जाणे अटळ आहे . खरे तर या सगळ्यावर कंगाल होणे हा उत्तम उपाय एकदा का कंगालच तुम्ही झाला की लोक तुमच्याकडे बोट करत नाही पण राजकारणात कंगाली काही कामाची नाही आणि म्हणूनच पैसे मिळवले पाहिजेत याची जाणीव त्यांना झाली होती.
त्यांच्या मृत्युपत्रामध्ये जे काय आलेले आहे त्याविषयीच्या काही बातम्या येत आहेत मुख्य म्हणजे डिजिटल पैसा त्यांनी प्रचंड कमावला असा प्रवाद आलेला आहे या अंगाने त्यांनी मिळवलेला पैसा जवळ जवळ 11 अब्ज आहे आणि तो चक्क त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या इन्व्हेस्टमेंट सॉफ्टवेअरच्या साह्याने मिळवला असे समोर आलेले आहे . हा सगळा पैसा खेळता असल्याने त्याच्या बाबतीतल्या कायदेशीर गोष्टी कशा हे सांगणे आता अवघड आहे . मुळात हे खरे की खोटे हे सांगणेच अवघड आहे पण जर हे खरे असेल तर मात्र आमच्या पिढीत मिळालेला आणि झालेला हा एक उत्तम नायक होता असे म्हणायला हरकत नाही कारण केवळ राजकारण हे एकमेव क्षेत्र नाही त्याबरोबर अर्थकारण हे क्षेत्र येते आणि अर्थकारणामध्ये जर काही त्यांनी ही चमकदार कामगिरी केली असेल तर त्याला दाद दिलीच पाहिजे
अजितदादा यांना आदरांजली !
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment