डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल तंत्र
ढग
आकाशाच्या विरोधात उभा ठाकलेला ढग
वारा काढून घेतो अलगद त्याची पाण्याची रग
चालून येतात चालू फ्लॅश एकामागून एक
काळ उभा करतो त्याच्यापुढे जहाजाचे डेक
पाण्याशिवाय कसे बरसावे कोल्हापूर शहरात
त्याच्यामधून गळत राहते एक कोरडी धार
डोळ्यामधून उडत राहतो आगीचा धुरळा
माहित नाही कुठल्या पृथ्वीचा काढणार असतो कोथळा
प्रेम नसलेला तो आकाशामधूनच हद्दपार
शेवटपर्यंत कळत नाही त्याचा आर त्याचा पार
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन या सिरीज मधील डे कॅथलॉन अनकॅटेगरीकल तंत्र या काव्यफायलीतून)
थोडे तीळ थोडा गूळ
संसाराचे गोड मूळ
गोड खाण्याचे व्यसन
आयुष्यावर वजन
एकही नाही लाभ
तरी सुटत नाही लोभ
झाले आयुष्य चक्की
देहामध्ये धक्काबुक्की
फेक गर्दी बाहेर
तरच तुझी आहे खैर
संसाराने देह ज्याचा ढापला
तो राहत नाही आपला
एक तीळ वाट सातात
काय होते बघ आत
देह होईल गोडवा
होशील पूर्ण सगळा
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन अन कॅटेगरी कल तंत्र या काव्यफायलीतून)
विक्षिप्तपणा म्हणजे सिद्धी नव्हे
मोक्ष मिळवणे ही खरी सिद्धी
यमनियम हीच सिद्धता
प्रचंड नाक वाढवणे
रोज दहादा आंघोळ करणे
किंवा दहा वर्षे अंघोळ न करणे
कपडे न घ****
किंवा १०० कपडे घ****
म्हणजे तपस्या नव्हे
नग्नतेचा खरा अर्थ
बनण्याचे सारे कपडे
बनवण्याचे सारे कपडे
उतरवून ठेवणे
केवळ असणे
नग्न तोच ज्याच्या अंगावर समाजाने दिलेल्या कुसंस्काराचे कपडे टिकत नाहीत
केवळ आंघोळ करून स्वच्छ होशील
पण शुद्ध होशील याची कसलीही गॅरंटी नाही
जोवर अंतकरण शुद्ध नाही
तोपर्यंत मळाचा अंत नाही
अंतकरण शुद्धी ही खरी शुद्धी
आणि अहंकार म्हणजे अशुद्धी
नखे वाढवू नकोस
कुठल्याही भ्रष्टाचारात हात न बुडवणे
म्हणजे नखे न वाढवणे
नख म्हणजे तृष्णांची वाढ
ती नैसर्गिक आहे
तिला शैविक बनवणे म्हणजे सिद्धता
जे शिवाकडे नेते ते शैविक
जे जीवात अडकवून ठेवते ते जैविक
फरक समजून घेणे म्हणजे सिद्धता
ह्या अशा ठोंब्या उपायांच्याकडे
जाशील
तर आयुष्याची होळी होशील
आयुष्याची काशी करणे म्हणजे मोक्ष मिळवणे
आणि ते ठोंब्या उपायांच्याकडून
शक्य नाही
जर खरोखरच काशीत जायचे असेल
तर मोक्षाची साधना कर
बाकी सगळ्या चिल्लर राजधान्या आहेत
वाजल्या न वाजल्या
नाहीतर मोडून खाल्ल्या
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
मोक्ष का फुल हर शरीर में अलगसा खिलता है
किसी को फॉलो मत कर ये दिया अंदर से जलता है
थोडे तीळ थोडा गूळ
संसाराचे गोड मूळ
गोड खाण्याचे व्यसन
आयुष्यावर वजन
एकही नाही लाभ
तरी सुटत नाही लोभ
झाले आयुष्य चक्की
देहामध्ये धक्काबुक्की
फेक गर्दी बाहेर
तरच तुझी आहे खैर
संसाराने देह ज्याचा ढापला
तो राहत नाही आपला
एक तीळ वाट सातात
काय होते बघ आत
देह होईल गोडवा
होशील पूर्ण सगळा
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन अन कॅटेगरी कल तंत्र या काव्यफायलीतून)
श्वास घ्यायला तू विसरशील
तुला कळणारही नाही तू मरशील
एकाच देहाचे आयुष्य आहे
कधी चढशील कधी घसरशील
तुला अनंत राहील दिसत
तू असंख्य बनत पसरशील
कळेल आयुष्यात दुःखच दुःख
सुखात रतशील रक्तशील रसरशील ओसरशील
एक कंटाळा निरर्थकता डसेल
तू स्वतःहून स्वतःला आवरशील
लोक वेड्यात काढत राहतील
तू मात्र साधना एकम करशील
शून्यापासून सर्व सारा खेळ
जा ते वाट पाहतय कधी परतशील
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : शक्तीतंत्र या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment