क्रिकेट :
क्रिकेट : प्रादेशिकता , देशता आणि जागतिकीकरण लेखक श्रीधर तिळवे नाईक
खरे तर पाचवी कसोटी जसप्रीत बुमरा बॉलिंग टाकणार नाही म्हटल्यावर मी बघणे सोडून दिले कारण मुख्य शस्त्र नसेल तर लढाईला काही अर्थ नसतो सचिन तेंडुलकरच्या सुरुवातीच्या काळात सचिन गेला की टीव्ही ऑफ व्हायचे तशी ही अवस्था आहे जसप्रीत च्या बाजूने बघितले तर त्याची ती अचीवमेंट आहे पण भारतीय संघाच्या दृष्टीने पाहिले तर हे अध:पतन आहे
पराभवाची खरी कारणे भारतीय फलंदाजी आहे मी विश्वचषकाच्या विश्लेषणात स्पष्ट म्हटले होते की हा बुमराहचा एक हाती विजय आहे ऑस्ट्रेलियात सुद्धा फार काही वेगळे घडले नाही पण मर्यादित षटके आणि कसोटी यामध्ये फरक असतो इथे एक खेळाडू पुरत नाही आणि सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचे तिसरे ते सहावे वर्ष आपण पाहिले की त्यावेळी हे अनेकदा घडताना पाहिलेले आता आठवत आहे
या मालिकेमध्ये स्पष्टपणे दिसलेली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा हा कसोटी प्लेयर नाही ही गोष्ट ! तो जर स्वतः स्वीकारत नसेल तर त्याला ती स्वीकारायला लावावी लागेल दुर्दैवाने हे घडत नाही दुसरी गोष्ट गौतम गंभीर याने स्पष्टपणे सांगितलेले आहे की मी आत्तापर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना फॉलो करत होतो परंतु आता यापुढे करणार नाही पण संघ कसा तयार करणार याविषयीचा काय मॅप आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही गौतम गंभीर यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल किंबहुना त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर भरवसा टाकला हीच चूक होती आता करून सावरून हे लोक नामा निराळे राहतीलच किंबहुना हे करण्यात हे अत्यंत वाकबगार लोक आहेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सारखे दिग्गज समर्थ प्रतिस्पर्धी संघ लढायला उभे राहिले की भारतीय लोकांचे नेमके काय होते हा प्रश्न आहे आपल्याकडे अनेक बॅट्समन कमकुवत संघांच्या पुढे खेळून ओवर रेटेड झालेले आहेत त्यांचे खरे रेटिंग हे कसोटी वेळेला कळते 20 20 च्या सामन्यात कितीही गुणवान खेळाडू असला तरी त्याला जास्तीत जास्त चार षटके टाकायला मिळतात त्यामुळे गुणवत्ता पूर्ण खेळाडूला सतत फेस करावे लागत नाही पण कसोटी संघात असे होत नाही तो खेळाडू तुमच्यापुढे स्वतः देऊ शकतो आणि त्याचा दबाव पण येऊ शकतो जिथे जसपुरेत बुमराह पुढे ऑस्ट्रेलिया दबावा खाली आला तिथे भारतीय खेळाडूंचे काय ? त्यामुळे 20 षटके खेळणे आणि 100 षटके खेळणे यात फरक असतो तो स्पष्टपणे कसोटी मालिकेत दिसतो एकंदरच फास्ट टेंपरामेंट फार कामाला येत नाही विशेषतः तुम्ही जर कसोटी मालिकेत खेळत असाल तर जे काहीसे कादंबरी सारखे आहे हे लक्षात घ्यावे लागते कादंबरी लिखाण करताना कवितेचा टेम्पो ठेवून चालत नाही तसेच काहीसे हे आहे भारतीय संघात कसोटीचा टेम्पो असणारे लोक नाहीयेत अगदी सर्वात गाजलेला जो बॅट्समन आहे श्रेयस तो सुद्धा कसोटीच्या टेंपरामेंटचा नाहीये त्याचाही टेम्पो हा फिफ्टी-फिफ्टी वाला आहे आणि तो सहजरीत्या ट्वेंटी-ट्वेंटी होऊ शकतो कसोटी मध्ये आक्रमणा इतकेच संरक्षण फार महत्त्वाचे असते आणि दुर्दैवाने त्याची जाणीव नसल्याने सगळ्यांचाच गोंधळ झालेला आहे
शेवटच्या कसोटीमध्ये रोहित शर्माला बाहेर बसवले गेले नव्हते असे आता स्पष्ट झाले आहे किंबहुना ही पोस्ट उशिरा होण्याचे कारण याबाबतीत नेमकी वस्तुस्थितीच कळत नव्हती पण आता जे दिसते ते असे ! रोहित शर्मा स्वतःच बाजूला बसला आणि यासाठी त्याचे अभिनंदन करायला हवे. मात्र त्याचा फायदा संघाला काय झाला तर काहीही झाला नाही कारण प्रॉब्लेम संघाच्या टेंपरामेंटचा आहे 20-20 आयपीएल ह्या भारतात होतात त्या जर ऑस्ट्रेलियात झाल्या तर मला खात्री आहे भारतातले अनेक बॅट्समन अशीच माती खातील
विराट कोहली उत्तम कसोटीपटू आहे यात शंकाच नाही पण त्याचे रिफ्लेक्स वयानुसार कमी झालेले आहेत आणि आता यापुढे अवघड होऊन बसणे अटळ आहे मी या ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधीच विराट कोहली बाबत माझ्या काहीही अपेक्षा उरलेल्या नाहीत अशी पोस्ट टाकली होती ती एक शतक सोडले तर खरी झाली असे दिसते खरे तर रोहित आणि विराट या दोघांचेही वय झालेले आहे आणि ते रिटायरमेंट घेत नाहीयेत इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे सचिन तेंडुलकरच्या वेळी 20 20 चे सामने जास्त नव्हते आता ते प्रचंड वाढलेले आहेत आणि पुन्हा प्लस आयपीएल आहे त्यामुळे सचिन स्टॅमिना टिकवू शकत होता हे खेळाडू तो स्टॅमिना या वयात टिकवणे शक्य नाही कारण शेवटी क्रिकेटमध्ये वयापेक्षा तुम्ही किती सामने आयुष्यात खेळला आणि कोणत्या प्रकारचे सामने खेळला हे काउंटिंग असते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे काउंटिंग जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे आलेले आहे त्याने आता सन्मानाने कसोटी क्रिकेट मधून रिटायर व्हावे हेच उत्तम खरे तर त्यांनी ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये निवृत्ती घ्यायला नको पाहिजे होती त्यांनी ती कसोटी मध्ये घ्यायला हवी होती परंतु सचिन तेंडुलकरची रेकॉर्ड तोडण्याचा मोह इतका आहे की हे झालेले नाही
अजित वाडेकर विरोधात झालेल्या कारस्थानापासून क्रिकेटमध्ये मराठी माणसाचे काहीच टिकू द्यायचे नाही हे धोरण असलेले सो कॉलड लोक उदयाला आलेले आहेत आणि आता ते सत्तास्थानी बसलेले आहेत ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संधी देतायेत कारण सचिन तेंडुलकरची सगळी रेकॉर्ड तुटावीत अशी यांची योजना आहे त्यासाठी विराट मारून मुटकून डोक्यावर बसवला जातोय मला वाटतंय निदान कसोटीच्या संदर्भात तरी त्याला साईडलाईन करणे योग्य तुमचे जे काय प्रादेशिक गेले असेल आणि मराठी लोकांचे विरुद्धचे जे कटकारस्थाने असतील ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आणू नयेत
या दरम्यानच्या काळात विनोद कांबळीचा इशू प्रचंड पुढे येत गेला कारण विनोद कांबळी बाबत जे झाले तेच नेमके अजिंक्य रहाणेबाबत झाले का असा प्रश्न निर्माण झाला होता विनोद कांबळी च्या बाबतीत मुद्दा केवळ जातीचा कधीच नव्हता कारण त्याची जातच मुळात अनेकांना माहिती नव्हती तो फॅक्टर नंतर दलित लोकांनी जास्त उपस्थित केला आणि त्याची जात सर्वांना माहीत करून दिली क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना त्याविषयी फारशी कल्पनाच नव्हती शिवाय कांबळी हे आडनाव शैव ब्राह्मण म्हणजेच पंडित लोकांच्यात पण येते याची अनेकांना कल्पना नाही कांबळ टाकून शिवसूत्र स्पष्टीकरण करणारे हे लोक होते म्हणूनच त्यांना कांबळी म्हणायचे पुढे वारकरी संप्रदायाने सुद्धा कांबळ ही अतिशय महत्त्वाची मानलेली आहे तिच्या जागी आता शाल आलेली आहे आणि तिचा अर्थ काय आहे हे मी सांगायला नको १८५० नंतर अनेक पंडित लोक हे अत्यंत जाणीवपूर्वक शूद्र लोक टाकले गेले त्यात कांबळी पण येतात त्यामुळे जातीचा प्रश्न जेवढा दाखवला जातो तेवढा मुळात क्रिकेटमध्ये उपस्थितच नव्हता दुर्दैवाने आता तो आणला गेलाय आणि त्याचा नेमका इतरांना खरोखर किती फायदा होणार हे अद्याप स्पष्ट नाही विनोद कांबळे बाबत मराठीचा मुद्दा किती होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र मराठी लोकांचे क्रिकेटवरचे वर्चस्व नष्ट करावे म्हणून जाणीवपूर्वक प्रादेशिक पातळीवरच्या निवडी संख्ये बाबत आणल्या गेल्या त्यामुळे महाराष्ट्राकडून किती लोक भारतीय संघात येणार यावर मर्यादा आल्या आणि मुंबई संघातून किती लोक भारतीय संघात येणार यावरही मर्यादा आल्या ही कोटा सिस्टीम सर्वाधिक महागात मराठी लोकांना पडलेली आहे किंबहुना मराठी लोकांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठीच नॉन मराठी लोकांनी हे पद्धतशीरपणे राजकारण केले आणि दुर्दैवाने मराठी राजकारणी लोकांनी त्या सगळ्या राजकारणाला साथ दिलेली आहे आपले मुख्य शत्रू शरद पवार आहेत जोपर्यंत पैसे नव्हते तोपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता पैसे आले तसे सगळे नॉन मराठी या क्रिकेटच्या जगामध्ये संघटितपणे लोभी करत उदयाला आले तोपर्यंत नॉन मराठी लोकांच्या सुद्धा या खेळाची तितकीशी धनात्मक क्रेझ नव्हती जे खेळत होते ते केवळ क्रिकेटसाठीच खेळत होते
मराठी बाबतचे नेमके हेच राजकारण पुढे अजिंक्य रहाणे बाबतीत खेळले गेले तो रोहित शर्मा पेक्षा उत्तम कॅप्टन होता तरीसुद्धा त्याला कॅप्टनशिप दिली गेलेली नाही आणि अलीकडे ऋतुराज गायकवाड बाबतीत सुद्धा हेच अमराठी लोकांचे राजकारण चालू आहे क्रिकेट बोर्ड शरद पवारांच्या कडून हिसकावून स्वतःकडे घेण्याची अमित शहा यांना का घाई झाली होती हे अजूनही मराठी लोकांना कळत नाही जिथे पैसा तिथे मराठी लोक आणि जिथे सुरुवात आणि कष्ट तिथे मराठी लोक हा भारतीय लोकांचा व्यवसायनिष्ठ फॉर्म्युला आहे म्हणजे मराठी लोकांनी रिस्क घ्यायची पैशाशिवाय काम करायचे आणि मग नॉन मराठी लोकांनी येऊन त्यात पैसा आला की तो पैसा कमवायसाठी मराठी लोकांना साईडलाईन करायचे हे इथे दशकाणु दशके चालू आहे दुर्दैवाची गोष्ट मराठी लोकांना मराठी म्हणून याबाबत काही जाणीव उरलेली नाही मराठी राजकारणी फक्त स्वतःचा मिळणारा हप्ता बघतात मराठी खेळाडू याबाबतीत तोंड उघडत नाहीत कारण तोंड उघडले की आपण कायमचे बाहेर बसू याची त्यांना जाणीव आहे वास्तविक हे तोंड राजकीय लोकांनी उघडायला पाहिजे पण मराठी लोकांच्या बाजूने एकही राजकीय नेता नाही अगदी राज ठाकरे सुद्धा नाहीत त्यातच मराठी लोकांच्या डिस्कोर्स मध्ये कमालीची जातीयता आलेली आहे आणि विनोद कांबळीच्या वादाला ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद सुद्धा मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि ब्राह्मणांचा प्रतिनिधी म्हणून सचिन तेंडुलकर आणि ब्राह्मण्यतरांचा प्रतिनिधी म्हणजे विनोद कांबळे अशा प्रकारचे उद्योग इथल्या जातीयतेने उभा केलेला आहे एवढी जातीयता तर उत्तर भारतात पण नाही फरक असेल तर तो फक्त इतकाच की मराठी लोकांच्या फक्त चांगले कपडे घालून ही जातीयता चाललेली असते असेलच तर एवढाच काय तो गुणवत्तात्मक फरक असेल याबाबतीतली सर्वात हाईट जर काय असेल तर ती म्हणजे रोहित शर्मा लां पाठिंबा देणारे प्रचंड संख्येने असणारे मराठी लोक कधीही अजिंक्य रहाणे बाबतीत अशी मोहीम चालवताना दिसले नाहीत ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकर आणि त्याआधी सुनील गावस्कर यांच्या विरोधात मराठीच माणसे जास्त होती त्याचप्रमाणे अजिंक्य राहणेचा फॉर्म जरा गडबडला की आवाज बोंबलवणारे मराठीच लोक होते मॅच फिक्सिंग चे प्रकरण सचिन तेंडुलकरच्या कॅप्टनशिप नंतरच प्रचंड वाढत गेले हा योगायोग ज्यांना वाटतो ते अजूनही शाळकरी आहेत त्याचप्रमाणे इथेही मराठी माणसेच मराठी माणसाची शत्रू झालेली दिसतात या कसोटी मालिके दरम्यान हा इशू वारंवार आल्यामुळे मी हा चर्चेला घेतला गुणवत्ता कुठल्याही कसोटीवर डावलली जात असेल आणि जर त्याबाबत राजकारण होत असेल तर त्या राजकारणाविरोधात सर्वांनीच उभे राहिले पाहिजे पण अलीकडे काही अति शहाण्या धर्मांध आणि धम्मांध जात्यांध लोकांनी वेगळेच राग आलापायला सुरुवात केली आहे धर्मकारणाचा विषय असेल तर जरूर धर्म आणा परंतु जिथे विषय संस्कृतीचा येतो तिथे सांस्कृतिकच एकता हवी मराठी माणसे सांस्कृतिक एकतेबाबत सातत्याने कमी पडतायत याला कारण मराठी संस्कृतीचे खरे दगलबाज लोक हे मराठीतच आहेत समता केंद्री अनार्य शैव संस्कृती टिकवायची असेल तर प्रत्येक प्रादेशिक संस्कृती व्यवस्थित टिकली पाहिजे पण त्याचबरोबर ती सतत वाढत राहिली पाहिजे तिचा विकास होत राहिला पाहिजे तिचे नवे प्रोग्रामिंग झाले पाहिजे भारताची राष्ट्रीय संस्कृती चहु अंगाने बांधण्यासाठी व डेव्हलप व अपडेट करण्यासाठी हे आवश्यक आहे
यानिमित्ताने एक निर्माण न झालेला प्रश्न पण न्यूज मध्ये असलेला प्रश्न म्हणजे विराट कोहली हा इंग्लंड मध्ये सेटल होणार आहे का? विराटने मुलाला जन्म इंग्लंड मध्ये दिलाय हा ज्यांना योगायोग वाटतोय ते पुन्हा एकदा शाळकरी आहेत. भारतातली राष्ट्रीयता ही किती तकला दु असते याचा अंदाज अनेकांना नाही. स्वतःचा राष्ट्रीय स्वाभिमान वारंवार जाहीर करणारे राष्ट्रीय संघातले लोक जेव्हा परदेशाची कास धरतात तेव्हा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या नेमक्या व्याख्या काय आहेत हे एकदा आपण विचारायला हवे म्हणजे असे की भारतीय संघ यांना फक्त खेळण्यासाठी हवा असतो की काय आणि जर असे असेल तर मग भारतीय म्हणजे काय फक्त एक टीम? राष्ट्र हे फक्त टीम असते का आणि जर का तसे ते असेल तर चौथ्या नवते ची राष्ट्रवादाची व्याख्या राष्ट्र म्हणजे एकत्र संघ भावनेने खेळणारी टीम अशी करावी का? अलीकडच्या राष्ट्रवादीमध्ये ही नवीन झालेली डेव्हलपमेंट आहे आणि आणि तिचे मूळ थेट फारुख इंजिनिअर पासून सुरू झालेले आहे अलीकडे क्रीडा क्षेत्रामध्ये ती प्रचंड प्रमाणामध्ये तळपताना दिसते ही व्याख्या जर का आपण स्वीकारली तर राष्ट्रीयत्वाच्या सगळ्या डायमेन्शन्स बदलत जातात दुर्दैवाने याकडे फार काही लोकांचे लक्ष नाहीये याचे कारण ही चौथ्या नवतेची घटना आहे आणि चौथी नवता म्हणजे काय आणि ती काय नेमका परिणाम टाकत आहे याचा अंदाज भल्याभल्यांना नाहीये राजर फेडररचा मुलगा राफाच्या स्पॅनिश संस्थेत टेनिस शिकतो याचा अर्थ नेमका काय होतो हे आपण लक्षात घ्यायला हवे मी नेहमीच जागतिकीकरणाचा पुरस्कार केलेला आहे किंबहुना ते होणे अटळ आहे प्रश्न असा आहे की याचा फायदा फक्त उच्च वर्गीय लोकांना होणार की निम्नवर्गीय लोकांच्या पर्यंत तो पोचणार आहे ? म्हणजे असे की यशस्वी झालेल्या लोकांच्या साठीच हा फक्त जागतिक राष्ट्रवाद आहे असे म्हणता येईल का म्हणजे विराट कोहलीला हा राष्ट्रवाद आपलाय होतो पण भारतातल्या एखाद्या गरीब नागरिकाला मात्र तो आपलाय apply होत नाही असे आहे का ? या अंगाने जर का आपण श्रमिक लोकांचे पर देशात जाऊन काम करणे लक्षात घेतले तर लक्षात येईल की त्यांना काही बाबतीत जागतिक दळणवळणाचा फायदा मिळालेला दिसतो किंबहुना श्रमांचे जागतिक दळणवळण ही एक फार मोठी घटना अलीकडे घडलेली आहे पूर्वी तिची संदर्भ चौकट फक्त गुलामगिरीची होती ती आता राहिली नाही श्रमिक लोक स्वतःहूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात मायग्रेट होत आहेत पूर्वी ही संख्या अल्प होती उद्या जर का विराट कोहली चा मुलगा इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या संघाकडून खेळला तर आपण त्यावर काय रिएक्शन देणार आहोत? कारण तो इंग्लंडमध्ये जन्मलेला आहे साहजिकच तिकडचे नागरिकत्व त्याला मिळालेले आहे. दीपिका पदुकोण बाबतीत हा प्रश्न प्रकाश पडू कोण यांना तितक्या मोठ्या प्रमाणात विचारायला गेला नव्हता कारण त्याचे गांभीर्य त्यावेळेला कळाले नव्हते पण आता अशा खेळाडूंची संख्या प्रचंड वाढत जाईल तेव्हा राष्ट्रवादीच्या व्याख्या चौथ्या नवतेनुसारच कराव्या लागणार नाहीत काय ? म्हणजे संघ हे एक नेटवर्क आहे आणि या नेटवर्क कडून नेटवर्कीय भावनांच्या कडून खेळणारे नागरिक म्हणजे त्या त्या राष्ट्राचे नागरिक होत. म्हणजेच राष्ट्र म्हणजे केवळ एक नेटवर्क ही वस्तुस्थिती बनत चाललेली आहे का? आणि हे नागरिकत्व आता तात्कालिक मानावे लागेल असे म्हणता येईल का? म्हणजे संघ सोडणे तसे राष्ट्र सोडणे नवीन संघ घेणे म्हणजे नवीन राष्ट्र स्वीकारणे असे म्हणता येईल का? मला वाटते हे बदल होत चाललेत आणि ते स्वीकारण्याची तयारी आता आपण सर्वांनी करावी हे योग्य होय. थोडक्यात संस्कृती आता जागतिक पातळीवर सुद्धा ज्या तऱ्हेने वाढत जाईल ती पातळी सुद्धा आपणाला स्वीकारावी लागेल आणि आपणाला मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे राष्ट्रवाद सुद्धा मार्गी देशी पोटी आणि जमाती अशा चारही पद्धतीने वाढवत जावा लागेल मी हे नेहमीच सांगितलेले आहे की केवळ देशीवाद किंवा केवळ मार्गीवाद आत्ताच्या नव्या काळात उपयोगी नाही जो या चारही गोष्टींचे नेटवर्क करतो तोच खरा चौथ्या नव्हते चा माणूस आहे आणि अर्थातच कलावंत सुद्धा ! ते अपवाद नाहीत
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment