नवता , अंतःकरणीकरण, आत्मसातीकरण आणि देशीकरण श्रीधर तिळवे नाईक
तुम्ही ज्या इतिहासात भूतकाळात जन्म घेता तो कधीही परिपूर्ण असत नाही तो सर्व काही तुम्हाला देत नाही अनेक नव्या गोष्टी निर्माण होत असतात ज्या परंपरेत ,इतिहासात, भूतजालात नसतात आणि त्यांचे काय करायचे हा प्रश्न प्रत्येक माणसा पुढे उभा ठाकत असतो. त्यामुळेच प्रत्येक माणूस नवीन निर्माण झालेल्या गोष्टीचे अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो किंबहुना अनेकदा ज्याला आपण अभ्यासक्रमाबाहेरचा अभ्यासक्रम म्हणतो तो दुसरा तिसरा काही नसून नवता अवगत करून तिचे अंतःकरणीकरण करणे हा असतो सर्वसाधारणपणे अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कायमच जी शिकवली जाते ती नवता नसते ती जूनता असते आणि होऊन गेलेल्या भूतकाळातल्या नवतांचा इतिहास असते ज्या होऊन गेलेल्या असतात परंतु तुमच्या आसपास अजूनही त्या परंपरा म्हणून जतन केल्या जातात . प्रत्यक्ष जगामध्ये मात्र वस्तुस्थिती वेगळी असते कुठल्यातरी कोपऱ्यात परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हाच तुमच्या आसपासच्या जगामध्ये एक नवीन नवता निर्माण होत असते जी तुम्हाला शिकवली जात नसते आणि म्हणूनच जी शिकवली गेलेली नाही अशी नवता तुम्हाला स्वतः आयुष्यात उतरून अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करावे लागते. त्यामुळेच जुनतेने भारावल्या गेलेल्या अभ्यासक्रमात प्रचंड मार्क्स मिळवलेले मेरिटमध्ये आलेले लोक अंतःकरणीकरण न करता आल्याने आयुष्यामध्ये मात्र फेल गेलेले दिसतात . मोक्षाच्या संदर्भात सुद्धा हे लागू होते अनेकदा गुरुकुल मध्ये तुम्ही जूनताच शिकत असतात आणि प्रत्यक्षामध्ये नवीन युगात आसकत्यांचे नवे नवे रूप नवे नवे आकार उदयाला आलेले असतात आणि या जूनतेच्या साह्याने तुम्हाला मोक्ष मिळत नाही कारण तुम्हाला काही नवीन तंत्र स्वतःच्या अंगाने डेव्हलप करावी लागतात . पण दुर्दैव नेहमी असेच असते की तुमच्या आधी होऊन गेलेल्या पिढीतले उदाहरणार्थ आमच्या पिढीत ओशो राजनिश जे कृष्णमूर्ती तुम्हाला आकर्षक वाटतात कारण ते होऊन गेलेले असतात ते जूनता असतात नवता नसतात त्यांच्याविषयी बोलणे सोपे असते कारण ते अभ्यासक्रम झालेले असतात मरून गेलेले असतात . त्यामुळेच अनेकांना मोक्ष मिळत नाही हीच गोष्ट अनेकदा सर्वच क्षेत्रांना लागू होते . तुम्ही आता विज्ञानात असाल तर तुम्हाला Quantam सायन्स शिकावेच लागते ते अभ्यासक्रमाचा भाग झालेले आहे पण प्रत्यक्षामध्ये जे चौथ्या नवतेचे विज्ञान आहे ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने उदयाला येतंय ते तुम्हाला स्वतःलाच अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करावे लागणार आहे आणि जे अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करतील किंवा आता करतात ते पुढची नोबेल पारितोषिके मिळवणार हे उघड असतं आहे.
पुढे मग या गोष्टी अधिक राजकीय बनतात त्याचे कारण असे असते की माणूस अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण थांबत नाही त्याचा स्वतःचा आत्मा असतो जो त्याने स्वतःच निर्माण केलेला असतो किंवा अभ्यासक्रमाने निर्माण केलेला असतो जो प्रत्यक्षात काल्पनिक असतो मानसिक दृष्ट्या वास्तविक म्हणून वावरत असतो आणि साहजिक असतो तो आपल्या आत्म्याला नित्य समजून तो त्याचे देशी करण आणि सामाजीकरण करण्यासाठी म्हणून त्या नवतेचे देशीकरण किंवा साम्राज्यकरण करायला लागतो . या दोन्ही गोष्टी अनेकदा सत्तेतून निर्माण होतात आणि त्यातूनच मग सर्व गोष्टी पॉलिटिकल होत जातात .
विशेषता तुम्ही जर का तिसऱ्या जगात जन्मलेला असता तेव्हा तर हा प्रश्न अधिक तीव्र होतो साहजिकच मग काय करायचे हा प्रश्न प्रत्येक माणसापुढे उभा राहतो आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणून नेहमीच अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण पुढे येते. नवता आत्मसात कराव्याच लागतात त्याला पर्याय नसतो पण त्यांचे देशीकरण आणि साम्राज्यिकरण होणार नाही याची काळजी घ्यावी लागते . आणि त्याचबरोबर जे असे करतील त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करता येईल तेही पहावे लागते .
भारताचा भूतकाळ आपण पाहिला की हा प्रश्न सतत निर्माण झालेला दिसतो विशेषत: धर्माच्या क्षेत्रात तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झालेला दिसतो . प्रत्येक येणाऱ्या काळात नवा मोक्षक नवा मोक्ष सांगत असतो आणि राजकारण करू इच्छिणारे लोक या नव्या मोक्षा मधून नवा धर्म निर्माण करत राहतात नवीन राजकीय विचार प्रणाली निर्माण करायला लागतात .
अंतःकरणीकरण म्हणजे काय? तर स्वतः शाबूत ठेवून जे नवे आहे जे आपल्या आसपास आहे पण जे आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या शरीराचा भाग नाही त्याला अवगत करणे होय त्यावर मास्टरी मिळवणे होय साहजिकच व्यक्ती तितक्या प्रकृती या हिशेबाने प्रत्येक व्यक्ती आपल्या हिशेबाने हे अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करत असते. कलावंत आणि वैज्ञानिक याला अपवाद नसतात. या दोघांनाही विशेषत: ते जर का तिसऱ्या जगात असतील तर परकीय विज्ञान तंत्रज्ञान ज्ञान विद्या शास्त्र या गोष्टी अवगत कराव्या लागतात आणि हे करताना अनेक प्रश्न उभे ठाकत असतात.
हा अंतःकरणीकरणाचा प्रश्न भारतामध्ये प्रथम जेव्हा सिकंदर याने आक्रमण केले तेव्हा उभा ठाकला कारण वायव्य भारतीय सिकंदराकडून पराभूत झाले होते तो जरी माघारी गेला असला तरी त्याने आपले क्षेत्रपाल पंजाब सिंध यासारख्या प्रांतामध्ये नेमले होते आपण सिकंदराला पूर्णपणे हरवले अशी एक दंतकथा हल्ली प्रसवली जाते पण ती खरी नाही वायव्य भारतात ग्रीक लोकांचे साम्राज्य होते हे प्रथम स्वीकारावे लागते ग्रीक लोकांचा प्रचंड प्रभाव आपल्यावर पडला ही वस्तुस्थिती आहे. चंद्रगुप्त मौर्य याने तर एका ग्रीक क्षेत्रपालाची मुलगी असलेल्या हेलनशीच विवाह केलेला आहे आणि हा विवाह ग्रीक लोकांची उपस्थिती स्पष्टपणे दर्शवतो त्यापूर्वी आपल्यावर झालेले यशस्वी आक्रमण हे पर्शियन लोकांचे होते . त्यांच्याकडून आपण नेमके काय घेतले हा एक फार मोठा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे zend awesta हा ग्रंथ या काळात भारतात आला आणि त्याच्या आधारे इथल्या भगत लोकांनी वेद निर्माण केले महाकाव्ये निर्माण केली का असा एक फार मूलभूत प्रश्न या अंगाने निर्माण होतो . कारण हे आक्रमण बुद्धाच्या मृत्यू बरोबर लगेच झालेले आहे आणि बुद्धाला शह देण्यासाठी म्हणून मग स्वतःची लिखित परंपरा तयार करणे आपण पर्शियन लोकांच्याकडून शिकलो का असा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो ब्रिटिश काळात इतिहास निर्माण होताना हा प्रश्न अनेकदा निर्माण झालेला आहे पण नंतर सिंधू संस्कृतीमुळे हा प्रश्न सुटला आणि भारतात लिखित संस्कृती असावी असा एक कयास बांधला गेला निदान पक्षी लिखित संस्कृती ही सुद्धा अतिशय महत्त्वाचे असते आणि तिची तातडी निर्माण झाली असावी किमान झाली का असा प्रश्न नक्की उपस्थित होतो .
हीच गोष्ट ग्रीकांच्या आक्रमणाबाबत आहे याबाबतीत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांची प्रेरणा ही प्रामुख्याने ग्रीक आक्रमणात आहे असे मानायला नक्कीच जागा आहे. अर्थात दुसऱ्या बाजूने आपण असेही म्हणू शकतो की ही दोन महाकाव्य स्वतंत्र आहेत. वेद स्वतंत्र आहेत. मात्र ज्या पद्धतीचे साम्य आहे ते बघता या दोघांचाही सोर्स कुठल्यातरी एका ठिकाणी आहे असे मात्र आता नक्की सांगता येते. त्याउलट उपनिषदांच्या बाबतीत हे प्रश्न निर्माण होत नाही त्याचे कारण त्यांचे जे सोर्स आहेत ते आर्य नाहीत. ते स्पष्टपणे शैव अनार्य आहेत. मुळात सूत्र हा शब्द सिंधू संस्कृतीतूनच आलेला आहे कारण कापसाचे उत्तम उत्पादन ही भारतीयांचे खासियत होती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वेळूला सुत्त असे म्हटले जायचे आज सुद्धा मराठीत सूत काढ असे आपण सहज म्हणत असतो . सुतक हा शब्द सुद्धा त्यातूनच आलेला आहे प्रत्येक गोष्टीत" र "मिक्स करायचा आणि त्याला संस्कृत बनवायचे अशी एक खोड नंतर आर्य लोकांच्यात डेव्हलप झाली त्यातूनच मग सुतापासून सूत्र धम्मापासून धर्म कम्मापासून कर्म असे शब्द तयार होत गेले मुळात आर्य हा शब्द सुद्धा आय पासून तयार झालेला आहे . आय या शब्दाचा अर्थच "बाहेरून आलेला"असा आहे . शैव लोकांनी हा खास बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठी निर्माण केलेला शब्द आहे आजही आयाराम गयाराम हे चाललेलेच असते आया याचा अर्थ हिंदी मध्ये आला असा होतो . बुद्धाने सर्व लोकांच्यासाठी वापरलेला अनारिय या शब्दाचा खरा अर्थ जे आलेले नाहीत म्हणजेच जे इथलेच मूळचे आहेत असा आहे साहजिकच आपली मुळे घट्ट करणे हे या लोकांना अत्यंत आवश्यक वाटत होते . त्यांच्या स्वतःच्या म्हणून काही मौखिक परंपरा होत्या आणि त्या वापरत त्यांनी वेद आणि महाकाव्य निर्माण केले असे आता म्हणता येते मात्र हे करताना त्यांनी जे त्यांच्या नंतर आले होते त्यांच्या अनेक गोष्टी आत्मसात केल्या या आत्मसातीकरणालाच त्यांनी अधिक ओरिजनल असल्याचे सांगत अधिकाधिक प्रमोट केले . याचे कारण म्हणजे या लोकांचा आत्मा नित्य असतो हा सिद्धांत होय प्रत्यक्षात हितल्या शैव आणि श्रमण दोन्ही संस्कृतीमध्ये आत्मा अनित्य होता अनित्य आहे पुढे जैन धर्माने आत्मा स्वीकारला किंबहुना पार्श्वनाथ पर्यंत जैन धर्म हा शैव धर्म होता पुढे मग महावीर यांच्यापासून ज्याला आज आपण ज्याला जैन धर्म म्हणतो तो निर्माण झाला
यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अवेस्तन म्हणजेच पर्शियन लोकांनीच आपल्यावर प्रथम आक्रमण केलेले नव्हते ना ? की पर्शियन धर्मातून हाकलले गेल्यानंतर हे लोक इथे आले ? हे सर्व लोक भगत होते आणि पुढे त्यांनाच ऋषी म्हटले गेले काय ? यज्ञ ही मांत्रिकी नव्हती काय ? मुळातच मंत्री हा शब्द आपण पाहिला तर त्याचा उगम हा स्पष्टपणे मंत्र मांत्रिक या दोन शब्दांच्या मध्ये दिसतो . गमतीचा भाग असा आहे की मांत्रिक याला प्रतिष्ठा नाही पण मंत्री याला प्रतिष्ठा आहे याचे कारण मांत्रिकाची सत्ता अप्रत्यक्ष आहे तर मंत्र्याची सत्ता प्रत्यक्ष आहे म्हणजेच एका अर्थाने मंत्रि म्हणजे दुसरे तिसरे काही नसून राजाने अपॉइंट केलेला मांत्रिक असा आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या काळामध्ये जो राजा असायचा नायक असायचा तो राज्यकारभार चालवण्यासाठी गणकारभार चालवण्यासाठी भगतांना मांत्रिकांना मंत्री म्हणून नेमत होता याचे कारण मुळात त्या काळामध्ये श्रद्धा आणि श्रद्धेच्या आधारे उभी राहिलेली मांत्रिकी हीच समाजाच्या केंद्रस्थानी होती.
प्रश्न असा आहे की वैदिक धर्म म्हणजे अंतःकरणीकरण होते का ? की वैदिक आधी होते आणि झरतृष्टामुळे एक धर्म तिथे निर्माण झाला आणि तो हळूहळू सर्वत्र स्वीकारला जाऊन ज्यांनी तो नाकारला त्यांची इराणमधून हकालपट्टी झाली ? भारतात आलेल्या लोकांना शेती येत नव्हती जो काही शेतीचा संदर्भ आहे तो फार
तुरळक आहे आणि जो धान्याचा उल्लेख आहे तो प्रामुख्याने आपोआप उगवलेले धान्य असा आहे शेतीमधून निर्माण झालेले धान्य असा नाही अर्थात शेती स्वीकारल्या गेल्यानंतर मात्र शेती संदर्भातल्या सुद्धा ऋचा रचल्या गेल्या आणि पुढे वेदाव्यासाच्यामुळे सामील झाल्या अन्यथा या लोकांचा पशुपालन हाच मुख्य व्यवसाय दिसतो त्यामुळेच हा वाद वैदिक पशुपालक विरोधात झोराष्ट्रीयन शेतकरी कृषी समाज असा होता काय ? असा प्रश्न निर्माण होतो कारण हा प्रश्न जवळजवळ सगळीकडेच निर्माण झालेला आहे अगदी जीवधर्म हा सुद्धा सुरुवातीला पशुपालक असल्याने त्याचा संघर्ष इजिप्त मधल्या शेती प्रधान संस्कृतीशी झालेला दिसतो एका अर्थाने अडाणी राहू इच्छिणाऱ्या लोकांचा नवता आणू पाहणाऱ्या लोकांशी झालेला हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जेव्हा आपण हरणार असे लक्षात आले तेव्हा या लोकांनी स्थलांतर केलेले दिसते बायबल मध्ये त्यामुळेच बायबल मधला देव पशुपालक माणसाला पशुपालक भक्ताला आशीर्वाद देताना दिसतो आणि ज्याने शेती केली आहे त्याला मात्र शिक्षा देतो .
जर वेद हे मूळचे असतील आणि शेती आत्मसात केलेले झोराष्ट्रियन लोक हे आत्मसात करणारे लोक असतील तर मग नेमके काय झाले असेल ते स्पष्ट होऊ शकते . इराणी म्हणजेच पर्शियन वैदिक होते पण झरतृष्ट हा माणूस निर्माण झाला आणि त्याच्यामुळे एक नवीन धर्म उदयाला आला हा नवीन उदयाला आलेला धर्म आत्मसात करून एक नवा झोराष्ट्रीयन धर्म निर्माण झाला आणि या धर्माचे भांडण आपली पशुपालक संस्कृती टिकवू पाहणाऱ्या मूळ वैदिक असलेल्या धर्माशी सुरू झाले साहजिकच जी नवता आली ती स्वीकारण्याची तयारी वैदिक लोकांची नसल्याने त्यांना भारतामध्ये यावे लागले . पण इथे आल्यानंतर त्यांच्यापुढे आणखी एक नवीन धर्म होता तो म्हणजे शैव धर्म आणि हा धर्म ही शेती करणारा होता पशुपालन करणाराही होता त्यांच्या हे त्यामुळेच लक्षात आले की आता आपणाला शेती स्वीकारावी लागणार त्यामुळे शेतीची चाल ढकल आपणाला अनेक वेदांच्या मध्ये दिसते स्वीकारापैकी न स्वीकारावी हा फार मोठा प्रश्न या लोकांच्या पुढे उभा राहिलेला दिसतो त्यामुळेच त्यांना वेद नव्याने निर्माण करावे लागले आणि शैव धर्म आत्मसात करत त्यांनी नवीन वेद लिहिले जे जुन्या वेदांशी एका अर्थाने पूरक परंतु शैव धर्म आत्मसात करत निर्माण झाले . किंबहुना निर्माण करण्यात आले आणि हे काम बहुदा व्यास या संस्थेने केले ज्याची सुरुवात वेद व्यास यांनी केली परंपरा आणि नवता यांचा हा संघर्ष आहे हे आपण बारकाईने पाहिले की लक्षात येते जिथे नवता अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करणे एका संस्कृतीने नाकारले त्यासाठी स्थलांतर केले आणि नाईलाजाने पुन्हा ज्यासाठी स्थलांतर केले ते स्वीकारले . प्रश्न असा आहे की दरवेळी नव्हतेला विरोध करायचा आणि मग नंतर पुन्हा त्या नव्हतेला स्वीकारायचे पण त्याचे अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करणे न करता फक्त आपला स्वतःच्या संस्कृतीचा आत्मा शाबू ठेवत आत्मसातीकरण करायचे आणि हे आत्मसातीकरण आपल्या आसपासच्या देशावर देशी करण करत लादायचे असे का चालले असते आज सुद्धा जे काही घडते आहे त्यामध्ये एका बाजूला चौथी नवता आत्मसात केली जात आहे आणि त्याच वेळेला आपली संस्कृती या आत्मसातीकरणानंतर ती लादली जात आहे . वास्तविक खरी गरज नवता अवगत करून तिचे अंतःकरणीकरण ही आहे पण प्रत्यक्षामध्ये मात्र आत्मसातीकरणाच्या नावाने साम्राज्यीकरण चाललेले आहे तसा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणूनच म्हणून मनुस्मृती पुन्हा पुन्हा चर्चेत आणली जाते
या पुढचा प्रश्न असा आहे की हा वैदिक धर्म थेट युरेशियामध्ये निर्माण झाला होता का आणि मग तिथून तो इराण मध्ये आणि मग अफगाणिस्तान मध्ये आला का ? याही पुढे जाऊन खरोखरच उत्तर ध्रुवावर या लोकांची प्रथम वस्ती नव्हती ना मग हे लोक तिथे पोहोचले कसे की पहिल्या हिम्मयुगामध्ये शेवटी हे तिथे पोहोचले . की मुळातच इंडिया, आफ्रिकेबरोबर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे सुद्धा मानवाचे उगमस्थान आहेत ? आणि तिथे हिमयुगामुळे प्रचंड बर्फ जमल्याने ते सर्व झाकले गेले आहे . तिथे खरोखरच अटलांटिक नावाची संस्कृती अस्तित्वात होती का ? आपण या जागांचे उत्खनन करू शकत नाही कारण ते केले तर नेमके वातावरणावर काय परिणाम होतील आपणाला माहिती नाही परंतु तिथे काहीतरी असे आहे जे आपल्या इतिहासाशी निगडित आहे . एका अर्थाने लोकमान्य टिळक यांनी मांडलेल्या सिद्धांताची ही वापसी आहे. जर का आर्य तिथून प्रथम युरेशियामध्ये आले आणि मग युरेशिया मधून स्थलांतर करत इराण अफगाणिस्तान करत किंवा तिबेट वगैरे करत भारतात आले असतील तर मग हा एक फार मोठा प्रवास या लोकांनी पुरा केला असे म्हणावे लागेल.
आणि हे सर्व यांनी केले कारण हे आपली परंपरा आपली जुनता
सोडायला तयार नव्हते म्हणून झाले साहजिकच पुढचा प्रश्न म्हणूनच त्यांचा संघर्ष झाला की काय ? हा येतो सर्वसाधारणपणे आपण सर्वच मांत्रिक लोकांच्या ज्यात ब्राह्मण आणि भगत दोन्ही येतात लोकांच्या विरोधात असतो परंतु जर का एखाद्या मांत्रिकांच्या टोळीचा स्वतःच्या मंत्रांवर प्रगाढ विश्वास असेल तर काय ? त्या काळामध्ये विज्ञान नव्हते हे लक्षात घ्या त्यामुळे साहजिकच हा एक असा ग्रुप होता ज्याचा मंत्रांच्यावर प्रचंड प्रगाढ विश्वास होता देवांच्यावर विश्वास होता आज आपणाला तो absurd वाटतो कारण आपण सर्वच आता अँपसर्ड appssard झालो आहोत परंतु त्या काळामध्ये तो खूप सार्थक वाटत होता हे लक्षात घेतले पाहिजे.
या पुढचा प्रश्न असा निर्माण होतो तो असा की जर का आपण वैदिक मंत्र ओरिजिनल होते असे मानले तर मग अवेस्ताचे काय करायचे ? एक शक्यता अशी ही दिसते की त्यांनाही झरतृष्ठापूर्वी असलेले त्यांचे वेद परंपरा म्हणून लाभले होते कदाचित हा तोच वेद असावा जो गुप्त झाला हरवला असे सांगितले जाते आणि ज्याच्यामधून दोन परंपरा निर्माण झाल्या पहिली वैदिक आणि दुसरी झोराष्ट्रीयन त्यामुळे साहजिकच झोराष्ट्रियन पर्शियन लोकांचाही वैदिकांच्या इतकाच त्या गोष्टींच्यावर अधिकार आहे किंबहुना दिसते ते असे की बहुदा या दोन परंपरांच्या मागे एक परंपरा उभी होती जी इराणियन होती . आणि तिच्यातून मग या दोन परंपरा निर्माण झाल्या इराण मध्ये झरतृष्ट ऍड झाला तर भारतामध्ये भगवान शंकर ऍड झाले आणि या दोघांच्या मुळेच या दोन्ही परंपरांच्या मध्ये प्रचंड फरक पडला कारण ही नवता सामावून घेणे गरजेचे वाटले भारतामध्ये ही नवता आत्मसात करण्यासाठीच उपनिषदे निर्माण झाली ब्रह्म धर्म निर्माण झाला सांख्य धर्म निर्माण झाला .
मग चुकले कुठे ? तर चूक ब्राह्मण धर्म निर्माण करण्यात आहे. ब्राह्मणांनी हा धर्म निर्माण करायला नको पाहिजे होता. त्याऐवजी जर का त्यांनी ब्रह्म धर्म आणि सांख्य धर्म पुढे नेला असता तर अनेक अनर्थ टळले असते . शंकराचार्यांचा वेदांत हा ब्रह्म धर्म पुढे नेणारा आहे पण दुर्दैवाने त्यांना ब्राह्मण धर्म सुद्धा स्मृती स्वरूपात आत्मसात करावा लागला आणि हे आत्मसातीकरण अत्यंत चुकीचे होते त्याऐवजी त्यांनी आपली शैव परंपरा याबाबतीत पुढे नेली असती आणि स्मृती ठामपणे नाकारल्या असत्या तर बरे झाले असते .
म्हणजेच आता आपण असे म्हणू शकतो की वैदिक धारा ही एका अशा धारेतून आली जिच्यातून इरानियन झोराष्ट्रीयन धारा पण आली होती त्यानंतर त्यांनी भारतातला शैव-धर्म आत्मसात केला काही वेळा शंकराचे रुद्रीकरण केले गणपती पूर्णपणे स्वीकारला पार्वती पूर्णपणे शक्ती म्हणून स्वीकारली पण लक्ष्मी अधिक मोठी केली तर स्कंदाला देवाचा सेनापती बनवून टाकला.
इंग्रजांच्या काळात महालक्ष्मी आणि गणपती ही दैवते अधिक मोठी झाली कारण वैश्य युग आले होते आणि या युगात पैसा आणि ज्ञान फार मोठे झाले होते म्हणूनच गणपती मोठा होत गेला नंतर उत्सव झाला आणि महालक्ष्मी अधिक मोठी होत गेली . प्रॉब्लेम फक्त तेव्हा सुरू झाला जेव्हा त्यांनी पार्वतीची देवळे महालक्ष्मीची म्हणून सांगायला सुरुवात केली आणि आत्तासुद्धा खरा प्रॉब्लेम तोच आहे . तुम्ही शैव लोकांच्या छाताडावर बसून आपला धर्म मोठा नाही करू शकत . तुम्ही स्वतःची स्वतंत्र देवळे बांधा त्याला कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही पण कोल्हापुरातल्या अंबाबाईचे जसे महालक्ष्मीकरण करायला पहात आहात तसेच सर्वत्र तुम्ही आता करायला लागला तर त्याला प्रचंड विरोध होणे अटळ आहे . अत्यंत जाणीवपूर्वक तुम्ही वसंत पंचमीला सरस्वती प्रमोट करत असाल तर मग विरोध होणे अटळ आहे . वसंत पंचमी ही पार्वतीने शंकराला प्रपोज केले त्यासाठी साजरी केली जाते तुम्हाला हे असे मोकळे प्रेम आवडत नाही आम्ही समजू शकतो पण त्याला नाकारण्यासाठी तुम्ही थेट सरस्वतीच आणता याला काय म्हणावे ? तुम्ही हा मुख्य संदर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न करता आणि त्याला मुख्य भारतीय संस्कृतीमधून व्यवस्थित काढता आणि प्रॉब्लेम तिथे आहे तुम्ही शैव संस्कृती विज्ञान संस्कृती अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करा पण ते करण्याऐवजी तुम्ही देशी करण करता आणि संपूर्ण देश ताब्यात घेता. अवकाश ताब्यात घेता . त्या अवकाशाचे देशी करण करता. सामराज्यी करण करण करता माझा या देशीकरणाला साम्राज्य निर्माण करण्याला विरोध आहे . कारण देशी करण ही सुद्धा साम्राज्य करण हे सुद्धा अनेकदा ब्रिटिशांच्यासारखे शोषक साम्राज्यवादी असते . त्यामध्ये अनेकदा स्वतःच्या संकल्पना देशावर लादल्या जातात हे लादणे असते लादन असते आणि हे लादन मूळच्या संस्कृतीला रिप्लेस करण्यासाठी केले जाते .
आत्मसातीकरणांमध्ये स्वतःचा आत्मा जिवंत ठेवला जातो आणि दुसऱ्याची गोष्ट अवगत केली जाते. दुसऱ्याचा आत्मा बळकावला जात नाही . बळकावणी ही नेहमीच घातक असते कारण मग प्रतिकार अटळ होतो . आणि अनेकदा मग स्वतःचा आकार शाबूत ठेवण्यासाठी म्हणून या प्रतिकाराशी लढण्याची उबळ येते यातून युद्ध अटळ बनते . आज शैव कळत नकळत प्रतिकाराला तुम्ही तयार करत आहात . हळूहळू का होईना पण ते जागत आहे आणि त्यांचे हे जागरण जर का सृजनशील दिशेने गेले नाही तर ते फ्रोजनशील होईल आणि हे फ्रोजन फोडण्यासाठी मग ते तुमचा विनाश करणे अटळ आहे कारण शैव परंपरा तांडव पण सांगते . एकदा इराण मधून हाकलले गेलेलेच आहात आणि त्यापूर्वी कधी कधी कुठे काय काय तुम्हाला सोडावे लागले आहे याचा खात्रीशीर इतिहास उपलब्ध नाही . अनेकांनी भारत सोडण्याची तयारी पूर्ण केलेली आहे आणि अमेरिका आणि युरोप यांची वाट पकडलेली पण आहे हा स्वभाव आहे आधी आपल्याला सोयीची व्यवस्था निर्माण करायची आणि मग प्रतिकार सुरू झाला की तो प्रदेश सोडून द्यायचा पण एक वेळ अशी येतेच जेव्हा पळायला जागा शिल्लक राहत नाही तेव्हा काय करणार आहात ? उद्या जर का अमेरिका आणि युरोप या दोन्ही खंडानी तुम्हाला नकार दिला तर तुम्ही जाणार कुठे ? गेली साडेतीन हजार वर्षे तुम्ही इथे राहिले आहात तर मग शांतपणाने जगत का नाही आणि इतरांना सुद्धा का जगू देत नाही ? प्रत्येक वेळेला आम्ही आमचेच वर्चस्व गाजवणार हे कसे काय कोण खपवून घेईल ? तुम्ही एक हजार नंतर जे वर्चस्व गाजवलेले आहे त्याला मुस्लिमांचा आधार आहे आता तो आधार नाही बांगलादेश पाकिस्तान निर्माण झाले तेव्हाच हा आधार गेला . जनसंघ जोपर्यंत तुमची पार्टी होती तोपर्यंत तिला बहुमत नव्हते ती जेव्हा शैव लोकांची पार्टी झाली तेव्हा २०१४ च्या निवडणुकीत तुम्हाला निर्विवाद बहुमत मिळालेले आहे आणि आता जर का तुम्ही शैव श्रुतीच्या मुळावर आलात तर तुम्हाला हा सगळा जनाधार गमवावा लागेल . एका अदानीला सांभाळण्यासाठी तुम्ही जर का इथली सत्ता पणाला लावणार असाल तर ते तुम्हालाच महागात पडणार आहे हिंदुत्ववाद हा फक्त ब्राह्मणांचा आणि ब्राह्मणी क्षत्रियांचा आणि वैश्य लोकांचा असण्याचे दिवस गेले आता तो बहुजन समाजाचा झालेला आहे तुम्हाला हे सत्य आवडो अगर नावडो .
तेव्हा हे देशीकरण थांबवा मोक्ष अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करा . देशी करण पॉलिटिकल असते तर अंतःकरणीकरण अध्यात्मिक असते एवढे लक्षात ठेवा हा फरक तुम्हाला कधी कधी कळत नाही म्हणून सांगावेसे वाटते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment