बाळबोध कविता

आशा इतकी शक्तिशाली की 

राजा बरोबर दफन झाले 

जो स्वर्ग अस्तित्वात नाही 

त्याच्यात सामान्य अभिजन झाले 


ते कल्पना धाडतात ज्यांच्यात

लोक स्वतःचे आयुष्य घडवतात 

राजनीती आहे की धर्म कारण 

आंधळे करते ते दर्शन झाले 


माणसे खिडक्या बंद करतात 

तेही समजून घेतले असते 

पण इथे तर घरेही बंद केलेली 

हे कुठल्या औषधाचे आचमन झाले


पृथ्वीकडेही बघायचे नाही 

जिच्यातून यांचे अन्न उगवते 

हा कसला मनाचा माज आहे

पॉल्युशन कसे सोल्युशन झाले 


या असल्या भिकार जगामध्ये 

श्रीधर तुला जगायचे आहे 

जगण्यापेक्षा असे मरण बरे 

असे वाटावे असे जीवन झाले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

त्याची गुंडगिरी यशस्वी झाली 

कालच त्याला सीट ऑफर झाली 


त्याच्या नावाचे नारे आले 

लोकांनी नेता म्हणून निवड केली 


आता तो कायदे तोडणार नाही 

कायदे करण्यासाठी त्याची पाठवणी झाली 


बघता बघता मोठा नेता होईल 

त्याच्या स्वागताची तयारी झाली 


मी संविधान पहात राहिलो 

एकेका पानाची गळती सुरू झाली 


लोकांना जे हवे लोकांनी निवडले 

मी तरीही या देशाची निवड केली 


कदाचित उदासपणे मरून जाईन 

काल माझी कविता मरून गेली 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुला टाळण्याचे शंभर बहाणे आहेत 

रोमँटिक हो म्हण ते उखाणे आहेत


तक्रार नको तुला आधीच माहीत होते 

तिच्या खोलीत प्रियकर उताणे आहेत 


ती जुने परंतु प्रायोगिक सादर करते 

तिच्या ह्या अदेचे हजारो दिवाणे आहेत


ती परंपरा आहे की नवता माहित नाही 

एक खरे तिच्याजवळ मादक ताणेबाणे आहेत


ती पृथ्वीइतकी जुनी पृथ्वीइतकीच नवी 

आणि तुझ्याजवळ क्षणभंगुर दाणे आहेत


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गोष्टी तर खूप होतात पण तरीही गोष्टी घडत नाहीत 

तिला घरी सोडल्यानंतर त्या माझ्यात सापडत नाहीत 


आता तर बोलवल्याशिवाय ती घरी येत असते 

डोळ्यात इशारे उमटतात भेटायला धडपडत नाहीत 


एक भेट संपूर्ण होते जसा सामना व्हावा पूर्ण 

स्कोअर बोर्ड बघावा तर आकडे काही सापडत नाहीत 


एक संयम तरंगत असतो जलतरंग वाजवत असतो 

काळ किती गेला कळते पण ह्रदये तडफडत नाहीत 


साला मग चाललय काय प्रेम आहे की प्रेम नाही ?

ऐकले होते की गडबड होते पण भेटी आमच्या गडबडत नाहीत 


चालतय तोवर चालून द्यावं हलतय तोवर हालून द्यावं 

खड्ड्याचा अंदाज कशाला घ्या जोवर जीव गडगडत नाहीत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

थोडासा रडलो का रडलो 

एका अश्रूत का कलमडलो


दुसरा अश्रू ही येत होता

 आवरण्यासाठी का धडपडलो


तिच्यापुढे रडायला हवे होतो 

तिच्यापुढे मात्र गडबडलो 


तिची नाराजी दिसत होती 

माझ्या नाराजीवर बडबडलो 


काहीतरी अगम्य शिरले 

समजून न घेताच हुंदडलो 


वार दिसला नाही , आला 

कापला जाताना रखडलो


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


दिसावयाला पदर पण ताणेबाणे होते 

तिच्या काळजाखाली रोज रहाणे होते


ती तर कायमच चंचल वारा होती 

माझे इरादे तरी कुठे शहाणे होते


तिची नको वफा नि मीही करणार नाही 

करारच होते ना की काळीजगाणे होते 


जे आत आहे ते वासनेचे वादळ आहे 

ती ताटावरून उठली तूही समज खाणे होते 


असे टाईमपास होत असतात आयुष्यात 

आश्चर्य ! अशा टाईमपासचेही गाणे होते


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)



आयुष्याने अनेक बाजून्नी धोका दिला 

पावलो पावली आत्महत्येचा मोका दिला


मी तर माझा चेंडू अजून फेकलाही नव्हता 

त्यांनी मिळून माझ्याविरुद्ध चौका दिला


मला वाटले ते मला शिल्प बनवू पाहत आहेत 

उरलो तेव्हा दगडही नव्हतो राखेचा ढिगारा दिला


आयुष्याचे टवके उडवत जो तो आता फिरतो आहे 

जो तो विचारतो आहे मला किती टक्का दिला


माहित नाही का पण माझ्या तुकड्या नेहमी बदलत राहिले 

बदलणाऱ्या रिलेशनशिपचा शिक्षकांनी पुरावा दिला 


इतरांचे वाचण्यापेक्षा मी माझा अनुभव घेतो 

आयुष्याने माझ्या हातात नेहमी राजा वेगळा दिला 


माहित नाही का पण आता प्रयोगशाळेत जावव त नाही 

विज्ञानात असे काय आहे की मला इतका कंटाळा दिला 


ज्याची त्याची डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी धडपड 

मलाच का मग आयुष्याने असा वेगळा पाया दिला 


पाटील सर म्हणतात की तू फक्त कलावंत आहेस 

असेनही माहित नाही निसर्गाने काय चेहरा दिला


माझे म्हणावे असे फक्त माझ्याजवळ शहाणपण होते 

बाकी तुमच्या अभ्यासक्रमाने मला नेहमी दगा दिला


असे नव्हते की वाट पाहण्याचा स्टॅमिना नव्हता

जो निर्णय दिला त्यांनी खूप खूप उशिरा दिला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


बघता बघता बघता रात्र झाली 

उत्तर आले नाही फुटके पात्र झाली 


असा टांगला जीव एका प्रतीक्षेत 

साधी जखम होती नदीचे पात्र झाली 


चेहरा सुद्धा आता दाखवणे बंद 

माझी दृष्टीसुद्धा गलित गात्र झाली 


कळत नाही तिने पत्र का घेतले 

की सज्जन होती वाचून वात्र झाली 


असे वाटते आहे खूप काळ गेला 

दिवस आलाच नाही फक्त रात्र झाली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


विज्ञान सिद्ध करायला ईश्वर लागत नाही 

ईश्वर सिद्ध करायला जर विज्ञान लागत असेल 

तर पोरी 

हे कधीही चांगले की आपण थेट विज्ञान स्वीकारावे 


मी समजू शकतो तुझी अल्लावरची श्रद्धा 

परंतु सर्वत्रच अल्ला असेल आणि सर्वजण अल्ला असतील 

तर बुरखा घालून कोणापासून काय लपवत आहेस?


निराकाराची भक्ती मेंदूला सहन होत नाही 

मेंदूला फक्त आकार झेपतात 

कुठेही उभी राहिलीस तरी काबा येणारच 


मुळात तू आकारातच उभी आहेस 

तू स्वतः आकार आहेस 

इतकेच लक्षात घे


मूर्ती पुजली काय किंवा एक आकार पूजला काय 

एकूण एकच 


मी तुला म्हणत नाही की तू नास्तिक हो माझ्यासाठी 

माझ्यासारखी 


मी फक्त इतकेच म्हणतोय 

डोके झुकवताना 

मेंदू शाबूत ठेव 


कारणाशिवाय वाकणारे कणे 

मला गुलाम वाटतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


लाच घेताना पकडला जातो 

लाच घेऊन सोडला जातो 

कुठे काय झाले झालेच नाही 

एक हादसा खोडला जातो 


बरे झाले वाईट वेळ आली 

असेही एकदा व्हायला हवे 

लिहायला उचलतो आपण पेन 

नेमका नीब मोडला जातो 


कशाचेच काही वाटत नाही 

हृदय देखील फाटत नाही 

आपल्या डोळ्यासमोर रोज 

 पाया पाय तोडला जातो 


शंभर तिला हिंट दिल्या 

हजार गुलाब काळजात फिरवले 

तिला आता पक्के का विचारता

चेहरा सिक्रेट "कोड"ला जातो 


खरे तर कधीच नाते तुटले 

काळीज आयुष्यातून उठले 

तरीपण तिची गल्ली दिसता 

मेंदू तिच्या "मोड"ला जातो 


सर्व काही हलके केले 

बारके बारके कातरून ठेवले 

देह उचलतो आयुष्य अवघे 

आत्मा ओवरलोडला जातो


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

या जगात सैतानाच्या तोंडातही थोडेसे सत्य असते 

शेवटी त्यालाही त्याचे खोटे लोकांना करायचे कन्विन्स असते 


सैतानसुद्धा येऊ शकतो प्रेषिताचा वेश पांघरून 

भाषा सैतान लपवते तिला कुठे सत्य ठाऊक असते 


ज्याला तुम्ही निवडलाय तो मुळात नेमका काय आहे 

आपली निवडही कधीकधी संस्कार केलेली निवड असते 


तू कुठलाही आकार निवड किंवा कुठलीही मूर्ती निवड 

म्हटले तर तो दगड असतो म्हटले तर ती देव असते 


अनंत दाखवता येत नाही म्हणून तुला सांत दाखवले जाते 

तू कितीही झिगझिक कर पण सांत शेवटी सांतच असते


इतके बखेडे करण्यापेक्षा नास्तिक होणे कधीही चांगले 

धर्माच्या नावाने कितीही सांग धर्माचे सत्य काल्पनिक असते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आपण सर्वच जण श्रद्धेने आजारी आहोत 

आणि या आजाराबद्दल ईश्वराचे आभारी आहोत 


मातीच्या काचांपासून बनलेला काच महाल 

आपण हा काच महाल तुटण्याची तयारी आहोत 


वरून पाहिले तर काहीसुद्धा दिसत नाही 

कदाचित खालीच राहण्याची आपण हुशारी आहोत 


मेंदूच्या निवडुंगांना रंगबिरंगी फुले आली 

त्यांना सर्टिफिकेट हवे आम्ही विचारी आहोत 


चंद्रालाही वाटतो त्याचा प्रकाश अनाकलनीय

त्याच्यासारखीच प्रकाशाची आपण उसनवारी आहोत


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)

आत्ताच तर मला आयुष्य बरे दिसू लागले

आणि तुला त्यात माझे नखरे दिसू लागले


द्यायचे तरी काय तुला मी आता भेट म्हणून 

सोन्याचे दागिने दिले त्यात तुला चरे दिसू लागले 


तुझ्यासाठी घराचा स्वच्छता कार्यक्रम घेतला

तुला बाकी सोडून कचरा ठेवलेले कोपरे दिसू लागले


घर चालवण्यासाठी दुकान चालवणे आवश्यक 

वाटाघाटी करतोय तुला बोलणे तोतरे दिसू लागले


त्याला पाहून का तू नेहमी माझ्याकडे पाहते आहेस 

तुझ्या तुलना झाल्या आणि मला डबरे दिसू लागले


त्याने खोट्याच्या तांगड्या इतक्या ताणवल्या 

कि नको तिथून आता त्याचे खरे दिसू लागले


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी पापच करत जाईन तिचा बुरखा काढताना

मी पापच करत जाईन तिला माझे शरीर वाढताना


मी पापच करत जाईन वासना मिरवताना

मी पापच करत जाईन प्रेम जिरवताना 


मी पापच करत जाईन तिच्या इच्छा चुंबतांना

मी पापच करत जाईन तिच्या स्तनावर ओथंबताना 


मी पापच करत जाईन तिच्या कानात ओसांडताना

मी पापच करेन तिच्या खांद्यावर आयुष्य सांडताना 


मी पापच करत जाईन सेक्स मध्ये आग कापताना 

मी पापच करत जाईन स्वतःला तिच्यात चाचपतांना 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)



ज्यांना घरात जायचंय 

ते दरवाज्याचे कुलूप काढतात कड्या काढतात आत जातात 


ज्यांना बाहेर राहायचंय खिडक्यातून उपदेश करत राहतात 


ज्यांच्याजवळ काहीच नसतं 

ते वीट वीट जमवत 

घरकुल उभा करतात 


ज्यांना आयता महाल लाभतो 

एक तर तो ते वाढवतात 

नवे महाल बांधतात

हे ज्यांना जमत नाही ते पुन्हा महालाच्या खिडक्यातून उपदेश करत राहतात 


तेव्हा घर बांधायचं तर घर बांध 

घरात जायचं तर दरवाजा उघड 

नाहीतर दुसऱ्यांच्या घरात खिडकीतून डोकवताना

तूच विंडो सीट प्रमाणे 

विंडो मॅन होशील 


खिडकीतून फक्त तुलाच बाहेरुन न्याहाळता येत नाही 

घरातल्या लोकांनाही तुला घरातून न्याहाळता येतं हे लक्षात ठेव 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आमची लायकी नाही पण तू तर लायक आहेस ना ?

आम्ही आपले कार्यकर्ते पण तू तर नायक आहेस ना ?


तुझ्यावरती श्रद्धा ठेवली तू हात काढून घेत आहेस 

ज्या गाण्याचा रियाज केला त्याचा गायक आहेस ना ?


स्वतःच्या स्वप्नाऐवजी आम्ही तुझा केला पाठलाग

आम्हाला निर्णय घेता येत नाही तू निर्णायक आहेस ना 


तूच डळमळतो आहेस की तुझी तत्वे डळमळत आहेत 

जो एकाच जागी स्थिर राहतो असा कायक आहेस ना ?


आमचे आहे ते ते सर्व तुझ्याजवळच गहाण आहे 

आयुष्य डिपॉझिट म्हणून ठेवून घेतले पण उत्तरदायक आहेस ना ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


 प्रेमात घटना अशाच घडतात 

चांगल्या झाडावर माकडं चढतात 


दिसावयाला देखणी आहे 

साहजिकच डोळे फडफडतात 


बघावयाला अख्खा गाव जमतो 

शंभर कॉमेंट्स धडधडतात 


एकच प्रश्न तुला कशी पटली 

काळया जादूच्या शक्यता उडतात

 

इसका मत्सर सभोवताली 

नि तिला स्तुती सुमने आवडतात 


प्रतिस्पर्ध्यांचे करावे काय 

या प्रश्नात दिवस अवघडतात 


मी काळा म्हणून गोरे अस्वस्थ 

स्वप्नात माझे रंग उखडतात


तुझ्या सौंदर्याचे वजन झाले 

तुला कसे सांगू खांदे अवघडतात 


हे शहर पण फार बेरकी आहे 

बेवडे पण इथे तलवारी काढतात 


चल कोल्हापुरातून पळून जाऊ 

खूपच आता लोक बडबडतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आमची लायकी नाही पण तू तर लायक आहेस ना ?

आम्ही आपले कार्यकर्ते पण तू तर नायक आहेस ना ?


तुझ्यावरती श्रद्धा ठेवली तू हात काढून घेत आहेस 

ज्या गाण्याचा रियाज केला त्याचा गायक आहेस ना ?


स्वतःच्या स्वप्नाऐवजी आम्ही तुझा केला पाठलाग

आम्हाला निर्णय घेता येत नाही तू निर्णायक आहेस ना 


तूच डळमळतो आहेस की तुझी तत्वे डळमळत आहेत 

जो एकाच जागी स्थिर राहतो असा कायक आहेस ना ?


आमचे आहे ते ते सर्व तुझ्याजवळच गहाण आहे 

आयुष्य डिपॉझिट म्हणून ठेवून घेतले पण उत्तरदायक आहेस ना ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


शहनाज श्रीधर तिळवे नाईक 


तिच्याजवळ होते एक आय लव यू 


आय तिचा यु माझा लव सर्वांचा 


जो सर्वांचा नव्हता 

त्याचा झाला एक आय लव यू 


आय माझा यु तीचा आणि लव सर्वांचे

ज्याचे उडत गेले टवके 

चालत आल्या मांजरी आणि बोके 

आतले पार्सल गायब झाले 

उरले फक्त खोके 



शहनाज म्हणजे ताज 

शहनाज म्हणजे बादशहांचा नाज


शहनाज पुष्कळ होती 

पुष्कळत होती

तिची रियासत सुद्धा 

पुष्कळ पुष्कळ होती 


मी आणि निजाम 

एकाच वेळी प्रेमात पडलो तिच्या 

आणि मला वाटले

माझ्याजवळ तिचा धर्म नाही 

आणि हाच माझा पराभव आहे 



अशक्यच ती मागत होती 

वाटेत माझाच खच पडला होता 

आणि निजाम कडे सर्व अशक्य शिलकीला होते 


शेवटी तो श्रीमंत होता गर्भ श्रीमंत 

आणि माझ्या दुकानाला नुकतीच घर घर लागायला सुरुवात झाली होती 



लिलीची फुले तिने पाहिलीच नाहीत 

तिने पाहिला गुलाबांचा मत्तपणा 

आणि मला तर माहीत होता 

डेनिस लिलीचा वेगवानपणा 


साकळले नाही डोळ्यात पाणी 

वृक्षत्वाची गाणी 

वारे माप 


ती अमाप काटे पसरत म्हणाली 

एका चुंबनाच्या बदली 

एक काटे वॉक 



आभाळ निळे झाले 

कंठ निळकंठ झाला 

विषाचा प्याला कोण पिला 

तिने हातात दिला 

मी रिकामा केला 

आणि कायमचा रिता झालो 


६ 

निश्चल कृष्ण 

चंचलतेत वाकला 

एक काळा डोह फाकला 


क्षेत्र साळीचे उचलले गेले 

दोन मासे मेले 

पाणी पिऊन 



ती जे सांगायची 

ते घट्ट 

तिच्या जिभेला फिट्ट 


बांधेसूद आणि स्मूद 


ती फक्त खुंट्या पीरगळायची नाही 

ताराही पीरगळायची


मी व्हायचो पीर 

ती व्हायची काफीर 

कॉफी पिता पिता कॉफीर 


तिचे सावळे अंग 

कॉफीचे उपांग 



स्त्रीबरोबर स्त्री होणे जमले नाही 

मी पुरुष 

माझे भवितव्य तिच्याबरोबर रमले नाही

कदाचित काळीजच पुरेसे दमले नाही 



जो उठाव होता तो सार्वभौम होता 

सर्व भूमी त्याने उठवली 


१०


झनन झांजर झपूर्जा 

रमलरात पेंगाळत 

आनंद ताडन 

तालन तालन मालन मालन 

स्कलन स्खलन 

स्किलफुली 

स्कीमॅटा झपाटा 

ताठा कोसळला 

सळसळत कायमचा 


११


चढण्याचे आमंत्रण आले 

तेव्हा वाटले गावठी आहे 

पण स्कॉच निघाली 

आणि मी 

घोट घोट 

घाटाघाटाने

काळाचा 

गळा घोटला 


१२


ओठ गाफील नव्हते 

समंजस होते 

वाटच पाहत होते 


जिला शहनाज म्हणत होते प्रत्यक्षात ती जहाँबाज होती 


तिलाही सर्व हवेच होते 

काही अवयव कासव 

काही अवयव ससेच होते


१३


दवदार डेरेदार वृक्ष 

मी स्तन पिले नाही दव पिले 


ओला झालो 

पण फडके फिरवले नाही 


१४


मागणं मुश्कीलच असतं 

पण मी पुरेसा निर्लज्ज होतो 


१५


चढाव चढताना 

मिळण्याची काही खात्रीच नव्हती 


बुरखा होता 

पण ओळखीचा होता 


मी म्हणालो 

ओळखीचा शत्रू 

अनोळखी मित्रापेक्षा कधीही बरा 


त्यामुळे केला तिने तोरा 

तरी ओळख असल्यासारखी सलगी झाली 

ती झाली हलगी 

मी बडवत राहिलो 


१६


ज्याच्याजवळ धाडस नसते 

त्याच्याजवळ बाईचे ओजस नसते 


प्रभा फाकते 

आपण फक्त वाकून जायचे असते 


१७


निजाम आपोआपच बाजूला झाला 


भाऊ म्हणायचे 

किल्ला लढवला 

की नमाजवादी आणि समाजवादी 

दोघे गळून पडतात 


१८


एका मागून एक 

कित्येक समुद्र उचलले 

कित्येक नद्या गिळल्या 

काही वेळ ओले झालो 

तर त्वचा पिळल्या 


असेच तर असते 

लाटा कधी एकट्याने येत नाहीत 

त्यांच्या भरत्या होतात 

देहात भरती होतात 

एक कडक सॅल्यूट मारून 

निघून जातात 


१९


निघताना 

क्षणभर थांबलो 

त्यावेळी माहित नव्हतं 

अखंड प्रेमात बुडणार आहे 


आता ती शहनाज की जहाँबाज याच्याशीही काही देणे घेणे नाही 


एवढेच माहित आहे


जिचे अंगच आभूषण 

तिला दसऱ्याला देईल सोने कोण?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पोरी स्वतःलाच वाळवायला गेलेत 

कवींना उगाच गुलाब दिसतायेत 


त्या समुद्राला सामोऱ्या जात नाहीत 

त्यांना वाळवंटच वाळवंट दिसतात 


एक ऑन गोइंग क्रिएशन 

आणि तेलांच्या विहिरी 


कोणाला माहित होतं 

तेलाच्या बदल्यात पाणी विकत घेता येईल 


पोरी गुलाब वाळवायला गेलेल्या नाहीत 

पोरी स्वतःलाच वाळवायला गेलेत 


जिभा सुजलेत 

भाषा सजलेत 


दुर्मिळ ओलावा गिलावा म्हणून टिकलेला 

तरंगांचा थवा 

फेक म्हणून फेकलेला 


पोरी गुलाब वाळवायला गेलेल्याच नाहीत 

पोरी स्वतःलाच वाळवायला गेलेत 


छापले गेलेले ढग निमूट आकाशात उडवायचे 

शोधणारे डोळे ठरवलेल्या सूर्यावरच खेळवायचे 


चंद्राला फॉलो करणारे कॅलेंडरच 

सूर्यासमोर उभे करायचे 

जग सात दिवसात निर्माण झाले 

यावरचे विश्वास गाढ करायचे 


पोरींना कळत नाही 

दिवस तर सूर्य ठरवतो 

आणि सिल्याबस सांगतो 

कोट्यावधी सूर्य आहेत म्हणून 


सात दिवस प्रमाण मानायला 

नेमका कुठला सूर्य प्रमाण मानायचा ?


की हे जग फक्त या सूर्यापुरतेच मर्यादित आहे?


पोरींना सूर्यामध्ये आद्य पुरुष दिसतो 

आणि पोरी स्वतःलाच वाळवायला 

सूर्यासमोर निघून गेलेत 


जे नित्य आहे ते नियत करते सर्व 

त्यावरच उभा करायचा आपला गर्व 


कासवे पोहत येत आहेत 

ससे धावत येत आहेत 

कानाडोळा करायचा 

आणि स्वतःला निमुट वाळवायचे 


ग्रेस फुल इमोशन्स 

सादर करायच्या 

जेणेकरून पोरी पोरी वाटतील पोरं वाटणार नाहीत 


रोमँटिसीझम पुरुषसत्ताक असतो 

हे पोरींना कळत नाही 

त्या स्वतःतले गुलाब वाढवायला

उत्सव समजतात 


गळ्यांच्यावर बगळ्याची चोच मारणारे लोक 

छोटे छोटे दगड तारणारे लोक 

भुकांचे सुलेखित भरण पोषण 

संयमाचे आभूषण 


अ वचित डॉल्फिन दिसला 

की समुद्रासमोर लीन व्हायचे 

तल्लीन व्हायचे 

आणि तो कसा आपल्या नशिबात नाही 

असे म्हणत व्हायोलिन वाजवायचे 


एक्सटेंडेड फॅमिली पहारा वाढवतायात 

आणि पोरी बुरखा घालून समुद्रावर 


पाण्यावरचे लँडिंग फक्त पुरुषांसाठी 

किनारे बायकांसाठी 


पोरी डोळ्यांनी किनारा मोजतायेत

रित्या झालेल्या कित्येक घागरी नजरेमध्ये 


सौंदर्याचे कठीण त्रिकोण 

प्रत्येक खेळी परतवणारे पाणी 

स्वागतांना भाडे लागत नाही 

एक स्माईल पुरते 

तेच घेत 

पोरी स्वतःला वाळवायला हॉटेलमध्ये 


काळजातला ज्वालामुखी डोळ्यात राख 

अशी कित्येक शहरे उध्वस्त केलेली आहेत पोरींनी 

आतल्या आत 


पोरी गुलाबाबरोबरच एक भस्मासुर घेऊन जन्मतात 

जो पोरी जिथे हात ठेवतील त्याला भस्म करतो 


शतकांची इम्पोझिशन्स 

पोझिशन नीट करत 


आपण कोणाच्यातरी कंपोझिशन्स आहोत 

हा सततचा फील 

आणि लोक आहेत की पोरींना सांगतात 

गुलाब वाळवा 

आणि चांगला नवरा मिळवा 


क्रूस कुस मोडतात 

स्टॅमिना ताडतात 


पोरी झोपतात तेव्हा 

त्यांच्यातले गुलाब जागे असतात 


हृदयातली घुसमट 

सरफेस वर आणताना 

पोरी बोलताना गोंधळतात 

देवदार वृक्षाच्या फांद्या 

आणि नारळाच्या झाडावरून पडणारे नारळ 


आपण कुठल्या बेटावर उभे आहोत 

आणि कुठल्या बेटावर सांडणार आहोत 


त्वचा समुद्र कमवायला शिकत आहेत 

तहानेला मोकळे करावे का 


एखादा दात सडलेला 

डॉक्टरांच्या शिवाय अडलेला 


तरी गुलाब हुंगणारा 


दातांचा आणि नाकाचा संबंध काय 


गोव्याच्या या किनाऱ्यावर आता ऊस सुद्धा पोचला आहे 


पोरी समुद्राचे पाणी पहात उसाचा रस पितायत 


समुद्राची खारट खोली 

आणि ग्लासातला गोडवा 


धोकादायक शिळांचा सुळसुळाट 

दगडावर उभी राहण्याची रिस्क 

आमंत्रित करणारी 


रक्तातले उसळणारे कारंजे 

कम्फर्टला सोकावलेल्या पेशी 


कधी कधी पुरुषही कातावतात 

शेवटी पैसे दिल्याशिवाय समुद्र कमावता येत नाही 

आणि बायकांना तर एकदा तरी समुद्र दाखवावाच लागतो 

वर्षातून एकदा 

नाहीतर बुरखे घातलेल्या समाजामध्ये पतचर्चा होते 


मेरा शोहरतो मुझे एक बार लेके जाता ही है 


हवामानावर आक्रमण करणारे वारे 

स्मृतींच्या आरस प्रतिमा 

भोवळ येऊन पडणारे नॉशिया 


भरती असो की ओहोटी 

पोरींच्या पाठीवर वळ

जगण्याची ओढ कमी होत नाही 

कितीही जखमा झाल्या तरी 


शेवटी नाहीसे होऊन तरी काय मिळणार आहे ?


दफन होण्यापेक्षा जीवन कधीही उत्तम 


लाटा येतात वाळू शोषतात 

आणि आपल्या काल्पनिक हालचाली एन्जॉय करतात 


खाचा पिळून पिळून किती पिळणार ?


उथळ जमिनीवर फार पिके येत नाहीत 

इकडची तिकडची झुडपे आणि नारळ 


टिकण्यासाठी करावयाची युद्धे 

होम फ्रंट म्हणून पुरुषांनी सोडून दिलेली 


स्त्रियांचे मास पुरुषांच्यासारखे वांझोटे नसते 

त्यांना युद्धे परवडत नाहीत 


जर मुलांना द्यावयाचा जन्मच युद्ध असेल तर 

इतर युद्धे करायला सवड कोणाला ?


चार फोटो स्नॅप होतात 


आश्चर्यचकित नजरांच्यावर सुरक्षा रक्षक 

नावे ठेवता ठेवता नावा थकलेल्या 


फोटो काढणे हीच एकमेव करमणूक 


एकटेपणाचे संशयित चेहरे 

अस्तित्वाचे विद्रोह एकटेपणावर आदळून परत 


मी स्वतःला 100 वेळा पिरघळवून मानेत परतले तू किती वेळा 


मी मोजणी सोडून दिलेली आहे 

रोजचे मढे त्याला कोण रडे 


संभाषणे त्याच त्याच पाठीवर तशीच तशीच पडणारी 


बळी जाणे आणि स्वतःला पुन्हा जन्म देणे 


मुली गुलाब वाळवायला जात नाहीत 

मुली स्वतःला वाळवायला जातात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


उन्हे मुझसे ज्यादा अच्छा मेरा कॅमेरा लगा 

मुझसे बेहतर पब्लिक के सामने रखेगा लगा 


कौन सुनता है अभी यहाँ कोई किसी की दास्ता 

हर किसी को दुसरे की लाइफ अफसाना लगा 


कुछ भी तो मिलता नही है एक दुसरे से 

हर किसी को दुसरा अब बेहतर दुसरा लगा 


एक परेशानी थी सोचा था शेअर करूँगा उनसे 

मगर उन्हे पहलेही मेरा सब कुछ सोचा हुआ लगा 


समझमे नही आ रहा है एक दुसरेके साथ कर क्या रह हैं 

हर शक्स अपने आपमें एक लंबा काफीला लगा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पैशामुळे जवळची काही नाती इथे फिस्कटतात 

जपून तुला कळणारही नाही ती कुठे विस्कटतात 


काय दुखावले जाते आत नेमके कळत नाही 

पाठीचे कणे दोन्ही बाजूचे गवतासारखे धस्कटतात 


दोन्ही बाजूंनी हळूहळू अशांतता होते प्रस्थापित 

दोन्ही बाजूचे क्रोध येऊन दोन्ही बाजूंना विस्कटतात 


लोकांना ही मजा येते जे घडते ते पाहून पाहून 

रस्त्यावरती नाते येते आणि तमाशे किस्कटतात 


किती कपडे किती स्मृती किती जिव्हाळे लपलेले 

पुन्हा पुन्हा येतात आणि पूर्ण घराला उस्कटतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गोष्टी तर खूप होतात पण तरीही गोष्टी घडत नाहीत 

तिला घरी सोडल्यानंतर त्या माझ्यात सापडत नाहीत 


आता तर बोलवल्याशिवाय ती घरी येत असते 

डोळ्यात इशारे उमटतात भेटायला धडपडत नाहीत 


एक भेट संपूर्ण होते जसा सामना व्हावा पूर्ण 

स्कोअर बोर्ड बघावा तर आकडे काही सापडत नाहीत 


एक संयम तरंगत असतो जलतरंग वाजवत असतो 

काळ किती गेला कळते पण ह्रदये तडफडत नाहीत 


साला मग चाललय काय प्रेम आहे की प्रेम नाही ?

ऐकले होते की गडबड होते पण भेटी आमच्या गडबडत नाहीत 


चालतय तोवर चालून द्यावं हलतय तोवर हालून द्यावं 

खड्ड्याचा अंदाज कशाला घ्या जोवर जीव गडगडत नाहीत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुम्ही इतके दांभिक कसे 

तुम्ही तुम्हाला ओळखता?

इतके मुखवटे दिसतात तुमचे

स्वतःच्या चेहऱ्याला ओळखता?


लोकांना नेहमी लावता कामास 

देश प्रेमाच्या गोष्टी सांगत 

ज्यांपुढे तुमच्या पोरांची फील्डिंग 

त्या देशद्रोह्याला ओळखता 


इतके बनावट कसे असता

ही खोटी स्टाईल झेपते कशी 

ज्यांच्याशी लढण्याचे दावे तुमचे 

त्यांच्या दोस्ताला ओळखता ?


मुले परदेशात शिकली कशी 

त्यांना कोणी तिथे पाठवले 

तुम्ही या देशात करता काय


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कोई किसी का नही है 

और शायद यही सही है 


किसके भरोसे जिये हम

अकेले है और यही है 


बहुत प्यार से बोया था 

वो रिश्ता अब कही नही है 


हर किसी की खुदगर्जी 

सहनी होगी और सही है 


काम तो नही छोड सकते 

गद्दारी तो हर कही है 


किसान की तरह सोचना 

फसल हैं अपनी नही है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जरी त्याच्या चेहऱ्यावर अळूमाळू आहे 

तो नम्र नाही थोडासा लाजाळू आहे


कधीकधी ढगासारखा ओला होतो 

एरव्हीं तो स्वभावाने पायाळू आहे 


हे खरे की त्याने प्रतिमा सभ्य ठेवलीये 

गरजूंना माहित तो किती कृपाळू आहे


संगणक कठोरच निघणार मला शंका नाही 

शेवटी त्याच्या मटेरियल मध्ये वाळू आहे


लोणी खाण्याचे दिवस कधीचे संपले 

त्यांच्या ताटात वाढलेले आता टाळू आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

खूप काही आपल्यापासून दूर जात आहे 

आयुष्य आवाक्याच्या बाहेर होत आहे 


माहित नाही कसला काळोख आत लपलेला 

दिवा लावला तरी तिथे अंधार होत आहे 


थोडा तरी असण्याचा तुझ्या मला सुगावा दे 

मला आता तुझ्याविषयीच संशय येत आहे 


हे पडझड आहे की नाही काही कळत नाही 

एकत्र आहे असे वाटणारे जग विखरत आहे 


डोळे तरी मी आता किती वाढव णार 

दुर्बीण माझ्या मेंदूत बसून समजावत आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


काय आश्चर्य परक्यांना 

आपले काही कळले नाही 

आपल्याच जिथे लोकांनी आपणाला ओळखले नाही 


एखादा तिचा कीस होता 

पण तोही होता नाइलाज 

तिचे ओठ गुलाबासारखे 

चुंबन त्यात आढळले नाही 


इतकी वर्षे श्रद्धा ठेवुन 

नाही झाला दगड उत्क्रांत

लोकांनी देव पाहिले पण 

देव दगडात वळले नाही 


म्हणायला म्हणू शकतेस 

बुरखा आहे तुझा संरक्षण 

बुरख्यात माझी शपथ सांग 

पित्त तुझे खवळले नाही 


वाचत वाचत फाडत गेली 

आयुष्याची सारी पाने 

शेवटी पर्णहिन झालो पण 

चित्त तिचे डळमळले नाही  


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आहे ती पृथ्वी ताबडवून 

मूर्ख चालले तिला सोडून 


दुसरी पृथ्वी दृष्टीत नाही 

घेतायेत पहिली खरवडून


माहित नाही कोड सिस्टीम

संख्याशास्त्र घेते बडबडून 


सायन्सची चढलेली नशा

जनावर घेते ओरबडून


पुढच्या पिढीला काय सांगावे 

मागील पिढी मेली तडतडून ?


रसाततळाला रसाळ गेले 

काटेरी होते आले वर बुडून 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काळजात जरी तिच्या एक पिळ आहे 

ती आनंदाची एक सुरेल शिळ आहे 


तिच्या दारी पिंपळ माझ्या दारी वड

दरम्यान रस्त्याची खिळखिळ आहे 


कसे फेकून देऊ तिला आठवणीतून 

मेंदू गुंडाळणारी ती रिळ आहे 


जरी दिसावयाला रॅटरेस दिसते 

पळून जावयाला एक बिळ आहे


निघायचे तर कधीही निघू शकतो 

मरणास कोणी घातली खिळ आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मूर्ख तिच्या प्रेमात पडू लागले 

मग बुद्धिमान ही सापडू लागले 


खूप मिस केले तिला काही आठवडे 

मग विसरण्यासाठी ते धडपडू लागले 


काळजाच्या भेगा बोलण्यात दिसल्या 

मेंदूतले शॉक खडबडू लागले 


तिनेच घेतला होता प्रेमात पुढाकार 

मग माघारी तिचे निर्धार गडबडू लागले 


तिनेच ठेवले तिचे नशीब माझ्या हातावर 

आणि तिचेच हात माझ्याशी झगडू लागले 


मला माहित नाही माझी नेक्स्ट लेव्हल 

या लेवलला मात्र भविष्य खरवडू लागले 


असाही दिवस येईल विसरून जाईन 

स्वप्नात माझे काळीज बडबडू लागले 


प्रेम पत्रे फाडण्याशिवाय काय उपाय असतो 

जे गुलाब झाले होते ते कडू लागले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आरशात पाहताना सुंदर दिसलो नाही 

मी कधीही स्वतःला बरोबर दिसलो नाही 


कधीकाळी होतो गुलाब तिच्या प्रेमामध्ये

बघता बघता झालो अत्तर दिसलो नाही 


जिथून निघालो होतो शेवटी तिथेच पोचलो 

प्रवास पूर्ण झाला नंतर दिसलो नाही 


आईचा पदर होता नेहमीच घुसळण्यासाठी 

आयुष्यात मी कधीही बेघर दिसलो नाही


तलवार आली म्हणून अन्न फुकटात दिले 

दुकानात त्यानंतर बलवत्तर दिसलो नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


काय लायकीचे शत्रू आणि काय लायकीचे मित्र 

मोठ्या घराचे, प्रचंड पैशाचे, किमती गाडीचे मित्र 


जरा बापाची आर्थिक स्थिती काय ढासळली कळाले 

गांडीला पाय लावून पळून गेलेल्या मैत्रीचे मित्र 


तुला पुन्हा कमवावा लागेल प्रचंड अफाट पैसा 

तरच पुन्हा परततील तुझे हे भरभराटीचे मित्र 


तुझी सखीच बरी आहे जरी आहे बुरखेवाली 

तिच्या एका चेहऱ्यात आहेत कित्येक सचोटीचे मित्र


मी आता कोल्हापुरात बराचसा अनोळखी झालो 

ओळखसुद्धा दाखवत नाहीत मला माझे ओळखीचे मित्र 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आत वासनेची गरम झालेली लाळ आहे 

समोर तुझे शरीर म्हणजे थंडा फराळ आहे 


किती काळ टाळत राहणार स्पर्शाचे तू गणित 

ना तू बालिका आहेस ना मी बाळ आहे 


मी टोळनारायण नाही जो सतत राहील उडत

तुझी शेती नांगरेल असा काळाचा फाळ आहे 


तुझे असणे म्हणजे तुळशीत भांग आहे 

तुझ्याविना हे अंगण केवळ रटाळ आहे 


ताक पिठ्या समजू नकोस दूध पिट्या आहे 

माझ्यात एक रेडा त्रिस्थळी त्रिकाळ आहे 


मी थोडाच ढेगुजी आहे पिटायाला चकाट्या 

देणार तर आत्ताच दे तूच सकाळ आहे


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हर चेहरा वैसेही पुराना है 

दिलमें घिसापिटा जमाना है 


अपना घर अपनाही माचीस 

अपनेही लोगों को जलाना है 


हर कोई लूटने के लिए बेताब 

हर शखस यहाँ खजाना है 


सर कटा फिरभी कहता रहा 

ठोकरमे उसके जमाना है 


मैने भगवानको रोशन किया 

रोशनी मे मेरा आना जाना है 


 श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सर्वत्रच नतद्रष्ट आणि नीच लोक 

उंचावण्याऐवजी जाणारे खालीच लोक


जे काही जग आहे ते दरम्यानच आहे 

ह्या जगात जन्मतात ते पाशवीच लोक 


नैतिकता शोधायला जाशील फसशील 

वाजवतात एका हाताची टाळीच लोक 


स्वतः खेरीज काही दिसत नाही 

इतरांना बनवतात "मी" च लोक 


सिस्टीमच्या नावाने मारतात बोंबा 

स्वतः सिस्टीम बनवणारे नीच लोक 


आतून हा सुधारणारा प्राणी नाही 

मात्र भाषा बोलतात मानवीच लोक 


लोकांना कुठं देव बनायचं असतं 

देवाचा तुकडा समजतात स्वतः स प्राणीच लोक 


एका टिचकीने उडेल इतके हलके आयुष्य 

जड अंतःकरणाने काटतात लागलीच लोक 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

समोर पाहू की पाहू मागे 

दोन्ही दिशांना दुःख उभे 


मला वाटले कोरलेले आहे 

आता पाहतोय तर उसवलेले धागे


काळजातून फेकून दिले 

माझ्या नावाचे वाजणारे ठोके 


देहाची कशी चौकशी करावी 

बंद केलेत तिने सारे नाके


मी जरासा सुंदर म्हणालो 

उडायला लागले आपोआप टवके


एक ग्लास गुलाबात फुटला 

काचा उगवल्या बनून काटे 


हाच तर शेवट होणार होता 

मरणही देणार होते धोके 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हा तर उलट्या काळजाचा निघाला 

साखरेचा समजलो होतो विषाचा निघाला 


गोष्टी तर फारच सांगत होता मुलायम 

भाषेखाली पाहतो तर दगडाचा निघाला 


आधीच असा होता की सत्तेवर झाला 

मरण्याआधीच वाळूचा ढाचा निघाला 


दिसत तर होता ब्रम्हकमळासारखा 

हा कसा मग चिखलाचा निघाला


वाटले होते कैवारी बहुजन समाजाचा 

प्रत्यक्षात तर हा बाxणाचा निघाला 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जो लोग देना नही जानते उन्हे कभी देना नही 

अगर वो रिश्ता बनाये तो रिश्ता दिलमें लेना नही 


बडे अजीब होते है ऐसे लोगों के खयालात 

उनकी तरह सोचना नाही उनकी सोच लेना नही 


ये सैतान बनकर तुम्हे गलत कामोमें उलझायेंगे 

कभी कानून तोडना नही उन्हे तोडने देना नही 


मिठी मिठी बाते करके हर बात से निकल जायेंगे 

ना इनके वचनपे भरोसा रखना इन्हे वचन देना नही 


सबसे अच्छा यही है की इनके लाइफसे चले जाना 

और लाईफमे ऐसे रहना जैसे इनसे लेना देना नही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुमने क्या कह दिया खुले आम दिवाना मुझे 

दुश्मन समझने लगा हैं सारा जमाना मुझे


तेरा दिल क्या उतर गया मेरे दिल में शिद्दतसे 

मेरेही दिल मे हुआ मुश्किल आना जाना मुझे


देख पाता हूँ साफ तेरे मेरे बीचका फासला 

फिर भी नामुमकिन हो गया हैं समझाना मुझे


तुम हो सपने में तो नींद सुकून की आ जाती है 

तुम न हो तो क्या क्या पडता है दिखाना मुझे


आजकल समझाता हूँ हिसाब के लिए सही

कयामतमे तेरे सामने खुदाको पडेगा लाना मुझे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

इतके कमालीचे स्वार्थी लोक 

ते तुला ठोकतील किंवा तू ठोक 


डोळ्यांमध्ये आशाळभूतपणा 

आणि वासनेंचा वाकलेला पोक 


गरज पडेल तेव्हा तुझा पाठलाग 

गरज संपली की दाखवतील परलोक


हे कसले शिष्य बाळगलेले तू 

तुझ्या सूऱ्यांनी काढतात तुला टोक 


हे असले असण्यापेक्षा नसलेले बरे 

हे म्हणजे नावेला पडलेले भोक 


फेटाळून लाव यांना आयुष्यातून 

नाहीतर बनून जाशील एक जोक 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कुछ बने नहीं हैं फिरभी दिखा रहे हैं की कुछ बने हैं 

सिर्फ इगो कमाया हैं और उस कमाईपे तने हैं 


एक एहसास था और वो सिर्फ हमारी तरफसे था 

वो फैसला सुना रहे हैं जैसे गुनाहगार सामने हैं 


अभी तक समझ नहीं आया उन्होंने हमे बुलाया क्यूँ 

जैसे एकदुजेके बर्थडे केक हैं और एकदुजेको कांटने हैं


शायद मिलना नही था फिर हम मिलने आये ही क्यूँ 

अगर रिश्ता पेचिदा हैं तो आये क्यूँ जोडने हैं 


जिसको हमने कोसला समझा वो बस ढकोसला निकला 

कितने सिंहगड बाकी है जो मुझे और समझने है 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कुछ भी सही नही है 

हुआ दिमाग का दही है


कुछ बने नहीं हैं फिरभी दिखा रहे हैं की कुछ बने हैं 

सिर्फ इगो कमाया हैं और उस कमाईपे तने हैं 


एक एहसास था और वो सिर्फ हमारी तरफसे था 

वो फैसला सुना रहे हैं जैसे गुनाहगार सामने हैं 


अभी तक समझ नहीं आया उन्होंने हमे बुलाया क्यूँ 

जैसे एकदुजेके बर्थडे केक हैं और एकदुजेको कांटने हैं


शायद मिलना नही था फिर हम मिलने आये ही क्यूँ 

अगर रिश्ता पेचिदा हैं तो आये क्यूँ जोडने हैं 


जिसको हमने कोसला समझा वो बस ढकोसला निकला 

कितने सिंहगड बाकी है जो मुझे और समझने है 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कुछ भी सही नही है 

हुआ दिमाग का दही है


आणि मी प्रेमात पडलो दुसऱ्यांदा 

सह्याद्री झाला हिमालय चढलो दुसऱ्यांदा 


बर्फ तुटला आणि त्याची नदी झाली 

पाण्यातून चालत गेलो दुसऱ्यांदा 


तिच्यामुळे एक संस्कृती कळुन आली 

मी ही पुन्हा मला सापडलो दुसऱ्यांदा


मला वाटले ती बहुदा गोठलेली आहे 

कळले होतो फक्तं विचारात थांबलो दुसऱ्यांदा 


आता माझे आकाश सारे स्वच्छ आहे 

भरलेला ढग होतो रीता झालो दुसऱ्यांदा 


काय घडले पहिल्यांदा आठवत नाही 

मी पहिला नव्हतोच होतो दुसरा दुसऱ्यांदा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मोहब्बत कफन नही जो मरने के बाद पहनाई जाये 

मोहब्बत जिंदादिली है रिढकी तरह बिठाई जाये 



श्रीधर तिळवे नाईक

If you think that way it is your loss 

I know what I am so never cross 


Things are complicated but not yet dull 

I am still alive with my sophisticated skull 


I am too much transparent for this world 

That is why I am forever young and not like you old 


I belong to my generation with my original eyes 

I have some laughters and my own Cries 


Sridhar Tilve Nike 

12th standard science side New College

श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कवी एकमेकांना कविता ऐकवू लागले 

ऐकताना काना डोळा करू लागले 


जो तो विचारतो कधी माझा नंबर 

वेटिंग लिस्ट स्वतःच्याच आत झळकवू लागले 


असह्य झाले प्रतीक्षा किती वाट पाहायची 

आपल्या महान कवितेला फडफडवू लागले


जितके रसिक होते ते सर्व कवीच होते 

स्वतःला कवी इतरांना रसिक म्हणू लागले 


तरी म्हणे कार्यक्रम खूप बहारदार झाला 

माहित नाही कोणती फुले शेवटी शोधू लागले


जे भांडत होते कवितेच्या मंचावर एकमेकांशी

ते दारूच्या टेबलावर एकत्र जमू लागले 


दारू हाच शेवटी कवितेचा खरा रस आहे 

दारूने ठराव आणला एकमत होऊ लागले 


श्रीधर म्हणे मी निर्व्यसनी जात नाही वाचनाला 

त्याच्याशिवाय कुठे कवितेचे काही अडू लागले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आरशात पाहताना सुंदर दिसलो नाही 

मी कधीही स्वतःला बरोबर दिसलो नाही 


कधीकाळी होतो गुलाब तिच्या प्रेमामध्ये

बघता बघता झालो अत्तर दिसलो नाही 


जिथून निघालो होतो शेवटी तिथेच पोचलो 

प्रवास पूर्ण झाला नंतर दिसलो नाही 


आईचा पदर होता नेहमीच घुसळण्यासाठी 

आयुष्यात मी कधीही बेघर दिसलो नाही


तलवार आली म्हणून अन्न फुकटात दिले 

दुकानात त्यानंतर बलवत्तर दिसलो नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काय लायकीचे शत्रू आणि काय लायकीचे मित्र 

मोठ्या घराचे, प्रचंड पैशाचे, किमती गाडीचे मित्र 


जरा बापाची आर्थिक स्थिती काय ढासळली कळाले 

गांडीला पाय लावून पळून गेलेल्या मैत्रीचे मित्र 


तुला पुन्हा कमवावा लागेल प्रचंड अफाट पैसा 

तरच पुन्हा परततील तुझे हे भरभराटीचे मित्र 


तुझी सखीच बरी आहे जरी आहे बुरखेवाली 

तिच्या एका चेहऱ्यात आहेत कित्येक सचोटीचे मित्र


मी आता कोल्हापुरात बराचसा अनोळखी झालो 

ओळखसुद्धा दाखवत नाहीत मला माझे ओळखीचे मित्र 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आत वासनेची गरम झालेली लाळ आहे 

समोर तुझे शरीर म्हणजे थंडा फराळ आहे 


किती काळ टाळत राहणार स्पर्शाचे तू गणित 

ना तू बालिका आहेस ना मी बाळ आहे 


मी टोळनारायण नाही जो सतत राहील उडत

तुझी शेती नांगरेल असा काळाचा फाळ आहे 


तुझे असणे म्हणजे तुळशीत भांग आहे 

तुझ्याविना हे अंगण केवळ रटाळ आहे 


ताक पिठ्या समजू नकोस दूध पिट्या आहे 

माझ्यात एक रेडा त्रिस्थळी त्रिकाळ आहे 


मी थोडाच ढेगुजी आहे पिटायाला चकाट्या 

देणार तर आत्ताच दे तूच सकाळ आहे



श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

Ek bar jo aap dub jate ho gazalme aur diwanme 

Na khudse rishata bachta hain na khudase

Rumani sabab aur shikayatonme gujrati hain zindgi

Sanse chalti rahti hain bas kisiki duase 


Ho sake to dur raho dilki in harkatonse 

Jo sachhaise aapka wasta padne nahi deti 

Bas maykhana bana deti hain dimagko 

Thahrati hain ehsansme zindagi ladhne nahi deti


Shridhar Tilve Naik


चंद्र दिसला ग्रहण दिसले काय निसटले 

डोळ्यामध्ये काय फसफसले काय निसटले 


जादू गेली भ्रमही गेला तृष्णा गेली 

त्वचेवर काय येउन बसले काय निसटले 


ती म्हणाली तुला वाचून पूर्ण जाहले 

कळतच नाही काय ठसले काय निसटले 


दुःखही नाही ती गेली हातामधून 

हिशेब नाही काय गवसले काय निसटले


झालो निवांत तरी हळूहळू ती हुळहुळते 

काय अजून न गेले पुसले काय निसटले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शेवटपर्यंत कळाले नाही 

आमच्यात काय जाहले 

जे होते ते रहस्य होते 

प्राणपणाने सांभाळले 


तिचा बुरखा कामास आला 

माझे मौन कामास आले 

 ताकास तूर लावू न देता

स्पर्श एकमेकांचे हाताळले 


फक्त बोटे वाजवली 

एकमेकांना दिले इशारे 

मंदिराबाहेर भेटी ठरल्या 

डोंगरावर डोंगर हाताळले 


सस्पेन्स कधी टिकतो का 

त्याचे उत्तर आमचे प्रेम 

ना जगाला कधी कळाले 

ना जगाला कळू दिले 


ती तिकडे आणि मी इकडे 

तरीही कोणाला पत्ता नाही 

जगावेगळी जगलो आम्ही 

तरी काळजात प्रेम जगवले 


आता जरी जवळ नाही 

एकमेकांचा आदर आहे 

तिला तिचा संसार आहे 

माझे हृदय पुढे सरकले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आज तुझी आहे पर्स रिकामी का 

केली नाही अजूनही तू खरेदी का 


असे काय झाले नायटीवर आलीस 

नेसली नाहीस आज तू साडी का 


चेहऱ्याचे डिझाईन का बदलले 

बिघडलेली अशी रांगोळी का 


मी बोलतो तरी ऐकत नाहीयेस 

भाषेची चाललीये घसरगुंडी का 


जाणतो तुझा स्वभाव अबोल आहे 

प्रतिक्रियांची वाजत नाही ढोलकी का 


हाताला हात सुद्धा लावू देत नाहीस 

विसरलीस दिलेली शिकवणी का 


स्वप्न उडाल्यासारखे दोन डोळे 

नजरेसमोर थरथरते आहे पापणी का 


तुझ्या आयुष्यात कोणी आला आहे 

मला बनवले आहे तू सेकंडरी का 


आत आल्यावर चहा टाकला नाहीस 

इतकी आतमध्ये आहेस ओसरली का 


काय नेमके घडले आहे तुझ्या आयुष्यात 

गरज असेल तर कॉलेजला मारू दांडी का


झाडासारखी नेहमी हलत असायचीस

आता विजेच्या डांबासारखी तू उभी का 


नवागतासारखे मी प्रेम करतो आहे?

की झाली आपली मोहब्बत जुनी का


नमाज अदा नाही की विश्वास उडाला 

माझ्यासमोर तुझी अशी काफीरी का 


अंगावर कुठेही अत्तर सुद्धा नाही

तू काट्यात असलेल्या गुलाबासारखी का 


चौकशी समजू नको ही काळजी आहे 

करू आता सवय तुला अशी पाहण्याची का 


बोलायचे नाही तर निदान थोडे रड 

असे काय घडले तू इतकी कोरडी का


प्रश्नाला कुठल्याच देत नाहीस उत्तर 

कुलूप हरवलेली झालीस चावी का


पाच मिनिट झाली निघालीसही 

मला बाय करण्याची शैली ढीली का


तुझ्याविना जगण्याची भीती दाटत आहे 

अनाकलनीय येत आहे काहीतरी का ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

एका बाजूला ब्राह्मण दुसऱ्या बाजूला मुसलमान 

दोघेही निर्माण करतात आयुष्यावर सारखाच ताण 


एका बाजूला वर्ण आणि दुसऱ्या बाजूला गुलामगिरी 

दोघांचेही झेलायचे वार दोघांशी करायची मारामारी 


एका बाजूला जात आणि दुसऱ्या बाजूला अहंकार 

कशीही तुझी  गांड असो दोघांच्या मध्ये नक्की फाटणार 


त्यापेक्षा ओळख सांग तू आहेस होमोसोपियन 

बघायचे तर बघा माझे पण तन मन आणि धन  


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुला तो सांभाळून घेईल हा तुझा भ्रम आहे 

ईश्वराजवळ पुण्याचा कुठे काय क्रम आहे ?


जग ना वाईट आहे ना जग चांगले आहे 

चांगले हाही भ्रम आहे वाईट हाही भ्रम आहे 


तुझ्याशी सूत माझे कसे काय मी जमवयाचे 

तुझ्याजवळ डमरू आणि माझ्याजवळ ड्रम आहे 


पैसा काबाड कष्टाने नाही डोक्यालिटीने मिळतो 

उगाच डिंग मारू नको तुझ्याजवळ श्रम आहे 


शेवटी प्रेमही कुवतीपर्यंतच पोचते आणि तुटते 

माझ्या खिशाबाहेर गेला तुझा एकेक टॅन्ट्रम आहे.


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दुर्दैव की तो तुला कळणारा नसेल 

पण मृत्यू हाच तुझा शेवटचा इव्हेंट असेल 


भय नष्ट होत नाही काळजातले 

ते कायमच तुला आयुष्यात डसेल 


शेवटी भावना तुझ्यावर करेल मात

आणि बुद्धी न लढता तिच्यापुढे फसेल 


हलक्या पावलाने येईल कुठलातरी रोग 

मारेकऱ्यासारखा तुझ्या देहात बसेल 


टिंबटिंब रेषाखंड नाहीसा होत जाईल

शरीराची भूमिती मग एक दिवस नसेल


हे असेच असते आणि हे असेच असणार 

ना तुला थांबवता येईल ना तुला गवसेल


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पुन्हा पुन्हा तुझी निवड केली 

तुझी बॉडी माझा गड केली 


तुला पाहून प्रेम ओव्हरग्राउंड झाले 

हवासुद्धा मी कथा भाकड केली 


भाषा सुद्धा झाली माझी शांत 

कधीकाळी होती तिने तडतड केली 


मी माझ्यातच पडून राहिलो असतो 

बरे झाले तू गडबड केली 


आयुष्यभर तुझ्यात थांबायचे आहे 

काळीज तुझ्याकडे जाणारी कावड केली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वाळू होती निसटली 

बॉडी होती फिस्कटली 


मी स्वतःस भावना दिली 

माया होती तटतटली 


भय , नैराश्य यांची युती 

असुरक्षेत धसकटली 


आता तर बुद्धीही लंपट 

स्त्री पाहून बिस्किटली 


जर सुरुवात सुंदर होती 

कुरूपता का कटकटली 


देवाघरची जर लेणी तर 

दगडातून का उत्कटली 


जिथे जिथे मानवी हात 

तिथे प्रकृती भरकटली 


काय वाढून ठेवले आहे 

काया ताटात ताटकटली


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नव्या जुन्या युगादरम्यानचा सैतान आहे 

जो माणसाचे ताजे रक्त सांडत आहे 


शहरात किती माणसे मेली अवश्य विचार 

हेही विचार पाहणारे किती जिवंत आत आहे 


माझ्या बापाने प्रश्न विचारायला शिकवले 

कधी म्हणत नाही त्याच्याजवळ उत्तर आहे 


शेवटी दुःख त्याचे दयेमध्ये कोसळले 

दरीमध्ये आसवांची नदी जमत आहे 


तुझा राग सुप्रीम कोर्टात टिकणार नाही 

तुला उगाच वाटते की तू बच्चन आहे 


हलकट नीच होऊ नको इतकीच मागणी 

बाकी तुझे स्वार्थी होणे नैसर्गिक आहे


मेलेली माणसे पहाणे याची प्रॅक्टिस करतो 

बहुधा राजकारणात त्याला करिअर आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


स्वातंत्र्य मिळाले पण सांभाळता न आले 

योगायोग नासाडीचे टाळता न आले 


माझी संघटना कधी यशस्वी झाली नाही 

मला माणसांना पाळता न आले 


त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी भिन्नता होती 

मतभेद कळाले पण जाळता न आले 


निवांत संवादाची वाट पाहत राहिलो 

आई समोर होती पण नाळता न आले 


फिरकी घेता घेता तो गुद्द्यावर आला 

मुद्दाच असा होता की टाळता न आले 


माझी स्वतःची बाग कमवता आली नाही 

तिला फुलांचे गजरे माळता न आले 


आयुष्य चाचणी आहे कुठे निराश होतोस 

कोणालाही अपयश गाळता न आले 


दुःखाचा सागर आसपास पोहणारा 

मिळालेल्या सुखात वाळता न आले 


मलाही तावूनसुलाखून घ्यायचे होते 

पण इतके फास्ट होते चाळता न आले 


आयुष्यात इतरही खूप कामे होती 

तिच्या सौंदर्यावर पुरेसे भाळता न आले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी घरी रात्री उशीरा येईन 

पण येईल तेव्हा पुरेसा येईन 


तुला चांदणे दिसेल तेच मला दिसेल 

घरी मात्र मी चंद्रासारखा येईन 


काही ना काहीतरी बनलेलो असेन 

पोर्णिमा नाही तर बनून अमावस्या येईन 


पंचगंगेच्या किनारी बसू दोघे 

मी तुझ्या अंगावर बनून लाटा येईन 


रात्र कुठे घालवेन विचारू नको 

नाहीतर मग मी दिवसा येईन 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुला मूल होत नसेल तर कुत्रा आण 

काळीज ठेवता येईल असा तुकडा आण 


शेवटी माया करावीशी वाटणे गरज आहे 

तुलाही ज्याची भुरळ पडेल अशी माया आण 


मी पडलो बच्चन माझा तुला काही फायदा नाही 

जो तुझ्या तालावर नाचेल असा बच्चा आण 


नवरा करणे हीच तुला रिस्क वाटते 

त्यामानाने कुत्रा सेफ आहे सुरक्षा आण 


त्याला तुझे सौंदर्य कळेल न कळेल 

तुझ्या त्वचेवर खेळेल खिळेल असा मर्दाना आण 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

लोक एकमेकांना सांभाळून घेतात 

स्वहितसंबंध त्याआधी चाळून घेतात 


यंत्रणा माझ्या नैसर्गिक क्षमता संपवताहेत 

मशीन्स ही पद्धतशीरपणे वेटाळून घेतात 


कुठल्याही वाटाघाटीत तिसराच राहशील 

तू पोहोचण्याआधीच देवघेव माळून घेतात 


एक राजा पुरवून पुरवून खात आहेत 

एका राजात स्वतःचे भविष्य जाळून घेतात 


फार अपेक्षा करू नको तू लोकशाहीची 

जगताना लोक स्वातंत्र्याला फेटाळून घेतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तिचा स्वभाव सतत पर्याय शोधणारा 

कधी नीट कधी चंचल वागणारा


ती म्हणाली मला नको भाळणारा

मी म्हणालो मी आहे सांभाळणारा


मी भाळलो ती जागा चुकीची होती

एक कटाक्ष पुरुषाला चाचपणारा


मला कुठे खूप काही हवे होते 

फक्त एक स्पर्श जीव ताजा करणारा 


संपणार होते शेवटी ते संपलेच 

तिलाही बहुदा हवा होता संपवणारा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी पाहिली सर्वांनी फिरवलेली पाठ 

चालत राहिलो एकट्याने समाजात ताठ 


गरज होती तेव्हा कोणी संपर्क साधला नाही

मीही उकलली नाही मग संवादाची गाठ 


कोणालाही अंगावर सिस्टीम घ्यायची नसते 

ज्याला त्याला सिस्टीममध्ये थाटायचा असतो थाट 


मला पळताभुई झाली त्यांनी पिटल्या टाळ्या 

त्यांना पहावी लागली त्यांच्या हातांची काटछाठ


जे सिस्टीम मध्ये राहिले सिस्टीम मध्ये बुडाले 

मी सिस्टीम बाहेर राहून शाबूत आणि बिनबोभाट 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मुझे किसी खुदा ने बनाया नही है 

इंसानके अलावा किसी ने सताया नही है 


लगा ठुकराके जिंदगी लापता हुई 

उसके आनेसे लगा ठुकराया नही है 


 धीरे धीरे दिल तक वो पहुंच गया 

मगर अभी सर पे उठाया नही है 


देखते है आगे आगे होता है क्या 

हा के लिये पलकोंको हिलाया नही है 


चार दिन इंतजार में कटे तो क्या 

काफी है उसने मुझे सताया नही है 

 

श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

इतकेही होऊ नये महान की आयुष्य नाहीसे होईल 

समोरच्याचे होईल धडधाकट आपले कसेबसे होईल 


जे दिसते तेच ठसते ठसत नाही ते इथे अदृश्यच राहते

म्हणूनच माणूस काळजी घेतो आयुष्य त्याचे ठसे होईल 


काय ठसवून ठसवून मिळते ठसते तेही इथे उडून जाते 

तुझे ही उडत उडत शेवटी आयुष्य अखेर नाहिसे होईल 


आत्ता कुठे सुरुवात केलीस तरी तुला लागावी का चिंता ?

तुझ्यानंतर फॅमिलीचे काय होईल ? आणि कसे होईल ?


जे होतंय ते होऊन जाऊ दे तू फक्त प्रचंड पैसा कमव 

पैसा आयुष्य दुरुस्त करतो पैशानेच ते छानसे होईल 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


शांतता तुला कंटाळवाणी वाटते 

मला ही गोष्ट आणीबाणी वाटते 


उणीव माझ्या नको संयमास समजू

असे समजते ती अडाणी वाटते 


शंका नाही तू उत्तेजक करतेस 

संपता उत्तेजन पिंकदाणी वाटते 


तुझा सहवास मुलायम थरार आहे 

स्पर्शातून तू गुलाब पाणी वाटते


हे नवे स्कूल नाही मूर्खपणा आहे 

बिसलरीतून नदी पाणी वाटते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ज्याचं त्याचं विष ज्याला त्याला 

मी खुलासा करू कशाला ?


मला उशी पाशी झोप लागते 

चंद्र सूर्य द्या कवींच्या उशाला 


काल तिचा वाढदिवस होता 

तो मेणबत्ती विझवून निघाला 


मी तिच्या हृदयी स्थायीक झालो 

आणखी स्थलांतर हवे कोणाला 


कितीदा तोडले तरी स्वतः कुऱ्हाड देते 

अरे शहाणपण द्या कुणी समस्त जंगलाला 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माणसांना उपलब्ध माणसेच आहेत 

माणसांचे पेच त्यामुळेच आहेत 


देवाचा पर्याय हा आहे काल्पनिक 

देव पुढे माणूस मागे यात ठेच आहेत 


माणसाच्या नालायकपणाचे करायचे काय 

वासना तर लगोलग आणि लगेच आहेत 


जग बदलावे लागेल सिस्टीम बदलावी लागेल 

जितके क्रांतिकारक निघतील तेवढे हवेच आहेत 


ठरव तुला घरात राहायचे की पडायचे बाहेर 

बाकी घरातले प्रश्न तसे जुनेच आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

प्रत्यक्षात खूप काही घडलेलं असतं 

सगळंच काही तुम्हाला सापडलेलं नसतं 


मी सामान्य माणसाचा चालता बोलता इतिहास 

माझ्यात काहीतरी असामान्य धडपडलेलं असतं 


अनेक गोष्टी लोकांना सांगता येत नाहीत 

जे दाखवलेलं असतं ते तडफडलेलं नसतं 


माझे मारेकरी फक्त मलाच ठाऊक आहेत 

शेवटच्या क्षणी वाचतो कारण कारस्थान गडबडलेलं असतं 


तुम्हाला कळणार ही नाही माझा तुरुंग 

आणि कोण कोण कुठं कुठं मला नडलेलं असतं 


त्या अर्थाने मी शहाण्णव कुळी मराठा असतो 

तलवारीतच माझं नशीब कोल्हापुरात घडलेलं असतं 


जिवंत उभा आहे त्यांनी प्रयत्न करूनही  

रसरशीत असतो माझ्यातलं काहीही सडलेलं नसतं 


ओपनली चॅलेंज करतो दम असेल तर मारा 

माझं मरण मी टांगलेलं शरीर घडलेलं असतं 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काळाचा कशा प्रकारचा डीच असावा 

जितका म्हातारा तितका नीच असावा ?


रोग कोणता आहे ही कसली लागण ?

डॉक्टरच झोपलेला घरीच असावा ?


जल्लोषाने लोकात त्वचा फेकली  

जोशाचा हा कोणता पीच असावा?


हृदयात प्रेम जमा जाहले चुकीच्या 

जमानक माझ्यासारखा वा मीच असावा   


तुझ्यासारखा दिली जाताना कबुली

एखादा काळजात उगीच असावा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ती खरे तर मुलगी आहे मला फुलासारखी भासते 

किंवा झालो वेडा आहे मति वेडासारखी भासते 


घरामधून निघताना मी तिची टाळली गल्ली होती 

तरी मला ती इकडे तिकडे वावरल्यासारखी भासते 


ज्याला त्याला नीघायचंय देश सोडून परदेशाला

माझ्यात सिता जिला मायभूमि सुवर्णासारखी भासते 


कोणी कोणाला समजावे रक्त कोरडे सर्वांचेच

पंचगंगासुद्धा आता वाळवंटा सारखी भासते


एक आयुष्य बायलॉजीसम एक प्रेम जणु केमिस्ट्री 

जीवनरेखा न सुटणाऱ्या का गणितासारखी भासते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

फार शेफारून जाऊ नकोस तू गर्दीतच उभा आहेस 

लोकांच्या लेखी व्यवस्थेचा एक दाटलेला तुकडा आहेस 


अलौकिक राहते वाटत तुजला की तू आहे एक दागिना 

त्यांच्या लेखी सोन्याचा ताजा त्वचेवरचा मुलामा आहेस 


इथे त्यांना कुठे व्यक्तिमत्व लागते त्यांना एक गर्दी हवी 

त्यांनी बोलवले तुला कारण गर्दीचा तू ढिंढोरा आहेस 


पैसे घे आणि कविता वाच पैशासाठी अन गर्दीसाठी

तू सुद्धा या गर्दीचा कमर्शियल दिवाना सुभा आहेस 


बाकी सगळे हे आवनजावन येत राहते जात राहते 

कमी जास्त होणारा ढगांचा फक्त ओला ढिगारा आहेस 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मला फालतू समजतेस हेच ग्रहण नाही काय ?

काय करावे सांगतेस हे विलक्षण नाही काय?


ओठावरती कारणाशिवाय माझ्या येते हसू 

हेच माझ्या जिवंतपणाचेच लक्षण नाही काय?


समजू शकतो ऑब्जेक्शन आहे तुझे पण कशाला?

तूच सांग ना तू माझा खरा दर्पण नाही काय ?


मलाही भेट कळते नाही आपली कुठे पोचत 

पण मुळात आपण भेटतो हे विलक्षण नाही काय ?



आता आणखी काय होउ बाकी काय तूच सांग

तुला झेलता झेलताच झालो श्रमण नाही काय 

 

श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


फारच गुप्त ठेवले शेवटपर्यंत कुणास कळू दिले नाही 

एक रहस्य प्रेमाचे मरेपर्यंत ते मावळू दिले नाही 


मी आकाश वाचले पाऊस अभ्यासले तरीही अडाणी 

समुद्र बिलंदर असा ढग पाठवत राहिला पळू दिले नाही 


ज्याचा अभ्यास केला तो टॉपिक परीक्षेत आलाच नाही 

ज्याची कॉपी ठेवली तो आला त्याने चळू दिले नाही 


तिला विसरण्यासाठी अनेक शहरांच्यात भटकत राहिलो 

ती ही काढत माग माझा राहिली पण कवळू दिले नाही 


पूर्ण माणूस कधी कुठे प्रेमामध्ये वाट्याला येतो का 

तुकडे आले त्यांना पवित्र मानले मी खवळू दिले नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून )

पृथ्वी सूर्याकडे तोंड करते पाठ करते 

पृथ्वीच सूर्यप्रकाश जिंकते आणि गमावते 


पृथ्वीला कळत नाही चंद्राकडे प्रकाश कसा 

मात्र अमावस्येला चंद्र नसला की घाबरते 


पृथ्वीला आकाराने मोठा गुरु दिसतो 

त्याला भाऊ मानते आणि शुक्रात वावरते 


पृथ्वीला शनीची कधी कधी कडी दिसतात 

तिला वाटते तुरुंग आहे तीची थोडी तंतरते


मंगळाला पाहून पृथ्वी मांडते पसारा 

फायदा होत नाही म्हणून पसारा आवरते


दिसते त्याच्या पलीकडे खूप काही आहे 

केवळ ह्या विचारानेच पृथ्वी रोज दचकते

श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रस्थापित व्हायला जो तो जरी सोकावलेला 

क्रांती घरी येईल म्हणून घरी घाबरलेला


जो विरोध करतो त्याचे जाळले जाते घर

नाहीतर आढळतो कायमचा झोपवलेला


अनुशासन पर्व की हुकूमशाही एकटीची 

जिथे तिथे स्वातंत्र्याचा खांब उखडवलेला


यांना फक्त सत्तेशी देणे घेणे आहे 

सत्याच्या नावाने फक्त डंका फिरवलेला 


काय मुकाबला करणार दुर्जन संघटित झाले 

सज्जन मात्र जागोजागी फुटलेला खुटलेला


मला आता कुठलीही रेसिपी पसंत नाही 

प्रत्येक ठिकाणी आहे माणूस शिजवलेला 


निघावे म्हणावे तर मार्ग शिल्लक नाही 

दरवाजा ही बाहेरून आधीच कुलूप घातलेला 


ही हुकूमशाहीच आहे हुकूमशाहीच आहे 

माणसे शांत तरी एक शब्द बोंबललेला 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रॉब्लेम ये है की तुझमे लॉयल्टी नही है 

और दिक्कत , इसमे तेरी गलती नही हैं 


करवटे बदलती रहती है अंदर की वासना 

तेरी इस हलचलमे लेकिन रॉयल्टी नही है 


अच्छा होता तू गर खुद को चंचल कहलवाती 

क्यूँ डिक्शनरीमे जफा शब्द दिखाती नहीं है 


इससे ! उससे ! पता नही किसकिससे झूठ 

साहस करना है और तू साहसीभी नही है 


हृदयमंदिरमें किसी देवी की मूर्ती क्यूँ रखू?

इस बाजारमें वफाकी अगरबत्ती नही है 


तो तू भी कर टाइमपास मै भी करता हुं 

सेक्सुअलसे बेहतर एंटरटेनमेंटभी नही है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सगळेच एकसारखे दिसू लागले 

रंडीखान्याबाहेर बसू लागले 


घेताना लाच लाज उरली नाही 

देताना लाच लोक हसू लागले


जिथे तिथे करप्शनचे ट्रेनिंग सुरू

स्वतःस टेबलाखालून पिसू लागले 


जितका भ्रष्ट तितका वाटू लागला छान 

इंद्रियांना लबाड मोह डसू लागले 


कोणी तुझ्या लागणार हाती नाही

लोक जिवंत असूनही नसू लागले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माझी आई भन्नाट आहे 

मी नदी आणि ती काठ आहे


मला वाटते जाहलो राजा 

मांडला चांदिचा पाट आहे 


ती नजरेने अचूक हुडकते

डोळ्यांस तिच्या मी पाठ आहे 


मी येतो सहज तिला कळते 

काळ जणु तिची वहिवाट आहे 


ती म्हणते मीच पुरेसा आहे 

बाकी ईश्वर थाटमाट आहे 


कळेना कशाने तृप्त झाली 

तृप्ती इतकी घनदाट आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

वाघ गाईला खातो वाघाचा स्वभाव आहे 

गाय वाघ खात नाही यात सत्यानाश आहे 


ज्याला त्याला आता धर्माबद्दल आहे सांगत

बहुदा नव्या नव्याने झाला मुसलमान आहे 


तिला पाहून ठीक होई आता मात्र बिघडते 

शरीरातील आहे की प्रेमातील बदल आहे


अजूनही कळत नाही काय नाहिसे करायचे 

नको नको ते सारेच भवताली उगवत आहे 


अवस्थेत मजला अशा पाहुन काळ थक्क झाला 

इतके प्रेमभंग तरी प्रेत कसे जगत आहे ?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

खूप काही प्रेमामध्ये तुझ्या मिळाले 

जे मिळाले नाही ते मग कुठे वळाले 


आज सुद्धा हृदय धडकते येता क्षणीच 

कळत नाही फूल कि काट्यात ते गळाले 


हास्य जगलो ओठावरचे माळून कीस 

ती स्वादात अशी लहरली वस्त्र जळाले 


क्षण सर्व यजमान आहे वाटले मला 

पाहुणे होते उमजून मग सांभाळले 


सहज होता माझ्यापेक्षा तिचा आवेग 

तरी तिच्या त्वचेने स्पर्श सर्व टाळले


तिने अंतिम मलाच नाही नकार दिला 

स्वतःचेही तिने आयुष्य फेटाळले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आपण वाटच पाहत होतो कदाचीत या पतनांची 

नाहितर ही घडलीच नसते मालिका अशी घातांची 


आधीकाधिक इतके उघडे पडले नसते तिचे शरिर 

झाली नसती तीही तयार सजा झेलाय नजरांची 


एकांत कधी सजवत नाही खोट्या खोट्या प्रेमाने 

सहज पेंडिंग ठेवू शकतो गाठ नि भेट वासनांची 


वाट बघण्यात का घालवू आयुष्य सर्व पडलेले

इतकीही खोल कथा नाही हृदयी माझ्या प्रेमांची 


फ्रेश सकाळी असतो हसतो स्वागत करतो जगण्याचे 

रोजच्यारोजच संपवतो मी वाताहत शिळ्यांची 


असते तेव्हा कळतच नाही सोबत आहे मूल्यवान

सांगतात मासे मेलेले व्हॅल्यु जिवंत समुद्राची 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


त्याच्या चित्रांमध्ये खूप शांतता आहे 

कालच मी ऐकलेला हा बोभाटा आहे 


या आयुष्यास कसे मी व्हेरिफाय करावे 

सत्य आहे की फक्त ही एक अफवा आहे 


काल तो म्हणाला की मी मेलेलो आहे 

त्याच्याकडे म्हणे भरभक्कम पुरावा आहे 


सत्यावर बोलताना वाद घालू लागले 

भाषा ही सत्यकथा की दंतकथा आहे 


अफवांवर लिहिताना इतकेच सिद्ध झाले 

सिद्ध काहीच नाही सर्व सिद्धता आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ईश्वराबाबत विरुद्ध वा बाजूने बोलणे गेले वाया 

ना अस्तिकाला मिळाला ना नास्तिकाला पाया 


ज्याला कधी साधे भक्त वाचवता आले नाहीत 

तो म्हणे कयामतला करणार कर्मानुसार सफाया 


ईश्वर ही शोधतो आहे त्याच्या आधी कोण होते 

त्यालाही म्हणे सापडली त्याच्यासारखीच छाया 


बोलणे संपले तेव्हा दोन्ही बाजूंनी युद्ध सुरू झाले 

ईश्वर मात्र उतरला नाही कुणाच्याच बाजूने लढाया 


हे अस्तित्व असे उमलणारे गंध शोधते आहे 

गंध मिळत नाही म्हणून लावते अत्तराचा फाया 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पहिल्याच भेटीत इतकी लाजली

गाल आरक्त तिचे झाले 

तिचे गुलाब वितळले माझ्यात माझे रक्त तिचे झाले


टेंभा मिरवत होतो किती स्वतंत्र आहे पण स्वातंत्र्य

आत्तापर्यंत फक्त माझे होते ते 

आता भक्त तिचे झाले 


पुरुषानेच प्रथम बोलायचे असते तरी प्रपोज करत नव्हतो 

मग एके दिवशी त्वचा उलगडली 

सर्व अव्यक्त तिचे झाले 


तिचा प्रत्येक मित्र तिच्या प्रेमात 

मारामाऱ्या किती करणार 

प्रियकर तर कमी झालेच नाहीत 

कायदे संत्रस्त तिचे झाले 


तशी ती उदार आहे जखम देते आणि मलमही लावते 

तिच्यापुढे अशक्त होत गेलो पण प्रेम सशक्त तिचे झाले 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


असा कोण आहे ज्याचे रक्त इथे भळभळत नाही 

आणि तरीही संघटित कसे व्हायचे हे कळत नाही 


एका पाठोपाठ एक प्रदेश जिंकले आता जात आहेत 

आणि नेमके कुठे आहोत हरत ते काही कळत नाही 


वार करायला जे आले ते सारेच सुरे सभ्य होते 

ते म्हणाले फूल आहोत रक्त आमच्यात दरवळत नाही 


विवेकाची कापली आहेत त्यांनी हजारो मुंडके इथे 

शिताफी अशी आहे की मेंदू थोडाही कळवळत नाही 


शेवटी नाईलाजाने मी गनिमी कावा काढावा का 

कारण समोर अफझलखान  नि रक्त कुणाचे खवळत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ना आशा उरली आहे ना प्रेमाची शक्‍यता 

फक्त उसळून येते आहे दोन्हींची अवश्यता 


का घरी बोलावतो तू आभाळातील पक्षांना

तुला का आवडू लागलीये पिंजऱ्यांची दृश्यता 


पशु घरी आले की आम्हीच घरी बोलवले ?

वाढवत गेले बनून राजकारणी बलाढ्यता 


कधीकाळी खेळलो होतो पंचगंगेच्या काठाशी 

नदीतली आई मेली उरली पाण्याढ्यता 


बघता बघता माझ्यासमोर शहर बदलते आहे 

बेढबपणे वाढत आहे गंडलेली अवाढव्यता 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ऐसा कोई दिन नही हैं जब तुम्हे याद किया नही 

तुम्हारे नाम से आया जहर जो हमने पिया नही 


उनके दामन मे चमन था उनके आंगन में आग थी 

हमे ही कुछ हो गया था हमने कुछ भी लिया नही 


अब खून भी ठंडा हुआ जो गरम था हवा मे गया 

कुछ जिंदा सा अंदर आया था मगर मै जिया नही 


तुम्हारा गुस्सा जायज न था फिरभी हम सहते रहे 

जाना पहचाना जखम था हमनेही उसे सिया नहीं 


पूरे माहोल मे छायी थी उनकी हया इस कदर 

आखिर तकरार ,"हम तय्यार थे तुमनेही कुछ किया नहीं "


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


दोन सैतान लढत आहेत 

ईश्वर दोन्हीकडे बागडत आहे 


संतापात हलतात दोन अश्रू 

डोळा मात्र अवघडत आहे 


हा ही मरो आणि तोही मरो 

शेवटी मरण तर निवडत आहे 


दुःख करावे असा कोणी नाही 

दोघेही पृथ्वी उखडत आहे 


प्रत्येक फुलातून वाघ उमलला 

वसंत नेमके काय चिवडत आहे 


भाड्याच्या घरात श्वास ताठ 

माझा मालकी हक्क आखडत आहे 


आवेगांची गरज खरोखर संपली? 

मग रक्त कशास धडपडत आहे 


इंद्रिय थंड झाले की मरून गेले 

कुठला इंद्र आत कडकडत आहे 


त्याने क्षणाचा फासा फेकला 

संपूर्ण काळ मला नडत आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

भयाच्या आरण्यातून चंद्रप्रकाश चाललेला 

एक तिचा देह आहे तोही आहे हादरलेला 


कसा अप्रोच करावा मी ती म्हणते विश्वास नाही 

एक काळजाचा तुकडा आहे तोही कातरलेला 


दोन कोवळ्या त्वचा नाही ज्यांच्याजवळ मेमरी 

वर्तमानाचे पडलेले चांदणे आसमंत भारावलेला 


तुझ्या पुढे का वासनांची मी लाज बाळगावी 

तू तरी का आणते आहेस अविर्भाव सरावलेला 


बघता बघता सारा बर्फ पाणी पाणी होतो आहे 

कोणाला खरे वाटेल की हा जीव होता घाबरलेला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


Clevers are cunning fools are useless 

Everything is becoming pathless pathless.


No paradise no hell, earth with loneliness 

And those fucked sapiens know only their businesses 


Nobody is freind and deals are opened up

Either there's shut-up 

Or only thumbs up 


Either compete or leave 

Competition has set marks 

Nobody is sacrificed and everywhere hutatma parks 


Shridhar Tilve Naik 


{ बाळबोध कविता या काव्यफायलीतून}


सर्वच मारेकरी आणि आपण जिवंत 

हळूहळू वाटू लागलीये लाज किंवा खंत 


अनेपेक्षित काय जे विचलित करेल 

मर्डर आणि युद्ध तर रोजचेच जंत 


तशी त्याने आम्हाला हिंट दिली होती 

आम्हालाही वाटले होते आहे हा संत 


भांडण लावून तू कुठे गेलास निघून 

तुझी वाट पाहतोय फुले नसलेला वसंत 


मला वाटले होते एक छोटीशी खोली आहे 

आता सांभाळावा लागतोय अख्खा आसमंत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


विसरून जावे लागेल ज्ञान अशी ही एक वेळ येईल 

फक्त पहावा लागेल प्राण अशी ही एक वेळ येईल 


प्रेम तिचे तुला वाटत आहे स्थिर आहे भक्कम आहे 

अचानक तरंग देतील ताण अशी ही एक वेळ येईल 


तिचा मोह माया काया वाकड्या नजरेने पाहत नाही 

सरळ उडवते दाणादाण अशी ही एक वेळ येईल 


आयुष्याने थकवले म्हणून कधीही नाराज होऊ नकोस 

थकव्याचे होईल यक्षगान अशी ही एक वेळ येईल 


आत्ता जे जे चालू आहे ते कधीतरी होईल बंद 

होऊन जाईल तमाशा निष्प्राण अशी ही एक वेळ येईल 


श्रीधर तिळवे नाईक

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

एक आकार माणसांच्यात वेडसर आहे 

वागतो जसा फक्त तोच बरोबर आहे 


त्याला वाटते त्याच्यावर विशेष मर्जी 

स्थान बघावे तर चिखलात पायावर आहे 


खूप फटके पडतात त्याच्या अस्तित्वाला 

पण म्हणतो मी अजून गरोदर आहे 


दिसावयाला तो तसा आहे देखणा 

पण फसवणुकीतही तो एक नंबर आहे 


पॅकेज डील म्हणूनही स्वीकारता येत नाही 

तो पॅकेज डील म्हणूनही भयंकर आहे 


दरवेळी वाटते की याला हाकलून दिले 

सकाळी उठून बघावे तर घरभर आहे 


मीही तसा आता कंटाळलो आहे 

काळजात त्याच्या नावाने फक्त घरघर आहे 


कळत नाही कसे व्हावे मुक्त त्याच्यामधून

चर्चेच्या शेवटी ही फक्त जर तर आहे 


मला त्याची नीट मुळेही दिसेनात

आणि तो म्हणतो आहे तो जगभर आहे 


ही कुठल्या कर्कशीची सुरुवात म्हणावी 

त्याच्या आवाजात आलेली खरखर आहे 


शेवटी नको त्याची विकेट गेली 

ज्याचा उपयोग नाही तो खेळपट्टीवर आहे 


मी फार बायकांच्या नादी लागत नाही 

मला इतकेच पुरते मी आई बरोबर आहे


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सगळं जग गेलं ढगात 

काय चालंलंय दोघात 


वादासाठी पंडित हो 

नाहीतर कुत्रीही भुंकतात 


लांबून सगळे टीव्ही 

दम असेल तर उत्तर युद्धात 


तिच्या आठवणींचा प्रकाश 

विझून गेला रातोरात 


कोण दूध कट्ट्यावर जातो 

लोक फॅशनेबल ताकात 


श्रीधर तिळवे नाईक 


( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एहसानों का अकाउंट हमेशा करंट होता हैं 


उन्हे कोई सेव नही करता 


इसीलिए एहसान कर 

और निकल पड 


एहसास भी ना रख 


हिसाब हमेशा तकलीफ देता है 


लडकियों पे उडाते हैं वैसे उडा एहसानों को 


और कंगाल की तरह जी ले अपनी जिंदगी 


सुकून सायकॉलॉजिकल गरिबीमें है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तिने दिलेल्या फुलांचेही हळूहळू डाग झाले

डोळ्यांमधील लाटांचेही तिच्या झाग झाले


प्लेस मी केली होती चुकीच्या जागी माझी निष्ठा 

त्यांचे जखमात मीठ आणि नंतर आग झाले 


हळूहळू बंधनेही तिला काचू लागली 

जे रज्जू प्रेम होते कालांतराने नाग झाले 


एकेकाळी तपशिलांना नव्हते महत्त्व पण 

ढोबळ ते जंगल आणि सूक्ष्म ते बाग झाले 


तिच्यावरती लिहिलेल्या शेवटी उरल्या कविता 

हळूहळू त्यांचेही मग भग्न पाठलाग झाले 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


लोक कृतघ्न असतात 

म्हणून अस्तित्वात नसलेल्या ईश्वरांशी 

कृतज्ञ असतात 


त्यांना बरे होण्याचे श्रेय डॉक्टरांना द्यायचे नसते 

ते सारे श्रेय देवाला देतात 

त्यांना डॉक्टरांनी पैसे घेतलेले दिसतात 

पण त्याच डॉक्टरांनी बरे केलेले दिसत नाही 


तेव्हा मेडिकल ऍडमिशनला जाऊन काय मिळणार 


कृतघ्न असलेल्या लोकांचे उपचार ?


ते तोंडावर तुला देव म्हणतील 

पण माघारी तू किती पैसे घेतले ते मोजत बसतील 


ते यज्ञाचे पैसे मोजणार नाहीत 

ते पूजेचे पैसे मोजणार नाहीत 

पण ते डॉक्टरांचे पैसे मोजतील

औषधांचे पैसे मोजतील 


आणि डॉक्टर पण इतके शहाणे 

की मेडिकल सायन्सच्या लोकांचे फोटो टाकण्याऐवजी 

हॉस्पिटलमध्ये देव टांगतील 


ह्या असल्या जगात ऍडमिशन मिळवून तू काय करणार आहेस 


तू विचारलेले प्रश्न 

अमोल कोडोलीकरला कळणार नाहीत 

अभय पाटील ला कळणार नाहीत 


तेव्हा त्यांना डॉक्टर होऊ दे 

तू निघ त्या प्रदेशाकडे 

जिथे ज्याचे श्रेय त्याला दिले जाईल 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कोणा कोणापासून मी धडे घ्यायचे ठरवा 

नेमके काय आणि किती प्यायचे ठरवा 


प्रकाश उडत नाही म्हणून पोहोचतो 

त्यास कळत नाही का काय न्यायचे ठरवा 


सूर्य तुमच्या आवाक्याबाहेर आहे 

गायत्रीमुळे काय देता काय द्यायचे ठरवा 


मला विज्ञान शाखेमध्येच रस नाही 

त्या बदल्यात मला काय द्यायचे ठरवा 


मला माहित आहे कलेला भवितव्य नाही 

भविष्य काळाला किती भ्यायचे ठरवा 


श्रीधर तिळवे नाईक 


( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शब्दांचा संग्रह बरेच काही करतो 

त्याच्या पुढे जाताच मनुष्य मरतो 


माझी मागणी डिस्टर्ब करणारी होती 

बघू आता कसा मी तिच्यापुढे वावरतो 


तिच्या सावल्याही आडमुठ्या आहेत 

त्यांना पाहताच माझा देह थरथरतो


तू हास्याने सुरुवात करू शकशील 

तिला वाटले पाहिजे शेवट हास्यारतो 


कितीही अरेंज कर विस्कटणार आहे 

प्रेम देव नाही हैवान आहे फिस्करतो 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


खाली आज्ञाकारी शिपाई आहे 

वर मेंदूमध्ये एक बाई आहे 


वाट लागायला आणखी काय हवे 

डोक्यात लेखनाने भारावलेली शाई आहे 


माहित नाही बेडवरून कुठे जाणार ती

तिला माहित नाही खोली बाहेर खाई आहे


मी तिच्या बेंबीला टच काय केला 

ती लगेच म्हणाली मी सर्वप्रथम आई आहे 


मी हाच तारुण्याचा शर्ट घालतो कारण 

कापडापेक्षा देखणी तिची शिलाई आहे 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माहित नाही काय होऊन जाते 

ती येते माझा स्पर्श पिऊन जाते 


किती शांत दिसतो तिचा चेहरा 

वासनेला सहज वळसा घालून जाते 


चहासारखी पितो मी तिची त्वचा 

ती अख्खी घटाघटा पाऊस पिऊन जाते 


एक सावळी ऊर्जा आत अनेक गरजा 

चिमटीत वीज तशी मला पकडून जाते 


एक नाजूक हाय एक नाजूक बाय 

या दरम्यानचा ढग मटकाऊन जाते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आपल्यातलाच कोणीतरी निघून गेला 

दिवा बनण्याआधीच विझून गेला 


हे वय नव्हते त्याचे जगातून जाण्याचे 

जगणे जाणण्याआधीच सुकून गेला 


काय असेल त्याच्या डोक्यात विचार 

कोण डोक्यातील प्लग काढून गेला 


सायन्सला कंटाळला होता हे खरे 

मग साईड बदलायची का निघून गेला 


त्याच्या आई-वडिलांना काय सांगणार 

जवळचा मित्र अचानक लांबून गेला 


आत्महत्या असती तर निष्कर्ष असता 

आजारही नव्हता काय कळवून गेला 


नुसती हळहळ हळहळ हळहळ

भाषा गोठलेली काळीज गोठवून गेला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्य फायलीतून )


Don't quit, 

लाईफ is quick .


suicide ke bareme sochte sochte निकल जायेगी 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


शेवटी नवी पिढी आहे प्रश्न विचारणारच 

जे तुला थोर वाटते ते नाकारणारच 


श्रद्धा ठेवायला अक्कल लागत नाही 

तू श्रद्धा ठेवणार आणि ते नाकारणारच


तुला वाटते थोर तलवारी आहेत 

नवे लोक त्या किती गंजलेल्या तपासणारच 


वस्तुस्थिती अशी तू आऊटडेटेड आहेस 

जे इनडेटेड आहे ते शोधले जाणारच 


तुझे आदर्श स्वातंत्र्य चळवळ लढले नाहीत 

त्यांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा लाथाडल्या जाणारच 


कोणीही तसा इथे संपूर्ण नसतो 

सगळे अर्धे अपूर्ण पूर्ण केले जाणारच 


तूच ओपन कर मुकाट्याने तुझे हृदय 

नाही केलेस तरी हार्ड हार्ट सर्जरी करणारच 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुझ्या नावाने गोंधळ घातला 

इतका की चराचर चळाचळ कापला 


श्रीधर तिळवे नाईक


दिसायला सरळ पण शेवटी वळत झाला 

जो हादसा झाला तो माझ्या नकळत झाला 


असा काही मी या रॅट रेसला सरावलो 

जणू माझा जन्म इथे पळत पळत झाला 


दुकान तर टाकून बसलो बघू काय होते 

प्रत्येक धंदा येथे कणा आवळत झाला 


माझ्या उजव्या बाजूला जरी अंबाबाई 

माझा देह नास्तिक नकळत झाला


कुठल्या आगीतून मी जगात जन्मलो होतो 

जो शेवट माझा असा चितेत जळत झाला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुझं या देशातल्या लोकांवर प्रेम नाही 

तू आतून नीच आहेस बाहेरून नाही 


तुझा एक डोळा आहे अमेरिकेवर खिळून 

दुसऱ्या डोळ्यात तू आहेस हा देश नाही 


तुझ्यासाठी आम्ही आहोत केवळ एक प्लॅटफॉर्म 

तुझे इथे रेंगाळणे हा तुझा चॉईस नाही 


उद्या शक्य झाले तर तू पुन्हा नवे शोधशील 

वर आणि सांगशील तू कसा जुनाट नाही 


तरीही लोक तुझ्यावर ठेवतीलच विश्वास 

म्हणायला होमोसेपियनस काडीची अक्कल नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वो अंधा हो चुका है कह रहा है उसके पास नजर है 

अभीभी उसे लगता है की लोगो पे उसका असर है 


बुढा होना कोई गुनाह नही मैंभी सच जानता हुं 

मगर अगली पिढीको बुढा बनाना ये कैसा नेचर है 


कौन मुडकर देखेगा इतिहास में बार-बार लगातार 

जो बीत गया वो सपना था जो आ रहा है वो सहर है 


कोई औकात नहीं बचती बस एक तसल्ली बचती हैं 

उसके लिये वो अमृत हो जो हमे लगता है जहर है 


इसी सोच से विदा करो जो उम्रभर किया उसने ठीक किया 

वरना पुरी लाईफ गलत हो जाएगी और ये कहर है 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जो क्षण आत्ता आहे तोच खरा क्षण आहे 

परतते जी तुझ्याकडे ती फक्त आठवण आहे 


शरीरातून काही गंध तिच्या असे उडतात की 

बागांनाही वाटते तिने जंगल केले अर्पण आहे 


ती सतत येते आणि मला मोहवून टाकत राहते

सौंदर्य स्वतः बहुदा करते तिची भलावण आहे 


कळत नाही आता कसा पळून जाऊ तिच्यातून 

एक तर समोर असते किंवा तिचा दर्पण आहे 


प्रेमात प्रॉब्लेम कोणीही सस्पेंड प्रेम करू शकते 

लोंबकळत्या बागेमधले उमललेले क्षण आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नुसत्या संशयाच्या करतात हालचाली 

नेस्तनाबूत होतात भल्या भल्या चाली 


अचानक कुठून तरी एक येते तलवार 

माहित नाही का असते पण म्यान खाली 


नाचणारे नाचत जातात त्यांचे त्यांचे गाणे 

देणारे देत जातात गलोच आणि गाली 


आपल्यातल्याच कोणीतरी खूपसलेला सुरा 

ओळखता येत नाही कारण सर्वजण मवाली 


असा काही अभ्यास कर की मिळेल ऍडमिशन 

तेवढीच एक संधी तुझी दूर करेल बकाली 


मागितली मी होती शेवटची एक भेट 

तिने माझ्या प्रेमाचा मृत्यू पाठवला टपाली 


कोणता काळ कधी इथे फिट होता 

सर्वच जण जन्मले होते इथे अकाली 


शाहू महाराजांना आठवत बसू नकोस 

ते सुवर्णयुग संपले राज्य करतात मवाली 


अशा या शहरांमध्ये थांबून काय करणार 

थांबले त्यांना मिळाली शहरात फक्त बकाली 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हा असा जगण्यापेक्षा तू मेलेला बरा 

आत्महत्येचा गुन्हा तू केलेला बरा 


पैसे वजा झाले की समाज वजा झाला 

यांच्यापैकी नेमका कोण गेलेला बरा 


श्रीधर तिळवे नाईक


उतरण्याची खात्री नाही हा प्रेमाचा ज्वर आहे 

इथे नाही तर तिथे तापतच राहील शेवटी हा देहभर आहे 


जरी मी राहत असलो भाड्याच्या घरात 

तुझे हृदय माझे मालकीचे घर आहे 


या शहराचा रस्ता सुद्धा रस्ता नाही महाद्वार आहे 

ज्याला घर म्हणावे असे फक्त अंबाबाईचे मंदिर आहे 


प्रत्येक अफवा आता मला घरात येऊन विचारत आहे 

काय खरे सत्य आहे याची तुला खबर आहे ?


नाराज तरी मी आता होणार कोणा कोणा वर 

कधी वर आहे तो खाली तर कधी खाली आहे तो वर आहे 


तिचा बाप काय या शहराचा आमदार झाला

ती अशी वावरते जसे हे तिच्या बापाचे शहर आहे 


तिच्यापासून तुला वाचवणे तुझ्यापासून तिला लपवणे 

चालू हाच एक माझा धंदा किमान वर्षभर आहे 


शेवटी प्रेमात वाईट काय जे आहे ते उत्तमच आहे 

तू अनंत काळची प्रेयसी मी क्षणभराचा प्रियकर आहे 


ती माझ्या प्रेमात मी तुझ्या आणि तू कुणा तिसऱ्याच्याच

आणि तिसरा म्हणतो आहे की माझा जिवलग मित्र श्रीधर आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वाढू लागली संख्या आसपास दलालांची 

ओरबाडायला लागले ओळख माणसांची 


एक सूर्य माहीत होता आणि एक चंद्र 

मला कुठे माहिती होती शहरातल्या तासांची 


माझ्यापुढे ठाकलेला आडवा अंधार आहे 

काय करू काढून आठवण गेलेल्या दिवसांची


मला सांगायचे नव्हते की मी भुकेला होतो 

मी सांगत राहिलो कथा केलेल्या उपवासांची 


जिवंत असताना मी फक्त संत होतो 

मीमांसा सुरु झाली मेल्यानंतर ताणांची 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अचानक आलेल्या गरिबीचा धसका आहे 

काळजाचा उडालेला मेंदूमध्ये टवका आहे


तुम्हारे इश्क में मैं अकेला हुआ 

मै और जियादा तुम पे फिदा हुआ 


मोहब्बत मुझको रास आई 

अपनेही अक्सका दिवाना हुआ 


अपने आप हजारो दुश्मन हुए 

मैं सचके साथ खडा हुआ 


जानता हूं वो लौटेगी, हमेशा 

बादमे प्यार पहले झगडा हुआ 


ये सितम हैं या प्यार की तस्वीर 

पहले भी शायद यहीं नजारा हुआ


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मला बघून चेहरा चौकोन, खूप झाले 

तुझ्या डोळ्यात अश्रू दोन, खूप झाले 


भेटत नाही प्रत्यक्ष दोघे म्हणून काय 

वळताना डोळ्यांचा त्रिकोण ,खूप झाले 


सर्वां समोर दाखवणार ओळख कशी 

दुविधेत विचारणे हे कोण ,खूप झाले 


तिसरी बाजू येणार होती टाळले तरी

परफेक्ट काटकोन त्रिकोण ,खूप झाले 


मध्यंतरात अडकलेला आपला सिनेमा 

हळूहळू ठरतोय टोन ,खूप झाले


एकमेकातून होत जाऊ हळुवार वजा

पहात एकमेकांचे कोन, खूप झाले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


शायद कोई ख्वाब था 

जोभी था लाजवाब था 


आया सिल्याबसकीतरह 

जिंदगीकी किताब था


सिर्फ काँटेही बचे है 

मेरा इतिहास गुलाब था 


कभी खुद ही पूछा करो 

कौन जादा बेताब था 


मैने सवाल पूछा ही नही 

उनका चेहरा जवाब था 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

निरोध दुकानात विक्रीसाठी ठेवताना श्रीधर तिळवे नाईक 


अनेकांचा मेंदू दुसऱ्याच्या बाबत दोन पायांत लोंबकळतो

स्वतःला सज्जन म्हणवून घेत 

एकाच अवयवात जळतो गळतो


दातापासून दाताकडे अलीकडे मुळात जातो कोण 

मांड्यामधून मांड्यांच्याकडे जो तो प्रवास तळमळतो 


मेंदू कैद झाला आहे इथल्या समाज व्यवस्थेकडून 

साध्या एका कंडोममुळे 

जागच्या जागी डळमळतो 


बोट लावताच कोसळणार तर मग उभा करावा कशाला 

असाच महाल उभा करावा 

जो ना हलतो ना कोसळतो 


तुझे सारे अवयव आहेत आणि तुलाच विचार करायचा आहे 

शेवटी हा ज्याचा त्याचा खेळ 

जो तो निवडतो वा वगळतो


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्वतः खोटे बोलणार आणि मला म्हणणार खरं बोल 

नाजूक नाजूक शिव्या देणार मला म्हणणार बरं बोल 


श्रीधर तिळवे नाईक

गॅस पोटात साठलेला असतो म्हणून लोक हवा पसरवतात 

स्पष्टीकरण द्यावे लागते कारण लोक अफवा पसरवतात  


इतिहास खूप सावकाश चालतो त्यामुळेच फायदा होत नाही 

अनेक लोक सूर्य म्हणून आतला काजवा पसरवतात 


जेव्हा अख्खा समाज बनून खलनायक प्रेमाचा येतो 

डालडा स्वस्त होतो त्यास लोक म्हणत खवा पसरवतात 


कशासाठी सहन करतेस इतके इमोशनल ब्लॅकमेलिंग 

ज्यांना फुगा फोडायचा असतो ते आधी हवा पसरवतात 


लोकांच्या बोलण्याकडे उगाच लक्ष तू देऊ नकोस 

जो माणूस फिट बसत नाही लोक त्याला नागवा पसरवतात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शेवटची मिठी तर मारायची होती मिस केली 

नंतर पाठ करायची होती पण ती आधीच केली 


हे असेच होत असते अवचित नको ते 

कसा डरपोक झालो का घाई ऐनवेळीच केली 


माहित नाही कधी भेटणार आता आपण दोघे 

शहराने या आपल्या भोवती नेहमी गर्दीच केली 


भेटायचे नव्हते पण भेट टाळता आली नाही 

समोर ठाकलो बोललो भाषेत पण टाळाटाळ केली 


आता पाय काढू पाहतोय काही केल्या निघेना 

प्रेम बेकायदेशीर होते मग भेट का विधीवत केली 


जातानाही ड्रेस तू असा नीट केलास की 

वाटले मला अख्खी मीटिंग आपण बुरख्यात केली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तिच्याबरोबर पाहिलेला पहिला सूर्योदय श्रीधर तिळवे नाईक 


प्रेमाचा पाहिलेला पहिला सूर्योदय 

काळापलीकडे असे ज्याला नव्हते वय 


एक होती ब्लॅंकेट एक होती गर्मी 

एक होता हातामध्ये फिलिंगचा प्रलय 


पाठीमागे शहर होते पुढे एक डोंगर 

तरी जुळून आली होती दोघांमध्ये लय 


हळूहळू पसरत गेला प्रकाशाचा 

सुल्लोळ 

एक आल्हाद पसरला देह झाले निर्भय 


दोन तुझे ओठ आले दोन माझे ओठ 

जग कशाला हवे पुरे एकमेकाची लय 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आरशात माझे इतके चेहरे कसे दिसतात 

एकाच्या सुरक्षेसाठी पहारे इतके कसे दिसतात 


हे बावन्न उंट आहेत की उंटांच्या सावल्या 

तंबूत शिरण्याआधी सशासारखे कसे दिसतात 


बघता बघता त्यांनी माझे क्षेत्र बळकावले 

प्रजा म्हणून आले राजांसारखे कसे दिसतात 


डोक्याशिवाय त्यांनी सोबत काय आणले 

कोल्हापूर बाहेर धूर्त इशारे कसे दिसतात 


आम्हाला महाग माल त्यांना स्वस्त मिळतो 

विकणाऱ्यांना नेमके ते कुठे वेगळे दिसतात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दुसरे कोणते शस्त्र आहे तुझ्याकडे तळतळाटांशिवाय

पण आता चालत नाही दुर्दैवाने असे बोलभांड मौखिक उपाय 


सांग या क्षत्रियांना वेसण घालणार तरी मी कशी 

यांना भीती वाटत नाही भयसमुद्रांच्या महालाटांशिवाय 


खरेच पूर्वीचे ब्राह्मण आत्ताचे विद्वान फरक नाही राहिला?

तसे असेल तर तुझा धर्म झाला आहे आता कालबाह्य उपाय 


कदाचित सगळ्यांनाच आता ठाऊक आहे ना स्वर्ग ना नरक

शिक्षा नाहीच कळल्यानंतर मोकाट सुटतात जनावरांचे पाय 


करपलेल्या करप्ट सिस्टीमचे काहीतरी करावे लागेल ना 

की अशीच आपल्या डोक्यावर बसणार वामनाचे घेऊन पाय 


विनाश सुद्धा आजकाल खूप जंटलमन झालेला आहे 

जेव्हा कधी ऑफिशिअल येतो असतो गळ्यात मस्तपैकी टाय  


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

बहोत से लोग आँखें दिखाने लगे है 

मेरी हस्ती को चुपके से मिटाने लगे है 


पैसे क्या खतम हुए दुनिया ही खतम 

क्या जेवकतरे दुनिया चलाने लगे है 


चेहरा तक नही दिखाते आजकल मुझे 

दोस्त भी अच्छी दोस्ती निभाने लगे है 


अकेले होने का मुझे कोई डर नही 

डर है प्लॅनिंगसे अकेला बनाने लगे है 


ठीक है ये पहाडभी मैं पार कर जाऊंगा 

भले चांद और सुरज मेरे रास्ते जलाने लगे है 


कौन है जो दुनियादारी से छुट गया 

कुछ रिश्ते अपना मुंह छुपाने लगे है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


थांबलेल्यांनी जे चालत गेले पुढे त्यांना नावे ठेवू नये

त्यांना गाठावे पळत पळत उगाच रेंगाळत मागे राहू नये 


कोणी कुठली जीवनशैली निवडली होती त्यावेळचा प्रश्न 

वर्तमानात कुठली सूटेबल पहावे जुन्यात उगाच अडकू नये 


असतीलही जंगले सभोवताली ती आता टिकवावी लागतील 

कोणी जंगलात शिरणार नाही या भ्रमात अडकून झोपू नये 


जग बदललेले आहे आणि आता ते जंगलात आलेले आहे 

जंगल शहरात धाडणे शक्य नाही उगाचच तशा गमजा मारू नये 


आपल्या पोरांचे करणार काय? आपण त्यांना जंगलातच ठेवणार ?

बसून एकदा नीट ठरवावे लागेल उगाच परंपरा परंपरा करू नये 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

त्यांच्यासाठी नेहमीच व्यवहार वाकडा होता

त्यांच्यासाठी मेला तो फक्त एक आकडा होता 


कुठे त्यांना प्रिय होता हा माझा हिंदवी देश

शतकांसाठी निवडलेला काही बाकडा होता 


ते नेहमीच धूर्त होते त्याचाही नव्हता प्रॉब्लेम 

भोळेपणा आमचाच नको तितका ठाकडा होता 


श्वासावरही आमच्या ते आता बोलू लागले 

म्हणू लागले श्वास हा चपटा नाकडा होता 


कधीतरी ठरवावे लागेल करायचे नेमके काय 

थाट तो आणावा लागेल जो पूर्वी फाकडा होता 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माहीत नाही कुठे मुतारी गायब केली 

कधीही लागायची तुतारी गायब केली 


म्हणावयाला तसा समोर निळा रस्ता

निळी एकसंघ एकतारी गायब केली 


विक्रीसाठीच होती बाजारात आली 

स्वखुशीने होणारी उतारी गायब केली 


आत्तापर्यंत त्यांनी छप्पन लोक पचवले 

सुपारी अदृश्य आणि सतारी गायब केली 


पॉलीश करत केली संस्कृती पॉलिस्टर 

पोस्टर छान लावले जरतारी गायब केली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मूर्खपणा असीम आहे आचरटपणा अफाट  

वाईट गोष्ट ही आहे तो झाला आहे पिसाट 


चालली हिंसेची बदलत आता शैली सुद्धा 

न कापती तलवारिने देतात न्यूजने काट 


काचा तडकल्या घरे तडकली आता तर देवही 

कशामधूनही येऊ शकतात आता रक्तपाट 


लाकूडतोड्या जरातरी जंगलांच्या कह्यात 

आता कटर असे जसे लाटामागून लाट 


थाटमाट विचारावा काय स्मार्टनेस व्यक्त त्यात 

फक्त एक आज्जा आहे त्याला मात्र दिली खाट 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


१३- ७- ७ 

कशाला कोण पाहिजे ,तू आहेस खूप आहे 

उशाला कोण पाहिजे तू आहेस खूप आहे 


हे अपुले सरळ साधे छानसे चालले आहे 

खिशाला कोण पाहिजे तू आहेस खूप आहे 


तुझे लांब सडक केस वाहतात मस्तपैकी 

मिशाला कोण पाहिजे तू आहेस खूप आहे 


दारू त्यांना लागते ज्यांस पाणी पुरत नाही 

घशाला कोण पाहिजे तू आहेस खूप आहे 


ही खरी गोष्ट ,लागते संसारात एक कासव

सशाला कोण पाहिजे तू आहेस खूप आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


लोगों से बाते करते करते वो तो चला गया 

आज तक पता नही exactly क्या हिला गया 


झगड रहे है पूछा नही झंडा किस बात का था 

इसने कहा नीला गया उसने कहा पिला गया 


लोगोकी बुद्धिपे अब कितना भरोसा करे 

मंदबुद्धी कहते थे वो मॉडर्नको हिला गया 


मर गया सो मर गया बस चर्चा चली काटके 

सांप गया वो अच्छा गया या सांप जहरिला गया 


देखते देखते ऍक्टिव्हिटी इतनी मंद हो गई 

वो बेडसे उतर रहे थे की हाथ से किला गया 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आतमध्ये चलबिचल करतात आठवणी 

शेवटी स्वतः पुढेच हरतात आठवणी 


खूप काही त्यांनी पाहिले रानटीपण

जग आठवून आठवून मरतात आठवणी 


कोणालाही कळत नाही जग कसे चालते 

स्वतःपुरते जग आवरतात आठवणी 


बघावे तेव्हा स्वतःचे करतात वर्णन 

दरवेळी नवा देह उभरतात आठवणी 


आठवून आठवून स्वतःला विसरून गेल्या 

बरे झाले स्वतःला विसरतात आठवणी 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुम्हारे इश्क में मैं अकेला हुआ 

मै और जियादा तुम पे फिदा हुआ 


मोहब्बत मुझको रास आई 

अपनेही अक्सका दिवाना हुआ 


अपने आप हजारो दुश्मन हुए 

मैं सचके साथ खडा हुआ 


जानता हूं वो लौटेगी, हमेशा 

बादमे प्यार पहले झगडा हुआ 


ये सितम हैं या प्यार की तस्वीर 

पहले भी शायद यहीं नजारा हुआ


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


सहन केले असते जर त्यांनी असते पिंजरे मागितले 

पण त्यांनी माझ्या घरी येऊन माझे घरटे मागितले 


मी दुकानच थाटले होते कपडे माझे विकण्यासाठी 

त्यांनी कपड्याच्या किमतीत माझे चेहरे मागितले 


नको तेव्हा भेटतात हवे तेव्हा गायब असतात 

अशांचे काय करू ज्यांनी क्षण गुंतागुंतीचे मागितले


कधीही कळले नाही खाऊ चॉकलेट की ओठ तिचे 

तोडगा म्हणून चॉकलेटच्या बदल्यात ओठ तिचे मागितले 


कोणत्या मालकाने मला माहित नाही दिले घर 

आणि हेही माहित नाही कोणी भाडे मागितले


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रेम होते प्रेम आहे प्रेम पुढेही होत राहील 

तुडुंब ढग भरलेला उन्हाळ्यातही फ्रेश राहील 


तसा दिसतो दगड माझा चेहरा तुझ्या सभ्यतेला

तुझ्यासाठी सॉफ्ट होता पुढेही तो सॉफ्ट राहील 


मागत रहा दुवा तू माझा देवावर विश्वास नाही 

मी फक्त इतकेच सांगतो हातात तुझ्या हात राहील 


जिथे जावे तिथे आता प्रचार अवतरलेले दिसतात 

बाहेर निवडणूक झाली तरी तुझ्यात गुंतवणूक राहील 


ताजमहाल कोण बांधतो लोकांना लुटावे लागते 

प्रामाणिक पैसे कमवेन प्रेम प्रामाणिक राहील 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माझ्यावरती प्रेम तिचे 

घरंदाज अन पुष्कळ आहे 

पण पावित्र्यही जपलेले 

तसे तिने मायंदळ आहे 


कधी कधी ती करते अती 

वाटते की लई झाले 

मग वाटते हा आलेला

आतून तिचा ओहळ आहे 


चिंचोळ्या गल्लीत तिच्या

आज काल मुबलक गर्दी 

प्रत्येकास आमंत्रण वाटते 

डोळी तिच्या जे काजळ आहे 


आडमाड लाल पाकळ्या 

 ओठातून उमलत जातात 

जेव्हा ती बोलत जाते 

वाटते भाषा कमळ आहे 


भराभर असे नकोस देऊ 

दे प्रेम तू भाराभार 

घाई भरघोस करशील तर 

वाटेल प्रेम मृगजळ आहे 


चिक्कार मोक्कार प्रियकर 

विपुल झेल नेत्र पल्लवी 

जेव्हा पोरगी असते हिरा

समज स्पर्धा बक्कळ आहे 


कमी जास्त होत जाते 

हृदय थोडाच वजन काटा ?

दुकानाप्रमाणे चालायला 

प्रेम थोडीच चंगळ आहे ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


चालले रे चालले रे चालले रे गंडीव फशीव 

डोळ्यामध्ये धुर्त त्याच्या चकाकले रे गंडीव फशीव 


स्वर्गासाठी साठ फुटी केएमसिने बांधला रस्ता

आभाळाचे डांबरही टाकले रे गंडीव फशीव 


खानदानी छगनला कर कल्पनेचा आता कप्तान 

बघू तरी कुठवर जाते झाकले रे गंडीव फशीव 


जे पाठीत वाकले ते मेंदूत ही मोडून पडले 

शोभा दाखवून पात्याने फेकले रे गंडीव फशीव 


रोग होता आधुनिक आणि प्राचीन होते उपचार 

शहराचे ह्या शव शेवटी वाकले रे गंडीव फशीव


कुणाकुणास कसे कसे समजावणार आहेस राजा 

हरेक दारी तोरणासम टांगले रे गंडीव फशीव 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नको बनवू रिलेशनशिपला तू कमर्शियल 

कळणार नाही कधी झाले नाते फक्त डिल


पैशाचे हे भास सारे दिसावयास छान 

रक्तसुद्धा फाडावयास लागते नंतर मग बिल 


दहाव्या वर्षापासून चालवतो आहे मी माझे दुकान

तिसऱ्या वर्षी खांद्यावरून बापाच्या केले डिल


प्रेम असेल तर वाटाघाटी का मध्ये आणते 

आणायचा तर बेड आण का आणते टेबल


काळजाचे सर्व काही काळजानेच करावे 

फार व्यवहार आणू नये फक्त करावे फिल 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


डोळ्या देखत माझ्यासमोर 

माझे जुने शहर बुडाले

किनाऱ्यावर पोचलो तेव्हा 

समोर अख्खे बंदर बुडाले 


छोटे छोटे ताज महाल नि 

खोटे कित्येक बादशाह 

काळामध्ये बघता बघता 

असे खूप चिल्लर बुडाले 


उंटावरती माझ्या कित्येक 

शहाणे पर्वत झाले आरुढ 

मी मोहम्मद झालो नाही 

माझे तरीही घर बुडाले 


पती सरोवर विशाल होता 

तरी चालली निखाऱ्यावर 

माईल स्टोन होते पवित्र 

तरी बुडबुड्यावर बुडाले 


वाळवंटात पोहोचणार 

नाही तर आणखी कोठे 

जहाज माझे पाण्यात तरी

मला टाळून सागर बुडाले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


लायकीप्रमाणे मी ज्याला त्याला चेहरा दाखवतो 

समोर जसा असतो तसा त्याला आरसा दाखवतो 


बघता बघता हॉट झाली माझ्या डोळ्या देखत ती 

मीही दाखवत होतो सभ्य असभ्य आता दाखवतो 


तुम्ही जपा आयुष्यातले तुमच्या मैलाचे दगड

जे भूतकाळ झालं त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो 


मी सुंदर नाही जेव्हा अधोरेखित जाते केले

मी त्यांना मत्स्यालयातील सुंदर मासा दाखवतो 


देवांचे सुद्धा दिवस असतात ते येतात आणि जातात

कोणी विठ्ठल दाखवला की मी साईबाबा दाखवतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी कशाला कुठे जाऊ जोवर बनून तू पेशी आहेस

तू आहेस आयुष्यात माझ्या आणि तू पुरेशी आहेस 


मी कधीही तुला माझी कधी परी नाही मानली 

पंख कशाला हवेत सोबत चालताना पुरेशी आहेस 


मला कधीही चंद्रामध्ये तुझा चेहरा आढळला नाही 

तुझ्या चेहऱ्याचा प्रकाश आहे आणि तू पुरेशी आहेस


जो तो आहे हरवलेला भोवतालच्या गर्दीमध्ये 

तुझा हात माझ्या हातात आहे आणि तू पुरेशी आहेस 


आयुष्य एक फर्मान आहे कोणी काढले माहित नाही 

तू आहेस स्वाक्षरीसारखी आणि तू पुरेशी आहेस


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आपण जनावर म्हणून जगावे तेच बरे 

भावनेत चढावे आणि उतरावे तेच बरे 


कशाला हवी इतकी किचकीच बुद्धीची 

जंगलात जावे नि जंगली व्हावे तेच बरे 


शुभसंकेतांची अंधश्रद्धा सगळीकडे 

त्यापेक्षा डरकाळी ऐकून घाबरावे तेच बरे 


एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर नाही 

वारेमाप अनुत्तर बधिर व्हावे तेच बरे 


ज्ञानाचे फळ खाऊन काय घंटा भले झाले

जंगलातील अस्सल फळ खावे तेच बरे 


माणूस होण्यापासून मला वाचवा वा

 मीच माणसांच्यातून निघावे तेच बरे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आतून परिस्थितीला घाबरलेला आहेस 

की पळून जायला सरावलेला आहेस ?


दहा चेहऱ्यांनी तू येत असतोस 

तुझ्या चेहऱ्यांना तरी सापडलेला आहेस ? 


नेमकी कोणाची करत आहेस फसगत ?

की आतून बाहेरून फाफललेला आहेस ?


वीट येतो त्यास लोक विटेवर उभे करतात 

कोणत्या विटेसाठी आकारलेला आहेस ?


डोळे रिटायर झाले तुला पाहून पाहून 

नि तू म्हणतोस की अवतरलेला आहेस ?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


बोंब मारल्याशिवाय कोंब फुटत नाही 

आणि क्रांती केल्याशिवाय झाड वाढत नाही 


आपण आहोत मध्ये 

झुडपांच्या मधोमध 


आपल्याला जास्तीत जास्त 

बोन्साय होण्याची सवलत आहे 


तेव्हा बघा 

क्रांतीच्या ध्यासात वाया जायचं 

की बोंसाय होऊन तब्येतीत जगायचं 


मी तुमच्यातला कधीच नव्हतो 

त्यामुळे वाया जाण्याचे भय मला नाही 


एकट्याने जगण्याचा एवढाच एक बोनस 


बाकी बोनसायमधील असेल 

पण दिवाळी तुमची आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुझ्या त्वचेला माझ्या त्वचेचा सांग कुठे ग स्पर्श झाला 

संभोगापर्यंत जाण्याइतपत कुठे नात्याचा उत्कर्ष झाला 


कुठे प्रेमाने शहाणपण आले कुठे मिळाली मनास शांती 

आजवर फक्त समाजाशी आता व्यक्तिगत संघर्ष झाला 


मला संशय आहे माझ्यातील चांदण्यासुद्धा झिजत आहेत 

जरी तुझा चेहरा चंद्रासारखा , ग्रहण होऊन अपकर्ष झाला 


कळले नाही वासना माझी कशी वेगात आकर्षण झाली 

आता अटॅचमेंट झाली तर म्हणते नात्यात मला कुठे हर्ष झाला 


कालपर्यंत तरी जिवंत होतो उद्याचे काय ते माहित नाही 

कालही माझ्या मर्डरवर फक्त विचार विमर्श झाला 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एक तर गर्दीचा हिस्सा बन 

नाहीतर एकांतात मरणारा किस्सा बन


ती यावी म्हणून तो जप करत राहिला 

खूप वेळ होता त्याचा खप करत राहिला 


शेवटी पळून गेली ती दुसऱ्याच बरोबर 

हा मात्र आयुष्याला ठप करत राहिला 


ज्याला देव हवा त्याने फक्त देव पाहावा 

मुलीस पाहण्याऐवजी तू तप करत राहिला 


कितीही नवस कर ती मिळणार नाही आता 

देवाशी उगाचच तू गपशप करत राहिला 


निदान नव्या मुलीवर मुसळधार ट्राय मार 

असे नको व्हायला टप टप करत राहिला.


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू माझ्यासारखीच आहेस की झालीस 

वाईट वाटते तू ही शेवटी एकटी झालीस 


ऊनावरून ओळखतो मी सूर्य उगवला 

माझ्यासारखी तूही उशिरा उठणारी झालीस 


स्वतःचे रिपेरिंग सतत चाललेले आहे 

नवे इतकेच की तू त्यात सहभागी झालीस 


हेही तसे बरे आहे सुरू झाली लगबग 

हवीहवीशी घरातली गर्दी झालीस 


आडवळणाने येते आडवळणाने जाते 

मधली जीवनरेखा सरळ वळणाची झालीस 


श्रीधर तिळवे नाईक 


( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

नाईलाजांनी त्यांनी जमीन पेरली 

खूप वर्षांपूर्वी म्हणे होती वारली 


चिमटीत पकडावा तसा सूर्य पकडला 

नाहीशी झाली ती पृथ्वी त्याच्यात शोधली 


बरेच झाले नाही मजला कवच कुंडले 

लघवीत मेलो असतो जन्मताना होपलेसली 


गाफीलपणाने अवघे तो आयुष्य जगला 

आता करत बसतो स्वतःच्या चुका टॅली


माझ्याजवळ माझी दुसरी आवृत्ती नाही 

मी ओरिजनल म्हणून पहिली महागली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

त्याच्यासाठी अनोळखी भाषेचा मंत्र आहे 

बरे झाले शब्दापासून श्वास स्वतंत्र आहे 


पाल पाहून काही ती दचकत बिचकत नाही 

माझ्या मिठीत येण्याचे तिचे जुने तंत्र आहे 


इतका चाललो मी की पाठ झाल्या वहीवाटा 

ती वाट शोधतो आहे जी आता स्वतंत्र आहे 


आपण माध्यमांचा की माध्यमांनी ह्या आपला 

पाठलाग करायचा कुणी काही मंत्र आहे ?


आभाळाची सुद्धा म्हणे होते आहे आबाळ 

माणसाच्या हाती गेला त्याचा गुरु मंत्र आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

बिना आवाज किये हुए मै निकल जाऊंगा 

जीने का जहर पिये हुए मै निकल जाऊंगा 


पुरा जमाना चिटर सही मैं रहूंगा होशोहवासमें 

कुछ ऑथेंटिक दिये हुए मैं निकल जाऊंगा 


तू प्लान करता रह मेरी जिंदगी का मर्डर 

तेरे जखम सिये हुये मै निकल जाऊंगा 


श्रीधर तिळवे नाईक

माझा भावनिक उमाळा कुशलतेने आवरतो 

जे उपकार विसरतात मी त्यांना विसरतो 


कशासाठी तुझी सांग पत्रास मी ठेवावी 

तू असा माणूस जो माणसांना फक्त वापरतो 


तुझे सूर्य सुद्धा तू चंद्रातून बाहेर काढणार 

क्रांती म्हणताच मी तुझा प्रकाश थरथरतो 


असे छप्पन लोक झाले कुणाच्याच बाजूने नसतात 

ज्यांचा ठामपणा लवचिक 

व्यवस्थेला सतत घाबरतो 


मित्राच्या वेशामधला तू उत्तम शत्रू आहेस 

उसासा माझ्याविरुद्ध ज्याचा दिवस-रात्र खंजरतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आयुष्याला माहीत नाही चूक की बरोबर 

ते जपते आणि जगते स्वतःला खरोखर


रसेल मार्क्स होते त्यांनी सुरुवात करून दिली 

मग एक होता फुले आणि एक आंबेडकर 


पोहचण्यापूर्वीच त्यांची देवाणघेवाण ठरली 

मग त्यांनी दाखवले विकायास निघालेले घर 


संताप आता फक्त झाला आहे वैयक्तिक 

फॅनसारखी झाली करते क्रांती घरघर 


ब्रम्हांड ऐकतो तेव्हा फक्त ध्वनी ऐकू येतात 

कुणी माजवले माझ्यात भाषेचे अवडंबर 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आराम से तशरीफ पृथ्वीवर जेलर ठेवत आहे 

कारण प्रत्येक कैदी एकमेकावर नजर ठेवत आहे 


धर्मांच्या भाऊगर्दीत बंधू भाव झालेत गायब 

मंदिरामधला प्रत्येक दगड मेंदूत असर ठेवत आहे 


कित्येक दशके झाली मी वाट पाहत आहे 

तलवार घरी प्रत्येक कोल्हापूरकर ठेवत आहे 


आम्हालाही कळले नाही आम्ही कधी बेसावध झालो 

आमचाच मारेकरी आम्ही घरभर ठेवत आहे 


ज्याला तेज म्हणतो आहेस ते उसने आहे बेटा 

तो सूर्य तळपता स्वतःस आभाळभर ठेवत आहे 



श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्वतःच्या आईला शूद्र म्हणणारे तुम्ही 

आणि गाईला गोमाता बनवणारे तुम्ही 


कधीतरी नीट स्वतःला पहा आरशामध्ये 

एक खूनशी वारसा स्वतःत ठेवणारे तुम्ही 


एक नंबरचे आहात आळशी आणि जड 

कष्ट करणाऱ्यांना गुलाम बनवणारे तुम्ही 


कसली भिकारडी मानसिकता आहे तुमची 

आणि तिच्यावर नाज करणारे तुम्ही 


आता तरी सुधारा विसावे शतक आले 

शतकानुशतके बैल बुद्धी जपणारे तुम्ही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुला उध्वस्त व्हायचंय मला नाही 

तुझ्या इतका मी चांगला नाही 


कोण दलदलीत आत्महत्या करतो 

आत्महत्या करण्याइतपत मी भला नाही 


आभाळालाच दिलेले आहे रिक्तपण 

आभाळाचा स्वभाव पृथ्वीकडे कलला नाही 


पृथ्वी आभाळातच फक्त सॉलिड आहे 

तिचे नशीब तिचा कंद विरघळला नाही 


माझ्या दृष्टीने मी कलदार नाणे होतो 

ही गोष्ट वेगळी माझा रुबाब चालला नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आपल्या जरी प्रेमाची गोष्ट 

जगामध्ये एकमेव आहे 

आपल्यात जे चालले आहे  

ती केवळ देवघेव आहे 


उन्हाळा इतका गरम झाला  

साऱ्या खिडक्या केल्या ओपन

शरीराच्या गर्मीत तरीहि 

डासांचेच भेव आहे 


सूर्य उगवला आयुष्याची 

झाली आहे नवी सुरुवात  

दुर्दैवाने माझ्यासमोर 

दिवसभर जुना देव आहे


कशाने होतो तो प्रज्वलित

रहस्य हे मला कसे कळणार 

आग कशाची माज आहे नि 

धूर कशाचा चेव आहे 


जेव्हा समोर माझ्या होती 

किंमत तेव्हा कळली नाही 

आता कळते आहे मजला 

ती कशाची ठेव आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी पृथ्वीच्या खुर्चीत बसून 

पृथ्वीच्या वेगाने फिरतोय 


मला सूर्य उगवताना दिसतोय 

मला सूर्य बुडताना दिसतोय 

मला चंद्र उगवताना चमकताना दिसतोय 

मला चंद्र वाढताना आकसताना दिसतोय


खंत एकच आहे 

मी पृथ्वी नाही 

मी पृथ्वीवरची केवळ एक खुर्ची आहे 

जी सत्ता उबवत बसलीये 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पळून जायला कधीकधी वाट सोडावी लागते 

इतिहासातली खोल वाईट रेघ खोडावी लागते 


असते अशक्य कधीकधी माहेरला धाडणे 

सासरलाच स्वतःमध्ये तिला ओढावी लागते 


आली असेल अरेबियामधून पण सून झाली ना 

इथे वाळवंट नाही पटवत तिला नदीत सोडावी लागते 


बुरखा वापरत असेल तर थोडे दमाने घ्या 

वस्त्र गोष्टच अशी ज्याला त्याला खोडावी लागते 


एकदमच कसे काय होतील बदल जीवनशैलीतले 

त्यासाठी प्रथम तिच्याशी नाळ जोडावी लागते 


मूळ इथली असेल पण वाळवंटात राहून आली ना 

आरण्याशी ती तुटलेली असेल तर जोडावी लागते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

वो मेरी मय्यतपे आ जाये तो अच्छा है 

झूठेही सही चार आँसू बहाये तो अच्छा है 


पता है हमे रकिबोंकी लाईन सी लगी है 

फिर भी वो हमे आजमाये तो अच्छा है  


इशारे कौन करेगा हम खडे है बहुत हुआ 

जाते जाते वोभी हाथ मिलाये तो अच्छा है 


मजहब मै भी बदलूंगा नही उन्हेभी जरूरत नही 

इन्सानियतमें घूलमिल जाये तो अच्छा है 


स्मशान मे तो सिर्फ हिंदू औरत को मना है 

बुरखा पहनकर वो हमे जलाये तो अच्छा है 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझ्या देहात मी माझा देह रिक्रुट केलाय

आता

Bbbbb 

तात्पुरते मीही म्हणतो तू दगाबाज नाही

पण हृदय बोलते हा आतला आवाज नाही 


डोळ्यांनी पाहतो म्हणून जग अस्तित्वात आहे 

अन्यथा ही धुळ धूळ हा ताज ताज नाही 


नुसते दिवे लावून रात्र बदलणारी नाही 

सूर्य आणावा लागेल नुसता आवाज नाही 


कोण तड लावतो आता कुठल्या प्रश्नाची 

तडजोड सर्वत्र आहे आणि तिचा आवाज नाही 


वर्गातला प्रत्येक जण तुलाच पाहतो आहे 

पण मी सोडून कुणाच्या नजरेत गाज नाही


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आकाश मोकळे आहे जमीन फिरते आहे 

हे जग बदललेले नवी काया शिरते आहे 


अंतराळातच आहे हवा तेवढा एफएसआय 

जमीन वाढणार नाही डोक्यात का न शिरते आहे 


उंच उंच उंच उंच बिल्डिंगा बांधत जाऊ 

हवा मुबलक आहे नि माणसात जिरते आहे 


कितीही प्रयत्न कर भिरभिर संपणार नाही

ही पृथ्वी फिरत नाही सूर्याभोवती भिरभिरते आहे 


दिवसेंदिवस पिसारा काढतो आहे पिसे 

मोराच्या जागी नेमके काय अवतरते आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी प्रेमाला बांधून मुसक्या 

आणले माझ्या घरात खरे 

सुरुवातीला झाले मुके 

आणि शेवटी झाले तोतरे 


नारळासारखी आहे म्हणून 

मी चालवला तिचा पाठलाग 

झाले माझ्या आयुष्याचे 

शेवटी कोमल टेस्टी खोबरे 


दलदलीचा उलाढालींनी 

झाला वाळवंट हा बाजार 

क्षणोक्षणी मृगजळांसही 

भयाने भरते इथे कापरे 


माझा अंगठा नि तिचे ओठ 

एकमेकांस आहे पाहत  

अजूनी स्पष्ट होत नाही कि

आणत आहे कोण पिंजरे 


मागोव्यांनी रेंगाळावे 

का ठेवू नयेत तिने खुणा 

वाटा बनल्या जरी आरसे 

हरेक जागी हजारो चरे 


श्रीधर तिळवे नाईक

ही कसली अजिबोगरीब आपल्यात साखळी आहे 

एकमेक हृदयातली झालो आपण पोकळी आहे 


मिठीत ये दिठीत ये किसची सखे झाली वेळ 

घंटी देही वाजलेली उमलणारी कळी आहे 


उगाच शोधू नकोस आता कशामध्ये काय आहे

प्रेम म्हणजे मारलेली सेक्सने कोपरखळी आहे 


जगण्याची शोधत बसू कुठे जगात मी कारणे 

जगावयास पुरेशी तुझ्या गालावरची खळी आहे 


उगाच वाट पाहू नकोस परत ते होणार नाही 

जे हृदयी उमलले ते गेले पायातळी आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझ्या मुठीत हातभर क्षण 

तरी दिसत नाही क्वांटम कण 


दुःखाप्रमाणे वळवते मान 

केस सांभाळतात सर्वांगाचा ताण 


वासनेची खोली घेत राहते आदमास 

रडणाऱ्या डोळ्यांना हसण्याचा वास 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कसे थांबवू कॉमेंट करण्याच्या चाळ्याला 

दरवेळी तुमचे उचलली जीभ लावली टाळ्याला 


फक्त गुलाब पाहून तो जातो भारावला 

चाफा अबोलीचे झाले अजीर्ण माळ्याला  


रंगद्वेषाचा प्रेमात कसा आरोप करू मी 

म्हणू दे तिला," उभा करत नाही मी काळ्याला "


कधीतरी तिला माझा आवाज ऐकू येईल 

तिच्या घोडीबरोबर जोडेल माझ्या नाळ्याला 


आपलीच पार्टी कमजोर जोर लावला पाहिजे 

मी संयम शिकतो आहे पहात हिवाळ्याला 


श्रीधर तिळवे नाईक 


( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हे असले xव असतील तर ते मेलेलेच बरे 

ज्यांनी ते तयार केले तेही गेलेलेच बरे 


किती गर्दी असावी गाईच्या एका पोटात 

त्यांना चारा देण्यापेक्षा ते गेलेलेच बरे 


यांच्यामुळेच अख्खा समाज विभागला गेला 

आख्खे राष्ट्र मरण्यापेक्षा हे मेलेलेच बरे 


जिथे बघावे तिथे हे थाटलेलेच मिळतात 

दुकानासारखे दिसत असतील तर गेलेलेच बरे 


कधी ना कधी विरुद्ध घ्यावीच लागेल ॲक्शन 

काहीच न करण्यापेक्षा काही केलेलेच बरे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुला दिसत नसेन तर मी जगात अस्तित्वात नाही 

जग म्हणेलही मी आहे पण जाणतो तुझ्या आत नाही 


कोण विसरत नाही पार्टनर जो येऊन गेला होता 

पहिले चुंबन पुसट होते ओठ पूर्वीसारखा रहात नाही 


कुठे तुझ्या घरी बोलवले तूच माझ्या घरी राहिलीस

तुझा वावर आठवतो जाणतो तुझ्या मी घरात नाही 


मी वेगळा झालो कारण मला क्रम उलटा दिसला 

कळले तुझ्या ओठात आहे ते तुझ्या काळजात नाही 


जुने वेगळे माहेर असते वेगळे नवे सासर असते 

विसरणे त्याने सोपे जाते जुने वळून पहात नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मांसाचे लाकूड शरीराचे शिशिर 

थाळीत वाढला कुणी थंड झोत 

झोपेत बांधलेले जागृत शहर 

कळत नाही पण कोण आहे खोत 


वाळूच्या रंगाचे दिसते आकाश

करू शोक की करू मी आनंद 

चांदी आवरून शोधावे सोने 

तर लागते हाती तांब्याचे कंद 


डोळ्यांच्या वस्तीत रोजच पाहुणी 

दिसे ही देखणी वावरात वावर 

आपलाच पोपट आपणास म्हणे 

हिरव्या रंगास मुकाट आवर


नाहीसे होणारे शेवटचेच भय 

हाताचे धाडस वाजणारा छल्ला 

पडलेला पाऊस हलणारा ऊस

शरीरात उरलेला मातीचा कल्ला 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

विचित्र घरंगळ मळलेले मार्ग 

बोट ठेवावे तिथे अंत: स्फोट 

भुवई उचलते मुलायम मृगजळ 

पापाचे आवाज खेचतात लोट 


फुलांचे तरंग नि त्यांचे सुगंध 

रस्ता क्रॉस करत नाकात ढग 

आवेगांची वाढ वेगांची मंदता 

तरी आर्त जागी बागेची रग 


ओलांडला कुणी वासनेचा उंबरा 

छायेचा कुणी दिला धडाका 

हृदयाच्या जागी आजही ऐकतो 

घरी झालेल्या खुनाचा तडाखा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


त्यांची सनातन दया 

लागते मज पुढे गावया 


मी करतो गयावया 

आता गायन थांबवूया 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वादळात कोण थांबतो 

ज्याचा जीव आंबतो


झाडत होतो त्वचा 

गळली करत वचावचा 


एकच झाला कल्लोळ 

चालत आला गल्लीबोळ 


मी काशीला निघालो 

महाद्वार रोडवर सापडलो


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शुभ्र कोळ्यांचा बर्फ 

हवेत हंसांचे वादळ 

कुणी गाठावा आता 

अशा पावसाचा तळ 


नग्न देहांचा कापूस 

नजरेचा निघे वेळू 

ज्याने त्याने निवडले 

एक शिखर आळूमाळू 


एक सफेद जंगल 

बने सकल एक वृक्ष 

हिमालय एकल नक्षी 

जणू धरतीचा वक्ष


पिऊन पांढरे पांढरे 

पडलो शुभ्र पांढरा 

वाटले की ऋतू आहे 

गेला मनुष्य तरातरा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कशास हवेत भरजरी घण

मामुली धातू त्यांचे स्फुल्लिंगघन 

उन्हाची भट्टी मोजकी झाडे 

हिवाळा आण वाचव वनक्षण 


जितके ओले तितके अग्नीपूर 

कसले सुख जिथे क्रौर्य भरपूर

नाण्यांचे आवाज दागिन्यांचा जोर 

प्रत्येकात भरलेला आकांतकापूर 


हरेक भिंती चिरलेली किंचाळी 

त्यापेक्षा बऱ्या मुंबईच्या चाळी 

लगद्याचा माज भूतकाळ आवाज 

दुरून बघायच्या शोभिवंत थाळी 


मांस हे उथळ खोटेच रक्त 

संपवून टाक खानदानी आत्मा 

तूच कर असेल जर आत परशु 

प्रत्येकाचा संपूर्ण खात्मा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जखमांच्या काठी 

वाहते नदी 

शरीराच्या गाठी 

जशा सती 


वाजणाऱ्या बांगड्या

सुन्नसा पदर 

गोलावलेले पोट 

खिन्न नजर 


कामाचा शिण 

अंगावर घाम 

गर्भवती तरी 

काम तमाम 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझेच ना कान टोचलेले 

एक मोरपीस खोचलेले 

प्रकाश साक्ष कृष्ण मागतो 

भग्न अंधार बोचलेले 


तव हाताची विशाल झेप 

स्वतःच मारते पृथ्वी खेप 

हादरणारी नाळ तिची 

थरथरणारी गुळाची ढेप 


दुःख आढावा घेण्यासाठी 

मालवलेला दैवी दिवा 

तिलाही आता कळत नाही 

मनुष्य हवा की देव हवा? 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कसे पोहावे घेऊन बीज 

समुद्र वीज भवताली 


कोणी नाही नाही कुणीच 

तरीही नीच हालचाली 


नग्न पुटपुट नाही थांबा 

माझा आंबा पुढे पुढे 


काल कुटाची पुढे एक कुपी 

सूर्याची ढुशी चोखावते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ऐकताना खूप काही 

तुझे बोलणे आतोनात 

एक खोटे एक खरे 

एक खोल आत आत 


एक ॲपल मोदक पल 

एक भेट सुगंधलेली 

एक पाद एक पद्म 

सापासाठी खुळावलेली 


एक टेबल एक खुर्ची 

एक बाग वटवृक्ष 

तुझाच वट सार्वत्रिक 

तुझ्याजवळ एक वक्ष 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आयुष्यात तिची हवा आहे 

अंगावर जणू दागिना आहे 


गुलाब त्यालाच सुटेबल होतो 

त्वचेवर ज्याच्या पसीना आहे 


कोल्हापूर नाही व्यवसायिक 

खजिन्याचा तरीही दावा आहे 


हत्तीही रिटायर केला गेला 

राजेशाही तरीही रस्ता आहे 


पाण्याच्या हृदयावर तरंगते प्रेम 

ती आहे ,आहे मी रंकाळा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मेघांनी गर्जना केली समुद्र रोमांचित 

इतकाच प्रश्न नदी होणार का रोमांटिक 


हास्याने सांगितले अद्याप कळी आहे 

तिला झाडावरच राहू द्या ठेवेल टवटवीत 


लावावेच लागतील बाभळाचे काटे 

होईल त्यानंतरच सर्व काही ठाकठीक


विल्हेवाट वाटांची लागत आहे साऱ्या 

जंगलाचीही पाळी जेव्हा होईल बातचीत 


ही माणसाची जात हिला हिंसेचा रोग 

हिला माहीतच नाही शांतता निपचीत 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शान आणि शौकत ठोकाठोकीत 

मी का चालून आलो या गावकीत


गावातली कटपुतली झालो नाही 

माझे पटले नाही माझ्या भावकीत 


मी तिच्या नाकात झालो तल्लीन

प्रत्येक श्वास झाला माझा चकचकीत 


वसंत मुलगा की मुलगी की ऋतू 

ठरवता आले नाही कधी वार्षिकीत 


अचानक एक देवमासा उसळला 

अवघा समुद्र झाला टवटवीत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


फेब्रुवारी महिन्यातील बाळबोध संपलेले आहे महिन्यातील बाळबोध कविता 























कम्युनिझम सोडला त्याची गोष्ट श्रीधर तिळवे नाईक 


मी मार्क्सविरोधी आहेस

एवढे एक कारण सुद्धा 

मार्क्सवादी लोकांना पुरते 


मी श्रमिकांच्या बाजूने आहे 

हे मात्र त्यांना 

पुरेसे वाटत नाही 


जणु श्रमवादाची सुरुवात 

मार्क्स पासून होते 

जणू मार्क्सच्या आधी श्रमिक अस्तित्वातच नव्हते 


मी वाईट वाटून घेत नाही 

किंवा माझी साईट सुद्धा बदलत नाही 


श्रमिकांना थेट गाडणारी वर्णव्यवस्था

आणि श्रमांना थेट गाडणारी वर्ग व्यवस्था 

यांच्यात फरक काय 

हेच मला अजून कळत नाही 


सत्तेचा सोस कोणाला नसतो 

ही द्राक्षे कितीही आंबट असोत

पण प्रत्येक कोल्ह्याला 

त्यांची बागायती करायची असते 


कोणाला ज्ञानाची 

कोणाला व्याप्तीची 

कोणाला संपत्तीची 

प्रत्येकाला द्राक्षे हवी आहेत 


कितीही पेट्या येवोत 

तोंडच इतके अवाढव्य की 

कितीही पेट्या बसतात 

पोटच इतके मोठे 

की तृष्णा संपत नाही 


आता तर काय 

द्राक्षांच्या पासून दारू बनवण्याची कला अधिक विकसित 

अख्खी जमीन द्राक्षासकट घशात घालण्याची कला विकसित 

पोटातल्या पोटात द्राक्ष शेती करण्याचे उद्योग 


द्राक्ष सॉलिड दारू लिक्विड 

आता फक्त हवेतली सत्ता अस्तित्वात आली म्हणजे झालं 


सगळ्यांना गॅसवर ठेवायला मोकळे


हे सर्व करायला श्रमिक हवेत श्रम हवेत 

म्हणून त्यांनाच पोटात घेण्याची तयारी 


जो तो आब राखून राबवतोय 


जो स्वतः श्रमिक होता 

त्यालाही सत्ता हवी 

त्यालाही चान्स मिळाला 

की तोही सत्ताधारी 

आणि पुन्हा तेच 

द्राक्ष शेती आणि दारू 


सर्वांचाच सत्ता हा खरा शत्रू 

आणि सर्वांनाच सत्ता हवी 

कारण सत्ता हीच खरी मित्र 


एका परस्पर विरोधातून 

सुरू होणारी वाटचाल 

सुरू असलेली वाटचाल 


अख्खा शेतकरी कामगार पक्ष 

बैलगाडी सकट गिळला या लोकांनी 

एक संपूर्ण गाडा 

पोटात नाहीसा झाला 


आर्थिक क्रांती करायला निघालेल्यांचे दिवाळी निघाले 

आणि ज्यांच्यासाठी धडपडावे 

ते दिवाळीचा बोनस मिळाला म्हणूनच खुश 


श्रीधर राव 

निघा मार्क्सवादातून बाहेर 


जोवर तृष्णा आहेत 

तोवर फक्त एकच वाद आहे तृष्णावाद 


तेव्हा तहानेत जाऊन बसा 


अन्यथा तहाच्या वाटाघाटी 

तुमच्या आयुष्याचे टेबल करतील 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुम्ही माझ्याविषयी काय समज करून घेता

आणि काय गैरसमज करून घेता 

यावर अवलंबून नाही माझ्या असण्याची सत्यता 


मी आहे पाण्यासारखा 

आभाळाच्या गाण्यासारखा 

आणि तिळवे भांडार मधील वाण्यासारखा सुद्धा 


माझा श्वास वारा वेचतो 

जणू हवेची पडलेली फुले 


माझा मणका बासरी वाजवतो 

जणू जखमा म्हणजे बासरीची भोके 


माझा चेहरा मुखवटे नष्ट करतो 

जणु भुवई म्हणजे खोटे नष्ट करण्याचे फावडे 


माझे ओठ 

भाषेला दमायला लावतात 

माझी जीभ

अर्थाला खोकायला लावते


माझा स्वतःच्या अस्तित्वावर ठाम विश्वास आहे 

आणि मला हेही माहित आहे 

की मला आत्मा नाही 


मी मनाला गोंजारत नाही 

पण ते जेव्हा सश्यासारखे उड्या मारत जाते 

तेव्हा ते नेमके कुठल्या झाडाखाली झोपणार 

हे ओळखून 

मी कासव बनतो 


मी शेख चिल्ली आहे 

ज्या अहंकाराच्या फांदीवर मी बसलो आहे 

तीच तोडण्यास व्याकुळ 


तुम्ही काय म्हणता 

तुम्ही काय बोलता 

हे मी पाठीवर 

पाठलागाचे मोनोलोग म्हणून पेलतो 


तेव्हा चर्चा करत राहा माझ्याबद्दल 

निंदानालस्ती हीच अद्दल आहे असे समजून 


मला फरक पडत नाही 


मी तो घोडा आहे 

जो स्वतःच्या शरीरातच 

अश्वमेध साजरा करतो आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सैतान वाढण्याआधीच गाडणे आवश्यक असते

त्याला पक्षातच पाडणे आवश्यक असते 


कुठल्याही काळात हिटलर येणारच असतो 

त्याला आधीच ताडणे आवश्यक असते 


नाझी येणारच असतात भारावून जाणारे

त्यांना कबरीत धाडणे आवश्यक असते


वाळवंटाची जंगले वाळू वाढवत नेतात

वाळूंची बीजे उखाडणे आवश्यक असते 


केवळ लाल रंग पाहून खुश होऊ नकोस 

लाल सैतान ही ताडणे आवश्यक असते


नदी विषाची असो की अमृताची वहात राहते 

पाण्यातील विष काडणे आवश्यक असते


महाकाव्ये लिहिली जातात शोषण संस्थांकडून 

पोहचण्याआधीच ती फाडणे आवश्यक असते


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माझा विश्वास चुकीचा होता ना दुःख आहे ना आनंद 

ओळखीचाच धोका होता ना दुःख आहे ना आनंद 


खूप उशीर लागला मला तुला पूर्ण ओळखण्यासाठी 

फॉल्ट माझ्या डोळ्याचा होता ना दुःख आहे ना आनंद 


झोप देऊन जागणाऱ्या रात्री सारखी आलीस गेलीस

पोर्णिमेचा दिलासा होता ना दुःख आहे ना आनंद 


शोक करायचा तर तुम्ही कशाचाही तो करू शकता 

खोटा होता पण मजा होता ना दुःख आहे ना आनंद 


तू तुझ्या आता वाटेने जा मीही माझ्या वाटेने चाललो 

चाललो तेवढाच रस्ता होता ना दुःख आहे ना आनंद 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

फोटो नको त्याचा आरसा बनव 

आत्मसात कर त्याचा विचार वारसा बनव 


तो महान होता सांगून काय फायदा 

आचरणात आण त्याला आरसा बनव 


नुसतीच मिरवणूक काढत नको बसू 

काळजातली वर्तणूक त्याचा वारसा बनव 


गुलाल उधळायला काय अक्कल लागते 

विवेक गोळा कर त्याला वारसा बनव 


त्याने निर्मिक आणला तू स्वतःच बन 

नवे निर्माण कर त्याचा आरसा बनव 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आत कोण बोलतो आहे 

माझा मेंदू सोलतो आहे 


अफवा की सत्य पाठीत

एक नाग डोलतो आहे 


तोही झोलर ? कळेना 

कुठे कुठे झोलतो आहे 


प्रेम करताना शांत होतो 

प्रेम संपले बोलतो आहे 


कधीपासून एक मेकॅनिक 

आत एकांत खोलतो आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

झोप लागते पण थकवा उरतो

तू मला दिलेला चकवा उरतो


जातो शाळेसमोरून परततो घरी

माझ्यात कोणी ओणवा उरतो 


खूप विचाराचा जमतो पाचोळा

वाऱ्याबरोबर उडतो गारवा उरतो 


सर्व काही छानचा बहाना बाहेर 

आत जशाचा तसा नागवा उरतो


प्रयत्न करूनही फिक्स होत नाही 

आयुष्य चालते पण लकवा उरतो 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

बघता बघता देशाचा सत्यानाश झाला 

ज्याला क्रांती समजलो तो पाश झाला 


चेहरा तर प्रचंड सभ्य घेऊन आले होते 

इतका फास्ट सभ्यतेचा कसा नाश झाला 


दावा प्रत्येकाचा आम्ही वेगळे आहोत 

सळसळणारा चेहरा का इतका हताश झाला 


का सर्व लोक होते मुडदे म्हणूनच जन्मले 

मग जिवंत काय होते ज्याचा विनाश झाला 


शेवटी सगळे नागरिक भिकेला लागले 

समता प्रस्थापित विषमतेचा नाश झाला


चल आता आसमंत हाही सोडून जाऊ 

दिलासा हाच की हळूहळू नाश झाला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मला कुठे हवा आहे संपूर्ण समुद्र तुझा 

 पुरा आहे तहानेस माझ्या हौद तुझा 


अजूनही समजतेस मला का समस्या

का बनलो आहे मी परमनंट प्रश्न तुझा 


समस्त हे जग तुला दिसते आहे सभ्य 

मी का वाटतो आहे तुला गुन्हेगार तुझा 


तुझी काळी गाय तुला सफेद दूध देते 

काळ्या रंगाचा नाही जात न्यूनगंड तुझा 


त्यांनी मोजून मारल्या मला दहा पैजारा 

मी यातच खुश की कासावीसला जीव तुझा 


म्हणतेस म्हणून का मी त्यांची माफी मागू

राहिला पाहिजे सतत तोरा उंच तुझा 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

चाँद-माधवीचे प्रदेश श्रीधर तिळवे

गझल ७ =७ =७ =४ =६ =४ 

अजब आली आहे स्थिती थांबवतही नाही पळवतही नाही 

 कशी ह्याला द्यायचि गती थांबवतही नाही पळवतही नाही      


चुंबनाचा काय आहे अर्थ तुझ्या धर्मात पुण्य हे कि पाप  

मधुबाला कि शोधू रती थांबवतही नाही पळवतही नाही 


घेऊन तर आलीयेस मशीदीच्या दारी प्रेमाने मजला  

नमाज पढू का आरती थांबवतही नाही पळवतही नाही


तुला दुरून पहायचं कि मी तुझ्यात काही पेरायचं आहे ?

तुला चाँद म्हणु कि धरती थांबवतही नाही पळवतही नाही 


काफिरावर केले प्रेम कयामतीस गुन्हा हा आहे कि पुण्य 

प्रश्नांनी सर गरगरती थांबवतही नाही पळवतही नाही 


 

श्रीधर तिळवे 

(बाळबोध कविता ह्या संग्रहातून )

तू येशील घेऊन सुरा 

तर मीही घेइन तलवार 

तू असशील तिचा भाऊ 

मीही आहे तिचा यार 


ती आहे तुझी बहीण 

निघणारच तिची वरात 

मग बिघडले आहे कुठे 

जर आली माझ्या दारात 


वाचू दे तिला कुराण 

मी कधी नाही म्हणालो 

तिच्या प्रेमात मीही 

मजनू होऊन जळालो 


मी मुलखाचा नास्तिक 

ना नमाज ना मला आरती 

तिला पाहून मला येते 

इमोशनल रक्तभरती 


कशाला येतो आडवा 

मी होणार नाही सरळ 

जर तू वापरशील बळ 

तर मीही वापरेन बळ 


तेव्हा तुझ्याच हातात

तुझ्या घराची चंद्रलाज 

हे आहे हळवे प्रेम 

ह्याला समजू नको माज

 

श्रीधर तिळवे 

(बाळबोध कविता ह्या संग्रहातून ) 

तयारी श्रीधर तिळवे 


पाहण्याची नुसता बुरखा

मजला नाही सवय 

मी तर वयात आलो

आता तुहि मोजावे वय 


अंगणात खेळण्याचे 

दिवस आपले संपले 

खेळणी सारी मोडली 

खेळही सारे खपले 


ज्या ज्या भिंती आडव्या 

त्यांना नीट वाचावे 

घरातील आबोहवेस 

श्वासांनी हाताळावे 


मारण्याआधी उड्या 

तू मोज आतील दऱ्या 

ऐनवेळी सुटेल कंप 

होतील खारका खाऱ्या 


जर झाली असेल तयारी 

मी घेऊन येतो घोडा 

मी गोळ्या भरून घेतो 

इशाऱ्याचा वाजव तोडा  


श्रीधर तिळवे 

(बाळबोध कविता ह्या संग्रहातून )


अता अता तर होतीस 

तू येण्यासाठी तयार 

इरादा फिरला कोठे 

कुठे आत जिरलि तलवार 


एहसास अस्सल होते 

होते काय कमअस्सल 

कि खौफ घुसला रक्तात 

काळजात घुसली अक्कल 


घोड्याचे ह्या काय करू 

 माझ्याच भेज्यात ठासू ?

बनायचे न्हवते सपना 

का केले मजला वासू 


च्यायला कोल्हापुरात 

येडा एक मीच निघालो 

वारुणीला पिता पिता 

ओठांचे जहर प्यालो  


बरे झाले मेला राजू 

हळवेपण त्याचे मेले 

जाते जे पायावरून 

त्याच्या हृदयावरून गेले 


श्रीधर तिळवे 

(बाळबोध कविता ह्या संग्रहातून )

असेल बाई असेल माझीच वस्ती वाईट असेल 

चाललेली दिवस रात्र तिथे सतत फाईट असेल 


नसेल बाई मलाच कुणी सभ्यता शिकवली नसेल 

माझ्या प्रत्येक शब्दामध्ये असभ्य बाईट असेल


असेलही तुझे कॅलेंडर आमच्यापेक्षा वेगळे असेल 

ज्यास आम्ही डे समजतो तिथे तुझी नाईट असेल 


काय आहे स्टॅम्प पडतो आणि मग वापरला जातो 

कळत नाही काय रॉंग आणि काय राईट असेल 


तुझा सभ्य चेहरा घेऊन तू सभ्य अंधारात रहा 

मी माणूस रस्त्यावरचा नि रस्त्यावर लाईट असेल 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पुढं बोल मी जनावर आहे 

थोडी ओल अनावर आहे 


आहे कोल्हापूरी त्याचे काय 

जगणे माझ्या मनावर आहे 


सापडणार नाही शोधूनही 

खूप खोल जनावर आहे 


धंदा चालेना वैतागलो आहे 

तुझ्याही चिडलो स्तनावर आहे 


मूडप्रमाणे सूड चालतो 

डिपेंड घणावर किं घनावर आहे  


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुमची मी गय करतो कारण तुम्ही मास्तर आहात 

तळपायाची आग मस्तकी जाते पण तुम्ही मास्तर आहात 


तुम्ही असे एकटेच ज्यांनी कानाखाली वाजवली 

आजही वाटते एकदम भीषण पण तुम्ही मास्तर आहात 


खरा प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही मला दाखवला इंगा 

प्रॉब्लेम, इंगा विनाकारण पण तुम्ही मास्तर आहात 


तुम्हाला समोर पाहून माझी आत बुल्ली अवघडते 

सल झोंबतो होते ठणठण पण तुम्ही मास्तर आहात 


मारून वरती हुशारकी मारली राजाला कसा ठोकला 

तुम्हाला उलटे ठोकले असते पण तुम्ही मास्तर आहात 


परतफेड केल्याशिवाय कुणासही तसेच सोडणे 

जीवावर येते दडपण पण तुम्ही मास्तर आहात 


त्यापेक्षा असे करा ना मास्तर मला टाळून जा 

कशाला रोजची तणतण का पण तुम्ही मास्तर आहात ?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

एका हातात त्यांच्या गुलाब एका हातात सुरा आहे 

कळत नाही कोणता खोटा आणि कोणता खरा आहे 


ठरले आहे कसा करायचा तुझा कार्यक्रम आधीच 

मात्र अजून ठरत नाहीये कोणता बेत बरा आहे 


ते तुझे नेते आहेत हीच तर तुझी बद नशीबी

ते स्वतःला उजवे समजतात आणि तू डावरा आहे 


तू आहेस नदीसारखा वाहताना एकदम निर्मळ 

त्यांचा प्रॉब्लेम हाच की त्यांचा नळही तोतरा आहे 


ते कारस्थानेच करणार तू त्यांना कितीही सांभाळ 

आणि तुला कळणार नाही स्वभाव की हा नखरा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पाणी गळी कसे उमलते 

तहानेचे मिटते कमळ 

तळमळतो मनाचा मासा 

कोणी आहे टाकला गळ 


मुळात तहान का लागते 

तहान मोठी की जिज्ञासा 

कोण कासव असते यात 

आणि कोण असतो ससा 


की केवळ मशीन सारखे 

तहान लागता पितो पाणी 

की शोधतो आहे चप्पल 

जे स्वतःच आहे अनवाणी 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काळजी सततच करणे 

आणि तरीही न दाखवणे 

भ्यालेले एक जग आतील 

लपवणे तरी पाठवणे 


दारासिंग हवा कोणास

मी स्वतःच आहे पैलवान 

मी आई वरती गेलो 

बरे झाले टिकली शान 


गहनतेत एक शहाणपण 

जशी बोटांमध्ये वीज 

कोण हसतो बळी देताना 

तुझी अस्वस्थ काटक नीज


मी मुलगा तुझा म्हणूनी 

तुझ्याशी कसे वागावे 

तुझे ओठ जेव्हा थकतील 

मी स्माईल तुझे उचलावे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

चढताना माझ्या दिशेने 

माझ्यावर

पलंगावर 

तू केलीस एक खेकडा 

मग दुसरा 

आणि थांबलीस 


तिथेच मी ओळखले 

तू आळशी आहेस 


मी पळून आलो 

कामसू उंदरासारखा 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

परतलोही असतो पण तुझ्या डोळ्यात ते प्रेम कुठे आहे 

ज्या कपाळावर मी ओठ ठेवले होते ते नशीब कुठे आहे 


जेव्हा बघावे तेव्हा तू फक्त माझ्याकडे मागतच असतेस 

नमस्कारासाठी जुळावा असा तुझ्याकडे हात कुठे आहे 


साऱ्याच गोष्टी तुझ्या तशा वजनाने खूप हलक्या होत्या  

काळीज जमिनीवर ठेवेल असे तुझ्याकडे वजन कुठे आहे 


हा काळ असा आहे जिथे जंगलाची सुद्धा गॅरंटी नाही 

तू तर फक्त झाड आहेस तुझ्याकडे सरकार कुठे आहे 


तू तर फक्त पाणी आहेस आणि तेही एका भांड्यातले 

आग विझवता आली असती पण मोकळीक कुठे आहे


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दुकान बंद होताना श्रीधर तिळवे नाईक 

एकेक जुना मित्र गळाया लागला 

माझी गरीबी पाहून पळाया लागला 


आरोप येऊ लागले माझ्यावर बेशिस्तीचे

जो तो माझ्यावर खवळाया लागला 


माझे काय होणार तेच कळत नाही 

ज्याला निवडावे तो मला वगळाया लागला 


दुकान बंद करून मुकाट नोकरी कर 

मध्यमवर्गीय सल्ला आदळाया लागला 


धंदा मोडीत म्हणजे स्वतःला मोडीत काढणे 

पुन्हा उगवण्यासाठी मेंदू मावळाया लागला 


हेही कधीतरी दिवस निघून जातील 

जरी प्रकाश आता मान आवळाया लागला


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

यश दिसावे लागते लोकांना डोळे असतात 

उंच उठावे लागते लोकांना डोळे असतात 


काहीतरी असते जे खाजगी ठेवावे लागते

घर बांधावे लागते लोकांना डोळे असतात  


जो तो घाबरलेला आतल्या आवाजाला 

काळीज दडपावे लागते लोकांना डोळे असतात


बुरख्याआड तुझे मन लपवतेस की शरीर

आत डांबावे लागते लोकांना डोळे असतात 


वस्तुस्थिती अशी आयुष्य जगायला घाबरतेस 

ते लपवावे लागते लोकांना डोळे असतात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

वरून पाणी आलं 

थेट नारळात शिरलं 


खाली आलंच नाही 


आता विहिरी कोरड्या 

आणि नारळात पाणी 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

वस्तुस्थिती अशी की जगणे अशक्य आहे 

इतके टोकाचे दारिद्र्य निभावणे अशक्य आहे 


या झोपड्या गरिबीच्या सर्वत्र सांडलेल्या 

या असल्या समाजामध्ये राहणे अशक्य आहे 


दोन वेळची भ्रांत आहे इथे जगण्यामध्ये 

मला तत्त्वज्ञानावर बोलणे अशक्य आहे 


तो एकटाच आहे आणि तोच श्रीमंत आहे 

त्याचा हा माजोरडेपणा पेलणे अशक्य आहे 


एकतर आत्महत्या करावी वा व्यवस्था संपवावी 

याशिवाय दुसरे काही करणे अशक्य आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मुझे ए जिंदगी तूने हमेशा आईना दिखाया 

जब भी दिखाया मेरे बदनसीबीका किस्सा दिखाया 


मुझे किसींभी रिश्तेसे अब कोई उम्मीद नही 

हर रिश्तेंने मुझे यहाँ रिश्तोंका तमाशा दिखाया 


श्रीधर तिळवे नाईक

भेटेल तेव्हा तो काढत असतो माझी लायकी 

धुक्यात वावरतो जेव्हा चाचपतो माझी लायकी 


कधी म्हणतो नक्कीच तू ब्राह्मण माझ्यासारखा 

आंबेडकर हाती दिसता विझवतो माझी लायकी 


अचानक त्याला दाट संशय मी नक्कीच महार आहे 

घरी बुद्ध दिसत नाही फेटाळतो माझी लायकी 


अचानक मग साक्षात्कार अरे याची जैन गल्ली 

जैन जैन म्हणत नाहीत डळमळवतो माझी लायकी 


आता त्याला संशय नक्की आदिवासी तेव्हापासून 

प्रत्येक पूर्वज त्याचा शोधतो माझी लायकी 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मेरे गम की फिकर ना कर हैं तुझे कितनी फिकर जानता हु मै 

ये और बात है कि फिर भी तुझे बहोत करिबी दोस्त मानता हू मै 


श्रीधर तिळवे नाईक

झाड अजून तरी हिरवं दिसतंय


उद्या कदाचित माणसाची सावली पडून 

ते स्वतःच्या सावलीसारखं दिसू लागेल 


झाडाने झाडासारखं राहावं 

म्हणून मी काय करावं 


झाड म्हणते 

मी एकट्यानं नाही टिकू शकत 

मला टिकवायचं तर जंगल टिकवावं लागेल 


जंगल टिकावं म्हणून 

मी काय करू शकतो ?


मी २४ तास जंगलाला चिपकलो 

तर जंगल टिकेल काय ?

की मलाही झाड टिकवणाऱ्या 

टिकवू पाहणाऱ्या 

माणसांचं जंगल करावे लागेल करावं लागेल?


मी हिरवी शिळ घालतोय 

माझ्या प्राणातून 


मला खात्री आहे 

माणसांच्या आतील झाड 

अजून बधिर झालेलं नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मला वाटली लाज आहे पण तो तुझा संयम होता 

फुकाची वाट पाहत राहिलो माझ्यातच एक यम होता 


असे नव्हते कि जिवंत नव्हते ठेवायचे मला अपुले नाते 

तरीही ते मेले आपसूक जरी नात्यात दम होता 


तू हवीशी मला होतीस तुलाही मी हवा होतो का 

चाचपण्यातच दहावी सरली प्रेम खुळखुळा छमछम होता 


वाटले चापलीन आयुष्य आणि आहोत आपण भटके 

आता कळते जीव डुप्लिकेट राज कपूर डम डम होता 


एक दिलासा काही वर्षे कोल्हापुरात राहणारहेस 

तोही गेला अळवा वरचा थेंब कापरा चमचम होता 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कॅमेराने सर्वांनाच एक्सपोज केले 

लोक दाखवण्यासाठी जगत होते सिद्ध केले 


कुणालाही कुठल्याही देवाविषयी नव्हते प्रेम 

प्रत्येकाने नवस म्हणून देवाशी डील केले 


लग्न सुद्धा दाखवण्याचा एक सोहळा बनला 

ज्यांना दाखवायचे आहे त्यांनाच फक्त निमंत्रित केले 


जन्मलो तेव्हा माझी वाढ बहुदा नीट दिसली नाही 

मग प्रत्येक जन्मदिवशी माझे साजरे वाढदिवस केले 


मला वाटले मेल्यानंतर माझी सुटका होईल

पण नीट फोटो यावेत म्हणून त्यांनी स्मशान स्वच्छ केले 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शरीरातून उमलतात हाका ओल्या 

माहित नाही त्यांना किती खोल्या 


वाडा तर बांधला गेला आहे जन्मतः 

विटा म्हणून लागल्या कित्येक बोल्या 


दिसत नाही पण वावरते प्रचंड पाणी 

ओलेत्या फिरत असतात भगव्या अबोल्या 


प्रत्येक जिवंत उगम मातीत की प्रकाशात 

कश्यापासून बनवतात माणसांना मासोल्या 


मी आता घरांना ओळखावे कसे 

प्रत्येक दारावरती फुले आणि फोल्या


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शेवटी पुन्हा परंपरेचा विजय झाला 

जातीने इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घेतला 


कित्येकदा त्यांनी मला शेत दाखवले 

कित्येकदा मीही माझा खरा श्वास घेतला 


मला ते म्हणाले कोल्हापूर शहरात गायब होशील 

माहित नाही शहरात देह वितळला की आत्मा वितळला


मला वाटले होते निदान शहरात तलवार गायब असेल 

सत्य तेव्हा कळाले जेव्हा माझा शर्ट एका वाराने कापला 


अजूनही कळत नाही मी माझ्या जातीचे काय करू 

जेव्हा जेव्हा हा गड टाळला तेव्हा तेव्हा किल्ला उगवला 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू काय बळकवणार माझा देह

तुझ्याविनाही सहसळणार माझा देह 


मोहक कटाक्षाने भुलणारा मी नाही 

तुला सहज टाळून निघणार माझा देह 


तो लागोपाठ मला हरताना दिसतो 

तरी त्याला प्रेमाने कवटाळणार माझा देह 


काय इतके फोनवरती गुप्त बोलत होतीस 

विचार करून करून फुटणार माझा देह 


मुळात तू आधी असे विधान का करावे 

जेव्हा जेव्हा भेटशील अवघडणार माझा देह 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


इंद्र पुन्हा पुन्हा 

आपल्या घोड्यांच्या कडे जात आहे 


त्याच्या एका घोड्याचे नाव हरी आहे 

आणि तो त्याचा घोडा आहे 


इंद्राला खरे तर कंटाळा आलाय 

पण हरीने बोलवले की 

त्याला जावे लागते 


त्याच त्याच लढाया 

तेच ते शत्रू 

आणि तीच तीच शस्त्रे 


केवळ कंटाळा घालवण्यासाठी 

तोच तोच सोमरस 


स्तुती गाणारे ही तेच तेच 


त्याला व्हरायटी हवी आहे 

पण पुरवणार कोण 


एकेकाळी तो म्हणायचा 

राजा असणे म्हणजे सर्वात मोठे थ्रिल 

कायम पास होत राहते लोकप्रिय राहण्याचे बिल 


युद्धात तो मारला गेला तरी त्याला माहित आहे 

त्याची जागा नवीन इंद्र घेईल 

आणि इंद्राणीचे सुद्धा काहीही अडणार नाही 


स्वतःच्या देशालासुद्धा स्वर्ग म्हणून म्हणून त्याला कंटाळा आलाय 


जर देश स्वर्ग असता तर 

इतक्या प्रार्थना रचायला कशाला लागल्या असत्या ?


देश नीट चालत नाही 

तेव्हा प्रार्थना प्रचंड वाढत जातात 


तो बघतोय 

आपल्या नावाने 

यज्ञ प्रचंड वाढत चाललेत 


त्याला कळत नाही 

आपल्या लोकांचे आपल्या भक्तांचे हे प्रेम आहे 

की इन्सिक्युरिटी ? 


खरे तर 

प्रत्येक यज्ञ फळेल 

याची गॅरंटी त्यालाही उरलेली नाही 

तरीही तो गॅरंटी देतोय 

कारण त्याला भय आहे 

लोक यज्ञ बंद करतील 

आणि आपल्याला कायमचे विसरतील 


त्याला माहित आहे 

लोक ही प्रचंड लहरी जमात आहे 

ती कधीही पाठ फिरवू शकते 


तो सध्या सर्वत्र फुलतोय आणि फळतोय 


यज्ञतोय आणि पावसासारखा कोसळतोय 


असे म्हणतात की 

ज्यावेळी सलग दुष्काळ येतील 

त्यावेळी इंद्र देश सोडून निघून जाईल 


लोक यज्ञ ही करतायेत 

आणि इंद्र देश सोडून जाईल म्हणून वाट ही बघतायेत 


कोणालाच कळत नाहीये 

देशात काय चाललय ?


जोवर देश चालताना दिसतोय 

तोवर जिवंत आहे असं समजा 


ऐकून आहे 

देश सर्वांना चालताना दिसेल असे डोळे 

सर्वांनाच मोफत वाटण्यात येणार आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सगळं ठीकच आहे तू म्हणतेस तर 

जग चांगलेच त्यात तू असतेस तर 


असे नाही मी भाषिक प्रगल्भ आहे 

मला कळतच असणार तू बोलतेस तर 


दुःख मागून काय पुढून आले काय 

मला दिसत नाही तू दरवळतेस तर 


बघता बघता बागांचे अत्तर झाले 

मी प्रदूषणावरही खुश तू हुंगतेस तर 


मी हिवाळ्यातही असतो पेटलेला  

सर्वच गरम असते तू वावरतेस तर


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)



जो विचार करतो त्याला 

तुझ्या भावना कळत नाहीत 

तो उभा तुझ्याच दारी 

त्याच्या इच्छा बसत नाहीत 


वासनांचे होतात ढिले 

लपलेले त्वचेतील स्क्रू 

तुला वाटते एकटा आला

सोबत घेऊन येतो क्रू 


लाटावरती येती लाटा 

तरीही एक असतो समुद्र 

रक्तातल्या रक्तात गायब 

ना आढळते देहात युद्ध 


तुला कळतही नाही कधी

झाला होता कि नाही वार

हातावरती देऊन तुरी 

अवघे शेत झाले पसार


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सुरुवातीला होती बाग 

मग गेली बनत ती जंगल 

कळले ना कधी झाले 

माणसाचे त्यात शुभमंगल 


जंगल नष्ट होत आहे 

कदाचित होईल पुन्हा बाग 

पुन्हा एकच ऍडम उरेल 

एक ईव्ह आणि एक शाप 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

विझलेले दीप उराशी 

विजलेले सुन्न आभाळ 

पाहून किती पाहणार 

दूरवरचा पल्लेरी माळ 


गुरे परतली घरात 

पशुपतीचे झिजले नाणे 

परतायचे ज्याला होते 

गेला गाऊन घेऊन गाणे 


रात्रीचे नि:शब्द अहंकार 

सूर्य बुडाला गणपतीत 

दारुडे रात्र काढती 

अल्कोहोलिक काळोख पीत 


तो येतो आणिक जातो 

पुढील वर्षी येणार असतो 

न कळे काय होते त्याचे

आधीचा जो येतो बुडतो 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ते बघतील तुझ्या मागे किती लोक आहेत 

किती जण पाण्यामध्ये तुझ्या बुडत आहेत 


ना तू कुठले खुलासे कर ना तू दे दिलासे 

आहेत तुझ्यासमोर ते लोक अवघड आहेत 


जंगलात तर उरला नाही कुठेही त्यांचा मागमुस 

जे घोडे आहेत आता ते रेसकोर्सवर आहेत 

 

कुठे लपेटतोस तू देवांना फुलांच्या मध्ये 

लक्ष दे तू फळांकडे फळांच्यात साप आहेत 


शेवटी अंतिम निकष लोकप्रियता हाच 

आणि जे आहेत गुंड तेच लोकप्रिय आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ते खोटे बोलण्याचे निर्लज्जपणे समर्थन करतात 

ते कलावंत आहेत भावनांचा व्यवसाय करतात 


कुठे जातोस वाघाची कातडी पांघरणाऱ्यांच्यात 

तुला घाबरवण्यासाठी ते डरकाळी डब करतात 


फिक्शन बनवण्याखेरीज त्यांच्याकडे काय आहे 

काल्पनिक गोष्टींचा सुद्धा ते इतिहास करतात 


मी जिवंत असण्याचा ढळढळीत पुरावा दिला 

माझ्यासारख्या माणसाचा म्हणे ते मर्डर करतात 


तसाही मी मेल्याने काही फरक पडत नाही 

बघू मला मारण्याचे गोळा कधी धाडस करतात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रत्येकाला आहे माहीत जंगलचा कायदा आहे 

तरी गातो आहे गीत जंगलचा कायदा आहे 


चकाचक कपडे घालून दिसतो माहोल टकाटक 

आत पिसाटी रक्त पीत जंगलचा कायदा आहे 


तिलाही माहीत नव्हते जेव्हा झाली गर्भवती 

जनावराने केले पुनीत जंगलचा कायदा आहे 


नाचताना स्वतंत्र आहे की आहे आणखी काही 

देव मूक पालखीत जंगलचा कायदा आहे 


जो टोळी सोडून गेला त्याचे आयुष्य वाया गेले 

मेला एकांत शिजवीत जंगलचा कायदा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मृत्यूच्या काळ्या कळा 

जीवन उमलते ठेवतात 

मी मृत्यू पाहून येतो 

उभी राहू नको माझ्या आत


बांबूनेही तंबू बनतो 

घर बनताना हवी तूच 

तुझ्याविना अंग वाटते 

विणेला आलेली सूज 


शेवटचे दिस असतीलही

प्रथम पासून सुरुवात करू 

आवरायची वेळ येईल 

तेव्हा प्रेमाने सर्व आवरू


सध्या तरी मी ठाम उभा 

तळहाती घेऊन काळीज 

हा प्रकाश एन्जॉय कर 

पडेल तेव्हा पडू दे वीज 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मुळातून उठते कंपन

प्रकाश बनतो चमत्कार 

कितीही वळलो आत 

तरी दिसत नाही आकार 


वाराच खूपसतो सुरा 

वादळांचा होतो खून 

मला क्रांती असते हवी 

उत्क्रांतीचीही नसते खूण 


उणीवांनी सजते नेणीव 

हलते ते दिसत नाही 

जगण्याला कळत नाही 

का लागते मरणघाई 


पसारा पाय फाकवतो

पण दिसत नाही पाया 

मरताना इतकेच कळते 

आपण गेलो आहोत वाया 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

डोळ्यातून अश्रू ओघळावा तशी ओघळली निघून गेली 

क्षणभर काळजात तलवार भळभळली निघून गेली 


हास्य तर निर्व्याज होते म्हणून तर इंटरेस्ट देत होतो 

बत्तीस दातांची नदी शुभ्र खळखळली निघून गेली 


चंद्र विझला पौर्णिमेसारखे काही दिसले नाहीसे झाले 

जातानाही वळली नाही तिची सावली वळली निघून गेली 


तिच्या प्रेमात दोन्ही हात ब्रशसारखे रंगवत होते 

आयुष्य रंगले मग आर्ट गॅलरी संपूर्ण जळली निघून गेली 


माहित नाही का असे वाटते 

की जे झाले ते पूर्णच होते 

जाताना क्षणभर अपूर्णता सळसळली निघून गेली 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

त्याच्या नावाने पॅकेज येते ते काय माहित आहे 

पॅकिंग आहे सोनेरी आणि आत मध्ये शेण आहे 


तिथे कलियुग आले आहे असे तू खुशाल समज

सिंह करतो भक्ती जिथे गाढव बनले देव आहे 


हा कसला जंगलाचा कायदा आता आला आहे 

ज्यास भुताटकी झपाटते तेच म्हणे झाड आहे 


सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलन कशाकशाचे 

यांच्या लीला पाहून आता बनला देव नास्तिक आहे 


तू मंदिर बांधण्यापेक्षा गरिबांसाठी हॉस्पिटल बांध 

या धार्मिक काळामध्ये हेच आता शहाणपण आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्वतःला देव समजत होता बघता बघता माती झाली 

त्याला आभाळ दिसत होते 

पाहता पाहता माती झाली 


खूप भगवान येऊन गेले 

म्हणाले दैवी पंख आहेत  

त्यांचे गरुड चिमणी झाले 

उडता उडता माती झाली 


गावात कणा ताठ होता 

भक्त पागल माठ होते 

स्वतःस समजत होता स्मार्ट 

धूळ उडता माती झाली 


इतरांना गाढ निद्रा होती 

झोपेत चालायची सवय होती 

हाच स्वार्थात जागा होता 

डुलकी लागता माती झाली 


मातीमध्ये सुखी राहील 

याची काही गॅरंटी नाही 

उगवता उगवता गातो गाणे 

उगवण्याकरता माती झाली 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू सुलतान होगा तेरी सल्तनतका 

मगर प्रेमकी गली तेरे नसीब नहीं 

कितनीभी चर्चा कर तू तेरे मजहबकी 

कोई भगवान कोई खुदा तेरे करीब नहीं 


हर जगह तेरे दहशतके पोस्टर  

मगर किसीभी पोस्टरमे खुले नहीं कान 

कौनसी भाषामे बात करु मैं बयां 

 युगमेंही बची जब कोई तहजीब नहीं 


तेरे हर व्हिडिओमे तेरे जुड़े हुए हाथ 

नमस्कार करते हुए विनम्रतासे भरे 

मगर कोई इबादत दिखती नहीं उनमे 

और चेहरा शराफतके करीब नहीं 


कई लोग आये मजहबका नाम लेकर 

राजभी किया और गुमराहभी किया 

लोग बेवकूफ तबभी थे और अबभी हैं 

लोगोंको समझानेकी कोई तरकीब नहीं 


ये सब इमेजिनेशनका धंदा हैं 

और आइना दिखाना गुनाह हैं यहाँ 

क्या सचकी बात करूंगा इस माहौलमे 

जब सोचनाभी यहाँ मुनासीब नहीं 


श्रीधर तिळवे नाईक

***


जेव्हा जेव्हा सापांना पाहून लोक इथे घाबरले 

तेव्हा तेव्हा दोरीसारखे साप इथे मी वापरले 


ज्याने माझा खून केला तो चेहरा निरागस होता 

ज्यांनी माझा खून पाहिला तेही होते घाबरले 


मला कधीच मक्तेदारी गुलाबाची पटली नाही 

माहित नाही माझ्यावरती तरी का चाफे डाफरले 


ज्यांनी त्यांचे डोळे वाचले त्यांना भरपूर मिळाल्या 

पुस्तक म्हणून ठेवून दिले ते अडाणी ओसरले 


प्रत्येक जणच खास असतो तशी खास तीही होती 

मीच सामान्य होतो तिने सामान्य म्हणून वापरले 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पुन्हा एकदा भाकड कथा लिहायला सुरुवात झाली आहे 

पुन्हा एकदा ब्राह्मण धर्म खपवायला सुरुवात झाली आहे 


ज्यांना कोणाला वाटते की हे लोक सुधारणार आहेत 

ते भ्रमात आहेत त्यांचा भ्रम बिघडायला सुरुवात झाली आहे 


आता पहायचे बहुजनांचा देव कसा कसा बदलला जातो 

पुन्हा एकदा बहुजनांचे धर्म बदलायला सुरुवात झाली आहे 


ब्राह्मण धर्म आला पर्शियन आला 

मुस्लिम आला ख्रिश्चन आला 

एक नवीन कर्मठ धर्म बाकी तो यायला सुरुवात झाली आहे 


आता पुन्हा एकदा ते बहुजनांना आपल्या तालावर नाचतील 

त्यांनी ढोल तयार केलेत बहुजनांची नाचायला सुरुवात झाली आहे  


चार चारदा मरून सुद्धा ज्यांना अक्कल येत नाही त्यांचे काय 

पुन्हा स्वतःचे पाठीचे कणे काढून द्यायला सुरुवात झाली आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू आयुष्य स्वतःचं जग 

गाढवाच्या गात गेलं दुसऱ्याचं जग 


लोक त्यांचे त्यांचे जगत राहतात 

तुही जगून घे तुझ्या वाट्याचं जग 


कित्येक जगे आहेत तुझ्या जगाशिवाय 

तुझ्या वाट्याला येणार फक्त तुझं जग 


जे जगण्यासाठी येतं तेच तर जग असतं 

जिथे जगता येत नाही ते नाही तुझं जग


मरणाबद्दल कोणाला काय माहित आहे 

मरण जिथं आहे तिथं नाही तुझं जग 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हे एकट्याने जगणे आणि एकट्याने चालणे सोपे नसते 

मृत्यूने प्रवेश केलेला देहात तरी देहात हालणे सोपे नसते 


नसणे पैसे खिशामध्ये आणि तरीही तारुण्य झगमगलेले 

लोकांचे बंद होणारे दरवाजे 

पचवणे खिडक्यांचे हालणे सोपे नसते 


तोंड आपले बांधलेले आणि हात सुद्धा कंटाळून गाफील 

तरी वाजणारा आयुष्याचा तबला टिकवणे त्यात तालणे सोपे नसते 


कसे दोस्तांना सांगणार असतो 

सांगून तरी काय सांगणार 

त्यांच्याबरोबरची दोस्ती टिकवत

स्वतः एकटे चालणे सोपे नसते 


मी लक्ष्मीपुरीत जाऊन येतो 

तुम्ही बिंदू चौक सांभाळा 

उपोषण चालू असताना 

माल म्हणून अन्न घालणे सोपे नसते


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दोन्ही बाजूंनी बुद्धि मंद आहे 

दोघांनाही राज्य करण्याचा छंद आहे 


कुठे शोधतो आहेस तू शहाणपणा 

मूर्खपणात प्रत्येकाचा आनंद आहे 


ही अशी दोन्ही गालाखाली कानशिलात 

लाल झालेला गाल मकरंद आहे 


कितीही बोलणी कर फिस्कटणारच 

पाया समजतोस तो वाळूचा कंद आहे 


शेवटी सर्व काही हवेत चाललेले 

आणि जे ढग आहे ते अतिमंद आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जगलो जसा एक काजवा माझ्या या मातीवर 

प्रकाश माझ्यापुरताच होता माझ्या या मातीवर 


आकाश ओढायचा प्रयत्न केला सापडले नाही 

शेवटी मी झोपलो नागडा माझ्या या मातीवर 


प्रेम कधीच होकारावर तुझ्या नव्हते अवलंबून 

नकारही मी साजरा केला माझ्या या मातीवर 


खूप काही कथा ऐकल्या ब्रम्हांडाच्या विस्ताराच्या 

कळले शेवटी मी देहापुरता माझ्या या मातीवर 


मला लिहिता येत नाही गझल गणिती तुमच्यासारखी

मी गतिमान माझ्यापुरता माझ्या या मातीवर


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुम्ही लोक ओव्हरएस्टिमेट केलेत 

नसलेल्या लायकीला ग्रेट केलेत 


व्यापार करतो म्हणूनही असेल मी 

आयुष्याची कॅल्क्युलेशनस थेट केलेत 


लोक सुद्धा प्रचंड असतात स्वार्थी 

मी त्यांचे स्वार्थ एस्टिमेट केलेत 


तुमच्या दिखाव्याला बळी पडणार नाही 

असे खूप देखावे मी भेट केलेत 


जे काही चालले आहे ते चालू द्या 

मी अनपेक्षितपणेच डाव चेकमेट केलेत


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

त्याच त्याच घटना पुन्हा पुन्हा 

वर आणि वल्गना पुन्हा पुन्हा 


तेच तेच सुरे दाखवले जाणारे 

त्याच त्या संघटना पुन्हा पुन्हा 


तेच तेच भय स्पॉन्सर होणारे 

रिस्पॉन्स अवहेलना पुन्हा पुन्हा 


प्रत्येकास गर्दीत सामील व्हायचय 

काढून स्व कणा पुन्हा पुन्हा 


सर्वांनाच अभिनय मान्य झालेला 

त्याच खाणाखुणा पुन्हा पुन्हा 


तू तरी काय करू शकतोस 

कर ठणाठणा पुन्हा पुन्हा 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दिलासा शोधताय तुम्ही सत्य नाही 

तोपर्यंत तुमचं काही खरं नाही 


किती सफेद व्हायची घाई तुम्हाला 

लावणारा चुना लावून गेला रंग नाही 


तो म्हणाला देव आहे तुम्ही म्हणाला हो 

आता कशाला ओरड कि तो देव नाही 


तुम्ही लोकांना गंडवले त्याने तुम्हाला 

चोराच्या घरी चोरी करणारा चोर नाही 


तुम्हीही असे कैक अंगावर घेऊन फेकले 

तुमच्याही अंगाला काही लागत नाही 


अस्तित्वात नसलेल्या देवाचा खून झाला 

नि खूनी म्हणतोय मी केलेला खून नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कुठून आणून देऊ मी तुला सोन्याची बाहुली 

मीच बनून गेलो आहे चांदीची एक सावली 


मान्य की तुझ्या दारात हत्ती झुलतो आहे 

माझ्याही अंगणात एक कार आहे सामावली


इतके नको ताणवू की सर्व काही विस्कटेल 

एक जुळवाजुळव आहे आधीचीच फिस्कटली


प्रेम पुरेसे पडले नाही माझे तुझ्या हृदयासाठी 

तिथेही एक लांबलचक यादी तू मला धाडली 


अख्ख्या लग्नसमारंभात एकदा खुश झालो 

जेव्हा एका फोटोत ती मनमोकळी हसली


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सर्वांनीच खाल्लेले शेण आहे 

प्रत्येकाचे झालेले मेण आहे 


श्रीधर तिळवे नाईक

मी एका ढगाकडे चाललो आहे 

माझ्याही आत पाणी म्हणून हाललो आहे


श्रीधर तिळवे नाईक 

वेळ वाईट असली की जगाचे खरे रूप दिसते 

असते अतिशय सूक्ष्म पण दिसायला खूप दिसते 


वस्तुनिष्ठ म्हणावे असे काहीही अस्तित्वात नाही 

यातच तू मान धन्यता की तुला तुझे रूप दिसते 


पाठीशी आहे म्हणतात ते रेसमध्ये पुढे दिसतात 

धावताना जे काही दिसते ते वरवरचे रूप दिसते 


दीडशे वर्षे त्यांना कधी त्यांचा पूर्वज आठवला नाही 

आता म्हणे दिवस रात्र त्यांना त्याचे रंगरूप दिसते 


ती नेहमीच म्हणते मला मस्तपैकी निसटले आहे 

तिचे शेजारी सांगतात तुला भेटताना गुपचूप दिसते 


मी कानामात्रासुद्धा तिचा कधीही बदलला नाही 

भाषा तरीही का अशी अवघडलेली नि चूप दिसते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जो जो आला तो मला घोळवून गेला 

जखमेवरती माझ्या मीठ चोळून गेला 


आयुष्यालाच झाला जिथे इथे दमा  

काय फरक पडतो कोणी खोकून गेला 


मी माझ्या तहानेचा मुळी गुलाम नाही 

जरी शरीरात निसर्ग पाणी ठेवून गेला 


वस्तू जमवत नाही मी वस्तू विकतो 

लोक म्हणत राहतात स्टॉल लावून गेला 


मुळात माणसांची इतकी गर्दी कशाला 

अपघात झाला कारण देव खचून गेला 


जितक्यांना शक्य होते तितक्यांना वाचवले 

बातमी त्याने दिली जो पळून गेला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आकाश म्हणून रिकामी जागा आहे 

ती ईश्वर आहे की नाही शंका आहे 


शोधूनही तिला मी सापडलो नाही 

आता म्हणते मी दिला धोका आहे 


तिने संतापाने सारे आरसे नष्ट केले 

प्रॉब्लेम शिल्लक माझा चेहरा आहे 


वादळांनाही आता मी कळेनासा झालो 

ती गोंधळलेली मी श्वास की वारा आहे  


दिसावयास लागली तिच्यासारखी चिता 

हा कोणता डाव माझ्या काळजाचा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पाठलाग करून तिचा हृदय सुजले 

ती म्हणाली,"स्टॅमिना जबरदस्त आहे अजून नाही विझले "


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मेरे लिये जो प्यार था 

उनके लिये अखबार था 


हर रोज पढा करती थी 

मेरे लिये उनका दीदार था 


मुझे लगा गजलकी मैफिल 

उनके लिये वो दरबार था 


रईसीने मगरुर बनाया उपर 

खूबसूरती का अहंकार था 


मरने के बाद पता चला 

हर दिवाना सिर्फ अलंकार था 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

बघता बघता मी सभ्य झालो 

त्यांना हवा तसा नपुसंक झालो 


कळाले नाही आग कशी विझली 

आऊटडेटेड झालेला यज्ञ झालो 


ते म्हणाले स्वतःस जपायला हवे 

शरीर जपता जपता निष्प्राण झालो


कळाले नाही बालपण कधी संपले 

इतका मोठा झालो की कीटक झालो 


आता या कळपातच कळपलो आहे 

कळून घेता घेता कळप झालो 


त्यांच्या दृष्टीने सर्व व्यवस्थित आहे 

मी त्यांच्या व्यवस्थेचे आरोग्य झालो 


मला कळाले यातून बाहेर यायला हवे 

मी व्यवस्थेला मारून जिवंत झालो 


आता कळपाबाहेर निवांत एकटा 

ते नळात मी नदीत सेटल झालो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जीवन के अलावा जीवन में कुछ नही 

खिलनेके अलावा चमन में कुछ नही 


जो भी है बहुत है जीने के लिए यहाँ 

अच्छीतरहसे सजाना सजन मे कुछ नही 


तू अकेला नही है कम से कम सौ है 

जोभी हैं जन मे है निर्जन मे कुछ नही 


कुछ लोग ऐसे भी आयेंगे तन्हा करेंगे 

उनकी जगह और ला अकेले पनमें कुछ नही 


एक इन्सान सयाना और मूर्खभी होता है 

जो भी है पॅकेज है धिक्कारनमें कुछ नही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

प्रेम हाच धर्म आहे पृथ्वी हीच मंदीर आहे 

तरीही तुला वाटते की मी एक काफीर आहे 


दया क्षमा शांती आहे देवाची वस्ती आहे 

तरीही तुला वाटते की मी एक काफीर आहे 


तुझे हृदय वाचता येते माझ्या हृदयाच्या प्रकाशात 

पवित्र पुस्तक कधीच फेकले तू म्हण काफीर आहे 


ज्याच्या आत करुणा नाही तो कसला संत आहे 

कागदांच्यात फडफडणारा सैतानाचा तो खंजीर आहे 


तरीही प्रपोज करतो आहे वाटले तर स्वीकार कर 

नाहीतर म्हणत रहा नाकारले कारण काफीर आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ना आशा उरली आहे ना प्रेमाची शक्‍यता 

फक्त उसळून येते आहे दोन्हींची अवश्यता 


का घरी बोलावतो तू आभाळातील पक्षांना

तुला का आवडू लागलीये पिंजऱ्यांची दृश्यता 


पशु घरी आले की आम्हीच घरी बोलवले ?

वाढवत गेले बनून राजकारणी बलाढ्यता 


कधीकाळी खेळलो होतो पंचगंगेच्या काठाशी 

नदीतली आई मेली उरली पाण्याढ्यता 


बघता बघता माझ्यासमोर शहर बदलते आहे 

बेढबपणे वाढत आहे गंडलेली अवाढव्यता 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ऐसा कोई दिन नही हैं जब तुम्हे याद किया नही 

तुम्हारे नाम से आया जहर जो हमने पिया नही 


उनके दामन मे चमन था उनके आंगन में आग थी 

हमे ही कुछ हो गया था हमने कुछ भी लिया नही 


अब खून भी ठंडा हुआ जो गरम था हवा मे गया 

कुछ जिंदा सा अंदर आया था मगर मै जिया नही 


तुम्हारा गुस्सा जायज न था फिरभी हम सहते रहे 

जाना पहचाना जखम था हमनेही उसे सिया नहीं 


पूरे माहोल मे छायी थी उनकी हया इस कदर 

आखिर तकरार ,"हम तय्यार थे तुमनेही कुछ किया नहीं "


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दोन सैतान लढत आहेत 

ईश्वर दोन्हीकडे बागडत आहे 


संतापात हलतात दोन अश्रू 

डोळा मात्र अवघडत आहे 


हा ही मरो आणि तोही मरो 

शेवटी मरण तर निवडत आहे 


दुःख करावे असा कोणी नाही 

दोघेही पृथ्वी उखडत आहे 


प्रत्येक फुलातून वाघ उमलला 

वसंत नेमके काय चिवडत आहे 


भाड्याच्या घरात श्वास ताठ 

माझा मालकी हक्क आखडत आहे 


आवेगांची गरज खरोखर संपली? 

मग रक्त कशास धडपडत आहे 


इंद्रिय थंड झाले की मरून गेले 

कुठला इंद्र आत कडकडत आहे 


त्याने क्षणाचा फासा फेकला 

संपूर्ण काळ मला नडत आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

भयाच्या आरण्यातून चंद्रप्रकाश चाललेला 

एक तिचा देह आहे तोही आहे हादरलेला 


कसा अप्रोच करावा मी ती म्हणते विश्वास नाही 

एक काळजाचा तुकडा आहे तोही कातरलेला 


दोन कोवळ्या त्वचा नाही ज्यांच्याजवळ मेमरी 

वर्तमानाचे पडलेले चांदणे आसमंत भारावलेला 


तुझ्या पुढे का वासनांची मी लाज बाळगावी 

तू तरी का आणते आहेस अविर्भाव सरावलेला 


बघता बघता सारा बर्फ पाणी पाणी होतो आहे 

कोणाला खरे वाटेल की हा जीव होता घाबरलेला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

Clevers are cunning fools are useless 

Everything is becoming pathless pathless.


No paradise no hell, earth with loneliness 

And those fucked sapiens know only their businesses 


Nobody is freind and deals are opened up

Either there's shut-up 

Or only thumbs up 


Either compete or leave 

Competition has set marks 

Nobody is sacrificed and everywhere hutatma parks 


Shridhar Tilve Naik 


{ बाळबोध कविता या काव्यफायलीतून}


सर्वच मारेकरी आणि आपण जिवंत 

हळूहळू वाटू लागलीये लाज किंवा खंत 


अनेपेक्षित काय जे विचलित करेल 

मर्डर आणि युद्ध तर रोजचेच जंत 


तशी त्याने आम्हाला हिंट दिली होती 

आम्हालाही वाटले होते आहे हा संत 


भांडण लावून तू कुठे गेलास निघून 

तुझी वाट पाहतोय फुले नसलेला वसंत 


मला वाटले होते एक छोटीशी खोली आहे 

आता सांभाळावा लागतोय अख्खा आसमंत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

विसरून जावे लागेल ज्ञान अशी ही एक वेळ येईल 

फक्त पहावा लागेल प्राण अशी ही एक वेळ येईल 


प्रेम तिचे तुला वाटत आहे स्थिर आहे भक्कम आहे 

अचानक तरंग देतील ताण अशी ही एक वेळ येईल 


तिचा मोह माया काया वाकड्या नजरेने पाहत नाही 

सरळ उडवते दाणादाण अशी ही एक वेळ येईल 


आयुष्याने थकवले म्हणून कधीही नाराज होऊ नकोस 

थकव्याचे होईल यक्षगान अशी ही एक वेळ येईल 


आत्ता जे जे चालू आहे ते कधीतरी होईल बंद 

तमाशा होऊन जाईल निष्प्राण अशी ही एक वेळ येईल 


श्रीधर तिळवे नाईक

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अंतरिक्ष यात्रा १९८४


पांढरा फटाक तेज सूर्य 

आकाश गंगेचा हलता साप 

कळेनासे तिलाही झाले 

स्वदेहाचे नेमके माप 


ताऱ्यांनी स्वतःला मोजले 

मोजताना गळली बोटे 

मोजणारा कोण होता

काय हाताचे फायदे तोटे 


आकाशात काढली सहल 

हे चूक होते की बरोबर 

झोप तरंगत असता 

जागा राहतो खोड रबर 


पॅक झालेले कृत्रिम अन्न 

करते का मला ही पॅक 

मी वळतो आत तेथे 

आयुष्य उधार अथवा चेक 


यात्रांमध्ये धोका कसला 

ती करतो तरी का आहे 

की वाहते लटांबर म्हणून 

त्याच्यातून मीही वाहे 


आकाशात ठेवले पाऊल 

तरी का वाटेना सार्थक 

इकडची धूळ तिकडे उडली 

प्रवासाचे एवढेच मिथक ?


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलोन सिरीजमधील डे कॅथलॉन वर्ड्स या काव्य फायलीतून)


मृत्यूच्या काळ्या कळा 

जीवन उमलते ठेवतात 

मी मृत्यू पाहून येतो 

उभी नको माझ्या आत


बांबूनेही बनतो तंबू 

घर बनताना हवी तूच 

तुझ्याविना अंग वाटते 

आलेली विणेस सूज 


शेवटचे दिस असतीलही

प्रथम पासून सुरुवात करू 

आवरायची वेळ येईल 

तेव्हा प्रेमाने सर्व आवरू


सध्या तरी ठाम उभा 

तळहाती घेऊन काळीज 

हा प्रकाश एन्जॉय कर 

पडेल तेव्हा पडू दे वीज 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

त्याची गुंडगिरी यशस्वी झाली 

कालच त्याला सीट ऑफर झाली 


त्याच्या नावाचे नारे आले 

लोकांनी नेता म्हणून निवड केली 


आता तो कायदे तोडणार नाही 

कायदे करण्यासाठी त्याची पाठवणी झाली 


बघता बघता मोठा नेता होईल 

त्याच्या स्वागताची तयारी झाली 


मी संविधान पहात राहिलो 

एकेका पानाची गळती सुरू झाली 


लोकांना जे हवे लोकांनी निवडले 

मी तरीही या देशाची निवड केली 


कदाचित उदासपणे मरून जाईन 

काल माझी कविता मरून गेली 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कम्युनिझम सोडला त्याची गोष्ट श्रीधर तिळवे नाईक 


मी मार्क्सविरोधी आहेस

एवढे एक कारण सुद्धा 

मार्क्सवादी लोकांना पुरते 


मी श्रमिकांच्या बाजूने आहे 

हे मात्र त्यांना 

पुरेसे वाटत नाही 


जणु श्रमवादाची सुरुवात 

मार्क्स पासून होते 

जणू मार्क्सच्या आधी श्रमिक अस्तित्वातच नव्हते 


मी वाईट वाटून घेत नाही 

किंवा माझी साईट सुद्धा बदलत नाही 


श्रमिकांना थेट गाडणारी वर्णव्यवस्था

आणि श्रमांना थेट गाडणारी वर्ग व्यवस्था 

यांच्यात फरक काय 

हेच मला अजून कळत नाही 


सत्तेचा सोस कोणाला नसतो 

ही द्राक्षे कितीही आंबट असोत

पण प्रत्येक कोल्ह्याला 

त्यांची बागायती करायची असते 


कोणाला ज्ञानाची 

कोणाला व्याप्तीची 

कोणाला संपत्तीची 

प्रत्येकाला द्राक्षे हवी आहेत 


कितीही पेट्या येवोत 

तोंडच इतके अवाढव्य की 

कितीही पेट्या बसतात 

पोटच इतके मोठे 

की तृष्णा संपत नाही 


आता तर काय 

द्राक्षांच्या पासून दारू बनवण्याची कला अधिक विकसित 

अख्खी जमीन द्राक्षासकट घशात घालण्याची कला विकसित 

पोटातल्या पोटात द्राक्ष शेती करण्याचे उद्योग 


द्राक्ष सॉलिड दारू लिक्विड 

आता फक्त हवेतली सत्ता अस्तित्वात आली म्हणजे झालं 


सगळ्यांना गॅसवर ठेवायला मोकळे


हे सर्व करायला श्रमिक हवेत श्रम हवेत 

म्हणून त्यांनाच पोटात घेण्याची तयारी 


जो तो आब राखून राबवतोय 


जो स्वतः श्रमिक होता 

त्यालाही सत्ता हवी 

त्यालाही चान्स मिळाला 

की तोही सत्ताधारी 

आणि पुन्हा तेच 

द्राक्ष शेती आणि दारू 


सर्वांचाच सत्ता हा खरा शत्रू 

आणि सर्वांनाच सत्ता हवी 

कारण सत्ता हीच खरी मित्र 


एका परस्पर विरोधातून 

सुरू होणारी वाटचाल 

सुरू असलेली वाटचाल 


अख्खा शेतकरी कामगार पक्ष 

बैलगाडी सकट गिळला या लोकांनी 

एक संपूर्ण गाडा 

पोटात नाहीसा झाला 


आर्थिक क्रांती करायला निघालेल्यांचे दिवाळी निघाले 

आणि ज्यांच्यासाठी धडपडावे 

ते दिवाळीचा बोनस मिळाला म्हणूनच खुश 


श्रीधर राव 

निघा मार्क्सवादातून बाहेर 


जोवर तृष्णा आहेत 

तोवर फक्त एकच वाद आहे तृष्णावाद 


तेव्हा तहानेत जाऊन बसा 


अन्यथा तहाच्या वाटाघाटी 

तुमच्या आयुष्याचे टेबल करतील 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सारे कसे कोमेजलेले 

आत प्रेत उगवलेले 


कदाचित आहे बेकारी

हात आहेत पण तोडलेले 


नो डाऊट सूर्यच होते

पण होते सर्व मावळलेले 


तिचे लक्ष माझ्याकडे 

नजरेत भाव चपापलेले 


मी पौर्णिमा शोधत होतो 

चंद्र सापडले टपकलेले 


वाट पाहणे पण कुठवर 

वेटिंग डोळ्यात निखळलेले


शेवटी स्वतःस गुंडाळले 

प्रेत आपोआप पोहचलेले


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जगणे हा रोग असेल तर जगायचे कशाला 

उपाय शोधत आयुष्य घालवायचे कशाला 


ईश्वर अस्तित्वात नव्हता आताही नाही 

काल्पनिक दिव्यात तेल घालायचे कशाला 


आसपास प्रत्येक जण आतूनच उदास 

त्या उदासीचे कारण चालवायचे कशाला 


निष्ठाही हवी आहे पण दुसऱ्याकडून 

स्वतःजवळच नाही ते मागायचे कशाला 


जगणे हेच जर आता मुख्य इश्यु आहे 

थेट जगण्याऐवजी प्रश्न विचारायचे कशाला 


खूप झाल्या चर्चा खूप डोक्याचा भुगा 

पोळ्या खायच्या नाहीत त्या लाटायच्या कशाला ?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

एक तू , एक मी आणि अतूट प्रेम एका शहरात 

पुरेशी आहे तुझी माझी एकच फ्रेम एका शहरात 


तसेही आहे प्रत्येकाचे हृदय आतून इथे रिकामे 

सगळे दिसत आहेत मला सेम टू सेम एका शहरात 


लोक आता इतके चटकन विसरायला शिकलेत की

कितीही वेळा भेटलो तरी विचारतात नेम एका शहरात 


एका शहरात राहण्याचा एकच येथे तोटा असतो 

ओळखून असतो प्रत्येक जण एकमेकाचा गेम एका शहरात 


शहर बदलल्याशिवाय नाही माणूस यशस्वी होत 

जिथे जन्मलो तिथेच कसे कमवायचे नेम एका शहरात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पायाला बांधली चक्रे 

पण सुदर्शन नाही झाले 

मी नाही दिले आमंत्रण 

महाभारत घरी आले 


माझे शरीर सुद्धा 

शरीराचे दुसऱ्या अंग 

कधी नको तितके सैल 

कधी नको तितके तंग 


त्यालाच नाही आश्रय 

एक कुटील तीक्ष्ण हुसकावणी

मला पृथ्वी पाहिजे होती 

आकाशाची दिली छावणी 


असे असणे चांगले वाईट 

मला ठरवता येत नाही 

मी तिथून चालता झालो 

जिथे होती माझी सही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जे बाहेर चालत असते 

ते असते अपुले हृदय 

असतो तिथेही आपल्या

सूर्याचा अस्त नि उदय 


त्या हृदयी कळत असते 

प्रेमाची आहे शक्यता 

भाषा विखुरलेली 

आणि तरी एक वाक्यता 


ते असते करत पाठलाग 

असते त्याच्यासमोर ध्येय 

त्यालाही असतो अहंकार 

ठरवू द्यावे श्रेय प्रिय 


ते असते अपुले हृदय 

तो नसतो आपला अलंकार 

पाठवले सोने म्हणून

देवाचे मानावे आभार 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)



हळूहळू आपण जाणार इतकेच उरते 

शेवटीही अपुले आयुष्य एक पेच उरते 


लावला न लावला अर्थ उरतो काय फरक 

आयुष्य अर्थाशिवाय इथे तसेच उरते 


कदाचित जाणावे जीवन म्हणून ना जन्म 

शेवटी जाणणे मेंदूपुरतेच उरते 


जगत रहा जगत रहा जगत रहा जगत 

जगताना अपुल्या मेंदूत जगणेच उरते 


आपले पूर्वज सारे येडझवे होते 

आपलेही सारे काही येडझवेच उरते 


करायचे आहे काय हे सारे लिहूनी 

माणसात माणसाचे फक्त लिहिणेच उरते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुला माझ्या आयुष्यामध्ये इतका का रस आहे 

माझ्याबरोबर जगण्यात लागणार तुझा कस आहे 


तूच मला बोलवले आहेस तुझ्या धार्मिक समारंभात 

आता का म्हणते आहेस माझ्या हातात सोमरस आहे 


इतक्या साध्या आजारासाठी डॉक्टर कडे का जातेस?

ऐकून आहे तुझी तर देवांच्या मध्ये उठबस आहे 


मी माझ्या वर्ण जातीत वाकून पाहत नाही 

समजून जा मी फक्त होमो सेपियनची फसफस आहे 


माझ्याबरोबर जगायचे तर विज्ञानाबरोबर जगावे लागेल 

माझा हा विश्वास आहे माणूस देवा पेक्षा सरस आहे 


विचार सुद्धा सेक्सी का जी दातखिळी बसली आहे 

माझ्या मेंदूने स्पर्श केला आणि तू ना टस ना मस आहे 


माझ्या शापाने तुझ्यामधले इतके कावळे खरोखर मेले ?

तूच सांग मी कोणत्या महान गाईचा वारस आहे?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कुछ जरूरत से ज्यादा स्ट्रगल हो गया 

जमाना जीते जी मारनेमे सफल हो गया 


हर कामयाब आदमीके हाथ में पत्थर हैं 

मुझे आईना बनाने में वो सफल हो गया 


खुद का घर तक नही ले सका शहर में 

इतना रेंट दिया की दिलभी रेंटल हो गया 


कभी भी मेरे घर का छत उड सकता है 

शायद मै ही जमीपे असफल हो गया 


"पता नही क्या चाहता हैं तू शहर से "

पूछा तो मेरा बाप सेंटीमेंटल हो गया 


पता नही शहर से दुश्मनी थी या दोस्ती

जब शहर छोडा तो दिल बेकल हो गया 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तो आनंदी असेल तरच तू ही राहशील आनंदी 

असे होऊ शकत नाही तू घोडा तो बैल बंदी 


व्यक्ती म्हणून आता काही शिल्लक राहिले नाही 

समाजाची तीच तुझी स्थिती अच्छी वा गंदी 


सगळ्यांचा झाला नाहीस तर शोषण कर्ता होशील

लक्षात ठेव त्याच्याभवतीची कोसळते तटबंदी 


स्वातंत्र्य फक्त एकाचेच अस्तित्वात नसते 

एक तर सर्व स्वतंत्र किंवा सर्वच असतात बंदी 


ज्यांनी धर्मग्रंथ ही वाचला नाही ते कसे त्या धर्माचे 

पुरोहिताचा कोणता टाईप जो करतो वाचनबंदी 


इतके धर्म असूनही हा देश बदलून गेला 

पापाला प्राप्त भरभराट पुण्याला आली मंदी 


एका थर्ड क्लास समाजात वाटचाल आहे करायची 

समाज भेसुर लावणार तुला गायचा आहे दीपचंदी 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आता आम्ही जाऊन जीव द्यावा का 

थोडा शिल्लक आहे तो प्राण काढावा का 


काय करावी आम्ही तुम्हाला वाटेल बरे 

घालून खलबत्त्यात मेंदू कुटावा का 


मी काही केले तरी तुमचे समाधान नाही 

तुमच्यासाठी माझा देह शिजवावा का 


तुमच्या माझ्याकडून नेमक्या काय अपेक्षा 

सगळे तर दिले हात काढून द्यावा का 


मला तर मागण्याची संधीच दिली नाही 

दोन वेळचे अन्न इतकाच शिधा मागावा का 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

येरे घना येरे घना वर्तमानात ये 

पाऊस पडत नाहीये हवामानात ये 


आला नाहीस तर पाण्याची वाफ होईल

तिचा काय उपयोग फुलापानात ये 


किती काळ तू असा डान्स करत राहणार 

कधीतरी कोसळण्याच्या तापमानात ये 


किती किती असा इतिहासात रमशील 

काहीही दिसणार नाही वर्तमानात ये 


जे दिसतात ते नुसते पोशाख आहेत 

खरी माणसे मेली वर्तमानात ये 


ज्यांनी इतिहास घडवला ते वर्तमानात होते 

इतिहास घडवण्यासाठी वर्तमानात ये 


श्रीधर तिळवे नाईक

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सत्य कोणाला हवे प्रचार सर्वांना हवा 

नकार कोणालाच नको होकार सर्वांना हवा 


कोणास माहित होईल होपलेस सिच्युएशन अशी 

धनुष्य कोणालाच नको टणत्कार सर्वांना हवा 


गांधीचे सत्य लोक नोटेत घेऊन फिरतात 

 पैशातल्याच गांधींचा सत्कार सर्वांना हवा


****

तिच्याजवळ ही वेळ नव्हता माझ्यातही काही आटलेले 

दूध होते रक्तामध्ये पण माहित नाही कशाने फाटलेले 


जगण्याची घाई कोणाला नसते पण तिला स्वीकारले होते 

हवा तितका तिला वेळ दिला जरी खिसे  होते फाटलेले 


कोणाही बरोबर बसत असतो तिला हेही आवडत नाही 

तिच्याबरोबर फिस्कटत जातात दोस्तांचे बेत घाटलेले


पैसे कमावतो तेव्हा आनंदी असते पैसे खतम प्रेम खतम 

नात्यात राहावे की न राहावे सोडून द्यावे का दाटलेले ?


दिसायला तसे छानच आहे नाते आमचे दुरून डोंगर 

मीच जाणतो काळीज तिचे एक दुकान आहे थाटलेले 

श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तिच्याजवळ ही वेळ नव्हता माझ्यातही काही आटलेले 

दूध होते रक्तामध्ये पण माहित नाही कशाने फाटलेले 


जगण्याची घाई कोणाला नसते पण तिला स्वीकारले होते 

हवा तितका तिला वेळ दिला जरी खिसे होते फाटलेले 


कोणाही बरोबर बसत असतो तिला हेही आवडत नाही 

तिच्याबरोबर फिस्कटत जातात दोस्तांचे बेत घाटलेले


पैसे कमावतो तेव्हा आनंदी असते पैसे खतम प्रेम खतम 

नात्यात राहावे की न राहावे सोडून द्यावे का दाटलेले ?


दिसायला तसे छानच आहे नाते आमचे दुरून डोंगर 

मीच जाणतो काळीज तिचे एक दुकान आहे थाटलेले 


श्रीधर तिळवे नाईक 


( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्वतःला वाचण्यात सारी हयात गेली 

तरीही कळलो नाही पाने अज्ञात गेली 


लागली जनावरे माझ्याशी तिची बोलू 

संपताच संभाषण चेहरा पहात गेली


प्रत्येकाला होते दिले एक काळीज 

प्रेम पाहणार तोच समोरून जात गेली 


बाकी सर्व गोष्टी प्रेमा सारख्या असतात 

जी प्रेमासारखी दिसते बाराच्या भावात गेली 


प्रपोज मारणार होतो एकांतात तिला 

दगलबाज समोरून माझी औकात गेली 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जाणतो एकटा आहे 

पण आता पुरेसा आहे 


त्यास बोलू दे मोकळे

त्यालाही घसा आहे 


कसे स्वस्थ बसणार 

काळीज ठोका आहे 


कोणी दिला माहीत नाही 

आयुष्य धोका आहे 


त्यालाही श्रेय द्या 

मारण्यात वाटा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ठीक आहे आयुष्याने आपल्या काही दिले नाही 

पण हेही ग्रेट आपण चांगुलपण गमावले नाही 


ठीक आहे श्रीमंतीतून एक गरीबी आली 

पण त्यावरून कोणाला आपण तापवले नाही 


ठीक आहे आपल्या लोकांनी धोका दिला 

पण त्यांनाही क्षमा केली त्यांना अवघडवले नाही 


ठीक आहे आपल्या या गोष्टींचा विसर पडेल 

पण आत जे समाधान उगवले ते मावळले नाही 


ठीक कसोटी सामना झाला मर्यादित षटकांचा 

हेही कमी नाही आपण खेळणे टाळले नाही 


ठीक आहे आपण कदाचित गोव्याला जाऊ 

पण हेही खरे आपण हे शहर बिघडवले नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तिचे तिनेच ठरवले मी असा आणि मी तसा 

मलाही माहित नव्हते मी भेटत होतो कसा बसा


तारुण्याचे आयुष्य किती म्हणून म्हणालो मजा करूया 

समजले नाही तिला गेले निघून आयुष्य भसाभसा


इच्छांची लाख कमळे मी पाहिली तिच्या पदरात

मग एक वादळ आले उडाली जशी होता ससा 


कितीतरी वेळ बोललो बाय ही म्हणत राहिलो 

आता कळते किती खोलवर भाषेचा असतो ठसा 


कोण लग्नानंतर भेटतो आणि भेटून होणार काय 

प्रेम गोष्टच अशी पुढे नाही चालवता येत वसा 


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हा अवाढव्य पसारा कशासाठी 

वर प्रश्नांचा मारा कशासाठी 


तुझ्यामागे पिढ्यांची मेहनत 

तुझ्या असण्याचा दरारा कशासाठी 


माकडेसुद्धा आपापसात लढतात 

युद्धघोड्यांचा खरारा कशासाठी 


सिद्ध करण्यास आलेला नाहीस

दाखवतोस पिसारा कशासाठी 


जे आहे ते सुंदर आहे तेच जग 

नाराजीचा निखारा कशासाठी 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एकी बरोबर माझं जमलं नाही 

आश्चर्य हृदय माझं दमलं नाही 


आता जरी मी व्हेंटिलेटरवर आहे 

अस्तित्व घायकुतीपुढं नमलं नाही 


ती येताक्षणी फुलांचा स्फोट झाला 

व्हिज्युअल छान पण घमघमलं नाही 


तुझ्या श्वासावरही बंदी घालणार 

फरमान तर काढलं पण जमलं नाही 


तिच्यापुढं एकदाच घडलं होतं 

आयुष्य पुन्हा तसं दुमदुमलं नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


इतकेही दुर्दैव असू नये कोणाचे 

आयुष्य असे नासू नये कोणाचे 


हुकू नयेत कुणाच्या अशा संध्या 

नशीब इतकेही डसू नये कोणाचे 


असे हाकलले जाऊ नये प्रत्येक घरातून 

रस्त्यावर घर वसू नये कोणाचे 


असे खुपसले जाऊ नयेत खंजीर 

शरीर गारद्यांच्यात फसू नये कोणाचे 


आता निसर्गाने मला मृत्यू द्यावा 

यातनात जगणे ठसठसू नये कुणाचे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कावळायण श्रीधर तिळवे नाईक 


गाईच्या शापाने कावळा मरत नाही 

तिच्यावर बसतो पण तिच्या हिशेबाने बसत नाही 


त्याला कुठल्याही पाहुण्याची माहिती नसते 

पंढरीनाथ कोण हेही त्याला ठाऊक नाही 


फक्त एकच गोष्ट खरी तो बुद्धिमान आहे 

नदी समोर असताना हंड्यातून पाणी काढत नाही 


कधी कधी तोही आजारी पडत असतो 

पण बरे होण्यासाठी कोणताही मंत्र म्हणत नाही 


ना त्याला भूतकाळ दिसतो ना त्याला भविष्यकाळ 

उपस्थित वर्तमानावरून तो नजर हटवत नाही 


त्याला त्याचेही पूर्वज ठाऊक वा ओळखता येत नाहीत 

तो माणसाचा पूर्वज काय बघणार त्याला तो दिसत नाही 


तुम्ही म्हणू शकता की श्रीधर कावळा आहे 

मी म्हणेन दुर्दैवाने हे शहर कावळत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माहित नाही का परंतु तरीही टिकलेले आपलेपण आहे 

अजूनही आत तुला पाहून उडणारे हृदय टणटण आहे 


तुझा धर्म वेगळा आहे 

तुझी संस्कृती ही वेगळी 

बरोबर तुझ्या तलवारी गेल्या 

मेंदूत का त्यांची खणखण आहे 


मजहब हे सर्वच माणसाच्या जातीचे होते बालपण 

आता तू मोठी झालीस आता धर्म अडाणी पण आहे 


माणूस हा मूळचाच तसा भयाने आहे गांजलेला 

ईश्वर भयावर मात करण्यासाठी योजलेले केवळ वेपण आहे 


मला गमावून सुद्धा तुला वाटते तुझे सर्व काही आहे खरे 

पण स्पष्ट सांगतो तुझे जे आहे ते केवळ खोटे पण आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पाण्याचे कोणी दुध बनवतो कोणी बनवतो विष 

पाण्यास कोणी लाथ मारतो कोणी घेतो आशिष 


त्या उंदराला कसे पकडणार जो चिडवतो बिळामधून 

आणि मांजर शेवटी मांजर असते त्याला लागते आमिष 


प्रथम त्याने कोंबडी पळवली नंतर म्हणाला," तूच हवा" 

बकासुर फक्त खादाड असतो त्याची भूक असते सामिष 


माझ्यावरती भुंकत आहे आज-काल माझा कुत्रा

कोणता शत्रू देत आहे माझ्या विरुद्ध त्यास आशिष 


जग नेहमीच ज्याच्या त्याच्या चालते स्वभावाप्रमाणे 

स्वभाव गोष्टच अशी कि नाही बाळगता येत किल्मिष


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी म्हणतो शोध देशी 

ती म्हणते हो तू प्यारीस

व्हावे लागेल प्रेमासाठी

तुला माझा मस्त हॅरीस 


आवडतो ऋषी कपूर 

दिसतो मी मिथुनसारखा

तिला नवरा नको ज्याच्या

काळजात गांधी चरखा


मला हवी असते लंका 

हट्टाने मागते ती ट्रॉय 

शेवटी मीही होऊन जातो 

तिच्यासाठी ऑफीस बॉय 


कितीही मागितले तरी 

तेव्हाच मिळते प्रेमबळ 

तिच्यासाठी जेव्हा आणतो 

परदेशातून सीताफळ 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तिच्या घराच्या दारा पुढे बसावेसे वाटते 

दिवसातून एकदा तिला पहावेसे वाटते 


माहित नाही लाज की आणखी काही 

नाचताना तिला समोर मी नसावेसे वाटते 


वर्तमानात बहुदा करायला काही नाही 

भूतकाळाच्या जीवावर त्यांना उडावेसे वाटते 


जिथे तिथे त्यांना दिसू लागले अपमान 

अचानक हृदयांना का बडवावेसे वाटते 


स्वर्ग आहे नाही हा मुळात मुद्दाच नाही 

मरताना मरणोत्तर जीवन असावेसे वाटते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तिने दिलेल्या फुलांचेही हळूहळू डाग झाले

आणि मग  डागांचेही हळूहळू वास झाले 


कळले नाही आटत गेला कधी तिचा आशा सागर

डोळ्यांमधील लाटांचेही हळू हळू झाग झाले


प्लेस मी केली होती चुकीच्या जागी माझी निष्ठा 

तिचे जखमात मीठ आणि हृदय नंतर आग झाले 


हळूहळू बंधनेही तिची तिला काचू लागली 

प्रेम रज्जू कापूस होते कालांतराने नाग झाले 


एकेकाळी तपशिलांना नव्हते महत्त्व पण 

ढोबळ ते जंगल आणि सूक्ष्म ते बाग झाले 


तिच्यावरती लिहिलेल्या शेवटी कविता उरल्या 

हळूहळू शब्दही तिचा भग्न पाठलाग झाले 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


विषाच्या प्रेमात पडायला लागले 

गुलाब आतल्या आत झडायला लागले 


इतकेच आता घरात घडायला लागले 

जे बाहेरचे आहे जास्त आवडायला लागले


सत्ता होती पण फक्त बोटभर होती 

देह एकमेकांना नडायला लागले 


रस्ते सुद्धा मुक्कामात असे एकवटले 

शत्रू सुद्धा प्रवासात आवडायला लागले 


सरोवर तर अजून आलेलेही नाही 

मृगजळ पाहून घोडे उडायला लागले 


कोणता प्रदेश आहे नि इतका खडकाळ 

की प्रेम सुद्धा इथे खडखडायला लागले 


बघता बघता जिवंत झाले शांत 

जे मेले होते तेच बडबडायला लागले 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जन्मलो हीच एक चूक होती 

आई-वडिलांची भूक होती 


वंश म्हणून काय कंटिन्यू करणार 

वाहती नदी होती पण मूक होती 


कसे साजरे करू मी वाढदिवस 

जन्मतारीख कुठे माझी अचूक होती 


स्वयंपाकघरात प्रथम धान्य लागते 

अन्यथा प्रत्येक बाई कूक होती 


कुणास काही सांगावेसे वाटत नाही 

भाषा केवळ एक लूक होती 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


घोर वातावरण आहे 

मी खूप निराश आहे 


वाचावेसेही वाटेना 

हरेक पुस्तक डेड आहे 


प्रेरणा मला मिळेना 

इतिहास निरर्थक आहे 


घरामध्ये शांतता 

बाहेर एक गुंड आहे 


जावे तर कुठे जावे 

सर्वत्र डेड एंड आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कसाई गदगदला श्रद्धांजली वाहताना 

आम्हीही थक्क झालो नजारा पाहताना 


आदर्श म्हणून माझ्यापुढे मी गाढव ठेवले 

मग काही वाटले नाही व्यवस्था साहताना 


दोघांनी एकमेकांना दिल्या शिव्या 

एकमेकांना हसले स्मशानात पाहताना 


बघता बघता व्यवस्था प्रेमाचा फडशा पाडेल 

असे वाटले नव्हते मला तुला चाहताना 


परदेशात जाणे हेच आहे खरे सुख 

भूमिका घ्यावी लागत नाही तिथे राहताना 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझे अद्भुत शरीर वळण 

निर्माण करते गुरुत्वाकर्षण 

तुझ्या स्तनात खूपसतो डोके 

शांत करते मला ते घर्षण 


आहेस आधी आई की बाई 

समजून घेण्याची का करू घाई 

तुझ्यापासून सुरू होतात

दोन डोंगर एक खाई 


तुझी माया तुझा ओलावा 

पण पैशाअभावी जगणे कठीण 

कळतच नाही कशी पकडू 

दुनियादारीची सक्त नागीण 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

किती लवकर सोडून गेलीस तू हे अपुले जग 

तुझ्यामागे उरली फक्त तगमग आणि तगमग 


कधीपासून वाट पाहतय स्मशान माझ्या शवाची 

आणि मी इकडे जिवंत ज्याची चाललीये झगमग 


माणूस मेला की संपून जातात शक्यता भेटीच्या 

वाटते अजून समजून घ्यायला हवे होते तुझे जग


मला आता भीती वाटते तुला लवकरच विसरेन 

जगरहाटी म्हणतीये सुरू कर पुन्हा नवे जग 


कळावयास काळ लागला त्यास नाही पंजा दात 

मी सिंहाच्या हाती दिला दूध भरून एक मग 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझसे मोहब्बत है तो है 

अगर ये बगावत है तो है 


फूल देता नहीं चढाता हुं 

अगर ये इबादत है तो है 


तुम महकती रहो उम्रभर 

गर ये रुहानियत है तो है 


खुली आँखोसे देख दुनिया 

नजरोंको शिकायत है तो है 


हाथ ना छोड महाद्वार रोडपे 

शहर से ये बगावत है तो है 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तिच्या घराच्या दारा पुढे बसावेसे वाटते 

दिवसातून एकदा तिला पहावेसे वाटते 


माहित नाही लाज की आणखी काही 

नाचताना तिला समोर मी नसावेसे वाटते 


वर्तमानात बहुदा करायला काही नाही 

भूतकाळाच्या जीवावर त्यांना उडावेसे वाटते 


जिथे तिथे त्यांना दिसू लागले अपमान 

अचानक हृदयांना का बडवावेसे वाटते 


स्वर्ग आहे नाही हा मुळात मुद्दाच नाही 

मरताना मरणोत्तर जीवन असावेसे वाटते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी म्हणतो शोध देशी 

ती म्हणते हो तू प्यारीस

व्हावे लागेल प्रेमासाठी

तुला माझा मस्त हॅरीस 


आवडतो ऋषी कपूर 

दिसतो मी मिथुनसारखा

तिला नवरा नको ज्याच्या

काळजात गांधी चरखा


मला हवी असते लंका 

हट्टाने मागते ती ट्रॉय 

शेवटी मीही होऊन जातो 

तिच्यासाठी ऑफीस बॉय 


कितीही मागितले तरी 

तेव्हाच मिळते प्रेमबळ 

तिच्यासाठी जेव्हा आणतो 

परदेशातून सीताफळ 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पाण्याचे कोणी दुध बनवतो कोणी बनवतो विष 

पाण्यास कोणी लाथ मारतो कोणी घेतो आशिष 


त्या उंदराला कसे पकडणार जो चिडवतो बिळामधून 

आणि मांजर शेवटी मांजर असते त्याला लागते आमिष 


प्रथम त्याने कोंबडी पळवली नंतर म्हणाला," तूच हवा" 

बकासुर फक्त खादाड असतो त्याची भूक असते सामिष 


माझ्यावरती भुंकत आहे आज-काल माझा कुत्रा

कोणता शत्रू देत आहे माझ्या विरुद्ध त्यास आशिष 


जग नेहमीच ज्याच्या त्याच्या चालते स्वभावाप्रमाणे 

स्वभाव गोष्टच अशी कि नाही बाळगता येत किल्मिष


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माहित नाही का परंतु तरीही टिकलेले आपलेपण आहे 

अजूनही आत तुला पाहून उडणारे हृदय टणटण आहे 


तुझा धर्म वेगळा आहे 

तुझी संस्कृती ही वेगळी 

बरोबर तुझ्या तलवारी गेल्या 

मेंदूत का त्यांची खणखण आहे 


मजहब हे सर्वच माणसाच्या जातीचे होते बालपण 

आता तू मोठी झालीस आता धर्म अडाणी पण आहे 


माणूस हा मूळचाच तसा भयाने आहे गांजलेला 

ईश्वर भयावर मात करण्यासाठी योजलेले केवळ वेपण आहे 


मला गमावून सुद्धा तुला वाटते तुझे सर्व काही आहे खरे 

पण स्पष्ट सांगतो तुझे जे आहे ते केवळ खोटे पण आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कावळायण श्रीधर तिळवे नाईक 


गाईच्या शापाने कावळा मरत नाही 

तिच्यावर बसतो पण तिच्या हिशेबाने बसत नाही 


त्याला कुठल्याही पाहुण्याची माहिती नसते 

पंढरीनाथ कोण हेही त्याला ठाऊक नाही 


फक्त एकच गोष्ट खरी तो बुद्धिमान आहे 

नदी समोर असताना हंड्यातून पाणी काढत नाही 


कधी कधी तोही आजारी पडत असतो 

पण बरे होण्यासाठी कोणताही मंत्र म्हणत नाही 


ना त्याला भूतकाळ दिसतो ना त्याला भविष्यकाळ 

उपस्थित वर्तमानावरून तो नजर हटवत नाही 


त्याला त्याचेही पूर्वज ठाऊक वा ओळखता येत नाहीत 

तो माणसाचा पूर्वज काय बघणार त्याला तो दिसत नाही 


तुम्ही म्हणू शकता की श्रीधर कावळा आहे 

मी म्हणेन दुर्दैवाने हे शहर कावळत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


इतकेही दुर्दैव असू नये कोणाचे 

आयुष्य असे नासू नये कोणाचे 


हुकू नयेत कुणाच्या अशा संध्या 

नशीब इतकेही डसू नये कोणाचे 


असे हाकलले जाऊ नये प्रत्येक घरातून 

रस्त्यावर घर वसू नये कोणाचे 


असे खुपसले जाऊ नयेत खंजीर 

शरीर गारद्यांच्यात फसू नये कोणाचे 


आता निसर्गाने मला मृत्यू द्यावा 

यातनात जगणे ठसठसू नये कुणाचे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एकी बरोबर माझं जमलं नाही 

आश्चर्य हृदय माझं दमलं नाही 


आता जरी मी व्हेंटिलेटरवर आहे 

अस्तित्व घायकुतीपुढं नमलं नाही 


ती येताक्षणी फुलांचा स्फोट झाला 

व्हिज्युअल छान पण घमघमलं नाही 


तुझ्या श्वासावरही बंदी घालणार 

फरमान तर काढलं पण जमलं नाही 


तिच्यापुढं एकदाच घडलं होतं 

आयुष्य पुन्हा तसं दुमदुमलं नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एक कुंभ आहे एक करना आहे 

एक करणा आहे 


त्याच्या तल्हाशी एक मनु 

एक स्मृति



तिला मी हवा फक्त रिप्लेसमेंट म्हणून 

जुना पुन्हा परत आला डिस्प्लेसमेंट म्हणून 


तिच्या आयुष्यात आता मी कुठेही नाही 

कुठे जावे मी आता प्लेसमेंट म्हणून 


हा एकतीस डिसेंबर बहुधा वाया जाणार 

कोणीच सापडलेले नाही रिप्लेसमेंट म्हणून 


पोरीच्या आयुष्यात कायम प्रथम असावे 

परवडत नाही आयुष्य रिप्लेसमेंट म्हणून 


मी एका गुंडाला चुकून प्रवेश दिला 

मग महागुंड आला रिप्लेसमेंट म्हणून 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कसेबसे जगायचे असे तसे जगायचे 

या जगात जिवंत मी जगास दाखवायचे

मी स्वतःला आतून ओळखून आहे 

हेच थोर आहे की जिवंत अजून आहे 


प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये वेगळा उमटतो 

प्रत्येकासाठी माझी वेगळी धून आहे 


त्यांनी माझ्या अस्तित्वाला सपाट मानले

हिमालय झालो तरी त्यांचा भ्रम टिकून आहे 


जे सर्वत्र उपस्थित आहे तेच खरे आहे 

वाईट याचे वाटते की सर्व कोमेजून आहे 


ती रेकॉर्डसारखी मला ऐकत राहिली 

माहित नाही किती ती कान टिकवून आहे 


तो स्वप्नामध्ये आभाळाला आदेश देतो 

जागा झाला की म्हणतो अरे मी अजून आहे 


मी तिच्या घरामध्ये सापडलो इतकेच 

कळाले नाही आत्महत्या की खून आहे 


मेल्यानंतर असण्याची स्वप्ने पडली नाहीत 

मेल्यानंतर मी फक्त आठवणीत जून आहे 


 श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

उडवून संन्यासाची चेष्टा

लोक निघून गेलेत 

आणि आपण इकडे अत्यंत अस्वस्थ 


आपले आयुष्य कुठे कुठे कसे वाया गेले 

स्वभावामुळे 

याची उदाहरणे 


खोलीभर पसरले डास 

जाताना दार ही बंद नाही केलेले 


आपण डासांना मारतो म्हणून मोक्ष मिळत नाही का ?


गल्लीतला भेलवाला सुद्धा म्हणाला 

साहेब भक्ती करा कलियुग आहे 

भक्ती शिवाय मोक्ष नाही 

मी हवे तर तुम्हाला शंकराची पिंड आणून देतो 

ठेवा आणि लागा कामाला 


साधूंची भाऊ गर्दी झालेली 

कोण खोटा कोण खरा 

ज्याला कष्ट करायचे नाहीत 

अशा लोकांच्या अंगावर भगवा 


कोणाला एक्सपोज करायला जावे 

तर तो दाखवतो पोट 

शेवटी संन्यास हा सुद्धा काही जणांचा पोट भरण्याचा व्यवसाय 


लोक ताडताड बोलून गेलेत 

आणि आपण अस्वस्थ 


आपल्याला आपलेच अंतिम टोक का सापडू नये ?

की आपले वायरिंग चुकीचे झालेले आहे ?


मोक्षाला सुद्धा सेल्फ कॉन्फिडन्स लागतो ?


एक आभाळ बघून 

आपण घर सोडले 

घर तर निघून गेले 

आणि आभाळ पूर्ण ताफ्यासह फापलले


आयुष्य वाया घालवलंस राजा 

मी बघ नास्तिक 

लाखो कमावतो हजारो उडवतो 

संन्यास सोडलास तर धंदा टाकून देईन 

पार्टनरशिप करूया  


आपण तर काहीच आखले नव्हते 

अचानक आपल्या मोक्षावरची मोक्ष परिषद 


आपल्यासारखे असे कित्येक लाखो बरबाद झाले असतील 

त्यांच्या नोंदी कोण ठेवतो ?

एकदा समाजातून बाहेर पडलात 

की तुम्हाला नंबरिंग सुद्धा मिळत नाही 


या काम करा आणि चालते व्हा 


मी बसलोय माझे सगळे पाय आत घेऊन 

आतल्या आत लंगडत 


श्रीधर तिळवे नाईक 

( चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)

एक कुंभ आहे एक कर्ण आहे 

एक कर्णा आहे 


कोण झोपी गेलय

अद्याप माहित नाही 

युद्ध सुरू झाले की कळेल 


कुंभ "मेळा " भरवतो की नाही 

कर्ण युद्ध घोषणा करतो की नाही 

आणि कर्णा शत्रूंचा आवाज ऐकतो की नाही 


नाहीतर काय नेहमीचेच आहे 

उठायचे आणि 

कल्पनेतल्या कल्पनेत मारले जायचे 


राम सर्वत्र टपूनच असतात 

धनुष्यबाण सर्वत्र टपूनच असते 

आणि मारण्याची दिलेली कारणे सुद्धा टपून असतात 

चॉईस तर फक्त मरा इतकाच असतो 


कारण लिहिणारा तुमच्या बाजूचा 

शेवटी इतिहास कसा घडला त्यापेक्षा कोणी लिहिला 

हे महत्त्वाचे 


तेव्हा कुंभकर्ण तुमच्या बाजूने असून चालत नाही 

सोबत वाल्मिकी सुद्धा तुमच्या सेनेत असावा लागतो 


बाकी कल्पनाविलास ही तर तुमची मुख्य ताकद आहे 

दंतकथेत भलेभले हत्ती झुलवत ठेवले तुम्ही लोकांनी 


आले होते घोड्यावर बसून 

तेही आश्रयाला 

आणि घोड्यावर बसता बसता 

गाढवाचा नांगर फिरवला 

द्रविड संस्कृतीवरून 


एका दुष्काळात आम्ही उत्तर सोडली  

दक्षिणेत पळून आलो

त्यानंतर रिकाम्या झालेल्या जागी तुम्ही आलात 


 जणू पेपर कोरा होता 

आणि तुम्ही आमच्या प्रदेशाचे विद्यार्थी 

आता तुम्ही म्हणताय

आम्ही दक्षिणेत सुद्धा घुसणार 


काही हरकत नाही 

खयाली पुलाव ही तुमची नेहमीच सर्वोत्कृष्ट डिश राहिलेली आहे 

पण इतिहास महाकाव्यात शोधू नका 


खऱ्या इतिहासात सातवाहनांनी मारला 

दुसरा पुलकेशिने हाणला 

मग मराठ्यांनी तर कबरच बांधली 

एवढेच लक्षात ठेवा  


प्रत्यक्ष विजय मिळाले नाही की 

दुबळे लोक 

कल्पनेत विजय मिळवून 

महाकाव्य लिहितात 

तेच खरे आहेत असा अपप्रचार करायला लागतात 

पण शेवटी काल्पनिक ते काल्पनिकच असते 


तुमच्याच हिशेबाने गेले तर 

अजून कुंभकर्ण झोपलेला आहे म्हणून बरे 


ज्या दिवशी उठेल 

त्या दिवसापासून शेवटचे गाडण्याची तयारी सुरू होईल 

तो झोपलाय 


कारण आपण आपल्या क्रोधाला नियंत्रण घालू शकत नाही हे त्याला कळलेले आहे 

तेव्हा हे काल्पनिक इतिहास थांबवा 


जेव्हा खरा इतिहास चालायला लागेल 

तेव्हा पुन्हा एकदा गौतमीपुत्र सातकर्णी उत्तरेला पुन्हा गाडेल

पुन्हा एकदा पुलकेशी हर्षवर्धनला फेटाळून लावेल 

आणि धनाजी संताजींचे घोडे पुन्हा एकदा इतके पाण्यात दिसतील 

की कबर कुठे लागली कळणार नाही 


तेव्हा उगाच न झेपणारे चॅलेंज देऊ नका 

आमच्यातले काही फितूर असतील 


तर तेही आता गाडले जातील 

दया माया दाखवणे आता आम्हीही बंद करणार आहोत 

तेव्हा नीट विचार करा


काल्पनिक महाकाव्य लिहायलाही 

तुम्हाला आमच्या गणपतीचे दात लागले होते एवढे लक्षात ठेवा 


त्यावेळीही तुम्ही लिहू शकत नव्हता 

आणि आता तर आम्ही लिहूही देणार नाही 


आता दक्षिण म्हणजे पाच दिवसाचा गणपती नसेल 

वर्षभर चालणारा गणेशोत्सव असेल 


आणि त्याचे नेतृत्व मुरूगन करेल

श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माझ्या मधून बाहेर आला एक हरणटोळ

तो रस्ता सरळ झाला जो होता घोळ 


मी थांबलो होतो कारण लागली होती कीड 

ती निघून गेली त्यासह निघून गेली भीड 


चीडचीड आता बाकी आणि तिचा उत्पात

आरशाचा चेहऱ्यांस का कळेल लागला नाद 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

घरी पन्नास पुस्तके पंचवीस तलवारी 

मी करत नाही कधी विठ्ठलाची वारी 


भेटण्याआधी होते खूप सांगण्यासारखे 

पण भेटीस घेऊन आली परदेशातून फेरारी 


मी तिच्या कातडीला गोऱ्या भुललो का 

कशा त्वचेतून ऐकू आल्या इंडियन सतारी 


लोक सावध करत होते यात फक्त बरबादी 

मला बहुदा व्हायचे होते स्वतःतून फरारी 


असाही मरणार होतो तसाही मरणार होतो 

तिच्यावर मरून मेलो हीही तशी भरारी 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आलोच आहोत तर जगू हसत नाचत

आनंदाने जगण्याच्या जत्रेत वावरत


तुझ्यापेक्षा तुझे स्वप्न जास्त चांगले 

तुटले तरी लागत नाही बसावे आवरत 


निर्व्यसनी मी,डोळ्यात दारू दिसली नाही 

मुलगी दिसली जी होती जगत घाबरत 


कुठे देण्याघेण्याचा हिशेब मांडतेस 

हिशेब नाही गरिबाला श्रीमंत बनवत 


खुश रहा जोवर दुःख एक रन घेते 

आणि सुख येते थेट सिक्स मारत 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सर्व बाजूंनी जात आहे 

सर्व दिशांनी येत आहे 


भिंत टाकते निघून जाते 

सर्व घरांना ठासत आहे 


कितीही आपट ऐकत नाही 

नको तिथेही ताठ आहे 


प्रत्येक काळजात तिचे विष 

प्रत्येक काळीज तिच्यात मरत आहे 


होमो सेपियन दिसणे बंद 

आंधळ्याला आंधळा दाखवत आहे 


ज्याने ज्याने विरोध केला 

जातीसकट तो स्मशानात आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नैसर्गिक आहे आगही एक मोह आहे 

तिच्या गंधाची वेड्या बागही एक मोह आहे 


किती झपाटले आहे काही कळते का

तिच्या वेणीचा हा नागही एक मोह आहे 


शंकाच नाही तुला तो सतत खुणावतो आहे 

कॅरेक्टर वर पडलेला डागही एक मोह आहे 


तिच्या काळजातील लाटा ऐकतोयेस खऱ्या 

कसा बुडलास कळणार नाही डोहही एक मोह आहे


तू आत्तापासूनच प्रसिद्धीची गणिते मांडायला लागलास 

याचा अर्थ स्पष्ट आहे तुझा विद्रोह ही एक मोह आहे 


तुला त्यागाचे व्यसन लागले आहे 

समजून घे त्यागही एक मोह आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दुकानात काम करत होतो आणि दुकानाच्या दारात गझल 

खूप जण विचारतात कशी काय ठेवू शकतो तू तुकारामात गझल 


ती खरेदी करते काही की मला बघण्यासाठी वळसा घालते 

गिऱ्हाईक म्हणून दुकानात घेतो म्हणतो ,"तू फक्त घरात गझल "


त्यांनी दरवाजा बंद केला पण तू तर हृदयच बंद करून टाकले 

आणि मी तर असा माणूस आहे 

ठेवू शकत नाही अपमानात गझल 


माझ्यावर फिदा नाही ठीकच आहे नवऱ्यावर पूर्ण फिदा हो

शेवटी सार्थकी लागत असते 

फिदा होणाऱ्या काळजात गझल 


पाप पुण्याच्या हिशेब नाही आहे फक्त एकच हिशेब 

जो गजलेच्या प्रेमात असतो त्याच्याच असते प्रेमात गझल 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हूल देऊन गेलेले सारे क्षण तू येताच पुन्हा पुन्हा समोर 

सहज फोडता येईल वाटली होती काच पुन्हा पुन्हा समोर 


ऐकून होतो स्त्रीला तर स्वातंत्र्य हवे अन्य काही नको 

पण येत राहतो तुझा बुरखा त्याची टाच पुन्हा पुन्हा समोर 


का अशी समोर हसतेस जसा मी काही अस्तित्वातच नाही 

वर टाळण्याचा मला करत राहतेस नाच पुन्हा पुन्हा समोर 


दुर्लक्ष केले तर असे काही करतेस की लक्ष द्यावे लागते 

काही करता येत नाही असा नाजूक डाच पुन्हा पुन्हा समोर 


पिक्चर बघायला मी निवडलेली टॉकीज कशी सापडते 

का सोसावा मी तुझा नवरा असा उगाच पुन्हा पुन्हा समोर 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कितीही थुंक व्यवस्थेवर व्यवस्था हसते 

तू बोटांना शक्तिमान कर व्यवस्था नाचते


चांगुलपणाचाही तिला प्रॉब्लेम आहे

खूप चांगली झाली की व्यवस्था थकते 


व्यवस्था थकली की दुष्ट ताब्यात घेतात 

चांगुलपणाला मग राबव राबव राबवते 


मीच व्यवस्था आहे ही व्यवस्था मी आहे 

माझ्यात तिचे तिच्यात माझे काय कुठे कळते 


जन्मणे म्हणजे व्यवस्थेत दाखल होणे मरणे बाहेर होणे 

या दरम्यान जे जगते ते जगते मरते ते मरते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काहीच करू शकत नाही 

याचाही वैताग आलाय 

आणि स्वतःचा तिरस्कार 

त्याच्या मागोमाग आलाय 


दिसू नयेत भिकारी म्हणून 

करू का मी दरवाजा बंद

कधी वाटते आपणालाच

बधिरपणा जागोजाग आलाय 


प्रत्येक जण का पळतो आहे

ही तर फक्त अफवा आहे 

"ज्याच्या पोटात विष आहे 

असा जंगलात नाग आलाय "


आकाश कधीही दिसले नाही 

आयुष्य बोगद्यामध्ये काढले 

चोकअप कुठे कळले नाही 

स्वतःशी पुटपुटलो ,"राग आलाय" 


परवा तिने संकेत दिला 

कालच तिने लाईन दिली

आज म्हणे तिच्या गल्लीत 

तिच्या चरित्रावर डाग आलाय 


श्रीधर तिळवे नाईक 


( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी सह्याद्री पर्वताइतका जुना आहे 

णि आत्ताच जन्मलो इतका नवा आहे 


त्याच्या भुकेने कित्येक घोडे फस्त केले 

त्याच्या आयुष्याला लागलेला घोडा आहे 


ती आल्यापासून हृदय कित्येक टन झाले 

पण हेही खरे मी तेव्हापासून हलका आहे 


अचूक वेळी डोळ्यांमध्ये नद्या आणते 

मीही नाईलाजाने म्हणतो मी कोरडा आहे 


मृत्यू येईपर्यंत कदाचित संपणार नाही 

मृत्यू आल्यानंतर सर्व लापता आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

रानटी गोष्टींना सभ्य बनवणे 

हळूहळू स्वतःला माणूस बनवणे 


काढून टाकणं तलवार काळजातून 

रक्ताचे मुलायम सूत बनवणे 


वासनेच्या पलीकडे असते बाई 

ओळखून काहींना बहीण बनवणे 


शब्द आरटीफिशियल असतो 

तरीही शब्दांचे वचन बनवणे 


माहित नाही योग्य की अयोग्य 

नैसर्गिकपासून स्वतःस कृत्रिम बनवणे 


आता आलाच आहेस जगात तू 

स्वीकार आहे आवश्यक बनवणे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

साऱ्या दुःखातून गेलो आहे 

मी आतूनच मेलो आहे 


नको विचारू कोवळ्या आठवणी 

फुलांच्याकडून कातरलेलो आहे 


नातीगोती सारी पाहून झाली 

त्यांना मी आतून भ्यालेलो आहे 


जगतो कारण जगवायचे आहे 

जरी जगण्याने डावललेलो आहे 


माझ्याकडे नको सुगंध मागु 

पाठीच्या कण्यात करपलेलो आहे 


माझ्या हातांनाच यश नाही 

प्रयत्नात परमेश्वर झालेलो आहे 


नको येऊस माझ्या आयुष्यात 

प्रेमाने पूर्ण हादरलेलो आहे 


एक मेली दुसरी निघून गेली 

काळजात पूर्ण झिजलेलो आहे 


जगण्याआधीच माझे जगणे संपले 

आनंद आहे की आता मेलो आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


घड्याळ श्रीधर तिळवे नाईक 

ज्याचं कपाळच मावळलय 

त्याने प्राक्तनाची मोजदाद करू नये 


मी पाण्याच्या वृक्षाखाली कधीच उभा राहिलो नाही 

अंगावर बर्फ कोसळेल 

याचे भय होते 


माझ्या मुळात खोल नद्या 

अवांतर समुद्र 

आणि पुन्हा पुन्हा परतणाऱ्या नावा 


ऋतूंचे डोळे झाकणारे हात आसपास 

काळजाचा पाषाण खंड 

आणि त्याला मंदिर समजणारे देव 

हिरव्या रंगाचा विनाश काळ 

हेतू नसलेले आरंभ 

इच्छा छत्री सारख्या उघडल्या जातात 

आणि सावली बनून चिपकतात 


पक्षांच्या चोचीत शकुन असण्याचे दिवस 

कधीच सूर्याला पत्ता विचारता विचारता 

रात्रीमध्ये गायब 


गाणे सुद्धा कॅन्सर सारखे फुटत जाणार असेल 

तर त्या प्रदेशाला दिशा नसते 


२ 


शब्दांची अर्बन उपस्थिती 

पर्वतांना श्वास घ्यायला जागा कुठे आहे 

बेंबीला झोंबा झोंबी चा प्रकाश 


मांड्यांच्या दीपगृहामध्ये थांबलेला प्रवासी 


यात्रा शरीरा इतक्या पारदर्शक कधी होतात ?



आवाजांच्या खिडक्या सर्वत्र खुल्या 

डोळ्यांनी दिलेली आमंत्रणे कधी वेश्याव्यवसायाकडे वळली कळले नाही 


चेहरा हलवला की प्रतिबिंब कॅन्सल होते 


गंधमोहाचा नाकात गजबजाट 

श्वास अध्यक्षच असतात जगण्याच्या कुठल्याही समारंभात 


फुलांचा ड्रेस घातला म्हणून कळी होता येते काय ? 


निसर्गावरचे ताणले गेलेले आक्रमण 


संक्रमण संक्रमण संक्रमण 


संपतच नाही 


वाघ दिसला की हरणे स्वप्ने पाहायला विसरतात 

आता वाघाची जागा माणसांनी घेतलेली 


कटाक्ष्यांच्यामधल्या रात्री 

गवाक्षांच्या मधले दिवस 

माणूस हे पृथ्वीवरचे निसर्गाने लावलेले घड्याळ आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

भय श्रीधर तिळवे नाईक 

माझ्या लांबी इतकी नदी

माझ्या उंची इतका पर्वत 


मी मी मी 


पापण्यावर डोळे विखुरले की असे होते


झाडांचा केस संभार 

झाडांचा केस संहार 

कुठलीही द्रौपदी आता वेणी बांधायला तयार नाही 


 बॉब कट बॉब कट 


रक्तामध्ये मांडून ठेवलेले लाल भडक फर्निचर 

पायऱ्यांची म्हातारी पुटपुट 

वय झटपट निघून गेल्याची चुटपुट 


हे एक बरे आहे 

मधमाशा झिजत नाहीत 

आणि मधुभक्षण ताजे 


तात्कालीक आरशांनासुद्धा चेहरे अमर करण्याचे स्वप्न पडते 


एक स्थिर झालेला देव 

दिलासा देत 

खुलासा नाकारत 


काळ निघून गेला 

पण वेळ आली नाही 

मधोमध क्षणासारखे 

धुळीकण  


जखमांचा क्षीण आरडाओरडा


भय मरणाचे 

रोज व्यभिचार करून येते  



सापडत नाही तरी शोधत बसणे 

म्हणजेच तर आयुष्य जगणे 


एकांत स्वतःला लिहितो तेव्हा त्याची कविता होते 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

एक खळबळ युगाची घेऊन तुझ्या दारी आलो आहे 

तरी ही मला वाटते की नुकताच तर निघालो आहे 


कितीही येवोत भिंती आता तुझ्या माझ्या दरम्यान 

प्रेम माझे इतके गहिरे की मी ज्ञानेश्वर झालो आहे   


तुझ्या पॉझिटिव्ह कटाक्षासाठी चाललेली ही प्रतीक्षा 

कित्येक वेळा डोळे पाहून मी ढगात बुडालो आहे 


स्वतःचे हे दुःखही आता सुखदायक वाटू लागले 

लोक उगाच म्हणतात की मी हळवा झालो आहे 


तुझा भोळा चेहरा बघून मी फिदा झालेलो नाही 

अचानक काही क्लिक झाले ते काय शोधायला निघालो आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माझ्या आत मी आहे 

माझ्या बाहेरही मीच आहे 

ब्रह्म म्हणून ?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पाऊस श्रीधर तिळवे नाईक 


द्राक्षे सांडली जाताहेत 

दारूच्या चेहरे पट्टीत 

गहनता रिपीट करत नाही स्वतःला 

म्हणून तिचे चारित्र्यहनन करता येत नाही 


शुद्ध चरित्राचे पाणी 


एक क्षणकालिक पक्षी 

आकाशावर मात करत ढगाळ 

मी सावली बिघडवलेली नाही 

पण पचवलेली ही नाही 

मी सावली सकट भिजतोय 


मुली झाडाचे सर्वोत्तम फळ असल्यासारख्या 

वाटचाल करतायेत 


आपण फक्त यांनाच पाहायला आलो आहोत की काय ?


शाळेत जाताना कायमच शिशिर घेऊन जाणारा माझा चेहरा 

न्यू कॉलेजमध्ये वसंत वसंत 


आगीला आग लावत जा असे सांगणार कसे 


आपणाला ज्योत दिसते 

तोवर जग ठीकच असते 


सुरक्षितता गिळून बसलेल्या भिंती 

कधीही उंच उडी मारायला स्पर्धेत भाग घेतील अशा स्टाईलित


पावसाळा म्हणजे पहिला शॉवर 

बाकी सगळे सेकंड हॅन्ड 


पाऊस पडतोय 

तो एन्जॉय करावा 

की छत्री उघडून 

त्याला सेंड ऑफ द्यावा 


इमारतीतून दशके सरकतायेत 

इतिहास सांडत 


पावसाळा नेमके काय धुतो आहे ? 


तरंगणारे प्रत्येक खाली कोसळते 

हाच तर मेसेज नाही ना ?


कोणी सांगावे 

पृथ्वी हीसुद्धा 

एखाद्या पावसाळ्याचा थेंब असेल 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जखमा सुद्धा आता पॉलिशिंग मागतात 

रोजच्या रोज त्यांचे ब्रेन वॉशिंग मागतात 


जगतात जसा जगण्याचा आरोप आला आहे 

आयुष्याच्या कस्टडीत सेल्फ टॉर्चरिंग मागतात 


समुद्राने तिच्याकडे कित्येक ढग पाठवले 

पावसाळे प्रतिसाद अटॅकिंग मागतात 


ती दुसऱ्याची झाली इतकेच आता सत्य 

बस मेंदू खुलासे सॅटिसफाइंग मागतात 


ती समोर आली म्हणून मी माझी गल्ली सोडली 

तिच्या आठवणी सर्टिफिकेट लिविंग मागतात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


चाफ्याला काटे नसतात गंध असतो 

तो ज्योतीसारखा पिवळा मंद असतो 


तुझा आदर्श लाल गुलाब आहे 

जिथे निसर्गतः काटा संग असतो 


गुलाबाने भारवण्याचा काळ संपला 

या नव्या काळात परफ्यूम अंग असतो 


विवशता धडक देतच राहणार 

प्रत्येक युगात प्रेमाचा हा ढंग असतो 


पुरुषाच्या काठिण्यावर विश्वास नको ठेवू 

पार्टीकल नाही तोही तरंग असतो 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माँ की कोखसे पैदा हुआ आखरी मंजिल मौत है 

कितना साफ नक्शा है और तू कह रहा है मुश्किल है 


लोग कह रहे थे की झूठ तो बेइंतहा फैल रहा है 

मुझे रत्तीभर भी मिला नही बस चुल्लूभर भाषा का खेल है  


मरनेके उपाय कितने होते है ज्यादा से ज्यादा सौ 

जीने के उपाय ढुंढू तो हर इन्सान एक उपाय है 


दंगाफसाद करने वाला फसाद करके चला गया 

अंत मे अब पता चला की मूल मुजरिम ईश्वर है 


आईना समझता रहा की उसने सही शकल दिखाई 

आईने को पता नही कि अब हर चेहरे पे मास्क है 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ती विषय होती तिचा अभ्यास केला आणि फेल झालो 

विषय म्हणून कळलीच नाही वापरला गेलेला सेल झालो


खेळणे शिकला आहे जरी देह आयुष्याच्या उन्हामध्ये 

मी तेव्हा आऊट झालो जेव्हा तिच्या सावलीचा झेल झालो 


भावणे संपते तेव्हाही नाते निभवावे लागते ओढावे लागते 

शेवटी नाते ओढत ओढत मीच कैदी मी जेल झालो 


आधीचा क्षण मेला पाहिजे म्हणजे नवा क्षण जगता येतो

आधीचे क्षण मेलेच नाहीत माझ्या भूतकाळाची वेल झालो


होलसेल खोलता आले नाही रिटेल तर संपूर्ण कोसळले 

आयुष्याच्या बाजारामध्ये रस्त्याच्या मालाचा सेल झालो 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एका पेक्षा एक फालतू दंतकथा 

खोटे रचून गंडवण्याची महत्वकांक्षा 


आपण रक्त पितोय याची लाज सुद्धा नाही 

डासापासून तर नाही वंश सुरू झाला ?


ज्यांना ढोलकीवर थाप देता येत नाही 

त्यांनी देशाचा करून टाकला तमाशा 


असे कसाई आहेत गाईला पूज्य मानतात 

33 कोटी काढतात पोटातून देत देवाचा हवाला 


बागा जाळणाऱ्या भामट्यांचे करायचे काय 

जे सुरू करणार म्हणतात अत्तराचा कारखाना 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एक बूंद शराब की तेरी आँखोमें बैठकर मैने पी थी 

आजतक मयखानेसे नही उठा जैसे उम्रभरकेलिये जिंदगी भरी थी 


जानता हूं अच्छी तरह से तू कभी साकी थी ही नही 

मैने ही मेरी जिंदगी तेरी पलकोंसे सी थी 


तेरी बेरुखी लाजवाब है मगर अब वो नाकामयाब है 

मैने कल रात देखा मेरी मोहब्बत तेरे घरसे निकली थी 


जिसमे जान होती है उसमे ही जान चली जाती है 

किसी जमाने मे जिंदा था कलरात इश्ककी लाश मेरे सामने पडी थी


किसको रुकना हैं अब तेरे चेहरेके सामने 

ये वो गलीही नहीं जिसपे मैंने कभी दस्तक दी थी 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू लोकांचं भलं करावं इतकी लोकांची तरी लायकी आहे काय 

तू दिवस रात्र करतोस रियाज त्यांच्याकडे पण गायकी आहे काय 


एकत्र आले म्हणजे पाठिंबा नसतो स्वार्थासाठी सर्वजण एकत्र येतात 

आता तुझ्यामागे गर्दी तिच्याकडे तुझी दर्दी सायकी आहे काय 


हे केवळ मुंग्यांचे वारूळ आहे तिच्यामध्ये वेरूळ शोधू नकोस 

अद्भुत भित्तीपट घडवायचा पण मुंग्यांकडे घडवायची लायकी आहे काय 


उद्या आणखी एक मोठा नेता येईल जो तुझ्यापेक्षा त्यांना मोठा वाटेल 

तृष्णांच्या डोलाऱ्यावर नाचणारे नाग आत निष्ठावान सायकी आहे काय 


हा चंचल स्वार्थाचा महासागर आपल्याच हिशेबाने लाटा उठवणार 

अत्यंत परस्पर उठवणार वादळे ती पेलण्याची तुझ्याकडे नायकी आहे काय 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आयुष्यात तो कधी हरला नाही 

तो कधी शेतात उतरला नाही 


शहरात बसून त्याने निर्णय घेतले 

गावात यायला कधी घाबरला नाही


पाणी जवळच होते स्वतःचे नव्हते 

हा कधी पाण्याने भरला नाही 


सगळ्या देव देवता पूजून झाल्या 

पावसाळा अजून कसा अवतरला नाही 


मोहरण्याचे दिवस कायमचे गेले 

एक म्हातारा वर्षभर थरथरला नाही


नाईलाजाने माझी जमीन विकली 

काळजाचा एक तुकडा हे कधी विसरला नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जितना लोगों से मिला उतना तनहा हो गया 

ये किस तरह का समाज है मैं अकेला हो गया 


जो जिंदा रहने के फिराक मे थे उनका कुछ ना हुआ 

मै मर मिटने वालों के दिल में हौसला हो गया 


अगर पुरा समाज ही गलत है तो किससे दोस्ती करे 

किसी ना किसी मुद्दे पर हर दोस्तसे झगडा हो गया 


कौन कैसे दे रहा है किसी को कुछ भी पता नही 

मगर हर कोई कह रहा है उसके साथ धोका हो गया 


वे कौन से लोग थे जिनके पास कोई सब्र ना था 

मै आराम फर्मा रहा था उनकेलिये मरा हुआ हो गया


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पूर्ण झाला नाही अभ्यास अजून परीक्षा बाकी आहे 

आत्ताच बोर वाटतोय प्रयास अजून परीक्षा बाकी आहे 


आयुष्यात इतक्या परीक्षा देऊन मला अजूनही समजलेलं नाही 

परीक्षेत असतं काय खास अजून परीक्षा बाकी आहे 


ही परीक्षा आहे की अत्तर खाना सदा सदैव महकणारा 

चोवीस तास नाकात वास अजून परीक्षा बाकी आहे 


शायनिंग मारण्यासाठीच का मी सायन्स साईड घेतली होती 

अटेंड करावा वाटत नाही तास अजून परीक्षा बाकी आहे 


काळजाचं ऍपारेटस तुटलं समजलो होतो अनब्रेकेबल 

सायन्स साईडच करू का नापास अजून परीक्षा बाकी आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

धर्म पिऊन तो मस्त झिंगला आहे 

जरी आतून त्याचा आत्मा हलला आहे 


देवाशिवाय त्याला काही ऐकू येत नाही 

कळत नाही दगडाला इतका का भुलला आहे 


देह जाणार असे वाटतात डॉक्टर कडे जातो 

होताक्षणीच बरे त्याला देव आठवला आहे 


कष्ट केल्याशिवाय साधी भाकरी मिळत नाही 

तरीही त्याचा घाम ढगात गडगडला आहे 


गांजा पिल्यासारखे सगळे ऐकत आहेत 

कोणी महान गांजा पिऊन पूर्वी बडबडला आहे 


शिळ्या दगडाला ते ताजी फुले अर्पण करतात 

हे दृश्य पाहून रात्री बगीचा रडला आहे 


त्याला भोंदू म्हणावे तर तल्लीनता अस्सल असते 

नेमकी तहान कसली जिच्यात जीव तडफडला आहे 


देवळातला दगड कसा मेंदूत शिफ्ट होतो 

हा कोणता रानटी माणूस आत दडला आहे 


त्याच्या खऱ्या प्रश्नाचेही काही त्याला वाटेना 

आणि खोट्या प्रश्नामध्ये तो अवघडला आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्पंदने दोन आलिंगन 

एकच असते पेच 

टेचात निघतो अश्व 

न लागता कोठे ठेच 


नाटक म्हणू की सत्य 

शालीनता सोडून विनय 

घेतो चुंबन लाजेचे 

शरीर बनते पेय 


वस्त्रांचे गळते संकट 

संकेत गाठती कोपरे 

प्राचीन शरीराचे ती 

खोलून बसते चोपडे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुटलेल्या तारा हृदय वाद्य वाजणारे 

तुझे प्रेम नरभक्षक मला रक्त पाजणारे 


का विश्वास वाटला नाही माझ्या वचनाचा 

का गुंड पाठवलेस माझ्यावर माजणारे 


जातो एकदा म्हटले चाललो होतोच की 

कशाला तू बनवले आपले लफडे गाजणारे 


तुला कसे वाटले की काही केलीस तरी सोडेन 

जाब तर विचारणारच मेंदू खाजणारे 


वचन दिलेस म्हणून सोडतो हिंसा तुझी विसरेन 

आठवत राहीन तुझे डोळे मला पाहून लाजणारे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मिट्टी भी हवा मे तैर रही हैं 

उडानका हिस्सा रह रही हैं 


जो आँखोसे देखा धोखा था 

दुनिया कुछ अलगही चल रही हैं 


देखते देखते चांद बना पत्थर 

और पत्थर में जान धडक रही है 


देखनेवाला और दिखनेवाला चमडी 

गहराई नजरसे फिसल रही है 


हम बीच मे ही हो रहे हैं खतम 

और हमारे बगैर दुनिया फैल रही है  


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

प्रेरणा राजनारायण 

जनता तमाशा पाहायला सोकावलेली आहे 

नेते म्हणून सोंगाड्यांची निवड केली आहे 


कामे नका करू काम केल्याचा अभिनय करा 

पीटात मतदारांनी नव्हे प्रेक्षकांनी गर्दी केली आहे 


सर्वात प्रथम डायलॉग डिलिव्हरी करायला शिका 

जनतेला राजकुमार हवा तिने मागणी केली आहे 


उगाच लोकशाही वगैरे अंगाला लावून घेऊ नका 

आत्ताच तिची शवयात्रा माझ्या पुढून गेली आहे 


या देशात जन्माला येऊन मी धन्य झालो 

श्वासापासून स्मशानापर्यंत मी भूमिका केली आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आसपास आज-काल चांगली बातमी आहे कुठे 

या वर्तमानात आनंदाची पक्की हमी आहे कुठे 


कितीही भर घातली तरी माती जाते तोट्यातच 

काय वजा होते आहे नेमकी कमी आहे कुठे 


माझ्या गावात अजूनही मातीचे घर तेवते आहे 

गावात अर्बन रक्तातली सिमेंटची गरमी आहे कुठे 


मी अजूनही पुरेसा रोमांटिक नाही झालेलो 

तुझ्या पदरात पुरेशी घनतमी आहे कुठे 


गेले ते दिन गेले म्हणत कोण दिवस सोडतो 

वर्तमानात जगतो असा निखळ मी आहे कुठे 


मला सांगितले होते किमान आठ दहा मिळतीलच 

एकही आढळेना इथे माझा डमी आहे कुठे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

प्रथम वाटले होते ते दुरून आंबे पाडत आहेत

आता कळले लुटत नाहीत आयुष्यच ओरबाडत आहेत 


शेवटी सत्तेवरती आला तेव्हा त्याचा स्वभाव कळला 

जो त्याचा विरोधक आहे त्याला तो गाडत आहे 


तो आमचाच हात होता ज्याने हातात कुऱ्हाड दिली 

आता आमच्याच घरात शिरून आमचे घर पाडत आहे 


परमेश्वराच्या नावाने त्याने भल्याभल्यांना गुंडाळले 

वर आव आणला त्याला प्रत्यक्ष परमेश्वर धाडत आहे 


आपला गुन्हा काय होता आपला सहभाग काय होता 

आम्ही प्रश्न विचारण्याआधीच तो जीभ झाडत आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गाढवाच्या गांडीत गेला इतिहास 

नुसत्या आभासातच मेला इतिहास  


हजार वर्षे मार खातात लाज नाही 

नपुसंकत्वाने साजरा केला इतिहास 


कसले खोटे खोटे अभिमान आहेत 

तुटक तुटक दोऱ्यांचा शेला इतिहास 


कुठे वैज्ञानिकता शोधतोस ज्याच्या 

हातात राज्य त्याचा चेला इतिहास


आता तरी काही नवीन घडवा 

चालत आलेलाच आहे मेलेला इतिहास 

श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

खूप काही घडले नको त्या वयात 

नको ते फडफडले नको त्या वयात 


माहित नाही होते काय फुलात 

फुलपाखरू तडफडले नको त्या वयात 


वासना खिळून राहिली त्वचेवरती

काळीज गडबडले नको त्या वयात  


नको त्या जागेत उठल्या लाटा

समुद्र धडपडले नको त्या वयात 


चुंबनाचाही हळूहळू विसर पडला 

होते काय कडकडले नको त्या वयात 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शेवटची गाडी येईल म्हणून 

वाट पाहतोय 

आशांचे निखारे डोळ्यात पेटते ठेवत 


घरातून पळून आलोय 

की जळून आलोय 

माहित नाही 


मिरजेच्या या संसार स्टेशनवर 

मुंबईला जाण्याची शेवटची गाडी 


त्यानंतर कित्येक तास गॅप 


शेवटी दारिद्र्य साजरं करण्यात 

कसली मजा 


पैसा इतका हवा की बिडी सारखा फुंकता आला पाहिजे


कपडे डाग पडून जळालेले 

पिडा भिजवत ठेवत 

विड्यासारखी तोंडात 


सुमार दहशत गवगवा करत 

भयांचे कडे स्वतःला स्विंग करत 


मी गुगली पलीकडे गेलोय 


सावल्या देहाकडे पाहून हसतायेत 

त्यांना त्यांच्या ओरिजिनल सोर्सची कीव येतीये 


जिभेवर चंद्राचा थेंब शांत पहुडलेला 


आईचा चेहरा आठवतोय 

तिला न सांगताच आलोय खरा 

पण कदाचित 

तिला एक पोकळ पोकळ ढग दिसेल आपल्या बेडवर 


पाऊस निघून गेल्यानंतर बाई माणसाला घरातल्या ढगांची काळजी वाटत नाही 


बसावे की न बसावे शेवटच्या गाडीत ?


धैर्य एकवटावे की पुन्हा स्वतःला कोल्हापुरात पटकवावे ? 


ओला प्रतिध्वनी कोरड्या गळ्यात 


आठवणी सिगरेटी सारख्या पेटत पेटत 

आपण त्यांना ओठ द्यावेत की नको ?

आपण त्यांना फुफुस द्यावे की न द्यावे ?


डोळे झोपी जातायेत 


शेवटच्या गाडीला खूपच उशीर झालेला दिसतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जी नशा चढली होती ती उतरली की नाही 

आपल्या भविष्याला ती घाबरली की नाही 


गांडीवर आणखी किती फटके हवे आहेत

काय नेमके होते आहे पाहायला आतुरली की नाही 


एकाच पुतळ्याभोवती रात्रभर फिरतो आहेस 

पोचलेलाच नाहीस तुझी यात्रा उमगली की नाही 


ही नशा अशी पोलीस हस्तक्षेप करत नाहीत 

तू स्वतःचाच गुन्हेगार आहेस चूक कळली की नाही 


रात्री नशा केलीस म्हणून माफ करता येईल 

पण आता तर सूर्य आला धुंदी ओसरली की नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

प्यास तो दी मगर तूने समुंदर खारा बनाया 

बारिश दी मगर बादलको बेसहारा बनाया 


कितने भरम फैलाये तूने दुनिया के बारे मे 

चांद पत्थर हैं तूने उसका बदन सितारा बनाया 


उनके आते ही सारे आईने सवरने लगते है 

उनके चेहरे को तुने खूबसूरत नजारा बनाया 


उनके दामनमें पुरी दिलकी दिवाली परोस दी 

वो कह रही है मैने खाने को आज बेचारा बनाया 


जो मध्य मे है वो खुद को अनंत समझ रहा है 

जो अंत मे है उसके लिए तूने किनारा बनाया 


श्रीधर तिळवे नाईक 

( बालबोध कविता काव्यफाईल्ससे)


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय