डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :ज्ञान

 विक्षिप्तपणा म्हणजे सिद्धी नव्हे 

मोक्ष मिळवणे ही खरी सिद्धी 

यमनियम हीच सिद्धता 


प्रचंड नाक वाढवणे 

रोज दहादा आंघोळ करणे 

किंवा दहा वर्षे अंघोळ न करणे 

कपडे न घ****

किंवा १०० कपडे घ****

म्हणजे तपस्या नव्हे 


नग्नतेचा खरा अर्थ 

बनण्याचे सारे कपडे 

बनवण्याचे सारे कपडे 

उतरवून ठेवणे 

केवळ असणे 


नग्न तोच ज्याच्या अंगावर समाजाने दिलेल्या कुसंस्काराचे कपडे टिकत नाहीत 


केवळ आंघोळ करून स्वच्छ होशील 

पण शुद्ध होशील याची कसलीही गॅरंटी नाही 

जोवर अंतकरण शुद्ध नाही 

तोपर्यंत मळाचा अंत नाही 

अंतकरण शुद्धी ही खरी शुद्धी 

आणि अहंकार म्हणजे अशुद्धी 


नखे वाढवू नकोस 

कुठल्याही भ्रष्टाचारात हात न बुडवणे 

म्हणजे नखे न वाढवणे 


नख म्हणजे तृष्णांची वाढ 

ती नैसर्गिक आहे 

तिला शैविक बनवणे म्हणजे सिद्धता 

जे शिवाकडे नेते ते शैविक 

जे जीवात अडकवून ठेवते ते जैविक 

फरक समजून घेणे म्हणजे सिद्धता


ह्या अशा ठोंब्या उपायांच्याकडे 

जाशील 

तर आयुष्याची होळी होशील 

आयुष्याची काशी करणे म्हणजे मोक्ष मिळवणे 

आणि ते ठोंब्या उपायांच्याकडून 

शक्य नाही 


जर खरोखरच काशीत जायचे असेल 

तर मोक्षाची साधना कर


बाकी सगळ्या चिल्लर राजधान्या आहेत 

वाजल्या न वाजल्या 

नाहीतर मोडून खाल्ल्या


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)

मोक्ष का फुल हर शरीर में अलगसा खिलता है 

किसी को फॉलो मत कर ये दिया अंदर से जलता है


सर्वात प्रथम आत वळव 

स्वतःला थोडे हृदयात वळव 


जो शिव आहे तोच खरा मी 

बाकी मी काल्पनिक !आकलनात वळव 


हा देह मोक्षासाठी पुरेसा आहे 

तुझ्या या देहालाच मोक्षात वळव 


जीव नेहमी बाहेर पळायला धडपडतो 

त्याला तुझ्या अंत:करणात वळव 


शिव नसतो तेव्हा जीव कोलाहल असतो 

कोलाहल नको तर जीव शिवात वळव 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :ज्ञान या काव्यफायलीतून)

पंडित लोक सिद्ध कोण ठरवायला लागले 

लोक मंदिरात जाऊन देव बघायला लागले


बौद्धिक अहंकाराची चरबी मेंदूवरती चढलेली 

की प्राणाचा मर्डर कसा करायचा आखायला लागले 


त्यांच्या माजाविषयी पब्लिक मध्ये बोलू नका 

ज्यांना माज त्यांचा समाज व्याख्या करायला लागले


हे ते लोक आहेत ज्यांनी शिव कर्मकांडात बुडवला

मी म्हणालो तर मला पाण्यात बुडवायला लागले 


यांच्यामुळे कोणाचे शिवकल्याण होणार नाही 

हे षंढ षंढत्व पराक्रमासारखे मिरवायला लागले


एकांतात ते पुस्तके वाचत नाहीत पर्वत चढतात 

कागदांनी ते आता हिमालय झाकायला लागले


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन सिरीजमधील डे कॅथलॉन :अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)


होमो सेपियन नावाच्या जनावरासाठी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 



सर्वजण जनावर आहेत 

आणि सुरुवात तर जनावरापासूनच 


कोण ब्राह्मण कोण क्षत्रिय कोण वैश्य आणि कोण शूद्र 

कोण युरोपियन कोण आफ्रिकन कोण आशियाई कोण अमेरिकन 

कोण भारतीय कोण पाकिस्तानी कोण श्रीलंकन कोण ब्रिटिश कोण पोर्तुगीज 


सगळेच पशु आहेत 

आणि सुरुवात पशूपासून आहे 


तुझी जनूके पशूची आहेत 

आणि सुरुवात त्यांच्या संरक्षणापासून 


फक्त स्वतःला टिकवण्याचा खटाटोप 

मग तू कितीही टोप घाल 


वाढवण्याची अपेक्षा 

मग तू कितीही केस काप 


घोड्याने घोडा लावलेला आहे गाढवाने गाढव लावलेले आहे 

पण आत हत्ती शिल्लक आहे 

ज्याला पशुपती कडे जायचं आहे 


माणुसकीचे अर्धे शरीर पशुचे 

आणि ते हत्ती माकड सिंह घोडा आणि गाढव यांच्यापासून प्रेरणा घेते 


आपण सर्व जनावरेश्वर आहोत 


हे जनावर वगळून तू कुठे जाणार आहेस ?



तू कवितेत मस्त बिल्डिंग उभा करशील 

पण माणसातला बिल्ट झालेल्या जेनेटिक पशु 

तुला वगळता येईल का 

प्रत्येक पेशीच्या विटेत तो करोडो वर्षे उभा आहे


तू मस्त आकाशाच्या गोष्टी सांगशील 

पण वासनांच्या ढगांचे काय ?

केवळ मेघदूत लिहून 

पाशवी असण्याचे यक्षप्रश्न सुटणार आहेत का ?


बुद्ध म्हणायचा सर्व काही पृथ्वी 

पण पृथ्वीवर जनावर राहतात त्याचे काय ?


स्वतःच्या आतले कोण किती जनावर मारते 

यावर kingdom homo sapiena चा मुखवटा अवलंबून 


सायन्स हा मास्क आहे 

होमो सेपियन वर चढलेला 

सायन्स त्याचे पाशवी गुणधर्म बदलू शकते का ?


केवळ आकलनाने परिवर्तन घडते का ?


बोलायला गेलो तर ज्ञानाच्या गोष्टी खूप आहेत 

पण ज्ञानाने माणूस बदलला असता 

तर माणसात इतके जनावर शिल्लकच राहिले नसते 



तू म्हणशील मग मी रोमँटिक व्हावे का 


रोमँटिक माणूस फक्त रोमांटिक जनावर होतो 


भावना फक्त तीव्रता देऊ शकतात


तेव्हा ज्ञान भावनेसकट तुझ्या साधनेशी जोड 


मात्र एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेव 

ज्ञान साधनेची सुरुवात आहे 

अंत नाही 


जे ज्ञान करूणेपर्यंत पोहोचत नाही 

ते पोटात बाळ ठेवून 

स्वतःचे आईपण पन्नास वर्षे मिरवणाऱ्या बाईसारखे आहे 


ज्ञान हा फक्त अलंकार आहे 

जोपर्यंत मोक्ष मिळत नाही 



मोक्ष तिथे सुरू होतो 

जिथे ज्ञानाचाही अंत होतो 

आणि ते भिंती सारखे तू चालवायला शिकतोस 


अन्यथा ज्ञानाच्या भिंतीच 

तुझे घर चालवायला लागतात 


ज्ञानेश्वर तुझ्यातच आहे 

आणि चांगदेव ही तुझ्यातच 

आता पासष्टी येईपर्यंत थांबणार आहेस का 


मोक्ष ही तारुण्यात सुद्धा करण्याची गोष्ट असते 

साधनेचा आरंभ तरुण असतो 


संन्याशाश्रम हा आरंभ आहे 

कारण अरण्य स्वतःतच असते 


किंबहुना हे अरण्य म्हणजेच पशु 

ज्याच्यातून आज ना उद्या तुला प्रस्थान करावेच लागेल 


तेव्हा जे प्रथम आहे ते शेवटी ठेवू नकोस 

ज्यांना धर्म चालवायचा असतो 

त्यांच्यासाठी हा क्रम ठेव 


लोक पॉलिटिकल असतात 

आणि आश्रम सुद्धा फिरवतात 


प्रथम ज्ञानाश्रम आणि दुसरा मोक्ष आश्रम असला पाहिजे 

मग थाट संसार 

कर जगराहाटी 


मोक्ष मध्य ठेवशील 

तर आरंभ आणि अंत नीट होतील 


मोक्ष ही बौद्धिक गोष्टच नव्हे 

आणि वासनेचा आवेग 

पशु असतो 

तो पुन्हा पुन्हा तुला काबूत ठेवायचा प्रयत्न करेल


त्याला प्रेम समजण्याची गल्लत करू नकोस 


आवेग नीट स्वतःच्या ताब्यात ठेव

म्हणजे इंद्रियांचे घोडे नीट चालतील 


तुझ्या रथात 

हत्ती बसलाय 

त्याचे नीट सारथ्य कर 


युद्ध स्वतःतल्या पशुशीच आहे 

आणि तो बायकोसारखा किंवा नवऱ्यासारखा 

तुझ्या आतच आहे 

लाईफ पार्टनर म्हण ना 


तेव्हा बघ 

ज्ञान ही तुझी सुरुवात असेल 

तर सर्वात प्रथम 

तुझ्या आत संसार थाटून बसलेला हा पशु नीट समजून घे 


शेवटी 

पशु आहेस 

म्हणूनच पशुपती असू शकतोस 


फक्त बांधणे आणि बांधकाम 

नीट वगळ 

कारण ते तुला नेहमीच पशु बनायला भाग पाडेल 


बनवू नकोस बनू नकोस

अस 

जो असतो तोच पशुपती आहे 

जो तुझीच वाट पहात 

तुझ्या आतच असलेला आहे


श्रीधर तिळवे नाईक 


( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरी कल : ज्ञान या काव्यफायलीतून)

पंडितांनी स्वतःला ब्राह्मण समजू नये 

वीर वीरांगनानी स्वतःला क्षत्रिय समजू नये 

वाणी पणी यांनी समजू नये वैश्य 

शूद्रांनी स्वतःला शूद्र समजू नये 



अतिशूद्रांनी म्हणवून घेऊ नये अतिशूद्र 

आदिवासी लोकांनी आदिवासी समजू नये

माणसाचा जन्म आहे माणसांनी दिलेला 

कोणीही स्वतःला देव समजू नये 


आपण आलो आहोत पोटातून आईच्या 

आपला बाप हा होमोसेपियन आहे 

इतकेच लक्षात ठेवावे अचाट आहे शिवांड 

आणि आपण त्या शिवांडाचे सिटीजन आहे 


भेद पडू देऊ नये माणसाने आपल्यामध्ये 

फाटा फूट तर आपल्यामध्ये होऊच नये कधी 

पाच बोटासारखे हाताच्या एकत्र असावे 

कोणी कितीही प्रयत्न केले वेगळे होऊच नये कधी 


पर्यावरण टिकवावे वातावरण टिकवावे 

चांगले जगण्यासाठी चांगुलपण टिकवावे 

कितीही येवोत मध्ये हैवान आणि सैतान 

आपण आपल्या मधले माणूस पण टिकवावे 


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन: अनकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)

हिंसेमुळे तू एकदा पुन्हा पशु होशील 

मला सांग मग तू मोक्ष कसा मिळवशील 


हातातले शस्त्र कधीही हातामध्ये नसते 

ते मेंदूला म्यान करते तू म्यानात आढळशील


ज्याने मारले आहे तू त्याला दे सोडून 

मार त्याचा निघून गेला तू त्याच्यात अडकशील 


कुठल्या माणसासाठी दगड येत नाहीत 

दगड लक्षात ठेवशील तर तूच दगड बनशील 


तेव्हा जे झाले ते सारे सोडून दे माफ कर 

तसे केले तरच पुढे चालायला शिकशील 


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन :अनकॅटेगरी कल :ज्ञान या काव्यफायलीतून)

होमो सेपियन नावाच्या जनावरासाठी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 



सर्वजण जनावर आहेत 

आणि सुरुवात तर जनावरापासूनच 


कोण ब्राह्मण कोण क्षत्रिय कोण वैश्य आणि कोण शूद्र 

कोण युरोपियन कोण आफ्रिकन कोण आशियाई कोण अमेरिकन 

कोण भारतीय कोण पाकिस्तानी कोण श्रीलंकन कोण ब्रिटिश कोण पोर्तुगीज 


सगळेच पशु आहेत 

आणि सुरुवात पशूपासून आहे 


तुझी जनूके पशूची आहेत 

आणि सुरुवात त्यांच्या संरक्षणापासून 


फक्त स्वतःला टिकवण्याचा खटाटोप 

मग तू कितीही टोप घाल 


वाढवण्याची अपेक्षा 

मग तू कितीही केस काप 


घोड्याने घोडा लावलेला आहे गाढवाने गाढव लावलेले आहे 

पण आत हत्ती शिल्लक आहे 

ज्याला पशुपती कडे जायचं आहे 


माणुसकीचे अर्धे शरीर पशुचे 

आणि ते हत्ती माकड सिंह घोडा आणि गाढव यांच्यापासून प्रेरणा घेते 


आपण सर्व जनावरेश्वर आहोत 


हे जनावर वगळून तू कुठे जाणार आहेस ?



तू कवितेत मस्त बिल्डिंग उभा करशील 

पण माणसातला बिल्ट झालेल्या जेनेटिक पशु 

तुला वगळता येईल का 

प्रत्येक पेशीच्या विटेत तो करोडो वर्षे उभा आहे


तू मस्त आकाशाच्या गोष्टी सांगशील 

पण वासनांच्या ढगांचे काय ?

केवळ मेघदूत लिहून 

पाशवी असण्याचे यक्षप्रश्न सुटणार आहेत का ?


बुद्ध म्हणायचा सर्व काही पृथ्वी 

पण पृथ्वीवर जनावर राहतात त्याचे काय ?


स्वतःच्या आतले कोण किती जनावर मारते 

यावर kingdom homo sapiena चा मुखवटा अवलंबून 


सायन्स हा मास्क आहे 

होमो सेपियन वर चढलेला 

सायन्स त्याचे पाशवी गुणधर्म बदलू शकते का ?


केवळ आकलनाने परिवर्तन घडते का ?


बोलायला गेलो तर ज्ञानाच्या गोष्टी खूप आहेत 

पण ज्ञानाने माणूस बदलला असता 

तर माणसात इतके जनावर शिल्लकच राहिले नसते 



तू म्हणशील मग मी रोमँटिक व्हावे का 


रोमँटिक माणूस फक्त रोमांटिक जनावर होतो 


भावना फक्त तीव्रता देऊ शकतात


तेव्हा ज्ञान भावनेसकट तुझ्या साधनेशी जोड 


मात्र एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेव 

ज्ञान साधनेची सुरुवात आहे 

अंत नाही 


जे ज्ञान करूणेपर्यंत पोहोचत नाही 

ते पोटात बाळ ठेवून 

स्वतःचे आईपण पन्नास वर्षे मिरवणाऱ्या बाईसारखे आहे 


ज्ञान हा फक्त अलंकार आहे 

जोपर्यंत मोक्ष मिळत नाही 



मोक्ष तिथे सुरू होतो 

जिथे ज्ञानाचाही अंत होतो 

आणि ते भिंती सारखे तू चालवायला शिकतोस 


अन्यथा ज्ञानाच्या भिंतीच 

तुझे घर चालवायला लागतात 


ज्ञानेश्वर तुझ्यातच आहे 

आणि चांगदेव ही तुझ्यातच 

आता पासष्टी येईपर्यंत थांबणार आहेस का 


मोक्ष ही तारुण्यात सुद्धा करण्याची गोष्ट असते 

साधनेचा आरंभ तरुण असतो 


संन्याशाश्रम हा आरंभ आहे 

कारण अरण्य स्वतःतच असते 


किंबहुना हे अरण्य म्हणजेच पशु 

ज्याच्यातून आज ना उद्या तुला प्रस्थान करावेच लागेल 


तेव्हा जे प्रथम आहे ते शेवटी ठेवू नकोस 

ज्यांना धर्म चालवायचा असतो 

त्यांच्यासाठी हा क्रम ठेव 


लोक पॉलिटिकल असतात 

आणि आश्रम सुद्धा फिरवतात 


प्रथम ज्ञानाश्रम आणि दुसरा मोक्ष आश्रम असला पाहिजे 

मग थाट संसार 

कर जगराहाटी 


मोक्ष मध्य ठेवशील 

तर आरंभ आणि अंत नीट होतील 


मोक्ष ही बौद्धिक गोष्टच नव्हे 

आणि वासनेचा आवेग 

पशु असतो 

तो पुन्हा पुन्हा तुला काबूत ठेवायचा प्रयत्न करेल


त्याला प्रेम समजण्याची गल्लत करू नकोस 


आवेग नीट स्वतःच्या ताब्यात ठेव

म्हणजे इंद्रियांचे घोडे नीट चालतील 


तुझ्या रथात 

हत्ती बसलाय 

त्याचे नीट सारथ्य कर 


युद्ध स्वतःतल्या पशुशीच आहे 

आणि तो बायकोसारखा किंवा नवऱ्यासारखा 

तुझ्या आतच आहे 

लाईफ पार्टनर म्हण ना 


तेव्हा बघ 

ज्ञान ही तुझी सुरुवात असेल 

तर सर्वात प्रथम 

तुझ्या आत संसार थाटून बसलेला हा पशु नीट समजून घे 


शेवटी 

पशु आहेस 

म्हणूनच पशुपती असू शकतोस 


फक्त बांधणे आणि बांधकाम 

नीट वगळ 

कारण ते तुला नेहमीच पशु बनायला भाग पाडेल 


बनवू नकोस बनू नकोस

अस 

जो असतो तोच पशुपती आहे 

जो तुझीच वाट पहात 

तुझ्या आतच असलेला आहे


श्रीधर तिळवे नाईक 


( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरी कल : ज्ञान या काव्यफायलीतून)


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय