अशोक नायगावकर यांच्या कवितेविषयी श्रीधर तिळवे नाईक उपरोधिक आधुनिक कविता हा आधुनिक कवितेचा एक विशेष काव्य प्रकार आहे आपल्याकडे त्याची सुरुवात काही प्रमाणात मर्ढेकरांच्या कवितेमध्ये दिसत असली तरी प्रत्यक्षात अशा प्रकारची कविता सर्वात उत्तम रीतीने विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे . त्यांच्या काही विरूपिका भन्नाट आहेत. त्यांच्याप्रमाणे लिखाण करण्याचा प्रयत्न मंगेश पाडगावकर यांनी सलाम नावाच्या काव्यसंग्रहात केला असला तरी करंदीकरांची प्रतिभा त्यांच्याकडे कधीच नव्हती. अशोक नायगावकर हे कदाचित असे कवी आहेत ज्यांनी ही करंदीकरी आधुनिक उपरोधिक कविता स्वतःच्या काळाला अनुरूप करून लिहिली पण ते तिथेच थांबले नाहीत त्यांनी त्याला गद्यात्मक उपरोधक निवेदनाची अतिशय चांगली जोड दिली त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये हे मिश्रण फार भन्नाट वाटले. नायगावकरांची आत्ताची गोची अशी आहे की नायगावकर विषयाचे नवे प्रांत शोधत आहेत पण आशयाचे नवे प्रांत शोधत नाही आहेत किंवा त्याबाबत कमी पडत आहेत त्याचबरोबर नवी शैली शोधण्यामध्ये कमी पडत आहेत आणि कळत नकळत रिपीटेशन येत चाललेली आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रश्नांचा गोंधळ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका परंपरा वाद विरुद्ध पुरोगामी वाद विरुद्ध उत्तराधुनिक वाद श्रीधर तिळवे नाईक गेले काही लेख या युद्धाच्या अंगाने लिहिले आहेत. सर्वसाधारणपणे या युद्धातला तात्विक वाद नेमका काय आहे हे आता कोणाला समजेनासे झाले आहे त्यामुळे एका अर्थाने ही एक टिपिकल उत्तराधुनिक chaotic घटना बनलेली आहे जिथे एका बाजूला विचार प्रणालींचा अस्त सेलिब्रेट होतो आहे की काय असा प्रश्न पडतो आहे आणि दुसऱ्या बाजूला परंपरेचा धर्मकेंद्री उत्तर आधुनिक उदय हे सर्व घडवत आहे का असा प्रश्न उदयाला येतो आहे. मुळातच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पर्शियाचा मूळ स्वभाव काय आहे ? याचे कारण असे की पर्शियाच्या देशीवादी धर्माचे मूळ झोराष्ट्रीयन धर्मात आहे हे आता स्पष्ट झालेले आहे पण हा झोराष्ट्रीयन धर्म तरी देशी आहे का ? स्पष्ट सांगायचे तर भारतातल्या वैदिक आणि पर्शिया मधला झोराष्ट्रीयन धर्म यांचे मूळ कुठल्यातरी एका धर्मात आहे जो स्टेप मध्ये तयार झाला होता त्याच्या मग दोन शाखा झाल्या त्यातील एक शाखा इराणमध्ये गेली आणि दुसरी भारतामध्ये आली त्यामुळे झोराष्ट्रीयन धर्म हा मुळात इराणचा देशी धर्म नाह...
- Get link
- X
- Other Apps
अनुभव , कला, श्रद्धा , शहाणपण, धर्म आणि कलावंताची सामाजिक बांधिलकी १ श्रीधर तिळवे नाईक अनुभव हा मानवी जीवनाचा स्थायीपणा म्हणजे स्थावर आहे जो अजूनही टिकलेला दिसतो. माणसाला इंद्रियांच्याद्वारे प्रथम इंद्रियना होते मग संवेदना होते ही संवेदना माणसामधल्या वेगवेगळ्या अवयव आणि इतर सर्व गोष्टींच्या व्यवस्थांच्यापर्यंत पोहोचते त्यातील मज्जाव्यवस्था nervous system ही सर्वात महत्त्वाची आणि त्यातील मेंदू हा सर्वात महत्त्वाचा अवयव होय. या संवेदनेचे किंवा संवेदन पुंजाचे ग्रहण होते, त्याचे उमटण होते ही उमटणी एकदा पूर्ण झाल्यानंतर मग प्रक्रियेला म्हणजेच प्रोसेसला सुरुवात होते . अनेकदा सर्वात प्रथम या उमटन पासून ठसे तयार केले जातात आणि मग पुढे वाटचाल सुरू होते ही प्रोसेस ही प्रक्रिया १ शरीर २ बुद्धी ३ भाव ४ अहं ५ सृजनशीलता ६ अवकाश ७ काळ ८ स्थिती ९ अवस्था १० आणि शेवटी क्रिया कार्यान्वित करते म्हणजेच सर्व नय ऍक्टिव्हेट होतात एक निर्णय घेतला जातो आणि मग कृती होते किंबहुना जो निर्णय घेतो तोच निर्णयक असतो ज्याला आपण मी म्हणतो ( शैव भाषेत नंतर मीत हा शब्द याच अंगाने आलेला आहे त्याच्यानंतर म...
- Get link
- X
- Other Apps
भारतीय शिक्षणाचा इतिहास , ख्रिश्चन धर्म आणि गॉर्डन हॉल समाज किंवा जात ही सामाजिक की शैक्षणिक ? श्रीधर तिळवे नाईक भारताचा इतिहास हा एक अत्यंत विलक्षण पद्धतीचा इतिहास आहे आणि भारतीय शिक्षणाचा इतिहास याला अपवाद नाही भारतीय शिक्षणाचा इतिहास सुद्धा भारतीय इतिहासाप्रमाणे किमान तीन पद्धतीने लिहिला जातो. आणि आता चौथ्या पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे. पहिली पद्धत शैव पद्धत आहे दुसरी पद्धत युरेशियन पद्धत आहे जी प्रामुख्याने ब्राह्मणी आहे तर तिसरी पद्धत ही ओरिएंटल आहे आणि आता चौथी पद्धत आणली पाहिजे जीच्या दिशेने मी स्वतः अधून मधून प्रयत्न करत असतो ती म्हणजे ऑक्सिडेंटल पद्धत ! ओरिएंटल पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे इतिहास लिहिणारे जे आऊटसाईडर इतिहासकार आहेत ते त्यांच्या अमेरिकन किंवा युरोपियन दृष्टिकोनातून किंवा मुस्लिम दृष्टिकोनातून किंवा जुडाईक दृष्टिकोनातून लिखाण करत असतात आज त्यांना आपण ओरिएंटल या एका नावाखाली आणू शकतो पण त्याचबरोबर हेही खरे की आपण जेव्हा युरोपचा किंवा अमेरिकेचा इतिहास लिहितो तेव्हा तो आपण आपल्या पद्धतीने पहात असतो याला मी ऑक्सिडेंटल इतिहास लेखनाची पद्धत म्हणतो ओक्सी...
- Get link
- X
- Other Apps
प्रदेशांतर ,देशाटन , देशांतर ,राष्ट्रांतर आणि स्थलांतर श्रीधर तिळवे नाईक माणूस हा निसर्ग अवस्थेत नेमका काय होता हे अजूनही कळलेले नाही .काहींच्या मते तो स्वतःचा प्रदेश सांभाळत स्थिर होता तर काहींच्या मते तो भटका होता. यातूनच दोन प्रवृत्ती जन्मलेल्या दिसतात त्या म्हणजे देशी आणि मार्गी ! जे आपल्या प्रदेशात राहतात ते देशी असतात आणि जे सतत भटकत असतात ते मार्गी असतात. त्यामुळेच मी कधीही देशी आणि मार्गी या गोष्टीला विरोध केला नाही. माझा विरोध कायमच देशीवादाला आणि मार्गीवादाला होता . वस्तुस्थिती अशी आहे की यदाकदाचित समजा माकडांच्या सारखा एक प्रदेश स्थिर करत मनुष्य टोळी करून राहत असेल तर सुद्धा कधी कधी दुष्काळ पडल्यामुळे त्याला प्रदेश सोडावा लागलेला आहे. या नैसर्गिक कारणांच्यामुळे जेव्हा प्रदेश सोडावा लागतो तेव्हा त्याला प्रदेशांतर म्हणतात आणि प्रदेशांतर हे अत्यंत नैसर्गिक असते . माझ्या मते आपले प्रदेशांतर याबाबतीतले साम्य हे अधिक प्रमाणामध्ये हत्तीशी आहे . हत्ती कधी कधी आपला प्रदेश सोडून जातात कारण पाण्याची टंचाई असते. अन्नाची टंचाई असते . आणि अपवादात्मक वेळेला हवामानात असा काही बद...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्राचा मोक्षांक म्हणजेच मोक्ष quotient हा भारतात सर्वाधिक कमी आहे का ? श्रीधर तिळवे नाईक महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्षे ज्या पद्धतीची वासनाकांडे वारंवार घडत आहेत ते बघता एक प्रश्न नेहमीच निर्माण होतो की महाराष्ट्रामध्ये नेमके श्रद्धा, धर्म आणि मोक्षाच्या नावाने काय चाललेले असते आणि जे चाललेले असते त्याचा मोक्षाशी काडीचा तरी संबंध आहे का ? माणसाचा संपूर्ण प्राचीन कालखंड हा अनुभव केंद्री होता साहजिकच या अनुभवाला व्यक्त किंवा निर्माण करणारी कला ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आणि ती संस्कृतीच्या केंद्रस्थानी होती परंतु अनुभव आणि कला यातून जेव्हा मांत्रिकी श्रद्धा निर्माण झाली आणि त्याच मांत्रिकी श्रद्धेतून अनेक अनाचार निर्माण होऊ लागले तेव्हा मात्र अतिप्रत्यक्ष अनुभव हा प्रत्यक्षामध्ये काय आहे याचा वैज्ञानिक शोध सुरू झाला आणि यातून पहिला मोक्ष मिळवणारा मनुष्य म्हणजे भगवान शंकर होय . यानंतर मांत्रिकी श्रद्धेचे केंद्र रिप्लेस केले गेले आणि त्या जागी मोक्ष आणला गेला . मांत्रिकी गेली आणि मोक्ष मिळवणारे तंत्र आले . मोक्ष केंद्रस्थानी आल्यामुळे साहजिकच श्रद्धेमुळे ज...
- Get link
- X
- Other Apps
कविता कशासाठी कविता दिनाच्या निमित्ताने श्रीधर तिळवे नाईक UNESCO ने 21 March हा World Poetry Day म्हणून पॅरिसमध्ये १९९९ यावर्षी भरलेल्या 30th General Conference मध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यामागचा उद्देश भाषा संरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन होता . त्यामुळे आपण जेव्हा कविता दिन साजरा करत असतो तेव्हा हे दोन उद्देश त्यामागे असतात प्रश्न असा आहे की एक कवी म्हणून मला कवितेची गरज का वाटते ? या संदर्भातले माझे पहिले उत्तर मी खूपदा दिलेले आहे ते म्हणजे माझ्या मोक्षाच्या साधनेचा ग्राफ नेमका कसा चालला आहे ते मला कवितेमुळे जास्त चांगल्या रीतीने कळत होते म्हणजेच मोक्षाचा साधक म्हणून स्वतःच्या आकलनाची एक प्रोसेस म्हणून कवितेकडे बघता येते . पण हा फक्त जे मोक्षाची साधना करत आहेत त्यांच्यासाठी योग्य उद्देश होऊ शकतो पण जे मोक्षाची साधना करत नाहीत त्यांचे काय ? तर माझ्या मते आयुष्य हे सुद्धा साधना असते आणि आपल्या आयुष्याच्या साधनेचा ग्राफ म्हणून आपण कवितेकडे बघू शकतो . ज्यांना सामाजिक बांधिलकी प्रमाण मानायची आहे त्यांना सामाजिक अनुभवांचा ग्राफ म्हणून कवितेकडे बघता येईल . माझ...