Posts

Showing posts from January, 2026

डेकॅथलॉन एल्सेट्रा

इंग्रज श्रीधर तिळवे नाईक  १ ईश्वर सैतानाला मुळात परमिशनस का देतो  देव मुळातच इंग्रजांना येऊ कसा देतो  या दोन प्रश्नात फरक नाही  पुलाचे बांधकाम नीट व्हावे म्हणून  लहान मुलांना बळी देणारे लोक  आज सुद्धा शिल्लक असतील  तर आपण काय निर्माण केलं  आणि तुम्ही आमच्यासाठी काय सोडलं ? २ तुमच्या भाषेचं काय करायचं  हा प्रश्न तर अजूनही सुटलेला नाही  सर्वत्र इंग्लिश मिडीयमची स्कूल्स ओपन होत आहेत  आणि मला कळत नाही  भारतीय लोकांनी नेमके कोणते असे हत्ती मारले  की अजूनही या संस्कृतीत घोडे सळसळतायेत ? अजूनही नाण्याचे पुरावे हवे तसे वळवणारे लोक  अजूनही शिलालेख हवे तसे वळवणारे लोक  इतिहासात वाकून पाहायला जावं  तर आपलीच मान मोडलेली आढळावी  याहून शोकांतिका ती काय  ३ तुम्हाला परत जायला वाट होती  कारण तुम्ही घोड्यावरून आलेले नव्हता  तुम्ही थेट जहाजातून आला  आणि जहाजातूनच निघून गेला  घोड्यावरून आलेले मात्र  घोड्यावरून परत गेले नाहीत उलट इथेच घोडे रूढ केले  अश्वमेध रुढ केले मशिदी रूढ केल्या ...
ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद कोणी सुरू केला कुठून सुरू झाला श्रीधर तिळवे नाईक  ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद हा एक महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांच्यामुळे सातत्याने चालू राहिलेला वाद आहे या वादाला नंतर शाहू महाराजांच्या काळामध्ये वेदोक्त प्रकरणामुळे अधिकच चालना मिळालेली दिसते आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी तो हिंदुत्वाच्या अंगाने अधिक पुढे नेला हा वाद अनेकदा मराठा राजकारणी लोकांनी निर्माण केलेल्या काही मॉडेल्समध्ये नीट समजून घेतलेला नाही विशेषत: यशवंतराव चव्हाण यांच्या मॉडेलमध्ये हे घडलेले दिसते याचे कारण स्पष्ट आहे कारण त्या काळातले हे सर्व पुरोगामी लोक कळत नकळत ब्रिटिश लोकांनी किंवा ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी लिहिलेल्या इतिहासाच्या प्रभावाखाली आले यांनी खरा इतिहास तपासलाच नाही एका अर्थाने हे काँग्रेसचे मॉडेल आहे आणि हे मॉडेल ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद अस्तित्वातच नाही अशा तऱ्हेने मांडणी करत होते याचे कारण पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस मधील इतर नेते होते अनेकांना असे वाटते की याची सुरुवात महात्मा फुले यांनी केली परंतु पुरावे वेगळी गोष्ट सांगतात ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद किंवा हा भेद प...
 सत्य , व्यवहार आणि उत्तर व्यवहार १ श्रीधर तिळवे नाईक  कुल म्हणजे समान जन्मदत्त गुणांनी युक्त असलेल्या समानपिंडाच्या आणि काम संबंधाने जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा गट होय . पूर्वीच्या काळी हे जन्मदत्त गुण आणि पिंड म्हणजे नेमके काय हे स्पष्ट नव्हते परंतु आता आपणाला जेनेटिक्समुळे ते स्पष्ट झाले आहे . इतकेच नव्हे तर आता जीन्समुळे आपणाला कोण कोणाचे आईबाप आहेत वगैरे अनेक गोष्टी सहजरीत्या कळतात पूर्वी यामागचे विज्ञान माहित नव्हते पण आता आपणाला हे सर्व काही माहिती आहे . त्यामुळे कुल किंवा कुल हे जितके वर्तमानकालीन संबंधांचे जोडणारे कामसूत्र आहे तितके कदाचित कुठलेच इतर सूत्र नाही आणि याचे कारण समान गुणसूत्रे हे आहे.  प्रश्न असा आहे की आता आपण या काम गुणसूत्रांच्या आधारे जर का कुलव्यवस्था निर्माण केली तर ती आत्ताच्या काळामध्ये सक्षमपणे नांदवता येणार आहे का ? माझ्या मते आता या दिशेने प्रयत्न करायला हवा. प्राचीन काळी आपण या सर्व गोष्टीला आप्तावळा असा शब्द शोधला होता . अर्थातच आप्तावळा नंतर गोतावळा येतो ज्यात काम संबंध न आलेले अनेक मित्र येतात मैत्रिणी येतात आणि मग गणवळा येतो याला एक ...
नवता , अंतःकरणीकरण, आत्मसातीकरण आणि देशीकरण श्रीधर तिळवे नाईक  तुम्ही ज्या इतिहासात भूतकाळात जन्म घेता तो कधीही परिपूर्ण असत नाही तो सर्व काही तुम्हाला देत नाही अनेक नव्या गोष्टी निर्माण होत असतात ज्या परंपरेत ,इतिहासात, भूतजालात नसतात आणि त्यांचे काय करायचे हा प्रश्न प्रत्येक माणसा पुढे उभा ठाकत असतो. त्यामुळेच प्रत्येक माणूस नवीन निर्माण झालेल्या गोष्टीचे अवगत करून त्याचे अंतःकरणीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो किंबहुना अनेकदा ज्याला आपण अभ्यासक्रमाबाहेरचा अभ्यासक्रम म्हणतो तो दुसरा तिसरा काही नसून नवता अवगत करून तिचे अंतःकरणीकरण करणे हा असतो सर्वसाधारणपणे अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कायमच जी शिकवली जाते ती नवता नसते ती जूनता असते आणि होऊन गेलेल्या भूतकाळातल्या नवतांचा इतिहास असते ज्या होऊन गेलेल्या असतात परंतु तुमच्या आसपास अजूनही त्या परंपरा म्हणून जतन केल्या जातात . प्रत्यक्ष जगामध्ये मात्र वस्तुस्थिती वेगळी असते कुठल्यातरी कोपऱ्यात परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हाच तुमच्या आसपासच्या जगामध्ये एक नवीन नवता निर्माण होत असते जी तुम्हाला शिकवली जात नसते आणि म्...

पवार आणि अजित पवार

स्वसंतानमोह , पक्षांतर आणि पक्षमालकी श्रीधर तिळवे नाईक  कुठलाही पक्ष चालवताना त्याचा वारस कोण ह्याविषयी भविष्यकालीन स्वच्छ दृष्टी नसणे हे भारतीय शासकांचे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळेच मग वारस कोण हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो ह्यात त्या संततीचा करिअर बनवण्याविषयीचा गोंधळ हाही एक फॅक्टर असतो बाळासाहेब ठाकरे व शरद पवार ह्यांच्या संततीने प्रथम आम्हाला तुमच्या क्षेत्रात रस नाही असं सांगितल्याने हा गोंधळ सुरु होतो कारण मग स्वतःची संतती वारस बनायला तयार नसेल तर साहजिकच ती व्यक्ती भाचा भाची पुतणा पुतणी ह्यांच्याकडे वळते प्रत्यक्षात स्वतः निवडलेल्या क्षेत्रात मिळणार यश व वडिलांच्या क्षेत्रात दिसू लागलेलं यश ह्यांच्यात प्रचंड तफावत दिसायला लागली कि साहजिकच संतती आपला करियरसंदर्भातला निर्णय बदलते आणि ह्यात गोची बापाची होती कारण तोवर बापाने आपला वारस म्हणून भाचा भाची पुतण्या पुतणी ह्यांना तुम्हीच माझे वारस म्हणून सांगितलेले असते अशावेळी त्या संततीला आपली चुलत व मामे भावंडे सांभाळून पुढे जाता आलं तर ठीक असतं नाहीतर फूट अटळ असते  कुठल्याही आई बापाला स्वसंतानमोह नैसर्गिक असतो त्यामुळे स्व स...