वैदिक धर्माचे षडानन देव : ऋषी: शमन :राजन्य :विशपती आणि विश (म्हणजे जनता) श्रीधर तिळवे नाईक 


गेली कित्येक वर्षे मी वैदिक धर्मावर टीका करत नाही म्हणून खूप लोकांना खटकत असतो मी ब्राह्मण धर्मावर प्रचंड टीका करतो म्हणून काही ब्राह्मणांना मी खटकत असतो. माझी वैदिक धर्माबद्दल अनेकदा वेगवेगळी मते मी सादर केलेली आहेत आता आपण वैदिक धर्माचा जो गाभा आहे त्याकडे वळणार आहोत . मी हे नेहमीच सांगितलेले आहे की ऋषी म्हणजे ब्रह्म रचणारे आणि वैदिक धर्मात ब्रह्म म्हणजे मंत्र होत . त्या उलट देव म्हणजे विद्वान या शब्दाचा अर्थ अनेकांनी दिलेला असला तरी स्वामी दयानंद सरस्वती यांनी याचा जो देव म्हणजे विद्वान असा अर्थ दिलेला आहे तो बरोबर आहे . विश म्हणजे जनता तर विशपती म्हणजे जनतेने निवडून दिलेला प्रमुख ! आणि राजन्य म्हणजे या सर्व विशपतींनी मिळून निवडलेला सर्व विशपतींचा प्रमुख ! वेदांच्या मध्ये कुठेही विशेषता ऋग्वेदामध्ये क्षत्रिय ही संकल्पना नाही अपवाद फक्त नंतर घुसवलेले पुरुष सूक्त आहे . इतकेच नव्हे तर वेदांच्या मध्ये कुठेही वर्णव्यवस्था नाही . जी व्यवस्था आहे ती कर्म दत्त व्यवस्था आहे .


पण हे मूळ अर्थ न कळल्याने ब्राह्मण लोकांनी वैदिक धर्मामध्ये प्रचंड गोंधळ घालून ठेवला .


वैदिक लोक जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ते दोन मार्गांनी आले होते पहिला मार्ग हा जे लोक मंगोलिया मध्ये राहत होते त्यांनी निवडला आणि ते तिबेट मार्फत भारतामध्ये उतरले यांना आपण मंगोलियन वैदिक म्हणू शकतो स्वामी दयानंद सरस्वतींनी हे वारंवार मांडलेले आहे . यांना आर्य असे सुद्धा म्हणतात . त्या उलट जे स्टेप्स मधून व्हाया इराण आले त्यांनी मात्र स्वतःला वैदिक म्हणवून घेतले. हे प्रथम इराण मध्ये सेटल झाले होते त्यानंतर अफगाणिस्तानामध्ये आले आणि नंतर ते भारतात आले . हे स्वतःला कधी कधी नंतर अर्य म्हणू लागले मात्र जोपर्यंत त्यांची गाठ मूळ आर्य लोकांच्या बरोबर पडलेली नव्हती तोपर्यंत हे प्रामुख्याने स्वतःला वैदिकच समजत होते . हे लोक पशुपालक असल्याने साहजिकपणे त्यांच्याजवळ त्यांच्या श्रद्धा होत्या पण धर्म नव्हता त्यांनी हा धर्म इथल्या भारतीय भूमीतून घेतला आणि त्याला आपल्या साच्यात बसवले .


हे दोन्ही युरेशियन लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची गाठ ही इथल्या शैव-धर्माशी पडली आणि त्यामुळे त्यांच्या श्रद्धेमध्ये नक्कीच बदल घडायला सुरुवात झाली याबाबतीत साधारणपणे सात स्कूल आपणाला दिसतात 


१ विश्वामित्र स्कूल 

२ शुक्राचार्य स्कूल 

३ ब्रह्मदेव स्कूल 

४ सांख्य स्कूल 

५ जैमिनी स्कूल 


या पाच स्कूल मधूनच ज्याला आज आपण वैदिक धर्म म्हणतो तो डेव्हलप झाला आज सुद्धा अनेक वैदिक जेव्हा भारतीय दर्शन म्हणून काही सादर करतात तेव्हा १ सांख्य योगदर्शन २ सांख्य कपिल दर्शन ३ जैमीनी दर्शन ४ ब्रह्मस्कूल मधूनच विकसित झालेले वेदांत दर्शन किंवा उत्तर वेदांत दर्शन यांनाच चार दर्शने म्हणून सादर करतात हा एक प्रकारचा धूर्त पण आहे पण हा धूर्तपणा नेहमी चाललेला असतो याशिवाय ते आणखी दोन दर्शने सादर करतात पण ती वाया इराण आलेल्या लोकांची नाहीत


मंगोलिया मधून आलेले लोक स्वतः सोबत शमण किंवा शामण घेऊन आले होते आणि बहुदा त्यांच्यासोबत यजुर्वेद होता या लोकांची गाठ इथल्या अनार्य अनारीय शैव लोकांशी पडल्यानंतर या लोकांना हळूहळू धर्म आणि मोक्ष या दोन जीवनार्थांचा परिचय झाला यातील वृषभ देव यांनी शैव लोकांचा नाथसंप्रदाय स्वीकारला ते वृषभनाथ झाले (नाथ संप्रदायामध्ये मोक्ष मिळालेल्या पुरुषामागे नाथ हा शब्द लावला जातो) आणि त्यांच्या स्कूल मधून अनेक नाथ संप्रदायी लोक तयार झाले आणि या मधला शेवटचा नाथ हा पार्श्वनाथ होता यानंतर आलेला 24 वा नाथ मात्र पूर्णपणे वेगळा होता त्याने आत्तापर्यंत आलेल्या नाथ संप्रदायातल्या काही गोष्टी स्पष्टपणे नाकारल्या आणि इथूनच एक नवे युरेशियन स्कूल तयार झाले ते म्हणजे जैन धर्म होय याचाच प्रभाव पडून पुढे शाक्त(या गणाला शाक्य हा शब्द लावण्यात आला कारण बौद्ध वाङ्मयाची सुरुवात कनिष्काच्या राजवटीमध्ये झाली साहजिकच कनिष्क हा शाक्य होता म्हणून या लोकांनी गौतम बुद्धाला सुद्धा शाक्य केला प्रत्यक्षामध्ये गौतम बुद्धाच्या गणाचे नाव शाक्त होते आणि त्यांनी शैव धर्म स्वीकारला होता) गणातून आलेल्या गौतम बुद्ध याने आपला स्वतःचा एक नवा धर्म स्थापन केला धम्म स्थापन केला तो म्हणजे बौद्ध धम्म होय . त्यांनी आपला स्वतःचा धम्म आणि मोक्षाच्या नावाखाली कैवल्य आणि निर्वाण अशा दोन संकल्पना डेव्हलप केल्या . याचे कारण अर्थातच साधना होते 


या दोघांच्या मुळेच कपिल मुळे डेव्हलप झालेली श्रमण संस्कृती अधिक स्वतंत्र होत स्वतंत्रपणे डेव्हलप होत गेली आणि त्यातूनच पुढे 

५ जैन स्कूल 

६ बौद्ध स्कूल 


ही दोन स्कूल जन्माला आली आणि यांची ही दोन दर्शने सुद्धा भारतीय षडदर्शनाच्या मध्ये समाविष्ट केली जातात.


यामध्ये फक्त एकच स्कूल असे होते जे अत्यंत कट्टर होते आणि ते स्कूल म्हणजे ब्राह्मण स्कूल अथवा जैमिनी स्कूल आणि ज्यांना आज आपण ब्राह्मण धर्म म्हणतो तो ब्राह्मण धर्म ब्राह्मण लोकांनी जैमिनी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केला आणि मोक्ष हा यज्ञामुळे मिळतो अशी विपरीत मांडणी केली(हे मांडणे खुद्द ब्राह्मण लोकांना सुद्धा फार विपरीत वाटल्यामुळेच नंतर त्यांनी शंकराचार्य यांनी जैमिनी दर्शनावर मिळवलेला विजय अधिकाधिक प्रोजेक्ट केला) म्हणजे एका बाजूला या लोकांनी ब्राह्मण आणि स्मृति ग्रंथ लिहून ब्राह्मण धर्म तयार केला आणि दुसरीकडे मोक्ष स्वीकारला परंतु हा मोक्ष यज्ञ करून मिळतो अशी मांडणी केली . ही मांडणी त्यांच्या मधल्या मांत्रिकीला अतिशय धरून होती . कारण हे सर्व लोक मुळात मांत्रिक होते . त्यांचा आधी विश्वामित्रांशी आणि शुक्राचार्याशी संघर्ष झालाच होता वास्तविक बृहस्पती हे या लोकांचे गुरु पण शुक्राचार्य त्यांचा मुलगा असून सुद्धा त्याने आपल्या बापाविरोधातच बंड केले आणि तो थेट असूर शैव लोकांना मिळाला तो त्यामुळे शिवभक्त बनला आणि साहजिकच नंतर असुर लोकांनी तो परका असून सुद्धा त्याला गुरु म्हणून स्वीकारला. 


यातील सर्वात मोठे गूढ जर काही असेल तर ते म्हणजे देव लोकांचे झाले काय ? आपणाला साधारणपणे जी माहिती मिळते ती अशी आहे की सगळे देव हे तिबेटला निघून गेले . आणि पुढे पुन्हा ते रशियात गेले स्टेप्स मध्ये गेले .


याचे कारण स्पष्ट आहे त्यांची विद्वत्ता नंतर नंतर पूर्णपणे फेटाळली गेली आणि त्यांच्याबद्दल जो आदर होता तो पूर्णपणे संपला . त्यामुळेच नंतरच्या वाङ्मयामध्ये इंद्र हा फार दुय्यम देव झालेला दिसतो याचे कारण मुळात त्यांचे जे ज्ञान होते ते फार थोर राहिले नाही . त्यापेक्षा अधिक चांगले ज्ञान शैव धर्मामध्ये असल्याने शैव-धर्म स्वीकारणे किंवा शैव ज्ञान स्वीकारणे हेच सर्वांना योग्य वाटले याचा परिणाम या देवांच्यावर झालेला दिसतो . हे खरे तर घडायला नको पाहिजे होते असे माझे मत आहे जर का हे लोक विद्वान होते तर ते थांबले असते तर कदाचित जास्त बरे झाले असते कारण त्यांच्यामुळे आपणाला वैदिक धर्माविषयी अधिक माहिती मिळाली असती पण इराण मधून आले आणि तिबेट मार्गे पुन्हा रशियात गेले हा जो त्यांचा स्थलांतराचा प्रवास आहे तो फार गुंतागुंतीचा आहे . वास्तविक काश्मीरमध्ये त्या काळामध्ये शैव धर्मामध्ये पंडित वर्ग उदयाला आला होता आणि जर का हा देव वर्ग त्यांच्या इतर सहकाऱ्यांसारखा त्यांना सामील झाला असता तर कदाचित त्यांना पळून जावे लागले नसते . कदाचित असेही असू शकेल की ऋग्वेद हा पहिल्या पिढीचा असावा आणि या पिढीला ऋग्वेदाच्या निर्मितीनंतरच आपल्या मूळ जन्मस्थानाची ओढ लागली असावी . 


अर्थातच मग जे दुय्यम दर्जाचे देव होते ते कदाचित थांबले असावेत आणि ब्राह्मण झाले असावेत . ऋषी लोकांचे सर्वसाधारणपणे जे पुत्र होते ते नंतर ब्राह्मण झाले असेही दिसते . म्हणजे हळूहळू आपणाला असे दिसते की देव आणि ऋषी या दोन आयामांच्यातूनच आजचे ब्राह्मण निर्माण झालेले आहेत . आणि पुढे त्यांना भगत मिळालेले दिसतात.


मात्र या संस्कृती संपर्काच्या काळात शुक्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठा वर्ग शैव-धर्म स्वीकारून बसला . एका अर्थाने हे धर्मांतर होते . या लोकांनी मात्र शैव-धर्मातल्या पंडित लोकांच्या बरोबर तडजोड केली आणि त्यांच्याबरोबर रोटी-बेटी व्यवहार पण सुरू केला आणि त्यातूनच ते पंडित लोकांच्यात आणि शैव धर्मी लोकांच्यात मिसळून गेले . पुढे मग पंडित लोकांनी आपला स्टान्स बदलला आणि त्यांनी स्वतःच आपला धर्म बदलून सर्व धर्म नाकारून ब्राह्मण वैदिक आणि वासुदेव यांच्या चमत्कारिक मिश्रणातून तयार झालेल्या वैष्णव धर्माला स्वीकारले . प्रश्न असा आहे की इंद्र विद्वान म्हणून निघून गेला आणि नेतृत्व नंतर विष्णू म्हणून असलेल्या देवाकडे म्हणजे विद्वानाकडे आले का ? कदाचित ही ही शक्यता असेल .


 आज आपण जेव्हा युरेशियन असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने ही सात स्कूल येतात 


आपण जर का ऋग्वेदाचा अभ्यास केला तर आपणाला यांचे आपापसातच असलेले अनेक संघर्ष दिसतात त्यातील सर्वात मोठा संघर्ष विश्वामित्रांशी झालेला असावा विश्वामित्राच्या आधी ब्रह्म या शब्दाचा स्पष्ट आणि स्वच्छ अर्थ मंत्र होता पण विश्वामित्राने केवळ मंत्र हा अर्थ नाकारला आणि ब्रह्म हे ऊर्जा मानले . एका अर्थाने तोही शिवभक्त होता पण त्याने शिव हा शब्द स्वीकारला नाही त्याऐवजी त्याने शिवऐवजी ब्रह्म हा शब्द वापरायला सुरुवात केली . हा एका अर्थाने ब्रह्मदेवाचा पडलेला प्रभाव आहे कारण दक्षगणामधील लोकांच्या प्रदेशामधला पहिला मनुष्य हा ब्रह्म होता ज्याने शैव धर्म स्वीकारला होता आणि त्याच्या नावामुळेच ब्रह्मदर्शन उदयाला आले होते मी हे अनेकदा सांगितले आहे की शैव- श्रुतीमध्ये अनेकदा दर्शनाचे नाव हे गुरुच्या नावाने नव्हे तर शिष्याच्या नावाने होते कारण गुरू नाहीत इतकी दर्शने दिलेली आहेत त्यामुळे प्रत्येक दर्शनाला शिवदर्शन कसं काय म्हणणार किंवा शंकर दर्शन कसं म्हणणार म्हणून मग शिष्याच्या नावाने नाव देणे जादा संयुक्त ठरले कारण ओळख निर्माण होणे आवश्यक असते ब्रह्मदर्शनाच्या बाबतीत सुद्धा तेच घडलेले आहे भगवान शिव यांनी जो दक्ष गणातील ब्रम्हाला उपदेश केला तोच उपदेश ब्रह्मदर्शन म्हणून नंतर उदयाला आला त्याला आत्मसात करून पुढे इराण मधून आलेल्या वैदिक लोकांनी आणि तिबेट मधून आलेल्या आर्य लोकांनी त्याला आत्मसात करताना त्याच्यापासून ब्रह्मदेव निर्माण केला एका अर्थाने पार्वतीच्या दक्ष गणातून निर्माण झालेली दक्ष संस्कृती आणि युरेशियन संस्कृती यांच्या मिलनातून हे सर्व घडलेले आहे आणि हे बहुदा कश्मीरच्या आणि हिमाचल पर्वताच्या पायथ्याखालील प्रदेशात घडलेले असावे . आणि तिथून ते पंजाब मध्ये पोहोचले असावे .


गौतम बुद्धाचा धर्म उपदेश ऐकायला जे लोक आले त्यामध्ये ब्रह्मा सुद्धा आलेला दिसतो त्याचे कारण हेच आहे हा ब्रह्मा म्हणजे दुसरा दुसरा कोणी नसून या ब्रह्मा स्कूल मधलाच कोणीतरी असणार . इंद्र आणि ब्रह्म असे दोघेही इथे उपस्थित दिसतात . 


युरोशियन लोकांच्या मध्ये मग जो ब्रह्मा आला त्याने या दक्षगणातील ब्रम्हाचे दर्शन आत्मसात करून त्यातून व्यवस्थित एक मांडणी उभी केली जी पुढे उपनिषदातली मुख्य मांडणी बनली बौद्ध ग्रंथांमध्ये सुद्धा अनेकदा हा ब्रह्म ब्रह्मदेव म्हणून येत नाही तर ब्रह्मा म्हणूनच येतो . त्याला देव नंतर जोडण्यात आले .


या सगळ्यांचा जो संबंध सुरुवातीच्या कालखंडामध्ये आला तो अतिशय चांगला असावा. या बाहेरून आलेल्या लोकांचे करायचे काय असा एक फार मोठा प्रश्न इथल्या स्थानिक लोकांच्या पुढे होता . हे बाहेरून आलेले लोक आंघोळ करत नव्हते कारण त्यांना बर्फाच्या प्रदेशात राहून आंघोळ न करण्याची सवय लागली होती त्यातूनच मग शैव लोक स्वतःला शुद्ध म्हणून घ्यायला लागले आणि या लोकांना अशुद्ध म्हणू लागले 


शैव लोकांची ही मांडणी स्वीकारून पुढे मग या लोकांनी शैव लोकांना प्रथम सुद्ध आणि नंतर शुद्ध व शेवटी शूद्र म्हणायला सुरुवात केली व शेवटी शेवटी त्यांच्यापासून शूद्र नावाचा एक वर्ण तयार केला आणि त्याला जास्तीत जास्त हाकलून देण्याचे उद्योग सुरू केले याला सर्वात अधिक कारण जैमिनी म्हणजेच ब्राह्मण स्कूल होते या लोकांना आपली मांत्रिकी अजिबात सोडायची नव्हती कारण ती अतिशय चांगली उत्पन्न देणारी होती. मोक्षापासून शेवटी कसे उत्पन्न मिळणार ते शक्यच नसते पण मांत्रिकीला मात्र नेहमीच पैसे देणारे लोक भेटत असतात त्यामुळेच हे लोक मोक्ष तोंडी लावायला स्वीकारत होते परंतु यांचे सारे मांत्रिकीचे खेळ सुरूच होते कारण त्यामधून मुख्य कारण उत्पन्न होते हेच आहे . यांची ही मांत्रिकी शैव लोक स्वीकारायला तयार नव्हते याचे कारण यांच्याकडे म्हणजे सर्व लोकांच्याकडे स्वतःचे भगत होते . पुढे अधिक काळ गेल्यानंतर भगत लोकांना ब्राह्मण म्हणून स्वीकारले गेले त्यांची मांत्रिकी आत्मसात केली गेली त्यांच्यामार्फत संस्कृत ही भाषा सुद्धा आत्मसात केली गेली आणि आज जे आपणाला अनार्य ब्राह्मण दिसतात त्याचे खरे कारण हे आहे की हे सर्व मूळचे भगत आहेत आणि नंतर पंडित आहेत. 


यामध्ये ब्राह्मण शब्द इराणमधून आलेल्या लोकांच्यासाठी असला तरी आणि मंत्र म्हणजे ब्रह्म असा शब्द असला आर्य हा शब्द कायमच मंगोलिया मधून आलेल्या लोकांना लागू होता आणि त्यांच्या मांत्रिकीला नंतरच्या काळामध्ये अय्यारी असा शब्द सुद्धा मिळालेला दिसतो याचे कारण जे मंगोलिया मधून आले होते ते स्वतःला आर्य समजत आणि त्यांचे जे मांत्रिक होते ते स्वतःला शामण म्हणत हे इराण मधून आलेल्या ब्राह्मण लोकांच्या पेक्षा अधिक उदार होते आणि म्हणूनच त्यांनी मोक्ष फार गंभीरपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू केला साहजिकच त्यांच्या कलेला मांत्रिकीला अय्यारी असा स्वतंत्र शब्द आलेला दिसतो हेच पुढे दक्षिणेकडे अय्यर म्हणजे ज्यांना अय्यारी येते ते म्हणून स्थिरावले आणि आजही तामिळमध्ये यांचे प्रभुत्व आहे मात्र त्यांचे स्टेटस ब्राह्मण झालेले आहे . थोडक्यात हे ते लोक आहेत ज्यांनी श्रमण संस्कृती न स्वीकारता मांत्रिकी संस्कृती continue ठेवली . आजही यांच्यातला आर्य भाव जात नाही याचे कारण ते खरोखरच फार सुरुवातीपासूनच कट्टर होते इतके कट्टर की त्यांनी अनार्य असे काही मनापासून स्वीकारले नाही. ते स्वतःला याबाबतीत कायम ॲडजस्ट करत राहिले . 


प्रश्न असा आहे की मग शुद्ध या शब्दावरून पुढे शूद्र झाले हे आपणाला कळू शकते पण क्षत्रियांचे काय तर त्याचे स्पष्ट कारण असे दिसते की ते विश मधून आले आणि नंतर विशपती झाले त्यांनाच नंतर राजा म्हणण्यात येऊन त्यांचा स्वतःचा हळूहळू एक स्वतंत्र वर्ग तयार होत गेला आणि त्यांच्यातूनच क्षत्रिय वर्ण तयार झाला . शस्त्र हातात धरतात ते क्षत्रिय हे खरे आहे पण ज्यांनी शस्त्र हातात धरले ते काही वैदिक लोकांच्या किंवा आर्य लोकांच्यात कोणी बाहेरून आले नव्हते तर ते ह्या विश म्हणजेच जनसमुदायातूनच आलेले होते . म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचे तर एका अर्थाने वैश्य वर्णातून क्षत्रिय वर्ण तयार झालेला आहे . शक्यता अशी आहे की वशिष्ठ जो वैश्य लोकांचा मांत्रिक होता त्याचा जो विश्वामित्र याच्याशी संघर्ष झाला तो यातूनच झाला असावा. विश्वामित्र या शब्दाचा अर्थच विश्वाचा मित्र असा आहे आणि मित्र याचा अर्थ सूर्य असा होतो हा सूर्य पूजक होता आणि म्हणूनच त्याने सूर्याची पूजा करणारा गायत्री मंत्र रचला होता जो आपण नेहमी वापरत असतो 


प्रश्न असा आहे की विश्वामित्र याने नंतर वैदिक श्रद्धेचा त्याग केला का कारण नंतरच्या काळामध्ये त्याचा उल्लेख शैव म्हणून होतो . की याचा अर्थ ब्राह्मण लोक हा आपल्यातला नाही असे समजून त्याला शैव धर्मात ढकलतात ? शुक्राचार्य आणि विश्वामित्र यांच्यातला फरक हाच होता की शुक्राचार्य स्पष्टपणे आणि स्वच्छ पणाने शैव धर्म स्वीकारतात . त्या उलट विश्वामित्र हा शैव-धर्मातला गाभा स्वीकारतो परंतु त्याला आपले वैदिकीय श्रद्धेचे रंग रूप देतो . तो राजपुत्र असल्याने असे झाले आहे का ? अनेकदा होते असे की राजकीय लोकांना जनतेला नाराज करून चालत नाही त्यामुळे वैदिक मांत्रिकी विरोधात संपूर्ण बंड करणे त्याला शक्य झाले नसावे . 


पुढे मग परशुरामाने सर्वच इराणमधून आणि तिबेट मधून आलेल्या क्षत्रियांचा किंवा योध्यांचा सर्व नाश केला . आणि क्षत्रिय पूर्णपणे वैदिक रंगमंचावरून गायब झाले . पुढे जे काही राजा म्हणून आलेले आहेत ते सर्वच्या सर्व वैश्य किंवा शूद्र वर्णातून आलेले दिसतात . साहजिकच यज्ञ संस्था स्वीकारण्याच्या तयारीत ते नाहीत . अपवादात्मक केवळ दाखवावी म्हणून काही यज्ञ केले परंतु एकंदरीत यज्ञ संस्था नामशेष होत गेली हेच खरे . साहजिकच ब्राह्मणांना भगत लोकांची मांत्रिकी शिकणे हे अपरिहार्य होत गेले कारण शेवटी त्यांना मांत्रिकीवरच आपले पोट भरायचे होते . त्यासाठी प्रथम शैव धर्म स्वीकारावा लागला पूजा पद्धत स्वीकारावी लागली भगवान शंकर यांना रुद्र म्हणून आत्मसात करावे लागले . मंदिरामध्ये हे लोक पुजारी म्हणून काम करायला लागले . म्हणजे एका अर्थाने सर्वात प्रथम धर्मांतर ब्राह्मणांचे शैव धर्मात झाले त्यांचे भगत लोकांशी रोटी बेटी व्यवहार सुरू झाले आणि म्हणूनच नंतर मग त्यांनी इथल्या सर्वच भगत लोकांशी असे व्यवहार करत ब्राह्मण आणि भगत यांच्यातला फरकच नाहीसा केला झाला . पुढे जेव्हा मग वैष्णव धर्माच्या निमित्ताने यांना संधी मिळाली तेव्हा पुन्हा एकदा डोके वर काढले आणि आपला नवीन वैष्णव धर्म स्थापन केला पण आता ज्यांच्याशी त्यांचे साठेलोटे जमले होते असे सर्व भगत लोक वैष्णव धर्मामध्ये सामील व्हायला लागले मात्र आता त्यांनी शंकराचार्यांचे वेदांत दर्शन स्वीकारले आणि यामुळेच एक समग्र हिंदू धर्म निर्माण झाला जो राम कृष्ण हरीविष्णू या तीन देवतांना मुख्य मानत होता. अधून मधून या लोकांना इतर अवतारांची आठवण होत असली तरी प्रत्यक्षामध्ये राम आणि कृष्ण हेच अवतार त्यांना मुख्य वाटतात 


थोडक्यात काय जे षडानन आले होते ते हळूहळू आपल्या पद्धतीने भारतीय संस्कृतीमध्ये स्थिर होत गेले विरघळत गेले अपवाद कदाचित मूळ देवांचा असावा जे पुन्हा आपल्या मूळ स्थानी निघून गेले . या लोकांनी आपली मूळ ओळख कुठेही जाऊ नये आणि संकर होऊ नये म्हणून वर्णव्यवस्था प्रस्थापित केली मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले असे वाटत नाही . मात्र आज सुद्धा जेव्हा भारतीय दर्शन म्हणून हे सहा दर्शने सादर करतात तेव्हा ही सर्वच्या सर्व दर्शने फक्त आपलीच असतील याची काळजी ते व्यवस्थित घेत असतात . भारतीय म्हणजे आम्ही अशा पद्धतीचे त्यांचे सादरीकरण आजही जगभर चाललेले दिसते. एकेकाळी हे सादरीकरण संस्कृत द्वारे होत होते अलीकडे हे सादरीकरण ते इंग्लिश पद्धतीने इंग्लिश भाषेच्याद्वारे सादर करत असतात. या लोकांचे अनुवाद इतके भीषण असतात आणि ते इतके प्रपोगंडा करणारे असतात की जोपर्यंत तुम्हाला संस्कृत येत नाही तोपर्यंत या लोकांनी काय दिवे लावलेले आहे ते तुम्हाला कळतच नाही. शैव श्रुतीतील धर्मांची शोकांतिका अशी आहे की ज्यांना संस्कृत येत होते ते पंडित प्रामुख्याने ब्रिटिश काळामध्ये स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेण्यासाठी युरोप मधून आल्याच्या स्थलांतराला स्वीकारून बसले आणि सर्वच्या सर्व आता युरेशियन संस्कृतीला जाऊन मिळालेले आहेत आणि जे बीचारे देशी भाषेत प्राकृतिक भाषेत काम करत होते तेच फक्त आता गुरव वगैरे म्हणून उरलेले आहेत याला उपाय एकच आहे ते म्हणजे सर्व गुरव किंवा तत्सम लोकांनी संस्कृत शिकणे . माझा अनुभव असा आहे की कदाचित कुणी असा संस्कृत शिकला की त्याला ताबडतोब हे लोक ब्राह्मण करायला तयार असतात. आणि तो सुद्धा या ब्राह्मण ट्रॅपमध्ये असा अडकतो की निघतच नाही . दयानंद सरस्वती हे याचे उत्तम उदाहरण आहे. शिवाच्या पिंडी विरोधात अपप्रचार करण्यासाठी म्हणूनच अत्यंत जाणीवपूर्वक सिल्याबस मध्ये त्यांचे उदाहरण वापरले गेलेले आहे. आता उंदीर काय फक्त शिवलिंग पाशी येतात काय मूर्तीपाशी पण येतात शेवटी जिथे गोड आहे अन्न आहे तिथे उंदीर येतातच परंतु जाणीवपूर्वक प्रचार करायचा असल्यामुळे आणि ब्राह्मणेतर लोक फारसे या गोष्टींच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे ह्या गोष्टी चालत असतात . यामुळे होते काय तर शैवधर्माच्या विरोधामध्ये तुम्ही आपोआपच शाळेपासूनच होता याचा परिणाम आपणाला थेट अगदी पु ल देशपांडे यांच्या लेखांमध्ये सुद्धा दिसतो ते सुद्धा नेमके हेच उदाहरण सादर करतात कारण तेही हे सिल्याबस मधून शिकलेले असतात . आणि शेवटी उरते काय तर त्यांनी स्थापन केलेला अत्यंत पुरोगामी वैदिक धर्म नाहीसा होतो आणि उंदीरच लक्षात राहतो . प्रत्यक्षात ते इतके पुरोगामी होऊ शकले याचे सर्वात मोठे कारण ते मूळचे शैव होते पंडित होते हेच आहे.


ब्राह्मणांनी अर्थातच जेव्हा मंदिर आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी स्नान संस्कृती स्वीकारली आणि नंतर नंतर नंतर तिचा इतका गौगवा केला की शुद्ध अशुद्ध म्हणजे महाभयंकर गोष्ट बनून गेली . मात्र शूद्र हा शब्द सुद्ध या शब्दापासून तयार झाला आहे हे मात्र या लोकांनी अत्यंत जाणीवपूर्वक लपवलेले आहे . शैव लोकांचा मूळ शब्द सुद्ध असा आहे त्याचे संस्कृत रूप शुद्ध हे आहे आणि मग शूद्र असे करण्यात आले हेही हे लोक सांगत नाही. सुद्ध या शब्दाचा एक अर्थ शुद्धीवर असलेला असाही आहे आणि त्याचबरोबर ज्याला सूत कळते म्हणजे सूत्र कळते असा ज्याला सूत्र वाङ्मय माहित आहे असा होतो आणि सूत्र रचण्याची पद्धत ही मूळची शैव पद्धत आहे आणि आपणाला अनेकदा ही पद्धत श्रमण संस्कृतीने सुद्धा आत्मसात केलेली दिसेल . शेवटी कापसाचा शोध सिंधू संस्कृतीत लागलेला होता एवढे बेसिक कळले तरी खूप झाले . ही सूत्रे प्राचीन काळामध्ये लाकडावर लिहावी लागत आणि भारतात लाकूड मुबलक होते आणि त्यावर काम करणारे सुतार लोक मुबलक होते किंबहुना सुतार हा शब्दच जे लाकडावर सूत्र लिहू शकतात सूत लिहू शकतात असे लोक असा आहे . पुढे हेच लोक अनेक काम करू लागले त्यामध्ये रथ तयार करणे आले. रथ ही संकल्पना शैव लोकांची नव्हे ती घोड्यावरून आलेल्या युरेशियन लोकांनी आणलेली आहे . अन्यथा शैव संस्कृतीमध्ये कायमच बैलगाडी होती आणि बैलगाडीचे चाक तयार केले जाई. त्यामुळेच नंदीची पूजा ही बैल रूपात केली जाते कारण बैल हा केवळ शेतीसाठीच नव्हे तर प्रवासी वाहनासाठी सुद्धा महत्त्वाचा होता सगळा प्रवास बैलगाडीमुळे बैलावर अवलंबून होता . बैल आणि हत्ती हे शैव संस्कृतीचे आद्यप्राणी आहेत . त्या उलट युरेशियन लोक मात्र कायमच सिंहाला महत्व देत आलेले आहेत कारण इराणी संस्कृतीमध्ये सिंह हा महत्त्वाचा होता भारतामध्ये कॅट फॅमिली मधील मुख्य असा प्राणी वाघ आहे जो पार्वतीचे वाहन आहे सिंह नाही सिंहाचा प्रभाव हा प्रामुख्याने इराण मधून आलेल्या लोकांनी आणलेला आहे . 


या सगळ्या गोष्टी नीट पाहिल्या की मगच आपणाला भारतातील वर्णव्यवस्थेचा मूळ अर्थ कळू शकतो . युरेशियन लोकांनी शैव लोकांना हिनवण्यासाठी वर्ण जात व्यवस्था आणली खरी परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की हे उलटू शकते उद्या जर का हा क्रम बहुजन लोकांनी उलटा केला तर तुम्ही काय कराल? म्हणजे बहुजन लोकांनी तुम्हाला सर्वांना अशुद्ध म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला कसे वाटेल ? शुद्ध म्हणून आम्ही वाणीपणी, ओबीसी,बीसी आणि आदिवासी म्हणणाऱ्या लोकांना जर का वर ठेवले आणि तुम्हाला खाली ठेवले तर तुम्हाला कसे वाटेल ? हे तुम्ही आपले नशीब समजा की शैव -धर्मामध्ये कायमच भेदाभेद अमंगल ही संकल्पना आहे मंगल या शब्दाचा मुख्य अर्थ पवित्र हत्ती आहे. तेव्हा हे जे काही मनुस्मृतीच्या नावाखाली हल्ली नवीन वर्ण जात उद्योग चालू झालेले आहेत ते थांबवा कारण ते तुमच्यावरच उलटू शकतात . वर्ण व्यवस्थेचा विनाश हा सर्वांच्या भल्याचा आहे . माझी भारत सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी यापुढे फक्त ओपन, ओबीसी, बीसी आणि आदिवासी असे चार प्रवर्ग सरकारी कामात वापरावेत जातीपाती आणि वर्ण लिहायला परमिशन देऊ नये . आणि आणखी 50 वर्षांनी हे सुद्धा थांबवावे आणि माणूस अशी एकमेव कॅटेगरी वापरावी त्यात सगळ्यांचेच भले आहे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय