डेकॅथलॉन:अनकॅटेगरीकल: भक्ती


उभे वारकरी 

चाले वारकरी 

गाती वारकरी 

दगडात 


वर्ण जात पाळी 

धर्माचीच हाळी 

वाजवती थाळी 

अन्नहिन 


घेतात उसना 

शैवांचा विठ्ठल 

करती वैष्णव 

अवतार 


इतिहास ज्ञान 

न असे विज्ञान 

परंपराताण

गळ्यामध्ये 


हे शिवारकरी 

झाले वारकरी 

जातीत बुडती 

शूद्र जन 


गुलामगिरीची 

झालीये सवय 

होऊनिया वय 

हजारेक 


दिशाहीन भक्त 

आटवती रक्त 

भयाला आसक्त 

मेंदू यांचे 


मुळांवर करती 

बिनबुडी टीका 

शैवांचा हे टीका 

फेकतात 


स्वभाव गुलाम 

भक्तीही गुलाम 

नाकात लगाम 

घातलेला


झोपेचेच सोंग 

झोप हेच अंग 

झोपेशीच संग

रात्रंदिन 


भक्ती भावा पोटी 

बुद्धीचाच त्याग

म्हणे यज्ञ याग 

फळतात 


विसरले कार्य 

देह विसरले 

भक्तीत बुडाले 

लढणारे 


आता तरी सोडा 

भावनिक होणे 

मूर्खांची लक्षणे 

मिरवित 


शिवाकडे वळा 

शिवाकडे पळा 

शिव हा आकळा 

तोच मूळ 


नाथ संप्रदाय 

हीच तुझी साय 

तीच तुझी गाय 

दूध तुझे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन:अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)

बिघडलेलं दुरुस्त करणे इतकं सोपं असतं 


ब्राह्मण प्रथम मोक्षाचे केस कापतात 

आणि त्यांची शेंडी बनवतात 

संपूर्ण समाजाला शेंडी लावत जातात 


त्यांनी निर्माण केलेल्या पुरुषाला 

चार वर्ण फुटतात 

आणि असंख्य जाती 

ते पुरुषाचे डोके असतात 

आणि डोके बनून सर्वांच्या डोक्यावर बसतात 


ते मोक्ष मिळवत नाहीत अनेकदा पण मोक्षावर बडबड करत राहतात 

जेणेकरून मोक्ष धर्माच्या ताब्यात राहावा


बिघडलेल्या मोक्षाला दुरुस्त करणं सोपं नसतं 


प्रत्येक गोष्ट ब्राह्मणी करण्याचे त्यांचे कसब 

त्यांना खाटीक बनवते 

आणि ते काल्पनिक देवांना काल्पनिक हिंसा करायला लावतात 

त्यांना आपल्या तालावर नाचायला लावतात 

त्यांची शस्त्रे ते स्वतःची शस्त्रे म्हणून वापरतात


समाजाच्या हे लक्षात येत नाही 

ते त्यांनी नाचवलेला देव 

पूजतात


बिघडलेला देव दुरुस्त करणे एवढे सोपे नसते 


ते भक्ताच्या कथांना भाकडकथा बनवतात 

ते मूळ देवांना भक्ती देव बनवतात 

आणि मंदिरांचे ठेके बनवून बळकावून 

सगळे उत्पन्न स्वतःच्या खिशात टाकतात 


देवांची विक्री खरेदी चालू राहते 

आणि भक्त स्वखुशीने त्यांच्या दुकानात जाऊन

खिशातले पैसे देवाला देत राहतात 

जे त्यांच्या खिशात पॉकेट मनी म्हणून राहते 

आणि जी अनेकदा ड्रेस पेक्षा मोठ्या असलेल्या पॉकेटमध्ये विसावते


या देशांमध्ये 

सनातन फक्त धर्म लूट आहे 


तेव्हा बघ 

या दुकानदारीत सामील होशील 

तर भक्त म्हणून मोक्ष मिळणार नाही 


तुला तुझा वेआऊट काढावा लागेल 


मोक्ष म्हणजे धर्माचे हम रस्ते सोडून 

स्वतःची पायवाट निर्माण करत 

शून्य गाठणे


त्या वाटेवर तुझ्याच आतल्या मगरी आहेत  

हिंस्त्र जनावरे आहेत 

आणि अनेकदा केले गेलेले उपदेश आहेत 


मोक्षाच्या मार्गावर स्वतःच करायचा मर्डर पावलो पावली उपलब्ध असतो 


तेव्हा बघ 

महामार्ग चघळायचे

की पायांनी वाट निर्माण करायची? 


कुठल्याही वाटेवर 

वाट लागण्याचा धोका राखीव ठेवला गेला आहे 

जाणतोसच


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : भक्ती या काव्यफायलीतून)


तुXXX गल्ल्यावरून उठून 

शेती करायला चाललाय 


त्याला कळत नाहीये 

हे वैश्यांना शूद्र बनवण्याचं कारस्थान आहे 


त्याला विठ्ठX दाखवण्यात आलाय 

आणि सांगण्यात आलंय कि 

त्यानं कफल्लक व्हावं 

शेती करावी 

म्हंजे त्याला विठ्ठX दिसेल 


तुXXX विXXठ्साठी व्यापार बुडवून शेतीत आलाय 

अन लगडलेलं चांदणं पाहतोय 


खरंतर प्लँनिंगनुसार तुXXX

शेती करता करता मरून जावा 

पण तुXXX ला विठ्ठX हवाय 

संपूर्ण सकळ 

त्यासाठी कुठलीही कळ 

सोसायची त्याची तयारी हाय 


त्याला संपूर्ण सकळ प्राप्त झालंय 

आता ना तो विXX आहे ना तुXXX

तो आता फक्त असण्याची प्रभा आहे 

जिला भेदाभेद कळत नाहीत 


असण्याची प्रभा निघालीये 

भेदाभेद अमंगळ म्हणत

भेदाभेद गिळत 


कोन्स्पिरसीला कळत नाहीये 

तिचं काय करायचं 

जी शेतात खपून मरणार असं वाटलं होतं 

ती आकाश बनून परतलीये 


कोन्स्पिरसी वह्या बुडवतीये 

असण्याची प्रभा तरंगून परत येतीये 

कोन्स्पिरसी मारेकरी धाडतीये 

तर असण्याची प्रभा त्यांना भक्त बनवून परत धाडतीये 


कोन्स्पिरसीच्या लक्ष्यात आलंय 

आपण काहीच करू शकत नाही 

ती बॅकग्राउंडवर जाऊन टाळ वाजवतीये 

आणि वाट पाहतीये 

कात टाकून 

फोरग्राऊंडवर येण्याची 


श्रीधर तिळवे नाईक 

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )

एक साउथ इंडियन इंसान का स्वगत श्रीधर तिळवे नाईक 


मै रामके खिलाफ नही हुं 


मैं उन लोगों के खिलाफ हुं 

जिन्होने हमारा जिक्र 

उनके फिक्शनमें बंदर करके किया है 


मैं राम के खिलाफ नही हुं 


मगर मुझे इस बात पर ऐतराज है की 

एक द्वंद्वयुद्ध मग्न इंसान को दूरसे

वानर कहके बाणसे मारा गया 

और कहा गया की क्षत्रिय को जंगलमे किसी भी प्राणी का शिकार करने का हक हैं 


मैं राम के खिलाफ नही हुं 

मगर मुझे अबतक समझ मे नही आ रहा है 

की जटायू नाम का इंसान फिक्शन मे तब्दील होते होते कैसे पंछी बन गया 


मैं रामके खिलाफ नही हुं 

क्यूँ की मैं जानता हूं 

किसी की भी पत्नी 

किडनॅप करना गुनाह है 


खासकरके सीता जैसी पत्नी 

जो अपने पतिके साथ एकनिष्ठ है 


इसीलिए तत्व समझता हूँ 

लेकिन जब हनुमान 

पत्नी को लेके आ सकता हैं 

तो खुद के अहंकार के लिए 

हजारो लोगों की जान दांवपे लगाना 

मुझे सही नही लगता 


जब आपके पास हनुमान है 

तो युद्ध की क्या जरुरत है ?


राम के खिलाफ नही हुं मैं 

मगर हनुमान जैसे मित्र को 

भक्त कहना 

मुझे शोभादायक नही लगता 


मै रामके खिलाफ नही हुं 


मगर किसी शूद्र को तपश्चर्या करनेसे रोकना मुझे नागवार गुजरता है 


अगर मोक्षकोभी वर्ण मे बाटना है तो मुझे वो मंजूर नाही 


मैने भी उस ब्रीज बनाने में मेरा योगदान दिया था 

और मैने ये भी देखा की जिन्होने मेहनत की 

उनको बंदर कहा गया 


मैने ये भी देखा है 

जिनको इंजीनियरिंग आती थी 

उन्हेभी बंदर कहा गया है 

और जिनके हाथमें शस्त्र थे 

उन्हे भगवान कहा गया है 

या फिर राक्षस 


मै जानता हूं कि राम ब्रिज बनाना नही जानते थे 

इसलिये तो शरयू नदी पे कोई ब्रिज नही बना 


उन्होंने कहा था की एक मल्हाहने उनको पंहुचाया था 


मैं राम के खिलाफ नही हुं 

मगर सीता की अग्निपरीक्षा 

मुझे सरप्राईज करती है 


मै खुश हुं 

मेरे अंदर राम नही रहे 


आप कह सकते हैं 

मुझमे राम नही रहा  


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : भक्ती या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय