चॅनेल ज्ञ, लव्ह , लिव्ह इन अँड लव आउट
क्रेझी फिलिंग टच करतय अविरत
एक समुद्र आता लाटा मोजत नाही
ढग मोजतो
प्रोफेशनल डोळ्यांचा अंत झालाय
एक मवाळ सिनरी स्क्रिप्टमधून डोकावतीये
आणि त्वचेवर हिरवी होतीये
श्वासांचं किलर स्किल आता किल्ले बांधतय
वाऱ्याचा पतंग उडवत बसलोय मी
वादळांच्या मध्ये
आणि मला हवेत उडण्याचं आता दुःख होत नाही
माझ्यातला सायंटिस्ट अल्कोहोलिक झालाय तुझ्या मादक प्रेमाच्या दारूमध्ये
मी तुझ्या बॉडीचा कायमचा सबस्क्राईबर झालोय
आणि तुला फक्त वाचतोय
पाना मागून पाने पाना मागून पाने
त्यांच्यावरच्या रानांच्यात कधी बर्फ कधी आग कधी पाऊस कधी नद्या
आणि कधी वाघाची डरकाळी सुद्धा
उंटावरच्या सगळ्या शहाण्यांना मी आता तुझ्या स्तनांच्या नदीत उतरवायला शिकलोय
तुझ्या नजरेतून पाघळणाऱ्या प्रकाशाची तेजस्वी वृध्दी पिंगा घालणारी
झोपेलाही स्वप्ने पडतात ती तुझीच
आणि जागृतीला जाग येते तुझ्या डोळ्यांच्या सावल्यात
एक लघु आता स्टॉप न घेता दीर्घ झालाय
मी चर्चगेटवर तुला सोडायचे म्हणून
चर्चगेट स्टेशनासाठी म्हणून येतो
तुझ्या प्रेमात ब्लाइंड फोल्डेड ठाण्याला पोचतो
तुला पोहोचवतो
आणि परततो
आणि पुन्हा पोहोचतो
फक्त तुला पाहण्यासाठी
तुला पाहण्याचे क्रेझी फिलींग संपत नाही
स्टेशनांची गणित आता मांडते कोण?
प्रेम म्हणजे थोडीच स्टेशनरी आहे?
तुझ्या एसएनडीटी विद्यापीठाला खापरपणजोबा समजणारा माझा हात
अचानक तुझ्या प्रेमामुळे त्याच्यात कॉन्टेम्पररी झालाय
जे एस हॉलची झालीये डॉल
आणि फॉल होऊ न देता
मी धबधबे वेचतोय तुझ्या अदांचे
जग कुठे चालले याची मला आता पर्वा नाही
मला आपल्यातल्या महाकाव्याची पर्वे जास्त महत्त्वाची वाटतात
प्रत्येक भेट threat वाटण्याच्या काळात
आपण भेटींना सॅटॅलाइट करतोय
तू वेडिंग ड्रेस घालशील ना घालशील
तू बोटांच्या आत माझी अंगठी पाळशील ना पाळशील
एक गोष्ट नक्की आहे
आपले पाय एकमेकांच्यात आता अनंत होत चालले आहेत
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील
चॅनेल ज्ञ, लव्ह , लिव्ह इन अँड लव आउट या
काव्यफायलीतून)
बायकांच्या विषयी अनुभवातून बोलायचं की विज्ञान सांगतं त्यावरून बोलायचं
मला कधीच कळलं नाही
ॲनाटोमीचा अभ्यास करून सत्व किती कळतं ?
एच टू ओ म्हणजे पाणी आणि प्रत्यक्ष पावसात भिजणे
दोन भिन्न गोष्टी नाहीत काय?
मी बायका असताना म्हणूनच छत्री येत नाही सोबत
आणि रेनकोटचा तर आयुष्यात मला कधी शोधच लागला नाही
डोक्यावर हॅट घालायला मला आवडते
कारण ती कधीही फेकता येते
पाऊस बाहेरुन डोक्यात घेणे
आणि आतला पाऊस बाहेर फेकणे
याला रोधक फक्त मनुष्य शोधू शकतो
कारण त्याला विज्ञान आहे
मी नदी बनतो ढग बनतो
आणि h2o ला मात्र माझ्यात गुप्त ठेवतो
मी अनेक नद्या रिकाम्या करून पाठवलेल्या आहेत समुद्राकडे
बेटावर राहण्याची प्रॅक्टिस मला आवडते
एकतर समुद्रात राहता येते
आणि समुद्रापासून दूरही राहता येते
तू एच टू ओ चे धरण फोडून
पावसाएवढ्या उंचीची कधी होणार आहेस?
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल ज्ञ लिव इन अँड लव आउट या काव्यफायलीतून)
तू आतून प्रचंड घाबरलेली
माझा गृहप्रवेश तसा नेहमीचाच
आणि तुझी कोसळ माझ्या अंगावरची
मिठीला गरम करत
दिठीला घरामध्ये आणत
काकणांचा नाद
हातांचा तामजाम
मला थक्क व्हावेसे वाटते
पण मी होत नाही
तू आतून घाबरलेली
ओठावर झुंबन
मोर नाचणारे नाचवणारे
लिपस्टिकचा पाऊस
रसांचा ढग
त्वचा मधाळ होत सर्पाळ
तू आतून घाबरलेली
कपाळावर प्राक्तन उमटवणारी स्पर्श बोली
आवेगांचा धडाका धूम धूम
रुमझुमत
दारातून एन्ट्री झाली नाही झाली
तोवर गुंफांचा चाफेबंद उमाळा
खिडक्या बेभान
एक उकाळा गालावरून
शर्टांचे कुलूप काढून भडकवलेली बटणे
माझे दोन्ही वक्ष तुरुंगातून मोकळे होत
पॅंटीतील पिसाटी खोळंबत ठेवलेली
चेहऱ्यावर पॅशन
आणि आतून तू घाबरलेली
अवयवाचे लाकूड मुलायम अग्नीत घालावे का ?
मला मुखशुद्धी आवडते
कारण ती वासना शुद्ध करते
एका लाकडात जंगलाचा गहिवर
मी दवबिंदूंच्यातून प्रवास करतोय
अख्खा समुद्र सूर्यात मावळत
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील ज्ञ : लव, लीव इन अँड लव आउट या काव्यफायलीतून)
तू माझ्या शक्यतांच्या वर प्रेम केले
प्रत्यक्षांच्यावर नाही
बॉलीवूड मधील एक महान दिग्दर्शक
किंवा एक महान बिजनेसमन
मी तुझ्या शक्यतांच्यावर खरा उतरलो नाही
ज्याची पीपासा पैसा नाही
त्याच्या शक्यता फक्त शक्यताच राहतात
माझ्या व्यवहारांच्या अपयशी झालेल्या फलश्रुती
शेवटी प्रेमाचे झाड कापून गेल्या
कुठलीही नाती प्रेमावर टिकत नाहीत
आपलेही टिकले नाही
काळीज ही भानगड कधीही साईडलाईन करता येते
त्यामुळे मी सलाईन्स घेतली नाहीत
माझा अहंकार दुधासारखा फाटला
मी तुला सोडून देत नाहीये
फक्त माझ्यात दिसलेल्या शक्यता
तू दुसऱ्यात शिफ्ट केल्यास
हे स्वीकारतोय
शेवटी लिफ्ट मिळणे गरजेचे
तुला ती मिळाली
याचा आनंदच आहे
तू अशक्य मागत नव्हतीस
पण तुझे शक्यही
शाक्त झाले माझ्या बाबतीत
बुद्ध होण्याच्या कसल्याही शक्यता माझ्यात नाहीत
हा तुझा शेवटचा साक्षात्कार
मी भगवा नाही
फक्त काळा निळा पडलोय
माझी बोटे क्षणभर कापली गेली आणि माझ्या हातावर कोटेशन सारखी ठेवली गेली
मी आता बसलोय
आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर
आत्महत्येची ट्रेन मला न घेता निघून गेलीये
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील ज्ञ : लव, लव इन अँड लव आउट या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment