सत्य, व्यवहारवाद, उत्तर व्यवहारवाद आणि व्यवहार १०च्या पुढे


सत्य , व्यवहार आणि उत्तर व्यवहार १ श्रीधर तिळवे नाईक 

कुल म्हणजे समान जन्मदत्त गुणांनी युक्त असलेल्या समानपिंडाच्या आणि काम संबंधाने जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा गट होय . पूर्वीच्या काळी हे जन्मदत्त गुण आणि पिंड म्हणजे नेमके काय हे स्पष्ट नव्हते परंतु आता आपणाला जेनेटिक्समुळे ते स्पष्ट झाले आहे . इतकेच नव्हे तर आता जीन्समुळे आपणाला कोण कोणाचे आईबाप आहेत वगैरे अनेक गोष्टी सहजरीत्या कळतात पूर्वी यामागचे विज्ञान माहित नव्हते पण आता आपणाला हे सर्व काही माहिती आहे . त्यामुळे कुल किंवा कुल हे जितके वर्तमानकालीन संबंधांचे जोडणारे कामसूत्र आहे तितके कदाचित कुठलेच इतर सूत्र नाही आणि याचे कारण समान गुणसूत्रे हे आहे. 

प्रश्न असा आहे की आता आपण या काम गुणसूत्रांच्या आधारे जर का कुलव्यवस्था निर्माण केली तर ती आत्ताच्या काळामध्ये सक्षमपणे नांदवता येणार आहे का ? माझ्या मते आता या दिशेने प्रयत्न करायला हवा. प्राचीन काळी आपण या सर्व गोष्टीला आप्तावळा असा शब्द शोधला होता . अर्थातच आप्तावळा नंतर गोतावळा येतो ज्यात काम संबंध न आलेले अनेक मित्र येतात मैत्रिणी येतात आणि मग गणवळा येतो याला एक शब्द गणगवळण पण होता आणि त्यातूनच एका वळणाचे असलेले गावातले गणगलोक अशी व्याख्या ही होती . आपल्याच गणातले परंतु कामसूत्राने जोडले न जाणारे अनेक मित्र गोतावळ्यामध्ये येतात तर अनेक मित्र जे गोतावळ्यात नसून सुद्धा ज्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला असतो असे लोक म्हणजे गणवळा होत . 

प्राचीन काळी टोळी रूपात अस्तित्वात असलेले लोक भगवान शंकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे गण झाले आणि त्यातूनच हा गणवळा डेव्हलप झाला . 

प्रश्न असा आहे की मग एक वळण स्वीकारणारा हा आत्ताच्या भाषेत सांगायचे तर संविधान स्वीकारणारा हा जो महागट आहे त्याच्याशी संबंध कसे ठेवायचे ? 

या प्रश्नातच संपूर्णपणे व्यवहार नावाची गोष्ट येते आणि हा व्यवहार कसा पार पाडायचा याचे वळण येते . सर्वसाधारणपणे इथे प्रत्येक वळण अंगवळणी पडावे लागते आत्ताच्या भाषेत सांगायचे तर संविधान अंगात मुरावे लागते आणि मग संविधानाच्या अंतर्गत काय व्यवहार करायचा ते निश्चित करावे लागते . प्राचीन काळी प्रत्येक कुलाचे असे अंगवळण निश्चित झालेले होते अजूनही आमच्या कुटुंबात हे चालते आणि हे चालत नाही अशा पद्धतीने आपण आपला कुटुंबव्यवहार इतरांच्या पुढे सादर करतच असतो .

व्यवहार साधारणपणे पुढील गोष्टींनी युक्त असतो 

१ आहार त्यात समाजात जाऊन आहार मिळवणे कमावणे आणि घरात येऊन आहार करणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या !

२ आहार्य यात कपडे वगैरे आहाराखेरीज असलेल्या इतर सर्व गोष्टी येतात शैव नाट्यशास्त्रामध्ये त्यामुळेच आहार्य अभिनय हा एक वेगळा अभिनय मानला गेलेला आहे .

३ विचार यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व विचार येतात आणि त्यांची एक प्रणाली येते जी सर्वांना कॉमन असते यामध्ये प्रामुख्याने यम आणि नियम येतात आणि संयम कुठे कुठे साधायचा कसा साधायचा तेही येते म्हणजेच एका अर्थाने यम संयम नियम हे ठरवले जातात आणि त्याचबरोबर गणाने ठरवलेले विधी नियम सुद्धा पाळले जातात आणि समाजाने आणि सामाजिक संस्थांनी अनेकदा जिथे आपण काम करत असतो उदाहरणार्थ कंपनी कार्पोरेट हाऊस तिथे ठरवलेले अधिनियम पण पाळले जातात. विधी नियम आणि अधिनियम दोन्ही पाळावे लागतात पण ते साधारणपणे बाहेर पाळावे लागतात घरात मात्र आपणाला यम संयम आणि नियम अधिक पाळावे लागतात 

४ आचार यामध्ये आपल्या विचाराचे आचरण करावे लागते अनेकदा यामध्ये आचार्य असलेले लोक सल्लामसलतीसाठी बोलवले सुद्धा जातात कारण कधी कधी वैचारिक संघर्ष निर्माण होतो अशावेळी त्या त्या कुलाच्या आचार्यांनी हे प्रश्न येऊन मिटवावेत अशी अपेक्षा असते . आचारामध्ये आचरण करण्याच्या सर्व अटी ठरवाव्या लागतात त्यासाठी त्या कागदावर उतरवाव्या लागतात आणि त्यासाठी करार करावे लागतात आता लिखित संस्कृती व्यवस्थित विकसित झाल्याने आपण कुटुंबात सुद्धा आपले करार निर्माण करू शकतो काही वेळा वाद विवाद होतात आणि त्यासाठी कुटुंबाच्या किंवा कुलाच्या आचार्यांना बोलावले जाते मी स्वतः आचार्य म्हणून असे वाद विवाद मिटवलेले आहेत .

एकदा का हा व्यवहार म्हणजे काय प्रकार आहे हे कळले की आपण सामाजिक व्यवहार म्हणजे काय तेही ठरवू शकतो कुल व्यवहार आणि गण व्यवहार आणि गणामध्ये समाजामध्ये असलेला सामाजिक व्यवहार या सर्वांनी मिळून महा व्यवहार ठरतो . व्यवहारवादाची सुरुवात ही अशी प्राचीन शैव संस्कृतीतच रुजलेली आहे आणि म्हणूनच शैव श्रुतीमध्ये आणि शैव श्रुतीने निर्माण केलेल्या सर्व धर्मांच्या मध्ये व्यवहार वाद हा फार महत्त्वाचा असा वाद आहे प्रणाली आहे . मुख्य म्हणजे व्यवहारिक नियम हे सतत बदलू शकतात आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे ते बदलता येऊ शकतात ही गोष्ट शैव श्रुतीने स्वीकारलेली असल्याने ती विलक्षण लवचिक झालेली आहे आणि म्हणूनच जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपणाला दिले तेव्हा सर्व शैव लोकांनी तिचे जोरदार स्वागत केले कारण संविधानाची सर्वाधिक आवश्यकता ही पंडित, वीर, वाणी पणी बनिया , कारागीर , आदिवासी या पाच समुदायातल्या आणि त्यांच्या मध्ये नांदत असलेल्या सर्व समाजातल्या सर्व प्रकारच्या शैव लोकांनाच होती . हे संविधान समान नागरी कायद्याने युक्त झाले असते तर जास्त बरे झाले असते . अर्थात अजूनही आपण यासाठी आंदोलन करू शकतो .

एकदा का हा सर्व व्यवहार काय आहे हे तपशिलात लक्षात आले की मग आपणाला व्यवहारवादाची का गरज आहे हे नीट कळते . 

श्रीधर तिळवे नाईक 


उपयुक्ततावाद , व्यवहार वाद उत्तर व्यवहार वाद आणि सत्य श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये ज्या काही गोष्टींच्या बाबतीत गोंधळ माजवला जातो त्यातील एक गोष्ट म्हणजे उपयुक्ततावाद आणि व्यवहार वाद यांना एक समजणे प्रत्यक्षामध्ये या दोन गोष्टी वेगळे आहेत कारण एक म्हणजेच उपयुक्ततावाद हा पुरोगामी प्रबोधनवादी नवते मधून जन्मलेला आहे त्या उलट व्यवहार वाद हा आधुनिक नवतेमधून जन्मलेला आणि अस्तित्ववादाच्या तोडीस तोड असलेला असा वाद आहे अशी मांडणी आहे.


दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे कलावंतांच्या मुळे अस्तित्ववादाचा खूप गाजावाजा झाला पण व्यवहारवादाची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही सर्वात आश्चर्यकारक जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आंबेडकर वादी लोकांनी सुद्धा व्यवहार वादाकडे प्रचंड दुर्लक्ष केले वास्तविक व्यवहारवादाचा सर्वाधिक सखोल परिणाम ज्या व्यक्तीवर झाला ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय मी स्वतः व्यवहारवादाचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करण्याचे पहिले कारण रसेल आणि दुसरे कारण आंबेडकर होते.


माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी वाचलेला पहिला पाश्चिमात्य तत्त्वज्ञ सुदैवाने रसेल होता त्यामुळे माझ्या बाळबोध कवितांच्या वर त्याचा प्रचंड परिणाम आहे. रसेल नसता तर मी कदाचित जडवादाचा इतका खोलात जाऊन विचार केला नसतो माझे लोकायतवादाशी या काळामध्ये नाते रसेल वाचून अधिक घट्ट झाले नंतर मी शक्तिपाता नंतर बदललो असलो तरी बर्ट्रांड रसेल हा माझा कायमच ऑल टाइम फेवरेट पैकी एक राहिला काळ गेला तसा त्याच्या प्रभावातून बाहेर मी आलो परंतु त्याच्यामुळेच संपूर्ण युरोपियन जग काय पद्धतीने विचार करते हे कळण्यासाठी मला खूप मदत झाली . मी बारावीला सायन्सला असल्यामुळे साहजिकच त्याची सायन्स विषयक मते मी अत्यंत खोलात जाऊन तपासलेली आहेत .


या काळातल्या तत्त्वज्ञांच्या पुढे सत्य विषयीचे जे प्रश्न होते ते खूप विलक्षण होते मुळातच कळत नकळत सत्य सापेक्ष असते किंवा निस्से म्हणतो तसा सत्य कन्स्ट्रक्टेड असते यात मुख्य तत्वज्ञानाचा प्रभाव प्रचंड पडायला लागला होता . उत्क्रांतीनी वादाने यात अधिकच भर टाकली कारण पुरोगामी वाद वारंवार एकाच गोष्टीपाशी आडत होता ती म्हणजे माणूस कसा तयार झाला हे पुरोगामी वादाला सांगता येत नव्हते . पुरोगामी वादाच्या शेवटी चार्ल्स डार्विनने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि गोष्टी बदलल्या. डार्विन वाद पुरोगामी वादळातून जन्मलेल्या धार्मिक सिस्टीम स्वर सिस्टिम्स वर प्रचंड मोठा आघात करत होता आणि त्याचा परिणाम कळत नकळत आधुनिकतेला जन्म देण्यामध्ये होत होता . मार्क्स आणि डार्विन हे दोन पुरोगामी वादाचे शेवटचे ग्रेट फिलॉसऑफर होते . 


व्यवहारवादाचा सर्वात मोठा विजय जर कुठला असेल तर तो म्हणजे हे तेच लोक होते ज्यांनी संरचना वादाचा पाया घातला आपल्याकडे अनेक लोकांना असे वाटते की सरचनावादाचा पाया हा फर्डिनांड सस्युर ने घातलेला आहे यावर मी वारंवार टीका केलेली आहे आणि हे फार सुरुवातीपासून ही टीकामी केलेली आहे याचे कारण असे की आमच्या पिढीपासूनच इंग्लंड साईडला पडले आणि अमेरिका केंद्रस्थानी आली होती साहजिकच अमेरिका काय म्हणते याबद्दल आमच्या मनात भयंकर उत्सुकता होती यात हॉलिवूडचा सुद्धा प्रचंड वाटा होता साहजिकच संस्युर च्या आधी मी Charles Sanders Peirce वाचला होता आणि कळत नकळत त्याचा काही परिणाम माझ्यावर झाला होता पुढे भाषाशास्त्राचा अभ्यास करताना तर तो संपूर्ण आकलनाच्या कक्षेत आणून मला संपवावाच लागला . गंगाधर पाटील यांच्यावर मी प्रत्यक्ष भेटीत याच अंगाने खूप टीका केली होती पण त्यावर त्यांचे उत्तर अत्यंत स्पष्ट होते ते म्हणजे तू अनुष्टुभसाठी त्याच्यावर मराठीत मालिका दे मी छापतो. माझी त्यावेळी PhD चालू असल्याने ते शक्यच नव्हते . शिवाय मी त्यावेळेला माझी चिन्ह की तयार केली होती . ती डेव्हलप करण्यात मला जास्त रस होता. 

Charles Sanders Peirce बद्दल खुद्द रसेलनेच"he was one of the most original minds of the later nineteenth century and certainly the greatest American thinker ever" असे म्हटले आहे आणि ते विकिपीडियावर उपलब्ध आहे . मलाही तो अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ विचारवंत वाटतो किमान १९ व्या शतकातला तो सर्वश्रेष्ठ अमेरिकन विचारवंत आहे याबद्दल आता कोणाला शंका उरलेली नाही .


दुर्दैवाची गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे संपूर्ण वाचन केलेले नव्हते. त्याऐवजी ते व्यवहारवादाचे जी मुख्य धारा आहे जिला आता आपण व्यवहारवादाची दुसरी पिढी म्हणतो तिच्यापासून ते जास्त प्रभावित होते कारण या दुसऱ्या पिढीतील जॉन ड्यूई हे त्यांचे गुरु होते . आताच एक प्रॉब्लेम आणखी होता तो म्हणजे मुळात Charles Sanders Peirce चे लिखाण या काळामध्ये फार प्रसिद्ध झाले नव्हते जेव्हा ते झाले तेव्हा अर्थातच खळबळ उडाली कारण अनेक बेसिक संकल्पना त्याने फार वेगळ्या पद्धतीने वापरल्या होत्या मांडल्या होत्या आणि हळूहळू स्पष्ट झाले की तोच खरा व्यवहारवादाचा संस्थापक आहे आणि आज त्याला पूर्णपणे मान्यता आहे. 


आंबेडकरांचे सगळे समाजकारण आणि राजकारण हे त्याने मांडलेल्या व्यवहारवादापासूनच प्रेरणा घेऊन सुरू होते त्यामुळे आंबेडकर यांना अभ्यासायचे आहे त्यांनी प्रथम व्यवहार वाद नीट अभ्यासणे आवश्यक आहे . आंबेडकरांच्या अनेक संकल्पनांचे मूळ व्यवहार वादात आहे. 


अलीकडे या व्यवहारवादाच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा जी सुरू झालेली आहे ती प्रामुख्याने सत्य या बाबतीत सुरू झालेली आहे. याचे कारण अर्थातच पोस्ट truth फिनॉमिना आहे . व्यवहार वादामध्ये प्रोसेस फार महत्त्वाची असते यातूनच मग सायंटिफिक प्रोसेस म्हणजे नेमके काय असा प्रश्न निर्माण होतो आणि या सायंटिफिक प्रोसेस मधून नेमके सत्य कसे सापडते असा आधुनिक प्रश्न निर्माण होतो. 


मी नेहमीच मांडत आलेलो आहे की सत्य मुळात दिसतच नाही ते अनुभवता येते पण ते फक्त मोक्ष मिळालेल्या माणसालाच अनुभवता येते . त्यामुळे सत्य विषयी कसलाही सिद्धांत लागूच होत नाही . मात्र आपण वास्तव आणि तथ्य या दोन गोष्टींच्या विषयी बोलू शकतो . प्रश्न असा आहे की आपणाला वास्तव कसे प्राप्त होते. ते इंद्रियांना संपूर्ण दिसते का आणि खरा गोंधळ इथेच सुरू होतो कारण वास्तव आपल्या इंद्रजांना पूर्णपणे दिसतच नाही आणि अनेकदा वास्तव आपली इंद्रिय कुठे असतात कुठल्या पोझिशनमध्ये असतात त्यावर अवलंबून असते साहजिकच त्यामुळेच तथ्य सर्वाधिक महत्त्वाचे होते कारण आपणाला खरे तर वास्तव दिसतच नाही आपणाला फक्त वास्तवाचा एक तुकडा दिसतो आणि म्हणूनच त्या तुकड्याला आपण तथ्य समजू शकतो वास्तव समजण्याचे कारण नाही . साहजिकच मग त्या तथ्यामुळेच आपणाला सत्य हेच अपेक्षा असते असे म्हणावे लागते आणि आधुनिक आणि उत्तराधुनिक यांची हीच भूमिका आहे . राशोमांसारख्या कलाकृती त्यामुळे जन्मले. भारतात अर्थातच हे नवीन नाही याचे कारण जैन लोकांनी हा सिद्धांत आधीच मांडलेला आहे. फक्त त्याचे स्वरूप मोक्षिक होते आधुनिक आणि उत्तर आधुनिकतेत मात्र त्याचे स्वरूप हे वैज्ञानिक करण्याचा प्रयत्न झालेला आहे . सत्याच्या आकलनासाठी सर्वबाजूवाद" अत्यंत आवश्यक आहे अशी चौथ्या नवतेची भूमिका आहे एकेकाळी वास्तव न्याहाळण्यासाठी आपणाला योग्य अशी साधने उपलब्ध नव्हती परंतु आता अशी साधने उपलब्ध आहेत विशेषता डिजिटल साधने त्यामुळे साहजिकच या डिजिटल साधनांनी वास्तवाशी केलेला करेस्पोंडन्स म्हणजे तथ्य अशी भूमिका आपण घेऊ शकतो आणि अशा अनेक डिजिटल साधनांनी सर्व बाजूंनी गोळा केलेली तथे गोळा केलेली तथ्ये आणि त्यातून निरीक्षकाने अत्यंत तटस्थपणे काढलेले तथ्यांविषयीचे निष्कर्ष म्हणजे वास्तव होय असे आपण म्हणू शकतो . तुम्ही सर्व पोझिशन वर जोपर्यंत फोकस करत नाही आणि त्यांच्याविषयीची नेटवर्क सिस्टीम तुम्ही ऑपरेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला आजच्या वास्तवाचा उलगडा होऊ शकत नाही . त्यामुळेच माणसाला पडलेली ही मर्यादा त्याच्या न्यायला पडलेली ही मर्यादा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती स्वीकारावी लागते म्हणूनच सर्व बाजूवाद महत्त्वाचा होतो मी माझ्या कवितांच्या मध्ये अनेकदा हा सर्व बाजू वाद हाताळत असतो म्हणजे माझ्या बॉल वरच्या ज्या कविता असतात त्या मॉल कडे एका बाजूने पाहत नाही ते अनेक बाजूने पाहतात आणि त्यामुळेच अनेकांचा गोंधळ उडालेला दिसतो. याचे कारण आपल्याला याची सवय नाही आपण सर्व अजूनही आधुनिक आणि उत्तराधुनिकतेत अडकलेलो आहोत . मुळा त्यासाठी मुळात यासाठी कवीचे अस्तित्व केव्हा कवीचे शरीर हेच मल्टीपोझिशनल असावे लागते आणि त्याला तसे ट्रेनिंग लागते आपल्याकडे अशा ट्रेनिंगची प्रचंड वाणवा आहे. माणसे अनेकदा एक बाजूवादी एक पार्टी वादी एक इझम वादी असतात आणि त्यातून हाती काहीच लागत नाही . मी नेहमीच या बाबतीत जैन धर्माचे आभार मानत असतो की त्यांच्या अनेकांत वादामुळे मला बारावीपासूनच यासंदर्भात ट्रेनिंग मिळायला सुरुवात झाली . जैन गल्लीत राहिल्याचे व जैन गल्लीत वाढल्याचे जे काही फायदे होते त्यामध्ये हा एक फायदा होता आणि आहे. 


गौतम बुद्ध याने काही प्रश्न अव्याकृत अनावश्यक मानले होते माझ्या मते खरे प्रश्न विशेषता तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले अनावश्यक प्रश्नच असतात पण ते फार मूलभूत असतात खरे उत्तर हेच आहे की सत्य आपणाला फक्त अनुभवता येते पण ते ज्ञानाच्या कक्षेत अजून तरी आणता आलेले नाही आणता येत नाही . भविष्यात कधीतरी कदाचित हे शक्यही होईल परंतु ते जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण पाहूच . सध्या तरी ते अशक्य बनलेले दिसते . सध्या आपण अनेक बाजूवादी आहोत आणि कधी ना कधीतरी आपणाला सर्व बाजूवादी होता येईल . किंबहुना अनेक बाजूवादाचे जे मूळ उद्दिष्ट आहे ते सर्व बाजू वाद आहे एकदा का आपण व्यवहाराच्या सर्व पातळ्यांच्या वर सर्व बाजूवादी पुण्यात होण्यात तंत्रज्ञानाच्या पातळीवर यशस्वी झालो तर बऱ्याचशा प्रॉब्लेम्सची सोडवणूक आपल्याला सापडेल .


चौथ्या नव्हत्यातला आणखी एक प्रश्न असा आहे की डिजिटल करसपोंडन्समध्ये प्रत्यक्ष असलेले वास्तव आपणाला कळू शकते का आणि डिजिटल कळणे म्हणजे ब्रेनल कळणे आहे का ? की अंतिम सत्य कधीच कळणार नाही आणि हा संसार कधीच आपल्याला आकळणार नाही ? सध्या तरी आपणाला इतकेच माहिती आहे की आपले ब्रह्मांड हे संसाराच्यापैकी एक ब्रम्हांड आहे आणखी पुढे किती संसार वाढून ठेवलेत माहित नाही . किंबहुना आणखी किती ब्रम्हांडे वाढवून ठेवलेत तेही माहित नाही . चौथ्या नव्हते मध्ये माणसाच्या ज्ञानाच्या मर्यादा जितक्या पुढे येऊ लागलेले आहेत तितक्या त्या यापूर्वी कधीच पुढे आलेल्या नव्हत्या पण त्याचबरोबर हेही तितके खरे आहे की डिजिटल मुळे ज्ञानाच्या अनेक सर्व बाजू आपल्या कक्षेत येण्याच्या शक्यता वाढलेले आहे वाढलेले आहेत म्हणजेच जितके ज्ञान वाढते तितकेच आपले अज्ञान वाढते असे दिसते. याला मी ज्ञानाचा वर्ग वादाचा सिद्धांत म्हणतो म्हणजे दोन चा वर्ग चार होतो चार चा वर्ग आठ होतो तसे काहीसे ज्ञानाबाबत आणि अज्ञानाबाबत एकाच वेळी घडत जाते .


प्रश्न असाही निर्माण होतो की डिजिटल रियालिटी ही किती स्टाईलआईज डिजिटल रियालिटी आहे की सत्याने मारलेली ती केवळ स्टाईल आहे? दुसरा प्रश्न साधनांच्या मर्यादांचा आहे आणि तो म्हणजे आपली साधने आपली सत्य शोधणारे साधने ही खरोखरच सत्याशी करस्पॉंडन्स करत असतात का ?करू शकतात का ? की त्यांच्या मर्यादा या आपल्या ज्ञानाच्या मर्यादा होतात ? व्यवहारवादामध्ये निगोशियेशन्स फार महत्त्वाच्या असतात . प्रश्न असा आहे की तुमचे साधन तुमचे माध्यम या निगोसेशन्स करू शकते का ? त्यांची निगोसिएशन्स करण्याची क्षमता हीच तुमची ज्ञान क्षमता बनते का ? की तुमच्या मेंदूतले अपरोक्ष बायस बनवून सतत येत राहते आणि तुमची ज्ञानाची मर्यादा तुमच्या बायसची मर्यादा ही तुमच्या ज्ञानाची ही मर्यादा होते ? व्यवहार वाद खूप प्रत्यक्ष ला महत्त्व देतो आणि आज प्रॉब्लेम असा आलेला आहे की प्रत्यक्ष जे असते ते सापेक्षतेमुळे खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष नसतेच ते तथ्य असते . आपणाला दिसणारे भौमितिक आकार हे प्रत्यक्ष त्या वास्तवात उपस्थित आहेत की आपल्या परोक्षमध्ये म्हणजे मेंदूमध्ये उपस्थित असलेल्या भूमितीची भौगोलिकतेची ती निर्मिती आहे ? उदाहरणार्थ पृथ्वी गोलाकार आहे असे आपणाला वाटते परंतु ती प्रत्यक्षात परफेक्ट गोलाकार नाही . ती प्रचंड खडबडीत आहे . तर तिचा व्यास मोजताना जिला आज आपण फ्रॅक्टल जॉमेट्री म्हणतो तिचा वापर करावा का ? चौथी नव्हता असे सांगते की होय हे करावे लागेल आणि हे करणे इतके सोपे नाही . पृथ्वीच्या गोलाकारावर असणारे फ्रॅक्टल मोजणे हे इतके सोपे नाही . तुम्ही म्हणाल की कदाचित सेंटीमीटर चा फरक असेल परंतु प्रत्यक्ष वास्तवात सेंटीमीटर फार मोठी गोष्ट होऊन बसते . ज्यांना स्पेसीकल्स कशी घुसवायची हा प्रश्न पडतो त्यांना समोरच्या गुंफे मधला मिलिमीटर सुद्धा काउंट करावा लागतो . फिनिशिंग टचेस ऍक्युरेट असावे लागतात . दैनंदिन व्यवहारामध्ये या गोष्टी इतक्या डॉमिनेट आत्ता करत नाहीत परंतु भविष्यात त्या करत जाणार आहेत . हीच गोष्ट रंगांच्या बाबतीत आहे . रंग एकाच वेळेला सापेक्ष आहेत आणि तरीही मानवी जीवनात चित्रकलेमध्ये ते निरपेक्ष होत जातात. मानवापुरते असलेली ही निरपेक्षता ही सापेक्ष निरपेक्षता आहे . त्यामुळे वाटाघाटी करताना जास्तीत जास्त त्या ऍक्युरेट असणे अत्यंत आवश्यक बनते आणि कलावंतांचा आळशीपणा तिथे चालत नाही. 


विल्यम जेम्स किंवा रसेल यांनी मांडलेले सत्यांचे सिद्धांत हे त्यामुळेच तपासून घ्यावे लागतात . वाटाघाटी ह्या सत्यांच्या संदर्भात चालतातच परंतु त्यांचे नेमके संदर्भ काय आहेत हे पुन्हा पुन्हा तपासणे आवश्यक झालेले आहे . आजचा व्यवहार वाद सुद्धा अनेकदा असे गृहीत धरतो की समोर ऑब्जेक्टिव्ह रिऍलिटी आहे ती तशी खरोखर आहे का हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. कारण शेवटी ही ऑब्जेक्टिव्ह रियालिटी सुद्धा आपणाला दिसणारे आहे आणि कदाचित तिच्या इतर ऑब्जेक्टिव्ह रियालिटीशी चाललेल्या वाटाघाटी आपणाला दिसतच नसतील तर त्यांचा नेमका प्रभाव तिच्यावर कसा पडतो हे कसे निश्चित करायचे आणि मुळात ते आपणाला कळणार कसे आपल्या साधनांना माध्यमांना हे कळणार कसे ? साधे रंग सुद्धा आपणाला सर्वच्या सर्व दिसत नाहीत आणि आपणाला दिसणारे रंग सुद्धा फक्त आपणालाच दिसणारे रंग असतात अशावेळी मानवी अनुभवांच्या टीमक्या वाजवणार कोण ? विल्यम जेम्स फाफलतो तो इथेच! आपण केवळ अनुभवांच्यावर अवलंबून राहावे असे तो सुचवत राहतो आणि आपल्याला तसे अवलंबून राहता येईल का हा खरा प्रश्न आपल्या काळात उपस्थित होत राहतो. मोक्षामध्ये सत्याचा अनुभव येतो ही वस्तुस्थिती परंतु तो अनुभव व्यक्त मात्र करता येत नाही आता मग करायचे काय ? जे कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश यांच्यामध्ये अडकलेल्या लोकांना हे कसे समजवायचे ? प्रश्न केवळ सापेक्षतेचा राहिलेला नाही जो त्यांच्या काळामध्ये राहिलाय असे वाटत होते . सर्वांसाठी मोक्ष उपलब्ध झाला पाहिजे अशी माझी तळमळ आहे पण तो उपलब्ध करण्याची साधने आणि माध्यमे माणसाला डेव्हलप कसे करता येतील हा खरा प्रश्न आहे . सध्या सर्व काही बायोलॉजिकल साधनांच्या आधारे चाललेले आहे . बायोलॉजिकल साधने ही प्रत्येक माणसात वर्कआउट होत नाहीत त्यामुळे प्रश्न असा आहे की सर्वांच्यासाठी मोक्ष असे जर आपण म्हणणार असू तर प्रत्यक्ष बायोलॉजिकल साधनेच फक्त घेऊन चालणार नाही सामान्य माणसांच्या साठी प्रत्येक बायोलॉजिकल साधन हे कार्यक्षम आणि फंक्शनल साधन बनवायचे असेल तर आपणाला अनेक ठिकाणी रोबोटिक्स ची मदत घ्यावी लागेल . हे सर्व दिसते तितके सोपे नाही आणि मोक्ष मिळालेला पुरुष किंवा स्त्री यापुढे यांच्यावर अवलंबून राहणार आहे हे तर उघड आहे . 


व्यवहार वात सुद्धा अनेकदा असे मान्य करतो की आपण फायनल सत्यापर्यंत पोहोचणारच नाही पण त्या काळामध्ये मुळात तशी चौथ्या नवतेची माध्यमे आणि साधने नव्हती पण आताची उपलब्ध झाली असल्याने आपणाला जे सापेक्ष आहे ते कसे निरपेक्ष करता येईल याच्या शक्यता आजमावता येतात . यासाठी सत्याशी सतत वाटाघाटी कराव्यास लागतील पण त्याआधी आपणाला या वास्तवाशी अधिक वाटाघाटी नीट नेटक्या कराव्या लागतील हबल ही याची सुरुवात होती परंतु आपण अजूनही त्याबाबतीत प्राथमिक अवस्थेतच आहोत मी म्हणतो आहे ते कदाचित पुढच्या पिढ्यांना अधिक चांगले समजेल असे मला वाटते . वास्तवाशी सतत आणि सातत्यपूर्ण वाटाघाटी हा सत्याचा मार्गच आहे त्याबद्दल शंका असू नये. दुर्दैवाने भारतामध्ये या अंगाने विचारही होत नाही म्हणजे चौथ्या नवतेचा विचार म्हणजे काय तरी फालतुगिरी आहे असे उगाच काही जणांना वाटते त्यांना नेमके काय चाललेले आहे संसारामध्ये हे सुद्धा माहीत नसतं . बक्कल लावून बसलेली अक्कल असे मी कोल्हापुरात याला म्हणायचो. 


अर्थात या पुढचा प्रश्न आणखीन वेगळा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष ब्रम्हांड आपल्याला ज्ञान देण्याला सज्ज आहे का की ते आपणाला ज्ञान होऊ देत नाही . भारतीय परिभाषेमध्ये ते माया थाटून बसलेले आहे का ? आणि ही माया जर का पुन्हा पुन्हा आपला पराभव करणार असेल तर आपण सत्यापर्यंत कसे काय पोहोचणार ? केवळ उपयुक्तता वादाच्या कसोट्या लावून उपयुक्त आहे तेवढे सत्य असे म्हणता येणे आता अशक्य बनत चाललेले आहे किंबहुना पूर्वीही ते अशक्यच होते व्यवहारवादाच्या व्यवहारिक पातळी पुरते कदाचित उपयुक्त तेच व्यवहारिक असू शकते परंतु जे व्यवहारिक आहे ते अंतिम सत्य असेल असे नाही कदाचित शक्य आहे की ते मायाचा कारभार आहे . असेल चे सर्वात मोठे योगदान जे काही आहे त्यामध्ये एक मोठे योगदान म्हणजे त्याने व्यवहार वादातल्या उपयुक्ततावादी सिद्धांतांची मांडणी ही किती absurd आहे हे दाखवून दिले . रसेलच्या मते सत्य हे उपयुक्ततेच्या पलीकडे असणारच आणि सुदैवाने ते तसे आहे . किंबहुना म्हणूनच तर सत्य सुंदरसुद्धा आहे . पर्यावरणाची नासाडी करायला निघालेल्या लोकांना सत्याचे सौंदर्य पर्यावरणामुळे शाबूत राहते इतके बेसिक सुद्धा कळत नसते आणि म्हणूनच प्रचंड गोंधळ व्यवहाराच्या पातळीवर उपस्थित होतात. याला मी व्यवहारिक हलकटपणा म्हणतो . उपयुक्तता वादाला तो कधी दिसला नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हिंदुत्ववादावर उपयुक्तता वादाचा प्रचंड प्रभाव वाया सावरकर पडलेला आहे . विल्यम जीएमसी सर्वात मोठी शोकांतिका हीच होती की तो शेवटी व्यवहारवादाच्या नावाखाली उपयुक्तता वादापर्यंत पोहोचला आणि याचा एक परिणाम किंवा दुष्परिणाम असा झाला की अमेरिका व्यवहारवादी आणि उपयुक्ततावादी अशाच अंगांनी चालत राहीली आणि जगभरच्या पर्यावरणाची नासाडी करत राहीली मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की कुठलेही राष्ट्र नेमके कोणते तत्वज्ञान स्वीकारते हे नीट पाहिले पाहिजे कारण त्यांची सगळी पॉलिसी त्या तत्त्वज्ञानानुसार चाललेली असते आणि हे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही. सेक्युलर वादा मधला सर्वात मोठा प्लस पॉईंट हाच होता की इतरांच्या असण्याची शक्यता तिथे स्वीकारली जाते परंतु ज्यांच्या असण्याची शक्यता तुम्ही स्वीकारतात त्यांना दुसऱ्यांच्या असण्याची शक्यता मान्य होत नसेल तर काय करायचे या संदर्भात काही भूमिका त्यांनी घेतली नाही . आणि इथे हिंदुत्ववाद पुन्हा प्रकट होतो. सत्य हे स्वतःच्या हितसंबंधावर निर्धारित करायचे नसते ते तसे होत नसते . सत्य हे पूर्णपणे स्वयंभू आहे आणि ते माणसावर आणि माणसांच्या गरजांच्यावर अवलंबून नाही. आम्ही जेव्हा शिव हे स्वयंभू आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा असतो की जे शून्य आहे जे सत्य आहे ते स्वयंभू आहे. उद्या जर का सत्याला असे वाटले की संपूर्ण मानव जातच फेटाळून लावावी तर त्याला क्षण सुद्धा पुरेसा आहे . आणि त्याचे वाटणे हे मानवी वाटण्याशी निगडित नाही .


माणसाला शिवाबाबत सत्याबाबत शून्याबाबत इतकी मूलभूत गोष्ट जरी कळाली तरी खूप झाले. 

(क्रमशः )


श्रीधर तिळवे नाईकमहाराष्ट्रातले राजकारणी काही प्रथम विकली गेलेली नाहीत ते कायमच 1000 नंतर विकले गेलेत सीनु प्रथम विकली गेले बाराशे स*** आणि मुसलमानाने आरामात राज्य जोडले त्यानंतर उत्तर पेशवाईने पुन्हा विकले स्वतःला आणि ब्रिटिश लोकांनी आरामात राज्य जोडले आणि आता आपल्या राजकारणी लोकांनी आपणाला उत्तर भारताला विकलेले आहे या सर्व प्रोसेस मध्ये फक्त एकच फॅक्टर कॉमन आहे आणि तो वैष्णव आहे . शैवा असलेले राजे यादव बनतात आणि मग महाराष्ट्र मुस्लिमांच्या ताब्यात जात शैवा असलेले पेशवे वैष्णव बनतात आणि ब्रिटिशांच्या ताब्यात राज्य देऊन मोकळे होतात आणि आता आपण उत्तर भारताच्या ताब्यात स्वतःला देत आहोत अर्थात त्याची नेहमीप्रमाणे लाज कोणालाच वाटणार नाही कारण भारतात दक्षिणेकडे शैव स्ट्रॉंग आहेत पण इथे मात्र ते अत्यंत पद्धतशीरपणे खिळखिळे केले गेले ज्यांच्यावर मुळात संरक्षणाची जबाबदारी आहे त्या मराठा आणि महार अशा दोन्ही समुदायांनी शैव धर्माकडे पाठ केली याचे जे परिणाम व्हायचे आहेत ते झालेले आहेत . भात वारकरी संप्रदायाची स्थापना त्यासाठी केली गेली होती. हा जो धर्मविचार आहे हा प्रामुख्याने आपल्याला वैष्णव धर्मविचार धर्माधिकारी लोक देत असतात आणि ते इतक्या शांतपणाने काम करत असतं की आपल्याला कळतच नाही की आपण दुसऱ्यांच्या ताब्यात जात आहोत 


थांबणे आता शक्य नाही त्यामुळे मराठी भाषेचा लढा पोकळ होत जाणार आहे हे तर उघडच आहे येत्या पन्नास वर्षात महाराष्ट्राची भाषा हिंदी असणार आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणखीन पन्नास वर्षांनी हिंदी बेल्ट मधला असणार ह्या बद्दलही माझ्या मनात आता शंका नाही. पाठीचा कणा नसलेला असा हा समुदाय आहे . कायम उत्तरेच्या अंकित ! उत्तरेने काहीही कॉन्व्हेन्स करावे आणि या लोकांनी ते स्वीकार आहेत असा सगळा प्रकार आहे . बाबासाहेब आंबेडकर हे उत्तरेत वाढलेत ते आपल्या लक्षातच येत नाही त्यामुळे कबीर आणि बुद्ध यांच्या विषयी त्यांना प्रेम असणे आपण समजू शकतो पण याचा जो घ्यायचा तो परिणाम असतो तो म्हणजे मराठी कणा मोडून पडतो . संत नामदेवांना सुद्धा पंजाब मध्ये जावेसे वाटते दक्षिणेकडे जावेसे वाटत नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे हा सर्व वैष्णव धर्माचा होणारा साईड इफेक्ट असतो तो कळत नाही . मुख्य म्हणजे हे थांबणे शक्य नाही . तुम्ही म्हणाल की ही पराभूत मनोवृत्ती आहे पण वास्तव काय आहे ते बघावं लागतं . ही सांस्कृतिक आत्महत्या आहे हे तर उघडच आहे प्रश्न असा आहे की मग मराठी भाषेत आपण कशाला लिहावे ? 


श्रीधर तिळवे नाईक

ईश्वर, देव, God, उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद, आणि सत्य २ श्रीधर तिळवे नाईक


गेले दोन दिवस जावेद अख्तर यांच्यामुळे आणि God बद्दल जो लल्लनटॉप वर वाद झाला त्यामुळे एक चर्चा सुरू झालेली आहे. याबाबत शैव काय म्हणतात आणि ईश्वरी संकल्पना काय आहे हे सांगणे आवश्यक वाटते म्हणून हा सर्व खटाटोप पुन्हा करतो आहे. यातले सर्व मुद्दे पूर्वी मांडले गेले होते फक्त ते वेगवेगळ्या लेखात असलेले यानिमित्ताने एकत्र आणतो आहे .


शिव सत्य असेल पण ईश्वर सत्य आहे का हा खरा प्रश्न आहे ? याचे कारण असे की शिव म्हणजे शून्य शक्ती म्हणजे अनंतता ! यांनी मिळून संसार निर्माण होतो आणि या संसारामध्ये शिवाची जी उपस्थिती आहे ती महाप्राणाची आहे आणि हा महाप्राण म्हणजे ईश्वर होय ही शैवांची संकल्पना आहे . याचा अर्थ स्पष्ट आहे की ईश्वर हा चौथ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर नाही आणि मुळातच ईश्वर ही संकल्पनाच शैव लोकांनी जन्माला घातली . ती आधी कुठल्याच श्रद्धेत नव्हती धर्मात नव्हती . या ईश्वराकडून या महाप्राणाकडून आणि शक्तीकडून जीवन आणि जीव निर्माण झाला आणि या जीवामध्ये जो प्राण आहे तो प्रत्यक्षात महाप्राणाचा भाग आहे प्राण आणि महाप्राण हे भिन्न नाहीत ते अभिन्न आहेत शैव भाषेत अभेद आहेत . म्हणजे असेही म्हणता येते की प्राण नाहीच फक्त महाप्राण अस्तित्वात आहे . जे कृष्णमूर्ती हेच सत्य वेगळ्या भाषेत सांगतात ते म्हणतात की संपूर्ण विश्वाला एकच mind आहे . पाश्चात्त्य देशांना अजूनही ही संकल्पना नीट पचवता आलेली नाही . मी स्वतः माईंड हा शब्द वापरत नाही कारण शैव धारेमध्ये माइंड हा शब्द प्रामुख्याने मन म्हणून येतो आणि तो भावशक्तीशी संबंधित आहे . म्हणजेच जीवाजवळ शरीर असते बुद्धी असते त्याचप्रमाणे मनही असते. मन हे भाग आहे पण पाश्चात्त्य देशांमध्ये जे कृष्णमूर्ती जेव्हा बोलतात तेव्हा ते अनेकदा पाश्चात्य संकल्पना सुद्धा वापरतात आणि म्हणूनच ते म्हणतात की संपूर्ण विश्वाचे एकच माईंड आहे . त्यांना प्रत्यक्षात म्हणायचे असते की संपूर्ण विश्वाचा एकच महाप्राण आहे पण शैव परिभाषेशी संबंध नसल्याने हा गोंधळ निर्माण झालेला आहे . मन हा शब्द वापरल्याने किती मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो याची कल्पना बहुतेक जे कृष्णमूर्ती यांना नसावी. त्यांनी पाश्चात्त्य देशातील माइंड आणि मॅटर यांच्या मधला वाद इथे जोडला आहे .त्यांनी ही गोष्ट लक्षातच घेतली नाही की जुडाईक परंपरेमध्ये फक्त भाव तंत्र आहे ज्ञानतंत्र नाही क्रिया तंत्र नाही शक्ती तंत्र नाही जोगतंत्र नाही आणि मोक्षही नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी प्राण अस्तित्वातच नाही त्यांच्यासाठी फक्त मन अस्तित्वात आहे आणि बुद्धी व शरीर दुय्यम आहे .


उपयुक्तता वाद हा सुद्धा त्यामुळे जुड्याईक परंपरेमध्येच राहतो आणि त्यातून अनेक गोंधळ निर्माण होतात. म्हणजे उपयुक्तता वाद अनेकदा असे सांगतो की ईश्वर ही एक उपयुक्त संकल्पना आहे आणि जवळजवळ हाच धडा नंतरचा व्यवहार वाद सुद्धा गीरवतो. म्हणजे माणसाला नैतिक धारणा देण्यासाठी ईश्वरी संकल्पना उपयुक्त असल्याने आपण तिचा वापर केला पाहिजे किंवा ती व्यवहाराला उपयुक्त असल्यामुळे व्यवहारवादामध्ये तिचा वापर आपण केला पाहिजे असे व्यवहार वास सांगणाऱ्या तत्त्वज्ञानांना आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेकांना वाटते. आता गमतीचा भाग असा आहे की जर का ईश्वर नाही असे वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे सिद्ध होत असेल तर एरव्ही वैज्ञानिक पुरावा स्वीकारणारा व्यवहार वाद इथे मात्र का शेण खातो ? वास्तविक व्यवहारवादाचा सिद्धांत जर का आपण बघितला तर वैज्ञानिक प्रामाण्य हे तिथे फार महत्त्वाचे त्यामुळे ईश्वर नाकाला पाहिजे परंतु तरीसुद्धा उपयुक्तता ही कसोटी लावून ईश्वर स्वीकारला जाऊ शकतो आणि ही जी जागा आहे ती उपयुक्तता वादाला आणि व्यवहारवादाला दुबळी बनवते .


प्रश्न असा आहे की ईश्वरी संकल्पना मग युरोपियन पद्धतीने कशी काय भारतात आली ? तर सर्वात प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे की ही संकल्पना आत्मसात केली गेली प्रत्यक्षामध्ये ती वैदिक युरेशियन परंपरेमध्ये अस्तित्वातच नव्हती . याचे कारण उघड आहे वैदिक परंपरा ही बहुदेववादी परंपरा आहे त्यामुळे तिच्यामध्ये अनेक देव आहेत आणि होते. एकच एक देव प्रमुख केला पाहिजे ही संकल्पनाच मुळात वैदिक धर्मात आणि नंतरच्या ब्राह्मण धर्मात नाही. एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की ब्राह्मण धर्म हा अत्यंत व्यवहारवादी आहे आणि हा व्यवहार ब्राह्मणांच्या स्वार्थांशी निगडित असतो . धर्म ही उपयुक्त गोष्ट असल्याने आपण ती स्वीकारली पाहिजे आणि धर्माच्या आधारे आपल्याला राज्य प्रस्थापित करता येत असल्यामुळे आणि आपल्याला स्वतःला सर्वोच्च वर्ण म्हणून स्थापित करता येत असल्यामुळे आपण धर्म स्वीकारला पाहिजे अशी ब्राह्मण धर्माची कळत नकळत जडणघडण असते आणि त्यामुळे सगळी मांडणी ही त्या अंगाने येते यामुळेच मग जेव्हा इंद्र हा देव किंवा यज्ञ उपयुक्त ठरत नाही तेव्हा तो सहज रित्या त्या देवाला फेकून देतात आणि विष्णू हा देव उपयुक्तता वादाच्या अंगाने डेव्हलप करत नेतात. हीच गोष्ट ते शिवबाबत करतात . ते रुद्र ही संकल्पना वापरत त्यामध्ये शिव विरघळवत नेतात याचा दुष्परिणाम असा होतो की रुद्र हाच शिव असा प्रचार मग तयार होतो आणि तो इतका मोठ्या प्रमाणात केला जातो की हळूहळू शिव आणि रुद्र एक होऊन जातात . वास्तविक पूजा ही संकल्पनाच मुळात वैदिक धर्मामध्ये नाही . त्यामुळे साहजिकच ती ब्राह्मण धर्मात पण नाही परंतु पूजा स्वीकारावी लागेल कारण उपयुक्तता वादाच्या तत्त्वावर व्यवहारवादाच्या तत्वावर आता जर का आपल्याला आपले पौराहित्य टिकवायचे असेल तर आपण बदलले पाहिजे हे लक्षात आल्याने मग एकीकडे वेद प्रमाण मानायचे पण दुसरीकडे वैष्णव नावाचा नवीन धर्म निर्माण करायचा असा प्रकार सुरू होतो यातूनच मग वेदातलीच एक देवता जे अत्यंत दुय्यम होती ती विष्णू ही देवता निवडली जाते आणि मग हळूहळू हरी ही संकल्पना जी आत्तापर्यंत वेदांमध्ये जवळजवळ शत्रू सारखी आहे ती अधिक वाढवत नेली जाते 


या सर्वांमध्ये देव ब्राह्मणांना निर्माण करत नसून अनेकदा ब्राह्मणच देवांना निर्माण करतात असे चित्र निर्माण होते. साहजिकच मग शिवाचे काय करायचे तर त्याला सुद्धा एक देव स्वरूप दिले पाहिजे म्हणून मग महादेव नावाची संकल्पना निर्माण केली जाते आणि ती व्यवस्थित भारतामध्ये प्रचलित केली जाते . त्याचे प्राचीनत्व स्वीकारले जाते तो आपल्या आधी आहे हेही स्वीकारले जाते . हळूहळू त्यानेच वेद निर्माण केले अशी ही संकल्पना मांडली जाते. साहजिकच मग एकदा वैदिक प्रामाण्य तुम्ही स्वीकारले की आपोआपच ब्राह्मण धर्मातला वर्णाश्रम सुद्धा तुम्ही स्वीकारता . वर्णजात व्यवस्था स्वीकारता. पण प्रश्न तसाच राहतो तो म्हणजे ईश्वर कसा निर्माण झाला हा संसार कसा निर्माण झाला ? 


आपण जर का बारकाईने पाहिले तर आपणाला असे दिसते की संसाराच्या निर्माण होण्याचा जो शैव सिद्धांत आहे तो स्वीकारला जात नाही . त्याएवजी ब्रह्म किंवा पुरुष ही संकल्पना आणली जाते . आणि ब्रह्मदेवाने संसार निर्माण केला असे तत्व प्रस्थापित केले जाते. साहजिकच मग प्रश्न निर्माण होतो की हा संसार कोणी निर्माण केला त्यासाठी मग ब्रह्मदेव नावाचा देव आणला जातो . ब्रह्मदेवाने हा संसार कसा काय निर्माण केला . त्यातूनच मग त्याने प्रथम स्त्रीला निर्माण केले हा सिद्धांत येतो पण प्रॉब्लेम असा येतो की ब्रह्मदेवाने जर काय प्रथम स्त्री निर्माण केली तर तो तिचा बाप होतो आणि त्यामुळे तिच्यापासून ब्रह्मदेव संतान निर्मिती करायला जातो आणि यातूनच मग फार नैतिक पेच तयार व्हायला लागतात यातून पळ काढण्यासाठी मग शापाची संकल्पना येते आणि ब्रह्मदेवाची पूजा करू नये असा सिद्धांत तयार करावा लागतो. राम आणि कृष्ण हे मूळचे स्थानिक लोकांचे असलेले शैव आदर्श पूर्णपणे बदलून टाकून त्यांच्या आधारे महाकाव्य निर्माण होते आणि अवस्था अशी होते की मूळचा सकाळचा सूर्य असणारा सकाळचा राम हा विष्णूचा अवतार बनतो तर संध्याकाळचा सूर्य असणारा श्याम रात्रीचा सूर्य असणारा कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार बनतात. म्हणजेच इथे माणूसच ब्राह्मणच देव निर्माण करताना दिसतात. भारताची विशेषता हीच आहे की तिथे हे सर्व एका अर्थाने नोंदवले गेले आहे . युरोपमध्ये मात्र याची नोंदणी नीट झालेली नाही .


कुठल्याही ईश्वर वादाविषयीचा जेव्हा डिबेट सुरू होतो तेव्हा साहजिकच देवाने माणूस निर्माण केला की माणसाने देव निर्माण केला हा सर्वात पहिला प्रश्न असतो. या अंगाने येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच असतो की जर का ईश्वराने संसार निर्माण केला असेल तर मग ईश्वराला कोणी निर्माण केले. जैन लोकांनी हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे आणि शेवटी त्यांनी दिलेले उत्तर असे आहे की ईश्वर अस्तित्वात नाही किंबहुना जगामध्ये सर्वात प्रथम निरीश्वर वाद व्यवस्थित कोणी मांडला असेल तर तो जैन लोकांनी मांडलाय शेवटी मग जैन धर्माचा निष्कर्ष असा असतो की ईश्वर अस्तित्वात नाही आणि विश्व स्वयंभू आहे . म्हणजेच मूळ मुद्दा ईश्वर स्वयंभू आहे की विश्वस्वयंभू आहे? जावेद अख्तर जेव्हा या संदर्भात डिबेट मध्ये भाग घेतात तेव्हा त्यांना भारतीय परंपरा बहुतेक माहीत नसते जैन परंपरा त्यांना माहित नसते त्यांना असे वाटते की हे सगळे काही पाश्चात्त्य देशात सुरू झालेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मूळचा हा डिबेट शैव लोकांच्यातला आणि महावीर प्रणित जैन धर्मातील लोकांच्यातला होता . तुम्ही जर ईश्वराने संसार जन्माला घातला ही संकल्पना घेतली तर मग ज्याने जन्म दिला त्याला कोणी जन्माला घातले असा प्रश्न निर्माण होतो आणि हे नेव्हर एंडिंग आहे म्हणूनच आपण हे विश्व कोणी जन्माला घातले हा प्रश्न विचारू नये असे जैन म्हणतात त्यापेक्षा विश्व स्वयंभू आहे हे जर का स्वीकारले तर प्रश्न मिटतो त्या उलट बुद्ध हा प्रश्न अव्याकृत म्हणून सोडून देतो त्याऐवजी आता जो माझ्या पुढचा संसार आहे त्या संसारामध्ये मला निर्वाण कसे मिळेल हा मूलभूत प्रश्न बुद्ध विचारतो कारण निर्वाणासाठी ईश्वराची आवश्यकता नाही असे त्याचे म्हणणे आता हे म्हणणे कुठून येते तर ही मुळातच ज्ञानतंत्राची संकल्पना आहे. ज्ञान तंत्रामध्ये ईश्वराची गरज नाही योग तंत्रामध्ये जोगतंत्रामध्ये ईश्वराची आवश्यकता नाही क्रिया तंत्रामध्ये ईश्वराची आवश्यकता नाही मग आवश्यकता कुठे आहे तर भावतंत्रामध्ये ईश्वर आवश्यक बनत जातो कारण भावना ह्या नेहमीच सगुण असतात आणि त्यांना काहीतरी समूर्त आणि सगुण द्यावे लागते. शैवांचा ईश्वर हा असा भावतंत्रासाठी म्हणून जास्त प्रचलित केला गेला आहे आणि त्या ईश्वराच्या संदर्भातच मग भगवान महावीर यांनी प्रथम युक्तिवाद सुरू केले . अधिक खोलात गेले तर आपणाला असे दिसते की मुळात निर्माण आणि निर्मिती यांच्यात भेद मानला तरच हा प्रश्न निर्माण होतो. शैव असला भेद मुळात मानतच नाहीत त्यामुळे ईश्वर म्हणजेच महाप्राण आणि संसार वेगळे मानले जात नाहीत. इतकेच कशाला प्राण आणि महाप्राण सुद्धा वेगळे नसतात फक्त शरीराच्या उपस्थितीमुळे शरीरातील महाप्राण हा स्वतंत्र प्राण वाटतो ही शैवांची धारणा आहे . हा प्राण जेव्हा स्वतःला स्वतंत्र समजायला लागतो तेव्हा मग मद तयार होतो मग मन तयार होते अहंकार तयार होतो अहं तयार होतो . स्व तयार होतो .


पण ज्या क्षणी प्राणाला कळते की आपणच महाप्राण आहोत त्या क्षणी मोक्ष प्राप्ती होते . जोपर्यंत मी असतो तोपर्यंत मोक्ष असत नाही आणि जेव्हा मोक्ष असतो तेव्हा मी असत नाही .


याउलट सर्व जुडाइक धर्मामध्ये ईश्वर वेगळा आणि विश्व वेगळे असते अनेकदा तर हे विश्व म्हणजे फक्त पृथ्वी आहे त्यापलीकडे काही असते याची फारशी कल्पना या धर्मांना नाही . त्यामुळेच दिवस ही संकल्पना सुद्धा मानवी असून सुद्धा ते ईश्वराला लावतात आणि हे विश्व गॉड ने सात दिवसात तयार केले असे मानतात जणू काय दिवस ही फुटपट्टी माणसाची असली तरी ती जणू देवाची पण होती. साहजिकच हा सगळा डिबेट मग इस्लाम मध्ये सुद्धा अवतरतो आणि तो कसा अवतरतो त्याचे प्रत्यंतर आपण आत्ता नुकतेच लल्लनटॉप वरच्या या वादामध्ये पाहिलेले आहे . 


वास्तविक यातला एक मुख्य युक्तीवाद म्हणजे God हा ज्ञानाच्या कक्षेत येत नाही तो मेटा फिजिकल आहे प्रत्यक्षामध्ये ही संकल्पना ना वैदिक आहे ना शैव आहे .शैवांच्या मध्ये ईश्वर ही संकल्पना मुळातच शिव आणि शक्ती यांच्यामुळे आपणाला ज्ञात होत असल्याने ती ज्ञानाच्या कक्षेत येते आणि तिच्यावर चर्चा झाली पाहिजे. शैव तिला मेटा फिजिकल मानत नाहीत त्यांच्या मते हे सर्व फिजिकल आहे . अगदी विचार सुद्धा ते केमिस्ट्री आहे असेच म्हणतात . विचारांना सुद्धा वजन असते हे त्यांना मान्य आहे भले ते अतिशय सूक्ष्म असेल पण असते . त्यामुळे आपल्याकडे प्रत्यक्षात काय असते तर आपल्याकडे ईश्वर नावाचा विचारच असतो आणि म्हणूनच ईश्वरावर वाद होऊ शकतात अगदी God हा सुद्धा एक विचार असतो आणि संस्कार असतो . जेव्हा एखादी गोष्ट विचार व संस्कार यांच्यामध्ये सापडते तेव्हा ती आपोआपच वैचारिकतेत येते. त्यामुळे आस्तिकतेचा जो हा विचार आहे की God हा मेटा फिजिकल आहे तो चुकीचा आहे . 


वैदिकांची देव ही संकल्पना आणि युरोपियन लोकांची देव ही संकल्पना एकच आहे दोघेही मूर्त असतात सगुण असतात फक्त युरोपियन लोक सुद्धा ग्रीक धर्मामध्ये बहुदेववादी होते आणि ते नंतर जुडाईक होऊन एक देववादी झाले ख्रिश्चन झाले . आणि याला जबाबदार रोमन लोक होते त्यांनी रोमन कॅथॉलिक नावाचा एक धर्म तयार केला आणि संपूर्ण युरोप वर युरेशियन प्रभुत्व लादले . मी मागेच म्हटल्याप्रमाणे युरेशियन लोकांना ही अत्यंत घाणेरडी सवय आहे ते व्यवस्थितपणे सर्व सत्ता आपल्या हाताखाली आणतात आणि त्यासाठी धर्माचा वापर करतात. आजही ग्रीक धर्मामध्ये मोक्ष ही संकल्पना होती की नव्हती हा एक वादाचा विषय आहे कारण तिथे सुद्धा हेरॉकलिटीस आणि पायथागोरस हे अशा प्रकारच्या कुठल्यातरी मुक्तीच्या संकल्पनेच्या दिशेने नक्कीच विचार करत होते प्रत्यक्षात त्यांना ती मुक्ती मिळाली नाही आणि पुढचा गोंधळ तयार झाला. किंबहुना त्यांच्यानंतर कदाचित मुक्तीकडून ते मोक्षाकडे गेले असते परंतु ते तसे गेले नाहीत कारण अचानकपणे रोमन लोकांनी आक्रमण करून तिथे हा सगळा जो विचार होता तो सगळाच्या सगळा नाहीसा केला आणि आपल्या अत्यंत हृस्व दृष्टिकोनातून जग तयार केले. साहजिकच मग ग्रीक तत्त्वज्ञानाचे युग नाहीसे झाले आणि त्या जागी रोमन कॅथॉलिक धार्मिक अंधार पसरला.


असाच प्रकार आरब स्थानात होता तिथे सुद्धा बहुदेव वाद होता तो रोमन कॅथोलिक आणि जुडाईक परंपरेच्या प्रभावाखाली येऊन एक देव वादी झाला म्हणजे इथे सुद्धा युरेशियन लोकांचे तत्त्वज्ञान राजकीय तत्वज्ञान बनले आणि इस्लाम या युरेशियन राजकीय तत्त्वज्ञानाची सर्वोच्च आविष्कृत शैली बनली इस्लामने आफ्रिकेतले सगळे प्राचीन धर्म नाहीसे केले आणि तिथे आपला धर्म लादला. 


साहजिकच लल्लन टॉप वर जो डिबेटसुद्धा झाला तो विचित्र होता कारण तो चक्क जुडाईक होता. या डिबेटचा आणि भारतीय धर्मांचा संबंध काय हा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे आणि तो कोणी विचारलाच नाही जणू काय भारत हा काहीतरी जुडाईक परंपरेमध्ये वावरत असतो असा गैरसमज दोन्ही वक्त्यांचा होता आणि एक हिंदू ज्याला स्वतःला हिंदू म्हणजे काय माहित नाही भारतीय धर्म म्हणजे काय माहित नाही हा डिबेट कंडक्ट करत होता . कॉन्व्हेंट मधल्या शिकलेल्या लोकांसाठी त्यामुळे हा साहजिकच चर्चेचा विषय झाला . कॉन्व्हेंट चा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की कॉन्व्हेंट नेहमीच भारतीय धर्मांच्या पासून विद्यार्थ्यांना तोडते . ही एक ख्रिश्चन कॉन्स्पिरसी असते पण ती कळत नाही . अगदी महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा ती कळाली नाही तिथे इतरांच्या बाबतीत काय बोलावे ? 


प्रॉब्लेम असा आहे की अनेकांचा असा गैरसमज आहे की ईश्वर ,देव आणि God या संकल्पना एकच आहेत . हा भ्रम पुरोगामी लोकांनी तयार केला प्रत्यक्षामध्ये या पूर्णपणे तीन वेगळ्या कल्पना आहेत यातील देव ही संकल्पना बहुदेववादाशीच निगडित आहे त्या उलट God अल्लाह ही संकल्पना हळूहळू एक देव वादाशी निगडित झाली आहे पूर्वी ती बहुदेववादाशीच निगडित होती. आपल्याकडे सुद्धा नंतर याच प्रवाह खाली शिव शैव आणि वैष्णव विष्णू असे दोन एक देववादी धर्म तयार झाले आणि हे प्रामुख्याने ब्राह्मण लोकांनी तयार केले . मात्र बहुदेव वाद सुटला का? तर नाही कारण मुळातच ब्राह्मणांना अनेक देव लागतात कारण जेवढे देव तेवढी दक्षिणा हे समीकरण त्यांना व्यवस्थित माहिती आहे.


हे देव इतके वाढत गेले की शेवटी नाईलाजाने आचार्य शंकर यांनी पंचायतन दिले ते म्हणजे शिव,शक्ती, गणपती, स्कंद आणि सूर्य ! पुढे आद्य शंकराचार्य यांनी ते शिव ,शक्ती, गणपती ,स्कंद आणि विष्णू असे केले तर त्या पुढचे पाऊल रामानुजाचार्य यांनी टाकले आणि त्यांनी स्कंद बाजूला करून त्या जागी सूर्य आणला आणि विष्णू मुख्य केला. 


भारतामध्ये त्यामुळे ईश्वर ही संकल्पना फक्त शैव धर्मात उरली . प्रबोधन काळामध्ये हा ईश्वर पुन्हा एकदा जुड्याईक परंपरेशी जोडला गेला आणि त्यातूनच ईश्वर = God हा आजचा गोंधळ सुरू झाला .


सावरकर यांनी गाय हा उपयुक्त पशु आहे असे म्हटले होते याच काळामध्ये ईश्वर ही उपयुक्त संकल्पना आहे असे व्यवहार वाद सांगायला लागला .या दोन्ही संकल्पनांच्यात खरोखर काही फरक आहे का असा प्रश्न विचारता येतो . सावरकर उपयुक्ततावादी आहेत तर व्यवहार वाद हे त्याचे आधुनिक रुप आहे.


त्यामुळे साहजिकच रसेल यांच्या वाय आय एम नॉट ख्रिश्चन या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव या डिबेटवर पडलेला दिसतो . युरोपच्या प्रबोधन युगामध्ये ज्या काही संकल्पना आल्या त्यामधली एक संकल्पना म्हणजे फ्री विल होय साहजिकच धर्मवादी लोक ही संकल्पना वापरतात याचे कारण असे आहे की या जगामध्ये प्रचंड हिंसा होते या जगामध्ये प्रचंड अन्याय असतो युद्ध असतात या सर्व गोष्टींना अर्थात त्या हिंसेला सुद्धा God जबाबदार आहे की नाही असा प्रश्न येतो.


गाजा पट्टीमध्ये झालेला हिंसाचार यामुळे केंद्रस्थानी आला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणूनच सैतान संकल्पना निर्माण झाली . म्हणजे जगात जे काही वाईट होते त्यामागे सैतान असतो आणि God तुमची परीक्षा घेण्यासाठी म्हणून सैतानाला वापरत असतो असे उत्तर धर्माने दिले प्रश्न असा आहे की जर God परम दयाळू असेल तर त्याला हे सर्व करण्याची गरज काय ? या प्रश्नापासून सुटका करून घेण्यासाठी म्हणून मग माणसालाच फ्री वील दिली आहे असे समीकरण मांडले गेले आणि हे समीकरण पुरोगामी आहे . या संपूर्ण डिबेटमध्ये या पुरोगामी संकल्पना वारंवार वापरल्या गेल्या मात्र ज्यांनी त्या वापरल्या त्यांनी हे सांगितले नाही की या जुन्या पुरोगामी व मध्ययुगीन संकल्पना आहेत. 


प्रश्न असा आहे की मगया बाबतीत शैव काही सांगतात की नाही ? तर याबाबतीत उत्तर स्पष्ट आहे ते म्हणजे शक्ती स्वभावत: अनंत आहे ती नेहमीच प्रसरण पावत असते आणि त्यामुळेच शिव आणि शक्ती यांनी युक्त असलेल्या जीवामध्ये सुद्धा दोनच शक्यता तयार असतात एक मोक्षाची शक्यता असते आणि दुसरी अनंत होत सतत पसरत जाण्याची व्याप्ती वाढवण्याची शक्यता असते . जीव जेव्हा व्याप्ती वाढवायला निघतो तेव्हा मग त्याच्या हातून अनेक गोष्टी घडायला लागतात त्यातील एक गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाचा प्रदेश आणि जीव बळकावणे . हे सर्व प्रसार पावण्याच्या शक्तीच्या सर्व काही व्यापत जाण्याच्या स्वभावामधून निर्माण होते . प्रचंड प्रसरण पावणे हे आज सुद्धा या ब्रम्हांडात चालू आहे. संसारात चालू आहे . याला मी नेहमी इन्फिनिटींग infiniteing हा शब्द वापरतो . शक्ती ही अशी इन्फिनिटीच होत जाते आणि आपण तिच्या या प्रसरण पावण्याच्या उद्योगाचे केवळ भाग आहोत आणि जेव्हा तुम्हाला हा सगळा उद्योग कळत जातो त्यातली निरर्थकता कळत जाते तेव्हा तुम्ही मग शांतपणे पुन्हा शून्यात परतण्यासाठी यात्रा सुरू करता आणि हिलाच मोक्षाची यात्रा म्हणतात . जीव हा मोक्षात परतू शकतो विशेषता मनुष्य म्हणून मोक्षात परतु शकतो शून्यात परतू शकतो ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे .


जुड्याईक धर्माचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते शेवटपर्यंत देववादात एक देव वादात अडकून राहतात ईश्वरवादाकडे येतच नाहीत डिबेट करणाऱ्या आणि डिबेट स्पॉन्सर आणि कंट्रोल करणाऱ्या एकालाही हे कळलेले दिसत नाही . भारतात जन्मून सुद्धा भारत न कळणारे असे खूप लोक आहेत. म्हणून तर हिंदुत्ववाद निर्माण झाला व तो पण आश्चर्यकारकरीत्या युरोपियन आणि युरेशियन होत जातो . शैव श्रुतीची किती आवश्यकता आहे हे या डिबेटमध्ये पुन्हा एकदा लक्षात येते .


याचा अर्थ स्पष्ट आहे तो म्हणजे ईश्वराचे सत्याशी काहीही देणे घेणे नाही .God चे काहीही देणे घेणे नाही. या दोन्ही शेवटी अंतिमतः धार्मिक संकल्पना बनून राहतात . सत्य या दोघांच्या पलीकडे शिव आणि शक्ती म्हणून आहे. शून्य आणि अनंत म्हणून आहे .


श्रीधर तिळवे नाईक

उपयुक्ततावाद , उत्तर - व्यवहार वाद , आहार आणि सत्य ३ संस्काराहारी की नि:संस्काराहारी श्रीधर तिळवे नाईक 


व्यवहार वादामध्ये नेहमीच एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो प्रश्न असतो प्रोसेसचा ! म्हणजे सायन्सचा विचार करताना सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय असा मूलभूत प्रश्न व्यवहारवाद विचारतो तिची मांडणी करतो. आणि नंतर मग साहजिकच या सायंटिफिक प्रोसेसला काही मर्यादा असतात का असा प्रश्न उपस्थित होतो . उत्तराधुनिकतेमध्ये नंतर सायन्सला आव्हान देणारा जो डिस्कोर्स आला त्याला कळत नकळत उत्तर व्यवहारवाद जबाबदार होता. त्यानेच संपूर्ण सायंटिफिक प्रोसेस ही कधीकधी कशी पूर्वग्रहदूषित असते याची मांडणी करायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक गोष्टी निर्माण झाल्या. विज्ञानाबद्दल शंका निर्माण करण्यामध्ये सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय तिला काही मर्यादा आहे की नाही किती खरोखरच संपूर्ण सत्य शोधू शकते या प्रश्नांचा प्रचंड वाटा आहे आणि आजचा जो पोस्ट ट्रूथ डिस्कोर्स उभा राहिलेला आहे त्याला सुद्धा कळत नकळत या सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाने चालना दिलेली आहे . अर्थातच दुसरा घटक जो जबाबदार आहे तो रसेलपासूनच सुरू होतो आणि कार्ल प्रॉपर ने सायन्स विषयक जे लिखाण केले तेही याला जबाबदार आहे आणि अर्थातच पुढे व्हिटगेस्टाईन! 


आपण करत असलेल्या या मांडणीमुळे पुढे धर्म नावाचा अत्यंत पारंपारिक असा ढोबळ दृष्टिकोन डॉमिनेट होत जाईल याची कल्पना उत्तरव्यवहारवादाला अजिबात आलेली नव्हती नाहीतर त्यांनी आधीच काही सोल्युशन शोधली असती त्यामुळे साहजिकच आता ही जबाबदारी चौथ्या नवतेतल्या विचारवंतांच्यावर पडलेली आहे.


बायस अथवा पूर्वग्रह ही एक वैज्ञानिक संकल्पना आता विचारात घ्यावी लागते याचे कारण माणसाला होणारे ज्ञान आणि खुद्द माणूस यांच्यातला करस्पोंडन्स हा माणसावर कितपत अवलंबून असतो हा निर्माण झालेला प्रश्न होय. भारतामध्ये आपण सुरुवातीपासूनच सांगतो आहे की माया नावाची गोष्ट अस्तित्वात आहे आणि माझे स्वतःचे याबाबतीतले म्हणणे असे की वास्तव उपस्थित असते परंतु त्या वास्तवाचे जे आकलन असते त्या वास्तवाशी जो करस्पॉन्डन्स होतो तो माया असतो. म्हणजेच माया वास्तवच असते आणि तरीही संपूर्ण वास्तव नसते. माया ही नेहमीच पोझिशनल असते . भारतातल्या शैव लोकांना ही गोष्ट नेमकी कशी काय कळली हा एक फार मोठा प्रश्न आहे परंतु भारतामध्ये आचार्य शंकराचा आणि आद्य शंकराचार्यांचा जो फार मोठा वाटा आहे तो ह्या संदर्भातला आहे . आद्य शंकराचार्य यांचा सामाजिक क्षेत्रातला वर्णजातवाद जो खरा आहे की नाही की त्यांच्या नावाने खपवला गेला हा फार मोठा प्रश्न असला तरी मायेच्या संदर्भातली त्यांची मांडणी अतिशय महत्त्वाची ठरत जाते. अर्थातच तत्कालीन काळामध्ये विज्ञान जास्त उपलब्ध नसल्याने त्यांना त्याचा अंदाज संपूर्ण आलेला नाही . मात्र शैवांची माया ही धारणा नेमकी काय आहे हे त्यांना नीट कळले होते किंबहुना त्यांना नंतर जो शंकराचा अवतार मानण्याचा विचार पुढे आला तो यासाठीच आला.शैव यासाठी वापरत असणारा शब्द आहे आदिमाया ! आणि हा प्रामुख्याने शक्तीच्या प्रतीत होणाऱ्या संवेदनशील इंद्रिय शील होणाऱ्या रूपाबद्दलचा शब्द आहे. यातूनच मग माणसाची माया निर्माण होते . याला मनुष्य माया म्हणावे का असा एक मोठा प्रश्न आहे पण आपण त्याला मनुष्य माया म्हणू शकतो. याचे कारण असे की वाघाला प्रतित होणारी माया ही वाघमाया म्हणू शकतो प्रत्येक प्राण्याची माया वेगळी असण्याची शक्यता बरीच आहे . याबाबतीत रंगांच्या विषयी जे संशोधन झालेले आहे ते तरी या क्षणी मायेच्या बाजूने आहे. किंबहुना शैव तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव जो 1990 नंतर वाढत चाललेला आहे त्याचे सर्वात मोठे कारण शैव श्रुतीतले अनेक मूलभूत सिद्धांत हे कळत नकळत आता सायंटिफिक बनत चाललेले आहेत. 


आता असे असेल तर मग माया काल्पनिक आहे ही विचार मांडणी कुणी सांगायला सुरुवात केली? तर माया म्हणजे भ्रम किंवा काल्पनिक असे काहीतरी हा सिद्धांत प्रामुख्याने पुरोहित वर्गाने प्रचलित केला. प्रत्यक्षात तो शैव लोकांना तसा अभिप्रेत नाही . पुरोहित लोकांनी हे करण्याचे कारण स्पष्ट होते त्यांना काहीही करून सामान्य जनतेचे लक्ष दैनंदिन जीवनातील वास्तवावरून हटवून त्यातील शोषणावरून हटवून त्याला परलोकावर घेऊन जायचे होते . त्यामुळे एखाद्या शस्त्रासारखा माया सिद्धांत वापरला गेला . पण आता आपण 21व्या शतकात आलेलो आहोत म्हणून आपण या गोष्टीचा नीट विचार करू शकतो. 


माणसाच्या शरीर मर्यादा या सत्य मर्यादा असतात ही एक वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती हळूहळू अधिकाधिक उत्खननित होते आहे . पण त्याचबरोबर हेही खरे की आपली ही मर्यादा कळल्यामुळेच माणूस आपले शरीर अधिक चांगल्या पद्धतीने वाढवत चालला आहे अधिकाधिक चांगल्या टेलिस्कोप तयार करत चालला आहे मायक्रोस्कोप तयार करत चाललेला आहे . किंबहुना मायेची आणि मनुष्य मायेची मर्यादा जितकी कळत जाते तितके वास्तव आणि सत्य तुमच्याजवळ येत जाते. 


एडमंड हुसरले याने जेव्हा हेगेल याची पुरोगामी फिनॉमिनोलॉजी मोडीत काढून आधुनिक फिनॉमिनोलॉजी मांडली तेव्हा इंटेंशन्यालिटीचा हेतूग्रस्ततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हे हळूहळू स्पष्ट होत गेले . हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता या दोन गोष्टी माणसाच्या सत्याच्या आणि वास्तवाच्या आकलनाच्या दरम्यान ठामपणे उभे असतात आणि त्या माणसाला टाळता येणे शक्य असते. पण माणूस या गोष्टींच्या संदर्भात पुरेसा सजग होत नाही आणि आश्चर्यकारकरीत्या तो सजग होऊ नये अशीच व्यवस्थांची आणि संरचनांची सहेतुक इच्छा असते. आपले अभ्यासक्रम हे त्या हिशेबाने अत्यंत व्यवस्थित रचले गेलेले असतात. आणि अवस्था अशी होती की आपले हे सर्व अभ्यासक्रम आपल्या मेंदूची ही विचार प्रोसेस सरचित करत जातात. आपण स्वतःच यांचे बाय प्रॉडक्ट बनतो . म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की अभ्यासक्रम म्हणजे राजकीय सत्तांची त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक सत्तांची हेतूग्रस्तता असते , त्यांनी स्पॉन्सर केलेली पूर्वग्रह दूषितता असते. याचा अर्थ स्पष्ट आहे एकीकडे व्यक्तिगत हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आणि दुसरीकडे सामूहिक हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रहदृष्टीता यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले असते . संस्कारीत केलेले असते . याचबरोबर काम या अक्षांमधील जी कुल आणि कुटुंब या संदर्भातली नेटवर्किंग सिस्टीम असते ती सुद्धा आपणात या गोष्टी स्पॉन्सर करत असते. म्हणजेच एका अर्थाने आपण संस्काराहारी असतो. 


म्हणजे आपण जर का आहाराचा प्रश्न घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपण काय खायचे हे आपल्या वैयक्तिक , कामिक , सामूहिक संस्कारग्रस्ततेवर म्हणजेच वैयक्तिक , कामिक , सामूहिक हेतूग्रस्ततेवर आणि पूर्वग्रहदूषिततेवर अवलंबून असते. त्यामुळेच मोक्षाच्या संदर्भामध्ये ऍक्च्युली तुम्ही नेमके काय खात वाढले आहात हे पाहावे लागते. म्हणजे मी जर का जन्माने गोवन gsb असेन तर माझ्यावर मासे खाण्याचे संस्कार आपोआपच होतात माशांच्या बद्दलचे हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आपोआपच माझ्यात स्पॉन्सर झालेली असते . मी जर का कोल्हापुरात वाढलो असेल तर आपोआपच पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा यांच्या बद्दलची संस्कारग्रस्तता म्हणजेच हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आपोआपच स्पॉन्सर झालेली असते . अशावेळी मोक्षाच्या दिशेने टाकलेले पाऊल हे शाकाहारी की मांसाहारी असे नसते तर संस्काराहारी की नि: संस्काराहारी या दिशेने ठरते कारण खरा प्रश्न नि:संस्कारी कसे व्हायचे हाच असतो . आपल्याकडे तर मुद्दा असा आहे अनेकदा आपली जात आणि वर्ण हे सुद्धा संस्कार करत राहतात. त्यामुळे जैन धर्मातले लोक कुठेही जन्मले तरी ते कट्टर शाकाहारी होत जातात यामध्ये प्रत्यक्ष वास्तवाची आणि सत्याची काहीच भूमिका नसते पण संस्कारांची प्रचंड भूमिका असते. त्यामुळेच मोक्षाच्या यात्रेमध्ये नेहमीच आपल्या हेतूग्रस्ततेचे आणि पूर्वग्रह दूषितपणाचे अत्यंत बारकाईने आत्मनिरीक्षण करावे लागते मगच तुम्हाला आत्मपरीक्षण करता येते स्वतःला लॅबमध्ये नेता येते जिला मी सेल्फ लॅबोरेटरी म्हणतो .


हाच प्रश्न पुढे मग आपण जेव्हा या संपूर्ण वास्तवाचे निरीक्षण आणि परीक्षण करायला जातो तेव्हा निर्माण होतो आणि अनेकदा घडते असे की आपण ज्या विशिष्ट शाखांच्या मध्ये ज्ञान शाखांच्या मध्ये ज्ञानदर्शनांच्या मध्ये वाढलेलं असतो तिथली सगळी हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रहदूषितता त्यांच्यामुळे तयार झालेली संस्कारग्रस्तता आपण मिरवत असतो गिरवत असतो . अनेकदा ही संस्कारग्रस्तता प्रत्यक्षात संसर्गग्रस्त असते संसर्गग्रस्तता असते. मनुष्य हा प्राणीच असा आहे की तो ताबडतोब संसर्ग लावून घेतो. त्यामुळेच कॉपी करण्याची आणि पेस्ट करण्याची अफाट क्षमता त्याच्यामध्ये आहे . हे कॉपी पेस्टिंग माणसाची कलेक्टिव्हिटी आणि कलेक्टिव्ह उत्क्रांती वाढवत नेते वेगाने प्रसार करत नेते आणि मनुष्य समुदाय म्हणून नेहमीच कळप म्हणून नेहमीच प्रचंड वेगाने पुढे पुढे सरकत जातो. इतर प्राण्यांच्याकडे हा गुण मनुष्याच्या तुलनेत फार कमी आहे आणि अनेकदा माणसाने केवळ या गुणाच्या जीवावर इतर प्राणी जीवांच्यावर मात केलेली आहे. ईश्वर हा सुद्धा एक संस्कार असतो आणि तो संसर्गानेच आलेला असतो . अगदी मोक्ष सुद्धा अनेकदा संस्कार असतो आणि तो संसर्गानेच आलेला असतो (माझे हे सुदैव म्हटले पाहिजे की माझ्या बाबतीत तसे झाले नाही आणि एका शक्तिपाताने आयुष्य बदलले आणि हा शक्तिपात शक्य झाला कारण माझ्या सुदेवाने संस्कारग्रस्तता फार कमी होती अर्थात दुसरे कारण मी इथे सांगत नाही कारण ते सायंटिफिकली सिद्ध करणे शक्य नाही ) 


भारतामध्ये धर्म हा यासंदर्भामध्ये म्हणजेच मोक्षाच्या संदर्भामध्ये एकाच वेळी मित्र आणि शत्रू असे दोन्ही रोल पार पाडतो एका बाजूला तो मोक्षाविषयी ठाम भूमिका घेतो आणि मोक्ष हेच अंतिम उद्दिष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला मोक्षाचे संस्कार आपोआपच मिळतात त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत पण त्याचबरोबर अनेकदा मोक्ष कसा मिळवावा या संदर्भात तो इतके संस्कार देतो की त्या संस्कारातून बाहेर पडणे गरजेचे बनते. विशेषत: आपल्या मोक्षाच्या संदर्भात अनेकदा आपल्यावर भक्ती लादली गेलेली असते . प्रत्यक्षामध्ये जवळजवळ 80 टक्के लोक हे भक्ती बाबत प्रतिकूलत असतात. पण संस्कारग्रस्त तेथून बाहेर न आल्याने त्यांना योग्य ते महातंत्र सापडत नाही आणि ते भेलकांडत राहतात . आपण जर का जुड्याईक धर्माशी याची तुलना केली तर आपली स्थिती मोक्षाच्या संदर्भात केव्हाही सर्वोत्तम आहे हे लक्षात येते. मी नेहमीच म्हणतो की तुम्ही जर का भारतीय धर्मात जन्म घेतलेला असाल तर तुम्ही मोक्षाबाबत सुदैवी आहात . पण जर का धार्मिक संस्कार गरजेपेक्षा अधिक घनदाट झाले असतील तर मात्र यातून काही प्रश्नही निर्माण होतात आणि कधी कधी पाश्चात्य साधकाला याचा फायदा जास्त मिळतो पाश्चात्य साधक हा इतका मोकळा असतो की त्याच्यावर मोक्षाच्या संदर्भात पूर्वग्रह दूषितता आणि हेतूग्रस्तता यांचे पडणारे भारतीय धर्माचे ओझे असत नाही त्याला ते वाहावे लागत नाही मात्र अनेकदा जुड्याइक धर्मातले ओझे जर का घट्ट असेल तर त्याला मूलभूत मोक्षवीचे सत्यच कळत नाही . माझ्या आयुष्यात मी असे अनेक मुस्लिम ख्रिश्चन साधक पाहिलेले आहेत ज्यांना मोक्ष सहज कळतो कारण त्यांचा जन्म भारतात झालेला आहे. 


संस्कारग्रस्ततेमुळेच माया अधिक घनदाट बनत जाते . ही माया प्रत्येक माणसाने स्वतःच तयार केलेली असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . तिला मी आत्ममाया म्हणतो या आत्ममायेतून मोकळे होणे ही मोक्षाची आद्याट आहे . 


आद्य आणि सद्य या दोन शैव संकल्पना आहेत आणि आपण या दोन्हींचाच फक्त विचार करू शकतो . मात्र भविष्याचा जो विचार असतो तो मात्र अनेकदा माया असतो म्हणूनच आद्य विचार , सद्य विचार आणि माया विचार यांचे अजीबो गरीब नेटवर्क आपल्यामध्ये ऑपरेट होत असते. आद्य शिव आहे शून्य आहे आणि त्याबरोबर मग येणाऱ्या इतिहासाच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणूनच आपण अनेकदा आद्याला नमस्कार करतो राम या शब्दाचा मूळ अर्थ सुद्धा आद्य आहे कारण तो सुरुवातीचा सूर्य असतो सकाळचा सूर्य असतो म्हणूनच आपल्याकडे रामनवमीला आपण आद्य लिंगाची पूजा करतो पूर्वजांची पूजा करतो आपण कुठे आले आहोत आणि कुठून आलो आहोत याची आठवण करून देणे हा त्या मागचा उद्देश असतो . अर्थातच आता आपणाला डार्विनने अधिक चांगल्या रीतीने हे समजावलेले आहे.


अर्थातच आद्याला नमस्कार करा नका करू हा मुळातच तुमचा मोक्ष साधायचा आहे की नाही यावरचा प्रश्न आहे पण मोक्ष हा जर का तुमचा सिल्याबसचा भाग नसेल तर मग अशा आद्याची पूजा करण्याची काहीच गरज नसते. अनेकदा तर आद्य सोडून द्या प्रथम सद्य काय आहे ते पहा अशी स्थिती येते . साधना म्हणजे सद्याची सध्याची साधना असते सध्या मध्ये उपस्थित राहण्याची साधना असते. आणि ती जी आद्य आहे त्याच्यात जाण्यासाठी असते. 


ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हे सर्व स्पष्ट असलेच पाहिजे परंतु त्याचबरोबर हेही तितकेच खरे की तुम्ही जर का वैज्ञानिक तंत्र वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक होणार असाल तर तुम्हाला या गोष्टी कळायलाच हव्यात . किंबहुना तत्त्वज्ञानाचे जे मुख्य काम आहे दर्शनाचे जे मुख्य काम आहे ते यासंदर्भातच असते आणि भारतामध्ये अनेकदा वैज्ञानिक हवेतच काम करत राहतात आणि मूलभूत काम होत नाही .


तुमचे क्षेत्र कोणतेही असो हेतूग्रस्तता पूर्वग्रहग्रस्तता यांच्यामुळे तयार होणारी संस्कारग्रस्तता आणि या संस्कार ग्रस्ततेमुळे तुमच्या ठायी दाटलेली मायाग्रस्तता यांच्यातून स्वतःला सतत मुक्त करावे लागते भले तुम्हाला मग मोक्षाची आस असो अगर नसो . ज्याला ज्याला हे वास्तव समजून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मोक्षाची मटरियालॅस्टिक असेल पण वाटचाल आवश्यकच ठरते त्यासाठी ज्ञानतंत्रातली साधना मग ती मोक्षाच्या दिशेने जावो किंवा जगाच्या दिशेने जावो आवश्यक ठरते. म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही काही असा भौतिक शास्त्रातले वैज्ञानिक असा , गणित भूमितीतील शास्त्री असा किंवा मग अर्थशास्त्रातले विद्वान असा किंवा कलेतले कलावंत असा मोक्षाला टाळून तुम्हाला जाता येत नाही. कुठल्याही क्षेत्रातली नवता तिथेच शक्य होते जिथे किमान मोक्षाची आद्याक्षरे गिरवली जातात.


श्रीधर तिळवे नाईक

उपयुक्ततावाद व्यवहार वाद आणि सत्य ४ श्रीधर तिळवे नाईक 


मागील लेखामध्ये आपण संस्काराहारी ही संकल्पना मांडली आणि संस्कारांचा थोडासा विचार केला आता त्या पुढे जाऊन आणखी काही करता येते का ते पाहू .


आपण आधीच पाहिले आहे की आपण सत्य वास्तव आणि तथ्य यांच्या अंगाने पाहावे लागते पण त्याचबरोबर आपण हेही पाहिले की अनेकदा हेतूग्रस्त आणि पूर्वग्रह ग्रस्तता कशी ग्रासून टाकत राहते . प्रश्न असा आहे की मग यांना ओलांडून जाता येते का ? आपल्याकडे त्यातूनच बुद्धिमत्ता विचार किंवा बुद्धी विचार आणि प्रज्ञा विचार हा वेगळा केला जातो म्हणूनच आता आपण त्या अंगाने चर्चा करत आहोत.


पहिला प्रश्न अर्थातच प्रज्ञा म्हणजे काय ? प्रज्ञा आणि बुद्धिमत्ता एक आहे का ? 


प्रज्ञा म्हणजे प्राणाशी जोडली गेलेली बुद्धिमत्ता ! त्यामुळेच I Q शी तिचे नाते नसते . आणि ती शक्तीला प्रतिभा बनवते . क्रिएटिव्ह बनवते . जर का शक्ती प्राणाशी जोडली गेली नसेल तर ती अनेकदा स्टिरीओ टाईप जाते . स्मृतीत अडकत जाते .स्मृति ही मेंदूशी निगडित घटना आहे पण तिचे ॲक्सेसीलेरेशन त्वरण हे बुद्धिमत्तेशी आणि प्राणाशी निगडित आहे मोक्ष काय करतो तर सविकल्प समाधीमध्ये तुम्हाला प्राणाशी जोडतो आणि निर्विकल्प समाधीमध्ये महाप्राणाशी जोडतो . आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की आपण स्वतःला प्राणाशी जोडून घेऊ शकत नाही आणि याला कारण आपला मद असतो त्याचा माज असतो त्याची मते असतात मते म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काँक्रीट झालेले विचार! सॉलिड झालेले विचार ! ज्ञानतंत्रामध्ये जेव्हा तुम्ही मोक्षाची साधना करायला लागता तेव्हा कळत नकळत वारंवार मताला , माजाला भिडत राहतात आणि ज्यांना आपण पूर्वग्रह ग्रस्तता पूर्वग्रह दूषितता म्हणतो आणि हेतूग्रस्तता हेतू दूषितता म्हणतो त्या नेहमीच या सॉलिडिटी मधून जन्मलेल्या असतात . त्या एक प्रकारची स्टॅबिलिटी देतात आणि त्या शॉर्टकट पुरवत असल्याने त्या आपणाला आपल्या वाटायला लागतात याचे कारण मुळातच आपल्या शरीराची प्रवृत्ती ही कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त प्राप्ती करून घेण्याचे असते. ऊर्जा वाचवणे शक्ति वाचवणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे . यातूनच जडत्व आळस या गोष्टी निर्माण होतात आणि त्याच अनेकदा सवयी बनत जातात आणि मग आपल्या सवयी नेहमी शॉर्टकट शोधायला लागतात आणि त्याच शॉर्टकटला जबाबदार असतात. साहजिकच प्रज्ञा अनेक लोकांच्या ठाई विकास पावत नाही कारण ठाय दिला कि ती स्थायी बनत जाते आणि स्थायित्व स्थावर निर्माण करते सवयी निर्माण करते आणि एकदा का मेंदू स्थावर झाला की तो जंगम पासून सवयी मोडण्यापासून वंचित राहतो आणि मग त्याच त्याच मतांच्या सॉलिडीटीमध्ये अडकून पडतो साहजिकच जेव्हा जीवनाची स्पर्धा सुरू असते तेव्हा ज्यांच्याकडे लिक्विडिटी आणि गॅसीडीटी जास्त असते असे लोक प्रज्ञा जास्त जवळ करत जातात तिचा वापर वाढवत जातात आणि इतरांना मात देत जातात. प्रज्ञा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्राणाशी जुळलेले बुद्धिमत्तेचे मेंदूचे नाते तर महाप्रज्ञा म्हणजे थेट महाप्राणाशी जुळलेले नाते होय. परम प्रज्ञा मात्र महाप्राणातूनही मुक्त होते आणि थेट शिवाशी शून्याशी युक्त होते. ही मोक्षाची अवस्था असते मात्र व्यवहारामध्ये कधी कधी अपवादात्मक वेळा महाप्राण ऑपरेट होतो आणि फार क्वचित प्राण ऑपरेट होतो . सर्वसाधारणपणे आपण बुद्धीतूनच ऑपरेट होत असतो आणि त्याहीपेक्षा अधिक बौद्धिक मदामधून ऑपरेट होत असतो आणि त्यामुळेच मेंदूतल्या अनेक गटारगंगा या मदामुळे त्याच्यातून निर्माण झालेल्या मतामुळे आणि माजामुळे तयार होतात. त्यामुळेच नि : संस्कारासाठी नि: संसारासाठी मेंदूला प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्यक्ष ज्ञान घेऊन प्रत्यक्ष प्रॅक्टिस करून निष्कर्ष काढण्याची सवय लावावी लागते आणि निष्कर्ष हे नेहमीच निरीक्षणातून परीक्षणातून निर्माण होत असतात . मताला अनेकदा निरीक्षण नसते परीक्षण नसते बस ते घडत जाते होत जाते किंवा ९०% बिंबवले जाते . आपण अनेकदा इतके माठ असतो की आपण इतरांचे निष्कर्ष सहजरित्या बिंबवून घेतो . अनेकदा यातूनच संस्कार घडतात . त्या उलट आपण आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यामधून प्राप्त केलेले जगण्यातून प्राप्त केलेले निष्कर्ष नेहमी ज्ञान निर्माण करतात तर मत नेहमीच माहिती गोळा करत असते . माहितीही ज्ञानाची पहिली पायरी होऊ शकते परंतु दुसरी पायरी ही नेहमीच स्वतःचे निष्कर्ष काढणे स्वतःचे प्रयोग काढणे यापासून सुरू करावी लागते . साधना न करताच मोक्षावर टीका करणारे महाभाग अनेक आहेत असे लोक स्वतःची बिंबवून घेतलेली मते इतरांच्या वर बिंबवत असतात . पण प्रत्यक्षामध्ये हे लोक अडाणी माणसापासून फार वेगळे असत नाहीत. हे त्यांना प्रिय झालेल्या तर्कदृष्टी पद्धतीतून आत्मसात केलेल्या मतांनाच कवटाळून बसलेले असतात . हा ज्ञानातून आलेला अडाणीपणा असतो कधी कधी तर यांच्यापेक्षा अज्ञानातून आलेला अडाणीपणा परवडतो . कारण तो किमान बदलाला तयार असतो परंतु ज्ञानातून आलेला अडाणीपणा बदलणे हे फार अवघड जाते कारण तो अनेकदा पुस्तकी असतो . त्यापेक्षा अज्ञानातून आलेला अडाणीपणा ओपन असतो .


साहजिकच ज्ञान तंत्रामध्ये जेव्हा तुम्ही साधना करायला लागता तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःमध्ये अनेक मी सापडायला लागतात त्यांची उगमस्थाने शोधायला गेलात की मग माज सापडतो आणि आपली मते नेमकी कुठून कशी यायला लागतात ती कुठून कोणी स्पॉन्सर केलेली आहेत तेही सापडायला लागते सर्वात प्रथम पूर्वग्रह आणि हेतू नीट न्याहाळण्याची जबाबदारी पडते ज्ञान तंत्रामध्ये सर्वात प्रथम त्यामुळेच सत्य आणि ज्ञान यांच्या संबंधांना व या संदर्भातील प्रोसेसला महत्त्व प्राप्त होते आणि सत्य हे कधीही परम प्रज्ञा प्राप्त झाल्याशिवाय "होत"नाही . आपण सत्य बनत नाही किंबहुना आपण सत्य बनतच नसतो आपण सत्यच असतो पण ते फार शेवटी कळत जाते. तोपर्यंत आपला सारा खेळ हा वास्तव आणि प्रज्ञा तथ्य आणि बुद्धी स्मृति आणि हुशारी व्यवहार आणि चालाखी यांच्यातच खेळला जातो . जगात अनेकदा हुशार माणसे स्ट्रीट स्मार्ट माणसे यशस्वी झालेली दिसतात कारण हुशारी नेहमी आपले हेतू जाणून असते. त्यामुळेच स्वार्थीपणा हा फार उत्तमपणे हुशारीला साधतो . मुख्य म्हणजे हुशारीजवळ अनेकदा नैतिकतेचा अभाव असतो येनकेनप्रकारेण आपला हेतू कसा होईल हेच फक्त हुशारी चाचपत असते ज्या हुशारीला प्रत्यक्षामध्ये चाचपणे परफेक्ट जमते तिला आपण चालाखी म्हणतो जिला जमत नाही ती हुशारी फक्त हुशारीच राहते . 


ज्ञानतंत्रात जेव्हा तुम्ही साधना सुरू करता तेव्हा सर्वात प्रथम हा जो तुमच्या आतला चलाख मनुष्य असतो त्याला फेकून द्यावे लागते मग हुशार माणसाला फेकून द्यावे लागते मग बुद्धिमान माणसाला फेकून द्यावे लागते आणि मग प्रज्ञेशी सामना करावा लागतो आणि शेवटी प्रज्ञेलाही फेकून द्यावे लागते. सर्वात अवघड प्रज्ञेला फेकून देणे असते कारण ती इतकी अनमोल असते की तिला फेकणे सहज शक्य होत नाही. अनेकदा तुमच्या आसपासच्या लोकांना तिचा फायदा झालेला असतो आणि त्यामुळे ते लोक सुद्धा नेहमीच अडथळा व्हायला लागतात . जगाला तर तुम्ही 101% यशस्वी होणार याची खात्री पटायला लागते परंतु ही वाटणारी खात्रीच अनेकदा तुम्हाला पुन्हा एकदा हुशारी आणि चालाखी करायला भाग पाडू शकते . तुमचे मित्र अत्यंत पद्धतशीरित्या किंवा न कळत तुमच्यावर प्रेशर टाकत असतात मी नेहमीच प्रेशर चे सुद्धा 

१ गुप्त दबाव 

२ लुप्त दबाव

३ सुप्त दबाव 

४ प्रकट दबाव 

५ जागृत दबाव 

६ उन्नत दबाव 


असे प्रकार सांगत असतो आणि यातला प्रत्येक प्रकार नीट तपासून बघावा लागतो .आपल्या मेंदूमध्ये अनेकदा संस्कार हे गुप्त लुप्त आणि सुप्त असतात आणि ते नेहमीच गुप्त लुप्त सुप्त दबाव निर्माण करत राहतात जे आपणाला ओळखता येत नाहीत. साधनेची सुरुवात करताना नेहमीच आपणाला ते प्रथम ओळखावे लागतात . कुठल्याही संस्काराची सुरुवात ही ठशापासून होते आणि मग ठसे हळूहळू संस्कार बनत जातात . आपण जेव्हा ठसे आणि संस्कार यांच्या बद्दल जागृत व्हायला आणि राहायला लागतो तेव्हा कुठे हळूहळू जागृती निर्माण होते आपल्या अनेक प्रकारच्या बौद्धिक नशा दिसायला लागतात . आपली अनेक बौद्धिक व्यसने दिसायला लागतात . 


ज्ञानतंत्रामध्ये भाव किंवा भावना या सुद्धा विचारच असतात त्यांची व्याख्याच मुळी" तीव्र विचार इन्टेन्स थिंकिंग "अशी असते. म्हणजेच भावना म्हणजे काय तर तीव्र विचार ! अनेकदा हे तीव्र विचार शब्द शून्य असतात भाषा शून्य असतात साहजिकच त्यांना विचार मानायला आपली प्रवृत्ती तयार नसते पण प्रत्यक्षात ते विचारच असतात याचे कारण त्यांच्या असण्यामागे असलेली प्रचंड मोठी पूर्वग्रह दूषितता आणि हेतुग्रस्तता ! मुळात आसक्ती इतकी प्रबळ असते कि ती भाषिक व्हायला पण अनेकदा नकार देते. किंवा ती इतकी उतावळी असते की तिला भाषा सापडत नाही . कवी लोक अनेकदा तिला अशी भाषा सापडवून देतात .


साहजिकच कलांच्या मध्ये आणि इमोशनल जीवनामध्ये अनेकांना भावना फार महत्त्वाच्या वाटायला लागतात. त्याच त्यांच्या पिंडनिश्चितीमध्ये येतात आणि भावपिंड तयार होत जातो आणि तोच मुख्य बनून जातो. ज्ञानतंत्र अशा लोकांच्यासाठी नसते . अशा लोकांच्यासाठी भाव तंत्र योग्य ठरते.


ज्ञान तंत्रातला साधक माणूस मात्र या सगळ्याचा नीट अभ्यास करायला लागतो . मेंदूची सेल्फ लॅबोरेटरी बनवणे हे इतके सोपे नसते कारण अनेकदा सेल्फ हाच अडथळा असतो सेल्फ पासून मुक्त झालेला मेंदू ही हळूहळू प्राप्त होणारी गोष्ट आहे . ती एकदा प्राप्त झाली की संपूर्ण मेंदू म्हणजे एंटरटेनमेंट होऊन जाते . आपण माजाला मौज बनवू शकतो . आपण हसायला लागतो अर्थात आपल्या या हसण्यामुळे गैरसमज पसरू शकतात कारण आपण इतरांच्या गोष्टींनाही हसायला लागतो. आणि समोरच्या व्यक्तीला माज आणि अहंकार जास्त असेल तर मग ती गैरसमज करून घेते.


जगामध्ये साधारण applicable हुशारी म्हणजेच व्यवहारिक बुद्धिमत्ता ठरत जाते . प्रॅक्टिकल इंटेलिजन्स ! ज्ञानतंत्रामध्ये तो थोडासा बाजूला ठेवावा लागतो . त्याऐवजी यमनियमाला धरून काय आहे त्याविषयी ठाम व्हावे लागते . लोकांच्या नजरेतून मूर्ख होण्याची रिस्क पत्करावी लागते .


व्यवहार वाद हा आपणाला काही गोष्टी समजून घ्यायला मदत करू शकतो परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की व्यवहार वादाचा प्रत्यक्ष मोक्षासाठी काडीचाही फायदा होत नाही. फक्त आपणाला मेंदूचा व्यवहार मात्र कसा चालतो ते कळू शकते. मात्र सुरुवात व्यवहारवादापासून करता येते मुख्य म्हणजे जग कसे आहे हे समजून घ्यायला व्यवहार वाद खूप उपयोगी पडतो . किंबहुना आधुनिकतेची दोन टोके आहेत. एक अस्तित्व वाद आहे आणि दुसरा व्यवहार वाद आहे . बाकी सर्व इजम हे या दरम्यान आहेत . अस्तित्व वाद हा पर्सनल आहे व्यक्तिगत आहे अस्तित्वगत आहे तर व्यवहारवाद हा लोकगत आहे समाजाभिमुख आहे . संस्कृतीअभिमुख आहे . 


मोक्ष साधना म्हणजे अस्तित्व आणि माज यांना ओलांडून व्यवहार आणि विचार यांना ओलांडून जात स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाला ट्रान्ससेंड करत प्राणाच्या आणि महाप्राणाच्या आणि शेवटी शिवाच्या दिशेने वाटचाल करणे असते . मात्र या वाटचालीला सुरुवात मात्र विचारात आणि व्यवहारातच लाभते . ज्यांची सुरुवात विचारापासून होत नाही त्यांच्यासाठी ज्ञान तंत्र नाही हे त्यांनी समजून घ्यावे.


श्रीधर तिळवे नाईक 







असे वर्गीकरण करतोउपयुक्ततावाद ,व्यवहार वाद नीतिमत्ता आणि सत्य ५ श्रीधर तिळवे नाईक 


सर्वसाधारणपणे जगातील सर्वच भागांमध्ये भूगोलामध्ये समाजामध्ये व्यवहारप्रणाली ही कायमच मानवाच्या आयुष्यामध्ये मानवाच्या जीवन आणि जीव प्रणालीमध्ये उपस्थित असलेली दिसते .


जेव्हा माणसांमध्ये श्रद्धायुग होते तेव्हा ती प्रबंधन म्हणून उदयाला आली तिचा आधार प्रामुख्याने श्रद्धा आणि शहाणपण होते .


त्यानंतर आलेल्या मोक्षयुगात मात्र तिचा उदय आस्थापन म्हणून झाला . करुणा , मोक्ष आणि शहाणपण हा तिचा आधार होता . आजही आहे . अलीकडे अत्यंत जाणीवपूर्वक आस्था हा शब्द श्रद्धा म्हणून वापरला जात आहे जेणेकरून मोक्ष धर्माच्या पुन्हा एकदा ताब्यात जाईल याबाबत वेळीच सावध होणे आवश्यक आहे.


त्यानंतर आलेल्या धर्मयुगात श्रद्धेचे रूपांतर धर्मात केले गेले राजकीय प्रणालीत केले गेले साहजिकच इथे व्यवहार प्रणाली ही कुटीलनीतीवाद म्हणून उदयाला आली . भारतात या अंगाने कौटिल्याचे अर्थशास्त्र फार महत्त्वाचे आहे कारण ते उपलब्ध असलेले यावरचे सर्वात मोठे जुन्या काळातले डॉक्युमेंटेशन आहे . कुटीलनीतिवाद एक व्यवहार प्रणाली म्हणून नेमका कसा काम करत होता हे तिथे स्पष्ट होते . पुढे आपणाला हे युरोपमध्ये मेक्यावलीमध्ये दिसते .


विज्ञान युगामध्ये मात्र व्यवहार प्रणालीचा उदय हा व्यवस्थापन म्हणून झाला मॅनेजमेंट म्हणून झाला . मॅनेजमेंट ला एक विज्ञान म्हणून पाहण्याची सुरुवात झाली याचे कारण तत्कालीन साम्राज्यवादाचे व्यवहार हे नेमके कसे हाताळायचे असा प्रश्न निर्माण झाला होता आणि या साम्राज्यवादात ने आणि साम्राज्यवादी कंपन्यांनी जे काही व्यवहार केले होते त्यांना यश कसे मिळाले याचा सुद्धा विचार केला जाऊ लागला कारण या सर्व साम्राज्यवादी कंपन्या संख्येने अतिशय अल्प असणारे लोक चालवत होते आणि आश्चर्यकारकरीत्या अत्यंत संख्येने कमी असणाऱ्या या लोकांनी भारतासारख्या चीन सारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या समुदायांच्यावर केवळ मॅनेजमेंट टेक्निक च्या जीवावर मात केली होती आज सुद्धा नेमका हाच प्रश्न ब्राह्मण धर्माच्या संदर्भात उपस्थित करता येतो ब्राह्मण वर्णाच्या बाबतीत उपस्थित करता येतो कारण नेमका हाच प्रश्न हिते सुद्धा आहे की इतके अल्पसंख्या असणारे ब्राह्मण कसे काय संपूर्ण बहुजन समाजाला मॅनेज करतात ? हा प्रश्न आपणाला मुस्लिमांच्या बाबतीत सुद्धा पडतो असे काय आहे की भारतामध्ये अशा प्रकारचे व्यवहार नियोजन अल्पसंख्यांक असणाऱ्या लोकांना पॉसिबल होते आपल्या समाजामध्ये व्यवहार प्रणालीच्या पातळीवर नेमका काय प्रॉब्लेम आहे की आपण सहजरीत्या अल्पसंख्यांक असणाऱ्या समुदायांच्याकडून समाजाच्या कडून पराभूत होतो ? त्याहून आश्चर्यकारक गोष्ट अशी की अल्पसंख्यांक असणाऱ्या ब्राह्मण समुदायाला मुस्लिम समुदाय कसा काय काट शह देतो आणि स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करतो ? आज सुद्धा हिंदू म्हणवणाऱ्या लोकांना मॅनेजमेंट जमत नाही काय ? आपण राजकीय मॅनेजमेंट करताना गोते का खातो? 


तंत्रज्ञान युगामध्ये मात्र सुरचनापण म्हणून व्यवहार प्रणाली उदयाला आली . याला अलीकडे पोस्ट मॅनेजमेंट सुद्धा म्हटले जाते . 


चौथ्या नवतेमध्ये याचे स्वरूप बदलले असून आता ते सुजालपण म्हणून उदयाला आलेले आहे . 


व्यवहार म्हणजे समाजात करावयाचा कृतीविचार ,आचार आणि प्रचार होय. त्याचा मुख्य उद्देश नेहमीच अंमलबजावणी असतो . विचार ही सुरुवात होऊ शकते पण शेवटी जर का विचार व्यवहार नाही झाला की तो हळूहळू मृत होत जातो . 


भारतीयांनी आपल्या सगळ्या व्यवहार प्रणाली हल्ली पाश्चात्त्य देशातून आयात करायला सुरुवात केलेली आहे तिकडचे सर्व मॅनेजमेंट आणि पोस्ट मॅनेजमेंट आपण अक्षरशः आंधळेपणाने इकडे आणलेले आहे . भारतीय समाज कसा चालतो याचा अभ्यास नसल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे. साहजिकच साठोत्तरीमध्ये या अंगाने हळूहळू का होईना परंतु भारतीय विचार प्रणालीचा आणि व्यवहार प्रणालीचा विचार सुरू झाला आणि साहजिकच आता शिवाजीचे मॅनेजमेंट कसे होते कौटिल्याचे मॅनेजमेंट कसे होते (हे चाणक्याच्या नावाने सांगितले जाते परंतु चाणक्य होऊन गेला की नाही याबद्दल शंका आहे पण प्रत्यक्षात चाणक्याच्या नावाने सांगितले जाणारे सर्व व्यवहारपण हे कौटिल्याने सांगितलेल्या लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे चाललेले असते .कौटिल्य आपली व्यवहार प्रणाली सांगतो हे खरे आहे . चंद्रगुप्ताच्या दरबारात असलेल्या विष्णू गुप्ता चे मूळ लिखाण काय होते हे मात्र अजूनही आपणाला सापडलेले नाही . तो चंद्रगुप्ताचा मार्गदर्शक होता एवढे नक्की आहे. तो वैश्य असल्याने आणि खुद्द नंद - मौर्य घराणे हे वैश्य असल्याने व्यवहार प्रणालीशी त्यांचा जबरदस्त संबंध होता . मुळातच मौर्य घराणे नंद घराण्यापासून अत्यंत जाणीवपूर्वक वेगळे काढण्याचा प्रयत्न युरेशियन लोकांनी केलेला आहे कारण त्यांना इतिहास नंद घराण्यापासून सुरुवात करायचा नव्हता . याला एक पौराणिक कारण आहे ते म्हणजे नंद घराणे हे प्रथम धनगर किंवा न्हावी होते असा असलेला पुराण लेखनाचा दावा ! प्रत्यक्ष शैव समाजामध्ये कोणीही काहीही होऊ शकत असल्याने धनगर किंवा न्हावी समाजात किंवा जन्म झाला तरी कोणीही व्यापारी बनू शकत होता वाणीपणी बनू शकत होता त्यामुळे धनानंद हा वैश्य आहे हे स्पष्ट आहे आणि चंद्रगुप्त ही त्याचीच संतती आहे . )त्यामुळे जेव्हा जेव्हा या संदर्भातले कौटिल्याचे विचार तुम्ही वाचता तेव्हा त्यामध्ये विष्णू गुप्ता चे विचार आहेत मात्र या विष्णू गुप्तच्या विचारांमध्ये स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मनुस्मृति आणि इतर स्मृती वाङ्मय घुसवून आत्ताचे अर्थशास्त्र तयार झालेले आहे. पहिले अर्थशास्त्र हे शुक्राचार्याने लिहिले का असा एक फार मोठा ऐतिहासिक प्रश्न आहे . हे सर्व सांगण्याचे कारण असे की व्यवहार प्रणालीचा भारतातला विचार हा नेहमीच कौटिल्यापासून सुरू केला जातो तो प्रत्यक्षात शुक्राचार्य विष्णु गुप्त असा सुरू झाला पाहिजे . प्राचीन काळामध्ये सहसा लोक आपला जन्मदत्त व्यवसाय किंवा नोकरी सोडत नसल्याने अनेकदा वर्ग हे वर्णासारखे भासतात पण प्रत्यक्षात ते तसे नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे . त्यामुळेच इंडिका मध्ये आलेले वर्ग हे अनेकदा जन्मदत्त असल्यासारखे आपणाला भासते परंतु प्रत्यक्षामध्ये लवचिक होते. हेही सांगण्याचे कारण म्हणजे इंडिका मध्ये कळत नकळत भारतातल्या मौर्य साम्राज्यातल्या व्यवहार प्रणालीचे प्रतिबिंब आहे .


व्यवहार प्रणालीच्या दृष्टीने मराठी लोकांच्यासाठी दुसरा महत्त्वाचा मनुष्य अर्थातच शिवाजी महाराज आहेत . त्यांच्या आज्ञापत्रांमध्ये याचे प्रतिबिंब आहे .


याबाबतीत सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे मोघल साम्राज्य ! जवळजवळ सर्वच मोघल बादशहांनी व दरबारी काम करणाऱ्या लोकांनी अनेक पत्रे लिहिली आणि ती आता उपलब्ध झाल्यामुळे त्या काळातल्या मोघलांच्या व्यवहार प्रणालीवर फार मोठा प्रकाश पडतो . हीच गोष्ट आपणाला शिवशाही आणि पेशवाई उत्तर पेशवाई यांच्या संदर्भात दिसते. अनेकदा पत्रांची सुरुवात पत्रांचा मायना त्या त्या माणसाच्या धर्माविषयी बोलतो. 


प्रश्न असा आहे की आधुनिक जीवनातली आपली भारतीय लोकांची व्यवहार प्रणाली नेमकी काय आहे आणि आत्ताच्या उत्तराधुनिक जीवनातली आपली भारतीय लोकांची व्यवहार प्रणाली काय आहे आणि आता चौथ्या नव्हतेच्या जीवनातील आपल्या भारतीय लोकांच्या जीवनातील विचार प्रणाली विचार प्रणाली व्यवहार प्रणाली काय आहे असे प्रश्न आता नीट विचारणे आवश्यक आहे. म्हणजे भारतीय जेव्हा होय म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ अनेकदा शक्यता असा होतो किंवा शक्यता आहे असे म्हणतात तेव्हा त्यांचा खरा व्यवहारीक अर्थ नाही असा आहे आणि भारतीय सहसा नाही म्हणत नाहीत. प्रश्न असा आहे की संपूर्ण भारतीय लोकांचा व्यवहारच बायकांच्या सारखा आहे का ? (या दृष्टिकोनावर स्त्रीवादी दृष्टिकोनातून टीका होऊ शकते याची मला कल्पना आहे)कारण आपल्याकडे बायका असे करतात अशी ठाम समजूत आहे प्रत्यक्षामध्ये पुरुष पण काही वेगळे करत नाही . ही जी भारतीय आणि एकंदरच मुसलमान जगतातली व्यवहार प्रणाली आहे जी शब्द अजिबात पाळत नाही तिचे काय करायचे हा एक प्रश्न आहे. किंवा मते विकणे आणि मते विकत घेणे असा जर का एक व्यवहार भारतीय लोकांच्या लोकशाहीमध्ये घडत असेल तर त्यामागे असणारी व्यवहार बुद्धी व्यवहार प्रणाली काय आहे आणि माणसे अशी व्यवहार प्रणाली पार पाडायला एकमेकाला का मदत करतात? भारतीयांना शॉर्टकटचे आकर्षण का आहे ? नीतिमत्तेमध्ये ते का ठाम असत नाहीत आणि भ्रष्टाचाराकडे ते सहजरीत्या का वळतात? त्यांना त्यांच्या देवाची, ईश्वराची किंवा धर्माची किंवा कर्मफळाची भीती का वाटत नाही ? की भारतीय माणूस आतून नास्तिक आहे आणि वरून मात्र देव देव करतो ? भारता मधले देव हा फक्त व्यवहाराचा भाग आहे का ? ते नीतिमत्तेचे भाग का बनत नाहीत? की मुळात देवच असे आहेत की जे नैतिक नाहीत आणि त्यामुळेच भारतीयांचा सगळा नैतिक विचार गडबडलेला आहे आणि जर का असे देव निर्माण झाले असतील तर ते कोणी निर्माण केले का निर्माण केले ? भारतीय व्यवहार प्रणाली मधले हे अत्यंत कळीचे प्रश्न आहेत आणि ते सतत विचारले पाहिजे कारण आपण फक्त भ्रष्टाचारावर चर्चा करतो परंतु आपल्या व्यवहार प्रणालीमध्ये कसल्याही प्रकारचा व्यवहारिक फरक झालेला दिसत नाही . याची मुळे मुळात कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे का किंवा भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशामध्ये आहे का याची नीट चौकशी करण्याची आता वेळ आलेली आहे.


श्रीधर तिळवे नाईक

उपयुक्ततावाद व्यवहार वाद आणि कल्पव्यवहारवाद ( मांत्रिकी) अर्थात मांत्रिक ,भगत आणि ब्राह्मण भाग सहा

मानवी जीवनामध्ये श्रद्धायुग हे एक अत्यंत गुंतागुंतीचे युग आहे कारण या युगाला शह देण्यासाठीच पुढे इंडियाना मधून मोक्ष आला युरोप मधून फिलॉसॉफी आली आणि नंतर मोक्ष आणि फिलॉसॉफीला शह देण्यासाठी युरोपमध्ये ख्रिश्चन हा रीलिजन आणि भारतामध्ये धर्म आला 


श्रद्धा युगाच्या केंद्रस्थानी मुळातच अनुभव होता हा अनुभव प्रामुख्याने इंद्रिय अनुभव होता आणि प्रॉब्लेम असा होता की भवतालचे जग हे फक्त इंद्रियांनी कह्यात येत नव्हते आणि याचाच फायदा नेमका घेतला गेला . हा फायदा घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून मांत्रिक होते . जगभरामध्ये सर्व टोळ्यांच्या मध्ये हे मांत्रिक उदयाला आलेले दिसतात याला अनार्य सुद्धा अपवाद नव्हते. शैव श्रुतीची मांडणी करताना नेहमीच अनेकदा येणारा सर्वात मोठा पेच हा या अनार्य श्रद्धांचा असतो कारण या अनार्य श्रद्धांमधल्या अनेक गोष्टी आज सुद्धा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मांत्रिक लोक करत असतात .


भगवान शंकर यांनी या अनार्य श्रद्धांना छेद देण्यासाठीच शैव श्रुती जन्माला घातली आणि या मांत्रिकांचे म्हणजेच भगतांचे वर्चस्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना पंडित बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रचंड यशस्वी झाला तरी कुठे ना कुठेतरी समाजाच्या निबीड अरण्यात हे लोक स्वतःच्या वर्चस्वसंधीची वाट पाहत होते .


या मांत्रिकांचे अनेक प्रकार होते पण त्यामधले जे प्रमुख समुदाय म्हणून उदयाला आलेत ते म्हणजे भगत आणि ब्राह्मण ! यातील ब्राह्मण हे दोन प्रकारचे होते का हा एक फार मोठा ऐतिहासिक प्रश्न आहे . भगत लोक मात्र इथले स्थानिक भारतीय होते याबद्दल कोणाला शंका नाही . या भगतांना सर्वात प्रथम संधी मिळाली पुन्हा ती वैदिक धर्म भारतात आल्यानंतर आणि या युरेशियन श्रुतीची भरभराट झाल्यानंतर ! कारण त्यांच्या मदतीला या वेळेला ब्राह्मण धर्म आला आणि ब्राह्मण आणि भगत यांची युती तयार झाली.


पुढे पुढे शैव श्रुतीचे रूपांतर तंत्र श्रुतीमध्ये करण्यात जे ब्राह्मणांना यश आले त्यातून मग हळूहळू भगतांनी स्वतःला तांत्रिक म्हणवून घ्यायला सुरुवात केली आणि लोकांनीही यांना तांत्रिक असे म्हणायला सुरुवात केली आणि हे लोकही स्वतःला भगत म्हणवण्याऐवजी तांत्रिक म्हणवून घेऊ लागले कारण त्यामुळे त्यांना शैव कस्टमर मिळत होते आणि पुढे वैष्णव लोकांनी यांना तांत्रिक म्हणून स्वीकारल्यानंतर त्यांना वैष्णव कस्टमर पण मिळत गेले . तांत्रिकी ही संज्ञा बदनाम होत गेली हळूहळू तिला श्रुती म्हणण्यात येऊ लागले . मुख्य म्हणजे या सगळ्याचे लिखित डॉक्युमेंटेशन होऊ लागले साहजिकच हळूहळू शैव तांत्रिकी हा शब्द मागे पडून प्रथम शैव श्रुती आणि लिखाणात पूर्णपणे तंत्र श्रुती हा शब्द प्रस्थापित झाला अलीकडे अनेक लोक तो मुद्दाम जाणीवपूर्वक वापरतात कारण त्यामध्ये हळूहळू वैष्णव लोकांचा समावेश होऊन तांत्रिक श्रुती ही हिंदू श्रुती झाली अनेक ब्राह्मण आणि पंडित सुद्धा तांत्रिक म्हणून काम करू लागले .


एका अर्थाने वैष्णव धर्मामुळे आणि वैष्णव धर्माने तंत्र स्वीकारल्यामुळे बौद्ध धर्माने तंत्र स्वीकारल्यामुळे म्हणजेच वज्रयान स्वीकारल्यामुळे मांत्रिकी पुन्हा एकदा तांत्रिक म्हणून प्रस्थापित झाली पुन्हा एकदा धर्मामध्ये मोक्ष जाऊन त्या जागी मांत्रिकी आली आणि सगळा खेळ पुन्हा एकदा श्रद्धेचा झाला 


ब्राह्मण हे सर्वात प्रथम मांत्रिक होते ऋषी सुद्धा आपण जर का ऋग्वेद पाहिला तर मांत्रिकच होते किंबहुना जो मंत्र रचतो तो ऋषी अशी व्याख्या होती मग ब्राह्मण आणि ऋषी यांच्यामध्ये काय फरक होता तर ऋषि मंत्र रचत होते आणि ब्राह्मण फक्त त्या मंत्रांना फॉलो करत होते अनुयायी होते. 


मांत्रिकीचा व्यवहार हा कसा होता तर तो कल्प व्यवहार होता प्रत्यक्ष व्यवहार नव्हता . कसलीही खात्री नसताना प्रत्यक्षात काल्पनिक खात्री देत मनोकामना पूर्ण करण्याचे कर्मकांड म्हणजे मांत्रिकी होय. अनार्य लोकांच्या मध्ये या संदर्भातल्या कल्पना अतिशय स्पष्ट होत्या आणि विद्या आणि मांत्रिकी या दोन भिन्न गोष्टी आहेत याची त्यांना कल्पना होती त्यांना ताळ्यावर आणायचे म्हणूनच भगवान शंकर यांनी विद्यांचा पुरस्कार केला भगवान गणपती यांनी भगवान विनायक यांनी विद्यांचा पुरस्कार केला पण मांत्रिकीचा कधीही पुरस्कार केला नाही . तिला कायम ठामपणे विरोध केला. खरे तर भगत हे पूर्णपणे भारतामधून पराभूत होत चालले होते परंतु दुर्दैवाने नंतर काही लोकांनी खुद्द शैवांच्यातच धर्म निर्माण केला आणि या सर्व मागे गेलेल्या भगत लोकांना पुन्हा एकदा मागून यायला जागा झाली आणि हळूहळू अनेक भगत शैव धर्मामध्ये पुरोहित म्हणून स्थिर होत गेले .


जगभरातील सर्व टोळ्यांचा आपण अभ्यास केला तर आपणाला असे दिसते की मांत्रिकी सर्वत्र आहे . याला स्टेप्स मधून आलेल्या किंवा सायबेरिया आणि मंगोलिया मध्ये असणाऱ्या टोळ्यांचा सुद्धा अपवाद नव्हता तिथे मांत्रिक हा शमन होता शामन होता त्यामुळे साहजिकच जेव्हा मंगोलिया मधून या लोकांचे स्थलांतर झाले तेव्हा ते भारतात आले ते तिबेट मार्फत आले आणि तिबेट मध्ये हे लोक हळूहळू बदलत गेले आणि त्यांनी शैव लोकांचा अनार्य लोकांचा मोक्ष स्वीकारला त्यामुळे साहजिकच मूळ शामन हा शब्द स्वीकारणे अवघड गेले आणि हळूहळू हे स्वतःला श्रमण म्हणवून घेऊ लागले यामुळे झाले काय की या प्रदेशामध्ये जो मांत्रिकी स्वीकारतो तो शामन पुढे ब्राह्मण आणि जो मोक्षाला जाण्यासाठी साधना करतो तो श्रमण अशी व्यवस्था प्रस्थापित झाली आणि त्यातूनच शैव लोकांच्या श्रुती मधली एक उपश्रुती म्हणून श्रमण श्रुतीचा विकास झाला जिच्यातून आजीवक ,जैन आणि बौद्ध अशा धर्मांचा उदय झाला हे लोक अनारीय लोकांना स्वीकारायला तयार नव्हते कारण यांना स्वतःची स्वतंत्र स्वायत्त ओळख टिकवून धरायची होती .


मात्र यांच्यात सुद्धा जे सामन म्हणून टिकू इच्छित होते ते संधीची वाट पाहत होते आणि त्यांना अशी संधी महावीर आणि नंतर महायानाने दिली हळूहळू सर्व श्रमण श्रुती सुद्धा मांत्रिकीच्या प्रभावाखाली यायला लागली 


अनार्य लोकांच्या मध्ये जे मांत्रिक होते ज्यांना भगत म्हटले जात होते अशा लोकांनी हळूहळू ब्राह्मण या दुसऱ्या आर्य लोकांच्यातील मांत्रिकांशी युती करून पुन्हा एकदा नवीन मांत्रिक धर्म स्थापन केला ज्याला आता आपण ब्राह्मण धर्म असे म्हणतो त्यामुळेच जेव्हा समाज शास्त्रज्ञ म्हणतात की ब्राह्मणांच्या मध्ये फक्त खरे बाहेरून आलेले ब्राह्मण 30% आहेत आणि उरलेले 70% हे इथूनच आलेले आहेत तर ते इथून आलेले जे ब्राह्मण आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून ते इथले भगत आहेत. आता प्रश्न असा आहे की सर्वच भगत असे होते का? तर नाही अनेक भगत असे होते ज्यांनी भगवान शंकरांचे शिष्यत्व पत्करले होते आणि ते स्वतः पंडित बनले होते परंतु एक वेळ अशी आली की जेव्हा पंडित लोकांनी सुद्धा मांत्रिकी स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांनीच शैव श्रुतीचे रूपांतर तंत्र श्रुतीमध्ये करण्यामध्ये प्रचंड मोठा वाटा उचलला याचे कारण स्पष्ट होते धंदा होता मांत्रिकी हा एक नेहमीच उत्तम चालणारा व्यवसाय असतो त्याचा व्यवहार कल्प व्यवहार असला तरी कल्पनेने चाललेला आणि कल्पनेच्याच आधारे चाललेला व्यवहार असला तरी त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गिऱ्हाईक आहे . आणि हे गिराईक फक्त अनार्य नाही ते आर्यसुद्धा आहे यज्ञ ही संस्था ही सुद्धा मांत्रिकी प्रधान व्यवस्था आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . वाम पूजा हीसुद्धा अशीच मांत्रिकी व्यवस्था आहे आणि फलप्राप्तीसाठी तीच केली जाते . या दोन्हींचा आधार यजमानाला कशाला प्राप्ती करून घ्यायची असते आणि ही प्राप्ती इच्छा हीच समस्त मांत्रिकी व्यवहाराचा पाया असते . 


या मांत्रिकी व्यवहारातला सर्वात मोठा टप्पा हा असतो की खुद्द राज्यव्यवस्था आणि राजा या मांत्रिकी व्यवहाराच्या सर्व व्यवहाराला स्वीकारतो मान्यता देतो आणि राजाश्रय देतो. इथेच धर्माचा उदय होतो . धर्म ही एक राज्य प्रणाली बनते राजकीय विचार प्रणाली बनते आणि संपूर्ण व्यवस्था राज्य व्यवस्थेच्या द्वारे ताब्यात घेते . म्हणजेच इथे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येतात सैन्य सत्ता ही धर्मसत्तेद्वारे राजसत्तेच्या अंकित आणली जाते . टोळी अवस्थेत सर्वसाधारणपणे सैन्य सत्ता ही उदयाला येते आणि अनेकदा सैन्य सत्तेमधलाच मनुष्य राजा बनतो त्यामुळे ज्याला युद्धभूमीवर लढता येते तोच राजा बनतो परंतु काही धूर्त लोक नंतर असे असतात की ज्यांना समाजावर नियंत्रण हवे असते ज्यांना आपण राजकारणी म्हणतो ज्यांना लढण्याबद्दल काहीही इच्छा नसते जे कधीच युद्धाच्या मैदानावर उतरत नाही असे भित्रे पण बिलंदर लोक व्यवस्थितपणे धर्मसत्तेच्याद्वारे सैन्य सत्तेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात आणि इथेच राजेशाही चा उदय होतो सैन्यशाही नष्ट होते सेनापतीचे टोळीप्रमुख वा राजा बनण्याचे चान्सेस नष्ट होतात . विद्या युगामध्ये निर्माण झालेल्या सर्व विद्या ज्या शहाणपण साठवत असतात त्या विद्या धर्माच्या अंकित केल्या जातात . मांत्रिकीच्या अंकित केल्या जातात आणि शेवटी त्यांची वाढ खुंटायला सुरुवात होते 


हे सर्व केल्यानंतर मग मांत्रिकी काय करते ? सर्वात प्रथम ती आपण बाहेरून आलो आहोत हीच गोष्ट नाकारते आणि आपण कसे त्या त्या राज्यातलेच प्राचीन काळामध्ये नागरिक आहोत हे सांगायला लागते इतकेच नव्हे तर त्या राज्याचा इतिहास म्हणजे आम्हीच निर्माण केलेला इतिहास आहे आम्हीच घडवलेला इतिहास आहे असे सांगायला लागते . सर्व विद्या ही कशी आमचीच म्हणजेच ईश्वराची निर्मिती आहे हेही सांगायला लागते प्रत्यक्षामध्ये या विद्यांच्या उगमामध्ये किंवा विकासामध्ये या लोकांचा या मांत्रिकीचा काडीचाही वाटा असत नाही . त्यातूनच मग संपूर्ण हडप्पा संस्कृती आमची निर्मिती आहे वैदिक संस्कृतीची निर्मिती आहे अशा प्रकारचा सिद्धांत पुढे आणला जातो 


प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा आलो तेव्हा आपण घोडे घेऊन आलो होतो ही मुख्य गोष्टच लपवली जाते वास्तविक तिबेट द्वारा आले काय किंवा अफगाणिस्तान द्वारा आले काय या लोकांनी सोबत घोडे आणले होते आणि घोडे ही त्यांची खासियत होती आज सुद्धा तिबेटमध्ये आणि अफगाणिस्तान मध्ये घोडे आहेत फक्त तिबेट मधले घोडे मंगोलिया मधून आले होते की नाही असा प्रश्न आपण विचारू शकतो पण हे प्रामुख्याने घोड्यावरून आले होते हीच वस्तुस्थिती आहे ज्यांचा मागमुस सिंधू संस्कृतीत आढळत नाही साहजिकच मग खोटेपणा येतो अनेक प्राण्यांना घोडे बनवले जाते . शंकर हे नंदीबैलावरून येतात मग करायचे काय तर मग स्कंद हे जे रूप आहे तेच खंडोबा म्हणून बदला आणि खंडोबाला घोड्यावर बसवा आणि त्याला शंकर करा शिवशंकर करा शिव रूप करा असा प्रकारचा उद्योग सुरू होतो म्हणजेच दक्षिण पादांक्रांत करणारा शिवपुत्र स्कंद मूळ खंडोबा बाजूला राहतो आणि घोड्यावर बसलेला खंडोबा प्रस्थापित होतो . तो साहजिकच प्राचीन काळातल्या भगतांना हवा असतो कारण त्याच्या आधारे तुमच्या मांत्रिकीच्या जुन्या प्रथा शाबूत ठेवल्या जातात देवदासी वाघ्या मुरळी या प्रथा ज्या मांत्रिकांना म्हणजे भगत आणि ब्राह्मण दोघांनाही अत्यंत आवश्यक वाटतात जिवंत होऊन पुन्हा सळसळायला लागतात 


यामुळेच मी नेहमी गुरव लोकांना सांगतो की भगत बनायचे की पंडित बनायचे हे ठरवा कारण हे जर का ठरवले नाही तर पुन्हा एकदा भगतगिरीच येणार आणि भगतगिरी ही कधीही कल्याण करणारी असत नाही . तुम्ही केवळ शैव आहात म्हणजे भगतगिरी करायला मोकळे आहात असा जर का तुमचा समज असेल तर काढून टाका. शैव होण्याचा अर्थ पंडित होणे असा असतो आणि पंडित तोच होऊ शकतो जो सर्व विद्यांचा अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यांचा प्रचार करतो . ज्या गोष्टी अनाकलनीय असतात त्यांचा अनाकलनीय म्हणूनच पाठपुरावा करतो त्यांचे रूपांतर मांत्रिकी मध्ये होऊ देत नाही . उलट त्या गोष्टींना कसे वैज्ञानिक बनवता येईल ते पाहतो . 


मांत्रिकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती वैज्ञानिक पुरावे कायम नाकारत राहते म्हणजे पुरातत्त्व विद्या असो अनुवंशिकी विज्ञान असो किंवा तुलनात्मक भाषा विद्या असो अशा प्रकारच्या सर्व विद्या आणि विज्ञान ती नाकारत राहते आणि जास्तीत जास्त श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा प्रचार करत राहते . साहजिकच तुम्ही कितीही वैज्ञानिक पुरावे द्या पण ती स्वीकारल्याचा आभास निर्माण करते पण प्रत्यक्षात ती ते पुरावे कधीही स्वीकारत नाही . त्यामुळे विज्ञानाला कायमच अग्नी परीक्षा द्यावी लागते आणि यदाकदाचित विज्ञानाने अग्नी परीक्षा दिली तरी ती त्या विज्ञानाला नंतर पद्धतशीरपणे अज्ञातवासात पाठवून देते वनवासात पाठवून देते. इतकेच नव्हे तर मग मांत्रिकीच्या आधी जे पुरातत्त्वविद्याने नवीन पुरावे आणलेले असतात ते सुद्धा ती नाकारत राहते कारण शेवटी आपण आधी आलो होतो किंवा सुरुवातीपासूनच आधी होतो हेच तिला सतत आग्रह पूर्वक मांडावे लागते .


इतिहास हा असा आपल्या ताब्यात ठेवण्याचे आणि पुराणांच्याद्वारे इतिहासरचना रचण्याचे सातत्यपूर्ण उद्योग हे सुद्धा मांत्रिकीचे लक्षण असते . धर्म नावाची विचार प्रणाली मांत्रिकी निर्माण करते कारण सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी हे आवश्यक असते मुख्य म्हणजे कायदे आणि कानून आपल्या हिशेबाने चालावेत ही त्या मागची आंतरिक इच्छा असते . 


आता प्रॉब्लेम असा असतो की वैज्ञानिक पुरावे प्रबळ होत गेले की टिकणे अवघडून बसते मग साहजिकच पुन्हा एकदा श्रद्धेचा हवाला दिला जातो आणि हा हवाला टिकावा म्हणून वारंवार आम्ही जे सांगत आहोत ते ईश्वराने आम्हाला सांगितलेले आहे किंवा ईश्वराने आमच्या प्रेषिताला किंवा आमच्या ऋषीला सांगितलेले आहे अशा प्रकारचा दावा वारंवार पुढे आणला जातो . मांत्रिकी प्रधान धर्म मग तो धर्म ज्यू असो रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन असो इस्लाम असो किंवा तो धर्म ब्राह्मण धर्म असो किंवा तो धर्म वैष्णव धर्म असो नेहमीच परलोकांतून वा उच्च लोकांतून किंवा थेट देवाकडून आलेल्या प्रेषितांच्या वर किंवा अवतारांच्यावर विश्वास ठेवतो . इतकेच नव्हे तर जे लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांच्या दैवतांना सुद्धा आपल्यात सामावून घेत त्यांना अवतार करतो त्यांचा नवा कल्प व्यवहार तयार करून त्यांच्या नावाची पुराणे रचतो . त्यांच्या वतीने त्यांच्यासाठी लोकांच्यात राबवता येतील असे मंत्र तयार करतो त्यांचीही मांत्रिकी तयार करतो . लोक फसत जातात फसत राहतात ही या मधली सर्वात मोठी शोकांतिका असते. 


प्रश्न असा असतो की या मांत्रिकीला जो विरोध होतो मग तो विरोध मोक्षाच्या पातळीवर होवो किंवा विज्ञानाच्या पातळीवर होवो तो मोडून कसा काढायचा ? यासाठी मग एक तर धर्म युद्ध ही संकल्पना राबवली जाते किंवा बहिष्कार राबवला जातो आणि विरोधकांना पूर्णपणे नष्ट केले जाते किंवा मग आपल्या मांत्रिकी मध्ये बाटवले पाठवले जाते आणि हळूहळू या विरोधकांच्या पुढच्या पिढ्या आपोआपच मांत्रिकीचा पुरस्कार करायला लागतात .


हे करताना कधी कधी यांचा संघर्ष मोक्ष आणि तत्त्वज्ञान यांच्याशी होतो मग करायचे काय तर जी मोक्षिकी असते तिच्यातील सर्व गोष्टी हळूहळू आत्मसात करत त्यांना बदनाम करायचे किंवा त्यांना तात्पुरते सामावून घेऊन पुन्हा एकदा आपला धर्मच आणायचा . अनेकदा आत्मसात करण्यासाठी त्या मोक्षिकी मध्ये घुसायचे त्या धम्मामध्ये घुसायचे आणि त्याला इतके पतित करायचे की तो उभा राहू शकत नाही अशी अवस्था यावी . भारतामध्ये ब्राह्मण लोकांनी हे अनेकदा केलेले आहे म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक आपला रुद्र हा वैदिक देव शिव करून टाकला आणि गणपतीला अत्यंत जाणीवपूर्वक आत्मसात करायला सुरुवात केली त्यासाठी कथा रचल्या गेल्या मग अत्यंत स्ट्रॅटेजिकली ज्याप्रमाणे युरोपमध्ये मूळचे ग्रीकदेव नष्ट करून रोमन देव आणले गेले तसेच काहीसे गणपतीबाबत केले म्हणजे मूळ मनुष्य असलेला गणपती नाहीसा झाला आणि हत्ती पासून तयार झालेला गणपती असा एक नवा गणपती उदयाला आणून तो पूर्णपणे प्रस्थापित केला गेला . हे करताना अत्यंत जाणीवपूर्वक मोक्षामधले हत्ती हे प्रतीक राबवले गेले स्वीकारले गेले . पुढे मग सिंह (हा प्राणी भारतीय आहे की नाही याबद्दल वाद आहे मात्र तो परदेशी असल्यासारखा वापरायला गेलाय) हत्तीला भारी पडतो वगैरे सांगायला सुरुवात केली प्रत्यक्षामध्ये एक हत्ती आणि एक सिंह असा सामना झाला तर हत्ती अक्षरशा सिंहाची वाट लावतो पण तरीही जंगलचा राजा सिंह अशी इमेज केली जाते आणि सगळ्या क्षत्रियांना सिंह व सिंग असे प्रतीक रूप लावले जाते इंद्राला सुद्धा ऐरावत देऊन शेवटी त्या गजेंद्रला मगरीच्या जबड्यात दिले जाते आणि त्याची सुटका तो विष्णू करतो . हत्ती या प्रतीकाची जितकी हेटाळणी करता येईल तितकी करणे चालू होते पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा मग त्या हत्तीला स्वीकारू या असे म्हणत स्वीकारले जाते. सूर्याला घोडे दिले जातात आणि सूर्य हे शिवलिंगाचे पृथ्वीवासी लोकांच्यासाठी सर्वात मुख्य रूप आहे ही संकल्पना शैव मोक्षिकेतून गायब केली जाते . सूर्याचे राम आणि कृष्ण हे दोन शैव प्रकार अवतार म्हणून स्वीकारले जातात . शैव श्रुतीमधील सूर्याचे मुख्य रूप यम हे नाहीसे केले जाते त्याला परलोक देऊन टाकला जातो आणि अनेकदा त्याच्यातला गांभीर्य हा प्रकार नाहीसा केला जातो इतकेच नव्हे तर दक्षिण दिशा बदनाम केली जाते कारण दक्षिण दिशेत यम प्रभावी असतो .


ब्राह्मण ,ज्यू,ख्रिश्चन आणि मुस्लिम हे कसे उच्च आहेत हे वारंवार सांगितले जाते आणि इथले जे स्थानिक शैवलोक आहेत त्यांना तुम्ही कसे खालचे आहात हे सांगितले जाते त्यांच्यासाठी खास वैश्य , शूद्र अतिसुद्र आणि आदिवासी असे वर्ण निर्माण करण्यात येऊन त्यांच्यातले जे धनवान आहेत त्यांना मुद्दाम वैश्य म्हणून" मध्ये" ठेवत दलाला सारखे राबवत जनतेला आपल्या मांत्रिकीच्या कहेत आणत राज्य केले जाते. त्यांनी निर्माण केलेले सर्व उत्पादन आणि त्यांचे श्रम आपल्या ताब्यात ठेवले जाते आणि जातात . पुढे मग वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये कशी फाटा फूट होईल ते पाहिले जाते . जे गुणवान वैश्य आणि शूद्र आहेत त्यांना आपोआपच क्षत्रिय म्हणून स्टॅम्प मारत आपल्यात सामावून घेतले जाते त्याची संपत्ती आपल्या ताब्यात यावी म्हणून राज्याभिषेक सुद्धा केला जातो . हे संस्कार इतके ठसवट ठसवत जातात की शेवटी या नव्याने क्षत्रिय बनलेल्या लोकांना पूर्णपणे क्षत्रिय बनवून टाकून आपल्या मांत्रिकीच्या कह्यात आणले जाते . याचा एक दुष्परिणाम असा होतो की सर्व सत्ताधीश शेवटी मांत्रिकीच्या तालावर नाचायला लागतात. कारण नव्याने प्राप्त झालेली उच्चता ही या लोकांना अतिशय सुखद वाटत राहते आपल्याच लोकांचा विसर पडतो आपण कुठून आलो आहोत याचाही विसर पडतो त्यांच्यामध्ये एक श्रेष्ठत्व गंड निर्माण होतो आणि हा गंड शेवटी त्यांना आपल्या स्वतःच्या माणसांच्या पासून पूर्णपणे तोडतो . ही एक मांत्रिकीची स्ट्रॅटेजी असते तिला सर्वच बळी पडतात कोणीतरी एक शिवाजी महाराज असतात ज्यांना यातले राजकारण कळते आणि ते पुन्हा एकदा शैव राज्याभिषेक करून घेतात आणि शैव होतात बाकी नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेत राहतात परंतु प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचे शहाणपण घेत नाहीत . कोणीतरी एक बसवेश्वर असतो जो पंडित असतो आणि ज्याला हे व्यवस्थित कळते की काय चाललेले आहे तो मग आपली पंडितगिरी सोडत नाही उलट नवा लिंगायत धर्म स्थापन करतो कोणीतरी एक पहिला बाजीराव पेशवा असतो जो थेट आंतरजातीय जाऊ द्या अंतर धर्मीय लग्न करतो कोणीतरी एक गुरुनानक असतो जो आपली शैव श्रुती सोडत नाही उलट काळाच्या नवीन टप्प्यावर तिला नवीन वळण देतो . ओम केंद्रस्थानी आणतो . कोणीतरी एक महात्मा फुले असतो ज्याला हे राजकारण कळलेले असते तो मग बरोबर खंडोबा आणि तुळजाभवानी यांची शैव ताकद ओळखतो आणि वैष्णव अवतारांची आणि हिंदू गणपतीची कठोर मीमांसा करत नव्या काळाची नवी मांडणी करतो साहजिकच मग या सर्व लोकांना कसे काय आत्मसात करता येईल ते पाहिले जाते . लिंगायत धर्म नष्ट करून त्याजागी वीरशैव धर्म कसा येईल ते पाहिले जाते शिवाजी महाराजांच्या कडे असलेली त्यांच्या घराण्याकडे असलेली शिवशाही काढून घेतली जाते आणि पेशवाई आणली जाते . बाजीराव पेशवे यांच्या विरोधात आपोआपच मस्तानी चे प्रकरण मोठ्या प्रमाणात उभे केले जाते आणि त्यांच्या मुलांना युरेशियन बनवले जाते वर्ण जात समर्थक बनवले जाते .महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची इमेज कुठेच उभे राहणार नाही याची काळजी घेतली जाते . अहिल्याबाई होळकर यशवंतराव होळकर यांचे अत्यंत सॉलिड असलेले चरित्र पुढे आणलेच जात नाही 


हे सर्व पद्धतशीर रित्या केले जात असते आणि ते कधीही शैव लोकांना कळत नाही . बहुजन हे कायम अडाणी असल्यासारखेच वावरत राहतात . 


कधी कधी मग साहजिकच मांत्रिकी युती करायला लागते त्यातूनचही मग ब्राह्मण आणि ज्यू यांची युती होते ब्राह्मण आणि ख्रिश्चन यांची युती होते ब्राह्मण आणि मुसलमान यांची युती होते मुसलमान आणि ख्रिश्चन यांची ज्यू आणि ख्रिश्चन यांची युती होते यांच्यामध्ये झालेली धर्म- युद्धे विसरली जातात (ब्रिटिश मुस्लिम लीगशी युती करतात)शेवटी मग साहजिकच धर्मावर्चस्वासाठी पुढे यांच्यातच आपापसात युद्धे होतात म्हणजेच असे की विज्ञान आणि मोक्ष यांच्या विरोधात लढायचे असेल तर आम्ही युती करू नाहीतर मग आम्ही आपापसात लढू .त्यामुळेच मग कोकणस्थ ब्राह्मणांच्या विरोधात उरलेले सगळे ब्राह्मण उभे ठाकतात. ज्यू मुस्लिम आपापसात लढतात 


एकदा काही मोक्षकी आणि विज्ञान यांच्याविरुद्धची युद्धे संपली की मग मांत्रिकीचा लढा दुसऱ्या मांत्रिकीशी होतो आणि प्रश्न निर्माण होतो की या मांत्रिकीला आता कसे काय नष्ट करायचे किंवा कसे आत्मसात करत स्वतःमध्ये विरघळवून घ्यायचे? म्हणजे ब्राह्मणी मांत्रिकी जेव्हा भगत मंत्रीकी पुढे उभी ठाकते तेव्हा काय करायचे ? दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये अनेकदा अशी युद्ध झालेली आहेत. आत्तासुद्धा हाच प्रश्न इस्लाम मुळे निर्माण झालेला आहे .


मला अनेक मुस्लिम लोक असे सांगतात की एकदा सगळीकडे इस्लाम झाला की सर्व जगात शांतता नांदेल पण मी गॅरंटी देतो की असे काही होणार नाही शेवटी मग हे लोक जगभर इस्लाम धर्म आला आणि सर्वच लोक मुस्लिम झाले की मग आपापसात खरा मुसलमान कोण आणि काफीर कोण यावरून आपापसात लढून एकमेकाला नष्ट करणार आहेत कारण लढणे हे या मांत्रिकीमध्येच रुजवले गेलेले असते . 


मांत्रिकी ही अशी संघर्षरत असणारीच व्यवस्था असते कारण ती काल्पनिक आहे ती जर का मोक्षाकडे वळली तरच काही सुधारण्याचे चान्सेस निर्माण होतात जसे काही प्रमाणात का होईना पण ज्यू, रोमन कॅथोलिक आणि इस्लाम यांच्यापेक्षा मोक्ष स्वीकारलेले ब्राह्मण हे थोडेसे माईल्ड होत जातात . मोक्ष स्वीकारलेले सुफी आणि काही ख्रिश्चन्स माइल्ड होत जातात . तसे ते झाले नाहीत आणि त्यांनी मोक्ष स्वीकारलाच नाही की मग मात्र ते अत्यंत आक्रमक युद्धासाठी उभे राहतात आणि संपूर्ण जगभर अशांती स्थापन करत राहतात .


त्यांना यश मिळते कारण जगामधला केऑस आणि डिसऑर्डर कधीच संपत नाही जोपर्यंत या जगामध्ये आसक्ती आणि तिची भूक तृष्णा आणि निकड ही माणसांच्या मध्ये कार्यरत आहे तोपर्यंत हा chaos आणि डिसऑर्डर संपणार नाही सर्वांनी मोक्ष मिळवणे हाच मांत्रिकीवरचा विजय असतो आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा विजय कधीच मिळत नाही अजून तरी मिळालेला नाही आता भविष्यात काही आरटीफिशल इंटेलिजन्स ने चमत्कार केला तर केला! तोपर्यंत तरी मोक्षिकी हा एकमेव उपाय सध्यातरी माणसाच्या हातात आहे . 


श्रीधर तिळवे नाईक 

उपयुक्ततावाद ,व्यवहारवाद आणि सत्य ७ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ का वाढली नाही श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये व्यवहारवादाच्या आधारे आंबेडकर उभे राहिले आणि त्यांनी उत्कृष्ट एप्लीकेशन्स दिली हे मी मागच्या लेखात सांगितले . असं असून सुद्धा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे नेमके असे काय झाले की ती चळवळ बारगळली ?


अलीकडेच संदेश शालिनी संभाजी कर्डक याने आव्हान केले की "आंबेडकर ही सांस्कृतिक चळवळ उभी राहावी असं ज्यांना वाटते त्या सर्वांनी पुन्हा एकत्र येऊन चर्चेला बसुया"


यातली शब्द रचना लक्षात घ्या. उभी राहावी असं तो म्हणतो आहे याचा अर्थ सांस्कृतिक चळवळ आता उभी नाही हे तो मान्य करत आहे . वास्तविक आंबेडकर आणि नंतर दलित पॅंथर यांनी एवढे प्रचंड काम करून ठेवले होते की त्या आधारे प्रश्न यायला हवा होता पण एकंदरच ही पिढी साठोत्तरी आणि 90 उत्तरी लोकांनी काहीच केले नाही असे दाखवत असते कदाचित त्याचा हा आविष्कार असावा . आंबेडकरी संस्कृतिक चळवळ वाढत का नाही ? असा प्रश्न विचारण्याऐवजी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ उभी का नाही असा प्रश्न यावा यामध्येच आपण नेमके कुठे उभे आहोत हे लक्षात आले पाहिजे 


मी सतत आंबेडकर यांचे पुन्हा पुन्हा अत्यंत कठोरपणे निरीक्षण करतो कारण आंबेडकर यांना एकविसाव्या शतकात घेऊन जायचे असेल तर आंबेडकरांना ओलांडावे लागेल असे माझे स्पष्ट मत होते आणि आहे. त्या अंगाने मी परिवर्तनवाद का कोसळला नावाचे पुस्तक साईज विवेचन केलेले आहे ते सौष्ठवच्या अंकात आहे . पण आंबेडकरांच्या वर टीका करणारे काहीही वाचायचेच नाही असे जणू काय या सांस्कृतिक चळवळीतल्या लोकांनी ठरवूनच टाकलेले आहे त्यांना काही झाले तरी आंबेडकरांना देव करायचे आहे आणि देव चुकत नाहीत . त्यांना असे भय आहे की आंबेडकरांना देव केले नाही त्यांना जर का माणुस केले आणि जर का क्रिटिसिजमच्या विशेषता कठोर क्रिटिसिजमच्या क्षेत्रात आणले तर चळवळीचा अख्खा बेसच नाहीसा होईल . जणू काय आंबेडकर ही फार लेचीपेची अशी काहीतरी मांडणी आहे अशी त्यांची धारणा असावी आणि किंवा मग जर अशी धारणा नसेल तर घाबरता कशाला ? मुळातच आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर आपणाला उपयुक्ततावाद आणि व्यवहार वाद या दोन्ही तात्विक विचार प्रणाली व्यवस्थित लक्षात घ्याव्या लागतात दुर्दैवाने आपल्याकडे आंबेडकरांचा विचार करताना उदारमतवादाचाच विचार होतो. आंबेडकरांच्या वर एक प्रभाव उदारमतवादाचा नक्की आहे परंतु त्याचबरोबर त्यांचा जो खरा आधार आहे तो व्यवहारवादाचा प्रागमॅटिझमचा आहे . हे मुळात अमेरिकेचे मुख्य तत्त्वज्ञान आहे आणि आंबेडकरांना अमेरिकेची सर्व ताकद माहिती होती आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या मर्यादा सुद्धा त्यांना व्यवस्थित कळलेल्या होत्या आणि म्हणूनच भारताच्या संदर्भात त्यांनी स्वतःचा व्यवहार वाद विकसित करायला घेतला होता दुर्दैवाने त्यांना आयुष्य लाभले नाही अन्यथा आपल्याला आंबेडकर वादाचे आधुनिक स्वरूप सुद्धा व्यवस्थित दिसले असते . त्यांना हे व्यवस्थित लक्षात आले होते की आपणाला काही झाले तरी प्रथम आपल्या देशाला पुरोगामी केले पाहिजे आणि त्यांनी संविधानाची रचना करताना संपूर्ण संविधान अत्यंत पुरोगामी केलेले आहे . पण त्याचबरोबर हा देश कधी ना कधीतरी पुरोगामी वादाकडून संपूर्णपणे आधुनिकतिकडे जाणार याची त्यांना पूर्ण पूर्व कल्पना होती त्यामुळे त्या संदर्भात जो एक खुला अवकाश सोडणे गरजेचे होते तो अवकाश त्यांनी आपल्या संविधानामध्ये सोडलेला आहे किंबहुना त्यांचा हा व्यवहारवादी उदारमतवाद संविधान लवचिक बनवण्यामध्ये प्रचंड फंक्शनल आहे . अलीकडे संविधानाचे श्रेय काढून घेण्याची जे काय उद्योग चाललेले आहेत त्याला मी नेहमीच ऑब्जेक्शन घेतलेले आहे याचे कारण आंबेडकरांची एक समग्र दृष्टी आपल्याला संविधानामध्ये दिसते तिचा आधार कुठल्याही पुरोगामी चळवळीला प्रथम घ्यावा लागेल आणि मगच आधुनिकेकडे , उत्तर आधुनिकतेकडे आणि चौथ्या नवतेकडे वाटचाल करावी लागेल बसवेश्वर, नानक, शिवाजी,फुले आणि आंबेडकर हे आपले आरंभबिंदू आहेत याचा विसर कोणीच पडू देऊ नये पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की रेषा अनंताकडे जाते आरंभाकडे नाही . ही रेषा पुढे पुढे जाणार हे प्रथम स्वीकारायला हवे . बुद्ध म्हणाला होता की जर का तुम्हाला निर्वाण हवे असेल तर तुम्हाला शेवटी बुद्धाची सुद्धा हत्या करावी लागेल . याचा खरा अर्थ असा आहे की एक वेळ अशी येते की शेवटी तुम्हाला गौतम बुद्धाला सुद्धा ओलांडावे लागते आणि गौतम बुद्धाचे विचार हेच निर्वाणप्राप्ती मधला अडथळा बनून राहतात. गौतम बुद्धाला हे व्यवस्थित माहिती होते . शेवटी प्रत्येक जीव हा अद्वितीय असतो आणि त्याचे बुद्ध बनणेसुद्धा अद्वितीय असते . तुम्ही बुद्धाची कॉपी करून बुद्ध बनू शकत नाही . हीच गोष्ट आंबेडकर वादा बाबत आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची कॉपी करून नवे बाबासाहेब आंबेडकर बनू शकत नाही. आंबेडकर बनण्याचा अर्थ सतत सर्जनशील असणे असा आहे असा मी तरी घेतो . आंबेडकरांनी कधीच महात्मा फुले बनण्याचा प्रयत्न केला नाही ते फक्त आपल्या वर्तमानात कसे परिवर्तन घडवता येईल ते पाहत होते हीच गोष्ट आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा करणे आवश्यक आहे श्रीधर तिळवे नाईकला श्रीधर तिळवे नाईकच बनावे लागेल अन्यथा तो आंबेडकरवादी बनणे शक्य नाही तो फक्त आंबेडकरांची डुप्लिकेट बनेल प्रश्न असा आहे की हे बेसिक गृहीत आंबेडकरवादी चळवळ उभी करू इच्छिणाऱ्या लोकांना मान्य आहे का ?


बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी यामध्ये आहे की त्यांनी आपला काळ हा महात्मा फुले यांचा काळ नाही आणि महात्मा फुले यांची थोरवी यात आहे की त्यांनी आपला काळ हा बसवेश्वरांचा शिवाजी महाराजांचा नाही हे ओळखलेले होते . या लोकांनी आपला काळ नीट ओळखला त्याप्रमाणे आपल्या समाजाची नवीन मांडणी केली आपला समाज कुठल्या दिशेने जायला पाहिजे हे नीट ओळखले आता सुद्धा आपणाला नवीन आलेल्या चौथ्या नवतेची नीट ओळख राहिली तरच आपण टिकू शकतो अन्यथा बाकीचे ओपन समाज इतक्या पुढे गेलेले आहेत की त्यांनी व्यवस्थित देवघेव सुरू केलेली आहे .


व्यवहार वादामध्ये प्रोसेस ही फार महत्त्वाची असते आणि सत्य म्हणजे वास्तवाशी केलेल्या वाटाघाटी असतात बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या काळात असलेल्या समाजाशी वाटाघाटी करण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट होते त्या काळामध्ये गांधी आणि आंबेडकर हे दोघं दोनच नेते असे होते ज्यांना या वाटाघाटी नीट जमत होत्या म्हणूनच त्यांचा समाजावर प्रचंड प्रभाव पडला बाकीचे नेते मात्र आजूबाजूला हिंडत राहिले पण वाटाघाटी करणे त्यांना जमले नाही किंबहुना भारतामध्ये साम्यवाद अंतिमतः अयशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण तो इथल्या समाजाशी वाटाघाटी करण्यामध्ये कमी पडला

. आंबेडकरांना साम्यवादी लोकांच्या पेक्षा भारतीय समाज अधिक कळला होता हीच तर त्यांची विशेषता आहे .


पुढच्या काळात ज्या वेळेला रशियातला मार्क्सवाद कोसळत होता त्यावेळेला त्या काळाला समकालीन असणारे आंबेडकरवादी हे चक्क मार्क्सवादाशी लेनिनवादाशी वाटाघाटी करत होते याचा परिणाम व्हायचा तोच झाला मार्क्सवाद तर कोसळलाच पण मार्क्सवादाबरोबर आंबेडकरवाद सुद्धा कोसळला . मी याला तयार नव्हतो पण ऐकतोय कोण ? 


रावसाहेब कसबे यांच्यापासून शरद पाटील यांच्यापर्यंत अनेक जण कोसळत गेले याचे सर्वात मोठे कारण त्यांची डाव्या विचाराशी असलेली बांधिलकी होती . प्रत्यक्षात आंबेडकर स्वतः बुद्धाला फॉलो करत भारताचे समाजकारण हे नेहमी सुवर्ण मध्ये साधत असते हे ओळखून मध्य काढत होते तो मध्य आपणाला संविधानामध्ये सुद्धा सापडतो . इंदिरा गांधींच्या काळात हा मध्य पुन्हा डावा झाला तेव्हाच खरे तर दलित चळवळीला आंबेडकरवादी चळवळीला बदलण्याचा चान्स होता परंतु झाले उलटे नामदेव ढसाळ सारख्या लोकांनी इंदिरा गांधींच्या बरोबर युती केली प्रियदर्शनी नावाची कविता सुद्धा लिहिली जेव्हा जाग आली तेव्हा मग हिंदुत्ववादाचा रस्ता पकडला . पण तोपर्यंत उशीर झाला होता . त्यांना समजून घेणे दूर उलट त्यांच्यावरच बहिष्कार टाकला गेला . पण मुळात नामदेव ढसाळ यांच्या लक्षात आले नाही की खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच एक इंदिरा गांधी लपलेली आहे आणि ती उजव्या विचाराची आहे. मुळात आर्थिक धोरण काय असा प्रश्न आपण आज सुद्धा शिवसेनेला विचारला तर उत्तरे सापडत नाहीत . माझे भाऊ कळत नकळत शिवसेना वादी होते पण आर्थिक धोरण काय असा प्रश्न विचारले की त्यांच्याकडे उत्तर नसायचे कारण बाळासाहेब ठाकरे हे आर्थिक धोरणाबाबत कधीच स्पष्ट नव्हते एक प्रकारचा उपयुक्ततावाद त्यांच्या ठायी नांदत होता जो सावरकरांच्या सारखाच होता. सावरकर सुद्धा आर्थिक धोरणाबाबत काहीच भूमिका घ्यायचे नाहीत जर हिंदुत्वाला समाजवादी धोरण पूरक ठरणार असेल तर ते समाजवादी झाले असते. प्रत्यक्षामध्ये हिंदुत्ववादाचा कल कळत नकळत उजवाच राहतो . प्रश्न असा आहे की तो मध्यभागी कसा आणता येईल किंवा मग त्याच्या विरोधात ठाम उभे राहून पर्याय कसा उभा करता येईल ? तुम्ही जर का डावा पर्याय आणणार असाल तर तो आता आऊट डेटेड झालेला आहे आणखी काही वर्षात कदाचित उजवा पर्याय सुद्धा कालबाह्य होईल असा माझा अंदाज आहे . शेवटी सर्वांना सुवर्ण मध्यात यावे लागते तो सुवर्णमध्ये हिंदुत्ववाद काढणार आहे की नाही हा खरा हिंदुत्ववादा पुढचा प्रश्न आहे पण हा प्रश्न केवळ हिंदुत्ववादा पुढचा नाही तो पुढे जाऊन 21 व्या शतकातल्या आंबेडकर वादा बाबत सुद्धा उपस्थित होणार आहे . 


आंबेडकरांनी धार्मिक पातळीवर या देशाला ओळखून नव्याने बौद्ध धम्माला निर्माण केले त्यांना वाटले होते की ही दिशा बरोबर आहे आणि म्हणूनच मग संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती आज अवस्था अशी आहे की खुद्द पूर्वाश्रमीच्या महार असलेल्या त्यांच्या स्वतःच्या समाजात 100% लोक बौद्ध झालेले नाहीत उलट जवळजवळ 75 टक्के लोक स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला लागले आहेत हा बदल आहे . यातच आता भर पडणार आहे ती तुम्ही धर्म बदलला असाल तर आम्ही तुम्हाला राखीव जागा देणार नाही या नव्या धोरणाची ! सध्या याबाबतीत काहीशी विचित्र भूमिका आहे कारण महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीच्या महारांची संख्या प्रचंड आहे आणि मतदानाच्या पातळीवर ती डावलायची की नाही असा भाजपला प्रश्न पडला आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशामध्ये मुसलमान मते बाजूला केली गेली त्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महारांची मते साईडलाईन केली तर यश मिळेल की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. एक गोष्ट मात्र आता स्पष्ट दिसते आहे ती म्हणजे पूर्वाश्रमीचे महारेतर समाज बौद्ध व्हायला फारसे तयार नाहीत. किंबहुना मायावतींची जी वाताहात झाली त्याला कारण त्यांचे टोकाचे बौद्ध धोरण जे त्यांच्या स्वतःच्या समाजाने स्वीकारायला नकार दिला . वस्तुस्थिती अशी आहे की धम्मांतराची त्याच्या वेगाची जी कल्पना आंबेडकरांनी केली होती तो वेग अतिशय मंद झालेला आहे. उलट मी सध्या जे पाहतो ते असे की हा समुदाय अधिकाधिक हिंदुत्ववादाच्या जवळ येत चाललेला आहे. अशा वेळेला त्याला युरेशियन स्मृतीमध्ये ढकलायचे की अनार्य शैव श्रुतीमध्ये ढकलायचा असा हा प्रश्न आहे. या प्रश्नांना बगल देऊन पुन्हा आंबेडकरवादी चळवळ उभी करणार असाल तर ती पुन्हा एकदा अपयशीच होईल . मी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे की बुद्धाच्या केंद्रस्थानी निर्वाण आहे . किंबहुना धम्म हा मुळातच निर्वाण केंद्री असतो आणि तिथेच तो धर्मापेक्षा वेगळा होतो . बुद्धाच्या भाषेत धम्म ही निर्वाणासाठी देण्यात आलेली शिस्त आहे आणि तो शास्ता आहे. शैव धम्माच्या भाषेत हे अनुशासन आहे आणि तेच मोक्षासाठी अत्यंत आवश्यक असते मोक्षासाठी धर्माचा काडीचाही उपयोग नाही . आणि मुख्य विचार हा असला पाहिजे . शैव , जैन आणि बौद्ध हे मुळातच धम्म आहेत शिस्त आहेत अनुशासन आहेत . त्यांचा धर्म बनवण्याचा प्रयत्न वारंवार झालेला दिसतो आणि अनेकदा लोक याला बळी पडताना दिसतात प्रश्न असा आहे की हे वाचवायचे कसे ? धम्म ही जीवनशैली आहे . ती वाचवायची कशी ? मुख्य म्हणजे एकदा का तुम्ही आंबेडकरांचे कर्मकांड केले की मग ही जीवनशैली वाचवण्याचे सर्व चान्सेस नाहीसे होत जातात. कुठलेही कर्मकांड शेवटी धर्मकांड तयार करते आणि एकदा का धर्मकांड तयार झाले की धम्म नाहीसा होत त्याचे धर्मात रूपांतर होते .


आज अवस्था अशी आहे की शैव , जैन आणि बौद्ध हे तीनच्या तीन धम्म वेगवेगळ्या दिशेने फुटलेले आहेत यातला सर्वात शॉकिंग धम्म हा जैन धम्म आहे कारण माहित नाही कसं पण तो आठव्या शतकापासून सातत्याने वैदिक होत चाललेला आहे . एकेकाळी त्यांची व शैव धम्माची स्पर्धा होती आणि नंतर बौद्ध धम्माशी स्पर्धा सुरू झाली होती आणि त्यामुळेच मतभेद झाले ही वस्तुस्थिती! पण याचा फायदा कोणाला मिळाला तर तो ब्राह्मण धर्माला मिळालेला दिसतो. "पेरिय पुराणम '' सारख्या ग्रंथांच्या मध्ये याचे प्रचंड प्रतिबिंब दिसते म्हणजेच आपापसात लढून या सर्व धम्मानी ब्राह्मण धर्माची वाट मोकळी केली यामध्ये बौद्ध तर नाहीसे झाले आणि जैन चक्क वैदिक झाले. कधी कधी तर वर्ण जाती व्यवस्थेचे कट्टर समर्थक झाले . आदीपुराण या जिनसेन यांनी लिहिलेल्या जैनपुराणांमध्ये त्यामुळेच वर्ण व्यवस्थेचे समर्थन आलेले दिसते. कल्पसूत्र सारख्या सतत वाचल्या जाणाऱ्या जैन ग्रंथामध्ये तीर्थंकर कधीही खालच्या जातीत किंवा ब्राह्मण जातीत जन्म घेत नाहीत असा सिद्धांत मांडण्यात आला .ते फक्त क्षत्रिय वर्णांमध्ये जन्म घेतात असाही सिद्धांत आला . पुढे पुढे तर महावीर यांचा जन्म ब्राह्मण घरी होणार होता परंतु नंतर तो क्षत्रिय गर्भामध्ये शिफ्ट झाला अशा प्रकारचा सिद्धांत आला इतका हा ब्राह्मण आणि जैन धर्मा मधला वाद टोकाला गेला याचा उलटा परिणाम पण झाला. मदुराई मध्ये जवळजवळ आठ हजार जैन साधूंना सुळावर चढवले गेले . हिला केवळ स्थानिक प्रतिक्रिया म्हणता येईल का हा एक फार मोठा प्रश्न आहे. प्रथम राजांना वापरून जैन लोकांनी बौद्ध मंदिरे आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली तिथून याची सुरुवात आहे. पुढे मग हळूहळू ब्राह्मण आणि जैन यांची युती होत गेली आणि कर्नाटकामध्ये जैन ब्राह्मण नावाची एक नवीन जातच तयार आहे . आता अवस्था अशी आहे की आज 21 व्या शतकात ही युती स्पष्टपणे प्रबळ झालेली दिसते.


म्हणजेच आपणाला दिसते असे की जैन ब्राह्मणधर्मा विरुद्ध होते हा इतिहास झाला आणि ते आता युतीत आलेत हे वर्तमान आहे 


आता दुसरा जो बौद्ध धम्म आहे त्याकडे वळले तर काय दिसते ?बौद्ध धम्मप्रसार जवळजवळ थांबलेला आहे . त्याची गती अतिशय मंद आहे . तुम्ही जर का फक्त चिवट आशावादी असाल तरच आता याबाबतीत पॉझिटिव्ह राहू शकता अन्यथा पॉझिटिव्ह राहणे अवघड आहे .


मग शेवटी शैव धम्म उरतो आणि 2010 नंतर घडलेली सर्वात मोठी घडामोड हीच होती की अचानक शैव धम्म हा हिंदुत्ववादाच्या दिशेने सरकायला सुरुवात झाली . पुरोगामी शैव धम्मा बाबत प्रचंड उदासीन राहिले अपवाद कदाचित गौरी लंकेश वगैरे लोकांची झालेली हत्या पण त्यावेळी सुद्धा प्रतिक्रिया मार्क्सवादी फॉर्म मध्ये दिल्या गेल्या आणि आज त्यांना त्याचीच किंमत मोजावी लागतीये . 


तेव्हा आंबेडकरवादी चळवळ उभी करताना जे पूर्वाश्रमीचे महार हळूहळू आता शैव झालेले आहेत आणि ज्यांची नवशैव बनण्याची प्रोसेस सुरू आहे त्यांना सामावून घेणार आहात की ही चळवळ फक्त नवबौद्धांची होणार आहे ? तुमचा व्यवहार काय आहे हे तुम्ही स्पष्ट करणार आहे की नाही ? 


आंबेडकरवादी चळवळ अयशस्वी फेल होण्याचे सर्वात मोठे कारण ही चळवळ कळत नकळत फक्त पूर्वाश्रमीच्या महारांची बनून गेली . यावर उपाय एकच आहे तो म्हणजे काही झाले तरी दर वेळेला एक अध्यक्ष शैवधर्मी बीसी वा ओबीसी असावा एक पूर्णपणे अस्पृश्य प्रवर्गाच्या बाहेरचा असावा आणि एक नवबौद्ध असावा म्हणजेच काहीतरी नीट होत राहील अन्यथा नवसंघटन होणे शक्य नाही . आंबेडकर आमच्या समाजात जन्मले म्हणून तुम्ही आमच्या मागे या ह्या लॉजिकला आता अर्थ उरलेला नाही . तुमची स्वतःची वर्तमानकालीन योग्यता आणि पात्रता काय आहे हे तुम्हाला आता सिद्ध करावे लागेल . कारण जे नव बौद्ध झालेले नाहीत ते आता जागृत झालेले आहेत तुम्ही फक्त ते कसे अडाणी आणि अज्ञानी आहेत हे सांगत बसाल तर हे लोक आता हे खपवून घ्यायला तयार नाहीत . केवळ नव बौद्ध झाले नाहीत हे अडाणीपणाचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही . तुम्ही तसे ठरवाल पण तसे प्रत्यक्षात नाहीये . जे नव बौद्ध झाले नाहीत त्यांचाही काही विचार आहे . त्यांनाही काही डोके आहे यावर जरा विश्वास ठेवायला हवा . चळवळी ह्या एकमेकांच्या बद्दल विश्वास निर्माण करत वाढत असतात हा विश्वास निर्माण करण्यामध्ये पूर्वीच्या सर्व आंबेडकरवादी नेतृत्वांना अपयश आलेले आहे . वास्तविक ज्या वेगाने आंबेडकरांनी यश मिळवले होते ते दैदीप्यमान होते पण पुढे हा वेग शाबूत ठेवण्यामध्ये अपयश आले त्या अपयशाची अत्यंत कठोर मीमांसा आंबेडकर वादाला आज ना उद्या करावी लागेल . मुख्य म्हणजे आंबेडकर ज्या समाजात जन्मले त्याच समाजाला सगळी अक्कल दिलेली आहे असे समजण्याचे कारण नाही इतर बीसी प्रवर्गातले समाज आणि ओबीसी प्रवर्ग असलेल्या समाजांना आणि लोकांना सुद्धा अक्कल आणि व्यवहारिक अक्कल दिलेली आहे हे स्पष्ट स्वीकारावे लागेल .


कुठल्याही परिवर्तनवादी चळवळीपुढे दोन पर्याय असतात. यांच्यापैकी एक पर्याय निवडावा लागतो पहिला पर्याय हा नेहमीच विरोध करण्याचा असतो आणि दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष त्या प्रस्थापितेमध्ये जाऊन ती प्रस्थापितता संपूर्ण बदलण्याचा असतो . नामदेव ढसाळ आणि रामदास आठवले यांनी दुसरा पर्याय निवडला कारण सद्यकालीन स्थितीमध्ये त्यांना तो योग्य वाटला या दोघांच्या पैकी कोणीही ओबीसी समाजाशी नाते का जोडू शकला नाही असा प्रश्न नक्की निर्माण करावा पण त्याचबरोबर या लोकांनी जो दुसरा पर्याय निवडला तो जर का तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तो का योग्य नाही त्याचेही विश्लेषण झाले पाहिजे . 


थोडक्यात काय आंबेडकर वादाचा व्यवहार हा १९८० नंतर पूर्णपणे फ्लॉप झालेला व्यवहार आहे आणि त्याची मीमांसा व्यवहारवादाच्या आधारे झाली पाहिजे किंवा मग निदान व्यवहाराच्या आधारे झाली पाहिजे . 


अर्थात पुन्हा एकदा नाहीतर भारताच्या सामाजिक वाळवंटामध्ये नवीन काहीच घडत नाहीये कोणी घडवत नाहीये असे गृहीत धरण्याचा आणि शहामृग होण्याचा पर्याय उपलब्ध आहेच 


श्रीधर तिळवे नाईक

उपयुक्ततावाद व्यवहार वाद उत्तर व्यवहार वाद आणि जालव्यवहार वाद १०


आपण अनेक पेपरमध्ये हळूहळू व्यवहार वाद अशी गोष्ट समजून घेतो आहे आणि त्याचबरोबर त्याच्या नवीन काही दिशा शोधतो आहोत. आपण हे पाहतो आहोत की ज्ञानाची नवता आणि ज्ञानाची जूनता यांचा आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो आता आपण आता मूलभूत गोष्टीवर चर्चा करू. माणसाचे जीवन हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असते असा प्रश्न जर का आपण मोक्षवादी लोकांना विचारला तर त्याचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर मोक्षकी देते ते म्हणजे प्राण आणि प्राणायाम ! मी हे खूपदा सांगितलेले आहे की भगवान शंकर ही कदाचित पहिली अशी व्यक्ती होती की जिने माणसाचे प्राणी असणे माणसाचे पशु असणे अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आणि ठामपणाने स्वीकारले कुठलाही परलोकाचा अलौकिक मुलामा दिला नाही आणि त्याचबरोबर हा प्राणी मोक्ष अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो हेही त्यांनी स्वतःच्या जीवनशैली मधून सिद्ध केले . त्यामुळेच पशुपतिनाथ हे नाव त्यांनी अभिमानाने मिरवले . हेच नाव पुढे शिव ह्या तत्वालाही दिले आणि एक नवीन तत्त्वज्ञान पशुपती या आपल्या शिष्याला दिले जो मूळचा बहुदा नेपाळी असावा किंवा पंजाबी ! हेच तत्त्वज्ञान पुढे पाशुपत दर्शनाच्या द्वारे मोक्ष मिळालेल्या नकुलिश यांनी नव्याने सादर केले आणि त्यातूनच पुढे पाशुपत दर्शन आणि पाशुपत धर्म यांचा उदय झाला आणि यातूनच लोकशैवधर्म भारतामध्ये प्रचलित झाले ज्यातील एक नाथधर्म सुद्धा होता ज्यातून पुढे जैन धर्म उदयाला आला आणि जैन धर्मामुळेच बौद्ध धर्म सुद्धा उदयाला आला आणि पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांच्यामुळे नवनाथ धर्म पुन्हा उदयाला आला . याच पाशुपत धर्मामधून पुढे बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली . आणि एक पुरोगामी नवा धर्म कसा स्थापन करता येतो तो कसा विज्ञानाशी आणि कायकशी जोडता येतो आणि शिवकल्याणाशी जोडता येतो हे नव्याने सादर केले या सगळ्या प्रवाहांच्या मध्ये आपण एक गोष्ट कॉमन बघू शकतो आणि ती कॉमन गोष्ट म्हणजे प्राण आणि प्राणायाम होय . आज विज्ञानामध्ये सुद्धा प्राणवायूचे ऑक्सिजनचे असलेले महत्त्व सर्वांना माहिती आहे म्हणूनच त्यासंदर्भातच आता आपण काही चर्चा करतो आहे .


आमच्या पिढीमध्ये ज्या काही नवीन ज्ञानाच्या लाटा आल्या त्यामधल्या काही महत्त्वाच्या लाटा या ऑक्सिजन संदर्भात होत्या . जवळजवळ सर्व उत्तर आधुनिकता आणि आधुनिकता यांचा यावर विश्वास होता की ऑक्सिजन हाच प्राण जिवंत ठेवणारा आहे पण पुढे असे लक्षात आले की पृथ्वीवर ऑक्सिजनपूर्वी सुद्धा जीवन अस्तित्वात होते . इतकेच नव्हे तर अंतराळामध्ये गेलेल्या गोष्टींच्याद्वारे हळूहळू हेही स्पष्ट होत आहे की अंतराळामध्ये ऑक्सिजन नसून सुद्धा काही प्रमाणात का होईना पण अतिशय सूक्ष्म पद्धतीची अशी जीवसृष्टी अस्तित्वात आहे . याचा अर्थ स्पष्ट होता प्राण फक्त प्राणवायूमुळे नव्हता तर इतरही वायूंच्यामुळे अस्तित्वात होता आणि म्हणून ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणणे बरोबर नाही पुढे आणखी लक्षात आले की पृथ्वीवर एक कालखंड असाही होऊन गेलेला आहे ज्यावेळी ऑक्सिजन शिवाय एक जीवसृष्टी अस्तित्वात होती . ग्रेट ऑक्सिडेशन एक्सिटस्टींशन होण्यापूर्वी ऑक्सिजनने कोणी जगत नव्हते उलट ऑक्सिजन निर्माण झाला सायनो बॅक्टेरिया मुळे आणि ऑक्सिजन शिवाय जगणारे सर्वजण मारले गेले म्हणजेच ऑक्सिजन जिवंत जीवन देणारा होण्याआधी किलर होता आणि हे सत्य काहीसे धक्कादायक आहे पण मग लक्षात येते की जी गोष्ट जगवते तीच मारणारी ही असू शकते . जीवन आणि मृत्यू हे असे एकत्र जोडलेले असतात पुढे पुन्हा दुसरी गोष्ट अशी घडली की खुद्द पृथ्वी मध्ये पृथ्वीवर जिथे ऑक्सिजन पोहोचत नव्हता तिथे सुद्धा जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे आता लक्षात आलेले आहे आणि आत्ता या क्षणी ते अस्तित्वात आहे . ही अतिशय प्राथमिक अवस्था असेल पण आहे परंतु इतरत्र तिथे जे काही वायू आहेत त्यांच्या आधारे एखादी प्रगत वायूसृष्टी प्रगत जीवसृष्टी असू शकते त्यामुळे मुद्दा आता असा आहे की ऑक्सिजन हाच तुमच्या जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी असेलच याची खात्री नाही माझ्या मनामध्ये ऑक्सिजन बद्दल आदर आहे आणि मी त्यावर कविताही लिहिली आहे परंतु मला हेही माहिती आहे की मी माणूस म्हणून होमो सोपियन म्हणून ऑक्सिजनमुळे अस्तित्वात आहे याचा अर्थ संपूर्ण जीवसृष्टी तशी आहे असा नाही होत .


या अंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात कारण ज्ञान हे कायम नवीन जेव्हा येते तेव्हा त्याचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न असतो पुन्हा तंत्रज्ञान निर्माण होते म्हणजे आता असे समजा की आपण जर का असे फुफ्फुस तयार केले जे प्राणवायू बरोबर कार्बन डाय-ऑक्साइड सुद्धा शोषून घेईल आणि त्या कार्बनडाय-ऑक्साइडच्या आधारे पण जर आपला मेंदू आणि जीव जगू शकेल तर मग पर्यावरणाचा संपूर्ण प्रश्नच बदलून जातो आणि हा जो तंत्रज्ञान शाखेचा पॉसिबिलिटी ग्राफ असतो तो फार वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतो. आता आपण अशा प्रकारचे फुफ्फुस जे आरटीफिशियल असेल तयार करू शकतो का ते माणसाला बसवू शकतो का शकू का आणि समजा एखाद्या चिप्स सारखे ते बसवता आले फुफ्फुसात तर आपण मग कार्बनडायऑक्साईड आणि ऑक्सिजन अशा दोन्ही वायूंच्यामुळे जगू शकू म्हणजे समजा इमर्जन्सी मध्ये आणीबाणी मध्ये आपणाला ऑक्सिजन कमी पडत असेल तर आपण कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे चीप किंवा कृत्रिम फुफ्फुस ऑन करायचे तर अशा जेव्हा शक्यता निर्माण होत जातात तेव्हा तुमचा व्यवहार बदलत जातो ऑक्सिजनच्या वापराबाबत तुम्ही अधिक संवेदनशील होता आणि ज्याच्या आधारे प्राणायाम हवा आहे तो प्राणायाम म्हणजे फक्त ऑक्सिजनचा आयाम नाही तर इतर कुठल्याही वायूचा आयाम होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात यायला लागते तुमची प्राणवायू या शब्दाची व्याख्या बदलते कारण आता कुठलाही वायू प्राणवायू बनू शकतो .आता हे प्रश्न काही जे कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश्यांना पडणे शक्य नाही पण मला ते पडले याचे कारण साधना करताना मग आणखीन काही शक्यता दिसायला लागल्या. सर्वसाधारणपणे शरीर तंत्रामधल्या (इतर तंत्रांनी मोक्ष साधू इच्छिणाऱ्या साधकांनी या भानगडीत पडू नये )प्राणायाम करताना एक गोष्ट तुम्ही मूलभूत शिकता ती म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या दरम्यान जो एक क्षण असतो त्यात मृत्यू असतो आणि हा मृत्यू जर का तुम्ही अधिकाधिक लांबवत नेला तर तुमच्या मोक्षाच्या शक्यता अधिकाधिक वाढत जातात . आणि याचे कारण असे असते की संपूर्ण मेंदूच प्राणायामाची निगडित असल्यामुळे जर का त्याला अचानक तुम्ही मृत्यूची सवय लावायला लागला की तो मृत्यू झाला मोक्ष बनत जातो परंतु त्याचबरोबर ही प्रोसेस फक्त सेपियन ला लागू आहे की इतर प्राण्यांना ही लागू आहे असा प्रश्न निर्माण होतो .त्यामुळे इतर प्राण्यांच्या बाबतीत किंवा वनस्पतींच्या बाबतीत मोक्षाची शक्यता काय असू शकते याच्या नवीन चाचपण्या करण्याची चाचण्या करण्याची गरज निर्माण होते विशेषतः मोक्षाच्या संदर्भामध्ये हे शक्य होते उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा वनस्पतींच्या संदर्भात मोक्षाचा प्रश्न येतो तेव्हा वनस्पती या कार्बनडायऑक्साईडच्या साह्याने सुद्धा प्राणायाम साधत असतील कारण प्राण त्यांच्यात पण असतो परंतु तो प्राण कार्बनडायऑक्साइडच्या आधारे चाललेला आहे आपल्या शेजारचे हे उदाहरण आहे परंतु ते आपल्याला आधी कळत नाही आणि इथेच आपल्या ज्ञानाच्या सर्व मर्यादा दिसतात आणि आपल्यावर ज्ञानाचे होणारे संस्कार आपल्याला कसे जवळची गोष्ट बघू देत नाहीत तेही कळते. अनेकदा मी बघितलेले आहे की प्राणायाम करणाऱ्या राजयोगी माणसाला दोन श्वासांच्या मधला हा मृत्यू हा कणा आहे हेच कळत नाही . त्यामुळेच शिव जेव्हा म्हणतो की मी मृत्यू आहे तेव्हा त्याचा अर्थ काय आहे हे कळायला हवा. आपल्याकडचा ब्राह्मण लोकांचा मूर्खपणा इतका आहे की त्यांनी काय शिव म्हणतो आहे ते लक्षातच घेतले नाही आणि त्याला मृत्यूचा देव करून टाकला संहाराचा प्रलयाचा देव करून टाकला. शैव श्रुती काय आहे हे माहीत नसले की अडाणीपणाने काय काय गोष्टी होतात याचे हे एक फक्त उदाहरण आहे असा अडाणीपणा कुठे कुठे युरेशियन श्रुतीमध्ये आहे त्याची अजून कल्पना सुद्धा भारतीयांना आलेली नाही ते आपले युरेशियन श्रुतीमध्ये गायन करत बसले आहेत करत आहेत परंतु यामुळे कधी कधी फार गोंधळ निर्माण झालेला असतो . एकदा का तुम्ही त्या मृत्यूला स्पर्श करून आला की तुम्हाला वर्ण जात व्यवस्था सुचत नाही कारण तुम्हाला एकच गोष्ट माहिती असते ती म्हणजे आपण सर्व प्राणी आहोत प्राण हा आपला प्राण आहे आणि होमोसेपियन म्हणून फक्त आपल्यामध्येच अशा प्राणायाम द्वारा मोक्षाची शक्यता आहे इतरांच्या मध्ये असलेली मोक्षाची शक्यता काय आहे हे आपणाला कधीही कळू शकत नाही किंवा आता कळाले तरी आपल्याला हा आरंभ आहे हे लक्षात घ्यावे लागते 


तुम्ही म्हणाल हे तुम्ही आता का सांगता आहात याचे कारण स्पष्ट आहे की व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद यांना या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांचा विचार आता नव्या व्यवहारवादामध्ये ज्याला मी जालव्यवहारवाद Netpragmatism म्हणतो करायला लागतो आणि मला हे सांगायचे आहे की प्राण ही मूलभूत गोष्टच आपण जर का चर्चेला घेतली तर व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद यांना माहीत नसलेला अनेक प्रकारच्या ज्ञानांचा जो अव्याप्त प्रकाश आहे जो आधीच्या लोकांना माहीत नव्हता त्याला आपणाला आता भेटावे लागते आणि त्याला आपणाला असे म्हणावे लागते की बाबा धन्यवाद तू व्यवहार वाद आणलास किंवा आणलीस पण आता हा नवाव्यवहार आहे हा जाल व्यवहार वाद आहे ही पुढची स्टेप आहे हे जर का आपणाला कळले नाही तर मग काहीच कळले नाही 


चौथी नवता ही या जालव्यवहारवादाला धरून असते ती आस्थापन वाद , व्यवस्थापन वाद , उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद या सर्वांना सामावून घेत पुढे सरकते 


श्रीधर तिळवे नाईक

सत्य व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद भाग ११ माया आणि व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 

आपण सध्या व्यवहाराची चर्चा करत आहोत आणि त्या अंगाने व्यवहारवादाची ! सर्वसाधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यांची दखल व्यवहार वादाला घ्यावी लागली. इंग्लंड मध्ये या काळामध्ये लॉजिकल पॉझिटिव्हिजम ही एक फार मोठी वैचारिक चळवळ होती तिचा आधार इंद्रिय वाद आणि इंद्रियप्रामाण्यवाद होता ज्याची पहिली मांडणी फ्रान्सिस बेकन यांनी केली होती. तर दुसऱ्या बाजूला हेगेलचा विश्वचैतन्यवाद प्रभावित करत होता ज्याची मांडणी बुद्धी प्रामाण्यवाद व भाव प्रामाण्यवाद त्यांच्यावर उभ्या राहिलेल्या हेगेल कडूनच आली होती एका अर्थाने आपल्याला येणारा अनुभव हा इंद्रियांच्यामुळे येतो की आपल्या मनामुळे येतो हा मूलभूतच प्रश्न होता . गणिताचे ज्ञान हे अमूर्त असल्याने साहजिकच ज्यांना गणित कळायचे ते सर्व लोक या काळामध्ये चैतन्य प्रामाण्यवादी होते 

आपल्याकडे मात्र शैव लोकांची माया ही संज्ञा फार लोकप्रिय झालेली आहे मायेचा साधा सरळ अर्थ मांची म्हणजे आईची काया असा होतो पण नंतर याला अनेक मिती प्राप्त झाल्या . पुढे पुढे तर पुरोहित वर्गाने( यात ब्राह्मण आणि गुरव दोघेही येतात) याचा अर्थ भ्रामक असा केला . त्याचे भारतावर अनेक दुष्परिणाम झाले मुख्य म्हणजे या संसाराकडे पाठ करणे हेच मोक्ष मिळवण्याचे साधन ठरले यातून मोक्ष तर मिळाला नाहीच परंतु संसार पण हातातून गेला .

धर्माचा आणि या मायेचा काही संबंध असतो का हा या काळातला सर्वात मोठा प्रश्न आणि त्याचे उत्तर मनप्रामाण्यवादी लोक "नाही" असे देत होते त्यांच्या मते धर्म ही माणसाची मानवी ज्ञानाची निर्मिती आहे त्यामुळे अनुभवाच्या आधारे किंवा इंद्रियांच्या आधारे धर्माची चर्चा करता येणार नाही . प्रश्न असा आहे की धर्म ही जर का एक मानवी संकल्पना असेल तर मग तिची उपयुक्तता काय? की तिचीही उपयुक्तता आपल्याला मनाचे समाधान करणारी गोष्ट अशा तऱ्हेने सिद्ध करावी लागेल ? उपयुक्ततावादाने आणि नंतर व्यवहार वादाने जवळजवळ हीच भूमिका घेतलेली दिसते . यातून पुढे निर्माण होणारे प्रश्न असे आहेत की जर का धर्म ही मनाची गोष्ट असेल तर मग मनाच्या बाहेर असणाऱ्या मायेमध्ये धर्माच्या नावाने व्यवस्था का असावी ? मंदिरे का असावीत ? पुरोहित कशाला हवेत ? आपण मग देवाला नैवेद्य का दाखवावा कारण देव तर तो खाणार नाही आणि देवही मनोनिर्मित गोष्ट असल्यामुळे कधीही नैवेद्य पुढेही खाल्ला जाणार नाही . मग करायचे काय ? तर मी देवाला दाखवलेला नैवेद्य माझ्या मनाला शांती देतो एवढीच उपयुक्तता त्या नैवेद्याची राहते . अर्थात त्यासाठी नैवेद्याला पावित्र्य प्राप्त होणे अत्यंत आवश्यक असते आणि त्यासाठी नैवेद्य सुंदर दिसावा लागतो म्हणजेच धर्मामध्ये सौंदर्य आणि पावित्र्य या दोन गोष्टींचे महत्त्व आहे याचा एक दुष्परिणाम असा होतो की सौंदर्याच्या कसोट्या (उदाहरणार्थ ब्राह्मण पुरोहितांनी तरी स्त्री सौंदर्याचा ठरवलेला गोरा रंग) हा पुरोहित वर्ग ठरवायला लागतो त्याचबरोबर नैवेद्याची पावित्र्यता ही ही पुरोहित वर्ग ठरवायला लागतो सर्वसाधारणपणे शैव-धर्मामध्ये अनेकदा नैवेद्य हा मांसाहारी सुद्धा चालत असल्याने साहजिकच ज्या धर्मांच्या पुरोहित वर्गामध्ये /ने नैवेद्य हा शाकाहारी असला पाहिजे असे ठरवलेले आहे त्यांच्याशी संघर्ष अटळ होतो . इथे मांसाहारी नैवेद्य हा पवित्र आहे की नाही हा वाद आहे . भारतामध्ये प्रथम महावीर यांनी मांसाहारी नैवेद्याला नकार द्यायला सुरुवात केली . हा विचार त्यांच्या अहिंसा या तत्त्वातूनच आलेला आहे याचे कारण असे की मांसाहार हा हिंसा करूनच निर्माण झालेला असतो आणि अशी हिंसा करून निर्माण झालेला नैवेद्य हा पवित्र कसा काय असू शकतो असा प्रश्न अहिंसावाद स्वीकारल्याने जैन लोकांच्या मध्ये निर्माण होतो अगदी मुस्लिम समाजामध्ये बकरी ईदला बकरी ही पवित्र असते असेच मानले जाते . जिथे सर्वसाधारणपणे शाकाहार हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतो उदाहरणार्थ वाळवंट तिथे मांसाहार हाच मुख्य आहार असल्याने देवाला सुद्धा तोच दाखवला जाणे अटळ असते . प्रश्न असा येतो जेव्हा तुम्ही भारतासारख्या शाखाहार प्रचंड उपलब्ध असलेल्या देशांमध्ये येता तिथे आहाराचे तत्त्वज्ञान बदलणार आहात का? तर ते बदलले जात नाही साहजिकच नैवेद्य सुद्धा मांसाहारीच राहतो . यातून हिंसेला उत्तेजन देणारा नैवेद्य ठेवावा की नाही असा मूलभूतच प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट शैव-धर्मामध्ये असे काय झाले की तिथे मांसाहार नैवेद्य म्हणून चालायला लागला ? याही प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा आपल्याला पशुपालन कालखंडामध्ये घेऊन जाते . शैव धर्म हा अति प्राचीन आहे हे मी नेहमीच सांगतो त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शाकाहार प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यासाठी मुळात शेती प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात यावी लागते . महावीर आणि बुद्ध यांच्या काळामध्ये शेती भरपूर झाली आणि म्हणूनच शाकाहार हा नैवेद्य म्हणून येण्याच्या शक्यता अधिक वाढत गेल्या . शैव हा पशुपालन कालखंडामध्ये जन्मल्याने साहजिकच तिथे पशु हाच मुख्य आहार होता . साहजिकच तोच देवाला दाखवला गेला विशेषता देवीला ! माया म्हणजेच मातेच्या अंगाला अंगच नैवेद्य म्हणून दाखवावे असा हा प्रकार होता. आता काळ बदलल्याने शैव लोकांनी आपल्या नैवेद्यात बदल करावा आणि शाकाहार स्वीकारावा असे मी नेहमीच सांगत असतो. पण याबाबतीत सक्ती असू नये असाही माझा आग्रह आहे . मातेला जगदंबेला शाखाहार की मांसाहार हा प्रश्न पडत नाही त्यामुळे तिला शाकाहार चालतो . जेव्हा कसल्याच प्रकारची शाकाहाराची शक्यता नसते तेव्हा मात्र अवश्य मांसाहार करावा आणि मांसाहाराचा नैवेद्य सुद्धा चालू शकतो पण मुळात खरोखर अशी स्थिती आहे का हे पहावे एकेकाळी मांसाहार हा खूप स्वस्त होता आणि जंगलात जाऊन शिकार करून तो सहज मिळवता येत होता आता मात्र अशी स्थिती राहिलेली नाही हळू हळू मांसाहार हे महागडे प्रकरण बनत चाललेले आहे अशावेळी गरीब लोकांच्यावर त्यांनी मांसाहारच नैवेद्य म्हणून दाखवला पाहिजे अशी सक्ती करणे मला चुकीचे वाटते. 

मांसाहारामध्ये अनेकदा खटकणारी एक गोष्ट ही सौंदर्यशी निगडित आहे एखादा बकरा कापला जातो तेव्हा ती काही फार सौंदर्यपूर्ण घटना असते असे म्हणता येत नाही . एक विशिष्ट प्रकारची क्रूरता या घटने मधले सौंदर्य पाहण्यासाठी तुमच्याजवळ असावी लागते . त्या उलट शाकाहारी नैवेद्य हा सौंदर्यपूर्ण दिसतो . आणि मुख्य म्हणजे त्याचे दाखवणे सौंदर्यपूर्ण असते . काटण्याआधी बकरा किंवा कधी कधी रेडा म्हैस सुंदरच असतो परंतु त्याचे काटणे ही प्रक्रिया सौंदर्यपूर्ण आहे का असा हा प्रश्न आहे . मला तरी व्यक्तिशः कधीही हे सौंदर्यपूर्ण वाटलेले नाही उलट एक जीव जातो असाच फील येतो हा फील हिंसेला धरून असतो आणि मोक्षाच्या यात्रेमध्ये अनेकदा बाधा बनू शकतो . निदान माझ्या बाबतीत तरी तो बनला आणि मी बळी चढवणे बघणे बंद केले . शक्य होईल तिथे थांबवले . लोकांच्या श्रद्धांचा आदर करावा लागतो पण त्याचबरोबर लोकांना सत्य सांगणे गरजेचे असते . पण यातून एक वेगळीच मूल्य व्यवस्था तयार होते . म्हणजे शाकाहार करणारे हे धार्मिक पातळीवर किंवा आध्यात्मिक पातळीवर उच्च स्थानी आहेत असा भेदाभेद करणारा विचार उदयाला येतो . माझ्या मते हा विचार चुकीचा आहे . याबाबतीत विवेक दाखवणे खूप गरजेचे आहे पण दुर्दैवाने विवेकच हरवत चालला आहे . केवळ प्रथा चालत आली म्हणून रेडा कापला पाहिजे किंवा म्हस कापली पाहिजे हे सुद्धा चुकीचेच आहे . त्याबाबतीत विवेक काय सांगतो हे फार महत्त्वाचे निदान माझा विवेक मला असे सांगतो की आता नैवेद्य आणि बळी यांच्या नावाखाली होणारी हिंसा थांबवावी .

धर्माच्या केंद्रस्थानी कल्पनाशक्ती असते आणि अनेकदा धर्म जे सादर करतो ते वास्तव म्हणून कल्पनानिर्मित प्रतिकात्मक वास्तव असते असे म्हणता येईल. साहजिकच मग या प्रतीकात्मक वास्तवाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातूनच मग धर्म संघर्ष निर्माण होतो उदाहरणार्थ मूर्ती ही प्रतीकात्मक वास्तव असते परंतु इस्लाम मध्ये हे प्रतिकात्मक वास्तव स्वीकारले जात नाही उलट ती काफिरी ठरते साहजिकच मग इस्लामच्या नावाने मूर्तीफोड सुरू होते आता गंमत अशी असते की काबा हे प्रतीकात्मक वास्तव म्हणून चालते पण मूर्ती मात्र चालत नाही . वास्तविक दोन्ही ठिकाणी कल्पनाशक्तीच व्यक्त झालेली आहे मग तुझी कल्पनाशक्ती ही माझ्या कल्पनाशक्ती पेक्षा अधिक चांगली हे कोण ठरवणार ? उलट एकच एक प्रतिकात्मक वास्तव स्वीकारणे हे सौंदर्यावर मर्यादा घालते . सौंदर्यांच्या सर्व शक्यता लोप पावतात . कल्पना करा की जर का अशी आज्ञा दिली असती की कोणीही कुठेही काबा बांधू शकतो तर जगात किती नवीन वेगवेगळी सौंदर्यपूर्ण आणि पवित्र अशी स्थळी निर्माण झाली असती ? असो. भारतीय इस्लामने यावर दर्गा हा उपाय काढलेला आहे आणि तोही सौंदर्यपूर्ण आणि पावित्र्यपूर्ण आहे . आता अर्थात कट्टर इस्लामिक मुसलमानांना हे अमान्य आहे पण त्यातून मग वेगळा प्रश्न निर्माण होतो इस्लामने स्वतःच्या बाबतीत स्वतःच्या धर्माबाबतीत हा धर्म निर्णय घेतला हे ठीक आहे पण दुसऱ्यांच्या धर्माबाबत निर्णय करण्याचा अधिकार इस्लामला कोणी दिला ? तुम्हाला मूर्ती पूजा मान्य नाही तर तुम्ही मूर्ती पूजा करू नका पण इतर धर्मातल्या लोकांनी पण मूर्ती पूजा करू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आणि जर का तुमच्या धर्माने हा तुम्हाला अधिकार दिला असेल तर आमच्या धर्माने उद्या उलट आज्ञा दिली की जे मूर्ती पूजा करत नाहीत ते काफीर तर तुम्ही कसे react करणार आहात. इस्लाम या संदर्भातला इतर धर्मांच्या मधला निर्णय स्वतःच्या ताब्यात घेतो आणि स्वतःच निर्णय करतो हा दुसऱ्यांच्या धर्मात असलेला हस्तक्षेप असतो आता तो इतर धर्मीय लोकांनी का सहन करावा ? तुमच्या धर्मातल्या सौंदर्याच्या आणि पावित्र्याच्या कल्पना आम्ही ठरवणार असा अट्टाहास आहे आणि तो स्वीकारणे आता इतरांना शक्य होत नाही याबाबतीत इस्लामला स्वतःला बदलावे लागेल .

कलेमध्ये सर्वसाधारणपणे धर्मप्रदान धर्मप्रधान कला ही नेहमीच प्रतिकात्मक कला असते साहजिकच धर्माने निर्माण केलेले वास्तव जे काल्पनिक असते ते प्रमाण मानण्याकडे कलावंतांचा आणि रसिकांचा कल असतो . मानवी जीवनामध्ये धर्म महत्त्वाचे बनण्याचे सर्वात मोठे कारण कला आहे . कलेनेच धर्म वाढवला आणि जतन केला. त्यामुळे शेवटी नाइलाजाने गौतम बुद्ध यांनी कला ही धम्माची शत्रू मानली . प्रत्यक्षात बौद्ध लोकांनी काही ही गौतम बुद्धाची ही गोष्ट स्वीकारलेली दिसत नाही म्हणजे जितक्या प्रामाणिकपणाने आणि तळमळीने मुस्लिम लोकांनी मूर्तिपूजा नाकारली तितक्या तळमळीने बौद्ध लोकांनी काही कला नाकारलेली नाही . महायान आणि आदियान यांच्यात जो काही महत्त्वाचा फरक पडला आहे तो कला या मुद्द्यावर सुद्धा पडलेला आहे . महायान हे मुख्यतः शैव लोकांनी जन्माला घातलेले बौद्ध धर्माचे स्वरूप आहे आणि शैवांच्या मते कला ही मोक्ष देऊ शकत असल्याने आणि नटराज हे अतिशय महत्त्वाचे त्यांचे दैवत असल्याने साहजिकच त्यांनी बौद्ध धर्मामध्ये कला आणली आणि ती केवळ आली नाही प्रचंड भरभराट पावली . आता इथे मूर्ती ही पवित्र आणि सुंदर असते ही संकल्पना आहे साहजिकच तीच्यातून भीतीचित्रे सुद्धा निर्माण झाली जी आपणाला सर्वत्र दिसतात .

चित्रकलेला विरोध हा काही प्रथम मुस्लिम लोकांनी केलेला नाही तो प्रथम गौतम बुद्धाने केला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . पण आश्चर्यकारकरीत्या घर ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट असल्याने मोहम्मद पैगंबर स्थापत्य कलेला नकार देऊ शकलेले नाहीत साहजिकच जिथे जिथे मुस्लिम राजवटी आल्या तिथे स्थापत्य कलेची प्रचंड भरभराट झालेली दिसते . कारण मुस्लिम धर्मात ती गोष्ट पवित्र आहे . मुळात मशिद हेच स्थापत्य असल्याने स्थापत्य कलेला नकार देणे ना प्रेषितांना शक्य झाले ना त्यांच्या अनुयायांना ! गौतम बुद्ध यांच्या बाबतीत सुद्धा हेच झालेले दिसते कारण संघाच्या सदस्यांसाठी विहार बांधणे हे सुरू झाले होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा स्थापत्य कलेला नकार दिलेला नाही पण याचा एक विचित्र दुष्परिणाम असा झाला की चित्रकला ही स्थापत्य कलेवरच आरोपीत करण्यात आली आणि त्यातूनच मग लेणी नावाची गोष्ट अधिकाधिक निर्माण झाली . म्हणजे चित्रकला ठेवायची पण स्थापत्य कलेचा भाग म्हणून जिवंत ठेवायची अशी ही तडजोड होती . पुढे मुस्लिम धर्माने नेमकी हीच गोष्ट केलेली आपल्याला दिसते पण लेण्यांचे ऐवजी त्यांनी कॅलिग्राफीक वॉल पेंटिंग तयार करण्यावर भर दिला . याचे कारण उघड आहे वाळवंटामध्ये लेणी निर्माण करणे अवघड आहे . पण याचा एक फायदा असा होतो की लेण्यांच्या मध्ये कधीही द्विमिती असत नाही तिथे त्रिमिती असते त्यामुळे साहजिकच त्रिमितीचा वापर लेण्यांच्या मध्ये प्रचंड झालेला दिसतो . याउलट इस्लाम मध्ये मात्र द्विमितीयता कळत नकळत महत्त्वाचे झाल्याने कुराणा मधलेच मेसेज कॅलिग्राफीकवॉल पद्धतीने पुढे आलेले आहेत .त्यांचे मुख्य स्वरूप भिंतींच्या वर स्थापन केलेल्या चित्रकला व अक्षर कला असेच आहे . या सर्व कलांच्या मध्ये त्यामुळेच पावित्र्य आणि सौंदर्य यांचे जतन केलेले दिसते. 

प्रश्न असा येतो की मग धार्मिक कलेमध्ये कलावंताचे मन येते की नाही ? धार्मिक कला ही वस्तुनिष्ठ असते कलाकृतीनिष्ठ असते ? जर का कला ही मन आणि संसार यांच्या सहचार्यातून सौंदर्य निर्माण करत असेल तर कलावंताच्या मनाचे धार्मिक कलेमध्ये नेमके काय स्थान आहे ? की इथे धार्मिक मन हे साचा बनते आणि हा साचा सर्वच कलांच्या मध्ये सारख्याच पद्धतीने उमटायला लागतो ? त्याच त्याच पद्धतीच्या शिव, शंकर, शक्ती, पार्वती, गणपती , स्कंद, सिद्ध,बुद्ध , तीर्थंकर, महावीर यांच्या तशा तशाच सारख्या सारख्या मुर्त्या निर्माण व्हायला लागतात ? 

पुढे मग साहित्यामध्ये रामायण आणि महाभारत आणि पुराणे यांच्यामधूनच तुम्ही कथा घेतल्या पाहिजेत अशी सक्ती येते याचा परिणाम असा होतो की तीच तीच कथानखे तशी तशीच यायला लागतात कथानक बदलून त्याचे कथानख होते आणि तीच कलेमध्ये उमटायला लागतात . पूर्वी लोककला रेकॉर्ड होत नसल्याने कधीतरी त्या वाट्याला यायच्या आणि त्यामुळे त्या अभिनव आणि ताज्या वाटायच्या परंतु आता मुद्रणक्रांती झाल्यामुळे अवस्था अशी आहे की या लोककला सहजरीत्या उपलब्ध होतात आणि त्यामुळेच त्यांचा तोच तोच अनुभवसाचा इतका कंटाळवाणा होत जातो की आता त्या पद्धतीचा प्रतिसाद त्या रसिकांच्याकडून मिळत नाही . मुद्रण कलेने घडवून आणलेले हे बदल धार्मिक कलेच्या लक्षात येत नाहीत . अशावेळी मग कांतारा सारखी फिल्म निर्माण करावी लागते जी कथानकच नवीन आणते पण धार्मिक कलेचा बाज बदलत नाही . म्हणजेच इथे कलावंताचे मन कलाकृतीमध्ये येऊ दिलेले आहे त्यामुळेच कथानक साचेनिष्ठ होत नाही . कुठल्याही कलाकृतीमध्ये कल्पनाशक्तीला मर्यादा घालून चालत नाहीत कल्पनाशक्ती मोकाट सुटली नसली तरी पिसाट सुटली पाहिजे म्हणजे मग तिला तर्कशास्त्राचे अधिष्ठान राहत ती अत्यंत व्यवस्थितपणे फंक्शनिंग करत राहते . कल्पनाशक्ती ही संवेदनशक्ती , भावशक्ती आणि बुद्धीशक्ती यांच्यापेक्षा वेगळी असते . ती या तिन्ही शक्तींना व्यवस्थित संघटित करत पुन्हा स्वतःच्या कल्पनेच्या जीवावर कल्प रचत जाते आणि हा कल्पच मग कल्पकृती किंवा कलाकृती बनतो . त्या उलट तंत्रअधिष्ठत कला ही साच्याच्या आधारे संकल्प रचत जाते. इथे संकल्प शक्ती कल्पनाशक्तीवर मात करते आणि त्यामुळे त्याच त्याच संकल्पना येतात आणि या संकल्पना शक्तीमुळे कल्पनाशक्तीचा नाश होत जात कल्पक कृती निर्माण होण्याऐवजी संकल्प कृती निर्माण होते . आधीच ठरवून कल्पना केलेली अशी ही कृती असते . आणि आधीच ठरवलेल्या कल्पना या नेहमीच संकल्पना असतात . म्हणजे मग गझल त्याच त्याच प्रेम विषयक संकल्पनांच्या गिरमिटातून फिरत राहते . अभंग त्याच त्याच भक्तीच्या ठराविक संकल्पनांच्या गिरमिटातून फिरत राहतात . वृत्त ही सुद्धा एक संकल्पना असते हेच अनेक गझलकारांच्या लक्षात येत नाही . त्यामुळेच त्या वृत्ताला रिटायर करावे लागते जेणेकरून कल्पनाशक्ती अधिक मोकळी होत जावी अर्थातच मुक्त गजलेने मुक्त केलेली कल्पनाशक्ती पुढे पुन्हा मीटर मध्ये बसवून तिला सादर करणारे लोक येतात पण ही सर्व नंतरची गोष्ट असते . प्रतिभावंतांची प्रतिभा ही नेहमीच कॉपी केली जाते . पण ही जी काही प्रतिभा शक्ती असते ही जी काही मनशक्ती असते ती फार पारदर्शकपणे वापरावी लागते . तिचा व्यवहार आणि व्यापार हा मुक्त ठेवावा लागतो अन्यथा कलेमध्ये संकल्पनाशक्ती कधी उडी मारते आणि प्रतिभा शक्तीला कधी रिप्लेस करते ते कळत पण नाही . विशेषता भावनांच्या ठराविक गिरमिटातून फिरायला आवडणारे लोक नेहमीच प्रतिभाशक्ती बाजूला करत लोकांना आवडणाऱ्या भावना लोकांच्याच पद्धतीने सादर करत राहतात . इथेच मग लोककला सुद्धा लोकशरण कला बनतात आणि धार्मिक कला सुद्धा लोकधर्मशरणकला बनते . अनेक लोक कलावंतांना लोककला आणि लोकशरणकला यांच्यातला फरक कळत नाही . हे लोक त्याच ठराविक गिरमिटातील लोककला सादर करत राहतात आणि लोकांना खुश करत राहतात . 

मानवी जीवनामध्ये अहम मधून आणि क्रियाशक्तीमधून निर्माण होणाऱ्या संकल्प शक्तीचा एक रोल आहे आणि तो अमान्य करण्याचे कारण नाही पण संकल्प शक्ती ही फक्त मी कलाकृतीचा संकल्प करत आहे एवढा संकल्प करण्यापुरतीच मर्यादित असली पाहिजे तीच जर का मुख्य नियंत्रण करायला लागली की मग प्रतिभा शक्ती आणि कल्पनाशक्ती या दोन्ही तिच्या आहारी जातात आणि कला गणितमानी प्रेडिक्टेबल बनत जाते .

कुठलीही कला ही अंतिमतः अवकाश आणि काळ यांच्यामध्ये निर्माण होत असते साहजिकच अवकाश शक्ती आणि कालशक्ती यांच्यापासून ती मुक्त असत नाही . अवकाश शक्ती ही नेहमीच लय निर्माण करत असते तर काल शक्ती नेहमीच ताल निर्माण करत असते . कुठल्याही कलाकृतीला त्यामुळेच लय आणि ताल या दोन्ही गोष्टी असतात . त्या अंगाचे रूपांतर सौष्ठवात करतात . ताल जसा गणितमानी असतो तसाच तो गतिमानी सुद्धा असतो म्हणूनच गझल मुक्त होऊ शकते कुठलाही फॉर्म मुक्त होऊ शकतो . अर्थात गणितमानी फॉर्म हा नेहमीच जास्त चित्त वेधक वाटतो कारण तो संगीताला ठराविक फॉर्ममध्ये पाहत असतो आणि त्याच्या साच्याची आपल्याला सवय झालेली असते पण ज्याला मुक्त संगीत कळते त्याला लयीच्या साह्याने खूप काही निर्माण करता येते. 

संवेदनांना चिन्हशक्तीमध्ये रूपांतरित करून चिन्हअनुभव निर्माण करणे म्हणजे कला होय. चिन्हशक्तीचा पाया हा प्रामुख्याने प्रज्ञा किंवा बुद्धी असते . किंवा मग शरीर असते . कलेमध्ये कलावंत मन ओतताना कधी कधी भावशक्ती सुद्धा ओततो आणि ही भावशक्ती अनेकदा कलेला अधिक प्रभावी बनवते . प्रश्न असा असतो की चिन्हशक्ती मध्ये भावशक्ती कशी ओतायची ? कलेमध्ये शरीर हे नेहमीच चिन्ह म्हणून येते त्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा असतो कारण प्रत्यक्षामध्ये चिन्ह म्हणजे शरीर नसते तर शरीराचे शारीरिक सादरीकरण असते . या सादरीकरणातील संकेतच जर का विसरले गेले तर किंवा हे संकेतच कळणारे नसतील तर अनेकदा अर्थच प्रतीत होत नाही . चिन्हाचा कुठलाही मूलभूत अर्थ हा संकेत अर्थच असतो संकेतार्थ असतो . विशेषतः भाषाकलेमध्ये हे खूप तीव्रतेने जाणवते . भारतातल्या अनेक कला ह्या वैष्णव धर्माच्या उदयानंतर सांकेतिक बनत गेल्या आणि नंतर नंतर साचेबद्ध बनत गेल्या . त्यामुळेच इसवी सन १००० नंतर दृश्यात्मक कला जवळजवळ नाहीशा झाल्या किंवा मग साचेबद्ध झाल्या आणि फक्त साहित्यिक कला संतांच्या मुळे भरभराटीला आल्या . वैदिक धर्मातल्यास वेद ग्रंथांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये भाव शक्ती खूप आहे साहजिकच या भावशक्तीचे रूपांतर भक्तीशक्ती मध्ये करत करत वैष्णववादाने भाव वाद आणि भक्तीवाद इतका प्रबळ केला की इतर सर्व गोष्टी हळूहळू नाहीशा होत गेल्या . या काळातला मुख्य संकेत भक्ती काव्य झाले . साहजिकच मानवी जगण्याचा सर्व व्यापार आणि व्यवहार हा सुद्धा भक्तीकेंद्री झाला आणि इथेच तर्कशास्त्र फाफलत गेले . सर्व कल्पनाशक्ती ही धर्म संकेत निर्माण करण्यात व वाढवण्यात वाया गेली . त्यातूनच व्रत वैकल्याचा महिमा वाढला धार्मिक मन याचा अर्थ भाविक मन असा झाला . साहजिकच जे व्यक्त करतात ते पण भाविक आणि जे अनुभवतात तेही भाविक ! आज सुद्धा भक्तीचा चढलेला जोश आणि ज्वर ओसरलेला नाही . उलट भक्ती सुद्धा अधिकाधिक भक्ती कांडात्मक भावकांडात्मक होत गेली . हे एका अर्थाने वैदिक साहित्यिकाचे पुनराआगमन होते ज्याला मोक्षाशी काही देणे घेणे नव्हते पण जो प्रचंड मांत्रिक होता आणि मंत्रांना भुलणारा होता . याचा परिणाम असा झाला की ज्ञानेश्वर ते तुकाराम यांनी निर्माण केलेले भक्ती काव्य हे आता मंत्र काव्य बनून गेलेले आहे . आणखी काही वर्षांनी हा अभंग म्हटलं की असा उतारा पडतो आणि तो अभंग म्हटला तर भूतबाधा दूर जाते अशा प्रकारचे संकेत निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये कारण पुढची स्टेप भावकाव्याची नेहमी हीच असते . 

श्रीधर तिळवे नाईक

सत्य व्यवहारवाद आणि उत्तर व्यवहारवाद १२ माया कला आणि उत्तर व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 

लॉजिकल पॉझिटिव्हिजनचा काळ साधारणपणे 1950 च्या आसपास संपायला लागला आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये सौंदर्य व्यवहारांमध्ये काही नवीन गोष्टी चमकताना दिसायला लागल्या याचे कारण उघड होते

साम्राज्यवाद संपला तेव्हा दोन्ही बाजूंनी म्हणजे इंग्लंड आणि भारत अशा दोन्ही ध्रुवांवर राज्य करणारे एक मेगा narrative कोसळले आणि इंग्लंड साम्राज्यापासून स्वतंत्र झाला तर भारत साम्राज्यवादापासून स्वतंत्र झाला . साहजिकच लंडन हे आता जागतिक केंद्र उरले नाही आणि प्रथमच लंडन चा विचार इंग्लंडचे लंडन या पद्धतीने होऊ लागला . लंडनला समांतर अशी अनेक सत्ता केंद्र उदयाला आली आणि ती ब्रिटिश साहित्यात सुद्धा कार्यरत झाली आयर्लंड स्वतंत्र झाले होते स्कॉटलंड स्वतंत्र झाले होते आणि त्यांच्या जाणीवा या ब्रिटिश आहेत की नाही यावरच वाद होऊ लागला . याद भरीस वर म्हणून ज्यांच्यावर राज्य केले होते त्या लोकांचे झालेले स्थलांतर आता वेगळ्या प्रकारचे इंग्लिश निर्माण करायला उतावीळ झाले होते ज्यातून पुढे सलमान रश्दी सारखा लेखक निर्माण होणार होता 

या काळातला उत्तर व्यवहारवाद हा व्यवहारातील भाषांना अतिशय महत्त्व देत होता साहजिकच बोलीभाषा आणि स्थानिक बोली यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले . अचानक कवितेमध्ये कवींची सांस्कृतिक पार्श्वभूमी वाद्यवादन करू लागली. चांगली कविता आणि वाईट कविता असे दोन कवितेचे प्रकार जास्त महत्त्वाचे झाले . शक्यतो वाईट कवितेची सर्व लक्षणे टाळणे सुरू झाले. 

सर्वात मुख्य प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे सौंदर्य हे विज्ञाननिष्ठ पद्धतीने विश्लेषणाच्या कक्षेत आणता येईल का ? जोपर्यंत धार्मिक कला राज्य करत होत्या तोपर्यंत धार्मिक सौंदर्यशास्त्र राज्य करत होते परंतु पुरोगामी कालखंडामध्ये विज्ञान हे केंद्रस्थानी आले आणि साहजिकच कलेची वैज्ञानिक मीमांसा सुरू झाली आणि त्यातूनच पुढे सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्य विज्ञान नावाचे एक विज्ञाननिष्ठ विश्लेषण पुढे यायला लागले . ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये सर्व गाईंच्या मध्ये "गोत्व" हा सत्वात्मक घटक असतो आणि त्याचे वैज्ञानिक विश्लेषण शक्य असते त्याचप्रमाणे सर्व कलाकृतींच्यामध्ये "सौंदर्य"हा सत्वात्मक घटक असतो अशी ही धारणा होती अर्थातच 1950 नंतर याला आव्हान देणारे लोक निर्माण झाले. आधुनिक सिद्धांतांचे जे वैशिष्ट्य आहे त्यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे द्विध्रुवात्मकता ! साहजिकच रा भा पाटणकर यांनी आपल्या सौंदर्य विश्लेषणात लौकिकतावादी आणि अलौकिकतावादी असे दोन ध्रुव कल्पून सौंदर्यशास्त्राचा इतिहास मांडला या काळामध्ये टी एस एलियट याने परंपरेची पुन्हा स्थापना केली आणि सर्व साहित्य हे परंपरेशी जोडले गेले पाहिजे आणि लेखक परंपरेत उभा राहून लिहितो असा सिद्धांत मांडला ज्याचा प्रचंड प्रभाव आपल्याकडच्या सर्व आधुनिक साहित्यिकांच्या वर पडलेला दिसतो आणि त्यातूनच पुढे देशी वादाचा उदय झाला या देशी वादामुळेच देशी सौंदर्यशास्त्राचा नेमका काय प्रकार आहे ही चर्चा सुरू झाली.

इंग्लंडचे राज्य होते तोपर्यंत इंग्लंडच्या सौंदर्यशास्त्राविरोधातसुद्धा जाण्याची तयारी अनेकांची नव्हती अपवाद फक्त गांधीच असावेत आता मात्र इंग्लिश भाषेची दादागिरी सहन करण्याची गरज राहिली नाही साहजिकच देशी सौंदर्य शास्त्री जे होते त्यांच्या विश्लेषणाचे नीट अध्ययन सुरू झाले त्यातूनच मग धार्मिक कलांचा अभ्यास सुरू झाला. मात्र हा अभ्यास पुरेसा होता का ? देशीवादाने विठ्ठल आणि खंडोबा हे दोघेही देशी देव आहेत अशी संकल्पना मांडली पण प्रत्यक्षामध्ये प्रस्थापित केली नाही उलट वैष्णववादाला अधिकाधिक उत्तेजन देणारे लिखाण केले म्हणजेच उत्तर भारतीय लोकांचा मार्गी वाद या लोकांनी स्वीकारला ज्याच्यामुळे आता मुंबई ही उत्तर भारतीय होत चालली आहे. सौंदर्यशास्त्रामध्ये तर संपूर्णपणे संस्कृत साहित्य शास्त्राची दादागिरी सुरू झाली . देशीवादाने या दादागिरीला विरोध केला आणि आपले सौंदर्यशास्त्र संतांच्या साहित्यापासून सुरू केले परंतु ज्या तऱ्हेने मर्ढेकर आणि प्रभाकर पाध्ये यांनी नवीन सिद्धांत तयार केले सिद्ध केले तसे काही या लोकांना जमले असे वाटत नाही . वास्तविक खरा प्रश्न असा होता की ज्याप्रमाणे गणितामध्ये सेट थेरी अप्लाय होते आणि दोन गोष्टींचे सेट वेगळे असू शकतात म्हणजे नैसर्गिक नंबरचा सेट एक असला तरी नंतर समसंख्यांचा एक सेट आणि विषम संख्यांचा एक सेट असे दोन सेट होऊ शकतात त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा विज्ञानाचा एक सेट तयार होतो आणि अनुभवाचा एक सेट तयार होतो असे आपण म्हणू शकतो आणि आपण असेही पुढे जाऊन म्हणू शकतो की अनुभवाचा जो सेट असतो तो पूर्णपणे वेगळा असतो आणि त्याचाच आधार घेऊन कला क्रीडा आणि धर्म निर्माण होतात . मोक्ष हा सगळा सेट मोडून काढतो आणि सेटातित करतो . कला, क्रीडा आणि धर्म या तिन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी अनुभव असतो आणि अनुभवांमध्ये ज्ञान आवश्यक असले तरी ते केंद्रस्थानी असत नाही . इथे इंद्रिय आणि मन यांची प्रोसेस जे अनुभव्य असते त्याला जाऊन भेटते भिडते . सचिन तेंडुलकर जेव्हा खेळत असतो तेव्हा आपण फक्त अनुभव घेत असतो सचिनची उंची किती आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्याचे जेनेटिककोड काय आहे ते पाहत नसतो तर आपण फक्त त्याची बॅटिंग पाहत असतो त्या बॅटिंगचा अनुभव घेत असतो सर्वसाधारणपणे हेच कलाकृतींच्या बाबतीतही घडते तिथे सुद्धा आपण केवळ अनुभवच घेत असतो म्हणजेच अनुभव हा जर का आपण एक वेगळा अनुभव संच मानला तर त्या अनुभव संचामध्ये आपण कला क्रीडा आणि धर्म यांचा समावेश करू शकतो . यातील धर्म आवश्यक नाही त्यामुळे तिथे आपण वेगळे उत्सव आणले पाहिजेत आणि असे उत्सव आपण अलीकडच्या काळामध्ये आणायला सुरुवात केलेली आहे मात्र धार्मिक उत्सव पूर्णपणे समाजामधून गायब करणे आवश्यक आहे ते होत नाहीये आणि म्हणूनच धर्माचा प्रभाव कमी होत नाही . भारतीय जनता पक्ष जेव्हा कुंभमेळ्यासारखी घटना घडवतो तेव्हा त्याला अनुभव द्यायचा असतो आणि त्यासाठी तो कुंभमेळा इव्हेंट म्हणूनच निर्माण करतो एका अर्थाने अनुभव अनुभव निर्माण म्हणून सादर करणे म्हणजेच इव्हेंट होय आणि हा अनुभव इ- इव्हेंट असेल तर त्याची व्याप्ती वाढत जाते एका अर्थाने हे चिन्हघटन असते आधुनिक आणि उत्तराधुनिक कालखंडामध्ये सर्वसाधारणपणे घटना हे घटन होते परंतु चौथ्या नवतेमध्ये अचानक हे घटन फक्त घटन न राहता चिन्हजालघटन झाल्याने त्याला एक विशिष्ट प्रकारची दिशा प्राप्त व्हायला लागली म्हणजेच सादरीकरण करतानाच हे सादरीकरण टीव्ही आणि मोबाईलवर सादर होणार आहे हे गृहीत धरूनच घटनाचे सादरीकरण होऊ लागले त्यामुळे त्याचे मांडणशिल्प बदलले ठाय बदलला मांडण स्थापत्य बदलले आणि त्याची प्रोसेस त्याचा व्यवहार त्याचा व्यापार बदलला . लौकिक आणि अलौकिक असे दोन्ही आधुनिक ध्रुव कोसळून पडले आणि उरले ते फक्त सादरीकरण ! सादरीकरणात बहूध्रुव असतात म्हणजेच सादरक , जालक , प्रक्षेपक आणि सादरसिक! अनेकदा तर हे एकमेकाला भिडतात विशेषता प्रत्यक्ष इव्हेंट मध्ये असे घडू शकते म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की इथे अचानक सेकंड आणि थर्ड ऑडियन्स तयार होतो म्हणजेच मैदानामध्ये उपस्थित असलेला प्रत्यक्ष पहिला ऑडियन्स आणि या सर्वांचे प्रक्षेपण सादर करण्यासाठी शूट करणारा शूट करता करता पाहणारा दुसरा ऑडियन्स आणि या सगळ्याचे प्रक्षेपण एडिट करणारा तिसरा ऑडियन्स आणि शेवटी पाहणारा चौथा प्रक्षेपणिक ऑडियन्स ! 


याचा मग साहजिकच सादर करणाऱ्या माणसावर सुद्धा परिणाम होतो. उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये आपण पाहतो की आता काही कॅच केवळ टेलिव्हिजनवर कसे दिसतील म्हणून कॅच घेतानाच मॅनेज केले जातात. उगाचच एक्स्ट्राची स्टाईल मारली जाते .हीच गोष्ट शॉट मारताना घडते . अनेकदा हल्ली बॉलर लोक आपली काही सिग्नेचर परफॉर्मन्स ची स्टेप तयार करतात . विशेषता विकेट पडली की घेतली की ! फोर लेयर ऑडियन्सचा पडलेला हा प्रभाव आहे . 


कविता सादर करताना कधी कधी असे घडते का तर हो असे घडते . अनेकदा रसिकांचा मूड बघून कविता बदलल्या जातात . मला आठवते की एकदा चौघांच्या कविता कार्यक्रमात आम्हाला अचानक कळले की इथे फार गंभीर काही चालणार नाही साहजिकच तिघांनी आपल्या लाईट लाईट कविता काढल्या आणि मी सुद्धा ऑब्जेक्शन घेणारा त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतले नाही कारण ऑडियन्स खरोखरच तसा खतरनाक होता. आता हे मी censor करणारा होतो कारण कार्यक्रमाची गुणवत्ता काही झाली तरी लोककेंद्री होऊ द्यायची नाही असा माझा आग्रह होता तरीसुद्धा चमत्कारिक ओडियन्स बघून बदल घडवावा लागला होता आता हे जर गंभीर कार्यक्रमाबाबत झाले असेल तर जर का खरोखरच लोकांच्या मनोरंजनासाठी होणारे काव्यवाचन असेल तर तिथे किती मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतात याची कल्पना येते . याउलट विलास कुमार कांळे यां आमच्या मित्राने प्रिन्सिपल झाल्यानंतर एक काव्यवाचन त्याच्या कॉलेजमध्ये ठेवले होते आणि मी एकटाच कविता वाचणारा होतो. चौथ्या नवतेच्या कविता असून सुद्धा खेड्यातून आलेल्या या सर्व कॉलेजच्या पोराकडून त्या काळात इतकी मोकळी दाद दिली होती की टाळ्यांच्या वर टाळ्या पडत होत्या प्रश्न असा होता की त्यांना ह्या कविता सहजरित्या कशा काय कळाल्या? याचे कारण त्यांच्यावर कसले संस्कार झालेले नव्हते पूर्वी मुक्त गजला मी बिनधास्त वाचायचो आणि त्या अॅप्रिसिएट व्हायच्या गझल म्हणून त्यांना स्वीकारताना कधीही या लोकांना प्रॉब्लेम नसायचा याचे कारण उघड होते त्यांच्यावर अनेकदा वाईट कवितांचे किंवा पारंपारिक संस्कार झाले न्हवते ते नंतर झाले की रसिक बिघडायला लागतात अन्यथा ते खूप ओपन असतात हा माझा अनुभव आहे .


काव्यवाचन हा एक थेट व्यवहार आणि व्यापार असतो साहजिकच मी तो मुद्दाम म्हणून अधून मधून करत असतो कारण लोकांच्यात नेमके काय चाललेले आहे ते कळते 


अर्थातच काव्य वाचण्याचा इव्हेंट व्हावा की न व्हावा हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो . आपण मुळातच ज्या पद्धतीच्या युगात वावरतो आहे तिथे मला स्वतःला काव्यवाचन हे खूप आवश्यक वाटत आलेले आहे आणि मी कायमच त्याला जोरदार पाठिंबा दिलेला आहे . 


प्रश्न असा आहे की काव्यवाचनाचे म्हणून काही नवीन सौंदर्यशास्त्र निर्माण होऊ शकते का ? उदाहरणार्थ अशोक नायगावकर यांच्याकडे एक विशिष्ट पद्धतीची शैली आहे तर आपण त्या शैलीचा काही सौंदर्यात्मक पातळीवर विचार करणार आहोत का ? किंवा अनुभवाच्या पातळीवर ? 


आज आपण असे नक्की म्हणू शकतो की सौंदर्य हा अनुभवाचा केवळ भाग आहे पण अनुभव हा याहून अधिक काही शक्तींनी युक्त असतो . सौंदर्य शक्ती ही केवळ एक शारीरिक शक्ती आहे आणि ती कवितेमध्ये किंवा कलेमध्ये शारीरिक फॉर्म ची शक्ती म्हणून येते . हा शारीरिक फॉर्म बद्ध असावा की मुक्त असावा हे ज्याने त्याने ठरवावे पण आमचंच म्हणणं खरे हे टोक असते .


कांट, हेगेल , ब्राँसांके ,क्रोचे आणि कलिंगवूड या पाचही विचारवंतांनी ज्ञानाच्या व्यवस्थेपेक्षा सौंदर्याची व्यवस्था वेगळी असते असे सांगितले खरे परंतु ते हे सांगायला विसरले की ही व्यवस्था प्रत्यक्षात सौंदर्याची नसून अनुभवाची व्यवस्था असते . प्रत्येक अनुभव हा सौंदर्याने भरलेलाच असेल असे नाही. एखादा अनुभव अत्यंत फ्रस्टेशननेसुद्धा भरलेला असू शकतो आणि तो तरीही कलात्मक अनुभव असू शकतो म्हणजे वेटिंग फॉर गोदो या नाटकामध्ये आपणाला सौंदर्य अनुभव मिळतोच असे म्हणता येत नाही . माझ्या मते आपण सौंदर्य अनुभव असा शब्द वापरण्यापेक्षा व्यवहारमुक्तअनुभव असा शब्द कलेतल्या अनुभवासाठी वापरावा म्हणजे व्यवहारा पासून मुक्त असलेला अनुभव ज्याला आपण व्यवहार मुक्त अनुभव म्हणू शकतो . माणसांच्या आयुष्यात असे व्यवहार मुक्त अनुभव असतात अगदी मैत्रीमध्ये सुद्धा असे अनुभव येतात दुर्देवाने मैत्रीमधले असे व्यवहार मुक्त क्षण आता कमी होत चालले आहेत आणि खरी चिंतेची गोष्ट तीच आहे . एकीकडे आपण सातत्याने टीव्ही पुढे बसतो स्क्रीन पुढे बसतो याचे सर्वात मोठे कारण तिथे मिळणारे व्यवहार मुक्त अनुभव होय प्रत्यक्षामध्ये सध्या कलेची बजबज इतकी वाढलेली आहे की हे व्यवहार मुक्त तथाकथित क्षण चक्क तुमच्यासाठी व्यवहार पाहूनच निर्माण केले जातात . जाहिराती तर उघड उघडपणे तुमच्या या अनुभव विश्वाचे शोषण करतात . अलीकडच्या काळात जवळजवळ ७० टक्के अनुभव आपण केवळ अनुभवासाठी अनुभव म्हणून घेत असतो म्हणजेच एका अर्थाने ७०%टक्के जीवन हे सध्या व्यवहार मुक्त अनुभवाने व्यापून टाकलेले आहे. माणसे त्यामुळेच जालव्यसनाधीन होत आहेत हे जाल व्यसन इतके वाढत चालले आहे त्याचे कारण ते व्यवहार मुक्त आहे असे आपणाला वाटते फेक मुक्तीचा फेक अनुभव येतो . एका अर्थाने स्क्रीन ड्रग सारखा काम करतो . प्रत्यक्षामध्ये हे व्यवहार मुक्त अनुभवाचे जालजग आपल्याला निष्क्रिय बनवत आहे किंवा अपस्तुतरीत्या एक्सायटिंग बनवत आहे उदाहरणार्थ निवडणुका या एक्सायटिंग इव्हेंट बनलेल्या आहेत त्यांचे निकाल हे आपण इव्हेंट बनवलेले आहेत अनेकदा हे आपण लक्षात घेत नाही . व्यवहार मुक्त जीवन हे मोक्षयुक्त जीवन असेलच असे नाही. कारण व्यवहार मुक्त जीवनामध्ये अनुभव व्यवहारापासून मुक्त वाटत असला तरी प्रत्यक्षात तो तसा असत नाही तो अनेकदा तुम्हाला बेशुद्ध करण्यासाठी वारंवार सादर केला जाऊ शकतो. म्हणजेच तो पॉलिटिकल असू शकतो . याचा अर्थ जाल व्यवहार ही एक अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आता बनत चालले कारण ज्या व्यवहारातले अनुभव हे एकेकाळी अत्यंत इनोसंट मानले जात होते तसे ते आता राहिलेले नाहीत कला कमालीची पॉलिटिकल बनवण्यात आलेली आहे कारण ती धंदेवाईक बनलेली आहे किंवा धंदेवाईक लोकांनी तिचे प्रक्षेपण ताब्यात घेतलेले आहे. हे धंदेवाईक प्रक्षेपण जालअनुभव अत्यंत इनोसंटली कला अनुभव असल्यासारखे व्यवहार मुक्त अनुभव असल्यासारखे सादर करते अगदी बातम्या सुद्धा कला सादर व्हावी , कला अनुभव सादर व्हावा तशा पद्धतीने सादर होतात . आता एकदा का तुमचा सगळा वर्तमान हा जाल वर्तमान बनला आणि तो जर का कला अनुभव म्हणूनच सादर होणार असेल तर मग कला कुठे सुरू होते आणि कला कुठे संपते हे कळणे मुश्किल होऊन बसते. जे प्रत्यक्षात व्यवहारी आहे ते प्रत्यक्षात कला अनुभव म्हणून सादर होते आणि साहजिकच मग आपण व्यवहारी घटनांच्या कडे सुद्धा करमणूक म्हणून पाहायला लागतो. ज्या घटनांचा ज्या निर्णयांचा परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या व्यवहारावर आपल्या व्यापारावर होणार असतो त्या घटना कलानुभव म्हणून सादर होणार असतील आणि आपण जर का त्या कला अनुभव म्हणून घेणार असू तर मग वैचारिकतेची वाट लागणे अटळ असते आपल्या नैतिक जाणीव बधिर होणे अटळ असते . आपल्याला एका अर्थाने व्यवहार कळू न देणे हाच अजेंडा बनत जातो म्हणजे व्यवहार हा कला व्यवहार बनवून आपल्याला अज्ञानी बनवले जाते. बधिर बनवले जाते . सगळीकडे कॅमेरे लावून आपल्यावर वॉच ठेवला जातो आणि याला बुरखा म्हणून सुरक्षिततेचे कारण सातत्याने दिले जाते आणि तुम्ही कसे आरक्षण असुरक्षित आहात हे जास्तीत जास्त बिंबवले जाते जेणेकरून तुम्ही ही सर्व कॅमेरागिरी स्वीकारावी अनेक जातीला जाणीवपूर्वक कारागिरी केले जाते . याचा दुष्परिणाम होतो तो म्हणजे तुम्हाला या सगळ्या कारागिरीचे कला अनुभवांचे व्यसन लागते. जी कला एकेकाळी तुम्ही शुद्धीवर यावे तुम्हाला वाहन मिळावे म्हणून निर्माण होत होती ती आता तुम्ही अधिकाधिक बेशुद्ध व्हावे म्हणून काम करायला लागते कलावंतांच्या कडून कला अनुभव हिसकावला जातो आणि तो जास्तीत जास्त स्क्रीन मालकांच्याकडे सरकत जातो. हिशेबी कलानुभव सादर केले जातात. आणि तुम्ही त्यांना addict व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात स्क्रीन तुमचा असतो पण त्यावर जे काही येते ते तुमचे नसते . तुमच्या डोळ्यांना बळकवण्याच्या आणि डोळ्यांच्या द्वारे मेंदू बळकवण्याच्या या तऱ्हा मोहम्मय असतात मोहनिमद असतात म्हणजेच मोह आणि मध यांनी युक्त व मद वाढवणाऱ्या असतात. या सगळ्या प्रसारामध्ये आपोआपच मग सौंदर्याचा आणि पावित्र्याचा जयजयकार केला जातो कारण जोपर्यंत तुम्ही अशा प्रक्षेपणाला धार्मिक टच देत नाही तोपर्यंत ते प्रक्षेपण ऑथेंटिक होत नाही . साहजिकच या प्रक्षेपणांच्यावर धार्मिक नैतिकतेचा दबाव वाढत जातो. लोक आता फक्त लोक राहत नाहीत ते क्राउड बनतात नंतर मास बनतात . आणि तुम्ही सुद्धा Net Mass बनून भाग बनता आणि त्याला साथ द्यायला लागता. या नेट मासच्या काउंटिंगचे एक भागधारक म्हणून तुम्हाला वापरले जाते .


म्हणूनच जालव्यसनापासून मुक्ती ही आता मोक्षासाठी बेसिक गरज बनून गेली आहे . तुम्ही जोपर्यंत जालव्यसनी आहात तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळण्याची कसलीही शक्यता नाही .


श्रीधर तिळवे नाईक

सत्य व्यवहारवाद आणि उत्तर व्यवहारवाद १२ माया कला आणि उत्तर व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 


लॉजिकल पॉझिटिव्हिजनचा काळ साधारणपणे 1950 च्या आसपास संपायला लागला आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये इंग्लंड वाद किंवा प्रांतवाद किंवा लंडन वाद अशा अनेक नावांनी मोमेंट नावाचा एक कवितेचा ग्रुप उदयाला आला हा ग्रुप प्रत्यक्ष अस्तित्वात होता की पत्रकाराने तो शोधला असा एक फार मोठा प्रश्न मुळातच निर्माण होतो कारण या ग्रुप मधले सर्व सामील सदस्य हे अशा प्रकारचा ग्रुप होता की नव्हता यावरच वाद घालताना दिसतात मात्र या लोकांचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे साम्राज्यवाद ओसरल्यामुळे या लोकांचा मेघनाग्रेटिव्ह चा आग्रह कोसळला होता आणि यांचे लक्ष प्रथमच इंग्लंडकडे जात होते. साहजिकच एक प्रकारचा उत्तर व्यवहार वाद हा या सर्वांच्या व्यवहारांमध्ये आढळताना दिसतो . या चळवळीला पुढे मूव्हमेंट पोएट्री असे नाव मिळाले . आपण जिला साठोत्तरी म्हणतो ती तिकडे आधीच पन्नासोत्तरी पिढी म्हणून उदयाला आली होती आणि भालचंद्र नेमाडे यांच्या थॉट प्रोसेस मध्ये ती अनेकदा चमकताना दिसते 


साम्राज्यवाद संपला तेव्हा दोन्ही बाजूंनी म्हणजे इंग्लंड आणि भारत एक मेगा narrative कोसळले आणि इंग्लंड साम्राज्यापासून स्वतंत्र झाला तर भारत साम्राज्यवादापासून स्वतंत्र झाला . साहजिकच लंडन हे आता जागतिक केंद्र उरले नाही आणि प्रथमच लंडन चा विचार इंग्लंडचे लंडन या पद्धतीने होऊ लागला . लंडनला समांतर अशी अनेक सत्ता केंद्र उदयाला आली आणि ती ब्रिटिश साहित्यात सुद्धा कार्यरत झाली आयर्लंड स्वतंत्र झाले होते स्कॉटलंड स्वतंत्र झाले होते आणि त्यांच्या जाणीवा या ब्रिटिश आहेत की नाही यावरच वाद होऊ लागला . याद भरीस वर म्हणून ज्यांच्यावर राज्य केले होते त्या लोकांचे झालेले स्थलांतर आता वेगळ्या प्रकारचे इंग्लिश निर्माण करायला उतावीळ झाले होते ज्यातून पुढे सलमान रश्दी सारखा लेखक निर्माण होणार होता 


या काळातला उत्तर व्यवहारवाद हा व्यवहारातील भाषांना अतिशय महत्त्व देत होता साहजिकच बोलीभाषा आणि स्थानिक बोली यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले . अचानक कवितेमध्ये कवींची सांस्कृतिक पार्श्वभूमी वाद्यवादन करू लागली. चांगली कविता आणि वाईट कविता असे दोन कवितेचे प्रकार जास्त महत्त्वाचे झाले . शक्यतो वाईट कवितेची सर्व लक्षणे टाळणे सुरू झाले.

वैदिक धर्म ही संज्ञा विचारवंतांची आणि बहुजन समाजाची दिशाभूल करत आहे का ? धार्मिक लोकसंख्या, व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहारवाद १३ श्रीधर तिळवे नाईक 


लोकशाही पद्धतीचा सर्वत्र उदय झाल्यानंतर जे काही घडलेले आहे त्यामध्ये व्यवहार आणि लोकसंख्या यांचा संबंध सातत्याने तपासणे गरजेचे झालेले आहे कारण शेवटी बहुमत म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसते तर तुमच्या मागे उभी राहिलेली बहुलोकसंख्या असते . तुमच्या पाठीमागे किती लोकसंख्या आहे त्यावरच तुम्ही निवडून येणार की नाही हे ठरत असते म्हणूनच गेली काही वर्षे सातत्याने लोकसंख्या आणि व्यवहार यांचा संबंध तपासला जातो आहे.

गेली काही वर्षे सनातन धर्म ही संज्ञा प्रचलित करण्याचा प्रयत्न हा सुद्धा लोकसंख्येला आपल्याकडे वळवण्यासाठी म्हणून सुरू झाला आहे आणि त्यातून काही वेगळ्याच गोष्टी निर्माण होत आहेत मुख्य म्हणजे वैदिक धर्म ही संज्ञा सनातन धर्माने का त्यागली आहे हा खरा प्रश्न आहे .

यामागे कारणे दोन आहेत पहिली गोष्ट म्हणजे अजूनही शैव धर्म पाळणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड आहे या धर्मामध्ये पाच महातंत्रे आहेत आणि त्यातील शिवतंत्र किंवा योगतंत्र आणि शक्ति तंत्र ही दोन तंत्रे प्रामुख्याने लोकसंख्येच्या बाबतीत अनुक्रमे ३९ करोड आणि ३१ करोड आहेत म्हणजे एकंदर शैव लोकांची लोकसंख्या ही साधारणपणे 80 करोड आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला साईडलाईन करणे हे आता वैदिक धर्माला शक्य होत नाहीये आणि म्हणूनच मग या लोकांना जर का आपल्याबरोबर ठेवायचे असेल तर आपण कुठलातरी वेगळा शब्द वापरायला हवा ही जाणीव ब्राह्मण धर्माला झाली आणि म्हणूनच ब्राह्मण धर्माने आणि ब्राह्मणांनी सनातन धर्म हा शब्द प्रचलित करायला सुरुवात केली आहे जेणेकरून ब्राह्मणांचे वर्चस्व एकविसाव्या शतकात सुद्धा शाबूत राहील . सुरुवातीला या दोन तंत्रांना शिवधर्म आणि शक्ती धर्म असे दोन धर्म म्हणून वेगळे काढण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आला परंतु यामुळे फूट पडली तर ते आपल्या अंगावर येईल आणि हे जर का आपापसातच भांडायला लागले तर ते परवडणार नाही विशेषतः हिंदुत्वाला परवडणार नाही हे लक्षात आल्यामुळे आता पुन्हा एकदा या लोकांचा एकत्र विचार ८० करोड लोकसंख्या अशा तऱ्हेने करण्यात आलेला आहे 

दुसरी गोष्ट या तुलनेमध्ये वैष्णव धर्म पाळणाऱ्या लोकांची संख्या ही ४० करोड आहे यातील सुद्धा अनेक जण शंकराचे भक्त आहेतच मुख्य म्हणजे हनुमानाचे भक्त प्रचंड आहेत किंबहुना भक्तीच्या बाबतीत लोकसंख्येच्या पातळीवर शंकर-पार्वतीनंतर हनुमानांचे भक्त तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांना वैष्णव मांडले तरी ते प्रत्यक्षात हनुमानाला शंकराचा अवतार समजतात. त्यामुळे वैष्णवधर्म हा प्रमुख धर्म करायचा असा अजेंडा असल्याने जर का सनातन धर्म हा शब्द वापरून जर आपण सर्व धर्म वैदिक धर्मामध्ये विलीन केले तर त्याचा आपणाला प्रचंड फायदा होईल असे हे गणित आहे त्यामुळेच मग सिंधू संस्कृती स्वतःच्या नावाने स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न ब्राह्मण धर्माने गेली काही वर्षे सुरू केला आहे 

या सगळ्या पार्श्वभूमीवर वैदिक निखळ धर्म पाळणारे लोक आपण शोधायला गेलो तर त्यांची संख्या धड एक करोड सुद्धा नाही खुद्द ब्राह्मण सुद्धा आता वैदिक ब्राह्मण राहिलेले नाहीत त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये वैदिक देव फारसे असत नाहीत एक तर वैष्णव देव असतात किंवा अपवादात्मक वेळेला शैव ! त्यामुळे साहजिकच एकंदरीत शैव आपल्याबरोबर यावेत म्हणून सातत्याने शैव मंदिरे आणि शिव महादेव हे कसे वैदिक आहेत हे वेगवेगळ्या पोस्टिंगच्या द्वारे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे . यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक वाटा हा ब्राह्मण झालेल्या पंडित लोकांचा आहे. हे बाटलेले लोक जास्तच कट्टर झालेले दिसतात मात्र आश्चर्य कारकरिता जेव्हा लग्न पत्रिका छापल्या जातात तेव्हा मात्र यांची सगळी सगळी कुलदैवते ही शैव दैवते असल्याने ती त्या लग्न पत्रिकेवर उपस्थित असतात . इतकेच नव्हे तर हे सर्व पंडित जे ब्राह्मण झालेले आहेत अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्या कुलदेवतांना जाऊन प्रणाम करत असतात. याच ब्राह्मणांना असे प्रामाणिकपणाने वाटते की आता आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र जगावे आणि आद्य शंकराचार्य यांनी जी चौकट घालून दिलेली आहे त्यामध्ये फिरावे . मी हे खूपदा सांगितलेले आहे की वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था या पंडित लोकांनी जन्माला घातलेल्या नाहीत परंतु दुर्दैवाने ते स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेत असल्याने त्यांच्या डोक्यावर हा दोष मारण्याचा प्रयत्न ज्यांनी वर्ण जाती व्यवस्था निर्माण केली त्या ब्राह्मणांनी सुरू केलेला आहे आणि हे सर्व आता हिंदुत्वाच्या नावाने सुरू झालेले आहे. म्हणूनच पंडितांनी वर्णव्यवस्था निर्माण केली जाती व्यवस्था निर्माण केली अशा प्रकारचे फेक नारेटिव्ह सध्या पंडित लोकांच्या नावाने सर्व भारतीय लोकांच्यावर लादले जात आहे माझे म्हणणे असे की पंडित लोकांनी हे घेऊ नये हे स्वीकारू नये त्यासाठी स्वतःला शांतपणाने पंडित म्हणून घोषित करावे जे पाप पंडित लोकांच्या हातून घडलेलेच नाही ते त्यांनी का स्वीकारावे ? त्यापेक्षा त्यांनी हा दोष घ्यावा की आम्ही 1000 नंतर थोडेसे भ्रष्ट झालो आणि वाट चुकलो . शैव समाज इतका नक्कीच उदार आहे की तो त्यांना माफ करेल पण आता त्यांनी पंडित व्हावे आणि शांतपणे पुन्हा एकदा खरा सनातन असलेला शैव धर्म उभा करावा 

मधल्या काळात लोकसंख्येच्या बाजूने सुद्धा घुमवा घुमव झाली परंतु प्रत्यक्षामध्ये कुंभमेळ्यात वेगळे चित्र दिसल्याने आता पुन्हा एकदा हिंदुत्ववाद ताळ्यावर आलेला दिसतो 

या सगळ्या पार्श्वभूमीवर वैदिक असणे हे काही आता बहुसंख्यांक असल्याचे लक्षण नाही किंबहुना वैदिक धर्म हा खऱ्या अर्थाने कोणीच पाळत नाही माझ्या मते वैदिक धर्म पाळणाऱ्या लोकांची संख्या ही फक्त तीस लाख आहे जे लोक अत्यंत प्रामाणिकपणाने यज्ञ संस्था पाळतात आणि संस्कार व्यवस्था पाळतात . मूर्तिपूजा करत नाहीत . यातील बहुसंख्य लोक हे आर्य समाजाशी निगडित आहेत . खुद्द आर्य समाजातल्या अनेक लोकांनी मूर्ती पूजा स्वीकारलेली दिसते पण काही कट्टर आर्य समाजीष्ट आहेत आणि तेच आता खऱ्या अर्थाने वैदिक आहेत . दयानंद सरस्वती हे स्वतः शैव होते आणि तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या धर्माच्या विरोधात जाऊन खरा वैदिक धर्म स्थापन करावा हा एक भारतीय इतिहासातील फार चमत्कारिक विरोधाभास आहे . वैदिक धर्म हा जन्मदत्त वर्णव्यवस्था पाळत नाही याचे भान त्यांनी पुन्हा एकदा जनतेला दिले इतकेच नव्हे तर ब्राह्मणेतरांच्या अनेक बुद्धिमान लोकांना त्यांनी पुरोहित बनवले मात्र जो स्वीकार इतर लोकांनी द्यायला हवा तो अजूनही पुरेशा प्रमाणात मिळालेला नाही .


या सगळ्या पार्श्वभूमीवर मग स्वतःला वैदिक म्हणवून घेणे हे परवडणारे नाही हे लक्षात आल्याने सनातन धर्म अशी संज्ञा ही शैव वैष्णव हिंदू ब्राह्मण आणि वैदिक या पाची धर्मांना मिळून वापरावी असा निर्णय झालेला आहे आणि हाच निर्णय प्रचार करून आता लादण्याचा प्रयत्न सुरू आहे . तो कितपत यशस्वी होईल हे सांगणे आता कठीण झालेले आहे कारण मुळात हिंदू धर्म हा शब्दच अठराव्या शतकापर्यंत लागू नव्हता त्यामुळे हिंदुत्व ही नवीन होते आणि आता पुन्हा एकदा नवीन शब्द रुजवणे हे फार अवघड जाणार आहे. हिंदू हा शब्द त्यापेक्षा अधिक रुजलेला दिसतो त्यामुळेच अनेकदा शैव धर्माला हिंदू असा शब्द वापरणारे काही विचारवंत उदयाला आलेले दिसतात त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की हिंदू हा शब्द कितीही तुम्ही सांगा परंतु प्रचलित नव्हता . सर्वच लोक स्वतःसाठी शैव किंवा वैष्णव किंवा वैदिक किंवा ब्राह्मणधर्मीय असे शब्द वापरत होते . ब्राह्मण लोक तर अठराव्या शतकापर्यंत स्वतःचा धर्म ब्राह्मण धर्म म्हणूनच सांगत होते ज्यांना कोणाला या संदर्भात माहिती घ्यायची असेल त्यांनी जुनी पुस्तके विशेषत: एकोणिसाव्या शतकातली पहावीत पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे लोक स्वतःला आर्य म्हणवून घ्यायला लागले 

आता प्रश्न या सगळ्यातून निर्माण होतो तो म्हणजे ब्राह्मण लोक असे का करतात ? 

या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा तेच आहे हे लोक जगातले एकमेव व्यवसायिक प्रोफेशनल मांत्रिक आहेत . त्यामुळे हे कधीही कुठल्याही देवाशी एकनिष्ठ नव्हते आणि आताही नाहीत. हे नेहमीच वर्तमानात जे देव चालतात त्या देवांना आपल्या पद्धतीने मांत्रिकी पद्धतीत सामावून घेतात आणि त्याचा व्यवसाय करतात आपल्याकडे अनेकांचे गैरसमज असा आहे की ब्राह्मण धर्माचे देव हेच वैदिक धर्माचे देव होते पण प्रत्यक्षामध्ये जर का आपण वेद वाचले तर त्यामध्ये ब्राह्मण लोकांचा फारसा उल्लेख दिसत नाही आणि जे मंत्र कोणी रचलेले आहेत ते स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेत नाहीत ते स्वतःला ऋषी म्हणून घेतात आणि त्यांच्यातले अनेक जण वेगवेगळ्या समाजामधून आलेले आहेत. त्यामुळे वैदिक देवता ह्या ऋषी या संस्थेने जन्माला घातलेल्या आहेत त्यांचा ब्राह्मणांशी संबंध नाही ब्राह्मणांनी तो पुढे आपल्या मांत्रिकी साठी जोडला आणि त्यातून ब्राह्मण धर्म निर्माण केला आणि वैदिक धर्म गिळून टाकला. जेव्हा यज्ञ या संस्थेला अनुयायी मिळणे कठीण झाले तेव्हा मग त्यांनी वैदिक धर्माचा ही त्याग केला आणि यज्ञसंस्थेचाही त्याग केला व पूजा पद्धत स्वीकारली. त्यातूनच मग शैव सिद्ध स्वीकारले आणि त्या सर्व मुख्य पाच सिद्धांना या लोकांनी नवे दैवत रूप दिले आणि त्यातूनच महादेव शंकर पार्वती स्कंद अय्यप्पा गणपती कार्तिकेय ईश्वर वगैरे वगैरे देवरुपे उदयाला आली आणि ती नवीन दैवत म्हणून प्रस्थापित झाली . पुढे मग ग्रीक , हूण , मंगोलियन आणि शक आक्रमणानंतर ग्रीकांची व इतर परकीयांची प्रजा झालेल्या जनतेने जन्माला घातलेल्या वासुदेव या धर्माची सांगड त्यांनी ब्राह्मण धर्माशी घालत नवीन वैष्णव धर्म निर्माण केला . आता त्यांची लॉयल्टी पुन्हा एकदा शिफ्ट झाली आणि नवीन वैष्णव दैवत संस्था उदयाला आली म्हणजेच ब्राह्मण वळणाचे किंवा ब्राह्मण लोकांचे स्वतःचे असे काही देव दिसतच नाहीत ते कायमच दुसऱ्यांचे देव उधार घेतात आणि स्वतःला हवे तसे रूप देत त्या रूपाला कॅश करतात . या लोकांचा मुख्य धंदा हा मांत्रिकी आहे साहजिकच मग पूजा पद्धतीमध्ये सुद्धा यांनी ही मांत्रिकी घुसवलेली दिसते इतकेच नव्हे तर एकेकाळी पंडित झालेले सगळेच्या सगळे भगत या लोकांनी पुन्हा एकदा मांत्रिकीकडे वळवले आणि त्यांना ते ब्राह्मण धर्मात टिकावेत म्हणून मानसन्मान देणे गरजेचे असल्याने ब्राह्मण करून टाकले. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बरेचसे पंडित हे हळूहळू पुन्हा भगत झाले मांत्रिक झाले आणि पुन्हा एकदा संपूर्ण तंत्र श्रुती ही मांत्रिकांच्या आहारी गेली आणि यांना लोक तांत्रिक म्हणायला लागले . हिंदू धर्म हा त्यामुळेच मांत्रिकीची बजबजपुरी बनला. साहजिकच अशा या धर्मापुढे जेव्हा इस्लामचे आव्हान समोर टाकले तेव्हा मुळातच त्या आव्हानाला पेलता येईल अशी मानसिकताच तयार नव्हती. ती पुढे बसवेश्वर , गुरुनानक आणि शिवाजी महाराज यांना तयार करावी लागली . हा नवा शैव धर्म होता आणि म्हणूनच तो इस्लामला पराभूत करू शकला आणि दिल्ली आपल्या नियंत्रणात आणू शकला .

या काळात अनेकदा शैव धर्म हा कळत नकळत ब्राह्मणांची ढाल बनत होता आणि म्हणूनच आज सुद्धा ब्राह्मणांना शैव धर्म टाळता येत नाही त्यांना हे आतून कुठेतरी माहिती आहे की आपले रक्षण फक्त हर हर महादेव म्हणणारेच करतात 

जर का उद्या हे संरक्षण ब्राह्मण धर्माने काढून टाकले तर फार मोठा संघर्ष आणि फार मोठी फाळणी होणे अटळ आहे . त्यामुळे असा संघर्ष न होण्याची जबाबदारी ही पूर्णपणे ब्राह्मण धर्मावर आहे आणि ब्राह्मण लोकांच्यावर आहे . सदा सर्वकाळ शैवधर्म गप्प बसत नाही हा इतिहास आहे त्यामुळे त्यांच्या संयमाची परीक्षा पाहूच नका. नवे वातावरणच असे तयार होते आहे की नवीन शिवाजी महाराज उदयाला यावेत . हे कोणाला किती परवडणारे आहे याचा नीट अभ्यास करणे तुम्हाला नवी दिशा दाखवू शकते. 

जय हिंद हर हर महादेव जय शिवजी जय भवानी 

श्रीधर तिळवे नाईक

सत्य व्यवहारवाद आणि उत्तर व्यवहारवाद १२ माया कला आणि उत्तर व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 

लॉजिकल पॉझिटिव्हिजनचा काळ साधारणपणे 1950 च्या आसपास संपायला लागला आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये सौंदर्य व्यवहारांमध्ये काही नवीन गोष्टी चमकताना दिसायला लागल्या याचे कारण उघड होते

साम्राज्यवाद संपला तेव्हा दोन्ही बाजूंनी म्हणजे इंग्लंड आणि भारत अशा दोन्ही ध्रुवांवर राज्य करणारे एक मेगा narrative कोसळले आणि इंग्लंड साम्राज्यापासून स्वतंत्र झाला तर भारत साम्राज्यवादापासून स्वतंत्र झाला . साहजिकच लंडन हे आता जागतिक केंद्र उरले नाही आणि प्रथमच लंडन चा विचार इंग्लंडचे लंडन या पद्धतीने होऊ लागला . लंडनला समांतर अशी अनेक सत्ता केंद्र उदयाला आली आणि ती ब्रिटिश साहित्यात सुद्धा कार्यरत झाली आयर्लंड स्वतंत्र झाले होते स्कॉटलंड स्वतंत्र झाले होते आणि त्यांच्या जाणीवा या ब्रिटिश आहेत की नाही यावरच वाद होऊ लागला . याद भरीस वर म्हणून ज्यांच्यावर राज्य केले होते त्या लोकांचे झालेले स्थलांतर आता वेगळ्या प्रकारचे इंग्लिश निर्माण करायला उतावीळ झाले होते ज्यातून पुढे सलमान रश्दी सारखा लेखक निर्माण होणार होता 

या काळातला उत्तर व्यवहारवाद हा व्यवहारातील भाषांना अतिशय महत्त्व देत होता साहजिकच बोलीभाषा आणि स्थानिक बोली यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले . अचानक कवितेमध्ये कवींची सांस्कृतिक पार्श्वभूमी वाद्यवादन करू लागली. चांगली कविता आणि वाईट कविता असे दोन कवितेचे प्रकार जास्त महत्त्वाचे झाले . शक्यतो वाईट कवितेची सर्व लक्षणे टाळणे सुरू झाले. 

सर्वात मुख्य प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे सौंदर्य हे विज्ञाननिष्ठ पद्धतीने विश्लेषणाच्या कक्षेत आणता येईल का ? जोपर्यंत धार्मिक कला राज्य करत होत्या तोपर्यंत धार्मिक सौंदर्यशास्त्र राज्य करत होते परंतु पुरोगामी कालखंडामध्ये विज्ञान हे केंद्रस्थानी आले आणि साहजिकच कलेची वैज्ञानिक मीमांसा सुरू झाली आणि त्यातूनच पुढे सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्य विज्ञान नावाचे एक विज्ञाननिष्ठ विश्लेषण पुढे यायला लागले . ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये सर्व गाईंच्या मध्ये "गोत्व" हा सत्वात्मक घटक असतो त्याचप्रमाणे सर्व कलाकृतींच्या प्रमाण मध्ये "सौंदर्य"हा सत्वात्मक घटक असतो अशी ही धारणा होती अर्थातच 1950 नंतर याला आव्हान देणार आहे लोक निर्माण झाले आधुनिक सिद्धांतांचे जे वैशिष्ट्य आहे त्यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे द्विध्रुवात्मकता ! साहजिकच राबा पाटणकर यांनी आपल्या सौंदर्य विश्लेषणात लौकिकतावादी आणि अलौकिकतावादी असे दोन ध्रुव कल्पून सौंदर्यशास्त्राचा इतिहास मांडला या काळामध्ये टीएसीएलटीने एलियट याने परंपरेची पुन्हा स्थापना केली आणि सर्व साहित्य हे परंपरेची जोडले गेले पाहिजे आणि लेखक परंपरेत उभा राहून लिहितो असा सिद्धांत मांडला ज्याचा प्रचंड प्रभाव आपल्याकडच्या सर्व आधुनिक साहित्यिकांच्या वर पडलेला दिसतो आणि त्यातूनच पुढे देशी वादाचा उदय झाला या देशी वादामुळेच देशी सौंदर्यशास्त्राचा नेमका काय प्रकार आहे ही चर्चा सुरू झाली.

इंग्लंडचे राज्य होते तोपर्यंत इंग्लंडच्या सौंदर्यशास्त्र विरोधात सुद्धा जाण्याची तयारी अनेकांची नव्हती अपवाद फक्त गांधीच असावेत आता मात्र इंग्लिश भाषेची दादागिरी सहन करण्याची गरज राहिली नाही साहजिकच देशी सौंदर्य शास्त्री जे होते त्यांच्या विश्लेषणाचे नीट अध्ययन सुरू झाले त्यातूनच मग धार्मिक कलांचा अभ्यास सुरू झाला. मात्र हा अभ्यास पुरेसा होता का ? देशीवादाने विठ्ठल आणि खंडोबा हे दोघेही देशी देव आहेत अशी संकल्पना मांडली पण प्रत्यक्षामध्ये प्रस्थापित केली नाही उलट वैष्णवादाला अधिकाधिक उत्तेजन देणारे लिखाण केले म्हणजेच उत्तर भारतीय लोकांचा मार्गी वाद या लोकांनी स्वीकारला . सौंदर्यशास्त्रामध्ये तर संपूर्णपणे संस्कृत साहित्य शास्त्राची दादागिरी सुरू झाली . देशीवादाने या दादागिरीला विरोध केला आणि आपले सौंदर्यशास्त्र संतांच्या साहित्यापासून सुरू केले परंतु ज्या तऱ्हेने मर्ढेकर आणि प्रभाकर पाध्ये यांनी जसे नवीन सिद्धांत तयार केले सिद्ध केले तसे काही या लोकांना जमले असे वाटत नाही . वास्तविक खरा प्रश्न असा होता की ज्याप्रमाणे गणितामध्ये सेट थेरी अप्लाय होते आणि दोन गोष्टींचे सेट वेगळे असू शकतात म्हणजे नैसर्गिक नंबरचा सेट एक असला तरी नंतर समसंख्यांचा एक सेट आणि विषम संख्यांचा एक सेट असे दोन सेट होऊ शकतात त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा विज्ञानाचा एक सेट तयार होतो आणि अनुभवाचा एक सेट तयार होतो असे आपण म्हणू शकतो आणि आपण असेही पुढे जाऊन म्हणू शकतो की अनुभवाचा जो सेट असतो तो पूर्णपणे वेगळा असतो आणि त्याचाच आधार घेऊन कला क्रीडा आणि धर्म निर्माण होतात . या तिन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी अनुभव असतो आणि अनुभवांमध्ये ज्ञान आहे आवश्यक असले तरी ते केंद्रस्थानी असत नाही . इथे इंद्रिय आणि मन यांची जी प्रोसेस अनुभव्य जे असते त्याला जाऊन भेटते भिडते . सचिन तेंडुलकर जेव्हा खेळत असतो तेव्हा आपण फक्त अनुभव घेत असतो सचिनची उंची किती आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्याचे जेनेटिकोड आहे ते पाहत नसतो तर आपण फक्त त्याची बॅटिंग पाहत असतो त्या बॅटिंगचा अनुभव घेत असतो सर्वसाधारणपणे हेच कलाकृतींच्या बाबतीतही घडते तिथे सुद्धा आपण केवळ अनुभवच घेत असतो म्हणजेच अनुभव हा जर का आपण एक वेगळा अनुभव संच मांडला तर त्यास अनुभव संचामध्ये आपण कला क्रीडा आणि धर्म यांचा समावेश करू शकतो . यातील धर्म आवश्यक नाही त्यामुळे तिथे आपण वेगळे उत्सव आणले पाहिजेत आणि असे उत्सव आपण अलीकडच्या काळामध्ये आणायला सुरुवात केलेली आहे मात्र धार्मिक उत्सव पूर्णपणे समाजामधून गायब करणे आवश्यक आहे ते होत नाहीये आणि म्हणूनच धर्माचा प्रभाव कमी होत नाही . भारतीय जनता पक्ष जेव्हा कुंभमेळ्यासारखी घटना घडवतो तेव्हा त्याला अनुभव द्यायचा असतो आणि म्हणूनच अनुभव सादर करणे म्हणजेच इव्हेंट होय आणि हा अनुभव इइव्हेंट असेल तर त्याची व्याप्ती वाढत जाते एका अर्थाने हे चिन्हघटन असते आधुनिक आणि उत्तराधुनिक कालखंडामध्ये सर्वसाधारणपणे घटना हे घटन होते परंतु चौथ्या नव्हते मध्ये अचानक हे घटन फक्त घटना राहता चिन्हघटन जालघटन झाल्याने त्याला एक विशिष्ट प्रकारची दिशा प्राप्त व्हायला लागली म्हणजेच सादरीकरण करतानाच हे सादरीकरण टीव्ही आणि मोबाईलवर सादर होणार आहे हे गृहीत धरूनच घटनाचे सादरीकरण होऊ लागले त्यामुळे त्याचे मांडण शिल्प बदलले मांडण स्थापत्य बदलले आणि त्याची प्रोसेस त्याचा व्यवहार त्याचा व्यापार बदलला . लौकिक आणि अलौकिक असे दोन्ही आधुनिक ध्रुव कोसळून पडले आणि उरले ते फक्त सादरीकरण ! सादरीकरणात दोनच ध्रुव असतात एक सादर करणारे आणि दुसरे ते सादरीकरण आत घेणारे ! म्हणजेच सादरक आणि सादरसिक! अनेकदा तर हे दोघे एकमेकाला भिडतात विशेषता प्रत्यक्ष इव्हेंट मध्ये असे घडू शकते म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की इथे अचानक सेकंड आणि थर्ड ऑडियन्स तयार होतो म्हणजेच मैदानामध्ये उपस्थित असलेला प्रत्यक्ष पहिला ऑडियन्स आणि या सर्वांचे प्रक्षेपण सादर करण्यासाठी शूट करणारा शूट करता करता पाहणारा दुसरा ऑडियन्स आणि या सगळ्याचे प्रक्षेपण एडिट करणारा तिसरा ऑडियन्स आणि शेवटी पाहणारा चौथा प्रक्षेपणिक ऑडियन्स ! 

याचा मग साहजिकच सादर करणाऱ्या माणसावर सुद्धा परिणाम होतो. उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये आपण पाहतो की आता काही कॅच केवळ टेलिव्हिजनवर कसे दिसतील म्हणून कॅच घेतानाच मॅनेज केले जातात. हीच गोष्ट शॉट मारताना घडते कधी कधी आणि अनेकदा हल्ली बॉलर लोक आपली काही सिग्नेचर परफॉर्मन्स ची स्टेप तयार करतात . फोर लेयर ऑडियन्सचा पडलेला हा प्रभाव आहे . 


कविता सादर करताना कधी कधी असे घडते का तर हो असे घडते . अनेकदा रसिकांचा मूड बघून कविता बदलल्या जातात . मला आठवते की एकदा चौघांच्या कविता कार्यक्रमात आम्हाला अचानक कळले की इथे फार गंभीर काही चालणार नाही साहजिकच तिघांनी आपल्या लाईट लाईट कविता काढल्या आणि मी सुद्धा ऑब्जेक्शन घेणारा त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतले नाही कारण ऑडियन्स खरोखरच तसा खतरनाक होता. आता हे मी होतो पण जर का खरोखरच लोकांच्या मनोरंजनासाठी होणारे काव्यवचन असेल तर तिथे किती मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतात याची कल्पना येते . याउलट विलास कुमार कांबळे यांच्या मित्राने प्रिन्सिपल झाल्यानंतर एक काव्यवाचन त्याच्या कॉलेजमध्ये ठेवले होते आणि मी एकटाच कविता वाचणारा होतो. चौथ्या नवतेच्या कविता असून सुद्धा खेड्यातून आलेल्या या सर्व कॉलेजच्या पोराने त्या काळात इतकी मोकळी जात दिली होती की टाळ्यांच्या वर टाळ्या पडत होत्या प्रश्न असा होता की त्यांना ह्या कविता सहजरित्या कशा काय कळाल्या याचा याचे कारण त्यांच्यावर कसले संस्कार झालेले नव्हते पूर्वी मुक्त गजला मी बिनधास्त वाचायचो आणि त्या अॅप्रिसिएट व्हायच्या त्याबाबतीच्या अफवा पसरवल्या जातात त्या खोट्या आहेत तेव्हा अनेकदा वाईट कवितांचे संस्कार झाले की रसिक बिघडायला लागतात अन्यथा ते खूप ओपन असतात हा माझा अनुभव आहे .

काव्यवाचन हा एक थेट व्यवहार आणि व्यापार असतो साहजिकच मी तो मुद्दाम म्हणून अधून मधून करत असतो कारण लोकांच्यात नेमके काय चाललेले आहे ते कळते 

अर्थातच काव्य वाचण्याचा इव्हेंट व्हावा की न व्हावा हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो . आपण मुळातच ज्या पद्धतीच्या युगात वावरतो आहे तिथे मला स्वतःला काव्यवाचन हे खूप आवश्यक वाटत आलेले आहे आणि मी कायमच त्याला जोरदार पाठिंबा दिलेला आहे . 

प्रश्न असा आहे की काव्यवाचनाचे म्हणून काही नवीन सौंदर्यशास्त्र निर्माण होऊ शकते का ? उदाहरणार्थ अशोक नायगावकर यांच्याकडे एक विशिष्ट पद्धतीची शैली आहे तर आपण त्या शैलीचा काही सौंदर्यात्मक पातळीवर विचार करणार आहोत का ? किंवा अनुभवाच्या पातळीवर ? 


आज आपण असे नक्की म्हणू शकतो की सौंदर्य हा अनुभवाचा केवळ भाग आहे पण अनुभव हा याहून अधिक काही शक्तींनी युक्त असतो . सौंदर्य शक्ती ही केवळ एक शारीरिक शक्ती आहे आणि ती कवितेमध्ये किंवा कलेमध्ये फॉर्म ची शक्ती म्हणून येते . 

कांट, हेगेल , ब्राँसांके ,क्रोचे आणि कलिंगवूड या पाचही विचारवंतांनी ज्ञानाच्या व्यवस्थेपेक्षा सौंदर्याची व्यवस्था वेगळी असते असे सांगितले खरे परंतु ते हे सांगायला विसरले की ही व्यवस्था प्रत्यक्षात सौंदर्याची नसून अनुभवाची व्यवस्था असते . प्रत्येक अनुभव हा सौंदर्याने भरलेलाच असेल असे नाही एखादा अनुभव अत्यंत फ्रस्टेशननेसुद्धा भरलेला असू शकतो आणि तो तरीही कलात्मक अनुभव असू शकतो म्हणजे वेटिंग फॉर गोदो या नाटकामध्ये आपणाला सौंदर्य अनुभव मिळतोच असे म्हणता येत नाही . माझ्या मते आपण सौंदर्य अनुभव असा शब्द वापरण्यापेक्षा व्यवहारमुक्तअनुभव असा शब्द कलेतल्या अनुभवासाठी वापरावा म्हणजे व्यवहारा पासून मुक्त असलेला अनुभव ज्याला आपण व्यवहार मुक्त अनुभव म्हणू शकतो . माणसांच्या आयुष्यात असे व्यवहार मुक्त अनुभव असतात अगदी मैत्रीमध्ये सुद्धा असे अनुभव येतात दुर्देवाने मैत्रीमधले असे व्यवहार मुक्त क्षण आता कमी होत चालले आणि खरी चिंतेची गोष्ट तीच आहे . एकीकडे आपण सातत्याने टीव्ही पुढे बसतो स्क्रीन पुढे बसतो याचे सर्वात मोठे कारण तिथे मिळणारे व्यवहार मुक्त अनुभव होय जवळजवळ 70 टक्के अनुभव आपण केवळ अनुभवासाठी अनुभव म्हणून घेत असतो म्हणजेच एका अर्थाने 70 टक्के जीवन हे सध्या व्यवहार मुक्त अनुभवाने व्यापून टाकलेले आहे. माणसे त्यामुळेच जालव्यसनाधीन होत आहेत हे जाल व्यसन इतके वाढत चालले आहे त्याचे कारण ते व्यवहार मुक्त आहे असे आपणाला वाटते प्रत्यक्षामध्ये ते आपल्याला निष्क्रिय ही बनवत आहे हे आपण लक्षात घेत नाही . व्यवहार मुक्त जीवन हे मोक्षयुक्त जीवन असेलच असे नाही. कारण व्यवहार मुक्त जीवनामध्ये अनुभव व्यवहारापासून मुक्त वाटत असला तरी प्रत्यक्षात तो तसा असत नाही तो अनेकदा तुम्हाला बेशुद्ध करण्यासाठी वारंवार सादर केला जाऊ शकतो. म्हणजेच तो पॉलिटिकल असू शकतो . याचा अर्थ जाल व्यवहार ही एक अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आता बनत चालले कारण ज्या व्यवहारातले अनुभव हे अत्यंत इनोसंटली कला अनुभव असल्यासारखे व्यवहार मुक्त अनुभव असल्यासारखे सादर केले जातात अगदी बातम्या सुद्धा कलासादर व्हावी कला अनुभव सादर व्हावा तशा पद्धतीने सादर होतात . 

म्हणूनच जालव्यसनापासून मुक्ती ही आता मोक्षासाठी बेसिक गरज बनून गेली आहे 

श्रीधर तिळवे नाईक


व्यवहार वाद ,उत्तर व्यवहारवाद, हिंदुत्ववादी वर्तनाचा प्रत्यक्ष व्यवहार अर्थात सावरकर वादी हिंदुत्ववादाच्या व्यवहाराची चौकट आणि त्यांना मिळणारे यश उदाहरणार्थ मंगेशकर परिवार ते श्री श्याम पोंक्षे श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये एका विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणाऱ्या सावरकर केंद्री लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या तुम्हाला पदोपदी भेटत असते तिचे वागणे अतिशय सभ्य असते बोलण्यातले उच्चार अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट असतात आणि सादरीकरण हे विसाव्या शतकाला आणि एकविसाव्या शतकाला साजेसे असते. साहजिकच तुम्ही या लोकांच्या प्रेमात पडता. वैयक्तिक पातळीवर तुमच्याशी यांचे संबंध कायमच मधुर राहतात .ते तुम्हाला वापरत राहिले तरीसुद्धा तुम्हाला धन्यता वाटत राहते आणि अचानक एखाद्या आणीबाणीच्या क्षणी तुम्हाला कळून चुकते की आवश्यक ती मदत आलेली नाही फक्त शब्दाचा फुलोरा आलेला आहे तेव्हा मग तुम्ही थोडेसे सटपटता बोलाचीच कढी बोलाचाच भात असा हा प्रकार असतो अपवादात्मक वेळेला कधीतरी अचानक पणे मदत केली जाते पण ही मदत अनेकदा हे लोक एकमेकांना आपापसातच करत असतात त्यांचा विचार तुम्ही स्वीकारलेला नाही हे लक्षात आले की व्यवहाराची तरा ही वेगळी असते. 


हा व्यवहार नेमका काय असतो आणि त्याचे तत्त्वज्ञान असते का तर हो त्याचे तत्त्वज्ञान असतं हा व्यवहार स्पष्ट आणि स्वच्छपणाने सावरकर यांचा उपयुक्ततावाद आणि व्यवहारवाद यांची सांगड घालत उभा राहत असतो 


सर्वसाधारणपणे हे लोक मोक्ष स्वीकारतात मात्र हा मोक्ष वेदांती असतो हे लोक तुमच्या सर्व देवतांना भेट देतात मात्र त्यांना हे माहीत असते की ही भेट केवळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून आपण देतोय . साहजिकच जो देव फळतो त्यामागे हे लोक जास्त असतात अपवादात्मक वेळेला श्रद्धात्मक आकलन डेव्हलप होत असते मात्र मनोमन कुठेतरी हे लोक नास्तिकच असतात आणि देवाकडे सुद्धा उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून बघत असतात अनेकदा काही लोक आतून कट्टर नास्तिक असतात आणि सावरकरांनाच मानत असतात पण हे बोलून दाखवत नाहीत जनतेच्या भावनेला ठेस पोचता कामा नये याविषयी हे विलक्षण सजग असतात. साहजिकच जनसामान्यांना याविषयी एक विश्वास निर्माण झालेला असतो हे कधीही तुमच्या पैशाची चोरी करत नाहीत त्यामुळे वागण्यामध्ये एक प्रकारचा विलक्षण प्रामाणिकपणा आहे असे वाटत राहतं मात्र हे आपल्या हक्काचे पैसे कधीही सोडत नाहीत ते कसे वसूल करायचे याविषयी साम दाम दंड भेद हे यांना फार क्लिअर असते फार अपवादात्मक वेळेला समोरच्याची स्थिती खरोखरच देण्यासारखी नाही याची खात्री यांना पटली तर हे तुम्हाला क्षमा करू शकतात क्वचित घडणारी घटनास्थळी विशेषता जर यांच्याजवळ पुरेसा पैसा पोहोचलेला असेल आणि समोरचा आपल्याला या पैशामुळे काहीही बाधा आणणार नाही याची खात्री पटलेली असेल तर हे पैसा सोडून देतात अन्यथा आपल्या हक्काचा पैसा हा वसूल कसा करायचा हे बघत असतात. सर्वसाधारणपणे एक गोष्ट आणखी कॉमन असते ती म्हणजे हे लोक जेव्हा उधारीने पैसे घेतात तेव्हा तो पैसा शक्यतो बुडवत नाहीत त्यामुळेच जनसामान्यांना कायमच या लोकांच्या विषयी एक आदर वाटत राहतो . 


दुसरी गोष्ट व्यवहारामध्ये जेव्हा भावनेचा प्रश्न येतो तेव्हा हे कधीही भावनेला प्राधान्य देत नाहीत हे व्यवहार अत्यंत चोखपणाने करतात त्यामुळेच लता मंगेशकरने नाकारलेली गाणी आशा भोसले व्यवस्थित गाते अनेकदा आशा भोसले चे किंवा लता मंगेशकर चे एखाद्या व्यक्तीशी काही भांडण झाले असेल तर असे कधी होत नाही की एका व्यक्तीचे एका बहिणीचे भांडण झाले म्हणून दुसऱ्या बहिणीने त्या संगीतकाराशी संबंध तोडले याचे कारण स्वतःचे व्यवहारिक संबंध कधीही झाले तरी बळी द्यायचे नाहीत याविषयी हे लोक विलक्षण सजग असतात पैसा जर का आपल्याच घरामध्ये येत असेल तर तो येऊ द्यावा अशी ही भावना असते अनेकदा जर का स्वतःच्या व्यवहारामध्ये उपयुक्तता दिसत असेल तर हे लोक बिनधास्तपणे भावना बाजूला ठेवून आपल्याला मिळालेली असाइनमेंट कम्प्लीट करत असतात यामध्ये अनेकांना असे वाटते की बहिणींचा झगडा होईल भांडण होईल परंतु प्रत्यक्षामध्ये असे काहीही होत नाही व्यवहार चोखपणे पार पाडला जातो म्हणजेच यदाकदाचित एकमेकाशी स्पर्धा आहे हे लक्षात आले तरी ही स्पर्धा ते वैयक्तिक पातळीवर कधीही घेत नाहीत आणि वैयक्तिक भावना घरामध्ये वेगळ्या आणि व्यवहारिक भावना व्यवहारांमध्ये वेगळ्या अशा तऱ्हेचे वर्गीकरण सहजरीत्या केले जाते .


लैंगिक बाबतीत हे लोक अत्यंत स्वच्छ असतात. ब्रह्मचर्य यांना साधायचे असते परंतु जर का ते साधले जात नसेल तर लैंगिकता ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट असे हे लोक समजत असतात आणि त्यामुळेच दोन लोकांचे जे प्रमाण काही लैंगिक पातळीवर चाललेले असते त्यामध्ये हे लोक कधीही डोकावत नाहीत तो त्यांचा आपापसातला व्यवहार आहे आणि आपण कशाला त्यात झक मारा अशा प्रकारची भावना असते त्यामुळे साहजिकच दोन पक्ष जर का संमतीने हे सर्व काही करत असेल तर हे लोक कधीही त्या दोन लोकांना त्रास द्यायला जात नाही . अनेकांना हिंदुत्ववादी संघटनेमध्ये होणारे लैंगिक व्यवहार हा इशू बनवावा लागतो परंतु प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा इशू संघटनेमध्ये अस्तित्वातच नसतो. या अंगाने कधीही संघटना हस्तक्षेप करत नाही त्यांच्या दृष्टीने तो आतला घरातला प्रकार आहे आणि त्यांचा त्यांनी तो बघून घ्यावा अशीच संघटनात्मक भूमिका असते . जर का त्या दोघांचा व्यवहार चव्हाट्यावरच आला तर मात्र अशा लोकांची खूपदा पंचाईत होते . शक्यतो कामवासना हा पब्लिक प्लॅटफॉर्म वरचा व्यवहारच नव्हे याविषयी हे लोक अत्यंत स्पष्ट असतात . याबाबतीचा संघटनात्मक गोंधळ हा अनेकदा इतर संघटनांचा प्रश्न होतो आणि अनेकदा सोयीस्कर रित्या मौन पांघरून हे लोक हे सर्व काही गाडले जाण्याची विसरले जाण्याची तशी वेळ येण्याची वाट बघत व्यवस्थित कल्टी मारतात . कालांतराने हे सर्व डिस्कशन आपोआप विझले जाते .


या लोकांचा कधीही अहिंसा या गोष्टीवर विश्वास नसतो त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य युद्ध हे सावरकर आणि नंतर बोस यांच्यामुळे जिंकले गेले आणि यांच्या सशस्त्र वादामुळेच जिंकले गेले याविषयी यांच्या मनामध्ये काडीची ही शंका नसते त्यामुळेच यांच्यातले अनेक जण भगवद्गीते मधील श्रीकृष्णाचे कट्टर समर्थन करतात आणि ते याबाबतीत गांधीजींना कायमच खलनायक मानत असतात . त्यामुळे सर्वसाधारणपणे गोडसे यांनी गांधी यांच्या हत्येबद्दल अनेकदा व्यवस्थित मौन पाळले जाते मात्र खाजगी मध्ये ह्या लोकांना ही हत्या झाली हे बरोबर झाले नाही हे मान्य असू शकते अनेकदा असेही असू शकते ही चुकलेली गोष्ट आहे परंतु यावर सार्वजनिक भूमिका घ्यायची नाही हा सर्व व्यवहार या संदर्भामध्ये नेहमीच उपयुक्तता काय आहे हे पाहून पार पाडला जातो. 


भारतामधील सशस्त्र क्रांतीचा व्यवहार त्या सशस्त्र क्रांतीचा इतिहास त्यामुळेच वारंवार मांडला जातो आणि यामध्ये मग शिवाजी महाराज सुद्धा येतात कारण त्यांनी सशस्त्र प्रतिकार केला आणि शिवाजी महाराज हे हे वैदिक राज्याभिषेक झाल्यामुळे कसे सशस्त्र हिंदूवादी होते अशी भूमिका सातत्याने बिंबवत नेली जाते आणि नंतर मग पहिला बाजीराव प्रमोट केला जातो आणि नंतर कळत नकळत उत्तर पेशवाई प्रमोट केली जाते . मग लोकमान्य टिळक आणि सावरकर येतात आणि मग सुभाष चंद्र बोस येतात आणि नंतर मग हिंदुत्ववादातले काही लोक येतात हा एक क्रोनोलॉजिकल ऑर्डरचा प्रकार असतो आणि तो कायम प्रमोट केला जातो त्यामुळेच शिवाजीचे गुरु कोण या विषयांना शंका नसते आणि त्या अंगाने वारंवार रामदास स्वामी लोकांच्या पुढे आणून त्यांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून बिंबवले जाते इतकेच नव्हे तर अनेकदा भाषणांच्या मध्येच स्वामी समर्थ रामदासांचा जो व्यवहारच होता जो व्यवहारिक उद्देश व उपदेश होता तो वारंवार आणला जातो आणि अनेकदा हे लोक त्या उपदेशाला खुद्द सावरकर कसे फॉलो करत होते तसे फॉलो करतात आणि त्यामुळेच अनेकदा हे लोक यशस्वी सुद्धा झालेले दिसतात हा व्यवहार सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत असतो परंतु त्याचबरोबर व्यवहारात वाकताना नि: शस्त्रवाद स्वीकारणे गरजेचे असेल तर ते स्वीकारले जाते अनेकदा स्वतःच्या जर भयावर माय मात करता आली नाही तर निदान बोली भाषेत कृती करत राहावे ही मर्यादा स्वीकारत हिंसा आणली जाते . हिंसा अतिशय सूक्ष्म असते आणि स्वतःला नाही जमली तर मग निदान सुभाषचंद्र यांना कशी ती जमली ते सांगितले जाते सातत्याने आणि बिंबवले जाते. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या रस भरीत कहाण्या सांगितल्या जातात अनेकदा या कथा सांगताना यांना चेव चढतो तो बघून यांच्या राष्ट्रीय प्रेमाविषयी कोणालाही शंका नसते मात्र जर का वेळ पडली तर हे लोक व्यवस्थित परदेशात जाऊन सेटल होतात आणि तिथे पुन्हा एकदा आपला हा हिंदुत्ववाद अतिशय व्यवस्थितरीत्या प्रमोट केला जातो एकमेकांना मदत सुद्धा केली जाते आणि यांचे अनेकदा आपापसात न सांगता संघ बनत जातात . अनेक लोक असे आहेत जे कळत नकळत अशा वेळेला विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्यासारखे वागत असतात आणि हे वागणे अनेकदा समोरच्या लोकांना लक्षात येत नाही 


या व्यवहारवादाचे एक विलक्षण वैशिष्ट्य असे असते की सावरकर यांनी जी जेनेटिक्स अनुवंशिक अशी गुणांची परंपरा स्वीकृत केलेली असते आणि ही परंपरा ब्राह्मणांच्यात आहे ब्राह्मणांच्यात कळत न कळत एक जन्मदत्त श्रेष्ठत्व आहे आणि हे श्रेष्ठत्व त्यांना त्यांच्या जीन्स मधून मिळालेले आहे अशी एक जी मांडणी आलेली असते ती स्वीकारली जात असते आपल्या श्रेष्ठत्वाबद्दल या लोकांना काडीचीही शंका नसते पण त्याचबरोबर या लोकांना ब्राह्मणे तर लोकांच्या मध्ये अशा प्रकारचे श्रेष्ठत्व असलेले गुण असलेले लोक मान्य असतात आणि ते लोक हे बरोबर हेरत असतात आणि त्यांना जर का सावरकरवाद पटलेला असेल तर मग ते आपलेच मानतात यामुळे होते काय बहुजन समाजातले मंगेशकरांच्या सारखे लोक हे स्वतःला कट्टर सावरकरवादी समजतात आणि त्यांचे प्रमोशन सर्व लेवलला हे लोक करत असतात तिथे मग ब्राह्मण्य आडवे येत नाही अनेकदा तर समाजातले एक्स्ट्रा ऑडिनरी टॅलेंट असेल तर ते त्याला कधीही बाधा आणत नाही उलट त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा सर्व प्रयत्न केला जातो आणि मग ब्राह्मणे तर समाजातला माणूस हळूहळू हिंदुत्ववादी ब्राह्मण बनत जातो आणि एक कर्मनिष्ठ हिंदुत्ववादी ब्राह्मण तयार होत जातो . हे अत्यंत सूक्ष्म रित्या तयार होत असते पण जर का हे लोक बहुजन समाजातले असून फ्लॉप झाले की मग मात्र हे लोक व्यवस्थितरित्या अंग काढून घ्यायला लागतात . त्यामुळेच राधा मंगेशकर यांच्या करिअरला या लोकांचा काडीचाही उपयोग होत नाही आणि बहुजन समाजातल्या लोकांच्या पुढे या विषयी शोक उरतो . 


सर्वसाधारणपणे या लोकांचा व्यवहार देण्याघेण्याच्या बाबतीत फारच विलक्षण असतो याबाबतीत हे कट्टर सावरकरांना फॉलो करत असतात म्हणजे काय तर हे लोक शक्यतो देत नाहीत पण घेताना मात्र हे लोक अजिबात लाजत नाही मग ती गोष्ट अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल किंवा दारू असेल बहुजन समाजातला एक माणूस हे सर्व जर का afford करत असेल तर हे लोक अतिशय गोड बोलत मधुर बोलत आनंदाने मग त्यांना झेपेल एवढीच दारू पीत सर्व व्यवहार चालवत असतात. अनेकदा मग बहुजन समाजातला माणूस गोंधळात पडतो कारण हे लोक या व्यवहारांमध्ये जोपर्यंत समोरचा देत असतो तोपर्यंत विलक्षण गोड असतात मात्र जर का दोन हिंदुत्ववादी सावरकर वादी लोक एकमेकांना भेटत असतील तर मात्र हा व्यवहार अतिशय सांभाळून केलेला व्यवहार असतो आणि ज्याने बोलावले त्याने मग मेहमाननवाजी करावी हे या लोकांना खूप स्पष्ट असते संपूर्ण व्यवहारामध्ये एक विलक्षण काटेकोरपणा आणि विलक्षण शिस्त आपणाला दिसते देताना हात आखडता घेतला जात नाही मात्र विचारपूस करताना एक प्रकारचा काटेकोरपणा तुम्हाला दिसतो . अन्न असो किंवा दारू असो वाया जाता नये याविषयी विलक्षण जागृत असतात मात्र माझा अनुभव असा की कधी ना कधीतरी या लोकांना दारू सिगरेट यासारखी व्यसने सोडायची असतात आणि जवळजवळ नव्वद टक्के लोक आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर दारू सिगरेट यासारखी व्यसने सोडतात आणि जे दहा टक्के सोडत नाहीत त्या माणसाविषयी या लोकांना मग काडीचीही सहानभूती असत नाही त्यांचे हे विलक्षण मर्यादित असलेले आयुष्य बहुजन समाजातल्या लोकांना कायमच आवडत राहते त्यांना त्यांच्यासारखे बनायचे असते आणि मग साहजिकच मी दारू किंवा सिगरेट कशी सोडली याची सुद्धा नंतर एक पेशंकश तयार व्हायला लागते सावरकरांचा जो संयम होता तो विलक्षण रित्या आपल्या आयुष्यात बाणवण्याचा प्रयत्न हे लोक सातत्याने करत असतात . अनेक लोक यशस्वी होतात. तुम्ही जर का बहुजन समाजातले मोकळे ढाकळे असाल तर मग तुम्हाला कधी कधी असे वाटते की ब्राह्मण असणे म्हणजे असेच असते त्यामुळे कधी कधी तुम्ही यावर विलक्षण रित्या टीका करू शकता परंतु आपली टीका फोल आहे अशी खात्रीसुद्धा या लोकांना वाटत असते . मुळातच अशा प्रकारचा संयम आपल्याला सुद्धा साधायला हवा होता असे नेहमी वाटत असल्याने हे लोक विलक्षण टोकाला जाऊन व्यवहार कधीच करत नाही आणि म्हणूनच या लोकांच्या वर आयुष्यात कधीही बहिष्कार टाकला जात नाही उलट आपल्या मुलांना अनेकदा हा व्यवहार सांगितला जातो की कसा हा ब्राह्मण काटेकोर आहे आणि काटकसरी आहे ते बघ आणि आत्मसात कर . संयम आणि काटकसर हा संपूर्ण यजमानगिरीचा एक विलक्षण व्यवहार असतो अपवादात्मक वेळेला मग नंतर अतिथी म्हणून सुद्धा हा व्यवहार पाळला जातो आणि जर का एखादी व्यक्ती यजमानगिरी आणि अतिथीगिरी यांच्यामध्ये जर का संपूर्ण समतोल साधून व्यवहार करत असतील तर मात्र असे लोक शक्यतो वारंवार बहुजन समाजाकडून बोलवले जातात कारण या लोकांच्या मुळे काहीही विलक्षण नुकसान होत नाही आणि हे लोक कंपनीला अतिशय चांगले वाटत राहतात.


हे लोक साधारणपणे आपली स्वतःची प्रायव्हसी कधीही सोडत नाही आणि त्यामुळेच अनेकदा यांच्या घरामध्ये तुम्हाला क्वचितच आमंत्रण मिळते. सर्व व्यवहार शक्यतो हॉटेल किंवा तस्सम गोष्टी मध्ये व्हावे याविषयी हे लोक विलक्षण रित्या जागृत असतात . जोपर्यंत तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण होत नाही तोपर्यंत हे लोक शक्यतो त्यांच्या फॅमिली मध्ये कुटुंबामध्ये हे घेऊन जात नाहीत. पुन्हा अपवाद शक्यतो यांच्यासारखेच जे हिंदुत्ववादी लोक असतात तिथे मात्र अनेकदा एकमेकांबद्दल आधीच विश्वास निर्माण झालेला असतो त्यामुळे मग परस्परांच्या घरी जाणे येणे होत राहते .


या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे असते की एकदा जर का व्यवहार ठरला कि तो व्यवहार हे लोक कधीही सोडत नाहीत यातले बहुतांशी लोक हा व्यवहार चोखपणे पार पडतात त्यामुळेच अनेकदा असे होते की व्यवहाराच्या पातळीवर हा व्यवहार बहुजन समाजातल्या अनेक लोकांना परवडणारा असतो अनेक यशस्वी झालेले बहुजन समाजातील लोक शक्यतो ब्राह्मणांनाच कामावर का ठेवतात याचे कारण या लोकांचा हा चोख व्यवहार असतो हे शक्यतो आपल्या मालकाचे नुकसान होऊ देत नाहीत . किंबहुना जास्तीत जास्त आपल्या मालकाचा फायदा व्हावा म्हणून हे याबाबतीत विलक्षण आणि प्रामाणिक कष्ट करत असतात .राजकीय पातळीवर एकदा का मालकाने आपले धोरण काय आहे ते सांगितले की मग हे धोरण कसे अमलात आणायचे याविषयी हे लोक विलक्षण संवेदनशील असतात आणि आपल्या मालकाचे चांगले आणि वाईट व्यवहार हे व्यवस्थित पार पाडत असतात शक्यतो कथा कादंबऱ्यांच्या मध्ये असलेले अनेक ब्राह्मणांचे वाचले जाणारे धोका दिल्याचे व्यवहार प्रत्यक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत नसतं आणि आजही घडत नाहीत . मात्र तुमचा त्यांच्या व्यवहाराला असलेला उपयुक्ततावाद मात्र प्रत्यक्षात जोपासला जातो आणि त्यामुळेच अनेकदा आपण फक्त वापरले गेलेलो आहोत हे लक्षात येते . मात्र अशा लोकांचे प्रमाण 20% च असेल . कोणीतरी एखादा जो ब्राह्मण असा असतो की जो याबाबतीत पाठीत खंजीर खूपसत असतो त्यामुळे बहुजन समाजातले अनेक यशस्वी झालेले बिझनेस मॅन आणि स्पेशल उंचीवर पोहोचलेले राजकारणी हे ब्राह्मणांना आपल्या ठाई नोकरीमध्ये ठेवतच असतात कारण एक प्रकारची लॉयल्टी मिळण्याची शक्यता असते आणि मुख्य म्हणजे व्यवहारांमध्ये एक विलक्षण सातत्य असतं कथा कादंबऱ्यातले पाठीत खंबीर असणारे व्यवहार प्रत्यक्षामध्ये घडतीलच याची शक्यता फक्त एक टक्का असते मग हे लोक नेमके कधी धोका द्यायला तयार होतात तर जर का तुम्ही त्यांच्या संपूर्ण ब्राह्मणी व्यवहाराबद्दल विलक्षण टीका करायला लागला किंवा त्या ब्राह्मण असण्यालाच चॅलेंज द्यायला लागला की मग यांचा व्यवहार बदलायला लागतो हे डोक्यात ठेवून व्यवस्थित तुमचे जे काय करायचे ते करत राहतात किंवा हळूच गोड बोलून तुमच्याबरोबर असलेला व्यवहार संपवत त्यापेक्षा अधिक संधी देणाऱ्या व्यवहार स्वीकारतात. अनेकदा नकार देताना सुद्धा भाषा अतिशय सभ्य असते . अपवादात्मक वेळेलाच कुणी डिवचला जातो आणि त्याचा नाना फडणवीस होतो अनेकदा तुम्ही घाशीराम कोतवाल सारखे पंडित असला तरी सुद्धा तुम्हाला सोडले जात नाही .


व्यवहार करण्याची विलक्षण तैलबुद्धी हा या संपूर्ण जमातीचा एक विलक्षण विशेष आहे आणि आपल्याला हा विशेष ब्राह्मण असल्यामुळेच किंवा जन्मदत्त व्यवहाराची परंपरा असल्याने प्राप्त झालेला आहे याविषयी या लोकांना शंका नसते .


संपूर्ण भारतामध्येच या लोकांची प्रशासन क्षेत्रामधली उपस्थिती ही लक्षणीय असते आणि अनेकदा हे लोक एकमेकांबरोबर व्यवहार व्यवस्थित ठरवून पार पाडत असतात आणि एकमेकाला प्रमोट करत असतात विशेषतः जर का व्यवहार क्रॉस करत नसेल तर मग ती व्यक्ती विलक्षण रित्या प्रमोट केली जाते कारण आपल्याला त्या व्यक्तीचे काम येणार नाही हे यांना माहिती असते म्हणजे उदाहरणार्थ जर का लता मंगेशकर सारखे आपण गाऊ शकत नाही हे माहिती असेल तर मग हे लोक लता मंगेशकरला जितके प्रमोट करता येईल तितके ते करत राहतात त्यामुळेच या लोकांची करीयरस कायमच बनत असतात यासाठी लागणारे सर्व प्रकारचे कष्ट घेण्याची तयारी या लोकांची असते अंदमानमध्ये प्रचंड मेहनत करणारे सावरकर या लोकांना त्यामुळेच कायमच आमंत्रित करत असतात. कष्टांच्यावर ईश्वरापेक्षा जास्त श्रद्धा हा एक विलक्षण गुण लोकांच्या ठाई असतो संधी नेमकी कुठे आहे हे यांना आपोआपच कळत असते आणि ती संधी मिळवण्यासाठी हे विलक्षण मेहनत करतात व्यवस्थित फिल्डिंग लावतात आणि संधी मिळाल्यानंतर शक्यतो आपण त्यामध्ये अपयशी होता कामा नये याचे संस्कारच या लोकांच्यावर झालेले असतात या लोकांचे सर्वाधिक पंचाईत श्रीधर तिळवे नाईक यांच्यासारखे लोक करत असतात कारण यांच्यासारखे लोक व्यवहारच करत नसतात आता व्यवहारच न करता आपल्या पद्धतीने जगणारा ह्या माणसाचे करायचे काय हे यांना कधीही कळत नाही आणि म्हणूनच गांधींच्या सारखे लोक यांच्यापुढे फार मोठा पेचप्रसंग निर्माण करत असतात. एकीकडे मोक्ष या संकल्पनेविषयी आदर असतो आणि दुसरीकडे धार्मिक प्रश्नांच्या बाबतीत धर्माबाबत हा माणूस अडथळा असल्याने हा माणूस प्रमोट होऊ नये कारण तो आपल्या धार्मिक विचारांच्या संदर्भामध्ये आणि विचार प्रणालीच्या संदर्भामध्ये अडथळा आहे याची या लोकांना कल्पना असते मग काय करायचे शक्यतो अशा माणसांना मरण येईपर्यंत वाट बघायची आणि एकदा अशा प्रकारचा माणूस मेला की मग त्याला सामावून घेण्यासाठी आपल्या परंपरेमध्ये काय करता येईल तीच्यात काही बदल करता येईल का? हे आजमावत मग त्याला एक विशिष्ट पद्धतीची प्लेसमेंट द्यायची आणि हा माणूस आपलाच कसा होता हे सांगत राहायचे अशा प्रकारचा व्यवहार पार पाडला जातो . मरणोत्तर तुमचे काय करायचे याविषयी सुद्धा या लोकांना विलक्षण तैलबुद्धी प्राप्त झालेली असते त्यामुळेच मेल्यानंतर सुद्धा या लोकांचे काहीही तुम्ही बिघडवू शकत नाही . त्यामुळे गांधीजींचे खरोखरच मेल्यानंतर किती हिंदुत्ववादी लोकांचे व्यवहारिक पातळीवर नुकसान केले असा जर का प्रश्न आपण विचारला तर त्याचे उत्तर शून्य असे येते . अपवादात्मक वेळेला यांच्यातले अत्यंत कट्टर लोक उदाहरणार्थ श्याम पोंक्षे गांधी हत्येचे सुद्धा समर्थन करत राहतात पण हे करताना ते कधीही स्पष्ट स्वच्छ भूमिका घेत नाहीत पण नथुराम गोडसे यांची भूमिका तात्विक पातळीवर कशी बरोबर होती हे सांगत राहतात .


युरेशियन लोकांच्यातला किलर इस्टिंक्ट या लोकांच्या मध्ये सौम्यपणे वावरत असतो त्यामुळेच त्या वावराचे काय करायचे असा प्रश्न यांच्या विरोधकांना पडत असतो कारण हे थेट कधीही हा किलर इस्टिंक्ट मिरवत नाहीत . मात्र खाजगी मध्ये स्वतःच्या ठायी असलेले भय हे लोक सांगत राहतात.


एकंदरीत आपण संपूर्ण व्यवहार बघितला तर आपणाला असे लक्षात येते की हे लोक ज्यांना स्वतःला उत्तम व्यवहार करायचा असतो आणि यशस्वी व्हायचे असते त्यांच्या चौकटीत व्यवस्थित बसत असल्याने वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आणि सरकार चालवत असतात आणि अनेकदा चालवत असलेल्या अनेक गोष्टींच्या मध्ये हे व्यवस्थित स्वतःची प्लेसमेंट करत स्वतःचे उत्तम करिअर करत असतात. त्यामुळेच अनेकदा लोक व्यवहार प्रिय बनत असतात यांचे संघटन एकमेकाला पूरक मदत करत व्यवस्थित चाललेले असते आणि म्हणूनच यांना हरवणे फार कठीण जात. त्यांना चेहरा असतो मात्र त्यांचे शरीर नेमके कुठे सापडेल याविषयी बहुजन समाजाला कसलीही कल्पना येत नाही . अनेकदा यांची शक्ती अदृश्य असते आणि अनेकदा हे वैदिक पण शक्तीचे उपासक असतात त्यामुळेच बहुजन समाजाला यांचे काय करायचे असा प्रश्न सुद्धा कधीकधी पडत असतो .


आधुनिक आणि उत्तर आधुनिक कालखंडामध्ये व्यवहार कसा चालवायचा व्यवहार वाद कसा चालवायचा हे या लोकांना नीट कळलेले आहे असे वाटत राहते मात्र खरोखरच यांचा व्यवहार दूरगामी पातळीवर भारतासाठी कितपत परवडेबल आहे हे शेवटपर्यंत कळत नाही अजूनही ते कळलेले नाही . त्यामुळेच एक विलक्षण पॉज टाकत माणसे यांच्या विषयी बोलत राहतात . व्यवहारामध्ये यांना प्रमोट करत राहतात परंतु सार्वजनिक जीवनातल्या बोलण्याच्या संदर्भामध्ये एक प्रकारचा पॉज टाकला जातो . हा पॉज थोडासा समजून घेण्याचा आणि मोडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख आहे 


श्रीधर तिळवे नाईक

सत्य ,केओस (कोलाहल )आणि उत्तर व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 


इसवी सन पूर्व १२००० च्या आसपास झालेल्या प्रलयामुळे आणि नंतर इसवी सन पूर्व २००० ते १५०० च्या आसपास आलेल्या विचित्र दुष्काळांच्या मुळे संपूर्ण मानव जातीत फार विचित्र गोष्टी उदयाला आल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे केऑस आणि डीसऑर्डर ! श्रद्धा युगात जन्मलेल्या देवतांनी हे जग एका विशिष्ट ऑर्डरमध्ये बांधलेले आहे ही संकल्पना समाजांच्या मध्ये अतिशय दृढमूल होत गेली होती पण इसवी सन पूर्व 2000 पासून हळूहळू तिला तडे जायला लागले आणि त्याचे प्रतिबिंब कधी नव्हे ते मानवी आयुष्यात उमटायला लागले. देवांच्या वरचा विश्वास उडाला देवांच्या चांगुलपणावरचा विश्वास उडाला आणि पुढे पुढे माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वासही उडाला भारतामध्ये मुळात जी युरेशियन श्रुती आली ती हा अविश्वास घेऊनच आली होती साहजिकच ती अतिशय भयग्रस्त , कोलाहलग्रस्त आणि अव्यवस्थाग्रस्त होती. आणि तिचे काय करायचे हे तिला कळत नव्हते तिच्यापुढे काही उपाय उरलेला नव्हता . हे लोक आले तेव्हा दुष्काळांच्या मुळे शैव श्रुती सांभाळणारे लोक जंगलात निघून गेले होते किंवा दक्षिणेत स्थलांतर करून आले होते . त्यामुळे बाहेरून आलेल्या युरेशियन लोकांना फार काही मोठ्या लोकसंख्येचा सामना करावा लागला नाही. आज सुद्धा या लोकांना युद्ध करावी लागले की नाही हा एक फार मोठा प्रश्न इतिहासकारांच्या पुढे आहे .काही लोकांच्या मते युद्ध झालेच नाही कारण हे लोक आश्रयाला आले होते आणि जे शिल्लक शैव श्रुतीतले लोक होते त्यांनी त्यांना उदार अंतकरणाने हा आश्रय दिला . पण पुढे सर्व स्थलांतरित लोक जे करतात तेच या लोकांनी केले आणि ते म्हणजे यांनी स्वतःच हा प्रदेश बळकवायला सुरुवात केली आणि इथल्या मूळ लोकांच्यावर दादागिरी सुरू केली . 


हे सर्व स्थलांतरित लोक वेगवेगळ्या टोळ्या करत आले होते कारण ते युरेशिया मधल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आले होते आणि अनेक मार्गांनी आले होते . अनेकदा त्यांची आपापसात सुद्धा युद्ध झाली होती असे दिसते आणि अपवादात्मक वेळेला इथल्या असुर, दस्यु ,राक्षस ,पणी याही लोकांचा त्यांच्याशी सामना झाला असे दिसते. पण एकंदरच आलेल्या लोकांना हे कळून चुकले होते की आपण जेथे आले आहोत तिथे आपल्यापेक्षा अतिशय उजवी अशी एक संस्कृती आहे आणि ती आत्मसात केल्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही . या लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन होता साहजिकच ते संपत्ती सुद्धा पशुंच्यात मोजत होते . कोणाकडे किती गाई आणि बैल आहेत यावर सर्व काही ठरत होते . त्यांचा सामना प्रथमच वस्तूंचा अतिशय नीटनेटका वापर आणि उत्पादन करणाऱ्या लोकांशी पडला जे स्वतः व्यापारही करत होते . या लोकांच्यात आपापसात खूप लग्नेही झाली. आलेल्या लोकांनी इथल्या लोकांचा धर्म जो शिवकेंद्रित होता तो आत्मसात करायला सुरुवात केली आणि रुद्र आणि शिव या एकच देवता आहेत अशी दंतकथा तयार करत आणि पुढे पार्वतीला लक्ष्मी करत आत्मसात करायला सुरुवात केली. विद्येचा पत्ताच नव्हता त्यामुळे साहजिकच गणपती मात्र सर्व अंगाने स्वीकारला गेला. नाट्यशास्त्र स्वीकारले गेले . 


पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट टोकावतच राहिली आणि ती म्हणजे केऑस ( कोलाहल) . पूर्वी भगवान शंकर हा कोलाहल पिऊन बसले होते आणि आता काय करायचे हा प्रश्न होता . 


साहजिकच या सगळ्या कोलाहालामध्ये मग वैदिक देव सुद्धा नैतिक राहिले नाहीत आणि याचे सर्वोत्तम उदाहरण इंद्र होता . हा इंद्र म्हणजे कसलेही नैतिक तत्त्व नसलेला आणि तरीही प्रचंड सत्ता असलेला असा राजा होता . त्याच्याकडे स्वर्गाचे राज्य होते . तर दक्षिणेकडे यमाचे राज्य होते आणि हे लोक त्याला नरक म्हणत. 


या लोकांचे समाज अतिशय छोटे छोटे होते आपल्याकडे महाजन म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे असे मानले जाते प्रत्यक्षात ते नंतर उदयाला आले. हा स्वर्ग कुठे होता तर हा स्वर्ग आकाशात होता पण इथे इंद्र ही पावसाची देवता वेळेवर पाऊस धाडत होती पण तरीसुद्धा या लोकांच्या मनात बसलेली दुष्काळाची भीती कधीही गेली नाही त्यामुळे ते सतत इंद्राला पाऊस पाड पाऊस पाड म्हणायचे त्यामुळेच ऋग्वेदामध्ये इंद्रावरच्या निम्म्या ऋचा या पावसाच्या अंगाने लिहिल्या गेलेल्या सुक्ताच्या रूपात आहेत. शेती जमत नसल्याने पशुंना लागणारा चारा हा फक्त पावसामुळेच उपलब्ध होऊ शकत होता किंवा वाहत्या नदीमुळे ! त्यामुळे साहजिकच सरस्वती ही नदीदेवता या लोकांना फार महत्त्वाची वाटत होती. प्रत्यक्षात सरस्वती नावाची कुठलीही नदी नव्हती . पण सरस्वती नावाची नदी देवता मात्र अस्तित्वात होती आणि ती मुख्य देवतांच्या पैकी एक होती . तिला स्त्रीलिंगी करण्याचे कारण उघड होते . ती आपल्या गर्भाशयामध्ये नदीचे पाणी साठवून ठेवते अशी ही धारणा होती त्यामुळे स्त्राव ही संकल्पना खूपच महत्त्वाची होती . सर्व नद्या म्हणजे एका अर्थाने नदीदेवतेच्या स्त्राव होत्या . त्यामुळेच एका अर्थाने वैदिक संस्कृती ही सरस्वती संस्कृती होती . पुढे या संस्कृतीला शैव लोकांची गंगा संस्कृती मिळाली कारण गंगा म्हणजे सुद्धा नदीदेवता होती आणि गंगा या शब्दाचा अर्थच वाहणारे वाहते पाणी हाच होता. आणि त्यामुळेच गंगा आणि सरस्वती या दोन मुख्य नदीदेवता भारतीय संस्कृतीला आकार देताना दिसतात. अर्थातच शैव लोकांची गंगा मात्र खुद्द शंकराच्या जटेतून आली होती (पुढे युरेशियन लोकांनी प्रत्यक्ष आत्ताची गंगा नदी या दंतकथेला जोडून दिली) त्यामुळे सरस्वती कुठून आली असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यासाठी म्हणून मग ब्रह्मदेवाची कथा जन्माला घालण्यात आली आणि त्याच्यापासून पळ काढण्यासाठी म्हणून सरस्वती गुप्त झाली अशी अफवा पसरवली गेली प्रत्यक्षात फक्त एकच गोष्ट झाली होती खुद्द युरशियन लोकांनी आता गंगा स्वीकारली होती . ती कधी आटत नसल्याने सरस्वतीला अधिक प्रसन्न करून घेण्याची गरज राहिली नाही. 


हळूहळू या सगळ्याची व्यवस्था लावली पाहिजे हे लक्षात आल्यानंतर मग धर्म जन्माला आला . कारण लोकसंख्या वाढत होती आणि गण बनत होते. या गणांना एक शिस्त देणे प्रत्येकाला आवश्यक वाटत होते मात्र ही शिस्त कोणी द्यायची हा खरा प्रश्न होता. शैव लोकांच्या मध्ये ऑलरेडी एक अनुशासन होतेच ते सर्वच लोकांनी स्वीकारले मुख्य म्हणजे ज्याची आई शैव आहे आणि वडील वैदिक आहेत अशा ऐतरेय नावाच्या मिश्र ब्राह्मणाने पहिला धर्म निर्माण केला आणि त्याने ब्राह्मण धर्माची वर्णव्यवस्था प्रस्थापित केली त्याने ज्या पुस्तकात ही व्यवस्था निर्माण केली त्या पुस्तकाचे नाव आहे ऐतरेय ब्राह्मण होय. या ग्रंथानंतर मग अनेक ब्राह्मण ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांनी हळूहळू ब्राह्मण धर्म निर्माण केला आणि पुढे जाऊन स्मृती वांग्मय निर्माण करत त्याला एक ठाम आणि ठोसाकार दिला .


सुरुवातीच्या कालखंडामध्ये कर्मदत्त असलेली वर्णव्यवस्था ही ब्राह्मण ग्रंथाने जन्मदत्त केली आणि सगळा अनर्थ निर्माण व्हायला सुरुवात झाली. 


इथूनच संस्कृतीमिलनापासून दूर होत शैव लोकांनी स्वतःचे अनु शासन शाबूत ठेवायला सुरुवात केली आणि इथेच अनेक संघर्षाचे बीज पडले. 


पूर्वी फक्त संस्कृती वरून भांडणारे लोक आता धर्मावरून भांडायला लागले. 


शंकर हा एक अत्यंत पक्के अनुशासन देणारा श्रुती संस्थापक होता त्या उलट वैदिक लोकांचा इंद्र मात्र फार गडबड करणारा होता साहजिकच इंद्राचे सगळे गुण शंकराला चिपकवण्याचे उद्योग सुरू झाले . पण शैव लोकांनी हे कधीही स्वीकारले नाही. रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य एका बाजूला शंकराचे वर्चस्व मान्य करतात पण दुसऱ्या बाजूला शंकराची जितकी बदनामी करता येईल तितकी करतात . त्यातूनच सती सारख्या कथा निर्माण झाल्या. म्हणजे आपले देव तर भ्रष्ट आहेतच पण या लोकांनी दुसऱ्या धर्मातील देव सुद्धा भ्रष्ट करायला सुरुवात केली . अनैतिकतेची इतकी हौस असलेला पुरोहित वर्ग जगाच्या पाठीवर कुठेच नसेल . साहजिकच आपल्यापुढे जी शिव महावीर आणि गौतम बुद्ध यांची प्रतिमा येते ती अनेकदा भ्रष्ट स्वरूपात येते अशावेळी उपाय एकच असतो खरे काय आहे ते शोधणे .


याला कारण अर्थातच एकच होते ते म्हणजे पुन्हा एकदा कोलाहल. भाव तसा देव त्यामुळे कोलाहल तसा देव असे नेहमी घडते . मानवी जीवनातल्या सर्व वासना अनेकदा माणूस आपल्या दैवतांना लागू करतो. देवाने दिलेली व्यवस्था आहे असा एका बाजूला आग्रह धरायचा सर्व सत्ता देवाच्या नावाने लेजीटी मेट करायची आणि नियंत्रित करायची आणि दुसरीकडे मात्र स्वतःच अव्यवस्था आणि कोलाहल यांनी पछाडून जायचे असा एक विचित्र भयद्वंद्वात्मक घोरपणा आपणाला नेहमी पुरोहित वर्गामध्ये आणि क्षत्रिय वर्गामध्ये जाणवत राहतो. केऑस आणि डीसऑर्डर यांच्या तावडीत सापडलेला विलक्षण समाज हे या धार्मिक समाजाचे वैशिष्ट्य होते . धर्माने केऑस मोडित काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन हा धर्म संपूर्ण समाजाला धारण करायला लावला . पण तरीही कोलाहल आणि डिसऑर्डर काही मोडीत काढता आलेली दिसत नाही . महाभारतामध्ये याचे प्रचंड प्रतिबिंब पडलेले दिसते . महाभारतातले संपूर्ण युद्ध म्हणजे कोलाहाल आणि अव्यवस्थेची बजबजपुरी आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जो या सगळ्याला धर्म देण्याचा दावा करतो तसे वचन देतो त्याला स्वतःच्या गणामध्ये सुद्धा शेवटी ही कोलाहल आणि अव्यवस्थेची बजबजपुरी पहायला लागते. त्याचा स्वतःचा यादव गणसुद्धा एकमेकांशी भांडून नष्ट होतो . आपले स्वतःचे सर्व पुत्र मेलेले पाहून स्वतःचाच वंश निर्वंश झालेला पहात ध्यानस्थ बसलेल्या कृष्णाला शेवटी एका पायात घुसलेल्या बाणाने मरण येते . मानवी जीवनाचा सर्वात absurd शेवट हा आहे . यातही पुढे निरर्थक व्यस्तता ही आहे की श्रीकृष्ण वैकुंठात नसून स्वर्गात आहे. तिथेही त्याला भारतापलीकडचा प्रदेश माहीत नाही. आता याला दिलासा मानावा का की हा दिलासा काल्पनिक आहे हे ओळखून स्वतःलाच हसावे ? 


या कालखंडामधला हा कोलाहल पुन्हा एकदा विसाव्या शतकामध्ये परत आला. मुळात फ्रेंच राज्यक्रांती फसल्यानंतर तो परत आला होता . पण त्याचा कडवा मुकाबला करत अस्तित्व वाद ठामपणे उभा राहिला. सगळे असता व्यस्त असले तरी निदान माझे अस्तित्व तरी ठोस आहे अशी त्याची भूमिका होती पण १९५० नंतर या ठोसपणाला पण सुरंग लागला आणि सब्जेक्ट इज डेड जाहीर झाले एका अर्थाने हे एक्झिस्टन्स इज डेड असेच होते . हा उत्तरवादाचा कार्पोरेट जन्म होता . "मी" सुद्धा कन्स्ट्रक्टेड आहे आणि मी जे पाहत आहे तेही माझे कन्स्ट्रक्शन आहे असा व्यवहार या काळामध्ये प्रस्थापित झालेला दिसतो म्हणजे या जगामधला सगळा व्यवहार म्हणजे एका कन्स्ट्रक्शन ने दुसऱ्या कन्स्ट्रक्शनला पाहणे असा आहे साहजिकच मग बांधकाम कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला . बांधकाम चालू तर आहे पण ते पुन्हा पुन्हा कोसळते आहे अशावेळी करायचे काय? साहजिकच याला उत्तर व्यवहार म्हणणे गरजेचे बनले. पीटर ड्रकर यांनी याला डेथ ऑफ इकॉनोमिक मॅन म्हटलेले आहे. इकॉनॉमिक मॅन यात टिकणारा नव्हताच . आता पोस्ट इकॉनॉमिक मॅनला सर्व उत्तर व्यवहार सांभाळायचा होता आणि हे एक फार मोठे आव्हान होते. कारण आता कोलाहल क्वांटम सायन्स मुळे सायंटिफिक बनला होता . सर्व सापेक्ष झाले होते आणि निर्णय मात्र निरपेक्ष घ्यायचे होते . हे विज्ञान सांगत होते की तुमचे सर्व निर्णय निरपेक्ष असतच नाहीत ते कन्स्ट्रक्टेड तर असतातच पण ते सापेक्षच असतात . अशावेळी मानवी व्यवहार कसा करायचा ? आत्तापर्यंत व्यवहार करताना माणसाला गॅरंटी असायची आता मात्र व्यवहार करणाऱ्या माणसालाच गॅरंटी देणारे असे काही उरले नव्हते . साहजिकच त्यांनी एक नवीन व्यवस्थापन तंत्र हवे एक नवा व्यवहारा प्रकार हवा अशी मागणी केलेली दिसते आणि त्या अंगाने संपूर्ण मॅनेजमेंट चाललेली दिसते परंतु हे सर्व काही पुरेसे पडले नाही आणि अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी कोसत गेल्या पण सुदैवाने याच वेळेला एक नवे युग उदयाला आले . त्या युगाचा कणा इंटरनेट होता जाल होता 


आमची पिढी या जाल युगात वाढली सत्य दिसत नाही आणि जे वास्तव दिसते ते माया आहे असे काहीतरी आमच्या वाट्याला आता आले. एका अर्थाने पुन्हा एकदा सारा संसार शाक्त बनला . शक्ती चंचल असते माया चंचल असते ती काहीही निर्माण करते कधीही काहीही नष्ट करते . कधीही कसलाही आकार धारण करते . ती कधी चंडी होते ती कधी महाकाली होते ती कधी अन्नपूर्णा होते ती कधी गौरी होते अशा या माया व्यवहारामध्ये साहजिकच माझ्यासारख्या माणसाला शिव जिवंत करावे लागले . कारण शक्तीला हाताळण्याचा तोच एक उपाय असतो . 


मानवी जीवनाच्या आधुनिकतेवर आणि उत्तर आधुनिकतेवर त्यामुळेच बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा दिसतो परंतु चौथ्या नवतेत मात्र तो आटत चाललेला आहे आणि बौद्ध धर्माची जागा हळूहळू शैव श्रुती घेत आहे . प्रॉब्लेम फक्त एकच आहे प्रत्येकाला शक्ती हवी आहे शक्तीमुळे मिळणारी सत्ता हवी आहे पण शक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिव मात्र कोणालाच व्हायचे नाही . प्रत्येकाला हे नियंत्रण माय मधून माया मधून हवे आहे म्हणून प्रत्येक जण माया नियंत्रित करायला धडपडतो आहे परंतु ही धडपड वाया जाणे अटळ आहे. कारण माया फक्त एकच तत्व नियंत्रित करू शकते ते म्हणजे शिव ! म्हणूनच आपल्याला सर्व व्यवहार हा शिव व्यवहार म्हणून करावा लागेल ज्याला जमेल तो आनंदी होईल ज्याला जमणार नाही तो पुन्हा एकदा कोलहालग्रस्त होणे डिसऑर्डर ग्रस्त होणे अटळ आहे इतकेच नव्हे तर तो कोलाहल आणि अव्यवस्था निर्माण करण्याला हातभार लावणे अटळ आहे . अशा या संपूर्ण अवस्थेत व्यवस्थेत अव्यवस्थेत फक्त सिद्धच डान्स करू शकतो मी तो डान्स करत असतो . आणि इतरांचे डान्स वेडेवाकडे चालले असले तरी आणि मायात अडकले असले तरी एन्जॉय करत असतो .


श्रीधर तिळवे नाईक


सत्य व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद १६ खोटे बोलणे आणि भारतीय लोक श्रीधर तिळवे नाईक 


भारतात खोटे बोलण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे याचे कारण भारतात तुम्ही खोटे बोललात तरी तुमचे संबंध बिघडत नाहीत. चांगली माणसे चांगुलपणामुळे खोटे बोलणाऱ्या माणसाला क्षमा करत संबंध कायम ठेवतात तर वाईट माणसे "अरे ही आपल्यासारखीच व्यक्ती आहे आणि आपल्यासारखेच खोटे बोलते" असे म्हणून संबंध तोडत नाही . मात्र खोटं बोलणारा आणि खोटे ऐकणारा एकमेकावर आरोप न करता व्यवस्थित तालमेळ ठेवत बसतात जे फार आश्चर्यकारक असते . चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक संबंध कायमच ठेवतात. याचा एक दुष्परिणाम असा आहे की खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला संबंध गमावण्याची भीतीच नाही . 


याचाच व्हायचा तो दुष्परिणाम असा झाला आहे की आपल्या लोकशाहीमध्ये नेते लोकांना हळूहळू लोकांशी खोटे बोलणे यामध्ये काही वाटत नाही आणि याबाबतीतला न्याय तोच आहे की नेता खोटं बोलणारच अशी आपली मानसिकताच बनून गेलेली आहे कारण वैयक्तिक पातळीवर आपण खोटे बोलणाऱ्या व्यक्तीशी संबंध तोडत नाही त्याला माफ करून टाकतो. काही काही वेळा तर काय मस्त सॉलिड चुना लावतो ना तू अशी दादही देतो आता ही जी मानसिकता बनलेली आहे हिचा धर्माशी संबंध काय कारण धर्म तर खरं बोला असच सांगतो आणि तरीसुद्धा इतके सारे लोक सातत्याने खोटे बोलतात याला काय म्हणावे? ही कसल्या प्रकारची धार्मिकता आहे? साहजिकच आपल्याकडे खोटे बोलणारा किंवा खरं की खोटं हे न पाहणारा श्रीकृष्ण हा सर्वात लोकप्रिय देवतांच्यापैकी एक ठरतो इतकेच नव्हे तर श्रीकृष्ण नीती ही एक नीती बनते कौटिल्य निती ही नीती बनते, आता खोटं बोलणारी नीती ही कशी काय नीती असू शकते पण भारतीय सानंद हे सर्व स्वीकारतात याचे कारण हा सगळा वैष्णव वादाचा परिणाम आहे कारण वैष्णववादाला खोटे बोलायला काहीच वाटत नाही कारण महाभारतामध्ये गोलमटोल खोटे बोलणे खूप आहे म्हणजे अगदी युधिष्ठराचा सुद्धा घोड्यांचा धर्म रथ वैष्णव लोकांच्यामध्ये खाली आणला गेलेला आहे . जिथे हे लोक आपल्या सर्वोत्तम धार्मिक माणसाला सुद्धा सोडत नाहीत तिथे ते इतरांना काय खोटेपणाबद्दल जबाबदार धरणार ? वर आणि पुन्हा हे सगळं कसं वास्तविक वास्तवदर्शी आहे अशी ही डिंग मारता येते. जे लोक स्वतःच्या धर्मग्रंथात सुद्धा खोटं बोलतात खोट्याला सहन करतात त्या लोकांच्या बाबतीत खोटे बोलणे ही एक व्यवहाराची नित्याची बाब बनून जाते आणि जे नित्य असते ते नेते लोक करतातच करतात . भारतामध्ये भ्रष्टाचार करणे असो लाच घेणे असो किंवा खोटे बोलणे असो या सर्व गोष्टी नेते करतात कारण त्या नित्य आहेत आणि भारतातील बहुतांशी जनता त्याला पूरकच वागते . आपल्या लोकांना खऱ्याची जरा सुद्धा चाड नाही किंबहुना जो खरे बोलतो तो एकटा पडतो . 


प्रश्न असा आहे की मग खोटे बोलण्याच्या आधारे कसा काय समाजाचा व्यवहार नीट चालवता येईल ? तो नीट चालणे शक्य नाही आणि म्हणूनच गेली कित्येक वर्षे आपण बोंबलत गेलेलो आहे . खोटेपणा बाबत एक मीच्युअल अंडरस्टँडिंग तयार झालेले आहे त्यामुळे व्यवहाराचा अर्थ या प्रकारचे आपापसातील अंडरस्टँडिंग गृहीत धरत व्यवहार करणे असा काहीतरी प्रकार चाललेला असतो म्हणजे समोरचा कुठे खोटे बोलणार आणि कुठे खरे बोलणार याचा अंदाज घ्यायचा आणि व्यवहार करायचा अशी एक पॉलिसी किंबहुना व्यवहारी पॉलिसी आपल्या लोकांनी तयार केलेली यामुळे भारतीय लोकांच्यावर आज विश्वास ठेवायला भारताबाहेरचे लोक तयार असत नाहीत .खोटं बोलणाऱ्या लोकांचा खोटा रडा देश हीच आपली प्रतिमा झालेली आहे. 


खोटेपणाचे हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग कदाचित काही लोकांना अद्भुत वाटत असले तरी ही एक परदेशी लोकांची फार मोठी डोकेदुखी ठरताना दिसते . आपण घरातल्या लहान मुलाला सुद्धा त्याच्या जडणघडणीच्या काळातच खोटे बोलायला शिकवतो म्हणजे घरात असूनही घरात नाही असं सांग अशी सुरुवात होते. किंवा एखाद्या मुलाला कुठल्या गोष्टीमुळे काही झाले की दत थत करत खोटे मारणे इथूनच खोट्या कृतीची सुरुवात होते . हे सगळं नंतर नंतर नंतर इतकं भिनत जातं की त्या माणसाच्या रक्तातच खोटे बोलणे शिरते आणि तो भारतात जगायला लायक होतो . 


त्यामुळेच खोटे बोलणाऱ्या नेत्यांना आपण पराभूत करू अशी जर काय तुमची समजूत असेल तर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणि निवडणुकीत फारशी खरी ठरण्याची शक्यता नाही कारण मुळात आपल्या लोकांच्या नेत्यांच्या कडून असलेल्या अपेक्षा इतक्या मर्यादित आहेत की त्या खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माफ करून टाकतात . आता तर काय आपण मतही एक सेमिओडिटी करून टाकलेली आहे जिला विकता येते. म्हणजेच राजकीय लोकशाही सुद्धा आपण खोटी करून दाखवली. 


या सगळ्या प्रकारा मुळेच अलीकडे भारतामध्ये मोक्षाची साधना करणारे लोक अल्पसंख्य होत चाललेले आहेत आणि धर्म मात्र वाढत चालला आहे .


अर्थात काही कट्टर पुरोगामी लोकांच्या मते धर्म हे जगातले सर्वात मोठे खोटे आहे त्यामुळेच धर्म अंगवळणी पडला असेल तर त्यात आश्चर्य ते काय ?


श्रीधर तिळवे नाईक

व्यवहार आणि अजित पवार श्रीधर तिळवे नाईक 

अनेकांचा प्रश्न असा की अजित पवार यांच्या अंगाने इतके लिखाण कशाला ? आणि एवढे लेख कशाला? त्यांना कदाचित हे कळणे अशक्य ! अजित पवार हे आमच्या पिढीचे राजकारणातले प्रतिनिधी आहेत . एका बाजूला बलाढ्य साठोत्तरी असे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला आपली समकालीन पिढी जिचे काय करायचे ते कळत नाही आणि तिसऱ्या बाजूला केवळ टॉंट मारणारी पिढी अशा कात्रीत सापडत आम्ही आमच्या वाटा शोधल्या. शोधत राहिलो पुढे मग तिसरी वाट गडद होत आली आणि त्यातून प्रश्न उभा राहिला पुढच्या पिढीचे काय करायचे ? सुरेल तिळवे हा माझा पुतण्या जेव्हा दहा वर्षाचा झाला तेव्हाच मला त्याचा फ्लॅश आला होता की हा राजकारणात पडणार आणि माझ्यापुढे तेव्हा एकच प्रश्न आला होता तो म्हणजे रोहिदास मामाशी याचे पटणार की नाही ? माझ्या सर्वच फ्लॅश प्रमाणे हाही फ्लॅश खरा झाला आणि सुरेल सार्वजनिक जीवनात आला 


एका बाजूला रोहिदास मामा बहुजनवादी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात होता आणि दुसरीकडे सुरेलला मात्र आप पक्षाचे आकर्षण होते यातून काही संघर्ष उदभवतो की काय असे भय होते पण तसे काही सुदेवाने झाले नाही आणि सुरेल आणि रोहिदास मामा यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले . मुख्य म्हणजे दोन्ही बाजूंनी प्रेम होते आणि पक्ष भले एकमेकांच्या विरोधात असो पण त्याचा ताण संबंधांच्या वर आला नाही . 


अजित पवार यांच्यामध्ये आमच्या पिढीचे प्रतिबिंब आहे. आमच्या पिढीने माणुसकी मरू दिली नाही मात्र आमच्या पुढच्या नव्वदोत्तरी पिढीमध्ये एक जो कृत्रिम पणा आला तो आम्ही समजून घेतला . प्रवीण बर्दापूरकर यांनी अजित पवार यांच्यावर लिहिलेल्या मरणोत्तर लेखांमध्ये दोन उदाहरणे दिली आहेत त्यातील आजारपणात उत्स्फूर्तपणे भेटायला आलेल्या अजित पवार यांचे व्यक्तिमत्व निश्चितपणे आकर्षक आहे. शरद पवार यांचे अनेक गुण अजित पवार यांनी अवगत केले असे म्हणायला हरकत नाही . भाजपाच्या उपस्थितीमध्ये या लोकांच्या मध्ये वाद झाले आणि असे वाद खुद्द आमच्या घरात पण काही कमी झालेले नाहीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जेव्हा भाजपबरोबर गेला तेव्हा काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न होता आणि आहे. गेली ५० वर्षे घरामध्ये असलेली बहुजनवादी परंपरा अचानक मोडीत निघाली की काय असे वाटावे असे हे वातावरण आहे तिचा परिणाम थेट देवळावर झालेला दिसतो म्हणजे कधी नव्हे ते देवळामध्ये वैदिक पद्धतीचे यज्ञ होऊ लागलेले आहेत मला स्वतःला हे कधीच पटले नाही कारण माझ्या मते यज्ञ संस्कृती ही काही बहुजनांची संस्कृती नव्हे परंतु हे सर्व काही होत आहे आणि मी त्यापासून अंतर राखून आहे. या सर्व गोष्टींचे आकलन इतके सोपे नाही काँग्रेस जर धड असती तर हे घडले नसते अनेकांना यामध्ये असलेला काँग्रेसचा वाटाच कळत नाही गांधी फॅमिलीच्या हट्टाहासामुळे अनेक चमत्कारिक गोष्टी या देशाच्या राजकारणात घडलेल्या आहेत त्यामधला सर्वात मोठा अट्टाहास गोव्याच्या राजकारणात आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे इथे ख्रिश्चन लोकांची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे भारतात जर अशी लोकसंख्या असती तर सोनिया गांधींनी काय काय प्रताप गाजवले असते हे सांगणे कठीण आहे त्या स्वतःला काहीही सेक्युलर वगैरे म्हणवत पण त्या आतून रोमन कॅथॉलिक आहेत आणि त्यांचे हे असे असणे गोव्याच्या राजकारणामध्ये फार प्रॉब्लेमटिक झाले आपण कुठल्या माणसांना पुढे आणतोय याचा विवेक सुद्धा राहिलेला नाही. धर्म विवेका पेक्षा मोठा झाला की काय होते त्याचे उदाहरण खुद्द काँग्रेस मधूनच सुरू झालेले आहे. नेहरू यांचे बौद्ध धर्माविषयीचे obsession इथून त्याची सुरुवात आहे . भारतातली जनता प्रामुख्याने हिंदू आहे बौद्ध नाही याचा विसर खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच पडला होता . त्यांचे हे obsession मुळातच या काळातल्या बौद्ध धर्माच्या आंतरराष्ट्रीय गौरव्यामुळे आणि दबदब्यामुळे निर्माण झाले होते त्याचबरोबर हिंदू धर्माचा एक तिरस्कार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये नक्की होता . पण त्याला कारण त्यांच्या काळातला हिंदू धर्म होता या हिंदू धर्मातल्या चालीरीती होत्या. सोनिया गांधी यांचे तसे नाही त्यांचा मुळात जन्मदत्त धर्मच वेगळा आहे त्यामुळे यांचा अल्पसंख्यांकवाद हा मुस्लिम लोकांशी कमी आणि ख्रिश्चन रोमन कॅथॉलिक यांच्याशी जास्त जुळलेला आहे . अर्थात हे राजकारण समजून घेण्याची आता गरज वाटत नाही कारण मुळात ख्रिश्चन लोकांची संख्या तेवढी नाही त्या उलट मुस्लिम लोकांची संख्या मात्र प्रचंड वाढल्याने अचानकपणे आपणाला सगळा अल्पसंख्यांकवाद हा मुस्लिम संदर्भामध्ये दिसायला लागतो . दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की 1980 नंतर रोमन कॅथोलिक या धर्माने सुद्धा कुठे कुठे आणि कसे कसे किती किती अत्याचार केले आणि हे लोक गुलाम बनवण्यात किती एक्सपर्ट होते आणि यांची गुलामगिरी कशी कुठे कुठे ऑपरेट होत होती हे आता पुढे आलेले आहे त्यामुळे या धर्माला कॉन्व्हेंट स्कूल कल्चर मुळे आणि सेवाधर्म म्हणून त्याची जी या स्कूल्सने इमेज तयार केली होती त्यामुळे जी एक सहानभूतीची लकीरं होती ती आता राहिलेली नाही . 1920 नंतरच्या ख्रिश्चन धर्मामध्ये अडकून पडलेल्या लोकांना आणि त्यावेळच्या डायरेक्टिव्ह मध्ये अडकून पडलेल्या लोकांना हे कळणे अवघड आहे. त्यांना मुळात नवीन पिढीचा आवाज ऐकू येत नाही . हा आवाज शरद पवार यांना ऐकू आला आणि हा आवाज ऐकू येणे हे त्यांना महागात पडले. किंबहुना त्यांना हा आवाज ऐकू आलेला आहे याची कल्पना टाइम्स ऑफ इंडिया पासून सगळ्या ख्रिश्चन लोकांनी स्पॉन्सर केलेल्या वर्तमानपत्रांना आली आणि त्यांनी आपल्या मीडिया मधून शरद पवारांच्या विरोधात जितका प्रचार करता येणे शक्य होते तितका केला . एतदेशीय मराठी संस्कृतीला विरोध हे तर टाइम्स ऑफ इंडियाचे एक वैशिष्ट्यच होते अलीकडे ते थोडे अड्जस्ट झालेले आहेत परंतु ही ऍडजस्टमेंट आहे 


अजित पवार त्यामुळेच काकांमुळे का असेना पण काही प्रमाणात समजून घेत होते पण सेक्युलर ठसा इतका जोमदार होता की त्यातून नंतर आलेल्या नवोदत्तरी पिढीला सुद्धा बाहेर येता आलेले नाही . आता साहित्यिक आणि कलावंत लोक हे तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मागासलेले असतात की काय असा प्रश्न आता पडतो कारण समाज एका दिशेला आणि कलावंत एका दिशेला अशी सरळ सरळ फुट आपणाला नवदोत्तरी पिढीमध्ये दिसते . ज्या वेळेला समाज हिंदुत्ववादी बनत चालला होता तेव्हा हे लोक अधिकाधिक सेक्युलर बनत चालले होते कारण यातल्या प्रत्येकाला आंतरराष्ट्रीय मान्यतेची आणि हिंदी बेल्टच्या मान्यतेची प्रचंड गरज वाटते शिवाय समाजवादी आणि डावे असणे हे साहित्याच्या क्षेत्रात फायद्याचे असल्यामुळे त्यांच्याही मान्यतेची गरज भासते. याला कारण अर्थातच हिंदुत्ववादी लोकांचा कलेबद्दलचा दृष्टिकोन अतिशय पारंपारिक आणि आठव्या शतकात अडकलेला आहे त्यामुळे कधीही कुठलाही कलावंत असलेला शहाणा माणूस हिंदुत्ववादी होणे शक्य नाही . नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे लोक कलावंत असतील आणि ते जर का हिंदुत्ववादाला प्रतिनिधित्व देत असतील तर कोण हिंदुत्ववादाकडे कलावंत म्हणून आकर्षित होईल ? शरद राव माझे चांगले मित्र आहेत पण मैत्री एका बाजूला आणि वैचारिक दृष्टिकोन एका बाजूला ! त्यांचे नथुराम गोडसे यांचे समर्थन मला कधीच पटलेले नाही . आपण चुकलो तर चुकलो म्हणावे ती चूक कशी बरोबर होती हे सांगू नये पण अहंकार इतका मोठा की काय बोलावे ?


अशा या सगळ्या माहोल मध्ये अजित पवार राजकारण करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . त्यांच्या आसपास असणाऱ्या कुठल्याही नेत्यापेक्षा ते मुख्यमंत्रीपदाला अधिक लायक होते . शरद पवार यांनी निर्माण केलेली व्यवस्थापन शैली त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेली होती आणि ते त्याबाबतीत शरद पवार यांच्या इतकेच एक्सपर्ट होते . असे असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये हा महाराष्ट्राचा करंटेपणा म्हटला पाहिजे . वास्तविक शरद पवार यांनीच त्यांना जेव्हा एकदा संधी आली होती तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती कारण संधी वारंवार मिळत नाही हे शरद पवार यांना सुद्धा माहिती आहेच की ! माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की इथे शरद पवार चुकले आहेत आणि दुर्दैवाने नंतर पुन्हा अशी कधी संधी निर्माणच झाली नाही . दिल्ली मधल्या लोकांनी खरंतर अजित पवार यांचा गेम केला आणि हा गेम शरद पवार यांनी चालवून घेतला तो त्यांनी चालवून घ्यायला नको पाहिजे होता. 


अशावेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे मग दुसरा कुठला काही पर्याय आहे का ते चाचपणे . दुर्दैवाने असा पर्याय निर्माण झालाच नाही आणि अजित पवार यांच्या सगळ्या राजकारणाची गोची ही इथे आहे . त्यांच्या डोळ्या देखत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना असे वाटत होते की आपण निश्चितपणे एकनाथराव शिंदे यांच्या पेक्षा उजवे आहोत . आणि खरे सांगायचे तर ते खरे होते . जर का काकाने भाजपशी युती केली असती तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळाले असते . पण येथे सगळा आयडिया लॉजिकल लोच्या झाला . त्याची चर्चा मी आधीच्या लेखात केलेली आहे. 


हिंदुत्ववादाबाबत आमच्या पिढीचा सर्वात मोठा लोच्या हाच होता की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून काही आकाराला येईना . याचे सर्वात मोठे कारण ओबीसी आहेत हे लोक हिंदुत्ववादाकडे गेले नसते तर कदाचित धर्मनिरपेक्ष राजकारणाला बरे दिवस पुन्हा आले असते पण हे घडले नाही आणि याचवेळी नेमकी भाजपाने एक अशी खेळी केली की तिथे सगळेच पराभूत झाले ही खेळी म्हणजे नरेंद्र मोदी यांना ओबीसी म्हणून पुढे आणणे . आज अवस्था अशी आहे की समस्त वैश्य आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे मोदी यांच्या मागे ठामपणे उभा आहे . आणि याचे एकमेव कारण ते दोघांनाही आपल्या वर्ण जातीचे वाटतात. त्यातच त्यांनी निवडणुका लढवताना हर हर महादेव ही घोषणा केली अशी घोषणा करणारे ते पहिले पंतप्रधान होते आहेत बसवेश्वर यांच्यावर बोलणारे ते पहिले पंतप्रधान आहेत साहजिकच अशा अनेक गोष्टींचा अडवांटेज त्यांना मिळत गेला आणि याचा पूर्ण फायदा भाजपला होत गेला आत्ता सुद्धा आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी व्यवस्थित प्लेस केलेले आहे साहजिकच सर्वशैवलोक हे या दोघांच्या मागे गेले . आणि शक्यता अशीच आहे की बहुदा पुढेही जातील .


ही जी एक त्यामुळे हिंदुत्ववादी अपरिहार्यता निर्माण झाली तिच्याशी कसे अड्जस्ट करायचे हेच अजित पवार आणि शरद पवार यांना कळत नव्हते आणि त्यामुळेच एक कोलाहल निर्माण झाला आणि त्या कोलाहाला मुळेच अजितदादांची सर्वात मोठी गोची झाली . नाही म्हटले तरी अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपद कळत नकळत शरद पवार यांच्यामुळे दोनदा हुकले असा काहीतरी समज (ज्यामध्ये सत्य असण्याची बरी शक्यता आहे) अजित पवार यांचा झाला होता . त्यामुळे ते भाजपाला जॉईन झाले खरे परंतु त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता राहिली नाही. कारण तोपर्यंत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपणच दावेदार असल्याच्या थाटामध्ये पुन्हा एकदा राजकारण करू लागले म्हणजे एकनाथ शिंदे एकदा मुख्यमंत्रीपद भोगून झाल्यामुळे पुन्हा कधीतरी आपल्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देतील ही शक्यता संपली . भविष्यामध्ये त्यामुळेच भाजपचाच मुख्यमंत्री येणार हे स्पष्ट झाले आणि यामुळेच अजित पवार यांना हळूहळू का होईना परंतु आपल्याला पुन्हा काकाकडे परत गेल्याशिवाय पर्याय नाही जर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आले तर ते आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच येऊ शकते असे वाटायला लागले आणि यामध्ये बरेचसे तथ्य होते . ते अधिक जगते तर कदाचित पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एक झाली असती. आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोक आहेत त्यांना काही शरद पवार यांच्याशी देणे-घेणे नाही किंबहुना जिकडे सत्ता तिकडे यांचा मत्ता असेच यांचे धोरण आणि वातावरण असते. 


थोडक्यात काय महाराष्ट्राचा मुख्य नायक होण्याचे जे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले ते त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे होते परंतु नियतीने त्यांना हुलकावणी दिली हेच खरे . कवितेत एक वेळ हे सगळे पुन्हा प्राप्त होऊ शकते कारण कविता जिवंत असतात त्या पुढच्या पिढीत कर्तुत्वाच्या चुका दुरुस्त करू शकतात परंतु राजकारणामध्ये हे शक्य नसते एकदा सत्ता गेली की जातेच . त्या अर्थाने अजित पवार ही एक शोकांतिका आहे . Macbeth बनायला खूनी माणसाचे काळीज लागते ते अजितदादा यांच्याकडे कधीच नव्हते ते आतून अतिशय सॉफ्ट होते . माझ्या मते हेच खरे नायकाचे आणि म्हणून त्यांचे यश आहे . राजकारणातल्या त्यांच्या तडजोडी भविष्यात अधिकाधिक पुढे येत जाणार . अशा प्रकारच्या तडजोडी आमच्या पिढीने का केल्या हाही एक मुद्दा गडद होत जाणे अटळ आहे . खरे तर या सगळ्यावर कंगाल होणे हा उत्तम उपाय एकदा का कंगालच तुम्ही झाला की लोक तुमच्याकडे बोट करत नाही पण राजकारणात कंगाली काही कामाची नाही आणि म्हणूनच पैसे मिळवले पाहिजेत याची जाणीव त्यांना झाली होती. 


त्यांच्या मृत्युपत्रामध्ये जे काय आलेले आहे त्याविषयीच्या काही बातम्या येत आहेत मुख्य म्हणजे डिजिटल पैसा त्यांनी प्रचंड कमावला असा प्रवाद आलेला आहे या अंगाने त्यांनी मिळवलेला पैसा जवळ जवळ 11 अब्ज आहे आणि तो चक्क त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या इन्व्हेस्टमेंट सॉफ्टवेअरच्या साह्याने मिळवला असे समोर आलेले आहे . हा सगळा पैसा खेळता असल्याने त्याच्या बाबतीतल्या कायदेशीर गोष्टी कशा हे सांगणे आता अवघड आहे . मुळात हे खरे की खोटे हे सांगणेच अवघड आहे पण जर हे खरे असेल तर मात्र आमच्या पिढीत मिळालेला आणि झालेला हा एक उत्तम नायक होता असे म्हणायला हरकत नाही कारण केवळ राजकारण हे एकमेव क्षेत्र नाही त्याबरोबर अर्थकारण हे क्षेत्र येते आणि अर्थकारणामध्ये जर काही त्यांनी ही चमकदार कामगिरी केली असेल तर त्याला दाद दिलीच पाहिजे 


अजितदादा यांना आदरांजली ! 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय